Friday, December 26, 2025
Home Blog Page 434

Navratri 2024 | मुंबईतील या मंदिरात नाणे चिकटल्यास देवी करते इच्छा पूर्ण; जाणून घ्या इतिहास

Navratri 2024

Navratri 2024 | संपूर्ण भारतात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या नवरात्रीमध्ये अनेक लोक हे देवीच्या वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत असतात. असे म्हणतात या नऊ दिवसात देवी ही पृथ्वीवर वास्तव करत असते. आणि त्यांच्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात. त्यामुळे अनेक लोक हे मंदिरात जातात. अशातच मुंबईतील एक महालक्ष्मीचे मंदिर आहे. हे मंदिर खूप प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या काठावर भुलाई देसाई मार्गावर आहे. या ठिकाणी अनेक लोक हे जात असतात. या महालक्ष्मीचे मंदिर समुद्राच्या अगदी जवळ आहे. या मंदिरातील वेगवेगळ्या अतिशय सुंदर अशा मूर्ती आहे. गर्भामध्ये महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती या तीन देवीच्या मूर्ती एकत्र आहे. तिन्ही मूर्ती सोन्याच्या बांगड्या आणि हारांनी सजवलेले आहे. तसेच हे मंदिर दिसायला अत्यंत सुंदर आहे. दारापाशी सुंदर कोरीव कामही केलेले आहे. या ठिकाणी विविध देवतांचे आकर्षक पुतळे देखील पाहायला मिळतात.

या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे. आणि तो इतिहास देखील खूपच रंजक आहे. ब्रिटिशांनी महालक्ष्मी प्रदेश वरळी प्रदेशाला जोडण्यासाठी ब्रीच मार्ग बनवण्याची योजना केली होती. त्यावेळी समुद्राच्या वादळी या कामात सारखी विघ्न येत होती. त्यावेळी देवी लक्ष्मी एक ठेकेदार रामजी शिवाजी यांच्या स्वप्नात आली. आणि समुद्राच्या देवीच्या ती मूर्ती काढून मंदिर स्थापन करण्याचा आदेश दिला. रामजी यांची तसेच केले आणि यशस्वीरिता ब्रीच तयार झाला.

या देवीला संपत्तीची देवी देखील मानले जाते. तुमच्या घर आणि व्यवसायात सुख-समृद्धी घेण्यासाठी अनेक लोक महालक्ष्मीची पूजा करतात. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा आई पूर्ण करत असते. भाविक महालक्ष्मी चा मुखवटा पाहू शकत नाही. कारण दिवसा त्या मूर्तीवर मुखवटा चढवलेला असतो. पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मूळ मूर्ती पाहण्यासाठी रात्री यावे लागते.

या देवीवर अनेकांची खूप श्रद्धा आहे. रात्री या देवीचा मुखवटा चढवल्यानंतर दरवाजा बंद होतात. आणि सकाळी स्वच्छता झाल्यानंतरच देवींचा अभिषेक होतो. आणि त्यानंतर भक्तांना दर्शन दिले जाते. या मंदिरात एक भिंत आहे. ज्यावर तुम्हाला अनेक दाणे दिसतील असे म्हणतात की, जर ही नाणी भिंतीवर चिकटली तर देवी त्यांची इच्छा पूर्ण करते.

Canara Bank Bharti 2024 | कॅनरा बँक अंतर्गत तब्बल 3000 रिक्त पदांसाठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

Canara Bank Bharti 2024

Canara Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण कॅनरा बँक अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदांसाठी आहे. या पदाच्या एकूण 3000 रिक्त जागा आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 4 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता आपण या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Canara Bank Bharti 2024

कॅनरा बँक अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण 3000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष दरम्यान असते गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

4 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा ? | Canara Bank Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 4 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांनी दुधात हा मसाला मिसळून प्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Blood Sugar

