Thursday, December 25, 2025
Home Blog Page 453

FDA Recruitment 2024 | अन्न व औषध प्रशासन विभागात भरती सुरु, दरमहा मिळणार 1 लाखापेक्षा जास्त पगार

FDA Recruitment 2024

FDA Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच सरकारी नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी करायची असते. परंतु सगळ्यांना ते शक्य होत नाही. अशातच आता महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यशाळांमधील (FDA Recruitment 2024 ) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी आहे. यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोग शाळांमध्ये पदांसाठी भरली जाणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. 23 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, तर 22 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करा.

पदाचे नाव | FDA Recruitment 2024

या भरती अंतर्गत विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदाच्या एकूण 37 रिक्त जागा आहे, तर विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदाच्या 19 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी तर पदवी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी प्राप्त केल्यानंतर उमेदवाराकडे औषधी द्रव्य विश्लेषण असा दीड वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क आहे, तर राखीव प्रगर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क आहे.

वेतनश्रेणी | FDA Recruitment 2024

विश्लेषण रासायन शास्त्रज्ञ – 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800 रुपये दर महिना
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये दर महिना.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख

23 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

भारतातील लोक ऑफिसमध्ये करतात सर्वाधिक काम; धक्कादायक माहिती आली समोर

Work time in India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक मोठ्या कंपन्यांमधून आजकाल कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. अशा अनेक बातम्या सध्या पसरत आहेत. जर कंपन्यांना एखाद्या कर्मचारी त्यांच्या कामावर नको असेल, तर ते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन राजीनामा देण्यासाठी भाग पाडतात. किंवा ते स्वतः त्यांना काढून टाकतात. परंतु कर्मचारी देखील त्यांचा महिन्याचा खर्च भागवण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यासाठी अतिरिक्त काम करायला तयार होतात. परंतु काम टिकवण्याच्या नादात ते खूप काम करतात आणि याचा त्यांच्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होतो.

नुकतेच पुण्यात एक विचित्र घटना घडली. ती म्हणजे एका कंनीच्या कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या एका 26 वर्ष महिलेचा मृत्यू झाला आहे. आणि तिच्या आईने कंपनीला एक पत्र लिहून कामाच्या दबावामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे, असे देखील सांगितले आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. आणि कर्मचारी हे किती तास काम करतात. या सगळ्या गोष्टींची देखील माहिती घेतली जात आहे. अशातच आयलो म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा एक मोठा रिपोर्ट समोर आलेला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक देशांत कामाचे तास किती आहेत याची संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे.

जेव्हा आपण कोणत्याही कंपनीत काम करतो. तेव्हा कामाचे दिवसाचे तास हे फिक्स असतात. जवळपास आठ ते दहा तास हे काम केले जाते . पण कामाच्या व्यतिरिक्त अनेक वेळा माणसे जास्त वेळ काम करतात. कधी कधी घरी गेल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी देखील त्याला काम करावे लागते.अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे उरलेल्या सदस्यांवर मात्र कामाचा मोठा दबाव येत आहे. आणि यामुळे अतिरिक्त काम करतात आणि त्यांच्या आरोग्यावर देखील तसा परिणाम होतो.

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा विचार केला तर भारतात कामाचे तास हे खूप जास्त आहेत. भारतीयांच्या कामाचे तास हे अमेरिका, जपान, चीन, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, ब्राझील या देशांपेक्षा जास्त आहे. दर आठवड्याला आता हे या देशातील कर्मचारी ऑफिसमध्ये किती काम करतात ते जाणून घेऊयात.

