Thursday, December 25, 2025
Home Blog Page 452

महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांना नोकरीसाठी पाठवणार इस्राईलला; महिना मिळणार एवढा पगार

Civil Workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच काही दिवसांपूर्वी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी जर्मनीला पाठवण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीमध्ये वाहन चालक पदावर काम देण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी हा निर्णय घेतला होता. अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या कौशल्य विभाग भागाकडून बांधकाम कामगारांना इजराइलला पाठवण्यात बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आणि याबाबत आणि प्रयत्न देखील चालू झालेले आहे.

इस्राईलमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे इस्राईलमध्ये संपूर्ण वातावरण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि या सगळ्यामुळे इस्राईल मध्ये चांगल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि या सगळ्या बाबत विचार करून राज्य सरकारच्या कौशल्य विभागाकडून पुढाकार घेण्यात येऊन आता कामगारांना पाठवण्यात येणार आहे. आणि यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल विभागाकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी इस्रायल यांच्यात एक मोठे युद्ध सुरू झाले होते. आणि त्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर तसेच इतर अनेक क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि कामे देखील रखडलेली आहे. तसेच अनेक कंपन्यांमधून बांधकाम कामगारांची कपात झालेली आहे. त्यामुळे इथे बांधकाम कामगारांचा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातून इस्राईलमध्ये बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि ते नोकरी देखील देण्यात येणार आहे. जे कामगार इस्राईल जाण्याची इच्छुक असेल त्यांनी जिल्हा कौशल्य आरोग्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा असे देखील सांगण्यात आलेले आहे. आणि या कामगारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.

इस्राईलला जाण्यासाठी कोणत्या अटी आहेत ?

कुशल आणि अनुभवी बांधकाम कामगारांना इस्राईलला जाण्याची संधी मिळणार आहे. यासाठी उमेदवार हा दहावी पास किंवा नापास असला, तरी चालेल तसेच कामगाराची वही 25 ते 45 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा सुरू झालेली आहे. त्यामुळे जाण्यासाठी जे बांधकाम कामगाराची इच्छुक असतील त्यांनी अर्ज करायचा आहेत.

महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी जर वुटेनबर्ग या राज्याशी करार केला होता. त्यामुळे कुशल मनुष्यबळ तिथे पुरवले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील वाहन चालक पुरवण्याची जबाबदारी देखील आता परिवहन विभागावर सोपवण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार ट्रक, बस आणि हलकी जड वाहने चालवणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि जर्मनीत पाठवले जाणार आहे. जर्मनीत वाहन चालवण्यासाठी दर महिना अडीच लाख रुपये त्याचप्रमाणे वार्षिक 30 लाख रुपये देखील मिळू शकतात.

Fig Water | सकाळी अंजीराचे पाणी प्यायल्याने शरीराला होतात फायदे; अशाप्रकारे करा सेवन

Fig Water

Fig Water | ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे. डॉक्टर देखील आपल्याला अनेक आजारांपासून मुक्त होण्यासाठी दररोज ड्राय फ्रूट खायला सांगतात. त्यातील अंजीर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन ए, बी, ई, के यांसारखे घटक असतात.तुम्ही अंजीर ( Fig Water) जर रातभर पाण्यात भिजवून ठेवले आणि सकाळी उठून ते पाणी पिले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. अंजिराचे पाणी देखील शरीरासाठी खूप फायदेशीर असते. या पाण्यात आपल्या त्वचेला आणि हृदयाला फायदा होतो. आता हे अंजिराचे पाणी ( Fig Water) सकाळी प्यायल्याने शरीराला आणखी कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

पचनसंस्था मजबूत राहते |Fig Water

सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहते. अंजीरमध्ये फायबर असते, जे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम देते. ऊर्जेचा स्रोत अंजीरमध्ये नैसर्गिक साखर असते, जी सकाळी ऊर्जा देते आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत करते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

रक्तदाब नियंत्रित करते अंजीरचे पाणी सकाळी लवकर प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. याच्या सेवनाने हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. वजन नियंत्रित करा अंजीरच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर

अंजिरामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची एक त्वचा अत्यंत नितळ आणि चमकदार होते. तसेच वाढत्या वयासोबत त्वचेच्या अनेक समस्या देखील कमी होतात. अंजीराच्या पाण्याच्या सेवनाने तुमचे डार्क सर्कल, पिंपल्स यांसारख्या समस्या दूर होतात.

पचन संस्था मजबूत

अंजिराच्या पाण्यामध्ये आणि गुणधर्म असतात. त्यामध्ये फ्री रेडिकल्स असतात. जे कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमती वाढते. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी अंजीरचे पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

हृदयासाठी फायदेशीर

अंजिराच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. तसेच हृदयाच्या अनेक आजारासाठी अंजिराचे पाणी खूप फायदेशीर आहे.

