Thursday, December 25, 2025
Home Blog Page 454

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे करताना माझी चूकच झाली; गडकरी असं का म्हणाले?

महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या 2 शहरांना जोडणारा महामार्ग म्हणजे मुंबई – पुणे एक्सप्रेसवे. नितीन गडकरी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते तेव्हा या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. या मार्गाचे लोकार्पण २००२ मध्ये करण्यात आले होते. आता हा महामार्ग खूप महत्वाचा मार्ग बनला असून या मार्गावर मोठी वाहतूक होते. हा महामार्ग सध्या वाहतूक कोंडी मुळे चर्चेत आला आहे. असे असताना मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना या मार्गाबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. हा महामार्ग करताना माझी चूक झाली,असेही ते म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले, पुणे-मुंबई महामार्ग करताना माझी चूक झाली. मला तो कात्रजपासून करायचा होता. पण काही अधिकारी म्हणाले की खर्च वाढेल. अधिकारी ठराविक वय झालं की रिटायर्ड होतात. नवीन कपडा शिवन्याएवजी त्याला रफ्फू करणे ही त्यांची जिवनदृष्टी असते. त्यामुळे, वाहतूक समस्या निर्माण झाल्याचं सांगताना तो महामार्ग कात्रज ते मुंबई असा करायची कल्पना आपल्या डोक्यात होती, असेही गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. पुण्यात 899 कोटी रुपयांच्या विविध रस्तेमार्ग विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते.

तसेच, राज्य सरकारची जबाबदारी असलेले पुणे – मुंबई आणि अहमदनगरच्या पुढे दोन टोल नाके आहेत, तो रस्ता अशा दोन रस्त्यांवरील खड्डे तीन महिन्यांत बुजवले न गेल्यास हे दोन्ही रस्ते राज्य सरकारकडून काढून घेण्याचा इशाराही गडकरींनी दिला आहे.

आठ हजार कोटींना विकला रास्ता

आम्ही पुणे-मुंबई एक्सप्रेस वे बांधला, त्यानंतर कॉग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आलं. त्यानंतर एम एस आर डी सी चे मॅनेजिंग डायरेक्टर करंदीकर माझ्याकडे आले आणि म्हणाले की हा लॉस मेकींग रस्ता आहे. यावर मार्ग कसा काढायचा. मी म्हटलं आता राज्य त्यांच आहे. त्यांना मार्ग काढू दे. मग पवार साहेबांचा फोन आला की एक्सप्रेस वे तुझं अपत्य आहे. समस्या तूच सोडविली पाहिजे. मग मी जुना पुणे मुंबई हायवे एमएसआरडीसी कडे हँडओव्हर केला. पण अट अशी घातली की, या रस्त्यावरचे पूल बांधून रस्ता चांगला ठेवले पाहिजे. पण त्यांनी तो रस्ता आठ हजार कोटींना विकून टाकला आणि ते कामच करत नाहीत, असेही गडकरी यांनी पुणे-मुंबई महामार्गाबाबत म्हटले.

Kisan Rail | किसान रेल पुन्हा सुरु करण्याची खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची मागणी; शेतकऱ्यांना होणार फायदा

