Thursday, December 18, 2025
Home Blog Page 43

PM Dhan Dhanya Yojana : शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना; बळीराजाची चिंता मिटणार

PM Dhan Dhanya Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Dhan Dhanya Yojana । देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं, शेती करताना त्याला जास्त कष्ट लागू नये यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सध्या शेतकरी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून ६००० रुपयांची मदत सूर आहे. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक नवीन योजना सुरु केली आहे. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना असं या योजनेचं नाव आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आज या योजनेला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा एकूण खर्च २४,००० कोटी रुपये प्रतिवर्ष इतका असून तब्बल १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

काय आहे पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना? PM Dhan Dhanya Yojana

पीएम धन धान्य कृषी योजनेअंतर्गत शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या विविध 36 योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाईल. यामध्ये देशभरातील १०० जिल्ह्यांचा समावेश असेल. कमी उत्पादकता, पिकांची कमी पेरणी आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज उपलब्धता असलेल्या जिल्हयांना या योजनेत (PM Dhan Dhanya Yojana) स्थान मिळेल. या योजनेअंतर्गत, पीक विविधीकरण, शाश्वत आणि हवामान-लवचिक शेतीवर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय, कापणीनंतरची साठवण क्षमता वाढवण्यावर आणि तंत्रज्ञान सुधारण्यावरही भर दिला जाईल.

याशिवाय पंतप्रधान धन-धन कृषी योजनेअंतर्गत (PM Dhan Dhanya Yojana) शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं, बी-बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाईल. तसेच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल? यावरही काम केलं जाईल. यासोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठीही अर्थसहाय्य केले जाईल.

योजनेचा मुख्य उद्देश काय ?

या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना मदत करणे
शेतीत सुधारणा घडवून आणणे
शेतीचे उत्पादन वाढवणे.
शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्यास प्रोत्साहन देणे.
ग्रामपंचायत आणि गट स्तरावर धान्य साठवण्याची सोय वाढवणे.
सिंचनाच्या सोयी सुधारणे
शेतकऱ्यांना कमी आणि दीर्घ मुदतीचे कर्ज सहज उपलब्ध करून देणे.

आता पाळीव प्राण्यांशीही बोलता येणार; AI चा नवा कारनामा

man with pets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात अनेकजण आपल्या घरात पाळीव प्राणी पाळतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस अशी अनेक पाळीव प्राणी तुमच्याही घरात असेल. पाळीव प्राणी हा घरातील सदस्यासारखाच असतो ज्याची आपण भरपूर काळजी घेतो. परंतु कधी कधी तुमच्या घरातील कुत्रा किंवा मांजर दुखी असेल तर आपल्याला ते समजू शकत नाही… कारण त्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही आणि आपण त्याच्यासारखं बोलू शकत नाही… यामुळे पाळीव प्राण्याच्या दुःख आणि वेदना समजणं, त्याच्यासोबत मनसोक्त वेळ घालवणं शक्य नसते. मात्र आता ही चिंता सुद्धा मिटणार आहे. AI च्या माध्यमातून आता पाळीव प्राण्यांशीही बोलता येणार आहे.

आर्टिफिशल इंटेलिजंस अर्थात AI च फॅड मागच्या काही दिवसात खूपच वाढलं आहे. AI मुळे जवळपास सर्वच क्षेत्रातील कामे सोप्पी बनली आहेत. AI मुळे माणसाला जास्त ताण घ्यावा लागत नाही. जर कोणतीही माहिती हवी असेल तर आपण AI चा करतोय. येत्या काळात AI संशोधन क्षेत्रातही खूप मोठी कमाल करेल असं बोललं जात आहे. आता तर एआयच्या मदतीने प्राण्यांच्या भावना समजून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) ने प्राण्यांचे शब्द समजून घेण्यासाठी एक विशेष केंद्र उघडले आहे. या केंद्राचे नाव जेरेमी कॉलर सेंटर फॉर अ‍ॅनिमल सेंटिअन्स असून ते ३० सप्टेंबर २०२५ पासून काम सुरू करेल.

मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संबंध सखोलपणे समजून घेणे हाच या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. यासाठी तब्बल ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की एआयच्या मदतीने पाळीव प्राण्यांशी बोलणे सोपे होईल. आगामी काळात, एआय ट्रान्सलेटर अॅप्सच्या मदतीने, तुमचा कुत्रा, मांजर किंवा कोणताही प्राणी काय अनुभवत आहे हे तुम्हाला कळेल. ज्या व्यक्तींना त्यांच्या पाळीव प्राण्यांशी बोलायचे आहे आणि त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरेल. पाळीव प्राण्यांसोबतच शास्त्रज्ञ कीटक, खेकडे आणि कटलफिश सारख्या प्राण्यांवरही संशोधन करतील.

मात्र यामध्ये काही धोके सुद्धा आहेत. याबाबत प्राध्यापक जोनाथन बर्च म्हणतात की एआय आपल्याला आपल्याला आवडणारी माहिती देते. अशा परिस्थितीत, एआय कधीकधी खोटे बोलू शकते .. समजा एखादा पाळीव प्राणी दुखी आहे… परंतु एआय तो आनंदी आहे असेही सांगू शकते. यामुळे पाळीव प्राण्यांच्या काळजीवर परिणाम होऊ शकतो.

Kia Carens Clavis EV : 490 KM रेंजसह Kia ने लाँच केली 7 सीटर इलेक्ट्रिक कार

Kia Carens Clavis EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Kia Carens Clavis EV । एकीकडे संपूर्ण भारतात टेस्लाच्या च्या इलेक्ट्रिक कार शोरुमची चर्चा असताना दुसरीकडे दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. Kia Carens Clavis EV असं या इलेक्ट्रिक कारचे नाव असून हि एक ७ सीटर MPV कार आहे. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत १७.९९ लाख रुपये असून टॉप मॉडेल साठी ग्राहकांना २४.४९ लाख रुपये मोजावे लागतील. फॅमिलीसाठी हि कार म्हणजे सर्वात बेस्ट पर्याय मानला जात आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि रेंज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लूक आणि डिझाइनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, Kia ची हि इलेक्ट्रिक कार (Kia Carens Clavis EV ) यापूर्वी लाँच झालेल्या पेट्रोल- डिझेल वाहनासारखीच दिसते. यात समोरील बाजूला आइस-क्यूब पॅटर्न असलेले हेडलाइट्स आणि स्लिम एलईडी लाईट बघायला मिळतात. तसेच नवीन ICE-क्यूब्ड LED फॉग लॅम्प आणि खालच्या बंपरवर एक नवीन सिल्व्हर ट्रिम देखील आहे. गाडीचे चार्जिंग पोर्ट MPV कारच्या पुढच्या बाजूला तुम्हाला दिसेल. गाडीच्या केबिनमध्ये १२.३-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि १२.३-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेसह ड्युअल-स्क्रीन सेटअप आहे.

बॅटरी आणि रेंज – Kia Carens Clavis EV

Kia च्या या इलेक्ट्रिक कारला २ बॅटरी पॅकचा पर्याय दिला जात आहे. यातील एक बॅटरी पॅक 42kWh युनिट असून ती 404 किलोमीटर रेंज देते, तर दुसरा बॅटरी पॅक 51.4kWh युनिटचा असून यामाध्यमातून कियाची कार तब्बल 490 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करू शकते. कंपनीचा दावा आहे कि हि इलेक्ट्रिक कार फक्त ३९ मिनिटांत १०% ते ८०% पर्यंत चार्ज होते, आणि अवघ्या ८.४ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडते. कार मध्ये ४-लेव्हल रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि स्टीअरिंग कॉलम-माउंटेड ड्राइव्ह सिलेक्टर देखील आहे. ज्याच्या मदतीने वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीनुसार ड्रायव्हिंग मोड चेंज करू शकता.

अन्य फीचर्स –

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास किया च्या इलेक्ट्रिक कार मध्ये (Kia Carens Clavis EV ) व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, पॅनोरॅमिक सनरूफ, प्रीमियम बोस साउंड सिस्टम, ४-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ६ एअरबॅग्ज, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी फीचर्स मिळतात.

Khuldabad Name Change : औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलणार??

