Friday, December 26, 2025
Home Blog Page 437

पूर्वप्राथमिक शिक्षणाचा कायदा होणार मंजूर; शिक्षणमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Pre primary school

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील खाजगी पूर्व प्राथमिक शाळांबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता खाजगी पूर्व शाळा प्राथमिक शाळा म्हणजे प्रि प्रायमरी स्कूल यांच्यावर नियंत्रण आणणाऱ्या कायद्याचा मसुदा तयार झालेला आहे. आणि तो मसुदा अंतिम करण्यासाठी विधी विभागाकडे देखील पाठवण्यात आलेला आहे. येत्या विधिमंडळाच्या बैठकीत हा कायदा मंजूर देखील करण्यात आले येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही दिलेली आहे. हा मसुदा मंजूर झाल्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025 – 26 पासून नर्सरी ज्युनिअर सीनियर केजी या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाचा अधिकृत अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

दीपक केसरकर हे पुण्यात शिक्षण विभागाच्या कार्यक्रमानिमित्त आलेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “महानगरामध्ये पूर्व प्राथमिक शाळांची संख्या वाढत आहे त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे पूर्व प्राथमिक शाळा अनाधिकृत मान्य अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या शाळांवर आणि शिक्षणावर देखील शिक्षण विभागाचे नियंत्रण असणार आहे. या शाळांसाठी नवीन कायदा तयार केलेला आहे. आणि तो आता अंतिम टप्प्यात आहे.”

त्यामुळे जर आता या कायद्याची अंमलबजावणी झाली तर प्री प्रायमरी स्कूल, बालवड्या, शाळा या सुरू करण्यासाठी आणि शिक्षण विभागाची तुम्हाला मान्यता घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे या शाळेची इमारत कशी असणार? शाळेमध्ये कोणत्या सुविधा दिल्या जाणार? विद्यार्थ्यांची संख्या किती असणार? शिक्षकांची नेमणूक देखील कशी होणार? या सगळ्या सूचना शिक्षण मंडळाकडूनच दिल्या जाईल. तसेच मुलांना त्यांच्या वयोगटांनुसार अभ्यासक्रमाची कोणती पुस्तके उपलब्ध करून देणार येतील तसेच छपाई देखील शिक्षण मंडळाकडूनच होणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिलेली आहे.

‘तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!’ पुणेकरांची संतापजनक पोस्ट, मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

swargate metro

रविवारी पुणे शहरात स्वारगेट-शिवाजीनगर मेट्रो सुरु करण्यात आली. या मेट्रोला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र आता पार्किंगच्या कारणावरून मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पे-अँड-पार्कची सुविधा सुरू करण्यात आली.पण कंत्राटदाराने जादाचे पैसे आकारल्याची बाब एका सजग पुणेकराने उघडकीस आणली त्यानंतर प्रशासनाला कडक निर्णय घ्यावा लागला. चला पाहूया हा प्रकार नक्की काय आहे ?

काय आहे नेमके प्रकरण ?

खरंतर शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन परिसरात पे आणि पार्कसाठी दोन तासांसाठी पंधरा रुपये शुल्क आकारणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराकडून असे झाले नाही. एका तासासाठी पंधरा रुपये हे दुचाकी साठी आणि चार सारखी साठी 35 रुपये आकारात असल्याचं आढळून आलं. नंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. मेट्रोच्या तिकिटापेक्षा पार्किंग शुल्क अधिक असल्याचे ट्विटर मधील पोस्ट मध्ये नमूद करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि मेट्रोच्या तिकिटापेक्षा पार्किंग शुल्क जास्त असल्याचा दावा केला. याबरोबरच काही प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया कळवत ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मेट्रोचे पार्किंग फ्री करण्यात यावं अशी देखील प्रतिक्रिया एका प्रवाशांना दिली आहे.