Kisan Rail

Kisan Rail | शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेतमाल वाहून नेण्यासाठी अनेक वेळा गाड्यांची गरज लागते. परंतु या गाड्या उपलब्ध नसल्याने अनेकवेळा शेतकरी त्यांचा शेतमाल हा रेल्वेने दुसरीकडे बाजारात नेतात. शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून नेण्यासाठी किसान रेल सुरू करण्यात आली होती. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून हे किसान रेल बंद आहेत. अशातच आता ही किसान पुन्हा एकदा सुरू करावी. अशी मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना केलेली आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते बिहार राज्यातील दानापूर किसान रेल्वे पुन्हा एकदा सुरू करावी अशी मागणी केलेली आहे. ही रेल्वे कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने सुरू केली होती. शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी त्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी ही रेल्वे सुरू करण्यात आली होती. आणि या रेल्वेला शेतकऱ्यांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. या रेल्वेचा वापर करून अनेक शेतकऱ्यांनी दिल्ली, कोलकत्ता मुजफरपूर आणि शालिमार यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक पिके नेली होती. त्यांनी डाळिंब, द्राक्ष, केळी, पेरू, कांदा, लिंबू यांसारखे भाज्या कमी वेळेत आणि कमी खर्चात वाहतूक केली होती. आणि त्यांना तिथे जाऊन चांगला नफा देखील मिळाला होता. किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी सुरू केल्यामुळे वाहतूकीचा खर्च जवळपास 75 टक्के कमी झाला होता. जर या वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 7 ते 8 रुपये खर्च येत असेल, तर रेल्वे सुरू झाल्यापासून हा वाहतूक खर्च केवळ 2.50 इतका झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे हा एक फायद्याचा पर्याय ठरला होता. परंतु ही किसान रेल्वे बंद झाल्याने शेतकऱ्यांसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे ही किसान रेल (Kisan Rail) लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. यामुळे वस्त्रोद्योगाला आणि कृषी उत्पादना देखील चालना मिळणार आहे तसेच सोलापूरमधील वस्त्रोद्योगाला टर्मिनल मुळे जागतिक बाजारपेठांमध्ये संधी मिळणार आहे. या बाजारपेठेमध्ये प्रभावी आणि जलद गतीने वाहतूक करता येईल आणि शेतकऱ्यांचा खर्च देखील कमी होईल.

पुण्यात नव्याने उभारणार विमानतळ; देवेंद्र फडणवीसांनी केले नाव जाहीर

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने यावर्षी राज्यात विविध प्रकल्प सुरू केलेले आहेत. नागरिकांच्या भविष्याचा विचार करता अगदी सोयीस्कर होईल, अशा प्रकल्पांची सध्या उभारणी होत आहे. अशातच पुणे शहरांमध्ये एक नव्याने विमानतळ उभारण्यात येणार आहे. पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे. पुण्यामध्ये देखील विविध प्रकल्प चालू आहेत. आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “पुण्यामध्ये नव्याने विमानतळ उभारण्यात येणार आहे. मी मुरलीधर अण्णा यांचे विशेष कौतुक करतो. त्यांनी चांगली संकल्पना मांडली. या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव द्याव ही संकल्पना होती. त्यामुळे आता पुढील टप्प्यात नामकरणाचा हा प्रस्ताव राज्य मंडळाच्या बैठकीत मांडणार आहे. आणि त्यानंतर मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवू तसेच हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि गडकरी यांनी घ्यावी” असे देखील त्यांनी सांगितले आहे.

यावेळी अनेक दिग्गज नेते तिथे उभे होते अनेकांची भाषणे देखील झाली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील भाषण केले. त्यांच्या म्हणण्यानुसार मागील दहा वर्षाच्या काळात नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात खूप प्रकल्प आणलेले आहेत. तसेच पुणे शहरातील सगळ्यात मोठे काम म्हणजे चांदणी चौकाच्या कामासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज चौकातील उड्डाणपूल यासाठी 170 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोकणात जाणाऱ्या रस्त्यांसाठी देखील 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या पर्यायी रस्त्याचा अवलंब केल्यावर पुणे शहरातील वाहतूक देखील कमी होईल आणि पर्यायाने प्रदूषण कमी होईल.

