Friday, December 26, 2025
Home Blog Page 431

मुकेश अंबानींचा म्युच्युअल फंडात प्रवेश; सेबीने दिली परवानगी

Mutual fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच भांडवली बाजार नियमक संस्था सेबी यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सेबीने म्युच्युअल फंड मार्केटिंग संदर्भात हा एक निर्णय घेतलेला आहे. सेबीने जिओ आणि ब्लॅक रॉक यांना म्युच्युअल फंडात येण्यामध्ये त्यांची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील जिओ फायनान्शिअल सर्विसेसच्या म्युच्युअल फंडातील प्रवेशामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढणार आहे.

जिओ फायनान्शियलने एक्सचेंज फाईलमध्ये याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी ब्लॅक रॉक फायनान्शियल मॅनेजमेंट सोबतच्या संयुक्त वेंचरला म्युच्युअल फंडात प्रवेश करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जिओ आणि ब्लॅक रॉक या दोन्ही कंपन्यांनी सर्व कागदपत्रे सेबीकडे दिल्यानंतर त्यांच्या वेंचरला मंजुरी दिलेली आहे. या कंपन्यांनी 2023 मध्ये एकमेकांशी करार केला होता. आणि आता एक वर्षानंतर हा करार मंजूर झालेला आहे. म्युच्युअल फंड मार्केटमध्ये प्रवेश मिळण्यासाठी या कंपन्यांनी संयुक्तपणे 2023 ऑक्टोबर मध्ये यासाठी सेबीकडे अर्ज केलेला होता. या नव्या नवीन प्रकल्पासाठी या दोन्ही कंपन्या आता 15 – 15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.

यावेळी ब्लॅक-अप कंपनीच्या रिचल लॉर्ड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले की, “सेबीने दिलेल्या या निर्णयामुळे आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे. आम्ही भारतातील कोट्यावधी लोकांना स्वस्त आणि चांगला गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिओ फायनान्शिअल सर्विस या कंपनीसोबत पार्टनरशिप करून आम्ही भारताला गुंतवणूक आणि बचत करणाऱ्या देशासाठी बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी वित्तीय सेवा देत असतात. या अगोदरही कंपनी रिलायन्स उद्योग समूहाचे उप कंपनी होती. जिओ फायनान्शिअल सर्विसेस या कंपनीची उप कंपनीची व फायनान्स या कंपनीकडे एनबीएससीचा परवाना आहे. याच कंपनीची जिओ पेमेंट्स बँक ही आणखी एक उप कंपनी आहे.

देशात धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन; रेल्वे विभागाची जय्यत तयारी

Hydrogen Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात रेल्वेचं भलंमोठं जाळं आहे. लांबच्या आणि आरामदायी प्रवासासाठी अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. रेल्वे विभागाने सुद्धा मागील काही वर्षात रेल्वेचा कायापालट केला आहे. देशात दरवर्षी नवनवीन आणि अपडेटेड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येतायत. यापूर्वी आपण वंदे भारत ट्रेन, अमृत भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण अशा नवनवीन ट्रेन बघितल्या असतील… मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुद्धा जोरात सुरु आहे. त्यातच आता . भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची योजना आखली आहे. हि ट्रेन स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असणार आहे. हायड्रोजन ट्रेनचे जुन्या इंधनाच्या तुलनेत कमी प्रदूषण होणार असून, भारतीय रेल्वेने अधिक टिकाऊ ट्रान्सपोर्ट सिस्टम विकसित करण्याच्या दिशेने उचलले महत्वपूर्ण पाऊल आहे. या ट्रेनच्या माध्यमातून 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट आहे. या ट्रेन देशाच्या विविध ऐतिहासिक आणि टेकडी मार्गांवरून धावणार आहेत.