भारतातील लोक हे एका आठवड्यात जवळपास 46.7 तास काम करतात.चीनमधील लोक एका आठवड्यात 46.1 तास काम करतात. ब्राझील मधील लोक हे दर आठवड्यात 39 तास काम करतात. त्याला अमेरिकेतील लोक 38 तास काम करतात. जपान मधील लोकांची आठवड्याला काम करण्याची क्षमता ही 36.6 तासांची आहे. तर इटली मधील एका आठवड्यात 36.3 तास काम करतात. युकेमधील डोके 35.9 तास काम करतात. फ्रान्समधील 35.9 तास काम करतात. त्याचप्रमाणे कॅनडामधील लोक एका आठवड्यामध्ये 32.1 तास काम करतात. या सगळ्या आकडेवारीवरून असे लक्षात आलेली आहे की, भारतातील लोक या आठवड्याला सगळ्यात जास्त काम करतात. आणि याचाच विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. आणि त्यांना वेगवेगळ्या शारीरिक व्याधीना सामोरे जावे लागत आहे.

देशातील शैक्षणिक संस्था होणार तंबाखूमुक्त; सरकारने जारी केली सूचना

Tobaco

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये तंबाखू यांसारख्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु आता देशातील तसेच राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये आता तंबाखू वर्ज केली जावी. यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आता केंद्रीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्रालयाने केलेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तंबाखूमुक्ती नियमांचे पालन केले जावे, असे सांगण्यात आलेले आहे.

आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे ही सूचना जारी केलेली आहे. आणि या मार्गदर्शक सूचनांमध्ये तंबाखू सेवनामुळे लहान मुलांवर आणि तरुणांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. सरकारने 2019 सालचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटलेले आहे की ग्लोबल युथ सर्वेक्षण 2019 नुसार 13 ते 15 वयोगटातील जवळपास 8.5 टक्के मुले ही तंबाखूचे सेवन करतात. म्हणजेच जवळपास 5500 लहान मुले तंबाखूचे सेवन करतात. ही अत्यंत चिंतादायक बाब आहे.

देशातील शिक्षण संस्थांचे सर्वेक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की, जवळपास 20 वर्षाच्या आधीच 55% मुले हे तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करतात. तसेच यामुळे त्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक शैक्षणिक दृष्ट्या देखील खूप तोट्याचे मानले जाते. तंबाखू फ्री एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मॅन्युअलचे महत्वपूर्ण सूचनेत सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता तंबाखू विरोधी धोरणांचे त्यांना अंमलबजावणी करता येणार आहे. केंद्र सरकारने 31 मे म्हणजेच तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने सोसिओ इकॉनोमिक एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीच्या सहकार्याने हे धोरण जारी केलेले आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णपणे तंबाखू गरजे केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे देखील कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाही याची खात्री केली जाणार आहे.

Weather Update | ‘या’ जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | सध्या राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहे. कधी उन्हामुळे अत्यंत गरम होताना दिसत आहे, तर कधी कधी पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. गणपतीनंतर पावसाने राज्यात काहीसा आराम केला होता. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून आगमन होणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर देखील वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभाग पावसाबाबत नेहमीच अपडेट देत असतात. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. .

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 23 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे पावसासाठी हे पोषक वातावरण आहे. त्यामुळे रविवारपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. तसेच खरीप हंगामातील शेतकऱ्यांची जी पीके आहे ते त्या पिकांची काळजी घेण्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

हवामान खात्याने बनवलेल्या अंदाजानुसार आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर तसेच धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचे सांगण्यात आलेले आहे.

मुंबई सह उपनगरामध्ये देखील आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील काहीशा प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना पावसाचा विभागाकडून वर्तवण्यात येईल आलेला आहे. येथे मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील तीन दिवसात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

Potassium | शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या लक्षणे

Potassium

Potassium | आपल्या निरोगी आरोग्यासाठी शरीरातील विविध पोषक तत्वांची खूप गरज असते. यातच पोटॅशियम हे देखील खूप गरजेचे आहे. आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोटॅशियम खूप आवश्यक असे पोषणतत्व आहे. त्यामुळे आपल्या आहारात पोटॅशियमचा (Potassium) समावेश असणे खूप गरजेचे असते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे उच्च रक्त दाबाचा धोका देखील वाढत असतो. तसेच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसंबंधीच्या आजार वाढत असतात. परंतु जर पोटॅशियम योग्य प्रमाणात असेल, तर तुम्हाला कोणताही धोका राहत नाही. आपल्या शरीराच्या पोषक तत्वांसाठी आणि हालचालीसाठी पोटॅशियम मदत करते. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील पोटॅशियम अत्यंत महत्त्वाचे असे मानले जाते.

