Friday, December 26, 2025
Home Blog Page 433

घराला वाळवी लागली आहे ? ‘हा’ मसाल्याचा पदार्थ ठरेल उपयोगी

termites

आपल्याकडे पूर्वीपासून असं म्हटलं जातं की घराला वाळवी लागू नये. कारण वाळवी ही कीड अशा पद्धतीची आहे जी अगदी भिंती, लाकडी वस्तू, कपडे, पैसे अशा सर्व वस्तू पोखरून टाकते. यामुळे तुमच्या घरात जर वाळवी लागली तर तुमचा चांगल्या पद्धतीचे फर्निचर खराब व्हायला वेळ लगणार नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः दमटपणा किंवा ओलसरपणामुळे घरामध्ये वाळवी लागण्याची शक्यता असते. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला घरामध्ये वाळवी लागली असेल किंवा लागू नये यासाठी कोणते उपाय करता येतील याची माहिती जाणून घेणार आहोत.

  • लवंगाची पावडर वाळवी घालवण्यासाठी प्रभावी करू शकते. यासाठी लवंग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर पावडर अशा ठिकाणी स्प्रे करा जेथे वाळवी लागली आहे. यामुळे वाळवीची समस्या दूर होण्यास मदत होईल.
  • लवंगाचे तुकडेही वाळवीची समस्या दूर करण्यास मदत करू शकतात. वाळवी लागलेल्या ठिकाणी लवंगाच्या पावडरसोबत अख्खी लवंगही ठेवा.
  • लवंगाचे तेल वाळवी दूर करण्यासाठी कामी येईल. हे तेल मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. लवंगाचे तेल पाण्यात मिक्स करुन स्प्रे बॉटलमध्ये भरा.वाळवी लागलेल्या ठिकाणी लवंगाचे तेल स्प्रे करा. लवंगाच्या वासामुळे वाळवी निघून जाण्यास मदत होईल.
  • याशिवाय लवंगाचे तेल लाकडाचे फर्निचर, कपाट, भिंती आणि अन्य ठिकाणीही स्प्रे करुन ठेवा. ज्या-ज्या ठिकाणी वाळवी पसरू शकते तेथे लवंगाचे तेल स्प्रे करून ठेवा. लक्षात ठेवा की, लवंगाचे तेल आणि पाण्याचे लिक्विडचा स्प्रे सातत्याने दोन ते तीन दिवस करावा लागेल. यामुळे वाळवी हळूहळू दूर होण्यास मदत होईल.

पीएमआरडीए क्षेत्रात 5 ठिकाणी मल्टीमोड हब विकसित करण्यासाठी मंजुरी

राज्यभरात रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याकडे शासनाचा भर दिसतो आहे. अशातच पुण्यातील रिंग रोड बाबत एका महत्वाची अपडेट हाती आली आहे चला जाणून घेऊया…

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) 83 किलोमीटर अंतरामध्ये अंतर्गत रिंग रोड विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यावर पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी मल्टीमोड विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहेत पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये एकूण 13 आरक्षित आहेत त्यापैकी प्राधान्यांने पाच मल्टीमोड हब विकसित करण्यासाठी पीएमआरडीए च्या सभेमध्ये नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

या ठिकाणी होणार हब

सोळू, वाघोली, कदम वाघ वस्ती, भिल्लारेवाडी आणि भुगाव अशा पाच ठिकाणी मल्टीमोड हब विकसित केले जाणार आहेत. यासाठी आवश्यक भूसंपादन आणि बांधकामासाठी एकूण 370 कोटी 13 लाख रुपये इतका खर्च होणार आहे. पीपीपी तत्त्वावर त्याचा विकास करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील कामांतर्गत निर्गुंडी ते वडगाव शिंदे या अंतरातील रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. सोळू ते निरगुडीदरम्यान होणाऱ्या रस्त्याच्या विस्तृत प्रकल्प अहवालाची छाननी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांच्या वतीने सुरू आहे.