कंत्राटदाराचे निलंबन

त्यानंतर मात्र प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागली. याबाबतची माहिती देताना पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी माध्यमांना सांगितलं की, शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन परिसरात पे अँड पार्कची सुविधा सुरू होती. कंत्राटदाराने सोमवारपासून काम सुरू केलं आणि तो ठरल्यानुसार दर आकारत नसल्याचे आम्हाला समजले त्यामुळे आम्ही त्याला काम करण्यापासून रोखलं आणि निलंबितही केलं अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Rule Change From 1 October | आजपासून देशात होणार ‘हे’ मोठे बदल; सर्वसामान्यांवर होणार परिणाम

Rule Change From 1 October

Rule Change From 1 October |आजपासून नवीन महिना सुरू झालेला आहे. ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक मोठ्या बदल झालेले आहेत. दर महिन्याच्या सुरुवातीला अनेक आर्थिक गोष्टींमध्ये बदल होत असतात. या महिन्यात देखील अनेक बदल झालेले आहेत. आता 1 ऑक्टोबर पासून देशभरात आधार कार्ड संबंधित पीपीएफ सुकन्या समृद्धी योजनेसंबंधी त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स यासह मोठे बदल झालेले आहेत. आणि या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर कसा बाहेर पडणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.

गॅस सिलेंडर किंमत | Rule Change From 1 October

नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या गॅस सिलेंडर त्या किमतीमध्ये एक मोठा बदल झालेला आहे. ती म्हणजे आता अनेक कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यवसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे. त्यांनी जवळपास 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीच्या दरात वाढ केलेली आहे. यामध्ये 39 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. दिल्लीमध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1740 आणि मुंबईमध्ये 1792 रुपये एवढी झालेली आहे.

एटीएएफची किंमत

अनेक कंपन्यांनी एक ऑक्टोबर पासून विमान इंधन म्हणजेच एटीएफ आणि सीएनजी पीएनजीच्या किमतीत देखील बदल केलेला आहे. सप्टेंबरमध्ये एटीएफच्या दरामध्ये कपात करण्यात आली होती. आता ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी नागरिकांना चांगला दिलासा मिळालेला आहे. ते म्हणजे आता दिल्लीत याची किंमत 87 लाख 59 हजार 722 रुपये प्रति किलो लिटर एवढी झालेली आहे.

एचडीएफसी क्रेडीट कार्ड

आज पासून एचडीएफसीच्या बँकेचे क्रेडिट कार्डचे नियमामध्ये देखील अनेक बदल झालेले आहेत. आता क्रेडिट कार्ड साठी लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल करण्यात आलेला आहे. यानुसार एचडीएफसी बँकेने स्मार्ट बॉय कॅलेंडर तिमाही एका उत्पादनापुरता मर्यादित ठेवलेली आहे.

सुकन्या समृद्धी योजना

एक ऑक्टोबर पासून सुकन्या समृद्धी योजनेत देखील मोठ्या बदल झालेला आहे. हा बदल आजपासूनच लागू करण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता मुलींच्या कायदेशीर पालकांना या मुलींच्या खात्या ऑपरेट करता येणार आहे. जर एखाद्या मुलीचं एसएसवाय खातं तिचं कायदेशीर पालक नसलेल्या व्यक्तीने उघडले तर तिला त्याचे नैसर्गिक पालक किंवा कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावे लागेल.

पीपीएफ खाते | Rule Change From 1 October

आज पासून पीपीएफ योजनेत देखील तीन मोठे बदल होणार आहेत. 21 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नियम संदर्भात मार्गदर्शक तत्व जाहीर केली. त्या अंतर्गत आता पीपीएफचे तीन नवीन नियम लागू केले जाणार आहेत. यामध्ये जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाती असतील तर पहिल्या खात्यात दोन खाती विलीन करावी लागतील. आणि अल्पवयीन मुलांच्या खात्याशी आणि एनआरआय खात्याशी संबंधित आहेत.

