Friday, December 26, 2025
Home Blog Page 436

बाप रे ! माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतेय; संशोधनात आली धक्कादायक माहिती समोर

Mount Everest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या जगामध्ये अनेक उंच उंच शिखरे आहे. जिथे जाण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यातील माउंट एवरेस्ट हे आपल्या जगातील सर्वात उंच असलेले शिखर आहे. त्यामुळे माउंट एवरेस्ट चढणे हा अनेक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. परंतु त्यावर चढणे खूप अवघड आहे. नेपाळमधील अनेक लोक हे एव्हरेस्टला सागरमाथा म्हणजे स्वर्गाच्या शिखर असे देखील म्हणतात. परंतु जगातील सगळ्यात उंच शिखर या असणाऱ्या माउंट एव्हरेस्ट बाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे.

माउंट एवरेस्ट चढण्यासाठी हजारो गिर्यारोह प्रयत्न करत असतात. परंतु त्यातील काहींनाच यश आले आहे, तर काहींच्या हाती मात्र अपयश आलेले आहे. परंतु आता संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे आता या माउंट एव्हरेस्ट उंची वाढत चालली आहे. गेल्या 89 हजार वर्षांमध्ये माऊंट एव्हरेस्ट हा 15 ते 50 मीटर उंचीने वाढलेला आहे. म्हणजेच दर वर्षी माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतच आहे. नेचर जिओ सायन्सने हा एक अहवाल समोर आणलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमालयातून वाहणाऱ्या आणि सुमारे 89 हजार वर्षांपूर्वी विलीन झालेल्या या दोन प्राचीन नद्यांमुळे एव्हरेस्टची उंची वाढत असल्याची सांगितली जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये माउंट एव्हरेस्टची उंची ही 8848. 86 मीटर एवढी होती. दर शतकाला एव्हरेस्टची उंची सुमारे अर्धा मीटर वाढत असल्याची माहिती समोर आलेली आहे. माउंट एव्हरेस्ट हा 50 ते 60 दशलक्ष वर्ष जुना आहे. त्या ठिकाणी 2015 मध्ये एक भीषण भूकंप झाला होता. या भूकंपाचा उंचीवर परिणाम झाला असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. याआधीची चीनने 1975 मध्ये पहिल्यांदा आणि 2005 मध्ये दुसऱ्यांना माउंट एव्हरेस्ट उंची मोजली होती. परंतु यात एव्हरेस्टची जंची वाढली असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर दुसरीकडे माउंट एवरेस्टची उंची वाढताना दिसत आहे. परंतु याही मन त्या सातत्याने वितळत असल्याने भारतीयांना जल संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशी माहिती संशोधकांनी वर्तवली आहे.

BMC Lipik Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत या पदाच्या 1846 रिक्त जागा, अशाप्रकारे करा अर्ज

BMC Lipik Bharti 2024

BMC Lipik Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही आमच्या लेखामधून नेहमीच नोकरीच्या विविध संधीची माहिती देत असतो. आज देखील आम्ही अशीच एक माहिती देणार आहोत. मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपीच्या पदासाठी आहे या पदाच्या एकूण 1846 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 11 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | BMC Lipik Bharti 2024

या भरती अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदाच्या जागा भरल्या जाणार.

पदसंख्या

कार्यकारी सहाय्यक या पदाच्या एकूण 1846 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क असणार आहे, तर आरक्षित वर्गासाठी 900 रुपये शुल्क असणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या आधी अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी | BMC Lipik Bharti 2024

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर उमेदवारांना दर महिन्याला 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 11 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केला मदतीचा हात पुढे; 1492 कोटींचा निधी मंजूर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. आणि याच अतिरिक्त पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे आता देशातील 14 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 5 हजार 858 कोटी 60 लाखांचा अग्रीम निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र या राज्याला सगळ्यात जास्त निधी मिळालेला आहे. महाराष्ट्र पूरग्रस्तांसाठी 1492 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकारने केंद्र सरकारचे आभार मानलेले आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर केल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यावेळी केंद्र सरकारचे आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेच मिळते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 1492 कोटी रुपयांची पॅकेज जाहीर केलेले आहे. पंतप्रधान नेहमी शेतकऱ्यांना अन्नदाता असे म्हणतात. त्याचप्रमाणे आता नैसर्गिक संकटाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. हे पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे.’

