Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 459

Viral Video | पुरुषांनी उभे राहून लघवी करणे आरोग्यासाठी घातक; व्हिडीओ आला समोर

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजन करणारे असतात. तर काही व्हिडिओंमध्ये आपल्याला खूप माहिती मिळते. जी माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी खूप गरजेचे असते. कधीकधी आपण या सोप्या ट्रिक्स वापरून अनेक गोष्टी करत असतो. ज्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो.

अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला खूप चांगले ज्ञान मिळेल. अनेक वेळा पुरुष हे लघवी करताना उभे राहतात. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी खूप अस्वच्छ आहे. याबाबतचा एक व्हिडिओ फायनल झालेला आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. आणि या व्हिडिओने सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये रचनात्मक पद्धतीने दृश्य दाखवलेली आहे. या दृश्यांमध्ये पुरुषांनी उभे राहून लघवी करणे हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यामुळे अनेक संसर्ग देखील होऊ शकतात. याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अनेक वेळा पुरुष जेव्हा उभे राहून लघवी करतात, तेव्हा टॉयलेट बाऊलमध्ये न जाता आजूबाजूच्या भागावर शिंपडले जाते. आणि त्यावरील जंतू हे आजूबाजूला असलेले दूध ब्रश टिशू पेपर इत्यादींवर बसते. आणि त्याच वस्तू आपण नंतर पुन्हा वापरतो. यामुळे संसर्ग होण्याचा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पुरुषांनी कधीही उभे राहून लघवी करू नये. अन्यथा तुमच्या सोबत इतरांच्या आरोग्य देखील बिघडेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेक लोक या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत

रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही : राजू शेट्टी

raju shetty

राज्याभरात विविध ठिकाणी रस्ते प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यापैकी राज्य सरकारचा सर्वात महत्त्वकांक्षी रस्ते प्रकल्प म्हणजे गोवा – नागपूर शक्तिपीठ महामार्ग. सध्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झालं असून भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा रस्ता जिथून जाणार आहे तेथील राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांमधून या रस्त्याला विरोध करण्यात येत आहे. यामध्ये आता माझी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला आहे. पुण्यामध्ये एका बैठकी आधी बोलताना त्यांनी ‘रक्ताचे पाठ वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही’ अशी भूमिका घेतली आहे.

गोवा नागपूर महामार्ग बाबत अनेक शेतकऱ्यांमधून विरोध होताना दिसतो आहे त्यामध्ये आता राजू शेट्टींची सुद्धा भर पडली असून पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीच्या संबंधी आयोजित केलेल्या बैठकीच्या आधी बोलताना त्याने रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शक्ती पिठाला स्थगिती देण्याच्या घोषणा झाल्या एकूण खर्च डीपीआर काय ? हे समजून घेण्यासाठी पत्र दिले होते त्याचे उत्तर त्यांनी दिले होते. त्यात ते म्हणाले 86000 कोटी खर्च येणार आहे. पत्रात म्हटलं की समृद्धी प्रमाणे मोबदला देण्याचा प्रस्तावित आहे पण स्पष्टता नाही. केवळ प्रस्तावित आहे असं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. रक्ताचे पाठ वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

MSRDC ने या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या अलाइनमेंटनुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता 760Km ऐवजी 805Km किमी लांबीचा असणार आहे. या मार्गाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीला 21 तासांचा प्रवास हा साधारणतः निव्वळ अकरा तासांवर येणार आहे.

दरम्यान शक्तीपीठ एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे.

IND vs Ban Test 2024 : अश्विनचा बांगलादेशला चोप !! संकटात सापडलेल्या टीम इंडियाला तारलं

IND vs Ban Test 2024 R Ashwin (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्व बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs Ban Test 2024) संकटात सापडलेल्या टीम इंडियाला आर अश्विनने (R Ashwin) चांगलंच तारलं. एकवेळ भारताची अवस्था १४४-६ अशी असताना टीम इंडिया २०० धावांचा टप्पा तरी पार करते का असा प्रश्न पडला होता. मात्र आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडगोळीने टीम दमदार भागीदारी करत टीम इंडियाला फक्त संकटातूनच बाहेर काढलं नाही तर संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली आहे. यामध्ये अश्र्विन तर खूपच आक्रमक मोडमध्ये पाहायला मिळाला.

चेन्नईवरील आजच्या सामन्यात (IND vs Ban Test 2024) बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल हे तिन्ही आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी संघाचा डाव सावरला. परंतु लंच ब्रेक नंतर लगेचच पंत ३९ धावांवर बाद झाला, त्यापाठोपाठ यशस्वी जैस्वाल सुद्धा ५६ धावांवर आऊट झाल्याने टीम इंडिया पुन्हा एकदा संकटात आली. भारताची धावसंख्या एकवेळ १४४-६ अशी होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा ऑल आऊट पडतो काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र इथूनच सुरु झाला अश्विन आणि जडेजा यांचा खेळ…. क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेल्या या दोन्ही फलंदाजांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत संघाला संकटातून बाहेर काढलं.