जर्मनच्या TUV-SUD संस्थेशी करार –

या ट्रेनसाठी भारतीय रेल्वेने जर्मनीच्या TUV-SUD या संस्थेसोबत सुरक्षा ऑडिटसाठी करार केला आहे. TUV-SUD हे विविध उद्योगांसाठी उत्पादनांची चाचणी करणे , प्रमाणपत्र तसेच सल्ला देण्याचे काम करते . या कंपनीचा उद्देश ग्राहकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि टिकाऊ उत्पादने व सेवा उपलब्ध करून देणे हा असतो . या पुनरुत्पादन हायड्रोजन ट्रेनची चाचणी 2024 मध्ये सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर सिस्टम इंटिग्रेशन युनिट बॅटरी आणि दोन फ्युएल युनिट सिंक्रोनायजेशन याची सुद्धा यशस्वी चाचणी झाली आहे. यामध्ये विद्यमान डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) रेकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल बसवण्याचा प्रकल्प आणि आवश्यक पायाभूत सुविधा देण्याचे काम चालू आहे.

35 हायड्रोजन ट्रेनची तयारी –

या प्रकल्पामध्ये पाच हायड्रोजन फ्यूल सेल आधारित मेन्टेनन्स वाहने तयार केली जाणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक वाहनाचा खर्च 10 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. हायड्रोजन फॉर हेरिटेजच्या माध्यमातून देशाच्या विविध ऐतिहासिक आणि टेकडी मार्गांवर 35 हायड्रोजन ट्रेन तयार केल्या जाणार आहेत. या प्रत्येक ट्रेनमागे अंदाजे 80 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मार्गासाठी जमिनीवरील पायाभूत सुविधांसाठी 70 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी उत्तर रेल्वेच्या दिल्ली डिव्हिजनमध्ये पहिली हायड्रोजन ट्रेनची नियुक्ती करण्यात आली आहे. या ट्रेनचा वापर विशेष करून ऐतिहासिक किंवा डोंगराळ मार्गांवर होईल. त्याचबरोबर सिस्टम इंटिग्रेशन युनिट बॅटरी आणि दोन फ्युएल युनिट सिंक्रोनायजेशन याची सुद्धा यशस्वी चाचणी झाली आहे. यामध्ये विद्यमान डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) रेकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल बसवण्याचा प्रकल्प आणि आवश्यक पायाभूत सुविधा देण्याचे काम चालू आहे.

PEM हायड्रोजन पुरवठा –

हरियाणामध्ये 1 मेगाव्हेट PEM इलेक्ट्रोलायझरद्वारे ट्रेनसाठी हायड्रोजन पुरवठा केला जाणार आहे. इलेक्ट्रोलायझर सतत कार्यरत राहून , रोज सुमारे 430 किलोग्राम हायड्रोजन उत्पादन करेल. त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये 3000 किलोग्राम हायड्रोजन साठवणूक युनिट समाविष्ट असणार आहे. जे ट्रेनसाठी महत्वाचे ठरेल.

Savitrbai Phule Scholarship Scheme | सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेत तिप्पटीने वाढ; मुलींना मिळणार एवढी शिष्यवृत्ती

Savitrbai Phule Scholarship Scheme

Savitrbai Phule Scholarship Scheme | आपले सरकार हे नेहमीच समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून योजना आणत असतात. त्यातही स्त्रियांना आणि मुलींना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत असतात. सरकार हे शाळेत शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देत असतात. परंतु आता या शिष्यवृत्ती बाबत एक सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता मुलांना मुलींना मिळणारी शिष्यवृत्ती वाढ होणार आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ होणार आहे. आता या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणाऱ्या येणार आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून (Savitrbai Phule Scholarship Scheme) दिली जाणारी शिष्यवृत्ती ही राज्य शासनाच्या मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य विभाग अंतर्गत दिली जाते. याआधी मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलींना 60 रुपये दिले जात होते. परंतु आता ती रक्कम 250 रुपये प्रति महिना एवढी करण्यात आलेली. आहे तसेच आठवी ते दहावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या मुलींना दर महिन्याला 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती ती आता 300 रुपये एवढी झालेली आहे. त्यामुळे आता विद्यार्थिनींसाठी ही एक खूप आनंदाची बातमी.

