Friday, December 26, 2025
Home Blog Page 435

Directorate of Education Daman Bharti 2024 | शिक्षण संचालनालय विभागात नोकरीची सुवर्ण संधी; अशाप्रकारे करा अर्ज

Directorate of Education Daman Bharti 2024

Directorate of Education Daman Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता शिक्षण संचालनालय या विभागाअंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती शिक्षक या पदासाठी आहे. शिक्षक या पदाच्या एकूण 265 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Directorate of Education Daman Bharti 2024

शिक्षण संचालनालय या विभागांतर्गत शिक्षक या पदाच्या रिक्त जागा आहेत.

रिक्त पदसंख्या

शिक्षक या पदाच्या एकूण 265 रिक्त जागा आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

या भरतीचा अर्ज तुम्ही शिक्षण विभाग लेखा भवन 66 केव्ही रस्ता आमली सिल्वासा खोली क्रमांक 312 डीएनएच किंवा शिक्षण संचालनालय शिक्षा सदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे मोती दमण

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 23 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
  • 30 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

3 नंबरचा गाळ शेतकऱ्याच्या पोराला; देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त विधान

Devendra Bhuyar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्याच्या मुलाला लग्न करायचं आले तर त्याला ३ नंबरचा गाळ म्हणजे हेबडली हाबडली जी पोरगी आहे अशी मुलगी मिळते असं बेताल विधान देवेंद्र भूयार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून देवेंद्र भुयार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येतंय.

अमरावती येथील एका जाहीर सभेत बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, आज जर लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल तर मुलाला नोकरीवाला पाहिजे. मुलगी स्मार्ट आणि एक नंबर देखणी असेल तर ती मुलगी तुमच्या माझ्यासारख्या पोट्ट्याला भेटणार नाही. ती नोकरी करणाऱ्या मुलांना मिळते. दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते, ज्यांचा धंदा आहे, पानटपरी, किराणाचे दुकान आहे अशा मुलांना मिळते. तीन नंबरचा जो राहिलेला गाळ आहे तो हेबडली हाबडली जी पोरगी आहे. ती शेतकऱ्यांच्या मुलांना मिळते. देवेंद्र भुयार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर शेतकऱ्याच्या पोराचं खरं राहिल नाही आहे. कारण जन्माला येणारे जे लेकरू आहे ते हेबंड वांभडच निघत राहिल. म्हणजे माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असा सगळा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही जरा सावध राहा असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, देवेंद्र भुयार यांच्या या विधानावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून भुयार यांच्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भुयार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भुयार यांचे हे वक्तव्य कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या भूमीपुत्रांची टिंगल टवाळी करणारा प्रकार आहे.लोकांची अवहेलना करणे आहे. दादा गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांना एक खात्री पटली आहे की आपण काहीही केले तरीही आपल्यावर कारवाई होणार नाही, या मस्तवालपणापासून अशी वाक्य येतात. शेतकरी आणि महिलांची टींगल करणे हाच तुमचा अजेंडा आहे का?, असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी केला.

SIP Investment Plan | SIP करून कोट्यवधी व्हायचे असेल तर; हे मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवा

SIP Investment Plan

SIP Investment Plan | आजकाल महागाईचा आणि भविष्याचा विचार करून गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातही लोक म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. कारण म्युच्युअल फंडमध्ये खूप चांगल्या प्रमाणात परतावा मिळतो. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट (SIP Investment Plan) प्लॅनमध्ये अनेक लोक गुंतवणूक करतात. यामध्ये तुम्हाला थोडी थोडी गुंतवणूक करता येते. त्यामुळे तुमच्या दर महिन्याच्या खर्चावर जास्त भार पडत नाही. एसआयपी योजना स्टॉकमध्ये थेट पैसे गुंतवण्यात येते. ही एक दीर्घकालीन योजना आहे. त्यामुळे त्यातून खूप चांगला परतावा येतो. सरकारी योजना आणि बँक एफडीच्या तुलनेत यातून नागरिकांना खूप चांगला परतावा मिळतो. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणूक केली, तर तुम्हाला सरासरी 12% परतावा मिळेल. असे तज्ञांचे म्हणणे आहे. जर तुम्हाला देखील एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचा प्रचंड फायदा होईल.

