Friday, December 26, 2025
Home Blog Page 430

नागपूरात धावणार भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक बस; तिकिटात मिळणार 30% सवलत

Electronic bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंत्रज्ञानातील प्रगती बघता आता इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अलीकडे रस्तावर इलेक्ट्रॉनच्या गाड्या धावताना दिसतात. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतामध्ये पहिली चार्जिंगवर चालणारी बस सुरु होणार असल्याची घोषणा केली. या बसमध्ये बसल्यानंतर विमानात बसल्यासारखा अनुभव येईल असे नितीन गडकरी म्हणाले. डिझेल बसपेक्षा कमी तिकीट असणारी इलेक्ट्रॉनिक बस नागपूरमध्ये धावणार असून, त्याचे तिकीट 30% कमी असणार आहे. केंद्रीय मंत्री यांच्या या भाष्यामुळे लोकांना मोठी उत्सुकता लागली आहे.

अतिक्रमण करणे सोडावे

नागपुरातील वाडी येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर लगेच वाडी नगर परिषदच्या इमारतीचा सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी लोकांना इलेक्ट्रॉनिक बस लवकरच नागपूर मधून धावणार असल्याचे सांगितले . एकेकाळी रोडवर ट्रकचे साम्राज्य होते. पण अलीकडच्या आधुनिकीकरणामुळे हे चित्र बदलले आहे. विकासासाठी नागरिकांनी अतिक्रमण करणे सोडावे, असे नितीन गडकरी म्हणाले .

वाहतूक कोंडी कमी होणार

विजेवर चालणाऱ्या या बसमुळे कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण कमी होईल. जी पर्यावरणास तसेच हरित ऊर्जा वापरण्यासाठी महत्वाची ठरू शकेल. या बसची खासियत म्हणजे, इतर बस पेक्षा इलेक्ट्रॉनिक बसचे तिकीट 30 % कमी असणार आहे. यामुळे प्रवाश्याना कमी खर्चात प्रवास करता येईल. या बस एलिव्हेटेड मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दीपासून या बसेस प्रवाशांना मुक्तता देणार आहेत. त्याचा फायदा शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. एकदा हि बस चार्जिंग केल्यास ती 50 किमी धावेल. विजेवर चालणारी एलिवेटेड बस सेवा देशातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे. हि बस 18 मीटर लांब असून, ती टाटा आणि स्कोडा या नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांच्या एकत्रीकरणातून विजेवर चालणारी खास बस तयार केली जाणार आहे.

ऍग्रो व्हिजन भूमिपूजन

ऍग्रो व्हिजन शेतकरीचे भूमिपूजन गडकरी याच्या हस्ते पार पडले. यावेळी या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत ते म्हणाले, फक्त खाद्य पिकांचे उत्पादन करू नका, त्यामुळे शेतकरी कधीच श्रीमंत होणार नाही. श्रीमंत होण्यासाठी बायोफ्यूल तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादन करावे. नागपूर या भागात कापूस, सोयाबीन आणि संत्री याचे उत्पादन जास्त आहे. पण शेतकऱ्यांना त्यामध्ये नफा होत नाही. त्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. लवकरच शेतकऱ्याचं मालाला चांगला भाव दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.

सदाभाऊ खोतांची पवारांवर जोरदार टीका; शरद पवारांचा केला अलीबाबा म्हणून उल्लेख

Sharad Pawar And sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकारणातील रणनितीनचा खेळ सुरु झाला आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर मोठयाप्रमाणात टीका करताना दिसत आहेत. सांगलीतील भाषणात भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रातला राजकाणातील शकुनी मामा असल्याचे वक्तव्य केलं होत , आणि आता पुन्हा एकदा खोतांनी त्यांना अलीबाबा म्हणजे मुस्लिमांचा सासरा असा उल्लेख करून त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत.