Khuldabad Name Change

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Khuldabad Name Change । औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केल्यानंतर मराठवाड्यातील आणखी एका शहराचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. हे शहर दुसरं तिसरं कोणतेही नसून औरंगजेबाची कंबर असलेलं खुलताबाद (Khuldabad) आहे. या खुलताबाद शहराचे नामांतर रत्नापूर करण्यात यावं अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर (Sanjay kenekar) यांनी केली आहे. याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना पत्र पाठवणार असल्याची माहितीही संजय केणेकर यांनी दिली.

औरंगजेबाचे नाव पाहतो तेव्हा रक्त खवळते Khuldabad Name Change-

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय केणेकर म्हणाले, आपल्या भारतावर ज्या ज्या आक्रमकांनी राज्य केलं आहे, मग तो आदिलशाह असो, निजामशाह असो वा इतर मुघल किंवा इंग्रज असो, या सर्वांचा इतिहास जागविण्याचे काम काँग्रेसने केलं आहे. परंतु हा इतिहास मिटविण्याचे काम आम्ही करू. वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे आहे, मात्र याठिकाणी शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लपवण्यात आला आहे. आणि आक्रमण ज्यांनी केलं त्यांचा इतिहास जागवण्यात आलं आहे. जेव्हा मी खुलताबादला जातो आणि तिथे औरंगजेबाचे नाव पाहतो, तेव्हा माझे रक्त खवळते. त्यामुळेच खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर असे करण्याची मागणी (Khuldabad Name Change) मी करणार आहे.

ते पुढे म्हणाले, एवढच नव्हे तर संभाजी महाराज आणि त्यांचे साथीदार संताजी घोरपडे, दादाजी जाधव आणि ताराबाई राणी यांसारख्या वीरांनी औरंगजेबाविरुद्ध हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला, औरंगजेबाला गाडण्याचे काम केलं, त्याच्या विचारांना गाडण्याचे काम केलं . त्यामुळे या वीरांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी, त्यांच्या शौर्याचे जतन करण्यासाठी रत्नपूर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य दिव्य आणि विशाल पुतळा उभारण्यात यावा अशा मागणीचे पत्र आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठवणार असल्याची माहिती संजय केणेकर यांनी दिली आहे.

Mumbai-Pune Missing Link Project : मुंबई- पुणे अंतर 30 मिनिटांनी कमी होणार; मिसिंग लिंक प्रोजेक्ट गेमचेंजर ठरणार

Mumbai-Pune Missing Link Project

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai-Pune Missing Link Project । मुंबई आणि पुणे हि महाराष्ट्रातील २ मोठी शहरे.. एक शिक्षणाचे माहेरघर तर दुसरं नोकरीसाठी सर्वोत्तम शहर… दोन्ही शहरात राहणाऱ्या लोकांच्या संख्या जास्त असली तरी दोन्ही शहरातून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही खूप आहे. मात्र खंडाळा घाट परिसर आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे मुंबईवरून पुण्याला जायला खूप वेळ लागतो. साहजिकच, चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु आता चिंता करू नका, मुंबई-पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक प्रोजेक्ट जवळपास ९४ टक्के पूर्ण झाला आहे. येत्या काही दिवसांतच हा पूल प्रवाशांच्या सेवेत येणार असून यामुळे मुंबई ते पुणे नंतर ३० मिनिटांनी कमी होणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प (Mumbai-Pune Missing Link project) उभारण्यात आला आहे. मिसिंग लिंक जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे. तसेच सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून वाहतूक सुपरफास्ट आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय होणार आहे. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता.. यानंतर त्याला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत 2025 पर्यंत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीस यांनी म्हंटल कि, नवीन मार्गामुळे एक्सप्रेस वेच्या घाट (टेकडी) भागात होणारी मोठी वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होण्यास मदत होईल. प्रवाशांच्या इंधनाची आणि वेळेची बचतही होईल.

काय आहेत वैशिष्ट्ये? Mumbai-Pune Missing Link Project

या मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे. यातील पहिला बोगदा 8.92 किमी, तर दुसरा बोगदा 1.75 किमीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा ठरू शकतो. तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे. देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार आहे. प्रगत बांधकाम पद्धती आणि सुरक्षा व्यवस्था तंत्रज्ञान वापरून हा प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प (Mumbai-Pune Missing Link Project) सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे.

