Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 460

IND vs Ban Test 2024 : रोहित- विराट 6 धावा, गिलला भोपळा; अखेर पंत- यशस्वीने सावरलं

IND vs Ban Test 2024 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs Ban Test 2024) आजपासून सुरुवात झाली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तासाभराच्या खेळातच कर्णधाराचा हा निर्णय बांग्लादेशच्या गोलंदाजांनी खरा करून दाखवला. कारण रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल हे ३ फलंदाज एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले आहेत. त्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने संघाचा डाव सावरला आहे. लंच पर्यंत भारताने ३ बाद ८८ धावा केल्यात. बांगलादेश कडून हसन मोहमदने तिन्ही विकेट घेतल्यात.

हसन मोहंमद ठरला हिरो – IND vs Ban Test 2024

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने डावाची सुरुवात केली, मात्र कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात सपशेल अपयशी ठरला. रोहित केवळ 6 धावा करुन बाद झाला त्यात त्याने एक चौकार ठोकला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शुभमन गिल कडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याला भोपळाही फोडता आला आहे. हसन मोहमदच्या गोलंदाजीवर विकेटकिपर लिटन दासच्या हातात झेल देऊन गिल शून्यावरच बाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहलीची साजेशी खेळी करू शकला नाही. रोहित प्रमाणे त्यानेही फक्त ६ चा धावा केल्या आणि हसन महमूदने त्याला बाद करत आपली तिसरी शिकार केली. IND vs Ban Test 2024

सुरुवातीलाच बसलेल्या या धक्क्यांमुळे टीम इंडियाची अवस्था एकवेळ ३४-३ अशी होती. मात्र अशावेळी सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि पाचव्या क्रमांकावर आलेला विकेटकिपर फलंदाज रिषभ पंत यांनी अधिक पडझड न होइउ देता धावफलक हलता ठेवला. यशस्वी जैस्वाल ६८ चेंडूत ३७ धावांवर खेळत आहे तर रिषभ पंत ४८ चेंडूत ३४ धावांवर खेळत आहे.

हा काय प्रकार…? ट्रेन उलट्या दिशेने अर्धा तास धावत होती आणि ड्रायव्हरला कळलंच नाही

train accident

भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेट्वर्कस पैकी एक आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. आरामदायी आणि वेगवान प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाकडे पहिले जाते. मात्र मागच्या काही दिवसांपासून रेल्वे विभागाला एका मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ते म्हणजे रेल्वेचे वारंवार होणारे अपघात. नुकत्याच मिळलेल्या माहितीनुसार कोलकत्ता हून अमृतसर कडे जाणारी ट्रेन सुदैवानं दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचली आहे.

नक्की काय घडलं ?

त्याचं झालं असं की ही ट्रेन सुमारे अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटांपर्यंत उलट दिशेने धावत राहिली. ही ट्रेन जालंधर स्टेशन पासून उलट दिशेने धावत राहिली आणि त्यानंतर नकोरडा जंक्शन इथे पोहोचल्यानंतर ट्रेन चुकीच्या पद्धतीने धावत असल्याची ड्रायव्हरला माहिती झाली. त्यानंतर मात्र इंजिन बदलून ट्रेन परत मार्गावर आणण्यात आली. ट्रेन उलट्या पद्धतीने धावत आहे हे ड्रायव्हरला जरी कळालं नसलं तरी प्रवाशांना मात्र याची जाणीव होती आणि प्रवासी मात्र जीव मुठीत घेऊन बसले होते. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर या घटनेबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत. मात्र सुदैवानं मोठी दुर्घटना टळल्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून वारंवार ट्रेन दुर्घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच वृंदावन रेल्वे स्टेशन पासून सुमारे 800 मीटर पुढे एका मालगडीचे 25 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर बिहार मधील मुजफ्फरपुर मध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती मात्र या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Bachchu Kadu : योजना काय देताय? त्यापेक्षा आमच्या कांद्याला भाव द्या; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

Bachchu Kadu On Onion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. तुम्ही आम्हाला योजना काय देताय? त्यापेक्षा आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी उमराणा येथील जाहीर सभेत बोलताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

बच्चू कडू म्हणाले, जेव्हा शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार, आमदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार आहे, तुम्ही आम्हाला रडवलं आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत. काँग्रेस आणि भाजपने निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था आम्ही उखडून फेकणार आहोत. तुम्ही काय आम्हाला योजना देतात, आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका केली.