मुस्लिमांचा सासरा

गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाने धुमाकूळ घातला आहे . त्यातच आता अहमदनगरच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहावे यासाठी अनेक मुस्लीम बांधवानी पवारांजवळ मागणी केली होती . हा प्रकार पवार साहेबांच्या समोरच का व्हावा हा मोठा प्रश्न खोतांनी उपस्थित केला आहे. खोत म्हणतात कि, ज्यांनी या विषयावर दंगा केला , ज्यांनी मागणी केली . त्या सर्वांच्या लक्षात आलं कि ,आता आपला सासरा आलेला आहे. त्यामुळे जावयांनी तिथे आरोळी दिली कि अहमदनगरचे नाव अहमदनगरच करा . पण खोत म्हणतात कि अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगरच असेल. ते बदलायची हिंमत अजून कोणाच्या बापात नाही . असे बोलून पवारांवर जोरदार टीका केल्या आहेत.

खोतांनी पवारांवर केल्या टीका

पुण्यसुलक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. हे राज्य ,हा देश उभा करण्याचं काम केलं आहे . औद्योगिक तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. हिंदुत्वाची पताका फडकवत ठेवण्याचं काम सुभेदार मल्हारराव होळकरांच्या नंतर ती परंपरा खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी यांनी चालवली होती . पण पवार साहेबाना याची जाणीव नसून , जर पवार साहेब बोलले तर जावई रुसतील . जर जावई रुसले तर विधानसभेला घराला पाठवतील अशी भीती पवारांच्या मनात आली असावी असे वक्तव्य खोतांनी मीडिया सोमोर केले आहे.

10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा हा फोन; मिळेल 128GB स्टोरेज आणि 5000 mAh बॅटरी

POCO M6 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे आता त्यात मोबाईलची देखील भर पडलेली आहे. कोणताही माणूस हा मोबाईल शिवाय राहत नाही. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र निवाऱ्याची माणसाला गरज असते. त्याचप्रमाणे मोबाईलची देखील गरज असते. बाजारात देखील आता वेगवेगळ्या प्रकारचे नवीन मोबाईल उपलब्ध झालेले आहेत. आणि सध्या भारतामध्ये सणासुदीचे दिवस चालू झालेले आहे. तोंडावर दसरा आणि दिवाळी आलेले आहेत. त्यामुळे अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी सेल चालू केलेले आहेत. असेच आता फ्लिपकार्टवर एक मोठा वार्षिक सेल चालू झालेला आहे या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोनवर चांगल्या प्रकारे तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. जर दहा हजार रुपयांपर्यंत तुमचे बजेट असेल आणि तुम्हाला एक चांगला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण अशाच एका मोबाईल फोनबद्दल जाणून घेणार आहोत.

फोनची किंमत 9,249 रुपये

हा फोन POCO M6 5G आहे, जो किफायतशीर किमतीत चांगल्या फीचर्ससह येतो. त्याचा 4GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,249 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक आणि नो-कॉस्ट-ईएमआयची सुविधा देखील आहे. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट या डीलमध्ये एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. सर्व ऑफर एकत्र केल्यास, प्रभावी किंमत खूपच कमी होते.

डिस्प्ले आणि प्रोसेसर

फोनमध्ये 6.74 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90 Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण मिळाले आहे. फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimension 6100 Plus चिपसेट देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कॅमेरा

यात 18W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी आहे. मागील पॅनलवर 50MP प्राथमिक सेन्सर आणि सेल्फीसाठी 5MP सेंसर देण्यात आला आहे. ओरियन ब्लू आणि गॅलेक्टिक ब्लॅक रंगांमध्ये फोन खरेदी करता येईल. यात Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी अपग्रेड करण्यायोग्य आहे.

Pune To Mumbai New Expressway | मुंबई ते पुणे प्रवास करता येणार अवघ्या 90 मिनिटात; तयार होणार नवीन एक्सप्रेस वे

Pune To Mumbai New Expressway

Pune To Mumbai New Expressway | जे लोक मुंबई ते पुणे दरम्यान रोज प्रवास करतात. त्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भविष्यात जाऊन या दोन्ही शहरात दरम्यानचा प्रवास आणखी सोपा आणि सुलभ होणार आहे. कारण आता मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त दीड तासाच्या अंतरावर करता येणार आहे. याबाबतची घोषणा स्वतः केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे हा प्रवास करणे इथून पुढे नागरिकांना अगदी सोयीचे आणि अगदी तासाभराच्या अंतरावर होणार आहे.