यावर्षी जवळपास 21 राज्यांना 14 हजार 958 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1491 कोटी, आंध्र प्रदेशला 1036 कोटी आसामला 716 कोटी, बीहारला 655 कोटी 60 लाख गुजरातला 600 कोटी, तेलंगणाला 416 कोटी 80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि आता या निधीमुळे अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

यावर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला. आणि यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे त्या मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे आणि भाजीपाल्यांचे नुकसान झालेले होते. त्यासाठी सरकारने आता त्यांना हा निधी उपलब्ध करून देण्याचे ठरवलेले आहे.

Heart Attack In Kids | लहानमुलांमध्ये हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Heart Attack In Kids

Heart Attack In Kids | आजकाल अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यातही आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अगदी लहान मुलांमध्ये देखील हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वाईट जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे मुख्य कारण आहे. याशिवाय अनेक प्रकारच्या तणावामुळे देखील लहान मुलांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. त्यामुळे वेळीच काळजी घेतली पाहिजे. अन्यथा वाढत्या वयासोबत हा आजार वाढतो. परंतु आता लहान वयातच मुलांना हृदयविकाराचा झटका का येतो हे जाणून घेऊया.

तुमच्या मुलाचे हृदयही कमकुवत होत आहे का? | Heart Attack In Kids

हृदयरोग तज्ञांच्या मते, आजकाल मुले कोणतेही शारीरिक काम करत नाहीत, ते फास्ट फूड संस्कृतीत वाढले आहेत. याशिवाय अभ्यासाचाही ताण पडत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा मुलाच्या आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकतो. आजकाल मुलं कमी चालतात आणि खेळतात, हेच हृदयविकाराचे कारण बनत आहे. मुलांना चरबीयुक्त पदार्थ जास्त आवडतात, अनेक माताही घरी चपाती बनवण्याऐवजी दोन मिनिटांत नाश्ता बनवतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे.

तुमचा कौटुंबिक इतिहास असल्यास काळजी घ्या

घरातील कोणाला हृदयविकाराचा झटका येत असेल तर अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुलांमध्ये हार्ट ब्लॉकेज होण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून निष्काळजीपणा टाळा. तरुण वयात सुरुवातीला त्याबाबत निष्काळजीपणा केला जातो पण नंतर ती मोठी समस्या बनते.

लठ्ठपणामुळे मुलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो

लठ्ठपणा हे लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांमध्ये लठ्ठपणामुळे श्वसनाचा त्रास, मधुमेह आणि इतर आजार होऊ शकतात. पालक योग्य वेळी गंभीर झाले नाहीत तर त्याच्या अडचणी वाढू शकतात.

तुमचे मूल हृदयविकाराने ग्रस्त असल्यास काळजी घ्या

हृदयरोग तज्ञ म्हणतात की जर मुलाला हृदयविकाराचा गंभीर आजार असेल तर त्याचा पाठपुरावा करत रहा. डॉक्टरांना वेळोवेळी भेट द्या आणि त्यांची औषधे आणि सल्ला घ्या. मुलांच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

अभ्यासाचा ताण | Heart Attack In Kids

अनेक पालक छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, जे मुलांसाठी चांगले नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्या समाजात अभ्यासाबाबत खूप ताण आहे. मुले घराबाहेर पडून चुकीच्या गोष्टी खातात, काहीवेळा ते लहान वयातच अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडतात, अभ्यासाचा ताणही घेतात, ज्यामुळे त्यांचे हृदय पोकळ होते आणि गंभीर धोके वाढतात.

मुलांचे हृदय कसे सुधारावे

  • मुलांना तणाव घेऊ देऊ नका.
  • मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या. फास्ट फूड टाळा.
  • नियमित व्यायाम करा.
  • तरुण वयात मधुमेह असल्यास, निरीक्षण करत रहा. मुलांचे बीपी तपासा.
  • जर मूल लठ्ठ असेल तर वर्कआउटची मदत घ्या.

Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं!! 3 जणांचा मृत्यू

Pune Helicopter Crash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील बावधन या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर क्रॅश (Pune Helicopter Crash) झालं आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळण्याच्या आल्याचे सांगितल जात आहे. मात्र दुर्दैवाने या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ पायलट आणि एका इंजिनीअर चा समावेश आहे. परिसरात तुटलेल्या हेलिकॉप्टरचे सांगाडे पसरले आहेत. घटनास्थळी पोलिसांचे पथक तातडीने रवाना झालं असून हे हेलिकॉप्टर कशामुळे कोसळलं याचा शोध सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबईतून सुतारवाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टर मधून प्रवास करणार होते मात्र त्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर कोसळलं.

3 मिनिटातच हेलिकॉप्टर कोसळले – Pune Helicopter Crash

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होते, मात्र थोड्याच अंतरावर जाऊन ते कोसळलं. सकाळच्या सुमारास डोंगराळ भागात धुके असलेल्या हे हेलिकॉप्टर कोसळले (Pune Helicopter Crash) असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. या हेलिकॉप्टर मध्ये २ पायलट आणि १ इंजिनिअर असे एकूण ३ व्यक्ती होते, या तिघांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघातानंतर ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी सुद्धा २४ ऑगस्ट रोजी अशाच प्रकारची हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना पुण्यात घडली होती. त्यावेळी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी होते. या अपघातात पायलट जखमी झाला. तर बाकीच्या तिघाना मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. मात्र आजच्या हेलिकॉप्टर अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘या’ सवयी आहेत Slow Poison; अशाप्रकारे आरोग्यावर करतात विपरीत परिणाम

Bad Habits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण आपल्या आयुष्यात निरोगी आणि चांगले जगले पाहिजे. यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. परंतु यासाठीच केवळ खाण्यापिण्याच्या सवयी नाही, तर तुमच्या अगदी दैनंदिन जीवनातील काही छोट्या सवयी आहेत. त्या देखील तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. आणि त्यानंतर या सवयींचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते आणि हळूहळू याच सवय एका मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होतात. तुमच्या या वाईट सवयींचा तुमच्या जीवनावर आणि आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे या सवयी सुधारणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवन जगाल. आता जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत. ज्या तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहेत.

जास्त साखरेचे सेवन करणे

काही लोकांना गोड खाणे खूप आवडते. त्याची त्यांना तलप देखील येते. पण जर तुम्ही जास्त गोड खात असाल, तर यामुळे तुम्ही लठ्ठपणा तसेच मधुमेहाचा आजाराला सामोरे जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात साखर खाणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल.

नाश्ता न करणे

सकाळी नाष्टा करणे हे दिवसभरातील अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सकाळी केलेल्या नाष्टामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे रात्रभर आपले पोट रिकामी असते. पोट जर जास्त वेळ रिकामे राहिले तर तुमच्या शरीरामध्ये ॲसिडचे प्रमाण वाढते. आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होते. त्यामुळे सकाळी नाष्टा करणे खूप गरजेचे आहे.

प्रक्रिया केलेले अन्न खाणे

तुम्ही जर जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न खात असाल तर यामुळे देखील तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकते. यामुळे तुमच्या शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी जमा होऊ लागते. आणि यामुळे तुम्हाला लठ्ठपणा तसेच हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो.

प्रक्रिया केलेले अन्न खाणे

तुम्ही जर स्मार्टफोनचा अतिवापर करत असाल तर हळूहळू याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे तुमची तणावाची पातळी वाढते आणि सामाजिक संबंध देखील कमी होतात.

एकाच जागी बसून राहणे

बैठकामामुळे आता डेस्क वर्क कल्चरमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे एका जागी बसून राहण्याचा लोकांचा वेळ देखील वाढलेला आहे अशा वेळी तुमच्या हालचाल कमी होतात. आणि तुमचा लठ्ठपणा वाढतो आणि यासोबत अनेक आजार देखील येतात. त्यामुळे एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नका.