यावेळी बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या २ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये चांदवड -देवळा मतदार संघातून गणेश निंबाळकर तर निफाडमधून गुरुदेव कांदे यांची प्रहारकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपण जीवाचे रान करून आपल्या विचाराचे आमदार निवडून आणावे, असं आवाहन बच्चू कडू यांनी उपस्थित जनतेला केलं.

दरम्यान, नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केली असता बच्चू कडू यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी कांदा खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत लक्ष घालण्याची मागणी करत लक्ष द्या, अन्यथा तुमच्या गाडीवर कांदा फेकत थोबाड लाल करण्याचे आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला.

Mumbai Pune Expressway : आता अटल सेतूवरून थेट सातारा -सोलापूर गाठता येणार ; बनणार नवा महामार्ग

mumbai pune expressway

Mumbai Pune Expressway : राज्यातील महत्वाच्या महामार्गांपैकी मुंबई – पुणे एक्सप्रेसवे अतिशय महत्वाचा मार्ग मनाला जातो. दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग व्यापार , उद्योग आणि कर्मचारी वर्गासाठीच सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी अनेकदा या मार्गावर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी (Mumbai Pune Expressway) शासनाकडून सुद्धा मोठे प्रयत्न केले जात आहेत.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील (एनएचआय) अधिकाऱ्यांकडून एका मराठी माध्यमाला मिळालेल्या माहितीनुसार लवकरच अटल सेतू आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. यामुळे केवळ कनेक्टिव्हिटी वाढणार नसून मुंबई ते पुणे हे अंतर कमी वेळेत कापले जाणार आहे.

मुंबई – पुणे प्रवासात दीड तासांची बचत (Mumbai Pune Expressway)

या नव्या महामार्गासाठी तब्बल 17000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे नव्या महामार्गामुळे अटल सेतूवरून थेट सोलापूर आणि सातारासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी सुद्धा आणखी कमी होणार आहे त्यामुळे नव्या महामार्गामुळे मुंबई ते पुणे साठी लागणाऱ्या सध्याच्या वेळेत सव्वा ते दीड तासांची बचत होणार आहे त्यामुळे आगामी काळात हा शिग्रसंचार द्रुतगती महामार्ग गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

कसा असेल नवा मार्ग ? (Mumbai Pune Expressway)

  • प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे सातारा, सोलापूरला सोडलं जाईल.
  • तब्बल 130 किलोमीटर लांबीचा हा शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग चौक पुणे शिवारे जंक्शन असा असेल.
  • या मार्गावर वेगवान प्रवासासाठी एकूण 8 लेन असतील.
  • या रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल 17500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  • सध्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या महामार्गाची रूपरेषा तयार केली जात आहे.

कोंडी फोडण्यासाठी तयार होतोय मिसिंग लेन

मुंबई पुणे महामार्गावरील कोंडी सोडण्यासाठी लोणावळा परिसरात मिसिंग लेन तयार केली जात आहे. मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी कमी करणाऱ्या या मिसिंग लेनचे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून भविष्यातही सुविधाही अपुरी पडण्याची शक्यता (Mumbai Pune Expressway) आहे. म्हणूनच अटल सेतू शिघ्नसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात आल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

Infinix ZERO 40 5G : 108MP कॅमेरासह भारतात लाँच झाला नवा 5G मोबाईल; किंमतही तुमच्या बजेटमध्ये

Infinix ZERO 40 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर मित्रानो, हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. भारतीय बाजारात 108MP चाय दमदार कॅमेरसह नवा मोबाईल लाँच झाला आहे. Infinix ZERO 40 5G असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा तुम्हाला परवडेल अशीच आहे. चला तर मग आज आपण या नव्या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात….

6.74 इंचाचा डिस्प्ले –

Infinix ZERO 40 5G मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा कर्व्ह AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 1080 x 2460 पिक्सेल रिझोल्युशन आणि 1300 nits पीक ब्राइटनेस मिळतो. डिस्प्लेचाय संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आली आहे. इनफिनिक्सने आपल्या या नव्या 5G मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate 5G प्रोसेसर बसवला असून Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतोय. स्मार्टफोनला IP54 रेटिंग मिळालं आहे त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही धोका नाही.