जर एखाद्या व्यक्तीला पुण्यावरून मुंबईला जायचे असेल, किंवा मुंबईवरून पुण्याला तरी यायचे म्हटले, तरी दोन-तीन तास सहज जातात ट्राफिकमध्ये तसेच इतर सगळ्या गोष्टींमध्ये जास्त वेळ जातो. आणि कधी कधी हा प्रवास चार-पाच तासांवरही जातो. परंतु इथून पुढे ही समस्या अजिबात राहणार नाही. कारण या एक्सप्रेस वेचे काम लवकरच सुरू होणार आहे. नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिलेली आहे. तसेच मुंबई ते बेंगलोर दरम्यान देखील एक नवीन मार्ग तयार होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. या नवीन एक्सप्रेस वे प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई येथील अटल सेतूच्या पुढे मुंबई ते पुणे या द्रुतगति महामार्गाला समांतर असा नवीन मार्ग बांधला जाणार आहे.

हा मार्ग पुणे, सातारा, सांगली, बेळगाव आणि बंगलोर पर्यंत जाणार आहे. या महामार्गांपैकी 307 किलोमीटरचा अंतर हे आपल्या राज्यातील असणार आहे. तर उरलेले 493 किलोमीटरचा अंतर हे कर्नाटक राज्यातील असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला मुंबईवरून पुण्याला यायला केवळ दीड तास लागणार आहे. आणि इथून पुढे पाच तासांमध्ये तुम्हाला बेंगलुरु गाठता येणार आहे. अशी माहिती देण्यात आलेली आहे. आणि या प्रकल्पासाठी तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलेली आहे. गडकरी यांनी सांगितलेल्या नुसार या महामार्गाचे दहा हजार कोटी रुपयांचे पहिले काम महिन्याभरात सुरू होणार आहे. आणि उर्वरित पन्नास हजार कोटी रुपयांचे काम हे सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. म्हणजेच येथे वर्षभरात आपल्याला हा नवीन महामार्ग पाहायला मिळणार आहे.

मुंबई, बेंगलोर, पुणे या शहरांचा प्रवासा अतिशय वेगवान व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेल्या आहे. ही तिन्ही शहरे वाहतुकीच्या दृष्टीने तसेच आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची शहरे आहेत. या शहरा दरम्यान अधिक नागरिक दररोज प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांचा हा प्रवास सुलभ करण्यासाठी आता एक नवीन महामार्ग तयार होणार आहे. मुंबई ते पुणे हा प्रवास केवळ 90 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. असा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे. आणि येत्या महिन्याभरातच या महामार्गाचे काम देखील चालू होणार आहे.

SSC GD Constable Bharti 2024 | SSC GD अंतर्गत 39,481 पदांसाठी भरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

SSC GD Constable Bharti 2024

SSC GD Constable Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ती म्हणजे आता स्टाफ सिलेक्शन कमिशन यांनी एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल आणि रायफलमन जनरल ड्युटी (SSC GD Constable Bharti 2024) या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 39,481 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करायचे आहेत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 5 सप्टेंबर पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच 14 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | SSC GD Constable Bharti 2024

या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल जीडी आणि रायफलमन जीडी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 39 हजार 481 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्ष दरम्यान असणे खूप गरजेचे आहे

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

शैक्षणिक पात्रता | SSC GD Constable Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

5 सप्टेंबर 2024 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये एवढे अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज कसा करावा ? | SSC GD Constable Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 14 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या घटली; 2024 मधील आकडेवारी समोर

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg | महाराष्ट्रमध्ये अनेक नवनवीन प्रकल्प झालेले आहे. त्यातीलच एक सगळ्यात मोठा प्रकल्प हा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) आहे. हा नागपूर ते मुंबईला जोडणारा एक सगळ्यात मोठा महामार्ग आहे. 2022 मध्ये या महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे लोकांनी लोकार्पण देखील करण्यात आले होते. परंतु त्यानंतर हा समृद्धी महामार्ग अपघाताचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला. कारण या समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. परंतु गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत आता या समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात 19 टक्के अपघाताची संख्या कमी झालेली आहे. यामध्ये 33% जीवित हानी देखील कमी झालेली आहे आणि जखमींची संख्या देखील कमी झालेली आहे.

हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) चालू झाल्यानंतर वर्षभरातच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडू लागले. त्यानंतर अनेक पूजा पाठ देखील करण्यात आले. परंतु 2023 पेक्षा 2024 मध्ये अपघाताची संख्या खूप कमी झालेली आहे. या महामार्गावर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आणि त्यानंतर या अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.

या समृद्धी महामार्गावर गेल्या वर्षभरात 134 अपघात झालेले आहे. ज्यामध्ये 151 जणांचा बळी गेलेला आहे. यामध्ये 81 हे अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते, तर 42 गंभीर जखमी झाले होते. यामध्ये 55 लोक किरकोळ जखमी झाले होते. तसेच कोणतीही जखम न झालेल्या अपघातांची संख्या 14 होती.

समृद्धी महामार्गावर जानेवारी ते ऑगस्ट 2023 मध्ये 8 महिन्यात 103 अपघात झाले होते. यामध्ये 120 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 63 गंभीर अपघात होते. 30 लोक यामध्ये जखमी झालेले होते, तर 40 लोक किरकोळ जखमी झालेले होते. तसेच कुणीही जखमी न झालेल्या अपघातांची संख्या 8 होती.

त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2024 या 8 महिन्याच्या कालावधीत समृद्धी महामार्गावर 83 अपघात झाले. त्यात 80 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये 57 हे गंभीर अपघात होते 39 लोक गंभीर जखमी झालेले होते. यामध्ये 17 लोक किरकोळ जखमी झालेले होते, तर काहीही जखम न झालेल्या अपघातांची संख्या तीन होती.

ही आकडेवारी लक्षात घेतली तर समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृत्यूचे प्रमाण हे 33 टक्क्यांनी कमी झालेले आहे. तर गंभीरित्या जखमी होणाऱ्यांची संख्या 30 टक्क्यांनी घटलेली आहे. किरकोळ जखम होणाऱ्यांची संख्या ही 58 टक्क्यांनी कमी झालेली आहे.

Mukhymantri Ladki Bahin Yojana | महिलांना ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये मिळण्यास सुरुवात; चेक करा नाव

Mukhymantri Ladki Bahin Yojana

Mukhymantri Ladki Bahin Yojana | सध्या संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा चालू आहे. महाराष्ट्र सरकारने जुलैपासून ही योजना चालू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना 15000 रुपये दर महिन्याला मिळतात. नुकताच या योजनेचा तिसरा हप्ता सरकारने महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे. अशातच आता दसरा आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधी देण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे आता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे.

या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले होते की, दिवाळी आधी महिलांना भाऊबीज देणार आहेत. म्हणजेच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र महिलांच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि पात्र महिलांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी हे 4 हजार रुपये जमा होणार आहेत.

महिलांना मिळाले 7500 रुपये | Mukhymantri Ladki Bahin Yojana

सरकारच्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण (Mukhymantri Ladki Bahin Yojana ) योजनेअंतर्गत पत्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत होते. आतापर्यंत या योजनेसाठी कोट्यावधी महिला पात्र ठरलेल्या आहेत. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांना मिळालेला आहे. आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील एकत्र मिळणार आहे. त्यामुळे महिलांची दिवाळी यावर्षी चांगली साजरी होणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत महिलांना 4500 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळाले आहेत.