पीएमआरडीए कडून एकूण 83 किमी अंतर्गत रिंग रोड विकसित केला जात आहे. त्यासाठी 14,200 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे असा सुमारे पाच किलोमीटर अंतराचा रस्ता केला जाणार त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पात 113 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सिंगापूर, मलेशिया फिरण्याची सुवर्णसंधी ; IRCTC घेऊन आले आहे स्वस्तात मस्त पॅकेज

Singapore IRCTC

तुम्ही एखाद्या सुंदर देशाला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला IRCTCच्या अत्यंत अप्रतिम टूर पॅकेजबद्दल सांगणार आहोत. IRCTC च्या या टूर पॅकेज अंतर्गत, तुम्हाला दक्षिण पूर्व आशियातील दोन सुंदर देश सिंगापूर आणि मलेशियाला भेट देण्याची संधी मिळत आहे.

किती दिवसांचे पॅकेज ?

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे SIZZLING SINGAPORE WITH MAGICAL MALAYSIA EX-KOLKATA. त्याचा पॅकेज कोड EHO037E आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला एकूण 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी नेले जाईल.

या महिन्यातच सूरु होणार टूर

IRCTC चे सिंगापूर आणि मलेशिया टूर पॅकेज 22 ऑक्टोबर 2024 पासून कोलकाता येथून सुरू होत आहे. हे IRCTC चे फ्लाइट टूर पॅकेज आहे. यामध्ये तुमचा प्रवास विमानाने केला जाईल.

जेवण आणि निवासाची सोय

इतर ठिकाणी तुम्हाला बसने नेले जाईल. प्रवास करताना तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. IRCTC हॉटेल निवासासह तुमच्या जेवणाची आणि निवासाची व्यवस्था करेल.

किती आहे तिकीट ?

जर पैशाबद्दल बोलायचे झाले , तर तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 1,20,700 रुपये मोजावे लागतील. दोन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती भाडे रु. 1,01,700 आहे. जर तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 1,01,700 रुपये भाडे द्यावे लागेल.

BSNL Mobile : BSNL लाँच करणार स्वस्त Mobile; Jio चं टेन्शन वाढलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही महिन्यापूर्वीच Airtel , Jio आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किंमती वाढवल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळला आहे. बीएसएनएल सुद्धा अगदी कमी पैशात ग्राहकांना स्वस्त रिचार्ज ऑफर करत आहे. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आता कंपनीने ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिली आहे. बीएसएनएल लवकरच स्मार्टफोन (BSNL Mobile) लाँच करणार आहे. त्यासाठी कंपनीने Karbonn Mobiles सोबत हातमिळवणी सुद्धा केली आहे. हा स्मार्टफोन जिओ फोन पेक्षाही स्वस्त असतो असं बोललं जातंय. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्यासाठी हा मोठा झटका असेल.

फोनसोबत BSNL सिम देखील उपलब्ध – BSNL Mobile

बीएसएनएलने याबाबत ट्विट करत म्हंटल कि, कार्बन मोबाईल् सोबत पार्टनरशिप करून एक नवीन फीचर फोन आणत आहे. हा मोबाईल Bharat 4G कॅम्पेन मार्फत रिलीज करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनची थेट स्पर्धा Jio Bharat 4G सोबत असणार आहे, जो कमी किंमतीत जास्त कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या फोनसोबत बीएसएनएल सिम देखील उपलब्ध असेल आणि या मोबाईलच्या मदतीने तुम्ही अतिशय जलद इंटरनेट वापरू शकता. BSNL च्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना कमी दरात 4G नेटवर्कचा फायदा मिळणार आहे. हा स्मार्टफोन चांगल्या नेटवर्क कव्हरेजसाठी डिझाइन केला आहे. त्यामुळे Jio ला ग्रामीण क्षेत्रात BSNL कडून चांगली टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

AI आधारित तंत्रज्ञानांचा समावेश –

या स्मार्टफोनमध्ये 4G आणि 5G नेटवर्क अपग्रेड असणार आहे. त्याचसोबत स्पॅम फ्री नेटवर्कसाठी AI आधारित तंत्रज्ञानांचा समावेश असेल. अनेक फीचर्सनी परिपूर्ण असणारा हा मोबाईल (BSNL Mobile) लवकरच ग्राहकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या मोबाईल मध्ये दमदार इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीचा समावेश आहे.