कॅमेरा – Infinix ZERO 40 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Infinix ZERO 40 5G मध्ये पाठीमागील बाजूला 108MP रियर कॅमेरा आहे, तसेच स्मार्टफोनमध्ये 50 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 MP डेप्थ सेन्सर देखील आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. अन्य फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी टाइप-सी ऑडिओ, स्टिरिओ स्पीकसारखे फीचर्स मिळतात. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5 हजार mAh ची बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45 वॅट वायर्ड आणि 20 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Infinix Zero 40 5G च्या 12GB + 256GB मॉडेलची किंमत 27,999 रुपये आहे तर 12GB + 512GB मॉडेलची किंमत 30,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन वायलेट, टायटॅनियम आणि रॉक ब्लॅक रंगांमध्ये लाँच करण्यात आला असून 21 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकता.

Semiconductor Project In Maharashtra : महाराष्ट्रातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत सुरु; 4000 जणांना नोकऱ्या मिळणार

Semiconductor Project In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासाठी आणि राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रतील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प (Semiconductor Project In Maharashtra) नवी मुंबईतील महापे MIDC येथे सुरु झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, मुंबई पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख कृष्ण प्रकाश, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोडणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

4 हजार नोक-या उपलब्ध होणार – Semiconductor Project In Maharashtra

IRP इलेक्ट्रॉनिक कंपनीचा हा प्रकल्प आहे. हा देशातील सर्वात मोठा सेमी कंडक्टर प्रकल्प (Semiconductor Project In Maharashtra) आहे. यातून राज्यात 2 टप्प्यांत मिळून तब्बल 36 हजार 573 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटी आणि त्यानंतर २४ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 हजार नोक-या उपलब्ध होणार आहेत. IRP हा मराठी उद्योजकाचा महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं बनवणारा अग्रगण्य समूह असून, या प्रकल्पांतर्गत इस्त्रायल आणि स्पेनमधील कंपन्यांचाही सहभाग आहे. या नव्या सेमी कंडक्टर प्रकल्पामुळे नवी मुंबईत रोजगाराच्या संधी येत्या काळात नक्कीच वाढतील.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. लाडकी बहीण योजना यशस्वी करुन दाखविली. इतर योजनाही यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. विविध प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने जलद गतीने कामे सुरु आहेत. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई मधील दोन तासाचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांवर आले आहे. महाराष्ट्रात बदल घडविणारे प्रकल्प आम्ही साकार करीत आहोत. राज्य शासनाने दाओसमध्ये पाच लाख करोडच्या उद्योग करारांवर सह्या केल्या आहेत. लोकांच्या हातांना निश्चित काम मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर युनिटमध्ये 400 लोकांना काम मिळणार आहे. या माध्यमातून अडॅव्हान्स टेक्नोलॉजी आपल्या राज्यात येत आहे. हे शासन सर्वांसाठी आहे. उद्योजकांना सबसीडी देण्यात येत आहे. आतापर्यंत मोठे उद्योग महाराष्ट्रात आले आहेत, आणखी येत आहेत.

Tirupati Balaji : तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? नव्या आरोपाने खळबळ

Tirupati Balaji Prasad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील तिरुमाला पर्वतावर वसलेलं तिरुपती बालाजी मंदिर 9Tirupati Balaji) हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो करोड भक्त व्येंकटेश्वर बालाजीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. मात्र आता याच बालाजीच्या प्रसादावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात येत होता असा थेट आरोप एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली – Tirupati Balaji

चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएच्या बैठकीत सांगितले की, मागील वायएसआर काँग्रेस सरकारने तिरुमलाच्या पावित्र्याला हानी पोहोचवली होती. वायएसआर काँग्रेस सरकारने प्रसादाचा दर्जाच कमी केला नाही तर लाडूंमध्येही भेसळ केली. तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Balaji) लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला. मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असल्याचंही चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं आहे. मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आलं आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे, असं देखील चंद्राबाबूं नायडूंनी सांगितलं.