केवायसी करणे गरजेचे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र महिलांचे बँक खात्याला त्यांच्या आधार कार्ड क्रमांक लिंक असणे खूप गरजेचे असते. त्यांचा आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही, त्यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे जर तुमचे आधार केवायसी नसेल, तर ते लवकरात लवकर करून घ्या. असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे.

Mumbai To Latur Train : मुंबई ते लातूर साप्ताहिक ट्रेन सुरु होणार; पहा कसा असेल रूट

Mumbai To Latur Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून , त्याला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच लोक शिक्षण , व्यवसाय आणि इतर कारणासाठी या ठिकाणी राहत असल्याचे दिसून येते . प्रवासाला लागणाऱ्या कालावधीमुळे कित्येक लोकांना आपल्या मूळ गावी जाण्याचा योगच येत नाही . त्यात दसरा आणि दिवाळी आली आहे . यासाठीच भारतीय रेल्वेने ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान CSMT लातूर आठवड्याला रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हि ट्रेन (Mumbai To Latur Train) प्रत्येक शनिवारी धावणार असून , ज्यामुळे मुंबई आणि लातूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ट्रेन थांबण्याची ठिकाणे –

19 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2024 पासून मुंबई ते लातूर रेल्वे धावणार असून , ती प्रत्येक शनिवारी रात्री 12:30 मुंबईहून निघेल आणि सकाळी 11:40 पर्यंत लातूर मध्ये पोहचणार आहे. नंतर ती ट्रेन 4:30 वाजता लातूरहून निघून दुसऱ्या दिवशी 4:10 पोहचेल . या ट्रेनच्या जाण्याच्या आणि येण्याच्या प्रवासात ती दादर, ठाणे , कल्याण, लोणावळा , पुणे , उरुळी, दौंड , भिगवण,जेऊर, केम, कुर्डुवाडी, बारशी , उस्मानाबाद, हरंगुळ या ठिकाणी थांबणार आहे.

ट्रेनमधील सुविधा –

या ट्रेनमध्ये दोन AC-III टियर कोचची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवाश्याना आरामदायी अनुभव मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना आठ स्लीपर क्लास कोच असणार आहेत. त्याचबरोबर या ट्रेनमध्ये आरक्षित सीट्स उपलब्ध असून , आठ सेकंड क्लास कोच उपलब्ध आहेत. काही सीट्स या आरक्षित नसून कोणत्याही प्रवाशाला बसता येईल. सुरक्षितता आणि सुरळीत कार्यासाठी दोन सीट्स गार्डसाठी असणार आहेत.

आरक्षण आणि बुकिंग –

हि सेवा कमी पैशामध्ये प्राप्त होणार आहे. तिकीट काढण्यासाठी मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून तिकीट बुक करता येईल . त्यासंदर्भात सर्व माहिती IRCTC वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध होईल. दुसरा पर्याय म्हणजे स्टेशनवर जाऊन तिकीट काढता येईल.

Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था मुंबई अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024| नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीचे असेच एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. ती म्हणजे रयत शिक्षण संस्था मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी आहे या पदांच्या एकूण 60 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. ही मुलाखत 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024

रयत शिक्षण संस्था मुंबई अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या रिक्त जागा आहेत.

पदसंख्या

सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या एकूण 60 रिक्त जागा आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्जशुल्क

या भरतीसाठी तुम्हाला 100 रुपये एवढे अर्ज शुल्क द्यावे लागेल.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी तुम्हाला मुलाखत द्यावी लागेल आणि त्यानंतरच तुमची निवड केली जाईल.

मुलाखतीचा पत्ता

महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य विद्यालय पनवेल जिल्हा रायगड

मुलाखतीची तारीख

9 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.