गुंतवणूक इतकी लवकर तितका जास्त फायदा | SIP Investment Plan

एसआयपीमध्ये तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त वेळ तुम्हाला गुंतवणूक करता येईल आणि तुम्हाला फायदा मिळेल. यासाठी तुम्ही खूप चांगले पैसे जमा करू शकता. अनेक लोक तरुणांना पहिल्या पगारातून एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. एसआयपी ही दीर्घकाळासाठी असते 20 वर्षे 25 वर्ष किंवा 30 वर्षासाठी देखील सुरू असते. यातून तुम्हाला खूप मोठा फंड तयार करू करता येतो. याबरोबर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा होतो. आणि तुम्ही यातून करोडपती देखील बनवू शकता.

शिस्तबद्ध गुंतवणूक

करत असाल तर यासाठी तुमच्यामध्ये शिस्त असणे खूप गरजेची असते. यासाठी तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक तारखेला रक्कम गुंतवावी लागते. त्यासाठी तुम्ही नियम आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीचे सूत्र वापरले पाहिजे. तसे तुम्ही इतर प्रकारच्या गुंतवणुकी देखील करत असाल, तरी तुम्हाला शिस्तबद्ध असणे खूप गरजेचे असते. त्यातूनच तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

बाजारातील ट्रेंड ओळखून गुंतवणूक करा

आणि त्यांना माहित आहे की एसआयपी ही एक मार्केट लिंक योजना आहे. तरी मार्केटमध्ये थेट गुंतवणुकी योजना कमी जोखमीची मानली जाते. त्यामुळे तुम्ही बाजाराच्या मूडवर आधारित गुंतवणूक करू शकतात. बाजारात मंदी आल्यावर काही लोक पैसे काढू लागतात.त्यामुळे त्यांचे नुकसान होते परंतु एसआयपी सरासरी खर्चाचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही बाजारातील ट्रेंड ओळखून गुंतवणूक करा.

इन्कम सह गुंतवणूक वाढवा | SIP Investment Plan

तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणुकीची रक्कम कालांतराने हळूहळू वाढू शकता. यातून तुम्हाला खूप मोठा फंड हवा असेल, तर उत्पन्नासोबत गुंतवणुकीची रक्कम वेळोवेळी वाढवत रहा. म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी टॉपअप करत राहावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात त्याचा खूप फायदा होईल.

Petrol Diesel Prices | भारतात वाढणार पेट्रोल डिझेलच्या किमती; सर्वसामान्यांच्या चिंतेत होणार वाढ

Petrol Diesel Prices

Petrol Diesel Prices | सध्या महागाईच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चाललेली दिसत आहे. त्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तर अगदी गगनाला भिडलेल्या आहेत. सध्या इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. आणि या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या जोरदार चाललेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 5 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आणि यामुळेच भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव (Petrol Diesel Prices) वाढलेले आहेत. आणि ते दर आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ | Petrol Diesel Prices

इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये होत असलेल्या युद्धाचा परिणाम त्याच्या तेलाच्या किमतीवर झालेला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती 4 ते 5 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सुरुवातीला ही दरवाढ 2 टक्क्यांनी होती. परंतु लगेच काही दिवसातच त्याच्या तेलाच्या किमती 5 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आणि आखाती देशांसह रसियाकडून भारतात कच्चे तेल आयात केले जाते. आणि भारतात येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सध्या कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये बाजारात चढ आणि उतार होताना दिसत आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांनी देखील नफ्यात सुधारणा झाल्याची माहिती एका अहवालात दिलेली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या प्रति लिटर दोन ते तीन रुपयांनी कमी करण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. परंतु आता कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

इराण ने इजराइल वर हल्ला केलेला आहे. त्यामुळे इस्राईल वर 180 ते 200 हाई स्पीड बॅलेस्टिक क्षेपणास्त्र काढलेली आहे. इस्राईलचे मोठा आर्थिक नुकसान झालेले आहे. आणि हे नुकसान करण्यासाठी जमा आहे. वेस्ट बँक परिसरात एकाचा मृत्यू देखील झालेला आहे. इराण न गाडलेला बहुतांश क्षेपणास्त्र इस्राईलच्या डिफेन्स सिस्टीमने हवेत नष्ट केलेला आहे.

सणाच्या सेलमध्ये फ्लिपकार्टवर 9000 रुपयांपर्यंत सर्वोत्तम स्मार्टफोन्स; एकदा नजर टाकाच

Flipcart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सणासुदीचा काळ असल्यामुळे अनेकजण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असतात. या सणांच्या हंगामातच फ्लिपकार्ट तगड्या ऑफर्स घेऊन आले आहे. त्याचबरोबर तुम्हाला कमी बजेटमध्ये मोठी बॅटरी आणि आकर्षक डिस्प्लेसुद्धा मिळेल. या फोनची किंमत फक्त 9000 रू असणार आहे. त्यामुळे फ्लिपकार्टवर असलेल्या संधीचा लाभ घेऊन मिळवा कमी बजेटमध्ये स्मार्टफोन . फ्लिपकार्टने HDFC बँकेसोबत भागीदारी किंवा पार्टनरशिप केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. HDFC चे क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स वापरून पेमेंट केल्यानंतर ही सवलत मिळते. यामुळे ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये आणखी फायदा होणार आहे. तर चला जाणून घेऊयात कोणत्या फोनवर किती तगड्या ऑफर्स आहेत.

