Friday, December 26, 2025
Home Blog Page 432

CIDCO च्या योजनेत वरच्या मजल्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे ? कसे असतील दर ?

cidco mumbai

मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे स्वात:चे घर असावे असे कुणाला वाटणार नाही ? सध्या घरांचे दर हे गगनाला भिडले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत असतो.

वरच्या मजल्यासाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे

सिडको कडून तब्बल 26 हजार घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती एका मराठी टीव्ही माध्यमाकडून देण्यात आली आहे.अगदी ३ दिवसांतच या योजनेचा शुभारंभ होणार असून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना असणार आहे. मात्र या मोठ्या योजनेबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या विविध नोडमध्ये या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले असून . यातील घरांच्या किंमती मजल्यानुसार आकारल्या जाणार असून वरच्या मजल्यावरील घरांसाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

किती भरावा लागणार शुल्क ?

सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत २६ हजार घरांच्या ठरावाला मान्यता मिळाली आहे. सिडकोच्या माध्यमातून 27 ठिकाणी 67 हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 43 हजार घरांना महारेराची परवानगी मिळाली आहे. यातील 26 हजार घरांची सोडत 7 ऑक्टोबरला होणार आहे. तसेच यामध्ये बावीस मजली इमारतींतील घरांच्या किंमती मजल्यानुसार ठरणार आहेत. सातव्या मजल्यावरील घरासाठी प्रति चौरस फूट 10 रुपये अतिरिक्त आकारणी होणार आहे. त्यावरील मजल्यासाठी प्रति चौरस फुटाला रुपये दहाच्या पटीने म्हणजेच 20, 30 आणि 40 असे वरच्या दराने अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हला वरचा मजला पाहिजे असेल तर त्यासाठी थोडे जादा पैसे भरावे लागणार आहेत.

कोणत्या भागात मिळणार घरे ?

या लॉटरी मध्ये 13 हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित 13 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. यातील सर्वाधिक जवळपास 50 टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. खांडेश्वर, मानसरोवर, खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत. तसेच जुईनगर, वाशी, खारघर या प्रकल्पांतील घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला नाही.

घराच्या विक्रीसाठी एनओसीची आवश्यकता नाही

याबरोबरच महामंडळांना आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळनिर्मित घरांच्या विक्रीसाठी महामंडळ एनओसीची आवश्यकता आता भासणार नाही. याशिवाय इतर व्यक्तीला घर विक्री करत असताना द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर लिजवर न राहता ते सदर व्यक्तीच्या मालकीचा होणार आहे. या निर्णयाच्या आधी ही घर विकण्यासाठी सिडको महामंडळाची एनओसी घ्यावी लागत होती. याशिवाय ही घरं विक्री करत असताना निश्चित शुल्कही भरावे लागत होते. मात्र नव्या निर्णयामुळे हा नियम रद्द करण्यात आल्याने सिडकोच्या गृहधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी 770.49 कोटी मंजूर ; गडकरींची माहिती

kalamboli junction

राज्यभरामध्ये अनेक महत्त्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या शहरांना छोट्या शहरांशी जोडणं आणि औद्योगिक आणि आर्थिक प्रगती करणे हा सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे. रस्ते प्रकल्पांच्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आता हाती आली असून मुंबई जवळच्या कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी 770.49 कोटी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

याबाबतची माहिती देताना नितीन गडकरी यांनी ट्विट करीत सांगितले आहे की 15.53 किलोमीटरचा हा एक महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प आहे. पंचभुजा असलेला हा सिग्नल युक्त रोटरी जंक्शन प्रकल्प मुंबई पुणे एक्सप्रेसवे, राष्ट्रीय महामार्ग 48, राष्ट्रीय महामार्ग 548 आणि सायन पनवेल महामार्गाच्या छेदनबिंदूवर स्थित आहे. कळंबोली जंक्शन या प्रमुख महामार्गावरून आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची जोडला जाईल असेही त्यांनी सांगितला सोशल मीडियावर या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे.