या वर्षी 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 (India Mobile Congress 2024) आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट भारतातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. जिथे नवीन तंत्रज्ञान, इनोव्हेशन्स, आणि भविष्यातील कल्पना मांडल्या जातात. या वर्षीच्या काँग्रेसमध्ये 5G, AI, आणि IoT सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर खास लक्ष दिले जाणार आहे. BSNL देखील त्यांच्या 4G आणि 5G सेवा तसेच AI आधारित स्पॅम फ्री नेटवर्कची माहिती या कार्यक्रमामध्ये देणार आहे.

पुण्यात नवरात्रीनिमित्त वाहतुकीत बदल ; पहा कोणते रस्ते चालू ? कोणते बंद ?

pune traffic

पुणे शहरात गणेशोत्सव जसा धुमधडाक्यात साजरा केला जातो. अगदी त्याचप्रमाणे नवरात्रीचा उत्सव देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील विविध मंदिराच्या परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे चला जाणून घेऊया…

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतुशृंगी मंदिर, भवानी पेठ येथील श्री भवानी माता मंदिर तसेच सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात हा वाहतूक बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. याबाबतची माहिती घेऊनच नागरिकांनी रस्त्यावर उतरावं असे आवाहन वाहतूक पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे. हा बदल मंदिरा परिसरामध्ये दिनांक 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे.

वाहतुकीत बदल

  • अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तर बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच गर्दी पाहून येथील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे.
  • लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यानचा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. तर श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर, नारायण पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
  • या सोबतच पुण्याच्या मध्यभागातील मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांसाठी नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळ येथे वाहने पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात देखील वाहतूकीत बदल करण्यात आले आहे. रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टँड दरम्यान रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. तर मंदिर परिसरात वाहने लावण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. या मंदिरात येणाऱ्या भविकांसाठी नेहरू रस्ता व परिसरात वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सेनापती बापट रस्ता

सेनापती बापट रस्त्यावर श्री चतुःशृंगी मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास येथील वाहतूक ही पत्रकारनगर चौकातून वळवण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहतूक शिवाजी हाउसिंग सोसायटी चौकातून सेनापती बापट रस्त्याच्या डाव्या बाजूने एकेरी करण्यात येणार आहे. तसेच गर्दी पाहून या रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकातून दीप बंगला चौकातून, ओम सुपर मार्केटमार्गे गणेशखिंड रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. चतु:शृंगी मंदिरात येणाऱ्या भावीकांयातही पॉलिटेक्निक मैदानावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महामूर्ख लोकांची जमात म्हणजे हिंदू; मनोहर भिडे पुन्हा बरळले

Manohar Bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. महामूर्ख लोकांची जमात म्हणजे हिंदू समाज आहे. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत.जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे” असं खळबळजनक वक्तव्य मनोहर भिडे यांनी केलं आहे. नवरात्रोत्सावानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्न करताना मनोहर भिडे यांनी वरील वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मनोहर भिडे म्हणाले, देशाच्या पाठीवर असंख्य अतिक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान आहे. आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणं केली. ते आता पाटलाग करतायत, आपण पाय लाऊन पळत आहोत. हिंदी-चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदी-चिनी आणि हिंदी मुस्लिम भाई म्हणाऱ्या हिंदूना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण,चांगलं कोण,हे कळत नाही. कारण हिंदू महामूर्ख आहे. शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवलाय. पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला गांडू बनवत चालला आहे, पण आता इथून पुढे हे चालणार नाही.

आम्ही नवरात्राचा बट्ट्याबोळ हाणून पाडू काही माता-भगिनी यांनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. नवरात्र उत्सवात कार्यक्रम करमणूक हे सर्व सध्या सुरू आहे. हे सर्व नाश करत चालले आहेत. राजकारण, सत्ताकारण,अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची गरज आहे असेही मनोहर भिडे यांनी म्हंटल.

