Thursday, December 18, 2025
Home Blog Page 44

Raigad Fort : रायगडावरील पायरी वाट 15 ऑगस्टपर्यंत बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

Raigad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raigad Fort । पावसाळयात तुम्हीची किल्ले रायगडावर सफर करणार असाल तर आधी हि बातमी वाचा आणि मगच पुढचे नियोजन करा. हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर १५ ऑगस्टपर्यंत पायरी वाट मार्ग बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झालं असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संभाव्य आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, या उद्देशाने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग सर्व नागरिक, पर्यटकांसाठी प्रतिबंधित केल्याची माहिती दिली आहे. याबाबत लेखी आदेशही काढण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्याला मागच्या २-३ दिवसांत मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यातच किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, या मार्गावर पावसाचे पाणी वेगानं वाहत असल्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने वेळेत निर्णय घेत, पायरी मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

पर्यटकांनी प्रशासनाशी सहकार्य करावं- Raigad Fort

पावसाळ्यामध्ये दगडी वारंवार पडण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून दगडी पडून कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी होऊ नये, याकरिता किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा. व पर्यटकांना किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवेचा वापर करण्याबाबत प्रसार माध्यमांतून माहिती द्यावी, अशी विनंती उपविभागीय अधिकारी महाड यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती. त्यावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस पाऊले उचलत आता रायगडावरील पायरी वाट १५ ऑगस्टपर्यंत बंद केला आहे. तसेच पर्यटकांनी प्रशासनाशी सहकार्य करावं, असा आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मागील २ ते ३ दिवसापासून रायगड आणि महाडला मुसळधार पावसाने झोडपले आहे. रस्त्यांवर पाणी साचलं आहे, जनजीवन विस्कळीत झालं आहे. दक्षिण रायगड मधील म्हसळा तालुक्याला जोरदार पावसाने झोडपलं असून म्हसळा मधील ढोरजे पूल पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील प्रामुख्याने ज्या पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या नद्या आहेत त्या आंबा, कुंडलिका आणि सावित्री नदी या धोका पातळीपर्यंत पोहचल्या आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील ६ तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

BSNL Recharge Plan : BSNL चा 87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; भल्याभल्यांची झोप उडवतोय

BSNL Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSNL Recharge Plan। मागील काही महिन्यात airtel, jio, vodafone- idea सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले रुचार्ज दर वाढवले आहेत. रिचार्जच्या किमती महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतोय. अशावेळी पैसे वाचवण्यासाठी अनेकानी आपली सिम कार्ड देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL मध्ये कन्व्हर्ट केलं आहे. तर अनेकांनी BSNL चे नवीन सिमकार्ड विकत घेतले आहे. बीएसएनएल सुद्धा जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी पैशात आणि स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. आज आम्ही तुमहाला बीएसएनएल च्या अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत, ज्याने एअरटेल, जिओ सारख्या कंपन्यांची अक्षरशः झोप उडवली आहे.

BSNL चा 87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन- BSNL Recharge Plan

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) बद्दल सांगतोय तो आहे BSNL चा ८७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन…. या रिचार्ज प्लॅन मध्ये दररोज 1GB हाई स्पीड इंटरनेट, अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग सर्व नेटवर्कवर, दररोज 100 SMS ची सुविधा मिळते. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन १४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. महत्वाची बाब म्हणजे या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना Zing अँपचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. ज्या ग्राहकांना कामापुरते इंटरनेट लागत अशा लोकांसाठी बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय आहे. इतर कंपन्यांशी तुलना केल्यास बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन खूपच परवडतोय.

एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाशी तुलना करायची झाल्यास, Jio च्या १४ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 119 रुपये आहे. यामध्ये दररोज 1.5GB इंटरनेट, अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. Airtel च्या १४ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत १२९ रुपये आहे. यामध्ये दररोज 1 इंटरनेट, अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तर वोडाफोन आयडियाच्या १८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत ९९ रुपये आहे. मात्र यामध्ये दररोज फक्त २०० mb इंटरनेट, अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. म्हणजेच काय तर बीएसएनएलचा हा ८७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) इतर कंपन्यांपेक्षा नक्कीच वरचढ आहे. ग्राहकांना कमी पैशात भरपूर फायदे या रिचार्जमुळे मिळतायत.