Babandada Shinde : अजित पवारांना मोठा झटका !! बबनदादा शिंदेनी साथ सोडली, तुतारी फुंकणार

Babandada Shinde Tutari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा झटका बसला आहे. माढ्याचे आमदार बबनदाद शिंदे (Babandada Shinde) यांनी अजित पवार गटाला सोडचिठी दिली आहे. आपल्या मुलाला एकवेळ शरद पवारांच्या तुतारीवर (Sharad Pawar) लढवू किंवा वेळ पडल्यास अपक्ष उभा करू अशी भूमिका बबन दादा शिंदे यांनी घेतली आहे. बबनदादा शिंदे हे मध्यातून तब्बल ६ वेळा आमदार झाले आहेत. मात्र यंदा त्यांनी निवडणुकीतून माघार घेत आपला मुलगा रणजित शिंदे याना उभं करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केलं होते.

मागील काही दिवसांपूर्वी बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांनी ३ वेळा शरद पवारांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच ते शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या. मी शरद पवारांच्या साथीने 38 वर्षे राजकारण करीत आलोय. त्यामुळे मी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांकडे तिकीटाची मागणी केली आहे. ते तिकीट देतील की नाही हे मला माहिती नाही. पण यंदाच्या निवडणुकीत माझा मुलगा रणजितसिंहला शरद पवारांनी तिकीट दिले तर ठिक, नाहीतर अपक्ष निवडणुकीला सामोरे जाईल”, महायुतीचा विषय आमच्यासाठी संपलाय अशी भूमिका बबनराव शिंदे यांनी घेतली आहे .आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास सांगताच आमचा घरचा विषय सुद्धा संपला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. तसेच

दरम्यान शरद पवारांनी रणजीत शिंदे यांना तुतारी न दिल्यास राष्ट्रवादी अर्थात घड्याळावर उभे न राहता अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवण्याची भूमिका बबनदादांनी घेतल्याने आता अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. महायुतीत शिवसेनादेखील या मतदारसंघावर दावा करत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी आखत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माढ्यात माहुयुतीत काहीच आलबेल नाही हे आता समोर आलं आहे.

काय सांगता!! पंतप्रधान मोदींचं मंदिर उभारणाऱ्या पुणेकराचा भाजपला रामराम; कारणही सांगितलं

mayur mundhe modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर उभारल्यानं तीन वर्षांपूर्वी चर्चेत आलेले भाजपचे कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी आता भाजपलाच रामराम ठोकला आहे. नरेंद्र मोदींबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी मयूर मुंढेंनी हे मंदिर बांधेल होते, मात्र आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात माजी पदाधिकाऱ्यांचे अपमान होत असून, त्यांना बैठकांमध्ये बोलावले जात नाही. कार्यकर्त्यांची मतं विचारली जात नाहीत असा आरोप करत मयूर मुंढे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र सुद्धा लिहले आहे.

मुंढेनी दिली पक्ष सोडण्याची कारणे –

मयूर मुंढेनी यांनी पत्रात नमुद केले आहे कि, पक्षात माजी पदाधिकाऱ्यांचे अपमान होत असून, त्यांना बैठकांमध्ये बोलावले जात नाही. कार्यकर्त्यांची मतं विचारली जात नाहीत, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढण्या ऐवजी कमी होत आहे. निवडणुकीच्या वेळी प्रचारातून प्रामाणिक कार्यकर्त्यांना वगळण्यात आले आहे. आर्थिक निधीच्या वितरणामध्ये दुसऱ्या पक्षांतील लोकांना निधी दिला जातोय . याचाच परिमाण म्हणजे पक्षामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. यांनी नेत्यांना याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळेल . मुंढेनी पक्षाच्या वाढीवरील दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात कि , कार्यकर्त्यांच्या निष्ठेला आणि मेहनतीला मूल्य न देता, बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. हे पक्षाच्या भविष्याच्या विकासासाठी धोकादायक असून शकते .

आगामी निवडणुकीवरील परिमाण –

मुंढे यांच्या या निर्णयामुळे भाजपमध्ये एक नवीन चर्चेची लाट येऊ शकते. प्रामुख्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि पक्षाबद्दल प्रेम कमी होऊ शकते. त्याचसोबत पक्षातील एकतेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या त्यांच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर आणि पक्षाच्या तयारीवर महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात. अनेक नेते पक्ष सोडण्याचा विचार करतील .