HDFC कार्डवर 10% डिस्काउंट

Redmi 12C

या फोनला 6.71 इंच HD+ डिस्प्ले असून , त्यात MediaTek G36 प्रोसेसरचा वापर करण्यात आलेला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. जी दीर्घकाळ वापरासाठी चांगली आहे. हा स्मार्टफोन 7,999 रुपयांपासून सुरू असून, HDFC कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ घेता येईल.

Realme C33 –

हा फोन 6.5 इंच HD+ डिस्प्ले आणि Unisoc T612 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 5000mAh बॅटरी आहे. या फोनवर बँक ऑफर्ससह अतिरिक्त सवलती मिळत आहेत, ज्यामुळे तो आणखी आकर्षक ठरतो. फोनची किंमत 8,499 रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे ग्राहकांना कमी बजेटमध्ये फोन प्राप्त होईल.

Poco C55 –

Poco C55 हा स्मार्टफोन 6.71 इंचाचा असून HD+ डिस्प्ले आहे, जो MediaTek Helio G85 प्रोसेसरद्वारे चालवला जातो. या फोनमध्ये देखील 5000mAh बॅटरी आहे. त्याचसोबत HDFC कार्ड वापरल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंटचा फायदा घेता येतो. या आकर्षित फोनची किंमत 7,999 रुपयांपासून सुरू आहे.

Infinix Smart 7 –

सणासुदीच्या सेलमध्ये या फोनवर चांगली ऑफर उपलब्ध आहे. Infinix Smart 7 मध्ये 6.6 इंच HD+ डिस्प्ले आहे. त्यामध्ये Unisoc SC9863A प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. बॅटरीबद्दल सांगायचं झाल तर, 5000mAh बॅटरी आहे. या फोनची किंमत 6,999 रुपयांपासून सुरू होते.

Samsung Galaxy M04 –

Samsung Galaxy M04 ला 6.5 इंच HD+ डिस्प्ले , त्याचबरोबर MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये देखील 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. बँक ऑफर्समुळे ग्राहकांना जास्त फायदा होणार आहे. हा स्मार्टफोन 8,499 रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या साऱ्या फोनचे फिचर्स ग्राहकांना उकृष्ट अनुभव देतील. तसेच हे फोन वॉरंटीमध्ये मिळणार आहेत. लाँचच्या वेळी या सर्व फोनच्या किंमती अधिक होत्या . पण सणामुळे त्यांनी ग्राहकांसाठी या सवलती दिल्या आहेत. तरी सर्व ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा .

एसटी स्थाकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ आणि महिला बचत गटाचे स्टॉलही ; गोगवलेंचे धडाकेबाज निर्णय

यापूर्वी विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे ई बसमध्ये देखील व्यवस्थापन परिचारिका असतील असे मंत्री नितीन गडकरी यांनी एका भाषणादरम्यान म्हंटले होते. मात्र आता गडकरींचे हे भाकीत लवकरच खरे होणार आहे असे दिसते आहे. कारण महाराष्ट्र एसटी महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एवढेच नाही तर आणखी दोन महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले असून यामुळे महिला बचत गटांना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया…

भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली 304 वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

बसस्थानकावर आनंद आरोग्य केंद्र

  • आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील एसटीच्या 343 बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.
  • माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार.
  • ही सेवा देण्याकरिता संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार.
  • संबंधित संस्था आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा देऊ शकते.