तुम्हाला देखील जर या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (Savitrbai Phule Scholarship Scheme) योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला शाळेतील मुख्याध्यापकांची संपर्क साधावा लागेल. त्यानंतर जिल्हाच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाशी देखील संपर्क साधावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज करून त्याचा लाभ घेता येईल. शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण वाढावे आणि त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे. यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. आणि आता त्या योजनेमध्ये बदल करून मिळणारे रक्कम देखील वाढवली आहे.

देशाची सर्वात प्राचीन भाषा कोणती? तमिळ की संस्कृत? जाणून घ्या इतिहास

Oldest language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने मराठी माणसाला एक खूप मोठी आनंदाची बातमी दिली. ती म्हणजे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मागील अनेक वर्षापासून ही मागणी केली जात होती. अखेर आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन सरकारने ही मागणी पूर्ण केलेली आहे. परंतु आपली प्राचीन भाषा ही वेगळीहोती? तमिळ आणि संस्कृत या या दोन भाषा हजारो वर्षापासून एकमेकांशी संघर्ष करीत आहेत. आता त्यातीलसगळ्यात प्राचीन भाषा नक्की कोणती आहे ? हे पाहून जाणून घेऊया

भारतामध्ये संस्कृत भाषा आणि तमिळ भाषा या दोन खूप जुन्या भाषा आहेत. परंतु या दोन्हींमध्ये नक्की प्राचीन भाषा कोणती आहे यावरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले आहे. तमिळ भाषेबद्दल पाहायला गेलो, तर या भाषेचे तब्बल 2300 वर्षांपूर्वीचे कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे ही भाषा सगळ्यात जुनी लिखित तिसऱ्या शतकात असल्याची मानली जाते.

त्याचप्रमाणे संस्कृत भाषेला सर्वात जुनी भाषा मानले जाते. त्यानंतर पुढे अनेक विविध भाषांचा विकास झालेला आहे. याबद्दलची संशोधकांनी माहिती दिलेली आहे. परंतु संस्कृत या भाषेचे जवळपास 3500 वर्षांपूर्वीचे दस्तऐवज उपलब्ध आहे. संस्कृतमध्ये अनेक प्राचीन वेद देखील लिहिलेले आहेत. तमिळ आणि संस्कृत या भारतातील सर्वात प्राचीन भाषा आहेत. आणि त्या समृद्ध आहेत यापैकी तमिळ ही सर्वात प्राचीन आणि लिखित परंपरेत कायम असलेली भाषा आहे. तसेच संस्कृत ही जगातील सगळ्यात जुनी भाषा आहेत असे देखील मानले जाते

तमिळ ही भाषा अनेक राज्यांमध्ये बोलले जाते. ही भाषा तमिळनाडू, श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशियामध्ये देखील बोलली जाते संस्कृती एक इंडो आर्यन भाषा आहे. भारतातल्या सगळ्या भाषांची जननी म्हणून संस्कृत भाषाकडे पाहिले जाते. तमिळ ही जगातली एकमेव अशी भाषा आहे. जिथे पाच ज्ञानकोश आहेत. संस्कृत भाषा ही मुख्यतः हिंदू ग्रंथमध्ये आढळून येते तसेच प्राचीन भारतीय साहित्य देखील संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. तमिळ ही जगातील सगळ्यात लेखन प्रणाली एक आहे.

ITBP Bharti 2024 | ITBP अंतर्गत नोकरीची मोठी संधी; अशाप्रकारे करा अर्ज

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. अशातच आता आम्ही आणखी एका नोकरीच्या संधी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सीमा पोलीस दल यांच्या अंतर्गत एक मोठी भरती होणार आहे. ही भरती सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषतज्ञ वैद्यकीय, अधिकारी वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी होणार आहे. या पदाच्या 345 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.16 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीला सुरुवात होणार आहे. तर 14 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | ITBP Bharti 2024

या भरती अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 345 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

अर्ज शुल्क

या भरती अंतर्गत आरक्षित उमेदवारांसाठी फी नाही. तसेच जनरल ओबीसी उमेदवारांसाठी 400 रुपये फी असणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