हाडे मजबूत होतात | Fig Water

अंजिराच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. त्यामुळे तुमची हाड मजबूत होतात. यामुळे इतर अनेक समस्या देखील दूर होतात.

शेतकऱ्यांना मिळणार झिरो वीजबिल; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अजित पवार, ठाकरे गट आणि भाजप यांनी महायुती केल्यानंतर वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली. परंतु महायुतीत असलेले हे सरकार वेगवेगळ्या योजना आणण्याचे काम करत आहे. तसेच त्या योजनेची अंमलबजावणी देखील चालू झालेली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

माहिती सरकार आणि योजनांबद्दल सांगताना अजित पवार म्हणाले की, “आम्ही महायुती झाल्यापासून आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. तसेच विकासासाठी आम्ही सरकारमध्ये गेलेलो आहोत. सत्ता असेल तर सर्वसामान्यांची कामे होतील. यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. तसेच लाडक्या बहिणी सक्षम करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रयत्न देखील करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी देखील गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडलेली आहेत.”

याच प्रमाणे अजित पवार यांनी सांगितले की, “त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची विनंती केली, तर सोयाबीन आणि कापसाला देखील जास्त दर देण्याची विनंती केलेली आहे. तसेच त्यांनी साखर एमएसपी वाढवण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला जास्तीत जास्त जागा निवडून देण्याचे प्रयत्न करावेत. असे अजित पवार यांनी जनतेला सांगितले आहे.

रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी मोहोळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसामान्य यात्रा आली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना देखील मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, “वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाणार आहे. राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना आहे. परंतु या योजना 20 बिलामुळे बंद पडतात. परंतु आता त्या योजनांसाठी आम्ही सोलर बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे सगळे वीज बिल झिरो असणार आहे.

यावेळी सुनील तटकरे यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण निघालेले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा निवडून येतील. परंतु सत्ता असो किंवा नसो तसर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणारे नेते म्हणजे राजन पाटील आहेत”

नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळावं, नाही मिळालं तर….; काँग्रेस नेते आक्रमक

Nana Patole CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे गट मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असताना आता काँग्रेसच्या बैठकीतून नाना पटोले (Nana Patole) यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं असा सूर उमटला आहे. नाना पटोले याना मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर आम्ही ते हिसकावून घेऊन असं म्हणत काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी इशारा दिला आहे. नागपुरात नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विदर्भाचे सहप्रभारी कुणाल चौधरी, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. नितीन राऊत, आ. अभिजीत वंजारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अतुल कोटेचा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विकास ठाकरे (Vikas Thackeray) म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदा सारखं महत्वाचे पद सोडून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं, मेहनत केली. आपलं घरदार सोडून ते जनतेच्या दारात गेले आणि काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस त्यांनी दाखवले. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याचा पुरस्कार नाना पटोले यांना मिळालाच पाहिजे. तो मिळाला नाही तर आम्ही विदर्भवाले तो हिसकावून घेऊ. वेळ पडली तर नाना पटोले यांच्यासाठी लढाई लढू.

दरम्यान, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं कि आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल तो हायकमांड घेईल. आमच्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या विषयापेक्षा महाराष्ट्र लुटण्याचे आणि गुजरात धार्जिणे करण्याचे काम भाजप करतंय ते विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही असं म्हणत नाना पटोले यांनी अधिक बोलणं टाळलं. तर दुसरीकडे असे काही उत्साही कार्यकर्त्ये असतात, ते काही मानण्याचे कारण नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली

Weather Update | पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा धुमाकूळ; ‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

Weather Update

Weather Update | महाराष्ट्रातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. पावसाची उघडझालं देखील चालू आहे. मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय झालेला आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. त्यामुळे सोमवारपासून म्हणजेच आज 23 सप्टेंबर पासून पुढील तीन दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

अंदमानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे..त्यामुळे महाराष्ट्र पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाल्याने आता पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडताना दिसणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र मध्ये परतीच्या पावसासाठी पोषक कसे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागांमध्ये देखील 23 सप्टेंबर नंतर पाऊस धुमाकूळ घालणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 24 सप्टेंबर रोजी रायगड, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच 25 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे पुणे, 26 सप्टेंबर रोजी नाशिक या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार आहे. तसेच या विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस उचलायला सोमवारपासून मुंबईचा इतर भागांमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये विशेषतः जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत या पावसाची रिमझिम चालूच राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.