आता हे काय नवीन ? मुंबई ते पुणे केवळ 20 मिनिटांत पोहचता येणार ; विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन

maglev train

भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतात रेल्वेचे मोठे नेटवर्क आहे. देशभरात लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती ? असा प्रश्न विचारला तर वंदे भारत ट्रेन ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावू शकते परंतु सध्या ही गाडी ताशी 150 किमी वेगाने चालविली जात आहे. मात्र चिन्यांच्या अजब देशात एक अशी ट्रेन तयार केली गेली आहे जी विमानापेक्षाही वेगवान धावते. चीनने ताशी 1000 किमी वेगाने धावणाऱ्या मॅग्लेव्ह ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. जर समजा चीनची ही सुपरफास्ट ट्रेन भारतात आली तर काय होईल ?

या ट्रेनच्या वेगाचा विचार केला तर जर भारतात अशी ट्रेन आली तर मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार होईल. मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात पोहचता येईल. बरं आता आपण थोडं स्वप्नरंजन थांबवूया. कारण भारतात अशी ट्रेन आणण्याचा अद्याप तर काही विचार नाही. मात्र चीनच्या या नव्या आविष्काराविषयी चला जाणून घेऊया…

चाके धावत नाहीत तर उडतात

चीनच्या सरकारी मीडियानुसार, या अल्ट्रा-हाय-स्पीड ट्रेनची चाचणी शांक्सी प्रांतात करण्यात आली. ही ट्रेन चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेडने संयुक्तपणे विकसित केली आहे. हे जर्मनीच्या मॅग्लेव्ह म्हणजेच मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्रज्ञानावर चालते. यामध्ये हायस्पीड गाड्यांना चालण्यासाठी ना चाके, ना एक्सल, ना बेअरिंगची गरज असते. पारंपारिक गाड्यांप्रमाणे, मॅग्लेव्ह ट्रेनची चाके रेल्वे ट्रॅकच्या संपर्कात येत नाहीत, उलट ती उडतात. हे त्याच्या वेगाचे कारण आहे.

दोन किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमध्ये कमी-व्हॅक्यूम परिस्थितीत या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. यामध्ये सुपरकंडक्टिंग मॅग्लेव्ह वाहन वापरण्यात आले. या ट्रेनने चाचण्यांमध्ये सर्व मानके पूर्ण केली. चीनच्या यांगगाओ काउंटीमध्ये अल्ट्रा हायस्पीड मॅग्लेव्ह वाहतूक प्रणालीचे बांधकाम एप्रिल 2022 मध्ये सुरू झाले. त्यात एरोस्पेस तंत्रज्ञान आणि रेल्वे तंत्रज्ञान यांचा समावेश करण्यात आला आहे.

पुण्यातील देवीची प्राचीन मंदिरे; भक्ताच्या श्रद्धेचे प्रतीक …

Durga Devi Temples In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सप्टेंबर किंवा ऑक्टोबर गणपती आणि दुर्गामाता यांच्या आगमनाचा महिना असतो . ऑक्टोबरचा हा महिना देवी दुर्गेच्या विविध रूपांना समर्पित आहे. नवरात्री विशेष म्हणजे देवीच्या नऊ रूपांची पूजा करणारा एक पवित्र सण. ज्या काळात भक्तजन उपवासी राहून देवीची आराधना करतात. सांस्कृतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सुद्धा देवीची अनेक मंदिरे पाहण्यास मिळतील . पण ठराविक मंदिरे सोडली तर काही मंदिरे भक्तांना माहीतच नाहीत . आज आम्ही पुण्यातील देवीच्या ठराविक स्थळांची माहिती सांगणार आहोत. जिथे तुम्ही नवरात्रीच्या काळात जाऊ शकता.