16 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

रिक्त पदसंख्या

  • सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी – 5 जागा
  • विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – 176जागा
  • वैद्यकीय अधिकारी – 164 जागा

शैक्षणिक पात्रता | ITBP Bharti 2024

वरील सर्व पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे MBBS झालेले असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 16 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
  • 14 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

कोकणात होणार राज्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प; 38000 बेरोजगारांना मिळणार नोकरी

Revise Aerospace

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महायुती सरकार आल्यापासून अनेक मोठ मोठे बदल होताना दिसत आहे. राज्यात अनेक मोठे प्रकल्प देखील उदयास येत आहे. ज्याचा फायदा राज्यभरातील नागरिकांना होणार आहे. अशातच आता रत्नागिरी येथील वाटद झाडगाव या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात क्षेत्रात जवळपास 2950 कोटी गुंतवणुकीचा दोन प्रकल्पांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली आहे. या नवीन प्रकल्पामुळे आता अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या ठिकाणी 38120 रोजगार निर्मिती होणार आहे. या गुंतवणूक प्रकल्पामध्ये सिलिकॉन वेफर्स एटीएमपी साहेब आणि एरोस्पेस संरक्षण या क्षेत्राशी संबंधित असणार आहेत.

हा प्रकल्प वाटत आणि झाडगाव एमआयडीसी या भागात होणार आहे. हा राज्यातील तिसरा सगळ्यात मोठा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पामध्ये जवळपास 1950 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ते 30 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. यासोबतच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा एक दुसरा मोठा प्रकल्प आहे. तो एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये जवळपास 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. आणि 4500 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

सरकारच्या या दोन्ही प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती वाढणार आहे. तसेच व्यावसायिक उपक्रम स्थापित होणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योग घटकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ समितीची बैठक झालेली आहे. या बैठकीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांसारखे लोक उपस्थित होते.

PM Kisan and Namo Shetkari Mahasanman | ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 4 हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर

PM Kisan and Namo Shetkari Mahasanman

PM Kisan and Namo Shetkari Mahasanman | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणत असतात. यातीलच केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. अशातचा आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2 हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच आता देशभरातील शेतकऱ्यांना 4 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आज म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम येथे कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे हस्तांतरित केले जाणार आहे.

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2018 मध्ये चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 4 हप्ते दिलेले आहे आणि आता पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे हस्तांतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील जवळपास 91.53 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा निधी जमा होणार आहे. असे एकूण 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

परंतु या योजनेचे दोन्ही हप्ते जर तुम्हाला पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्ही इ केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. इ केवायसी करण्यासाठी तुम्ही शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जाऊ शकता. आणि केवायसी टॅबवर क्लिक करून आधार क्रमांक नोंदवला जाईल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी दाखवल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. अशाप्रकारे तुम्ही केवायसी करू शकता, केवायसी केले नाही, तर तुमच्या खात्यावर या योजनेचे पैसे येणार नाहीत.

Eyesight Care Tips | रोजच्या ‘या’ वाईट सवयींमुळे होते डोळ्यांची दृष्टी कमी ; आजच करा बदल

Eyesight Care Tips

Eyesight Care Tips | आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा आहे. परंतु त्यातील निर्णय हे अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. ज्यामुळे आपल्याला हे सुंदर जग पाहता येते आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता येतो. परंतु आजकाल डोळ्यांमध्ये तसेच दृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अगदी लहान मुलांना देखील चष्मा लागलेला आहे. परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या काही अशा सवयी असतात. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना हानी पोहोचते. आणि यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते. या सगळ्यामुळे तुम्हाला चष्मा लागतो. तसेच डोळे दुखतात, डोळे लाल होतात यांसारख्या अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. आज आपण अशा सवयीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या सवयीमुळे तुम्ही ज्या डोळ्याची दृष्टी कमी होते. किंवा डोळ्याच्या संबंधित अनेक आजार वाढतात.