कमी पाणी पिणे

गरजेपेक्षा कमी पाणी पिणे हे तुमच्या शरीरासाठी खूप घातक आहे. यामुळे डीहायड्रेशन होते तसेच तुमच्या त्वचेवर आणि शरीरावर देखील याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे दररोज आवश्यक पाणी पिणे गरजेचे आहे.

अपुरी झोप

अनेक गोष्टी करताना लोकांचे जीवनशैलीमध्ये मोठा बदल झालेला आहे. यामुळे लोक पुरेशी झोप घेत नाही. त्यामुळे त्यांना मानसिक अस्थिरता निर्माण होते आणि शारीरिक थकवा देखील जाणवतो. त्यामुळे रोज सात ते आठ तासाची झोप घेणे गरजेचे आहे.

व्यायामाचा अभाव

दररोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर दररोज व्यायाम केले नाही. तर याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तरी व्यायाम करणे गरजेचे आहे.

नवरात्रीला घ्या रात्री उशिरापर्यंत गरबा, दांडियाचा आनंद ! मुंबई मेट्रो चालवणार जादा फेऱ्या

mumbai metro

येत्या 3 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दांडिया , गरबा चे आयोजन केले जाते. म्हणूनच प्रवाशांची सोय व्हावी याकरिता मुंबई मेट्रो कडून जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. MMRDA चे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आहे

‘या’ काळात अतिरिक्त मेट्रो धावणार

रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांना नवरात्री उत्सवात सहभागी होण्यासाठी 7 ऑक्टोबर ते दिनांक 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान अतिरिक्त मेट्रो सेवा पुरवल्या जातील. 7 ऑक्टोबर ते दिनांक 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान पंधरा मिनिटांच्या अंतराने दररोज 12 अतिरिक्त ट्रिप चालवले जातील. जेणेकरून मध्यरात्री उत्सवाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना सोयीस्कर आणि आर्थिक दृष्ट्या प्रवास करता येईल.

याबाबत माहिती देताना, एम एम ओ सी एल चे अध्यक्ष संजय मुखर्जी म्हणाले की नवरात्र हा सण आहे जो लोकांना आणि सर्व भाविकांना एकत्र आणतो आणि ही आपली जबाबदारी आहे. मेट्रोण्या सेवेचा विस्तार करून नागरिकांसाठी कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक उपलब्ध करून देणे आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की रात्री उशिरा उत्सवा दरम्यान प्रवाशांना प्रवासाचा एक सोपा आणि आरामदायी पर्याय उपलब्ध आहे.

नवरात्र काळात 294 फेऱ्या

एम एम ओ सी एल चे व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल म्हणाले, ‘आम्ही आमच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि नवरात्र उत्सवावर मेट्रोच्या वेळा वाढवण्याचा निर्णय प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरेल. 7 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत नवरात्रीसाठी अतिरिक्त 12 फेऱ्या वाढवतील परिणामी एकूण 294 फेऱ्या होतील

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या समुद्री बोगद्याबाबत आली अपडेट ; NHSRCL ने दिली माहिती

bullet train mumbai

राज्यभरात महत्त्वाचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मेट्रो प्रकल्प, रस्ते प्रकल्प, पूल बांधणी यांचा समावेश आहे. यातच राज्य सरकारचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन चे काम देखील वेगाने सुरू असून सध्या याची काय परिस्थिती आहे याची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत. नॅशनल हायस्पीड रेल कॉरीडॉर लिमिडेटने याची माहिती दिली आहे.

सद्यस्थितीला मुंबई ते अहमदाबाद या ट्रेन साठी देशातील पहिला समुद्राखालील बोगदाचे काम सुरू आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील बुलेट ट्रेन भूमिगत स्थानक ते शिळफाटा दरम्यान हा 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालचा बोगदा बांधण्यात येतो आहे. या बोगद्याच्या 21 km पैकी 16 किलोमीटर चा भाग हा टनेल बोरिंग मशीन द्वारे तर उर्वरित पाच किलोमीटरचा भाग हा एनएटीएम द्वारे आहे. यात ठाणे खाडीखालील जाणारा सात किलोमीटरचा बोगदा हा समुद्र खालून जाणार आहे.