या दाव्यानंतर आंध्र प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तसेच चंद्राबाबूंच्या या नव्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे. वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंचा हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडूंचे आरोप दुर्भावनापूर्ण असल्याचे सांगत नायडूंवर निशाणा साधला चंद्राबाबू नायडू तिरुमलाच्या पावित्र्याला हानी पोहोचवत आहेत. नायडू कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवत आहेत. चंद्राबाबू नायडू केवळ राजकीय फायद्यासाठी असे निराधार आरोप करत आहेत. ते खरे बोलत असतील तर त्यांनी कुटुंबासह तिरुमला येथे जाऊन शपथ घ्यावी, असे आव्हान त्यांनी नायडूंना दिले

अजित पवार सोडून गेल्याने अस्वस्थता वाटली, पण मजबुतीने उभं राहायचं असत

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सत्तास्थापन केली, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळवण्यात त्यांना यश आलं. या एकूण सर्व घडामोडींना आता वर्षभरातून अधिक काळ लोटला आहे. मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) या एकूण राजकीय परिस्थितीवर प्रथमच जाहीरपणे भाष्य करत म्हंटल कि, अजित पवार सोडून गेल्याने अस्वस्थता वाटली, पण चिंता करायची नसते. मजबुतीने उभं राहायचं असत. जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवारांनी (Ajit Pawar) साथ सोडल्यानं धक्का बसला नाही पण त्यावेळी अस्वस्थता वाटली. अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत विधिमंडळातील 25-30 सभासद गेले. अनेकांच्या निवडणुकीच्या यशासाठी तिथं गेलो असेन, त्यांच्यासाठी भाषणं केली असतील. गेल्या पाच दहा वर्षात त्यांना ग्रुम केलं असेल, अजित पवार त्याच्यातील एक घटक होते असं शरद पवार म्हणाले. हे लोक सोडून जातात, विधिमंडळात ज्यांच्या विरुद्ध ते निवडून आले. ज्या भूमिकेला त्यांनी विरोध केला, तिच भूमिका घेऊन ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्याच दारात बसले त्यामुळं अस्वस्थता वाटते. लोकांना जी कमिटमेंट केलेली आहेत, त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नाहीत, त्यामुळं अस्वस्थता असते.

शरद पवार पुढे म्हणाले, अस्वस्थता असली तरी त्याची चिंता करायची नसते, शेवटी मजबुतीनं उभं राहायचं असते, हिम्मत दाखवायची असते, लोकांना विश्वास दाखवायचा असतो. लोक आमच्यापेक्षा शहाणे असतात, ते कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे याच विचार करून लोक निर्णय घेतात. माझ्या पुस्तकाचं नाव देखील लोक माझे सांगाती आहे, लोकांवर विश्वास दाखवायचा असतो, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी सुद्धा भाजपची सत्ता होती तेव्हा त्यांना बहि‍णींचं दु:ख दिसलं नाही. आज आपण रोजचं वर्तमान पत्र बघितलं तर स्त्रीयांवर अत्याचार ही बातमी नित्याचीच झालेली आहे आणि ती क्लेशदायक आहे. खऱ्या अर्थानं बहि‍णींना सुरक्षेची सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दलची आस्था दाखवत नाही, महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, असं शरद पवार म्हणाले. तसेच समाजात बहि‍णींच्या घरात बेकारी, महागाई, स्त्रीयांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे असेही पवारांनी म्हंटल.

Pune Metro : गणेशोत्सव काळात पुणेकरांची मेट्रोला पसंती ; 20 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

pune metro

Pune Metro : राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुणे आता झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येऊन वसले आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी पुण्याच्या वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्यातही सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस आणि मेट्रो हे दोन्ही घटक महत्वाची भूमिका बजावत आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी देखील मेट्रोला चांगली प्रवासी संख्या (Pune Metro) मिळाल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गणेश विसर्जनाच्या दिवशी, मंगळवारी (दि. 17) तब्बल तीन लाख 46 हजार 663 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. ही प्रवासी संख्या मेट्रोची आजवरची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. विशेष गोष्ट म्हणजे यातून मेट्रोला 54 लाख 92 हजार 412 रुपये उत्पन्न मिळाले.पुण्यातील गणेशोत्सव अधिक लोकप्रिय आहे. गणेशोत्सव कालावधीत पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक आले. भाविक प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रो कडून अधिक फेऱ्या सोडल्या. सात सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत या फेऱ्या वाढविण्यात (Pune Metro) आल्या होत्या.