Blood Sugar | आज काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील होत आहे. त्यातही आजकाल मधुमेहाचा आजार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक लोकांना मधुमेह होतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मधुमेहाचा समस्या दिसत आहेत. मधुमेहाचा रुग्ण जास्त वेळ उपाशी पोटी राहिला, तर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढू लागते. तेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही. आणि योग्य प्रतिसाद देत नाही. तेव्हा या प्रकारचे आजार होतात आता या परिस्थितीमध्ये नक्की काय खावे. याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मधुमेहाच्या रुग्णांनी हे खास पेय प्यावे | Blood Sugar

अशा स्थितीत साखरेची पातळी वाढते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे आणि आहार घेऊन तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता. तथापि, काही घरगुती उपाय देखील मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात, ज्यामध्ये दालचिनी महत्त्वाची मानली जाते. दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.

दालचिनी साखर नियंत्रित करते. दालचिनीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा. हे दूध प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते. तुम्ही इतर मार्गांनीही दालचिनीला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. मधुमेहामध्ये दालचिनी कशी काम करते?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असेही समोर आले आहे की, दालचिनीच्या सेवनाने अनियंत्रित साखरेवर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दालचिनी फायदेशीर ठरते. विशेषतः उपवासाच्या साखरेवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. काही रुग्णांना 3 महिन्यांसाठी 1 ग्रॅम दालचिनी देण्यात आली आणि त्यांच्या उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी 17 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले.

दालचिनीचे फायदे फक्त साखरेसाठीच नाही तर दालचिनी अनेक रोगांवर गुणकारी असल्याचे सिद्ध होते. दालचिनीचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. हे वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जाते. उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील दालचिनीचा वापर केला जातो. यासाठी सकाळी दालचिनीचे सेवन करा. एका ग्लास पाण्यात दालचिनी रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी प्या. यामुळे तुमची मंद चयापचय क्रिया वाढेल आणि तुमचे वजनही कमी होईल.

तुमच्याही शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असेल तर, आहारात करा या पदार्थांचा समावेश

Uric Acid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीरात अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. परंतु या पोषक तत्त्वांची जर कमतरता भासली, तर शरीरात अनेक बदल होत असतात. यातीलच एक म्हणजे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात युरिक ऍसिड तयार होते. जेव्हा हे यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार होते. तेव्हा आरोग्य संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जर तुमच्याही शरीरातील पातळी वाढली असेल, तर ते वेगाने कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काही गोष्टींचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. अनेक पदार्थांमध्ये आढळतात आणि तुमच्या शरीर नैसर्गिकरीत्या देखील असतात. त्यानंतर हे यूरिक ॲसिड रक्तात मिसळते आणि मूत्र मार्गे मूत्रपिंडातून शरीरातून बाहेर टाकले जाते.

परंतु जेव्हा प्युरीनचे प्रमाण वाढते. तेव्हा मूत्रपिंड ते फिल्टर करू शकत नाही तेव्हा ते क्रिस्टलच्या स्वरूपात जमा होतात. आणि सांध्यांमध्ये जमा होतात. आणि त्यामुळे खूप जास्त वेदना होतात. तेव्हा आरोग्य संबंधित अनेक समस्त उद्भवतात जर तुमच्या शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढली असेल, तर ती झटपट कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. ते आज आपण जाणून घेणार आहोत.

सांधेदुखी कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा

यूरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या आहारात कमी प्युरीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ जसे की दही आणि दुधाचे सेवन करा कारण ते यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत करतात. तसेच, डुकराचे मांस, सीफूड आणि सेंद्रिय मांसासारखे उच्च-प्युरीन असलेले पदार्थ टाळा आणि अल्कोहोल आणि साखरयुक्त पेये यांचे सेवन मर्यादित करा. ही संतुलित वजन कमी करण्याची योजना तुमच्या युरिक ऍसिडची पातळी कमी ठेवण्यास मदत करू शकते.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये आढळणारे कॅटेचिन हे प्रभावी अँटिऑक्सिडंट असतात. शरीरातील विशिष्ट एन्झाइम्सची निर्मिती कमी करण्यासाठी कॅटेचिनचा वापर केला जातो. यूरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते.