Realme C71 5G : Realme चा धमाका!! फक्त 7699 रुपयांत लाँच केला 5G Mobile

Realme C71 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Realme C71 5G । तुम्ही जर अतिशय कमी पैशात नवा कोरा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मित्रानो, हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण प्रसिद्ध मोबाईल निर्माता ब्रँड Realme ने भारतीय ग्राहकांना परवडेल अशा स्वस्तात मस्त किमतीत नवीन 5G मोबाईल लाँच केला आहे. Realme C71 5G असं या स्मार्टफोनचे नाव असून त्याची सुरुवातीची किंमत अवघी 7699 रुपये आहे. किंमत जरी कमी असली तरी कंपनीने या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. आज आपण या स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेणार आहोत.

डिस्प्ले

Realme C71 5G मध्ये ९०Hz रिफ्रेश रेट सह ६.६७-इंचाचा HD + LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 568 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. स्मार्टफोनची जाडी ७.९४ मिमी आहे. यात UNISOC T7250 प्रोसेसर आहे, जो कॉर्टेक्स-A75 आणि A55 कोरसह येतो. रीअलमी चा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ वर आधारित Realme UI या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या मोबाईलला IP54 रेटिंग देण्यात आले आहेज्यामुळे धूळ आणि स्प्लॅशपासून मोबाईलला कोणताही धोका नाही.

कॅमेरा- Realme C71 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme C71 5G च्या पाठीमागील बाजूला ५० मेगापिक्सेलचा AI कॅमेरा सेन्सर आणि समोर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन AI इरेजर, AI क्लियर फेस, प्रो मोड आणि ड्युअल व्ह्यू व्हिडिओ सारख्या खास वैशिष्ट्यांसह येतो. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6300mAh ची मजबूत बॅटरी बसवण्यात आली आहे. हि बॅटरी 15W फास्ट चार्जिंग आणि 6W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

आता येउयात मूळ मुद्द्यावर, ती म्हणजे या स्मार्टफोनची किंमत किती? तर रीअलमीचा हा स्मार्टफोन 4 GB RAM आणि ६ जीबी रॅम अशा २ स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,699 रुपये आहे, तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ८,६९९ रुपये आहे. ६ जीबी व्हेरिएंट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ७०० रुपयांचा बँक डिस्काउंट सुद्धा मिळतोय. तुम्ही हा मोबाईल फ्लिपकार्ट, realme.com आणि सर्व प्रमुख स्टोअर्सवरून खरेदी करू शकता.

Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवानिमित्त 5000 ज्यादा गाड्या सोडणार; ST महामंडळाचा मोठा निर्णय

Ganeshotsav 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025। सध्या सर्वजण गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहेत. गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारीही सुरु आहे. गणेशोत्सवाला मुंबई पुण्यात असलेले चाकरमानी सुट्टी टाकून गावी जातात आणि गणेशाची पूजा अर्चा करतात. खास करून कोकणी माणसासाठी गणेशोत्सव म्हणजे दिवाळी पेक्षाही मोठा सण… त्यामुळे एकवेळ कोकणी माणूस नोकरी सोडेल, पण गणपतीला गावी जाणार म्हणजे जाणारच… त्यामुळे गणेशोत्सवासाठी प्रवासावरही ताण पडतो. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात ५००० ज्यादा ST बस सोडणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

नुकतंच एसटी महामंडळाची एक बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, गणपती उत्सव (Ganeshotsav 2025) म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार 5000 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे.