खूप वेळ स्क्रीन पाहणे | Eyesight Care Tips

आजच्या काळात आपण सर्वच बहुतेक वेळ संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन किंवा टीव्ही स्क्रीनसमोर घालवतो. या उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांना थकवतो आणि डोळे कोरडे होऊ शकतात. शिवाय, एकाच अंतरावर जास्त वेळ लक्ष केंद्रित केल्याने डोळ्यांवर ताण येतो.

पुरेशी झोप न मिळणे

डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा डोळे सुजतात आणि थकल्यासारखे वाटते. दीर्घकाळ झोप न लागल्यामुळे दृष्टी खराब होऊ शकते.

सनग्लासेस न घालणे

सनग्लासेस केवळ सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करत नाहीत तर डोळ्यांतील स्क्वॅम्सच्या विकासास प्रतिबंध करतात. स्क्वामा हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो डोळ्यांना होऊ शकतो. सनग्लासेस लावल्याने दृष्टी सुरक्षित राहण्यास मदत होते.

कमी प्रकाशात वाचन करणे

जर तुम्ही मंद प्रकाशात वाचले तर तुमच्या डोळ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. यामुळे डोळ्यांमध्ये तणाव आणि थकवा येतो. कमी प्रकाशात जास्त वेळ वाचन केल्याने दृष्टी खराब होऊ शकते.

वाईट खाण्याच्या सवयी

तुमच्या आहाराचाही दृष्टीवर परिणाम होतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारखे पोषक घटक आवश्यक आहेत. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे फळे, भाज्या, अंडी, मासे आणि दूध यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

धूम्रपान

धुम्रपान डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. धूम्रपानामुळे डोळ्यात कोरडेपणा, जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो. दीर्घकाळ धूम्रपान केल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होते आणि मोतीबिंदूचा धोकाही वाढतो.

कॉन्टॅक्ट लेन्सचा चुकीचा वापर | Eyesight Care Tips

कॉन्टॅक्ट लेन्सच्या अयोग्य वापरामुळे दृष्टी खराब होऊ शकते. कॉन्टॅक्ट लेन्स स्वच्छ करण्यासाठी योग्य उपाय वापरणे महत्वाचे आहे. जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.

Dates Benefits |दररोज खजूर खाल्याने होतात अनेक फायदे; अशक्तपणा दूर होऊन हाडांची वाढेल ताकद

Dates Benefits

Dates Benefits | ड्रायफ्रूट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे पोषण तत्व मिळतात. त्यातील खजूर हा एक असा पदार्थ आहे. ज्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला जास्त फायदा होतो. खजुरांमध्ये फायबर, विटामिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे आपल्याला अनेक आजार होण्यापासून रोखले जाते. आणि आपले आरोग्य देखील चांगले राहते. आता रोज खजूर (Dates Benefits) खाल्ल्याने आपल्या शरीराला नक्की काय फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच खजूर खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती हे देखील जाणून घेणार आहोत.

रोज खजूर खाण्याचे फायदे | Dates Benefits

वजन कमी करण्यास मदत करते

खजूरमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते, त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. हे जास्त खाण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.

पचनासाठी फायदेशीर

खजूरमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय आतडे निरोगी ठेवण्यासही मदत होते.

ऊर्जा वाढते

खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते, जी तुम्हाला झटपट ऊर्जा देते. हे फळ एक निरोगी आणि नैसर्गिक पर्याय आहे जे तुम्हाला थकवा आणि सुस्तीशी लढण्यास मदत करते. खजूर खाल्ल्याने तुम्ही तुमची दैनंदिन कामे अधिक उर्जेने पूर्ण करू शकता.

हृदय आरोग्य

खजूरमध्ये पोटॅशियम आढळते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे ठोके नियमित राहतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

मानसिक आरोग्य

खजूरमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते. हे मेंदूच्या पेशींना पोषण देते आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. खजूरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

डोळ्यांचे आरोग्य | Dates Benefits

खजूरमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे डोळ्यांसाठी आवश्यक आहे. हे रातांधळेपणासारख्या डोळ्यांच्या समस्या टाळते. खजूरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

हाडांचे आरोग्य

खजूरमध्ये कॅल्शियम आढळते, जे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांच्या आजारांना प्रतिबंधित करते.