पोटॅशियमच्या (Potassium) कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो . पोटॅशियम हे आपल्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची अशी पोषक तत्वे आहे. यामुळे आपल्या हृदयाच्या स्नायूंना बळकटी प्राप्त होते. जर आपल्या शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल, तर हायपोलेमिया म्हणून ओळखला जातो. यामुळे हृदयाचे कार्य नीट होत नाही. तसेच पोटॅशियमच्या कमतरतेमुळे हृदय विकाराचा झटका आणि रक्तवाहिन्यांचा समस्या वाढतात अशा लोकांना कधीही हृदयविकाराचा धोका येऊ शकतो.

जर तुमच्या शरीरात पोटॅशियमची (Potassium) कमतरता असेल किंवा तुम्ही हायपोक्लेम यांनी ग्रस्त असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू शकतात. यामध्ये तुमचे हृदय अचानक धडधडू लागते. तसेच कधीकधी श्वास घेण्यात देखील अडचणी निर्माण होतात. काही प्रकरणांमध्ये हृदयाचे ठोके अचानक वाढतात. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे तुमच्या आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही केळी, बटाटा, अवाकॅडो, पालेभाज्या यांचा समावेश करू शकता. जर तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल, तर तुम्हाला डीहायड्रेशन देखील होऊ शकते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी भरून निघेल. तसेच इतर वेगवेगळ्या आजारांपासून देखील तुम्ही मुक्त व्हाल.

थायरॉईडच्या रुग्णांसाठी हे 5 पदार्थ आहेत फायदेशीर; आजच करा जेवणात समावेश

Thyroid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल लोकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. अगदी लहानापासून ते वृद्धांपर्यंत कोणाला कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. आजकाल थायरॉईड हा मोठ्या प्रमाणात पसरलेला रोग आहे.अनेक महिलांना हा आजार होत असतो. थायरॉईड हा एक असा आजार आहे. तो कोणत्याही वयात व्यक्तीला होऊ शकतो. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, जर तुमची जीवनशैली चांगली नसेल तुम्ही जर निरोगी राहत नसाल, तर हा आजार तुम्हाला होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला औषधंसोबत पौष्टिक आहार आणि चांगल्या जीवन शैलीचा अवलंब करणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल, तर सगळ्यात आधी तुमचा आहार चांगला असणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही चांगल्या आहाराचा समावेश केला, तर तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच तुमच्या शरीराला चांगली ऊर्जा आणि पोषण देखील प्राप्त होते. जर तुम्हाला थायरॉईड झाला असेल तर असे काही खाद्यपदार्थ आहेत. ज्याचे तुम्ही सेवन केल्यावर तुमचा थायरॉईड कमी होते आता जाणून घेऊया या पदार्थांबद्दल.

नारळ

तुम्हाला जर थायरॉईडची समस्या असेल, तर तुम्ही ओला नारळ खाऊ शकता. तुम्ही आहारात नारळाचा वापर कोणत्याही स्वरूपात करू शकता. म्हणजेच तुम्ही कच्चा नारळ खाऊ शकता, तसेच त्याची चटणी किंवा लाडू बनवून खाऊ शकता.

आवळा

थायरॉईड कमी करण्यासाठी आवळा उपयुक्त आहे. तसेच तुम्ही आवळा पावडर मधासोबत खाल्ली किंवा आवळ्याचा रस कोमट पाण्यासोबत पिला तरी देखील तुमचे थायरॉईड नियंत्रणात राहील.आवळ्यापासून तुम्हाला इतर अनेक फायदे देखील होतात.