गट आरक्षण कधीपासून सुरु होणार ? Ganeshotsav 2025

जादा बसेस मध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू होत आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवाला ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या, त्या तुलनेत यंदा ७०० बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2025) एसटीची वाहतूक सुरळीत चालावी यासाठी बसस्थानके आणि बसथांब्यांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच, कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथके देखील तैनात करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात स्थापन होणार महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ

Mahamumbai International Agricultural Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील दापचरी येथील जागेची पाहणी करण्यात यावी. यासोबतच राज्यातील 305 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी सचिवांच्या राज्यस्तरीय केडरच्या निर्मितीसाठी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या बाजारपेठेच्या निर्मितीसाठी पणन, महसूल आणि पदुम आदी विभागांनी संयुक्त पाहणी करावी. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जागा उपलब्ध नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित जिल्हा सहनिबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करावेत अशा सूचनाही फडणवीसांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे ‘महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ’ स्थापन करण्याबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री जयकुमार रावल आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कडून पालघर जिल्ह्यात महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. रुंगीस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या धर्तीवर ही बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या बाजार व्यवस्थापन प्रतिनिधींनी राज्य शासनाशी चर्चा करून सहकार्याची तयारी दर्शवली आहे.

या प्रकल्पात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही सहभागाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेमुळे देश-विदेशात शेतीमालाचा प्रभावी पुरवठा सुलभ होणार आहे. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील बापगाव येथे मल्टी-मॉडेल हबसह कृषी पणन विषयक सोयीसुविधा उपलब्ध करणे, नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथे कृषी पणन विषयक सुविधा प्रकल्प उभारणे, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करणे , ‘एक तालुका, एक कृषी उत्पन्न बाजार समिती’ स्थापन करणे, आणि आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे अशा अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला

Tesla Y Model Car Price : 500KM रेंज, 5 सेकंदात 100 चा टॉप स्पीड; Tesla कारची किंमत किती?

Tesla Y Model Car Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tesla Y Model Car Price । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेल्या एलोन मस्क यांच्या Tesla कंपनीचे भारतातील पहिले शोरूम मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आजपासून खुलं झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते या शोरूमचे उद्घाटन पार पडलं. मुंबईतील या शोरूमच्या माध्यमातून टेस्लाने भारतात आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. टेस्ला साठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. भारतात टेस्ला तिचे Y Model विकणार आहे. यातील पहिले मॉडेल मॉडेल वाय रीअर-व्हील ड्राइव्ह (RWD) आहे, ज्याची किंमत ६० लाख रुपये आहे. दुसरे मॉडेल मॉडेल वाय लॉन्ग रेंज RWD आहे, ज्याची किंमत ६८ लाख रुपये आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर किमतींबद्दल माहिती दिली आहे.

इतर देशाच्या तुलनेत भारतात टेस्ला कारच्या किमती (Tesla Y Model Car Price) महाग आहेत. अमेरिकेत, मॉडेल Y ची सुरुवात $44,990 पासून होते, तर चीनमध्ये त्याची किंमत 263,500 युआन आणि जर्मनीमध्ये 45,970 युरो आहे. भारतात किमती जास्त असल्याचे महत्वाचे कारण म्हणजे आयात शुल्क. मॉडेल Y हे टेस्लाच्या शांघाय प्लांटमधून मॉडेल वाय मुंबईत आले आहे. या वाहनांवर प्रति युनिट २१ लाखांपेक्षा जास्त आयात शुल्क आहे. परिणामी ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे गाडीची किंमत महाग झाली. याशिवाय तुम्हाला जर तुमच्या आवडीचा रंग हवा असेल तर यासाठी आणखी पैसे मोजावे लागतील. उदाहरणार्थ, पर्ल व्हाइट मल्टी-कोट साठी 95,000 रुपये अतिरिक्त, डायमंड ब्लॅकसाठी 95,000 रुपये अतिरिक्त, ग्लेशियर ब्लूसाठी 1,25,000 रुपये अतिरिक्त, क्विक सिल्व्हर रंगासाठी 1,85,000 रुपये अतिरिक्त आणि अल्ट्रा रेडसाठी 1,85,000 रुपये जास्तीचे खर्च करावे लागतील. परंतु टेस्लाच्या या कारचे फीचर्स आणि लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. Tesla Y Model Car Price