1) दुर्गादेवी मंदिर –

दुर्गादेवीचे मंदिर पुण्यातील दत्तवाडी येथे असणारे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे. दुर्गामाता भारतीय संस्कृतीत शक्ती, समर्पण आणि साहसाचे प्रतीक मानली जाते. हि देवी दहा फुटाची असून , या मंदिराची शिल्पकला आणि स्थापत्यकला आकर्षक आहे. मंदिराचा रांगेत असलेला गर्भगृह आणि भव्य मंडप भक्तांना आकर्षित करतो. नवरात्र महोत्सव दरम्यान, येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात. या काळात भक्तांची मोठी गर्दी असते. हे मंदिर भक्तासाठी सकाळी 6 ते 12 आणि दुपारी 4 ते 9 पर्यंत खुले असते. या मंदिराला तुम्ही बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनाने सहजपणे जाऊ शकता.

2) कामाक्षी देवी मंदिर –

कामाक्षी देवी भारतीय हिंदू धर्मातील शक्तीच्या देवींपैकी एक मानली जाते, जिची पूजा ज्ञान, प्रेम आणि समर्पणासाठी केली जाते. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मंदिराचे वास्तुशिल्प अत्यंत आकर्षक असून , ज्यामध्ये विविध देवी-देवतांचे मूळ चित्रण केले आहे. या मंदिराचा परिसर हिरवागार असून, शांत वातावरणमुळे भक्तांना ध्यान करण्यास आणि शांती अनुभवण्यास उत्तम आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात, येथे विशेष पूजा, हवन, आणि धार्मिक अनुष्ठाने आयोजित केली जातात. भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. करवे रोडवरील स्थितीमुळे या मंदिराला बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनांनी जाता येईल.

3) भवानी माता मंदिर –

भवानी मातेचे हे मंदिर 1763 मध्ये बांधले . हे शक्तीच्या देवींच्या रूपांपैकी एक मानले जाते, जिचा आशीर्वाद भक्तांच्या संरक्षणासाठी आणि समृद्धीसाठी घेतला जातो. मंदिरात नित्य पूजा, अभिषेक, आणि आरती नियमितपणे पार पडतात. देवीच्या विशेष उत्सवांमध्ये विशेष पूजा विधी केले जातात. या मंदिरात महापूजा केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते असे अनेकांचे मानने आहे. पुण्यातील विविध सार्वजनिक वाहने किंवा खासगी वाहने वापरून मंदिरापर्यंत जाता येते. हे मंदिर सकाळी 6 ते 12 आणि दुपारी 4 ते 9 पर्यंत भक्तांसाठी ओपन असते.

4) चतु:श्रुंगी माता मंदिर –

या देवीचे मंदिर पुण्यातील चतु:श्रुंगी रोड, मुळशी या ठिकाणी आहे. मंदिराच्या वास्तुकलेत भारतीय स्थापत्य शैलीचा समावेश आहे. मंदिराच्या परिसरात सुंदर बागा आणि निसर्गरम्य वातावरण असून , भक्तांना अधिक प्रभावित करते. नवरात्राच्या काळात येथे उत्सव साजरे केले जातात. चतु:श्रुंगी माता मंदिर हे पुण्यातील भक्तांसाठी एक अनन्य स्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद असून ते शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. त्याच प्रमाणे हे मंदिर लाल विटांनी बांधले असून त्याचे आकर्षण वाढत आहे. या मंदिराला 170 च्या आसपास पायऱ्या आहेत. हे मंदिर सकाळी 5:30 ते 9:00 पर्यंत आणि दुपारी 12:00 ते 7:00 पर्यंत खुले असते.