त्याचप्रमाणे आत्ता रस्ता बांधकामाच्या कामाला खूप जास्त वेग आलेला आहे. 2014 त्याच्या आधी 12 किलोमीटर रस्ते दर दिवसाला तयार होत होत. परंतु मागील दहा वर्षात यात खूप प्रगती झालेली आहे. आणि दर दिवसाला 28 किलोमीटरची कामे होतात. तसेच हायवेचा नेटवर्क देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जवळपास 60% हायवेच्या नेटवर्क झालेले आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गडकरींनी लक्ष द्यावे. असे देखील मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भाषण केले आहे. त्यांनी पुण्यामध्ये होणाऱ्या नवीन विमानतळाचा उल्लेख केला. तसेच या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव दिले जाणार आहे. हे देखील सांगितले आहे. तसेच हा प्रस्ताव ते केंद्र सरकारकडे देखील घेऊन जाणार आहे असे गडकरींनी सांगितलेले आहे.

BMC Lipik Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

BMC Lipik Bharti 2024

BMC Lipik Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही असेच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. याचा फायदा अनेक तरुणांना होणार आहे. अनेक लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु मुंबई शहरांमध्ये नोकरी करणे सगळ्यांना शक्य होत नाही. परंतु त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबई महानगरपालिका अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक (BMC Lipik Bharti 2024 ) या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 1845 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 11 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

पदाचे नाव | BMC Lipik Bharti 2024

या भरती अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

लिपिक या पदाच्या तब्बल 1845 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 43 दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या व प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये एवढी फी आहे, तर आरक्षित वर्ग यासाठी 900 रुपये एवढी फी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला महिन्याला 25 हजार 500 ते 81 हजार 100 एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा ? | BMC Lipik Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 11 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

Viral Video | नवऱ्याने मुलीसोबत काढली सेल्फी; नवरीने रागात भर लग्नात केले असे कृत्य

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ गमतीशीर असतात, तर काही व्हिडिओ आपल्याला खूप सारे ज्ञान देऊन जातात. लग्ना संबंधित अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नात घडणारे मजेदार प्रसंग इंटरनेटवर लोक देखील मोठ्या आवडीने पाहत असतात. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती देखील दिली जाते. अशातच एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नुकतेच लग्न झालेल्या एका वधूला इतका त्रास झाला की, तिने जे काही केले ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

सोशल मीडियावर अनेक कार्य हे असे प्रँक व्हिडिओ (Viral Video) देखील बनवत असतात. जेणेकरून लोकांचे चांगले मनोरंजन होईल आणि त्यांना चांगले व्यवस्थित कधी कधी आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो. परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात कॉमेडी देखील केली जाते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न झाल्यानंतर वर आणि वधू स्टेजवर बसलेले असतात. त्यावेळी एक मुलगी स्टेजवर येते आणि नवरदेवा सोबत फोटो काढू लागते. त्यानंतर त्याच्या शेजारी बसलेली त्याची वधू खूप चिड.ते आणि ती थेट तिच्या नवऱ्याला कानशिलात मारते. त्या नवरीने केलेल्या या कृत्याबद्दल सगळेच खूपच थक्क होतात. आणि ती मुलगी देखील पाहतच राहते. काहीच सिरीयस आणि कॉमेडी प्रकारात हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक लोक या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/reel/DAEBDP3JeVa/?utm_source=ig_embed&ig_rid=cc5febb8-8a2a-4a5c-aedb-f44388e1fa3e

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक जोरदार कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “बरोबर, वाईट वागणाऱ्या लोकांसोबत असेच व्हायला हवे.” त्याचवेळी दुसरा वापरकर्ता म्हणतो, दीदी, हे ओव्हर ॲक्टिंगचे दुकान आहे असे वाटते. दुसऱ्या युजरने लिहिले की, हे मला खोटे वाटते. वराचे वय पहा. दोन्ही मुलींपेक्षा लहान दिसते. आणखी एका यूजरने कमेंट केली, बाबू भैया काहीतरी गडबड आहे, कारण कोणतीही वधू असे करत नाही.

Vanchit Bahujan Aghadi : विधानसभेसाठी वंचितकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर; पहा कोणाकोणाला संधी?