फायबरचा समावेश करा

आहारात फायबरचा समावेश केल्यास यूरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. आहारात ओट्स, संपूर्ण धान्य आणि ब्रोकोली, भोपळा यांचा समावेश करा. हे पदार्थ पौष्टिक फायबरमध्ये समृद्ध असतात जे शरीराला यूरिक ऍसिड शोषण्यास आणि काढून टाकण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खा

यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी, दररोज व्हिटॅमिन सी युक्त फळे खा, यामुळे यूरिक ऍसिडचे प्रमाण काही वेळात कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, तुमच्या वजन कमी करण्याच्या योजनेमध्ये किवी, संत्री, आवळा आणि लिंबू वापरणे सुरू करा.

जास्त पाणी प्या

पाणी हे नैसर्गिक क्लिंजर आहे जे विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करते. त्यामुळे दररोज किमान 10-12 ग्लास पाणी प्यावे. जास्त पाणी प्यायल्याने युरीक ऍसिड लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते.

Navratri 2024 | भारतातील ‘या’ प्रसिद्ध देवीच्या मंदिरांना नवरात्रीत नक्की भेट द्या; जाणून घ्या सविस्तर

Navratri 2024

Navratri 2024 | आपल्या भारतामध्ये प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. अशातच आजपासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून संपूर्ण भारतात नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. असे म्हणतात की, या नऊ दिवसात देवी पृथ्वीवर येत असते. आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असते. आपल्या भारतामध्ये देवीची अनेक मंदिर आहेत. त्या मंदिरांना शक्तीपीठ म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी वर्षभर भक्तांची खूप गर्दी असते. परंतु नवरात्रीच्या उत्सवात या मंदिरात लाखोंनी भक्त येत असतात. आता भारतातील ही कोणती मंदिर आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

वैष्णोदेवी मंदिर जम्मू आणि काश्मीर | Navratri 2024

वैष्णोदेवी हे भारतातील सगळ्यात प्रसिद्ध असे मंदिर आहे. हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर माता वैष्णोदेवीला समर्पित आहे. हे मंदिर जम्मू काश्मीरमध्ये आहे. वर्षभर या ठिकाणी भक्तांची खूप मोठी गर्दी होते. नवरात्रीच्या दिवसात तर या ठिकाणी जास्त गर्दी असते.

वनशंकरी मंदिर कर्नाटक

हे मंदिर कर्नाटक मध्ये आहे कर्नाटकातील दुर्गा देवीचे हे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर जंगलाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे या मंदिराला वनशंकर असे नाव देखील आहे. या मंदिरात देवीची काळ्या रुपात मूर्ति स्थापन करण्यात आलेली आहे. या मंदिराची निर्मिती जवळपास 17 व्या शतकात करण्यात आलेली आहे.

दुर्गा मंदिर वाराणसी

हे मंदिर भारतातील सगळ्यात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. वर्षभर या ठिकाणी खूप गर्दी असते. हे वाराणसी शहरात असल्यामुळे या ठिकाणी अगदी सहज पोहोचता येते. तुम्ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी भेट देऊ शकता. वाराणसी स्टेशन वरून केवळ दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

रेल्वेचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील वंदे भारत ट्रेन रद्द

vande bharat express nagpur

देशभरात अनेक मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर देशभरातून या गाडीला मागणी देखील आहे. खूप आरामदायी आणि विमानांप्रमाणे प्रिमिअम गाडीला प्रवाशांनी उचलून धरले. मात्र देशातील या लक्झरी रेल्वे बाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. देशभरातील अनेक मार्गांवर एका मागोमाग एक वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. मात्र या व्हीआयपी ट्रेनला काही मार्गावर उत्तम प्रतिसाद मिळतोय मात्र काही मार्गावर आहे त्या सीट्स सुद्धा भरता येत नाहीत अशी स्थिती आहे.