Pune Vande Bharat Express : पुण्याला मिळणार 4 वंदे भारत ट्रेन!! कुठून कशी धावणार पहा

Pune Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Vande Bharat Express । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे उत्तम ठिकाण म्हणून पुणे शहराला ओळखलं जाते. पुण्यात शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त देशाच्या विविध ठिकाणावरून लोक येत असतात. साहजिकच पुणे हे वाहतुकीचे सेन्टर ठरत आहेत. पुण्याला येण्यासाठी एसटी बस, ट्रॅव्हल्स, रेल्वे आणि विमानाची सुविधा आहे. पुण्याला २ वंदे भारत ट्रेनही जोडण्यात आलेल्या आहेत. आता पुण्याला आणखी ४ वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. त्यामुळे पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढण्यास नक्कीच मदत होईल.

कोणकोणत्या वंदे भारत ट्रेन पुण्याला जोडणार – Pune Vande Bharat Express

१) पुणे-शेगाव वंदे भारत- दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे थांबे समाविष्ट आहेत.

२) पुणे-वडोदरा वंदे भारत: हि वंदे भारत एक्सप्रेस लोणावळा, पनवेल, वापी आणि सुरत या स्थानकांवर थांबेल. या नव्या वंदे भारत ट्रेनमुळे पुणे- वडोदरा प्रवासाचा वेळ ९ तासांवरून ६-७ तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. (Pune Vande Bharat Express)

३) पुणे-सिकंदराबाद वंदे भारत: हि वंदे भारत ट्रेन दौंड, सोलापूर आणि गुलबर्गा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ २-३ तासांनी वाचेल.

४) पुणे-बेळगाव वंदे भारत: हि वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्रातून प्रवास करेल. सातारा, सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकावर या ट्रेनला थांबा मिळण्याची शक्यता आहे.या एक्सप्रेसमुळं प्रवासाचा वेळ दोन-तीन तासांनी कमी होऊ शकते. या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांची किंमत १,५०० ते २,००० रुपयांपर्यंत असण्याची अपेक्षा आहे.

सध्या पुणे शहरातुन २ वंदे भारत ट्रेन धावतात. आता आणखी ४ वंदे भारत एक्सप्रेस पुण्यातून धावणार असल्याने पुणेकरांचा प्रवास सोप्पा होण्यास मदत होईल. लांबच्या पल्ल्यावरून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. दरम्यान, रेल्वे पुणे – नागपूर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. प्रवाशांसाठी प्रवास सुलभ करणे, जोडलेल्या प्रदेशांमध्ये पर्यटनाला चालना देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

Cheapest Tourism Places : 1500 रुपयांच्या खर्चात करा परदेशात सफर; जगातील सर्वात स्वस्त पर्यटन स्थळ

Cheapest Tourism Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Cheapest Tourism Places। परदेशात पर्यटन करायचं म्हंटल कि खर्चिक बाब आली. परदेशातील जेवण खाणं, राहण्याची सोय, तिथलं फिरणे हे भारतीय रुपयांच्या तुलनेत खूपच महाग.. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही परदेशात जात नाहीत.. परंतु आता चिंता करू नका, आम्ही तुम्हाला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी तुम्ही अवघ्या १५०० रुपयांत एका दिवसाची सफर करू शकता. तुम्हाला राहण्या- खाण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाही…

आम्ही तुम्हाला ज्या पर्यटन स्थळाबद्दल सांगत आहोत त्याच नाव आहे लाओस (Laos) .. हा देश आग्नेय आशियात आहेत. एक सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला हा देश स्वस्त पर्यटनासाठी ओळखला जातो. इथलं राहणे, खाणे आणि फिरणे इतकं स्वस्त आहे कि दुसऱ्या देशातील लोक याठिकाणी आवर्जून येतात. ;लाओस मध्ये राहण्याचा खर्च दिवसाला ४०० ते ५०० रुपये आहे. जेवणाचा खर्च ३०० ते ५०० रुपये आणि स्थानिक ठिकाणांना भेट देण्यासाठी वाहतुकीचा खर्चही ३०० रुपयांपर्यंत आहे.. एकूणच काय तर दररोज १२०० ते १५०० रुपयांत तुम्ही एका दिवसाचे पर्यटन सुरु शकता.