सप्टेंबर महिन्यात पुणे मेट्रोला मिळाला 7 कोटींचा तगडा महसूल ; 47 लाख प्रवाशांनी केला प्रवास

pune metro

पुणे मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशातच स्वारगेट ते शिवाजीनगर या नव्याने सुरू झालेल्या मेट्रोला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे. याबाबतची आकडेवारी आता समोर आली असून सप्टेंबर मध्ये एकूण प्रवासी संख्या 46 लाख 19 हजार इतकी नोंदवली गेली आहे. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती…

47 लाख प्रवाशांनी केला प्रवास

खरंतर पुण्यामध्ये मेट्रो सुरु झाल्यापासून पीएमपी ला होणारी गर्दी ही मेट्रो कडे विभागली गेलेली आहे त्यामुळे ट्रॅफिक मध्ये तासंतास अडकून राहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2024 मध्ये प्रवासी संख्या एक लाख 18 हजार पेक्षा जास्त होते तर सप्टेंबर 2024 मध्ये दैनंदिन प्रवासी संख्या मध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालेली दिसून येत आहे. सप्टेंबर मध्ये दैनंदिन प्रवासी संख्या एक लाख 53 हजार 91 नोंदवण्यात आली आहे तर सप्टेंबर मध्ये एकूण प्रवासी संख्या 46 लाख 19 हजार 130 इतकी नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये पुणे मेट्रोला ७ कोटी सहा लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न 23 लाख 56 हजार इतके आहे. तर सप्टेंबर महिन्याची आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण प्रवासी संख्येची विभागणी केली असता पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गावर 35 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी संख्या तर रामवाडी ते वनाज या मार्गावर 65 टक्के प्रवासी संख्या निदर्शनास आली आहे.

महामेट्रोला 7 कोटींचा महसूल

पीसीएमसी ते स्वारगेट मार्गावर 15 लाख 74 हजार 340 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्या माध्यमातून मेट्रोला 2 कोटी 30 लाख 35 हजार 152 रुपयांचा महसूल मिळालाय तर रामवाडी वनाज मार्गावर तीस लाख 49 हजार 790 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्या माध्यमातून मेट्रोला चार कोटी 76 लाख 60 हजार 281 रुपयांचा महसूल प्राप्त झालाय. या दोन्ही मार्गांचा विचार केला एकूण 46 लाख 19 हजार 130 प्रवाशांनी प्रवास केला असून महा मेट्रोला यातून सात कोटी सहा लाख 95 हजारांचा महसूल प्राप्त झालाय.

सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेली पाच मेट्रो स्थानके

पीसीएमसी 5 लाख 85 हजार 753 इतकी प्रवासी संख्या, पीएमसी 4 लाख 68 हजार 915 इतकी प्रवासी संख्या, रामवाडी तीन लाख 99 हजार 779 प्रवासी संख्या, पुणे स्टेशन तीन लाख 43 हजार 724 प्रवासी संख्या, आणि शेवटचा आणि पाचवा स्थानक म्हणजे वनात दोन लाख 79 हजार 44 प्रवासी संख्या.

प्लॅटफॉर्मच्या कामामुळे कोकण रेल्वेच्या तीन गाड्यांवर परिणाम

konkan railway

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 11 आणि 12 च्या लांबीच्या विस्ताराचं काम अद्याप पूर्ण झालं नाही. त्यामुळे डिसेंबर अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. मात्र या कामामुळे रेल्वेचे वेळापत्रक बदलले जाणार आहे. याचा परिणाम कोकण रेल्वेवर सुद्धा होताना दिसतो आहे. त्यामुळे जर तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये कोकण रेल्वे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्या दादर आणि ठाणे स्थानकांपर्यंत डिसेंबरच्या अखेरपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे गाड्यांचा प्रवास दादर आणि ठाणे या स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.

कोणत्या तीन गाडयांवर परिणाम?

बांधकामाचा परिणाम कोकण रेल्वेच्या तीन महत्त्वपूर्ण गाड्यांवर होणार असून या गाड्यांमध्ये मंगळुरू मुंबई, मडगाव ते मुंबई सी एस एम टी तेजस एक्सप्रेस आणि मडगाव मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मंगळुरू मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस चा 31 डिसेंबर पर्यंतचा प्रवास ठाणे स्थानकावर मर्यादित करण्यात येणार आहे तर मडगाव ते मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि मडगाव मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस 31 डिसेंबर पर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 78 दिवसांचा बोनस जाहीर

Railway Empoyees Bonus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी नवरात्रीच्या सणानिमित्त एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनस म्हणजेच पीएलबी (प्रोडक्टिविटी लिंकड बोनस) जाहीर केला आहे. देशभरातील 11 लाख 72 हजार 240 रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होईल आणि त्यांना दिवाळीच्या तयारीसाठी एक मोठा आर्थिक फायदा मिळेल.