देशभरात तोट्यात चालणाऱ्या ट्रेन्स पैकी महाराष्ट्रातील एका ट्रेनचे नाव पुढे आले आहे. नागपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस प्रत्येकी दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस 2 आणि 3 ऑक्टोबरला तर सिकंदराबाद- नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 5 आणि 6 ऑक्टोबरला धावणार नाही. 16 सप्टेबरला सुरू झालेल्या गाडीला 15 दिवसांनी रद्द करण्याची वेळ आली आहे.

या गाडीच्या वेळापत्रकाबाबत सांगायचे झाले तर 20 डब्यांची नारंगी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर-सिकंदराबाद-नागपूर या मार्गावर सुरू झाली आहे. ही गाडी मंगळवार वगळता दररोज आहे. या गाडीला नागपूर ते सिकंदराबादचे अंतर कापण्यासाठी 7 तास 15 मिनिटे लागतील. ही गाडी नागपूरहून पहाटे 5 ला निघते आणि दुपारी सिकंदराबादला 12.15 ला पोहोचते.

या स्थानकांवर थांबे

130 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ही गाडी नागपूरहून निघाल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबते. त्यानंतर थेट सिकंदराबादला जाते. वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादहून दुपारी 1 वाजता निघते आणि नागपूरला रात्री 8.20 वाजता पोहोचते. सध्या नागपूरहून नागपूर -सिकंदराबाद, नागपूर- बिलासपूर आणि नागपूर इंदूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.

11 मार्गावर वंदे भारत तोट्यात

संपूर्ण देशाचा विचार करता जवळपास 66 मार्गावर प्रीमियम ट्रेन सुरू करण्यात आले आहेत परंतु या ट्रेनचा भाडंच एवढं आहे की ही ट्रेन सर्वांना परवडणारी नाही. त्यामुळेच काही मार्ग हे तोट्यात चालले आहेत. रेल दुनिया या वेबसाईटवर याबाबतचे माहिती सांगण्यात आली आहे. देशभरातील काही भागांमध्ये वंदे भारताला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर भुवनेश्वर विशाखापट्टणम, टाटानगर- ब्रह्मपूर, रीवा- भोपाळ, कलबुर्गी- बंगळुरू,उदयपूर- आग्रा/ जयपूर, दुर्ग- विशाखापट्टणम, नागपूर- सिकंदराबाद आदि मार्गावर निम्म्यापेक्षा जास्त सीट हा रिकाम्या राहू लागल्याची माहिती आहे. या ट्रेनची सेवा ही विमानासारखी प्रीमियम सेवा आहे. अगदी पुणे मुंबई असा वंदे भारतचा प्रवास करायचा विचार केल्यास तिकीट उपलब्ध असतात. या मार्गावरील वंदे भारत ट्रेन लोकांच्या सोयीची आहे. बहुतांश वेळा प्रवाशांनी ही ट्रेन भरलेली असते.

महाराष्ट्रात नागरी गृहनिर्माण संस्थांसाठी NA कर काढून टाकणार ?

real estate

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नागरी गृहनिर्माण संस्थांवरील बिगरशेती (NA) कर काढून टाकणे अपेक्षित आहे, असे महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा निर्णय राजकीय नेते आणि गृहनिर्माण महासंघांकडून कर रद्द करण्याच्या विनंत्यांनंतर घेण्यात आला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पेमेंट नोटिसांचा सामना करणाऱ्या अनेक जुन्या सोसायट्यांवर परिणाम होतो.

ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही घोषणा होऊ शकते, असे या अधिकाऱ्याने नमूद केले. सध्या, नगरपालिका कार्यक्षेत्रातील गावठाण क्षेत्राबाहेरील सोसायट्यांना हा कर लागू होतो, जवळपास 200,000 सोसायट्यांपैकी फक्त 10,000-15,000 सोसायट्यांना NA करातून सूट देण्यात आली आहे. 2022 पासून NA कर संकलनावर स्थगिती असूनही, ज्या जमीनधारकांनी आधीच एक-वेळ NA रूपांतरण कर भरला आहे त्यांच्यावरील दुहेरी कर आकारणीबद्दल चिंता कायम आहे. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी मत व्यक्त केले की जर निवडणुकीपूर्वी सूट जाहीर केली गेली तर त्यामुळे बाधित गृहनिर्माण संस्थांना लक्षणीयरीत्या दिलासा मिळेल.