कोणकोणती पर्यटन स्थळे – Cheapest Tourism Places

लाओस मध्ये अनेक आकर्षक अशी पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये कुयांग समुद्री धबधबा, मेकाँग नदी, ४००० बेटे, कायाकिंग, ट्रेकिंग, ट्यूबिंग, गुहा टूर तुम्ही करू शकता. तसेच वेलनेस रिट्रीट, ध्यान आणि गावांचे शांत वातावरण तुमचा दिवस नक्कीच खास बनवेल. लुआंग प्रबांग, वांग व्हिएंग, पॅक्सी, नोंग खियाव, टेकक, ४००० बेटे ही लाओसमधील सर्वात परवडणारी अशी पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी तुम्ही अगदी कमी खर्चात पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. याठिकाणी जेवणाचा आणि राहण्याचा खर्चही इतर तुलनेत खूपच कमी आहे. म्हणूनच कि वाक्य दरवर्षी या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

तुम्हीही लाओसला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर त्याठिकाणी पोचल्यानंतर खर्च कमी करण्यासाठी, बस, टॅक्सी किंवा स्कूटर सारख्या स्थानिक वाहतुकीचा वापर करा. धबधबे, गुहा आणि मंदिरे यासारख्या कमी खर्चातील पर्यटन स्थळांना भेटी द्या आणि मनसोक्त आनंद घ्या.

Indian Railways : ट्रेनच्या जनरल डब्ब्यात फक्त 150 प्रवाशांनाच तिकीट मिळणार?? रेल्वे घेणार मोठा निर्णय

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । आपल्या देशात रेल्वेचे जाळे मोठे आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे धावते. रेल्वेमुळे प्रवाशांना लांबच्या ठिकाणी अगदी आरामशीर प्रवास करता येतो. आपल्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे विभाग सुद्धा सातत्याने प्रयत्नशील असतो. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, रेल्वेने नुकतंच सर्व कोच आणि रेल्वे इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे विभाग याच्या पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.ट्रेनच्या जनरल डब्ब्यात फक्त १५० प्रवाशांनाच तिकीट देण्याचा रेल्वेचा विचार आहे . यामुळे ट्रेनमधील वाढती गर्दी आटोक्यात येईल.

खरं तर ट्रेनच्या एका डब्ब्यात १५० प्रवाशांच्या बसण्याची (Indian Railways) व्यवस्था असते, परंतु याठिकाणी ३००- ४०० प्रवासी गर्दी करतात. यावर उपाय करण्यासाठी आणि हि वाढती गर्दी नियंत्रीत ठेवण्यासाठी, आता अनारक्षित कोचमध्ये तिकिटे देण्याची मर्यादा देखील निश्चित केली जात आहे. या अंतर्गत, ज्या स्टेशनवरून गाड्या सुरू होतात त्या स्टेशनवरून फक्त १५० तिकिटे दिली जातील. त्याच वेळी, रूट दरम्यान येणाऱ्या स्थानकांवर एकूण क्षमतेच्या फक्त २० टक्के तिकिटे दिली जातील. . या चाचणीसाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर पुढील ३ तासांत धावणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांचीच गणना करते. जर चाचणी यशस्वी झाली तर ती देशभरात लागू केली जाईल. प्रत्यक्षात, फेब्रुवारीमध्ये महाकुंभमेळ्यादरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक अपघात झाला होता. तेव्हापासून, स्टेशनवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

SL आणि AC कोचमध्ये वेटिंग तिकिटांची मर्यादा देखील निश्चित – Indian Railways

दरम्यान, केवळ सामान्य कोचच नाही, तर रेल्वेने स्लीपर आणि एसी कोचमध्ये वेटिंग तिकिटांची मर्यादा देखील निश्चित केली आहे. नवीन नियमानुसार, एसी कोचमध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के आणि स्लीपर कोचमध्ये सीट क्षमतेच्या ३० टक्के पर्यंत वेटिंग तिकिटे दिली जातील. रेल्वेच्या या प्रयत्नांमुळे गाड्या आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होईल. सध्या, अनारक्षित तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालण्याचा कोणताही नियम नाही. त्यांची विक्री सतत सुरू राहते. अनेक वेळा ३५० पेक्षा जास्त प्रवासी अनारक्षित कोचमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे रेल्वे विभागाने जर जनरल डब्ब्यात फक्त १५० प्रवाशांनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतला तर देशभरातील रेल्वे प्रवाशांना (Indian Railways) मोठा फायदा होईल हे मात्र नक्की….