लाडक्या बहिणींनो, तिसरा हप्ता आलाय!! योजना कायम सुरूच राहणार

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे एकूण ३ हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा आले असून ४५०० रुपयांची आर्थिक मदत महिलांना मिळाली आहे. खरं तर या योजनेची घोषणा होताच विरोधकांनी इतके पैसे देणे शक्य नाही, राज्यावर कर्जाचा बोजा आहे असं म्हंटल होते, मात्र राज्यातील महायुती सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर ठाम राहिले. कोणत्याही परिस्थितीत ही योजना पूर्ण क्षमतेने राबवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्यामुळेच 29 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

खरं तर हि योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आणली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख हि सुरुवातीला 31 जुलै ठेवण्यात आली होती. मात्र महिलांचा उदंड प्रतिसाद पाहून 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. तरीही महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून या योजनेसाठी नोंदणी सुरूच ठेवण्यात आली. आजअखेर दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांनी पुरेपूर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. मात्र विरोधकांनी तेव्हा नावे ठेवली होती.

काँग्रेस सरकार येताच ही योजनाच बंद करू, अशा घोषणाही झाल्या. विरोधातील अनेक आमदारांनी महिलांच्या नोंदणीस सुरुवात केली. बॅनरवर स्वतःचे फोटो लावले. आणि अर्जावर नेमकी चुकीची माहिती भरली. ही योजना पूर्णपणे बदनाम व्हावी, पात्र लाभार्थींना पैसे मिळू नयेत, हा एकमेव उद्देश त्यामागे होता. चुकीचा डाटा अपलोड करून या योजनेचे पोर्टल हँग करण्याचा प्रयत्न देखील विरोधकांनी केल्याचा आरोप होतोय. मात्र तरीही ऑफलाइन पद्धतीचा वापर करून राज्य सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली.

लाडकी बहीण योजना खूप कमी वेळेतच लोकप्रिय झाली. या योजनेची प्रचंड लोकप्रियता पाहून पोटदुखी सुरू झालेल्या विरोधकांनी न्यायालयात देखील दाद मागितली. मात्र न्यायालयाने या योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही, हे थेट जनतेत जाऊन सांगितले आहे. जनतेचाही आता सरकारवर विश्वास बसला असून या योजनेचा उदंड प्रतिसाद अद्यापही सुरू आहे.

महत्वाची बाब म्हणजे , एखादी योजना सुरू करताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा समग्र आढावा घ्यावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कारभार चालवण्याच्या बाबतीत अत्यंत तरबेज नेते आहेत. राज्याच्या तिजोरीवर कोणताही ताण येणार नाही याची दक्षता या तिघांनीही घेतली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पातच 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर याचा कोणताही परिणाम होण्याची तीळमात्र शक्यता नाही. म्हणूनच राज्याचे आर्थिक आरोग्य सुदृढ ठेवून गरजू महिलांना लाभ देण्याच्या या योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिलासादायक ! मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा लोकल प्रवास ‘फास्ट’ होणार

mumbra-kalva local

मुंबई लोकल ही मुंबईकरांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मुंबईकरांचे जीवन हे लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते . मात्र मागच्या काही दिवसांमध्ये लोकलच्या प्रवाशांची संख्या खूपच वाढली आहे. त्यामुळे लोकल मधून प्रवास करताना अगदी धक्काबुक्की करीत प्रवास करावा लागतो. लोकलच्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा असे प्रयत्न रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. आता मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. कारण या स्थानकांवर जलद लोकल गाडयांना थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

5 ऑक्टोबर पासून गाड्यांना थांबा

या मार्गावर ऑफिस करिता ये -जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. म्हणूनच तोच विचार क्राऊन सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रत्येकी एक लोकलला थांबा मिळणार आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे 5 ऑक्टोबर 2024पासून या गाड्यांना थांबा मिळणार आहे. त्यामुळं या स्थानकातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या गाड्या थांबणार ?

कळवा रेल्वे स्थानकात सकाळी 8.56 वाजता अंबरनाथहून – मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
मुंब्रा रेल्वे स्थानकात सकाळी 9.23 वाजता आसनगावहून – मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
कळवा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.29 वाजता मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
मुंब्रा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.47 वाजता मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
त्याचप्रमाणे आता मुंबई सीएसएमटी वरून शेवटची कर्जत लोकल रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी सुटेल तर शेवटची कसारा लोकल 12 वाजून 8 मिनिटांनी सुटेल.