अश्विन ९० चेंडूत ८१ धावांवर खेळत आहे– (IND vs Ban Test 2024)

एकीकडे जडेजा शांततेत खेळत आहे, तर दुसरीकडे अण्णा अश्विन थेट गोलंदाजावर आक्रमण करत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलत आहे. सध्या अश्विन ९० चेंडूत ८१ धावांवर खेळत आहे. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि १ षटकार ठोकला आहे तर दुसरीकडे रवींद्र जडेजा सुद्धा ८८चेंडूत ६५ धावांवर खेळत आहे, त्यानेही ८ चौकार आणि १ षटकार मारला आहे. आतापर्यंत ७२ ओव्हर चा सामना झाला असून भारताची धावसंख्या २९७-६ अशी आहे. जडेजा आणि अश्विन ज्याप्रकारे खेळ खेळत आहेत आणि एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवत आहेत ते पाहता बांगलादेश साठी पुनरागमन करणं नक्कीच अवघड झालं आहे. अश्र्विन आणि जडेजाची जोडी आणखी वेळ मैदानावर राहावी अशीच भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल.

Cidco Lottery : सिडकोची देणार घर खरेदीची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची निघणार लॉटरी

cidco lottery

Cidco Lottery : मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे स्वात:चे घर असावे असे कुणाला वाटणार नाही ? सध्या घरांचे दर हे गगनाला भिडले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत (Cidco Lottery) असतो.

२०२४ च्या लॉटरीचा विचार करता मुंबई मंडळासाठी म्हाडाची 2030 घरांसाठीची लॉटरी निघाली असून याबाबतची प्रक्रिया अजून चालू असतानाच सिडको कडून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सिडको कडून तब्बल 40 हजार घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती एका मराठी टीव्ही माध्यमाकडून देण्यात (Cidco Lottery) आली आहे.

दसऱ्याला निघणार 40 हजार घरांची लॉटरी

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमक्या कोणत्या ठिकाणांमध्ये घरांची लॉटरी सिडको कडून काढली जाणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॉटरी निघणार असून दसऱ्याला सिडको लॉटरी घेऊन येणार आहे त्यामुळे मुंबई तसंच उपनगरात राहणाऱ्यांना परवडणारी घरं घेण्याची ही मोलाची संधी आहे. यापूर्वी सिडको ना रेल्वेस्थानका शेजारी उभारलेल्या घरांची लॉटरी कधीच काढलेले नाही मात्र या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर (Cidco Lottery) तब्बल 40 हजार घरांची लॉटरी निघणार आहे.

सिडको ने वाशी, सानपाडा, जुईनगर, खांनेदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घर बांधली आहेत. सिडको कडून सध्या 67000 घरांचे काम सुरू असून यातल्या साधारण 40 हजार घर बांधून पूर्ण (Cidco Lottery) झाले आहे.

वंदे भारतच्या तिकीट विक्रीत सांगलीने केला विक्रम ; रेल्वेला मिळाले सव्वा लाखांचे उत्पन्न

vande bharat express sangali

पूर्णपणे स्वदेशी असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ची अख्ख्या देशभर चर्चा आहे. अद्यापही देशात असे बरेच भाग आहेत जिथे वंदे भारत एक्सप्रेस पोहचहली नाही. या गाडीला संपूर्ण देशातून मागणी असताना कोल्हापूर सांगली भागातील प्रवाशांची मागणी पूर्ण झाली असून १६ सप्टेंबर रोजी या भागात पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली. अगदी पहिल्याच दिवशी या गाडीला चांगला प्रतिसाद दिल्याचे समोर आले असून त्याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

रेल्वेला मिळाला सव्वा लाखांचा उत्पन्न

पहिल्याच दिवशी सांगलीकरांनी वंदे भरात एक्सप्रेसला भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं आहे. पहिल्याच दिवशी सांगली -पुणे आणि पुणे- सांगली या मार्गावर वंदे भारतच्या दोन गाड्यांमध्ये एकूण 175 तिकीट काढली गेली आणि यातून रेल्वेला सव्वा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

वंदे भारतला सांगलीकरांचा भरभरून प्रतिसाद

हुबळी सांगली पुणे वंदे भारत एक्सप्रेस पहिल्या दिवशी सांगली स्थानकातून शंभर तिकिटांची विक्री झाली. गाडी क्रमांक २०६६९ हुबळी सांगली वंदे भारत या गाडीला सांगली स्टेशन वरून सकाळी सहा वाजेपर्यंत 90 तिकीट विकली गेली होती. तर सकाळी सात ते सव्वानऊच्या दरम्यान सांगली स्टेशन वरून वंदे भारत सुटण्याच्या आधी करंट बुकिंग मध्ये आणखी दहा-बारा तिकिटांची विक्री झाली. त्यामुळे एकूणच सांगलीकरांनी वंदेभरात एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच एकाच फेरीत 100 तिकिटांची विक्री पार केल्यामुळे एक नवा विक्रम हे सांगलीच्या नावावर नोंदवला गेला आहे याशिवाय पुणे सांगली कोल्हापूर वंदे भारत गाडीत पुणे ते सांगली या परतीच्या मार्गावर 75 तिकीट यांची विक्री झाली.