AI म्हणजे अमेरिकन इंडियन; मोदींनी सांगितला नवा अर्थ

Narendra Modi America (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजे अमेरिकन भारतीय असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हंटल, तसेच हेच AI संपूर्ण जगाची खरी पॉवर असल्याचे प्रतिपादन मोदींनी केलं. नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम येथे अनिवासी भारतीय समुदाय आणि भारतीयांना त्यांनी संबोधित केलं. ,

आपल्या भाषणात मोदी म्हणाले, मित्रांनो, जगासाठी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, पण माझा विश्वास आहे की एआय म्हणजे अमेरिकन-भारतीय… अमेरिका भारत, हा आत्मा आहे आणि ही नवीन जगाची AI शक्ती आहे. हा AI आत्मा भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंची देत ​​आहे. मी तुम्हा सर्वांना, भारतीय डायस्पोराला सलाम करतो. मोदींच्या या वाक्यानंतर संपूर्ण परिसरात मोदी- मोदी घोषवाक्य सुरु झालं. संपूर्ण वातावरण हे मोदीमय पाहायला मिळालं.

मोदी पुढे म्हणाले, भारताला आपले वर्चस्व नको आहे, तर जगाच्या भरभराटीसाठी भूमिका बजावायची आहे. आज भारताचे परराष्ट्र धोरण सर्वांशी समान अंतर राखण्याचे नसून समान जवळीकीचे आहे. “ही युद्धाची वेळ नाही” … जागतिक शांतता प्रक्रियेला गती देण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची असेल असेही मत मोदींनी मांडलं. दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात भारताने 150 हून अधिक देशांना दिलेल्या मदतीचा संदर्भ देत मोदी म्हणाले, “जगात जेव्हाही आपत्ती आली तेव्हा भारत प्रथम मदतीसाठी सर्वात आधी धावून आला. भूकंप असो किंवा गृहयुद्ध, भारत तिथे आधी पोहोचतो.

असे म्हटले जाते की त्याग करणाऱ्यांनाच आनंद मिळतो, इतरांचे भले करून आणि त्याग करून आनंद मिळतो, आपण कोणत्याही देशात राहिलो तरी ही भावना बदलत नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात आपले योगदान अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर, संशोधक, तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही येथे फडकवलेला ध्वज हे त्याचेच प्रतीक आहे, काही काळापूर्वी येथे T-20 क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. यूएसएचा संघ अप्रतिम खेळला, त्या संघात इथे राहणाऱ्या भारतीयांचे योगदान जगाने पाहिले असेही मोदींनी म्हंटल.

RRB Non Technical Bharti 2024 | रेल्वे अंतर्गत तब्बल 3445 पदांसाठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

RRB Non Technical Bharti 2024

RRB Non Technical Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीच्या अशाच एका संधीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. रेल्वे अंतर्गत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु काही कारणास्तव ती इच्छा पूर्ण होत नाही. परंतु आज आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता रेल्वे भरती बोर्ड टेक्निकल अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती कमर्शियल कम टिकीट क्लर्क, अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क इत्यादी पदांसाठी आहे. या भरती अंतर्गत तब्बल 3445 रिक्त जागा आहे. त्यांचा रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. 20 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | RRB Non Technical Bharti 2024

  • पदाचे नाव – कमर्शियल कम टिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क
  • पदसंख्या – 3445 जागा
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
  • अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गासाठी – 500 रुपये
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी – 250 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2024
  • वेतनश्रेणी
  • कमर्शियल कम टिकीट क्लर्क – 21 हजार 700 रुपये
  • अकाउंटंट क्लर्क कम टाइपिस्ट ज्युनिअर क्लर्क कम टाईप्स ट्रेन क्लर्क – 19,900 रुपये

अर्ज कसा करावा ? | RRB Non Technical Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 20 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

Curry Leaves Farming | कढीपत्त्याची शेती करून पट्ठ्या कमावतोय लाखो रुपये; जाणून घ्या त्याची कहाणी

Curry Leaves Farming

Curry Leaves Farming | आजकाल अनेक तरुण हे नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहे. त्यातही अनेक लोक शेती हा व्यवसाय आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. शेती हा एक असा व्यवसाय आहे. तो कधीही बंद पडू शकत नाही. कारण शेतीमध्ये जर धान्य पिकवले गेले, तरच सगळेजण खाऊ शकतात. त्यामुळे शेतीत केलेली मेहनती नेहमीच कामाला येते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, बटाटा मिरचा, कढीपत्ता यांसारखे पदार्थ लागतच असतात. प्रत्येक पदार्थ करताना यातील कोणता ना कोणता पदार्थ लागत असतो. त्यामुळे बाजारात या भाज्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. तुम्ही जर या भाज्या घरच्या घरी घरीच केल्या तर चांगला नफा कमवू शकता. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. त्यांनी कढीपत्त्याची (Curry Leaves Farming) शेती करून लाख रुपये कमावलेले आहे.