सफरचंद

सफरचंद हे सगळ्या आजारांवरचे एक प्रभावशाली औषध आहे. यामध्ये पेक्टीन आणि फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातिफिकेशन होण्यासाठी मदत करते. आणि तुमची थायरॉईड नियंत्रणात राहते. म्हणून तुम्ही दररोज एका सफरचंदाचे सेवन केले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर होईल.

अंडी

दररोज अंडी खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो. अंड्यामध्ये प्रथिने ओमेगा थ्री असिड सेलेनियम आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच यामुळे थायरॉईड कमी होण्यासाठी देखील मदत होते.

भोपळ्याच्या बिया

तुम्ही जर दररोज भोपळ्यांच्या बियांचे सेवन केले, तर तुमचा थायरॉईड नियंत्रण राहण्यास मदत होते. कारण या भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते. यामुळे थायरॉईड संप्रेरके तयार होण्यास मदत होते. म्हणून भोपळ्याच्या बियांचे दररोज सेवन करावे.

Edible Oil Price | सर्वसामान्य नागरिकांना बसणार आर्थिक फटका; खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

Edible Oil Price

Edible Oil Price | महाराष्ट्रात नुकतेच गणपती साजरे झालेले आहे. आणि आता एकानंतर एक असे अनेक सण येणार आहेत. गणपतीनंतर आता नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येतील. परंतु या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला जरा जास्त फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. कारण आता खाद्य तेलाच्या (Edible Oil Price) किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. मागील आठवड्यात जर आपण पाहिले तर सोयाबीन तेलाची किंमत ही 110 रुपये किलो होती. परंतु ती आता 125 रुपयांवर गेलेली आहे. तसेच सोयाबीनच्या तेलात पुन्हा एकदा दर वाढ होऊन ते 133 रुपयांवर पोहोचलेले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक चिंतेची बाब बनलेली आहे.

केंद्र सरकारने तेलावरील एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे. त्यामुळे ही दरवाढ देखील मोठ्या प्रमाणात झालेले दिसत आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कावर 20 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे कच्चे सोयाबीन तेल आणि सूर्यफेल ते 27.5 टक्के आयात शिल्क लागणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहेत. आणि या खाद्यतेलाची किंमत 20 ते 25 रुपयांनी देखील वाढलेली आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी सोयाबीन तेलाचे भाव हे 125 रुपये पर्यंत होते. परंतु ते पुन्हा एकदा पाच रुपयांनी वाढलेले आहे. आणि सोयाबीन तेलाचे दर आता 135 रुपयांवर पोहोचलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा एक मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नागरिक हे अगदी काटकसरीने किराणा विकत घेत असतात. त्यातही तेलाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करतात. साधारणपणे महिन्याला चार ते पाच लिटर तेल लागते. परंतु आता तेलाचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत.

दरवर्षी सणासुदीच्या काळात तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत असते. परंतु यावर्षी खाद्यतेल महाग होणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जाणार आहे. खाद्यतेलावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना आयात शुल्क लागू केल्यानंतर त्यांनी किरकोळ किमतीमध्ये वाढ न करण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे सध्याचा साठा शिल्लक असेपर्यंत खातेगोलाच्या किमती वाढू नये, अशी सूचना केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनांना दिलेली आहे.