Vanchit Bahujan Aghadi candidates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) सर्वात आधी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. वंचितकडून सुरुवातीच्या टप्प्यात ११ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती जागावाटपाच्या फेऱ्यात अडकली असताना वंचितने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत खरोखरच आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली.

कोणकोणत्या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर ?

वंचित बहुजन आघाडीने ज्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी आम्ही विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही पैशाचा महापूर बघितला होता. आता विधानसभा निवडणुकीत महापुराचा महापूर येईल असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.

अशी आहे वंचितच्या उमेदवारांची यादी-

रावेर – शमिभा पाटील
सिंधखेड राजा – सविता मुंडे
वाशीम – मेघा डोंगरे
धामगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
नागपूर साऊथ वेस्ट – विनय भांगे
डॉ. आविनाश नन्हे – साकोली
फारुख अहमद – दक्षिन नन्हे
शिवा नरांगळे -लोहा
विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)
किसन चव्हाण – शेवगाव
संग्राम माने – खानापूर

खुशखबर ! पुण्याहून ‘या’ शहरासाठी धावणार विशेष रेल्वे

दसरा -दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने अनेकजण आपल्या आप्तेष्टांना भेटण्यासाठी आपल्या गावी जात असतात. अशा काळात अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाकडून पुण्याहून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती…

पुणे ते करीमनगर विशेष रेल्वे

अतिरिक्त गर्दीचा विचार करून रेल्वे विभागाने पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. ही विशेष रेल्वे पुणे ते करीमनगर दरम्यान धावणार आहे. या एक्सप्रेस ट्रेन मुळे पुणेकरांना तसेच पुण्याहुन मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. चला जाणून घेऊया वेळापत्रक

काय असेल वेळापत्रक ?

पुणे-करिमनगर-पुणे (०१४५१/५२) या विशेष साप्ताहिक रेल्वेच्या ८ फेऱ्या होणार आहेत. पुणे ते करीमनगर अशा चार आणि करीमनगर ते पुणे अशा चार फेऱ्या होणार आहेत. पुणे-करिमनगर ही रेल्वे २१ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर अन ११ नोव्हेंबरला पुणे येथून रवाना होणार आहे. ही गाडी या दिवशी रात्री १०.४५ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वरून रवाना होईल आणि करिमनगर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता पोहचणार आहे. परतीच्या प्रवासात ही विशेष एक्सप्रेस 23 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला करीमनगर येथून रवाना होणार आहे. ही विशेष रेल्वे करीमनगर येथून रवाना झाल्यानंतर पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता पोहोचणार आहे.

मराठवाड्याच्या प्रवाशांना होणार फायदा

ही विशेष एक्सप्रेस ट्रेन मराठवाड्यातील नांदेड रेल्वे रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार आहे. त्यामुळे पुण्यावरून मराठवाड्यात जाणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय नांदेडसहित संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला या ट्रेनमुळे जलद गतीने पुण्यात पोहोचता येणार आहे.

BSNL ला मिळाले 29 लाख नवे ग्राहक; Airtel-Jio ला दणका

BSNL Customers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel-Jio सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ केल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसला. रिचार्जच्या किमती खिशाच्या बाहेर जाऊ लागल्याने अनेक ग्राहकांनी आपला मोर्चा देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडे वळवला. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त असल्याने अनेकांनी आपलं जून सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केलं तर काही यूजर्सनी नवीन बीएसएनल सिमकार्ड घेतलं. या परिणाम म्हणजे जुलै महिन्यात जिओ, एअरटेल आणि वीआय या कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. तर, बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत वाढ झाली आहे. जुलै मध्ये बीएसएनएलला तब्बल 29 लाख नवे ग्राहक मिळाले. कंपनीसाठी हि सर्वात मोठी उपलब्धी असून एअरटेल आणि जिओ साठी हा मोठा दणका आहे.