SBI FD Rate Cut : SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी!! बँकेने घेतला मोठा निर्णय

SBI FD Rate Cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन SBI FD Rate Cut । देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. SBI ने त्यांच्या अल्पकालीन FD वरील व्याजदरात कपात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने १५ जुलै २०२५ पासून काही FD वरील व्याजदरात १५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.१५% कपात केली आहे. ही कपात सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक दोघांनाही लागू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे.

कसे असतील नवे व्याजदर? SBI FD Rate Cut

सामान्य नागरिकांसाठी, ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या FD वरील व्याजदर ५.०५% वरून ४.९०% केला आहे. १८० दिवस ते २१० दिवसांच्या FD वरील व्याजदर ५.८०% वरून ५.६५%केला आहे तर ११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर ६.०५% वरून ५.९०% पर्यंत कमी करण्यात (SBI FD Rate Cut) आला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

कसे आहेत SBI चे व्याजदर ?

७ दिवस ते ४५ दिवस: सामान्य लोकांसाठी – ३.०५%; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ३.५५ टक्के

४६ दिवस ते १७९ दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.९० टक्के; ज्येष्ठ नागरिक – ५.४० टक्के

१८० दिवस ते २१० दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.६५ टक्के; ज्येष्ठ नागरिक – ६.१५ टक्के

२११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ५.९० टक्के; ज्येष्ठ नागरिक – ६.४० टक्के (SBI FD Rate Cut)

१ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिक – ६.७५ टक्के

२ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ६.४५ टक्के; ज्येष्ठ नागरिक – ६.९५ टक्के

३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ६.३० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.८० टक्के

५ वर्षे ते १० वर्षे: सामान्य लोकांसाठी – ६.०५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.०५ टक्के.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार!! आता किती मिनिटाला धावणार??

Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro। मुंबई लोकल वरचा ताण कमी होण्यासाठी मुंबईत मेट्रो सेवा सुरु झाली. मुंबईत आज अनेक लाईनवर मेट्रो ट्रेन दिमाखात धावत आहे. मुंबई मेट्रोमुळे प्रवासाचा ताण हलका झाला असून प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचत आहे. आता या मेट्रोचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये होणारी गर्दी आणखी कमी करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यानुसार, मेट्रो लाईन्स २अ आणि ७ वर २१ अतिरिक्त सेवा सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुद्धा मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर सेवा वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे.

२१ अतिरिक्त फेऱ्या – Mumbai Metro

८ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर ३ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास करत विक्रमी संख्या गाठली होती. प्रवाशांचा मेट्रो वर असलेला विश्वास यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला. या प्रवाशांचा प्रवास सोप्पा व्हावा यासाठी एमएमआरडीएने या दोन्ही मेट्रो मार्गावरील फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली. त्यानंतर एमएमएमओसीएलने या दोन्ही मार्गवर २१ अतिरिक्त सेवा सुरू केल्या आहेत. यापूर्वी या मेट्रो मार्गावर दररोज २८४ ट्रिप व्हायच्या, आता हा आकडा ३०५ पर्यंत वाढला आहे. यासाठी ३ नवीन मेट्रो सेवेत (Mumbai Metro) दाखल करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांसाठी मेट्रोने दिलेली आणखी एक गुड न्यूज म्हणजे आता मेट्रो प्रवासाचा (Mumbai Metro) वेळही वाचणार आहे. मुंबई मेट्रो लाईन्स २अ आणि ७ वरील पीक-अवरचा म्हणजेच गर्दीच्या वेळीच प्रवास ६ मिनिटे ३५ सेकंदांवरून ५ मिनिटे ५० सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या बदलामुळे आता प्रवाशांना मेट्रोची जास्त वाट बघायला लागणार नाही. आणि प्लॅटफॉर्म वरील गर्दीही लक्षणीयरीत्या कमी होईल. दुसरीकडे जेव्हा जास्त गर्दी नसते अशा वेळेतील मेट्रो फेऱ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या फेऱ्या आधीप्रमाणेच ९ मिनिटे ३० सेकंदांवर सुरू राहतील.