काय सांगता ! इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी ?गडकरींनी सांगितला प्लॅन

ev bus pune

पुण्यातील रस्तेमार्ग विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना नितीन गडकरींनी यांनी इलेकट्रीक बस प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले ‘जसं एअर होस्टेस असतं, तसं बस होस्टेस असणार आहे’.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना गडकरी म्हणाले, “मुरलीधरजी मी आता नवा प्रोजेक्ट करतोय. टाटा कंपनीचं मी झेकोस्लोव्हिया येथे स्कोडा कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करुन दिलय.18 ते 40 मीटरची ही बस आहे, ती बस जेव्हा बस स्टॉपवर थांबेल तेव्हा अर्ध्या मिनिटांत 40 किमीची चार्जिंग करेल.बसमध्ये एक्झिक्युटीव्ह क्लास आहे, लॅपटॉप आहे. विशेष म्हणजे जसं एअर होस्टेस असतं, तसं बस होस्टेस असणार आहे.या बसमध्ये चहा-पानी, नाश्ता मिळेलच. पण, या बसचं तिकीट डिझेलच्या बसेसपेक्षा 30 टक्के कमी असणार आहे, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमातून दिली.

इथेनॉलवर आधारित गाड्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये

पुढे बोलताना ते ,म्हणाले , या इलेक्ट्रिक बसचा पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होत असून, त्यानंतर पुण्यातील रिंग रोडवर तुम्ही हा प्रोजेक्ट सुरू करा, असेही गडकरी यांनी मुरलीधर मोहोळ यांना उद्देशून म्हटले आगामी काळात पुण्याला प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी इथेनॉलचा वापर करणाऱ्या या सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरू करण्याबाबत गडकरींनी मार्गदर्शन केले.

GOOD NEWS ! ‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी करणार पुण्यातील नवीन भूमिगत मेट्रोचे उदघाटन

पुणेकरांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एवढेच नव्हे तर गणेशोत्सव काळात सुद्धा पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. असे असताना पुणे मेट्रोच्या नवीन भूमिगत मेट्रोचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 सप्टेंबर रोजी करणार आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड ते निगडीपर्यंत उन्नत कॉरिडॉरची पायाभरणी

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या मार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होईल, आणि आम्ही हा संपूर्ण रस्ता पूर्ण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गासाठी इतके निर्णय घेतले याचा मला आनंद आणि सन्मान वाटतो,” असे ते म्हणाले. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो कॉरिडॉरचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा विस्तार करण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड ते निगडीपर्यंत उन्नत कॉरिडॉरची पायाभरणीही ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही पुणे मेट्रोसाठी नवीन टप्पे बांधत आहोत. गणपती उत्सवात विसर्जनासाठी तब्बल 3.5 लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला. पंतप्रधान मोदी मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन करतील आणि 26 सप्टेंबर रोजी दुसऱ्या मार्गाचे ‘भूमिपूजन’ करणार आहेत. तर येत्या काही दिवसांत पुणे हे सर्वोत्तम शहरी निवास केंद्रांपैकी एक होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याबाबतचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठविण्यात येणार असून, मोहोळ व गडकरी साहेब त्याचा पाठपुरावा करणार आहेत.

मुंबईकरांनो ! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक ; पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक

mumbai local

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावते. उद्या रविवार दिनांक २२ रोजी जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लाॅक घेण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री १२ पासून ते सकाळी १० पर्यंत १० तासांचा मोठा ब्लाॅक पश्चिम रेल्वेवर असेल. त्यामुळे रविवारी लोकल विलंबाने धावण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे

ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे ब्लाॅक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबतील. तर, ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकल थांबणार नाही.

हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांवर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे

गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर शनिवार मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. परिणामी ब्लाॅक कालावधीत सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावतील. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरी येथून डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल गोरेगाव स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर नेण्यात येतील. गोरेगाव – बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल पाचव्या मार्गिकेवरून धावतील. या लोकल राम मंदिर, मालाड, कांदिवली या स्थानकांवर थांबणार नाहीत. पहाटे ४.३० नंतर अंधेरी – विरारदरम्यान धावणाऱ्या डाऊन जलद लोकल ब्लाॅक कालावधी पूर्ण होईपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच चर्चगेट – बोरिवली मार्गावरील काही धीम्या लोकल गोरेगावपर्यंत अंशत: रद्द करून गोरेगाववरून चर्चगेटकडे मार्गस्थ होतील. काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.