2,500 कामगारांचा रोजगार धोक्यात ? ; टाटा स्टीलचा पोर्ट टॅलबोटमध्ये ब्लास्ट फर्नेस 4 प्रकल्प होणार बंद

Tata Steal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टाटा स्टीलने युनायटेड किंगडममधील पोर्ट टॅलबोट येथील ब्लास्ट फर्नेस 4 आणि इतर लोह व स्टील उत्पादनाचा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक लोकांवर परिणाम होणार असून, त्याचाच परिणाम म्हणजे 2,500 कामगारांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन आणि पारंपरिक यंत्रणांमध्ये आणखी गुंतवणूक करणे, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या शक्य नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

नव्या प्रकल्पासाठी करणार गुंतवणूक

या वर्षाच्या सुरुवातीस गहिरा पाण्याचे बंदर, मोर्फा कोक भट्टी, ब्लास्ट फर्नेस 5 आणि कंटिन्युअस कास्टर 2 बंद झाले. तसेच आता सिंटर प्लांट, ब्लास्ट फर्नेस 4 आणि प्राथमिक स्टील उत्पादनासोबत काही द्वितीय स्टील उत्पादन व ऊर्जा यंत्रणा बंद होणार आहे. टाटा स्टीलने लोकांना आश्वासन दिले आहे कि, 2027 किंवा 2028 मध्ये इलेक्ट्रिक आर्क फर्नेसच्या माध्यमातून स्टील उत्पादन पुन्हा सुरू होईल. या नव्या प्रकल्पासाठी 1.25 अब्ज पौंडांच्या गुंतवणुकीची योजना त्यांनी आखली आहे. ज्यामध्ये UK मधील वापरलेल्या स्टील वस्तूंचा पुन्हा वापर केला जाणार आहे. सोबतच CO2 ग्रीन स्टील उत्पादनासाठी 750 दशलक्ष पौंडांची गुंतवणूक होणार आहे. यालाच यूकेच्या सरकारने 500 दशलक्ष पौंडांचे ग्रँट फंडिंग दिले आहे.

गुंतवणुकीमुळे होणार रोजगाराची निर्मिती

टाटा स्टीलने स्थानिक समुदाय, ग्राहक आणि नियोजन विभागासोबत नवीन इलेक्ट्रिक आर्क फर्नेसचा आराखडा तयार करून , तो लोकांपर्यंत पोहचवला जात आहे. त्यामध्ये कंपनी येत्या काही आठवड्यात इलेक्ट्रिक आर्क फर्नेसचे उपकरण बनवणाऱ्याचे नाव जाहीर करणार आहे. टाटा स्टील यूकेचे CEO राजेश नायर यांनी सांगितले की, आजचा दिवस आमच्या व्यवसायाशी जोडलेल्या सर्वांसाठी किती कठीण आहे , याची त्याचा पूर्ण कल्पना आहे. त्यांना विश्वास आहे कि , येत्या काळात गुंतवणुकीद्वारे अधिक नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे स्थानिक समुदायाच्या विकासास गती मिळेल.

छत्रपती संभाजीराजेंनी केली नवीन राजकीय पक्षाची नोंदणी; जाणून घ्या नाव आणि चिन्ह

New Political Party

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अगदी तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी वेगाने घडताना दिसत आहे. यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता यावर्षी निवडणुकांमध्ये नक्की काय निकाल लागेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काही पक्षांकडून उमेदवाराच्या नावाच्या अधिकृत नावाची घोषणा होताना देखील दिसत आहे. परंतु आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय झालेला आहे. आणि या राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाने नोंदणी देखील झाली असेल. त्यांनी चिन्ह देखील ठरवलेले आहे.

महाराष्ट्रात नव्याने उद्या झालेल्या या राजकीय पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे आहे. हा पक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा आहे. त्यांनी फेसबुक वर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिलेली आहे. या पोस्टद्वारे संभाजीराजांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची तयारी दाखवलेली पाहायला मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला सप्तकीरणांसह पिनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. याबाबत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवली आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील मतदारांपर्यंत पोहोचवणे, हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, संघटनेचे कार्यकर्ते आणि हितचिंतकाचे कष्ट त्यामुळे राज्याच्या राजकारणाला असलेली एक नवीन आणि सुसंस्कृत पर्यायाची माग आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत परिवर्तन महाशक्ती घेऊन जाईल हे निश्चित जय स्वराज्य.”