सिंगल चार्जवर 500 KM रेंज – Tesla Y Model Car Price

टेस्ला मॉडेल Y चे नवीन व्हर्जन खूपच अत्याधुनिक आहे. गाडीचा लूक आणि डिझाईन आकर्षिक करणारा आहे, खास करून तरुणाईला तिची नक्कीच भुरळ पडेल. समोरील बाजूला आकर्षक आणि आधुनिक पद्धतीच्या हेडलाईट पाहायला मिळतायत. मागील बाजूस कनेक्टेड टेल लाइट्स देण्यात आले आहेत. मॉडेल Y RWD व्हेरिएन्ट सिंगल चार्जवर ५०० किलोमीटर अंतर पार करते तर मॉडेल Y लाँग रेंज रीअर-व्हील ड्राइव्ह व्हेरियंट मध्ये तब्बल ६२२ किमी रेंज मिळतेय. या दोन्ही इलेक्ट्रिक कारचे टॉप स्पीड २०१ किमी प्रतितास इतकं आहे. महत्वाची बाब म्हणजे अवघ्या हि इलेक्ट्रिक कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते

Tesla Showroom In Mumbai : BKC मध्ये सुरु झालं Tesla शोरूम; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं उद्घाटन

Tesla Showroom In Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tesla Showroom In Mumbai । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेल्या एलोन मस्क यांच्या Tesla कंपनीचे भारतातील पहिले शोरूम मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आजपासून खुलं झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा हस्ते या शोरूमचे उद्घाटन पार पडलं. टेस्ला साठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मुंबईत टेस्लाचे स्वागत (Tesla Showroom In Mumbai) करतो. टेस्लाने मुंबईत आपले सर्व्हिसिंग आणि भविष्यातील उत्पादन केंद्र सुरू करणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी टेस्लाने चांगलं राज्य आणि चांगल्या शहराची निवड केली आहे. कंपनीच्या दीर्घकालीन योजनांमध्ये राज्य महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे, भविष्यात पूर्ण प्रमाणात उत्पादन अपेक्षित आहे अशी आशा फडणवीसांनी व्यक्त केली. टेस्ला ४ मोठे चार्जिंग स्टेशन देखील स्थापित करत आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये आघाडीवर असल्याने टेस्लाने महाराष्ट्राची निवड केली याचा मला आनंद आहे असं म्हणत फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले, भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी एक खूप मोठी बाजारपेठ आहे. आम्ही आता इलेक्ट्रिक मोबिलिटीचे उत्पादन केंद्र देखील आहोत, मला वाटते की टेस्ला संपूर्ण बाजारपेठ बदलणार आहे. Tesla Showroom In Mumbai

भारतात Tesla ची कार महाग – Tesla Showroom In Mumbai

टेस्ला भारतात दोन मॉडेल विकणार आहे. पहिले मॉडेल मॉडेल वाय रीअर-व्हील ड्राइव्ह (RWD) आहे, ज्याची किंमत ६० लाख रुपये आहे. दुसरे मॉडेल मॉडेल वाय लॉन्ग रेंज RWD आहे, ज्याची किंमत ६८ लाख रुपये आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर किमतींबद्दल माहिती दिली आहे. भारतात त्याची किंमत अमेरिकेपेक्षा खूपच जास्त आहे. भारतात टेस्ला मॉडेल Y ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ६० लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी रियर व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटसाठी आहे. इतर बाजारपेठांमध्ये टेस्लाच्या बेस प्राइसिंगपेक्षा या किमती जास्त आहेत. अमेरिकेत, मॉडेल Y ची सुरुवात $44,990 पासून होते, तर चीनमध्ये त्याची किंमत 263,500 युआन आणि जर्मनीमध्ये 45,970 युरो आहे. भारतात जास्त किंमत ही प्रामुख्याने आयात शुल्कामुळे आहे. मॉडेल Y हे टेस्लाच्या शांघाय प्लांटमधून मॉडेल वाय मुंबईत आले आहे. या वाहनांवर प्रति युनिट २१ लाखांपेक्षा जास्त आयात शुल्क आहे. वाहनांसोबत, टेस्लाने भारतात सुमारे $1 दशलक्ष किमतीचे सुपरचार्जर उपकरणे आणि अॅक्सेसरीज देखील आणल्या आहेत. या वस्तू बहुतेक चीन आणि युनायटेड स्टेट्समधून आणल्या गेल्या आहेत.