खजूर खाण्याची योग्य पद्धत कोणती?

खजूर खाण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना रात्रभर पाण्यात 8-10 तास भिजवून दुसऱ्या दिवशी खाणे. पाण्यात भिजवल्याने खजूरमध्ये असलेले टॅनिन आणि फायटिक ॲसिड काढून टाकले जाते, ज्यामुळे त्यातील पोषण सहजपणे शोषले जाते.

खजूर खाल्ल्याने नुकसान होऊ शकते का?

खजूर अत्यंत पौष्टिक असले तरी त्यांचे जास्त सेवन केल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात. खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी ते सावधगिरीने सेवन करावे. तसेच खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

नया है यह ! पुढे,मागे दोन्ही बाजूला स्क्रीन, 50MP कॅमेरा,Lava Agni 3 5G लाँच

Lava Agni 3

यापूर्वी तुम्ही मोबाईलच्या एकाच बाजूला स्क्रीन पहिली असेल. मात्र आता मोबाईच्या दुनियेत एक नवा फोन आला असून या फोनला दोन्ही बाजूला स्क्रिन आहेत. Lava Agni 3 असे याचे नाव आहे. चला याबद्दल जाणून घेऊया अधिक माहिती

Lava कंपनीने सणासुदीच्या हंगामात धमाल करण्यासाठी Lava Agni 3 हे Lava Agni 2 चे अपग्रेड मॉडेल लॉन्च केले आहे. महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर लावा हा स्मार्टफोन ड्युअल डिस्प्ले आणि ॲक्शन की सारख्या वैशिष्ट्यांसह आणला गेला आहे. तुम्ही Lava Agni 3 Heather Glass आणि Pristine Glass कलर पर्यायांमध्ये खरेदी करण्यास सक्षम असाल.

कुठून खरेदी करता येणार ?

तुम्ही Amazon वर फोन प्री-बुक करू शकता, प्री-बुकिंगसाठी तुम्हाला 499 रुपये द्यावे लागतील. या फोनची विक्री 9 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल, ज्यांनी प्री-बुकिंग केले आहे ते 8 ऑक्टोबरला फोन खरेदी करू शकतील.

किती असेल किंमत ?

इस लावा मोबाइल फोन के 8GB/128GB वेरिएंट की कीमत 20,999 रुपये है. यही मॉडल 66 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट के साथ 22,999 रुपये में मिलेगा. 8GB/256GB वाले टॉप वेरिएंट के लिए 24,998 रुपये खर्च करने होंगे. ये मॉडल आपको चार्जर के साथ मिलेगा.

काय आहेत वैशिष्ट्ये ?

  • डिस्प्ले: या लावा फोनमध्ये 6.78 इंच 1.5K 3D वक्र डिस्प्ले आहे जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय फोनच्या मागील भागात 1.74 इंच AMOLED स्क्रीन उपलब्ध असेल.
  • प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंशन 7300X प्रोसेसर स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वापरला गेला आहे.
  • रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे, परंतु 8 जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने, रॅम 16 जीबीपर्यंत वाढवता येते.
  • कॅमेरा: 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP टेलिफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर फोनच्या मागील पॅनलवर उपलब्ध असेल. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: फोनला लाइफ आणण्यासाठी 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी प्रदान करण्यात आली आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • सॉफ्टवेयर: इस नए लावा फोन को एंड्रॉयड 14 के साथ उतारा गया है, लेकिन कंपनी का कहना है कि इस फोन को दो एंड्रॉयड अपग्रेड और चार साल तक सिक्योरिटी अपडेट्स मिलते रहेंगे.
  • अन्य फीचर्स: इस फोन में डॉल्बी एटमॉस, डुअल स्टीरियो स्पीकर्स, बड़ा वेपर चैंबर कूलिंग सिस्टम मिलता है.