न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार ट्रायच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार जुलै महिन्यात जिओचे ग्राहक 7.58 लाखांनी कमी झाले आणि व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या 14.1 लाखांनी कमी झाली आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांपेक्षा सर्वात जास्त तोटा एअरटेलला सोसावा लागला आहे. कारण जुलैमध्ये एअरटेलने सर्वाधिक 16.9 लाख ग्राहक गमावले आहेत. या सर्व गोष्टींचा फायदा हा ऑटोमॅटिकच बीएसएनएलला झाला. या काळात BSNL ला तब्बल 29 लाख नवे ग्राहक मिळाले. कंपनीसाठी हा एकप्रकारे मोठा रेकॉर्ड आहे.

दरम्यान, ग्राहकांची वाढती मागणी पाहता बीएसएनएल सुद्धा आपलं नेटवर्क आणखी वाढवण्यावर भर देत आहे. बीएसएनएल लवकरच संपूर्ण देशात 4G सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. तसेच देशभरात १ लाख बीएसएनएल टॉवर उभारण्याची सुद्धा कंपनीची योजना आहे. BSNL हे येत्या काही वर्षांमध्येच 4G नेटवर्क सविस्तर सर्वत्र करणार आहे. 2025 च्या मध्यापर्यंत BSNL चे जवळपास एक लाख नवीन 4G टॉवर्स बसवले जाणार आहेत. तसेच या देशातील 25000 गावे याद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे गावांमध्ये देखील दूरसंचार सुविधा आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. अजूनही अनेक गावांमध्ये BSNL ची सुविधा उपलब्ध नाही. परंतु 2025 च्या मध्यापर्यंत सर्वत्र ही सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

Balaji Prasad Controversy : बालाजीच्या लाडूत चरबीचा वापर कधीपासून?? पुजाऱ्यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Balaji Prasad Controversy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिरुपती बालाजीच्या प्रसादात (Balaji Prasad Controversy) प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल. त्यानंतर टीडीपीच्या नेत्यांनी गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने सादर केलेला रिपोर्ट सुद्धा दाखवला. आता तर तिरुमला तिरुपती मंदिराचे माजी मुख्य पुजारी रमण दीक्षाथालू यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. बालाजीच्या प्रसादाच्या लाडू मध्ये भेसळ होत आहे अशी शंका मला आधीपासूनच होती, मी त्याबद्दल तक्रारही केली होती, पण कोणीही लक्ष दिले नाही. असं रमण दीक्षाथालू यांनी सांगितलं.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रमण दीक्षाथालू म्हणाले, काही वर्षांपूर्वी मला हे लाडू बनवताना तुपात भेसळ झाल्याचे लक्षात आले होते. याबाबत मी संबंधित अधिकारी आणि देवस्थानच्या प्रमुखांकडे तक्रारही केली होती, पण कोणीही माझ्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या नवीन सरकारने या सर्व गोष्टी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते झाले नाही. ते सरकारी डेअरींमधून तूप विकत घ्यायचे आणि त्याच तुपापासून ते तयार करायचे. गेल्या ५ वर्षांपासून तिरुपती लाडूमध्ये (Balaji Prasad Controversy) प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल मिसळण्याचे घोर पाप करत आहेत. आता हे महापाप पुन्हा होऊ नये हे ठरवावे लागेल.

रिपोर्टमध्ये काय म्हंटलयं? Balaji Prasad Controversy

टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेचा रिपोर्ट सर्वांसमोर सादर केला. या रिपोर्टमध्ये तुपाच्या नमुन्यात “बीफ फॅट” असल्याची पुष्टी झाली आहे. कथित प्रयोगशाळेच्या अहवालात नमुन्यांमध्ये “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलचाही दावा करण्यात आला आहे. नमुने स्वीकारण्याची तारीख ९ जुलै २०२४ होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलै चा होता. वेंकट रमण रेड्डी यांनी या रिपोर्टची प्रतही शार केली आहे. या एकूण सर्व प्रकरणामुळे संपूर्ण देशातील वातावरण गरम झालं आहे.