या बोगद्याबाबतची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एडीआयटीच्या बोगदाचे 11 x 6.4 मीटर बांधकाम झाले आहे. या बोगद्याचा वापर ऑपरेशन दरम्यान मुख्य बोगद्यात थेट वाहनांना प्रवेश देत आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर प्रक्रियेच्या उद्देशाने हा बोगदा वापरास येऊ शकतो.

हा प्रकल्प बांधत असताना वेगवेगळ्या मशिनरींचा वापर केला जातो जे यापूर्वी कधीही वापरलेली नाहीयेत. बांधकाम स्थळांवर काही भाग झुकला किंवा कंपन झाला, सेटलमेंट क्रॅक आणि खचला तर याचे निरीक्षण करण्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर केला जातो आहे. यामध्ये इनक्लीनोमीटर, व्हायब्रेशन मॉनिटर, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, टिल्ट मीटर आदी विविध प्रकारची जिओ टेक्निकल उपकरणे बसवण्यात आली आहेत. खोदकाम आणि बोगदासारख्या सुरू असलेल्या भूमिगत कामांना किंवा जागेच्या सभोवताच्या वस्तूंना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी ही उपकरणे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

बुलेट ट्रेनसाठी ‘या’ ठिकाणी खोदकाम

  • मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामस्थळी शाफ्ट 1 : शाफ्ट – 1 ची खोली 36 मीटर आहे, सेकेंट पायलिंगचे 100% टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित खोदकाम सुरू आहे.
  • विक्रोळीतील शाफ्ट 2 : शाफ्ट-2 ची खोली 56 मीटर आहे, सेकेंट पायलिंगचे 100% टक्के काम पूर्ण झाले आहे. आजपर्यंत शाफ्टसाठीचे सुमारे 92% खोदकाम पूर्ण झाले आहे.
  • सावली ( घणसोलीजवळ ) येथील शाफ्ट 3 : शाफ्ट-3 ची खोली 39 मीटर आहे, येथील 100% खोदकाम पूर्ण झाले आहे, त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस येथे पहिले टनेल बोअरिंग मशीन खाली जमिनीत टाकण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
  • शिळफाटा : बोगद्याचे हे एनएटीएम टोक आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत 200 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.
  • एडीआयटी ( एडिशनल ड्रिव्हन इंटरमीडिएट टनेल ) पोर्टल : 394 मीटर लांबीचा एडीआयटी बोगदा 6 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. यामुळे शिळफाटा व्यतिरिक्त खोदकामासाठी दोन अतिरिक्त एनएटीएम फेसची सोय झाली आहे. या अतिरिक्त प्रवेशामुळे 700 मीटरहून अधिक भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

‘या’ ठिकाणी आहे जगातील सर्वात लांब ट्रेन ; 682 डब्बे मोजेपर्यंत दमून जाल

worlds largest train

भारतात तर रेल्वेचे खूप मोठे जाळे पसरले आहे. सार्वजनिक आणि मालवाहतुकीमध्ये सुद्धा रेल्वे खूप मोठी भूमिका बजावते. अगदी त्याचप्रमाणे जगभरातलया विविध देशात सुद्धा रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का ? की जगातील सर्वात लांब रेल्वे कशी असेल ? चला तर आज जाणून घेऊया याच प्रश्नाचं उत्तर

ऑस्ट्रेलियात धावणारी ‘BHP Iron Ore Train’ ही जगातील सर्वात लांब रेल्वे आहे, ज्याचा वापर लोहखनिज वाहतूक करण्यासाठी केला जातो. या ट्रेनने तिची लांबी, वजन आणि क्षमतेच्या बाबतीत विक्रम केले आहेत, ज्यामुळे ही रेलवे म्हणजे एक तांत्रिक चमत्कार आहे. ही ट्रेन पश्चिम ऑस्ट्रेलियातील माउंट न्यूमन ते पोर्ट हेडलँडपर्यंत खनिज वाहतूक करण्यासाठी धावते, जे सुमारे 275 किलोमीटरचे अंतर व्यापते.