राज्य सरकार एनए कर मागे घेण्याकडे झुकत असताना, काही सोसायटी सदस्यांना या स्थगितीबद्दल माहिती नाही, पेमेंट करणे सुरूच आहे. वकिलांचा असा युक्तिवाद आहे की सध्याच्या कर तरतुदी निवासी साइट्सशी भेदभाव करतात आणि अयोग्य वर्गीकरणास कारणीभूत ठरतात

झारखंडमध्ये बॉम्बने उडवला रेल्वे ट्रॅक ; कारस्थानाच्या मागे कोणाचा हात ?

jharkhand

मागच्या काही दिवसांपासून रेल्वे ट्रॅक वर दगड , मोठे खांब अशा वस्तू ठेवल्याच्या अनेक घटना देशभरातून उघडकीस येत आहेत. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही अशी घटना घडली होती. मात्र आता झारखंड मधून एक धक्कादायक बातमी हाती येत आहे. झारखंड मधील रांची येथील साहिबगंज मध्ये बॉम्बस्फोट घऊन आणून रेल्वे ट्रॅक उडवून दिल्याची घटना घडली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराहट निर्माण झाली आहे.

अन रेल्वे ट्रॅकचा भाग उडून पडला

लालमाटिया ते फरक्का या एमजीआर रेल्वे मार्गावर ही घटना घडली. अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत ट्रॅकचा 470 सेमी लांबीचा तुकडा खराब झाला आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की रेल्वे ट्रॅकचा काही भाग 39 मीटर अंतरावर पडला.

ट्रॅकमध्ये 770 सेमीचा गॅप

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर ट्रॅकमध्ये 770 सेंटीमीटर अंतर निर्माण झाले आहे. तेथे तीन फूट खोल खड्डा आहे. 40/1 क्रमांकाच्या पिलरजवळ हा स्फोट झाला. खांब क्रमांक 39/15 येथे ट्रॅकचा तुकडा सापडला. आतापर्यंत केलेल्या तपासात हा स्फोट का झाला हे समोर आलेले नाही. अपघातानंतर झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात आहे की कोणीतरी जाणूनबुजून रेल्वे रुळाचे नुकसान केले आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.

“जैवविविधता नष्ट होणार…” नवीन महाबळेश्वर प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरणतज्ज्ञांची मागणी

महाराष्ट्राच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला प्रकल्प म्हणजे सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्प. मात्र या प्रकल्पाला पर्यावरण वाद्यांनी कडाडून विरोध केला आहे. केंद्र शासनाने पश्चिम घाटाबाबत जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेमध्ये राज्य सरकारच्या प्रस्तावित गिरिस्थान प्रकल्प रद्द करावा, अशी एकमुखी मागणी पयार्वरणतज्ज्ञांनी केली आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे हजारो ईमेल पाठविण्यात आले आहेत.

प्रकल्प उभा राहिला तर पर्यावरणाला धोका

पर्यावरण तज्ञांच्या म्हणण्यानुसार नवीन महाबळेश्वर साकार करण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील 235 गावांचा समावेश करून घेण्यात आलाय मात्र यातील 149 गावं ही केंद्र शासनाच्या आदीसूचनांच्या संवेदनशील यादीतील आहेत. या परिसरामध्ये कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र तसेच कास पुष्प पठार अशा संवेदन इकोसिस्टीमचा समावेश आहे. मात्र जर हा प्रकल्प उभा राहिला तर पर्यावरणाला धोका निर्माण होईल असे पर्यावरण वाद्यांचे मत आहे. याशिवाय हा प्रकल्प संरक्षित वनक्षेत्रातील असून याबाबतची परवानगी केंद्र शासनाचे मंजुरी राज्य सरकारने घेतली नाही. पर्यावरण व जैवविविधतेच्या नियम आणि कायद्यांचा पालन केलेले नाही असा आक्षेप पर्यावरण वाद्यांनी नोंदवला आहे.