छत्रपती संभाजीराजांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केलेली होती. आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या पक्षाचे अधिकृत रित्या नोंदणी देखील केलेली आहे. आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे त्यांच्या पक्षाचे नाव देखील जाहीर केलेले आहे.

लूटा जंगलसफारीचा मनमुराद आनंद ! ताडोबासह पेंच, बोर , कऱ्हांडला पर्यटन आजपासून सुरु

tadoba

देशभरात आता पावसाने विश्रांती घेतली असून वातवरण आल्हाददायक आहे. अशा स्थितीत तुम्ही विकेंडला किंवा दिवाळी आणि नाताळ च्या सुट्टीला कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सुट्टीच्या काळात तुम्ही जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर जंगल सफारीचा आनंद तुम्ही नागपूर आतल्या ताडोबा अभयारण्यात घेऊ शकता. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे पर्यटन आता १ ऑक्टोबर पासून म्हणजेच आजपासून पर्यटनासाठी खुलं होणार आहे.

खरंतर पावसाळा असल्या कारणामुळे ही पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती. मात्र आता राज्यभरात देखील पावसानं उसंत घेतल्यामुळे जंगल सफारीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाबद्दल सांगायचं झाल्यास पावसामुळे रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन सध्या परिस्थितीमध्ये या प्रकल्पातील सिल्लारी गेट, खुरसापार्गेट बनेरा गेट व चोर बाहुली गेटवरून सफारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर बोर व्याघ्र प्रकल्पात बोरधरण पर्यटन गेट पासून २० किलोमीटर पर्यंत रस्ते सफारी करिता उपलब्ध राहणार आहेत. तर दुसरीकडे उमरेड पवनी कऱ्हांडलाअभयारण्यातील कऱ्हांडला पर्यटन झोन, पवनी पर्यटन झोन आणि गोठण गाव पर्यटन झोन अंतर्गत 15 किलोमीटर व वीस किलोमीटर रस्ते सफारीला अनुकूल नाहीत.

ऑनलाइन पद्धतीने करता येणार बुकिंग

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंत जर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला ऑफलाइन बुकिंग करावे लागेल. गेटवरील वाहन क्षमतेच्या मर्यादित सफारी सुविधा उपलब्ध राहणार आहे तर दिनांक 16 ऑक्टोबर पासून महाइको टुरिझमच्या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

मुकेश अंबानींकडून दिवाळी भेट! iPhone 16 निव्वळ 13 हजारात घरी आणण्याची संधी !

iphone 16

जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल तर हि बातमी निव्वळ तुमच्यासाठी आहे. तुम्हाला देखील iPhone 16 विकत घ्यायचा असेल, पण तुम्ही बजेटची चिंता करीत असाल तर चिंता सोडा . कारण तर Amazon, Flipkart व्यतिरिक्त तुम्ही मुकेश अंबानीच्या Reliance Digital वर तुम्ही स्वस्तात iPhone 16 विकत घेऊ शकता. आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल iPhone 16 कमी किंमतीत मिळणार ? तर मग कसे ? चला आणून घेऊया…

बँक डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्हाला N0-Cost EMI आणि इतर ऑफर्स आणि डिस्काउंटसह iPhone 16 स्वस्तात मिळणार आहे. iPhone 16 सप्टेंबरच्या सुरुवातीला लॉन्च झाला होता. ॲपलचा हा नवीन फोन आहे. अशा स्थितीत ते लवकरात लवकर विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. काही जणांनी याचे बुकिंग करून ठेवले आहे. अशातच फोन रिलायन्स डिजिटलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. iPhone 16 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. पण रिलायन्स डिजिटलवर 5,000 रुपयांची झटपट सूट मिळत आहे.