उत्पादकतेवर आधारित बोनस –

2023-2024 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने उत्कृष्ट कामगिरी दर्शविली आहे. रेल्वेच्या कामकाजातील उत्कृष्टता आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी केंद्र सरकारने पीएलबी (प्रोडक्टिविटी लिंकड बोनस) देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही रक्कम दरवर्षी दुर्गापूजा किंवा दसऱ्याच्या सुट्टीआधी मिळणार आहे. यावर्षीही सुमारे 11 लाख 72 हजारांहून अधिक अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगारा इतकी रक्कम पीएलबी म्हणून दिली जाणार आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना सणाच्या हंगामात आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. हा बोनस त्यांच्या दैनंदिन खर्चात मदत करेल आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी एक आनंददायी वातावरण निर्माण करेल.

2000 कोटींहून अधिक निधी मंजूर –

मागील वर्षांपासून रेल्वेने 1588 दशलक्ष टन मालवाहतूक आणि 6.7 अब्ज प्रवासी वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीवरून केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या कौतुकाचे फळ त्यांना देणार आहे. या निर्णयासाठी 2000 कोटींहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निर्णयामुळे रेल्वेसेवेतील कामकाजात वाढ होण्याची अपेक्षा आहे, कारण बोनस मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचे मनोबल अधिक उंचावेल.

कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ –

या बोनसचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ट्रेन्स मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पॉइंट्समन, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, ट्रॅक मेंटेनर ,लोको पायलट , गट क मधील कर्मचारी त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा निर्णय सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे आर्थिक प्रगती साध्य करण्यास महत्वाचा ठरेल .

रविवार पासून मुंबईत धावणार अंडरग्राउंड मेट्रो-3 ; किती असेल तिकीट ?

mumbai metro -3

मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्हाला जर ऑफिस च्या कामासाठी लोकलचे धक्के खात जावे लागत असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवार म्हणजेच उद्या दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तर रविवारपासून ही मेट्रोमार्गिका नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे.

खरंतर कुलाबा ते आरे हा 33.5 किलोमीटरचा मार्ग आहे. मात्र पहिल्या टप्प्यात 12.4 किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे. या पहिल्या टप्प्यात प्रत्येक मार्गावर 6.40 मिनिटाच्या अंतरावर गाडी चालवली जाणार आहे. कुलाबा ते आरे या मार्गावर एकूण 27 स्थानके असणार आहेत मात्र पहिल्या टप्प्यामध्ये त्यातील दहा स्थानक खुली करण्यात येणार आहेत. तुम्ही सुद्धा लोकलच्या धक्काबुक्कीला कंटाळून गेला असाल तर तुमच्यासाठी मेट्रो ही एक उत्तम सुविधा ठरणार आहे. तुम्हाला जर चिंता वाटत असेल मेट्रोचे तिकीट किती असणार तर काही काळजी करू नका कारण मेट्रोचे तिकीट कमी असून हे अवघ्या दहा रुपयांपासून सुरू आहे. आता कोणत्या मार्गे केवळ किती रुपये आकारले जाणार आहेत हे पाहुयात….

काय असेल तिकीट दर ?

तुम्हाला जर संपूर्ण आरे ते बीकेसी असा प्रवास करायचा असेल तर पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत. आरे जे व्ही एल आर ते मरोळ नाक्यापर्यंतच्या अंतरासाठी 20 रुपये तिकीट दर आहे. तर आरे ते जे व्ही एल आर स्थानकापासून विमानतळ टी 1 टर्मिनल स्थानकापर्यंत 30 रुपये भाडं आकारले जाणार आहे. याशिवाय वांद्रे कॉलनी स्थानकापर्यंत प्रवाशांना चाळीस रुपये मोजावे लागणार आहेत.