जैवविविधता नष्ट होणार

याबाबत माहिती देताना वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी सांगितले की, राज्य शासन कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कास पठार आणि सभोवतालच्या परिसरात नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्प सुरू करणार आहे. त्यामुळे येथील जैवविविधता नष्ट होणार आहे येथील वन्य जीवांवर पर्यावरणावर परिणाम होणार आहे. या परिसरातील वृक्षतोड, जंगल तोड सुरू केली आहे. असं बाचुळकर यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे.

नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प, पश्चिम घाटासारख्या संवेदनशील प्रदेशातील असल्याने, महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाच्या संवेदनशील प्रदेश अधिसूचनेचे उल्लंघन केले आहे. केंद्र शासनाने नियमांप्रमाणे महाराष्ट्र शासनावर आवश्यक योग्य कारवाई करावी. नवे महाबळेश्वर प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा आणि सातारा जिल्ह्यातील कोणतेही गाव संवेदनशील गावांच्या यादीतून वगळू नये, सह्यादीचे नैसर्गिक अस्तित्व अबाधितपणे दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी योग्य सहकार्य करावे, अशा सूचना पर्यावरणतज्ज्ञांनी केल्या आहेत.

केवळ 10 रुपयात करता येणार सोने खरेदी; Phone pay ने बाजारात आणली नवी योजना

Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये सोने खूप जास्त प्रमाणात खरेदी केले जाते. अगदी सणासुदीच्या काळात किंवा लग्न समारंभासाठी असो सोने खूप जास्त प्रमाणात लोक खरेदी करतात. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे अगदी दहा ग्राम सोने खरेदी करायचे असले, तरी सर्वसामान्यांना ते जमत नाही. म्हणजेच तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही, असा होत नाही. आता ज्यांना सोने खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी यूपीआय मधील आता कंपनी फोन पेने अल्पबचत प्लॅटफॉर्म Jar सोबत एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला रोज बचत करता येईल. यासाठी तुम्हाला रोज 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे या नवीन योजनेत ग्राहक प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 रुपये आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये गुंतवणूक करू शकत आहे. त्यामुळे हळूहळू तुमची एक मोठी रक्कम तयार होईल आणि तुम्ही 24 कॅरेट सोने खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला बचतीची सवय देखील लागेल आणि तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

डेली सेविंग हे उत्पादन 400 गिल्ड टेक सोल्युशनच्या मदतीने ऑपरेट करता येईल. यासाठी गुंतवणूकदार केवळ 25 सेकंदात डिजिटल बोर्ड मध्ये गुंतवणूक करू शकतील. गेल्या काही दिवसांपासून मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे आता फोन पेने छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही एक नवीन गुंतवणुकीची योजना आणलेली आहे. त्यासाठी प्रभावी मंत्र देखील दिला आहे. तुम्ही अल्पबचत करून यात खूप मोठी गुंतवणूक देखील करू शकता.

आज काल सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अनेक लोक हे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करत आहे. त्यामुळे आता या कंपनीने जार सोबतने एक नवीन पाऊल टाकलेले आहे. या माध्यमातून तुम्ही फोन पेचा 560 दशलक्ष म्हणून अधिक युजरसाठी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक अगदी सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सुरक्षित आह. यामध्ये केलेली गुंतवणूक ग्राहक त्यांच्या नियमाने अटीनुसार काढू शकतात. यामध्ये तुम्हाला दिवसाला कमीत कमी10 रुपये जास्तीत जास्त 5 हजार रुपये गुंतवणूक करता येईल.