काय आहे ट्रेनची खासियत ?

लांबी : बीएचपी आयर्न ओर ट्रेनची लांबी सुमारे 7.3 किलोमीटर आहे. या ट्रेनमध्ये एकूण 682 वॅगन्स आहेत, ज्याचा वापर 8 शक्तिशाली डिझेल-इलेक्ट्रिक इंजिन खेचण्यासाठी केला जातो. एवढ्या मोठ्या संख्येने वॅगन्स असल्यामुळे ही ट्रेन जगातील सर्वात लांब मालगाडी बनली आहे. विचार करा या गाडीची लांबी एवढी आहे की ही गाडी एखाद्या शहरातून जात असेल तर तिचे टोक एका टोकाला असेल आणि दुसरे टोक ते ओलांडत असेल.

वजन: पूर्ण लोड केल्यावर या ट्रेनचे एकूण वजन सुमारे 99,734 टन आहे. या भारामध्ये सहसा लोह खनिजाने भरलेल्या वॅगन्स असतात. एवढी जड ट्रेन खेचण्यासाठी अत्याधुनिक इंजिनांचा वापर केला जातो, जे कठीण परिस्थितीतही ती चालू ठेवण्यास आणि समतोल राखण्यास सक्षम असतात.

इंजिन: ट्रेन 8 डिझेल-इलेक्ट्रिक इंजिनद्वारे खेचली जाते, विशेषत: लांब आणि जड ट्रेन हाताळण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या इंजिनांच्या मदतीने ट्रेन कोणत्याही व्यत्ययाशिवाय शेकडो किलोमीटरचा प्रवास करते. इंजिन ट्रेनच्या मधोमध अशा रीतीने बसवण्यात आले आहेत, जेणेकरून लांब ट्रेनला समान शक्ती मिळेल आणि ट्रेनचा वेग आणि संतुलन राखले जाईल.

भाऊबीजेलाही लाडक्या बहिणींना मिळणार ओवाळणी; अजित दादांना केला हा वादा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता सध्या राज्यामध्ये राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांना दीड हजार रुपये दर महिना दिले जातात. परंतु ही योजना केवळ निवडणूक पुढील पाच वर्षे चालणार आहे. असा विश्वासही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी दिलेला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसामान्य याच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून ते सध्या मराठवाड्यामध्ये आहे यावेळी बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची संवाद साधताना दिसले. यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. परंतु आता ही ओवाळणी कशा स्वरूपात मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया.

सरकारचे लाडके बहिण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे .राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या सणाच्या अगोदर महिलांच्या खात्यात लाडके बहिण योजनेच्या दोन हप्त्यांचे पैसे जमा केले होते. त्यात आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. परंतु दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी देखील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्या त्या ठिकाणी मी जनसमान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करतात पण आमच्या अंगाला काही भोके पडत नाही. या सत्तेत असताना कोणते योजना आणली. मात्र आता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काचे पैसे ते कधीही काढू शकतात. आणि वापरू शकतात. आम्ही दिलेल्या ही योजना पाच वर्षे चालण्यासाठी तुम्ही घड्याळ या चिन्हाला मतदान करावे लागेल. मी बोलतो तसा वागतो हा अजित दादांचा वादा आहे ज्याप्रमाणे मी रक्षाबंधनाला तीन हजार रुपये दिले तसे भाऊबीजला देखील मी माझ्या बहिणींना खाली हाताने पाठवणार नाही. ओवाळणी देणार म्हणजे देणार हा माझा वादा आहे. म्हणजेच आता भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे.

सध्या अजित पवार हे महाराष्ट्र सन्मान यात्रा करत आहे. या निमित्ताने ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. तेथील बहिणींशी आणि इतर नागरिकांशी संवाद साधत आहे. आणि त्यांच्या पक्षाचा प्रचार देखील करत आहेत विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांसारख्या योजना आणताना दिसत आहेत.