सोलापूर शहरांमध्ये डोनगाव हे आहे. तिथे शेतकरी आनंद शेटे यांनी आपल्या शेतीमध्ये एक नवीन प्रयोग केला आहे.त्यांनी कढीपत्त्याची लागवड केलेली आहे. त्यांनी तब्बल तीन एकर शेतीमध्ये कढीपत्त्याची लागवड केलेली आहे आणि ते वर्षाला त्यातून लाखो रुपयांची कमाई करत आहे. आनंद शेटे हे गेल्या दहा वर्षापासून शेती करत आहेत. परंतु त्यांना कडीपत्त्याची एक नवीन कल्पना सुचली. आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये कढीपत्त्याची लागवड केली. वर्षातून जवळपास तीन वेळा ते कढीपत्त्याची छाटणी करतात आणि विक्री करतात.

कढीपत्त्याची (Curry Leaves Farming) मशागत जास्त असल्याने शेतकरी त्यातून त्याची जास्त लागवड करत नाही. परंतु तुम्ही जर कढीपत्त्याची शेती योग्य प्रकारात केली, तर त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल. याबद्दल देखील आनंद शेटे यांनी सांगितलेले आहे. आनंद शेटे हे तीन एकर बागायती कडीपत्त्याची लागवड केलेली आहे. ते दर चार महिन्यांनी कढीपत्त्याची छाटणी करतात. आणि त्यांना वेगवेगळा दर मिळतो. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कडीपत्त्याला कधी 50 रुपये 40 रुपये 35 रुपये पाच किलो असा दर मिळतो. त्यामुळे वर्षातून ते तीन ते चार लाख रुपये सहज यातून उत्पन्न कमावतात.

परंतु कढीपत्त्याची लागवड करण्याआधी जमिनीत खत टाकून खूप मशागत करावी लागते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करावी लागते. तसेच दर आठ दिवसातून एकदा त्यावर फवारणी करावी लागते. कीटकनाशक, तणनाशक फवारणी करावी लागते. त्यानंतर वर्षभर त्याची वाट पहावी लागते. परंतु एकदा कडीपत्त्याचे उत्पन्न चालू झाले की, त्यातून खूप चांगली कमाई करता येते. असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Vegetables Rate | पितृपक्षात भाज्यांचे दर वाढले, शेतकऱ्यांना होतोय फायदा

Vegetables Rate

Vegetables Rate | सध्या पितृपंधरवडा चालू झालेला आहे. आणि या पितृ पंधरवड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात. त्यामुळे बाजारात भाज्यांची मागणी वाढलेली दिसत आहे. परंतु आता भाज्यांची वाढलेली मागणी पाहता भाज्यांच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सध्या पुण्यातील बाजारामध्ये भाज्यांचे दर दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे पुढील 15 दिवस भाज्यांचे हे वाढते तर कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्रात भाज्यांच्या या दरात घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु सध्या भाज्यांचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र याचा चांगलाच फायदा होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. परंतु शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

पितृपंधरावडा सुरू झाल्यापासून भाज्यांची (Vegetables Rate) मागणी वाढलेली आहे. परंतु भाज्यांची आवक देखील कमी झालेली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसात भाज्यांची वाढ होणार आहे. पितृ पंधरवड्यात गवार, भेंडी, कारली, देठ, अळू, काकडी यांसारख्या भाज्यांच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे बाजारात आता सध्या किती दर आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

गवार 120 रुपये किलो
भेंडी – 80 रुपये किलो
कारले 80 रुपये किलो
काकडी 80 रुपये किलो
देठ 20 रुपये किलो
अळूची पाने 20 रुपये जोडी

पुण्यातील मार्केटमध्ये भाजीपाला विभागात लागणारे भाज्यांचे आभार पुणे जिल्हा आणि विभागातून होते
पाऊस नसल्यामुळे विक्रीसाठी बाजारामध्ये अनेक भाज्या देखील येत आहे. आणि त्यांचा दर्जा देखील चांगला पाहायला मिळत आहे. दरवर्षी भाज्यांचे भाव हे वाढतच असतात. या दिवसांमध्ये घरातील दिवंगत लोकांच्या नावाने नैवेद्य करून जेवण घातले जाते. ही परंपरा खूप वर्षापासून चालून झालेली आहे. यामध्ये जवळपास सगळ्याच भाज्या केल्या जातात त्यामुळे पितृपंधरावड्यात भाज्यांची मागणी वाढलेली असते.

बाजारामध्ये भाज्यांसोबत फळांची मागणी देखील वाढलेली आहे. पेरू, केळी आणि डाळिंबाची मागणी वाढलेली आहे. तसेच घाऊक आणि किरकोळ बाजारात प्रति किलो दर हा 100 ते 300 रुपये एवढा आहे. तसेच केळी 40 ते 50 रुपये डझन आहे. तसेच पेरू 20 ते 50 रुपये किलो या दराने विकले जात आहेत.