iPhone 16 No-Cost EMI

जर तुम्ही ICICI, SBI, Kotak Bank क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 5,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 74,900 रुपये होईल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआयचाही पर्याय आहे. तुम्ही नो कॉस्ट EMI निवडल्यास, तुम्हाला 6 महिन्यांसाठी दरमहा 12,483 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे दरमहा 12,483 रुपये भरून तुम्ही iPhone 16 विकत घेऊन येऊ शकता.

iPhone 16 चे धमाकेदार फीचर्स

यात A18 चिप सारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये आहेत. ही चिप खूप पॉवरफुल आहे आणि याच्या मदतीने तुमचा फोन खूप वेगाने चालेल, बॅटरी जास्त काळ टिकेल आणि तुम्ही खूप चांगले फोटो घेऊ शकता. तुम्ही गेम खेळता, फोटो घ्या किंवा मल्टीटास्क, iPhone 16 तुम्हाला कोणतीही अडचण देणार नाही.

iPhone 16 मध्ये खूप चांगले कॅमेरे आहेत आणि तुम्ही हे कॅमेरे अगदी सहज वापरू शकता. यात ॲक्शन बटण देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक कामे सहज करू शकता. या फोनद्वारे तुम्ही खूप चांगले फोटो आणि व्हिडिओ काढू शकता. याशिवाय, या फोनची बॅटरी खूप काळ टिकते, त्यामुळे तुम्हाला तो पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही.

पीएम ई-ड्राइव्ह योजना; केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठं पाऊल

PM E Drive Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पीएम ई-ड्राइव्ह योजना (PM E-Drive Yojana) ही केंद्र सरकारने सुरु केलेली महत्वाची योजना आहे. याचा उद्देश देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) वापर वाढवणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे असून, ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवणे आणि प्रदूषण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

जे लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार आहेत. त्यांच्यासाठी आर्थिक प्रोत्साहन तसेच सबसिडी दिली जाणार आहे. सबसिडीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार नाही. या योजनेचा आणखी एक फायदा असा आहे कि, खासगी वाहने तसेच इतर वाहनांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडींची तरतूद केली गेली आहे.

सरकारकडून कोणत्या वाहनांसाठी किती सबसिडी

दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारकडून साधारणपणे 10,000 ते 15,000 रू पर्यंत सबसिडी दिली जाईल , पण हि सबसिडी वाहनाच्या बॅटरीच्या क्षमतेवर अवलंबून असेल. चारचाकी खासगी इलेक्ट्रिक गाड्यांसाठी 1,50,000 रू त्याच प्रमाणे 5 kWh बॅटरीसाठी प्रति kWh 10,000 रुपयांच्या सबसिडीचा लाभ मिळेल. खाजगी वाहनांवर दिली जाणारी सबसिडी वाहनांच्या प्रकारानुसार बदलते. मोठ्या बस किंवा ट्रक यांसारख्या वाहनांसाठी 2,00,000 रू किंवा त्यापेक्षा जास्त सबसिडीसुद्धा मिळू शकते. या गाड्या खरेदी करणाऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळेल. सोबतच कर सवलतीमध्ये सूट मिळेल. पण या सवलती राज्य सरकारांनुसार वेगवेगळी असू शकतात.

भारतभर चार्जिंग स्टेशन उभारली जाणार

इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असणाऱ्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येमध्ये वाढ केली जाईल . या योजनेच्या अंतर्गत भारतभर विविध शहरांमध्ये आणि महामार्गांवर मोठ्या प्रमाणात EV चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. सरकार आता चार्जिंग पॉइंट्स हे सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयांमध्ये आणि खाजगी कंपन्यांच्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत.

2030 पर्यंत 30 % प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट

ई-ड्राइव्ह योजनेमुळे भारतातील वाहतुकीतील प्रदूषण 2030 पर्यंत 30 % ने कमी करण्याचा उद्देश आहे. या आधुनिकरणामुळे मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण होतील. पीएम ई-ड्राइव्ह योजनेचा कालावधी 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 एवढा असणार आहे.