स्थानिक महिला बचत गटांचे स्टॉल

  • प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा देण्यात येणार आहे.
  • या ठिकाणी परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करता येणार आहेत.
  • यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारले जाणार आहे.
  • तसेच या स्टॉलसाठी 10 बाय 10 आकाराची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • बस स्थाकांवर बऱ्यापैकी नागरिकांची वर्दळ असते.त्यामुळे याचा फायदा बचत गटांना होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे. नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

काय असतो कर्जाचा बोजा हलका करणारा ‘लोन इन्शुरन्स’ ? जाणून घ्या

Loan Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोन इन्शुरन्स, ज्याला डेब्ट प्रोटेक्शन इन्शुरन्स असेही म्हणतात. आजकाल अनेक लोक विविध कारणांसाठी कर्ज घेतात. पण कर्जाची परतफेड करणे हि एक मोठी जबाबदारी असते. कर्जदाराचा अचानक मृत्यू , अपघात किंवा गंभीर आजारामुळे कर्जाची परतफेड करणे शक्य नसते . त्या कर्जामुळे कुटुंबावर आर्थिक ओझे निर्माण होऊ शकते. याच समस्येवर उपाय म्हणून लोन इन्शुरन्स (कर्ज विमा) उपलब्ध आहे. या विम्यामुळे कर्जदाराच्या कुटुंबाला किंवा नातेवाईकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. जी कर्जाची उर्वरित रक्कम असेल ती या लोन इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून फेडली जाते.

लोन इन्शुरन्सचे फायदे

इन्शुरन्स घेण्याचे प्रमुख फायदे म्हणजे तात्काळ स्थितीत कर्जाची परतफेड करण्याची चिंता कमी होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक स्थैर्य मिळते. काही पॉलिसीमध्ये कर्जदाराच्या अपंगत्व झाल्यासदेखील कर्जाची परतफेड होण्याची तरतूद आहे. हा विमा कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितेचे कवच ठरते. या पॉलिसीची रचना हि त्या कर्जावर अवलंबून असते. कोणतेही कर्ज घेताना कर्जदात्याने लोन इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी . कर्जाच्या रकमेवर आणि कालावधीवर शुल्क ठरवला जातो . जर कर्जदाराच्या निधनानंतर पॉलिसी सुरु असेल, तर कर्जाची राहिलेली रक्कम विमा कंपनी भरते. ज्यामुळे कर्जाची कोणतीही जबाबदारी कुटुंबावर येणार नाही.

कर्ज विम्याचे विविध प्रकार

अनेक कर्जदार कर्ज घेताना फक्त कर्जाच्या व्याजदरावर लक्ष केंद्रित करतात. पण या पॉलिसीवर लक्ष मात्र कमी असते. त्यासाठी कोणत्या योजना असतात याकडे पाहणे गरजेचे असते. लोन इन्शुरन्सच्या विविध प्रकारांमध्ये टर्म इन्शुरन्स, रिड्यूसिंग कव्हर आणि फिक्स्ड कव्हर यांचा समावेश असतो. टर्म इन्शुरन्स हा एका निश्चित कालावधीसाठी दिला जातो. तर रिड्यूसिंग कव्हरमध्ये कर्जाच्या परतफेडीच्या काळात कर्जाची रक्कम कमी होत जाते. फिक्स्ड कव्हरमध्ये कर्जाची रक्कम जशी आहे तशीच असते.तसेच विमा कंपनीना तितकीच रक्कम भरण्यासाठी जबाबदारी असते.

रक्कम कशी ठरवली जाते

प्रीमियम कर्जाची रक्कम, कालावधी, कर्जदाराच्या वयावर, आरोग्याच्या स्थितीवर आणि निवडलेल्या पॉलिसीच्या प्रकारावर अवलंबून असतो. अधिक रक्कम आणि दीर्घकाळासाठी विमा घेणाऱ्या व्यक्तीचा प्रीमियम जास्त असतो .

चला, अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूया; संभाजीराजेंची सरकार विरोधात पहिली मोहीम

Sambhajiraje Chhatrapati Shivsmarak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) ऍक्शन मोड मध्ये आलेत. बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने संभाजीराजेंच्या पक्षाला नवं नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. डिसेंबर 2016 रोजी भाजप-शिवसेना महायुती सरकारने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता . त्यावेळी अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होणार आहेत पण महाराजांचे स्मारक काही दिसेना. हाच मुद्दा पकडून संभाजीराजे छत्रपती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. चला, अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूया असं म्हणत संभाजीराजेंनी सरकार विरोधात पहिली मोहीम सुरु केली आहे.

संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हंटल, मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही… चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला… असं म्हणत संभाजीराजेंनी एकप्रकारे नवी मोहीमच सुरु केली आहे.