Mumbai Local Train : बापरे!! मुंबई लोकल ट्रेनमध्ये 8 वर्षात 8273 प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबईची लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन… रोज सकाळी उठायचं आणि लोकलने ऑफिसला जायचं हा मुंबईकरांचा रोजचा दिनक्रम…. लोकल ट्रेनमुळे जलद प्रवासही होतोय आणि वाहतूक कोंडीतून सुटकाही… मात्र लोकलच्या गर्दीने मुंबईकरांना त्रास होतोय हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यातच मागच्या महिन्यात मुंब्रा लोकल ट्रेनमधील अपघातानंतर प्रवाशांचा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता तर मुंबई लोकल ट्रेन बाबत हादरवणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. मागच्या ८ वर्षात मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या ८२७३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईची हि लाईफलाईन आता डेथलाईन बनली आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

मध्य रेल्वेने (Mumbai Local Train) मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, गेल्या 8 वर्षात तब्बल 8273 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या पहिल्या केवळ पाच महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४४३ मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीमुळे मुंबई लोकल ट्रेन मधील प्रवास किती असुरक्षित आहे हे स्पष्ट होत आहे. मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, २०१८ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना लोकलसमोर येऊन १०२२ लोकांचा मृत्यू झाला. याच वर्षात लोकलमधून पडून ४८२ लोकांचा प्रवाशांचा मृत्यू झाला.

कोणत्या वर्षी किती मृत्यू– Mumbai Local Train

2019 मध्ये ट्रॅक ओलांडताना 920 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 426 मृत्यूची नोंद झाली.
2020 मध्ये ट्रॅक ओलांडताना 471 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 134 मृत्यू झाले.
2021 मध्ये ट्रॅक ओलांडताना 748 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 189 मृत्यूची नोंद झाली.
2022 मध्ये ट्रॅक ओलांडताना 654 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 510 मृत्यू झाले. धावत्या ट्रेनमधून पडून झालेल्या मृत्यूंची संख्या खूपच वाढली.
2023 मध्ये ट्रॅक ओलांडताना 782 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 431 मृत्यू झाले.
2024 मध्ये ट्रॅक ओलांडताना 674 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 387 मृत्यू झाले.
2025 (मे पर्यंत): ट्रॅक ओलांडताना 293 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 150 मृत्यू झाले आहेत.

मुंबई लोकलचे अपघात (Mumbai Local Train) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे, रेल्वेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि धोकादायक प्रवास टाळणे गरजेचे आहे. तसेच प्रवास करताना कोणताही स्टंट करू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी..

Mumbai E-Water Taxi : देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार; पहा कसा असेल रूट

Mumbai E-Water Taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai E-Water Taxi । मुंबईकरांसाठी आणि मुंबईत पर्यटनाला जाणाऱ्या इतर पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १ ऑगस्ट पासून मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गांवर हि इलेक्टिक वॉटर टॅक्सी धावणार आहे. आगामी काळात हि इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा टप्प्याटप्प्याने बेलापूर, घारापुरी आणि मांडवापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सिमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. तसेच मुंबईकरांना पर्यावरणपूरक प्रवास करता येणार आहे.

खरं तर यापूर्वीच मुंबईत विविध मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा (Mumbai E-Water Taxi) सुरू करण्यात आल्या. मात्र, त्या सर्व पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या असल्याने त्याचे तिकीटदर सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे काही काळातच त्या सेवा बंद पडल्या. मात्र ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्चात बचत होणार असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच या उपक्रमामुळे एका बाजूला समुद्र वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला, वाढत्या प्रदूषणाची समस्याही रोखली जाणार आहे.