निवड प्रक्रिया | Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024

  • या भरतीसाठी तुमची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
  • वर्णमूद केलेल्या पत्त्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • मुलाखतीला जाताना सगळी कागदपत्रात जाऊन बरोबर घ्यायची आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Date Palm Farming Tips | अशाप्रकारे करा खजुराची शेती, कमी वेळात मिळेल चांगले उत्पन्न

Date Palm Farming Tips

Date Palm Farming Tips | आजकाल अनेक शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या पिकांची लागवड करत आहेत. ज्यातून त्यांना खूप चांगला नफा देखील मिळत आहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे खजुराची शेती भारतातील अनेक राज्यांमध्ये खजुराची लागवड केली जाते.आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळत आहे. भारतातील राजस्थान, तमिळनाडू, केरळ आणि गुजरातमधील अनेक शेतकरी हे खजुराची लागवड करत असतात. खजुराला वर्षभर बाजारात खूप मागणी असते खजुरामध्ये अनेक पोषक तत्व असतात. तसेच खजूर खराब देखील होत नाही. याची फळे देखील तुम्ही वाळवू शकता. यामुळे खजुराला (Date Palm Farming Tips) खूप जास्त मागणी असते. आता ही शेती कशाप्रकारे करायची हे आपण जाणून घेऊया.

योग्य हवामान | Date Palm Farming Tips

खजुराच्या लागवडीसाठी कोरडे हवामान सर्वात योग्य मानले जाते. त्याच्या पिकाला कमी पाऊस लागतो, म्हणून कोरड्या वाळवंटी भागात खजूराचे उत्पादन सर्वाधिक होते. त्याच्या रोपांना योग्य प्रकारे वाढण्यासाठी भरपूर प्रकाश आवश्यक आहे. त्याच वेळी, तीव्र सर्दी त्याच्या झाडांना हानी पोहोचवू शकते. त्याच्या झाडांना 30 अंश तापमानाची आवश्यकता असते आणि फळे पिकण्यासाठी 45 अंश तापमान आवश्यक असते. खजुराच्या रोपाची उंची सुमारे 25 मीटर असू शकते.

योग्य माती

वालुकामय व भुसभुशीत जमीन खजूर लागवडीसाठी योग्य मानली जाते. त्याच्या शेतातील मातीचा निचरा योग्य असावा. 2 ते 3 मीटरपर्यंतच्या खडकाळ जमिनीवर शेतकरी खजूर लागवड करू शकत नाहीत. त्याच्या लागवडीसाठी, जमिनीची pH पातळी 7 ते 8 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

सुधारित जाती | Date Palm Farming Tips

खजूर जाती नर आणि मादी वाणांमध्ये विभागल्या जातात. त्याची बार्ही ही जात सर्वाधिक उत्पन्न देणारी म्हणून ओळखली जाते. या जातीची झाडे खूप वेगाने वाढतात परंतु त्याची फळे उशिरा पिकतात. एका झाडापासून सुमारे ७० ते १०० किलो फळे येतात. याच्या फळांचा आकार अंडाकृती असून रंग पिवळा असतो. मादी खजुराच्या जातींमध्ये बाराही, खुनेजी, हिलावी, जामली, खडरावी आणि मेदजूल यांचा समावेश होतो. त्याच वेळी, खजुराच्या नर जातीला फक्त फुले येतात आणि फळे येत नाहीत. खजूरांच्या नर जातींमध्ये धानामी, मदासरिमेल यांचा समावेश होतो.

या पद्धतीचा वापर करून झाड लावा

खजूराची रोपे लावण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात एक मीटर अंतरावर खड्डे तयार करावेत. यामध्ये तुम्ही योग्य प्रमाणात शेणखत मातीत मिसळावे. खजुराची रोपे रोपवाटिकेतून विकत घेऊन खड्ड्यात लावावीत. तुम्ही एक एकर जागेत सुमारे ७० खजुराची रोपे लावू शकता. प्रत्यारोपणापासून सुमारे 3 वर्षांनी वनस्पती उत्पन्न देण्यास सुरुवात करते.

पाम वृक्षांचे सिंचन

खजुराच्या झाडांना कमी सिंचनाची गरज असते. उन्हाळी हंगामात, आपण महिन्यातून फक्त 15 ते 20 दिवस झाडाला पाणी द्यावे. हिवाळ्यात फक्त एकदाच या वनस्पतीसाठी सिंचन योग्य आहे.