रविवार 6 ऑक्टोबर 2024 , सकाळी 11 वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे मोर्चा आयोजित करणार आहेत . या मोर्चात लाखो शिवभक्त सहभागी होणार आहेत. आंदोलनाद्वारे सरकारच्या धोरणांना विरोध करत , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जलपूजनाच्या ठिकाणी शिवस्मारक शोधण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या आंदोलनामुळे आगामी राजकीय घटनाक्रमावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. छत्रपतींना जनतेचा मोठा पाठिंबा असल्याने राज्य आणि केंद्र सरकार शिवरायांच्या न बांधलेल्या स्मारकावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Cidco Lottery : खुशखबर ! नवी मुंबईतील घरांसाठी ‘या’ दिवशी जाहीर होणार CIDCO लॉटरी

cidco lottery

Cidco Lottery : मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे स्वात:चे घर असावे असे कुणाला वाटणार नाही ? सध्या घरांचे दर हे गगनाला भिडले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत (Cidco Lottery) असतो.

2024 च्या लॉटरीचा विचार करता नवी मुंबई मंडळासाठी म्हाडाची 2030 घरांसाठीची लॉटरी निघाली असून याबाबतची प्रक्रिया अजून चालू असतानाच सिडको कडून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सिडको कडून तब्बल 26 हजार घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती एका मराठी टीव्ही माध्यमाकडून देण्यात (Cidco Lottery) आली आहे.

कधी निघणार लॉटरी (Cidco Lottery)

यापूर्वी सिडकोची ही लॉटरी दसऱ्याला निघणार अशी चर्चा होती. मात्र ग्रह खरेदीदारांना तेवढी वेळ वाट पाहावी लागणार नाही. तर दसऱ्याच्या आधीच सिडकोची लॉटरी निघणार आहे. सिडकोची लॉटरी ही 7 ऑक्टोबर म्हणजे पुढच्या सोमवारी निघणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला देखील सिडको कडून घर घ्यायचे असल्यास तुम्ही आतापासूनच त्याची तयारी करून ठेवा.

घराच्या विक्रीसाठी एनओसीची आवश्यकता नाही

याबरोबरच महामंडळांना आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळनिर्मित घरांच्या विक्रीसाठी (Cidco Lottery) महामंडळ एनओसीची आवश्यकता आता भासणार नाही. याशिवाय इतर व्यक्तीला घर विक्री करत असताना द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर लिजवर न राहता ते सदर व्यक्तीच्या मालकीचा होणार आहे. या निर्णयाच्या आधी ही घर विकण्यासाठी सिडको महामंडळाची एनओसी घ्यावी लागत होती. (Cidco Lottery) याशिवाय ही घरं विक्री करत असताना निश्चित शुल्कही भरावे लागत होते. मात्र नव्या निर्णयामुळे हा नियम रद्द करण्यात आल्याने सिडकोच्या गृहधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Ramai Gharkul Yojana | स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार; सरकारकडून मिळणार 2 लाखापर्यंत मदत

Ramai Gharkul Yojana

Ramai Gharkul Yojana | केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशातील विविध गटातील नागरिकांसाठी योजना आणल्या जातात. समाजातील दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटाचा विचार करून या योजना आणल्या जातात. या माध्यमातून विविध गोष्टींसाठी आर्थिक मदत केली जाते. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत असतात. अशातच ज्या नागरिकांना घर नाही त्यांना स्वतःचे हक्काचे चांगले घर मिळावे. या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. यासाठी केंद्र सरकारकडून पीएम आवास योजना योजना राबवली जात आहे.

यासाठी राज्य सरकारने देखील रमाई आवास घरकुल योजना (Ramai Gharkul Yojana) राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी ही योजना राबवली जात आहे. यासाठी नागरिकांना स्वतःची घरे पक्की करून देण्यासाठी सरकार मदत करत असतात.

काय आहे रमाई आवास योजनेचे स्वरूप | Ramai Gharkul Yojana

ज्या समाजातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान सुधारावे, त्यांना चांगले राहायला घर मिळावे. याकरता सरकार सरकारने ही योजना राबवलेली आहे. ज्या नागरिकांचे स्वतःच्या जागेवर कच्चे घर आहे त्या ठिकाणी पक्के घर बांधण्यासाठी 2018 पासून रमाई आवाज घरकुल योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना 1 लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे त्या शहरी भागातील लोकांसाठी 3 लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे.

रमाई आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना घर बांधण्यासाठी एका घरासाठी 1 लाख 32 हजार रुपये दिले जातात. तर शहरी भागात 2 लाख 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते

योजनेचा अर्ज कुठे करायचा ? | Ramai Gharkul Yojana

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी आधी अर्ज करावा लागेल. शहरी भागातील लाभार्थी संबंधित महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन किंवा नगरपरिषदा नगरपंचायतमध्ये जाऊन अर्ज करू शकतात. तसेच ग्रामीण भागातील लाभार्थी हे पंचायत समिती गट विकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे जाऊन अर्ज करू शकतात. त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.