अनंत चतुर्दशीला 24 तास सुरु राहिली मेट्रो

नियमित दिवशी मेट्रो सेवा रात्री दहा वाजता बंद होते. मात्र गणेशोत्सव कालावधीत ही सेवा वाढवली होती. सात ते नऊ सप्टेंबर या कालावधीत मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू होती. तर 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत मेट्रो सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत 24 तास मेट्रो (Pune Metro) सुरू राहिली.

गणेशोत्सव काळात 20 लाख प्रवाशांनी मेट्रोने केला प्रवास

पिंपरी ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर प्रवाशांनी मंगळवारी प्रचंड प्रतिसाद दिला. मंगळवारी सकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तब्बल तीन लाख 46 हजार 633 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. हा आजवरच्या दैनिक प्रवासी संख्येचा उच्चांक ठरला. यापूर्वी 14 सप्टेंबर 2024 रोजी दोन लाख 43 हजार 435 प्रवासी संख्येचा उच्चांक होता. गणेश भक्तांनी मेट्रोला पसंती देत यापूर्वीचा दैनिक प्रवासी संख्येचा उच्चांक मोडीत काढला आहे. गणेश उत्सव काळात (7 ते 17 सप्टेंबर) पुणे मेट्रोने 20 लाख 44 हजार 342 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला तीन कोटी पाच लाख 81 हजार 59 रुपये उत्पन्न (Pune Metro) मिळाले.

गणेश उत्सव काळात मेट्रोची प्रवासी संख्या आणि मिळालेले उत्पन्न

प्रवसी संख्या उत्पन्न (रुपयांमध्ये)
7 सप्टेंबर – 117723 1446150

8 सप्टेंबर – 148710 1845220

9 सप्टेंबर – 150042 2502552

10 सप्टेंबर – 149426 2470265

11 सप्टेंबर – 150685 2513825

12 सप्टेंबर – 168564 2788832

13 सप्टेंबर – 176946 2943133

14 सप्टेंबर – 243435 2973589

15 सप्टेंबर – 225644 2795432

16 सप्टेंबर – 166534 2809649

17 सप्टेंबर – 346633 5492412

भारतीय रेल्वेने सुरू केली ‘स्वच्छता ही सेवा मोहीम’, 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार उपक्रम

मंगळवार 17 सप्टेंबर रोजी वी दिल्ली येथील रेल भवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित समारंभात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ सुरू केले रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सतीश कुमार यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात केली. कार्यक्रमादरम्यान कुमार यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितले की चॅम्पियन स्वच्छतेची शपथ. या वर्षी स्वच्छता ही सेवा मोहिमेची थीम ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ आहे. या मोहिमेचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत दिवस’ या कार्यक्रमाने होणार आहे.

कार्यक्रमादरम्यान, कुमार यांनी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये – घरे, कार्यस्थळे, समुदाय आणि संपूर्ण देशामध्ये स्वच्छता राखण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी गांधींच्या व्यापक दृष्टीचे प्रतिबिंबित केले, ज्याने स्वच्छ आणि समृद्ध भारताचा समावेश करण्यासाठी राजकीय स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊन विचार केला.


“महात्मा गांधींनी अशा राष्ट्राची कल्पना केली जी केवळ राजकीयदृष्ट्या मुक्तच नाही तर स्वच्छ आणि विकसितही होती. त्यांनी भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त केले आणि आता गलिच्छता नष्ट करून देशाची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. आम्ही स्वच्छतेबद्दल जागरुक राहण्याची, या कारणासाठी वेळ देण्याचे आणि आम्ही कोणतीही घाण निर्माण करणार नाही किंवा खपवून घेणार नाही याची काळजी घेण्याचे वचन देतो,” असे कुमार म्हणाले.

हा उपक्रम देशभरातील गाड्या, रेल्वे वसाहती आणि उत्पादन युनिटवर राबविण्यात येणार आहे. 2017 पासून, हे पाक्षिक मोहीम स्वच्छ भारत मिशनचा एक प्रमुख घटक आहे, जो गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि जल शक्ती मंत्रालयाचा एक सहयोगी प्रयत्न आहे.

काय आहे अभियानाचा उद्देश

स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे सर्वात महत्वाचे स्वच्छता अभियान आहे. स्वच्छ भारत मिशन (SBM), स्वच्छ भारत अभियान, किंवा स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी उघड्यावर शौच निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उघड्यावर शौचमुक्ती निर्माण करण्यासाठी सुरू केलेली देशव्यापी मोहीम आहे ( ODF) गावे. मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.