मुंबईमध्ये धावणारी ही ई-वॉटर टॅक्सी (Mumbai E-Water Taxi) विदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली आहे. ‘एमडीएल’ने एकूण सहा वॉटर टॅक्सी तयार केल्या असून त्यातील पहिली 24 आसनी वातानुकूलित टॅक्सी सध्या इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या नव्या वॉटर टॅक्सिमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, पैशाची बचत होणार आहे तसेच वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे. त्यामुळे तिहेरी फायदा मुंबईकरांना मिळणार आहे .

कशी आहे ई-वॉटर टॅक्सी ? Mumbai E-Water Taxi

लांबी : १३.२७ मीटर
रुंदी : ३.०५ मीटर
प्रवासी क्षमता : २४ प्रवासी
वेग : १४ नॉटिकल माइल्स
बॅटरी क्षमता : ६४ किलोवॅट (चार तासापर्यंत)

या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीसाठी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस, जेएनपीए जेट्टीवर चार्जिंग स्टेशनची उभारणी सुरू आहे. जेएनपीएमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम आठवड्यात पूर्ण होईल.

MSRTC Tourism Bus : अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ… धार्मिक स्थळांना भेट देणारी ST ची विशेष पर्यटन बस

MSRTC Tourism Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC Tourism Bus । तुम्ही सुद्धा एसटी चे शौकीन असाल आणि महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांना भे देण्याच्या विचारात असाल तर मित्रानो हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाअंतर्गत पुण्यातील स्वारगेट आगारातर्फे चार विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या पर्यटन बसच्या माध्यमातून तुम्ही अष्टविनायक, अक्कलकोट, रायगड, ५ ज्योतिर्लिंग, गाणगापूर अशा धार्मिक स्थळांना जाऊ शकता. आणि देवासमोर नतमस्तक होऊ शकता. एसटी बस च्या सुविधेमुळे भाविकांचा प्रवास हा आरामदायी होईल यात शंकाच नाही.

कोणत्या तारखेला कुठे प्रवास करता येईल? MSRTC Tourism Bus

‘पाच ज्योतिर्लिंग’ दर्शन सहल – ही सहल ३ दिवसांची असेल, त्यात महाराष्ट्रात असणाऱ्या पाच ज्योतिर्लिंगांना भेट देता येणार आहे. यामध्ये भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ यांमचा समावेश आहे. 19 ते 21 जुलै 2025 या दिवसांदरम्यान ही सहल आहे. तुम्ही निमआराम बसमधून प्रवास करू शकाल. ५ ज्योतिर्लिग तशी एकमेकांपासून लांब असल्याने अनेकदा प्रवास करताना अडचण येते. परंतु आता एसटीच्या विशेष पर्यटन सेवेमुळे भक्तांना मोठा फायदा होणार आहे.

अक्कलकोट-गाणगापूर सहल -याठिकाणी सुद्धा निमआराम बसनं 22 आणि 23 जुलै 2025 रोजी ही सहल करता येणार आहे. यामध्ये तुळजापूरचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिराला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भक्त मोठ्या संख्येने येत असतात. अशा भक्तांसाठी हि मोठी सुवर्णसंधी म्हणावी लागेल. MSRTC Tourism Bus

अष्टविनायक दर्शन- 25- 26 जुलै 2025 दरम्यान दोन दिवसांच्या कालावधीत निमआराम एसटीनं अष्टविनायक दर्शन घडवलं जाईल. यामाध्यमातून तुम्हाला मोरगाव, सिध्दटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव अशा ठिकाणांना जाता येणार आहे.

रायगड दर्शनासाठी- 30 जुलै 2025 रोजी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडभेटीसाठी एकदिवसीय सहल नियोजित आहे. त्याठिकाणी सुद्धा निमआराम बसचा वापर केला जाणार आहे. रायगडावर जाऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊ शकता.

एसटी महामंडळाच्या माहितीनुसार या प्रत्येक सहलीसाठी निमआराम बसचा (MSRTC Tourism Bus) वापर केला जाणार असून, तिकीट आरक्षणासंदर्भातील माहिती स्वारगेट आगारासह एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिली जाईल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.