सीप्झ- 10 रुपये
एमआयडीसी अंधेरी-20
मरोळ नाका-20
सीएसएमआयए टी2-30
सहार रोड- 30
सीएसएमआयए टी1-30
सांताक्रुझ-40
वांद्रे कॉलनी-40
बीकेसी-50

या स्थानकांचा समावेश

रविवार पासून सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांमध्ये आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतराराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, सहार रोड, विमानतळ टर्मिनल 1, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी या स्थानकांचा समावेश असणार आहे.

मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

Sanjay Rathod Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात (Sanjay Rathod Accident) झाला आहे. पोहरादेवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या कारने पिकअप गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. आज मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अपघाताची हि घटना घडली. सुदैवाने संजय राठोड आणि त्यांचा चालक या अपघातातून बचावले. मात्र चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येणार आहेत. त्यासाठी पोहरादेवीला काल नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असल्यानेते या बैठकीला गेले होते. मात्र तेथून परत यवतमाळला येताना कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या कारनं पिकअप ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला तसेच पिकअप गाडी सुद्धा जागीच पलटी झाली. अपघातानंतर लगेच गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या. यामुळे संजय राठोड बचावले. मात्र दुसरीकडे पिकअपचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

एअरबॅग्ज वेळीच उघडल्यानं संजय राठोड यांच्या जीव वाचला. सध्या ते सुखरुप आहेत. तर अपघातानंतर पिकअप चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिकअपमधून केळीची वाहतूक सुरु होती. व्यापाऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेली केळी दुसऱ्या वाहन्यात भरुन पोहरागडला पाठवण्यात आली आहेत तर पिकअप चालकाला पुढील उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आलं आहे

ट्रायल रनच्या आधी ‘वंदे भारत स्लीपर’ची झलक आली समोर

vande bharat sleeper

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या विशेष वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती शेअर करणारी पोस्ट केली आहे. यामध्ये बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे आतून दिसणारे काही फोटो सुद्धा शेअर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया…

केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन 800 ते 1,200 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे राजधानी एक्स्प्रेसच्या बरोबरीने भाडे अपेक्षित आहे. एक दिवस आधी, वैष्णव यांनी बेंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) सुविधा येथे नवीन ट्रेनच्या उत्पादनाची पाहणी केली होती.

प्रगत तंत्रज्ञानाची जोड

वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस विशेषत: रात्रभर प्रवासासाठी डिझाइन केलेली आहे, ती 160 किमी/ताशी वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे. ट्रेनमध्ये 16 डब्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये 11 एसी थ्री-टायर, चार एसी टू-टायर आणि एक एसी फर्स्ट-क्लास आहे, जे एकत्रितपणे 823 प्रवासी बर्थ आहेत. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आलेली अनेक वैशिष्ट्ये हायलाइट केली आहेत.

ट्रेनच्या आतील भागात प्रगत प्रकाश व्यवस्था, USB चार्जिंग पोर्ट आणि प्रत्येक ड्रायव्हिंग ट्रेलर कोच (DTC) मध्ये पुरेशी सामानाची जागा समाविष्ट आहे. विशेष म्हणजे, ट्रेनमध्ये पॅसेंजर सोबत येणाऱ्या पाळीव प्राण्यांसाठी एक पेट बॉक्स देखील आहे. याशिवाय जेवणासाठी फिक्स्ड आणि फोल्ड करण्यायोग्य स्नॅक टेबल्ससुद्धा उपलब्ध आहेत.

सुरक्षेला प्राधान्य

वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या डिझाईनमध्ये सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ट्रेनमध्ये 36 किमी/ता पर्यंतच्या प्रभावांना तोंड देण्यास सक्षम असलेल्या एरोडायनामिक कॅबने सुसज्ज आहे, क्रॅश बफर आणि अँटी-क्लाम्बर्सने वाढविले आहे. वेळोवेळी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ब्लॅक बॉक्स सिस्टम रिअल-टाइम डेटा कॅप्चर करते. शिवाय, दक्षता नियंत्रण यंत्रासाठी ड्रायव्हरने दर मिनिटाला ते ऑपरेट करणे आवश्यक आहे, पुढे अग्नि शोध प्रणाली आणि HL3 सुरक्षा अनुपालनाद्वारे पूरक आहे जे आपत्कालीन परिस्थितीत 15-मिनिटांचा वेगवान प्रतिसाद वेळ सुनिश्चित करते.