Weather Update | पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना इशारा; या तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात

Weather Update

Weather Update | राज्यात गेले अनेक दिवसापासून ऊन पावसाचा खेळ चालू झालेला आहे. काही ठिकाणी ऊन पडत आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रातील हवामानाचे अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात काही दिवस हवामान कोरडे असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातून सरदार पावसाला सुरुवात होणार आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्रात चांगलाच मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर मागे दोन-तीन दिवसापासून पावसाने काहीशा प्रमाणात विश्रांती घेतलेली आहे. अगदी काही ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे.

परंतु महाराष्ट्रात जास्त पावसाची कुठेही तीन-चार दिवसात नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे. अनेक पिकांची काढणी सध्या चालू झालेली आहे. सोयाबीन, उडीद यांसारख्या पिकांची काढणी चालू झालेली आहे. तसेच कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे. अशातच पंजाबराव यांनी अंदाज देत राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 5 ऑक्टोबर पर्यंत हवामान कोरडे असणार आहे. परंतु त्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहेमहाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलणार आहे.

राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक स्थिती निर्माण होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांमध्ये पिकांची काढणी करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावी अशी माहिती देण्यात आलेली आहे. पंजाबराव आणि महाराष्ट्र सोबतच मध्य प्रदेशात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी देखील शेतीची कामे उरकून घ्यावी तसेच सल्ला देण्यात आलेला आहे.

2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी राज्यातील हवामान बदलणार आहे. आणि त्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या दिवशी पावसाचा जोर थोडासा कमी असेल. परंतु 6 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा पावसाला जबाबदार सुरुवात होणार आहे. 9 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस असाच राहणार आहे. हा हलक्या स्वरूपाचा पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत असणार आहे. तर 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्यास असल्याची माहिती देखील पंजाबरावांनी दिलेली आहे.

PM Surksha Bima Yojana | सरकारकडून मिळणार 2 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा; जाणून घ्या नवी योजना

PM Surksha Bima Yojana

PM Surksha Bima Yojana | आपले सरकार हे नागरिकांची खूप काळजी घेत असतात. त्यांना लागणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींना सरकार धावून येत असते. सरकार सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना अंतर्गत नागरिकांची गरज लक्षात घेऊन प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींची गरज असते. भविष्याचा विचार करूनही आपण अनेक गोष्टी ठरवत असतो. परंतु यामध्ये विमा पॉलिसी खरेदी करणे खूप गरजेचे असते. आजकाल धकाधकीच्या आयुष्यात कधी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. अशामुळे विमा पॉलिसी खरेदी करणे खूप गरजेचे असते. परंतु ही विमा पॉलिसी खरेदी करणे सगळ्यांना जमत नाही.

अशातच आता केंद्र सरकारने एक विशेष योजना राबवली आहे. ज्यामधून सामान्य नागरिकांना विमा सुरक्षा पुरवली जाणार आहे. भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Surksha Bima Yojana ) सुरू केलेली आहे. हा एक अपघात विमा पॉलिसी आहे. सरकारच्या या पॉलिसीद्वारे जर अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा गंभीर दुखापत झाली तर त्यासाठी तुम्ही सरकारकडे क्लेम करू शकता. आणि त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. 18 ते 70 वर्षे वयोगटातील जे नागरिक आहेत. त्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला केवळ 20 रुपये प्रीमियम दरवर्षी भरावा लागतो. जे तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट केले जातात.

सरकारच्या या योजनेअंतर्गत जर कुठल्याही दुर्घटनेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा पूर्णतः विकलांग झाला तर 2 लाखापर्यंतचा क्लेम मिळतो. तसेच या दुर्घटनेत काही प्रमाणात विकलांग झाला तर 1 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम सरकारमार्फत दिला जातो. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला स्कीम फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. त्याचप्रमाणे त्यात सगळी माहिती भरून तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तुम्हाला सगळ्या कागदपत्रांसह हा फॉर्म सबमिट करावा लागेल. आणि त्यानंतरच तुम्हाला याचा लाभ मिळेल.