दरम्यान, मध्यंतरी अमूल कंपनीचे नाव पण या प्रकरणात घेतलं जात होते. परंत्तू कंपनीने लागलीच एक परिपत्रक काढून याबाबत स्पष्टीकरण दिले. तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirupati Balaji) ला अमूल तूप पुरवले जात असल्याचा उल्लेख करणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात येतआहे. आम्ही हे कळवू इच्छितो की आम्ही कधीही TTD ला अमूल तूप पुरवठा केला नाही. आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितो की अमूल तूप आमच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये दुधापासून बनवले जाते जे ISO प्रमाणित आहेत. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या डेअरीमध्ये मिळणारे दूध FSSAI द्वारे निर्दिष्ट केल्यानुसार भेसळ शोधण्यासह कडक गुणवत्ता तपासणीतून जाते.

Viral Video | टायर विकत घेण्याआधी हा व्हिडीओ नक्की पाहा; अशाप्रकारे केली जाते फसवणूक

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल मीडियाचा वापर प्रत्येकजण करत असतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या एका क्लिकवर संपूर्ण जगात काय घडलेली आहे. याची माहिती मिळते. सुरुवातीच्या काळात अगदी देशातील तसेच विदेशातील माहिती मिळण्यासाठी आपल्याला न्यूज पेपर विकत घ्यावा लागत होता. परंतु आता सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे. तुम्ही अगदी घरबसल्या काहीही न करता तुम्हाला संपूर्ण माहिती हातात मिळते. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनाचे असतात तर काही व्हिडिओमुळे आपल्याला खूप चांगली माहिती मिळते. तसेच समाजात चाललेल्या गोष्टींची माहिती देखील मिळते.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, लोक कशा पद्धतीने तुमची फसवणूक करतात. आजकाल अनेक लोक हे सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करतात. कारण सेकंड हॅन्ड गाडीची किंमत कमी असते. त्यामुळे सेकंड गाडीचे मार्केट सध्या वाढलेले आहे. परंतु आज काल सेकंड हॅन्ड टायर देखील विकले जातात. साधारणपणे आपण एका टायरची किंमत 5 ते 6 हजार रुपयापर्यंत असते. परंतु काही गॅरेजमध्ये अगदी 1000 ते 1200 रुपयांपर्यंत मिळतो. अगदी कमी किमतीत नवीन टायर मिळाल्याने आपल्याला देखील आनंद होतो. परंतु हे कमी किमतीत घेतलेले टायर्स कितपत सुरक्षित आहे? यामुळे आपल्या जीवाला काही धोका तर निर्माण होणार नाही ना? या गोष्टीचा विचार अनेक लोक करत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video ) टाकाऊ टायर्सचे नवीन टायरमध्ये रूपांतर केले आहे. त्याची संपूर्ण निर्मिती या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला जुना टायर कोणता आणि नवीन टायर कोणता ओळखणे देखील शक्य होणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जुना टायर कापून त्याला डिझाईन करत आहे. नवीन टायर बनवत आहे.यानंतर दुसरा व्यक्ती टायर पॉलिश करत आहे. आणि अगदी नव्या सारखा करत आहे. नवीन असल्यासारखे प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळून ठेवतात. तसेच ग्राहकांना हे टायर अगदी नवीन आहेत. असे सांगून विकले देखील जातात. परंतु असे टायर वापरणे हे तुमच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक आहे.

हा व्हिडिओ एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेले आहे की, “अधिकृत डीलर्सकडून नेहमी टायर खरेदी करा. पैसे वाचवण्याच्या नादात तुम्ही तुमचा जीव ही गमावू शकता.” या व्हिडिओला अनेक लोकांनी लाईक केलेले आहेत आणि अनेक कमेंट देखील आलेल्या आहेत. तसेच फसवणुकीपासून सावधान राहण्याचा सल्ला या व्हिडिओ पाहून दिला जात आहे