सांगलीतून चांगली तिकिटांची विक्री झाली असली तरी मिरज आणि कोल्हापूर काही मागे नाही. कारण या दोन्ही स्थानकांमधूनही वंदे भारत एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद लाभला करंट बुकिंगचा विचार केला तर कोल्हापूरनेही शतक गाठले कोल्हापूरची तिकीट विक्री एकाच फेरीची आहे. त्यामुळे इथून पुढे देखील सांगली कोल्हापूर या भागातून सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.

तिकिटविक्रीची आकडेवारी

सांगली १७५
मिरज १३०
बेळगाव ११०
कोल्हापूर ९४
हुबळी २६
धारवाड २५
सातारा १०
(यात करंट बुकिंगचा समावेश नाही)

बदलापूर ते मुंबई अंतर केवळ 30 ते 40 मिनिटांत गाठता येणार ; राज्यातील सर्वात लांब बोगद्याचे काम जोमात

matheran tunnel

राज्यभरात अनेक महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. राज्यातील लहान शहरांची मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढून औद्योगिकरणाला आणि व्यापाराला चालना मिळावी हा यामागचा उद्देश आहे. रस्ते प्रकल्पाअंतर्गत बोगदे आणि पूल यांची सुद्धा निर्मिती करण्यात येते. अशातच बडोदा जे एन पी टी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा माथेरान डोंगरांमध्ये खोदण्यात आला असून बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा पंधरा महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. त्याची रुंदी ही 22 मीटर आहे तर या बोगदाच्या चार मार्गिका असणार आहेत.

बदलापूर ते पनवेल फक्त 10 मिनिटांत

या बोगदामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास फक्त दहा मिनिटांमध्ये तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे 30 ते 40 मिनिटांमध्ये करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदर इथून जी वाहन जातील त्यांना बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली वडोदरा महामार्गाला देखील उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. याशिवाय या बोगद्यामुळे सगळ्यात मोठा फायदा पनवेल तसेच तळोजा कल्याण मार्गावर जी काही वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचा ताण येतो तो कमी करण्यासाठी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बोगदाचा काम सध्या 80% पूर्ण झालं असून या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या बोगदाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात या दुसऱ्या बोगद्याचे काम देखील पूर्ण होण्याची शक्यता असून या दोन्ही बोगदांची मध्यभागांची उंची 13 ते 22 मीटर इतकी आहे

माथेरान डोंगरा खालून दिल्लीचा बोगदा

जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १३५० किलोमीटरच्या दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे च काम सध्या सुरू असून या एक्सप्रेस वे वरील माथेरान डोंगरा खालून दिल्लीचा बोगदा निघणार असून त्यामुळे मुंबईहून 12 तासात दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. दिल्ली ते जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या १३५० किलोमीटरच्या मार्गाचे काम सुरू होणार असून यासाठी माथेरानचा जो काही ईको सेंसिटिव्ह झोन आहे त्या डोंगर रांगांमधून 4.39 किलोमीटरचा आठ पदरी बोगदा लवकरच खोदला जाणार आहे. हा बोगदा पनवेल जवळ माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या मोरबी गावापासून सुरू होणार असून ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ जवळ असलेल्या भोज या गावापर्यंत असणार आहे. साधारणपणे या बोगदासाठी 1453 कोटींचा खर्च होणार आहे व यामुळे दिल्ली ते मुंबई हे 24 तासांचा अंतर निम्म्याने कमी होऊन 12 तासांवर येणार आहे

Bachchu Kadu : मोठी बातमी!! बच्चू कडूंना महाविकास आघाडीची ऑफर

Bachchu Kadu MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Maha Vikas Agahdi) प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) याना थेट ऑफर दिली आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. एकीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, छत्रपती संभाजी राजे यांची तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मोक्याच्या क्षणी बच्चू कडू याना ऑफर देण्यात आल्याने महाराष्ट्राचे राजकारण आणखी रंजक बनले आहे.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी म्हंटल कि, बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं. आम्ही भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात महाराष्ट्रात आम्ही एका आघाडी तयार केली आहे. परंतु आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही, असा मला विश्वास आहे, आम्हाला बच्चू कडू यांची काहीही अडचण नाही. त्यामुळे बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी जर महाविकास आघाडीत आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. जयंत पाटील यांच्या या ऑफरवर बच्चू कडू नेमका कोणता निर्णय घेतात यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा स्पष्ट होऊ शकते.

बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर –

दरम्यान, नाशिक येथील जाहीर सभेत कांद्याच्या प्रश्नावरून बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला होता. जेव्हा शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार, आमदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार आहे, तुम्ही आम्हाला रडवलं आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत. काँग्रेस आणि भाजपने निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था आम्ही उखडून फेकणार आहोत. तुम्ही काय आम्हाला योजना देतात, आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका केली. तसेच आपण जीवाचे रान करून आपल्या विचाराचे आमदार निवडून आणावे, असं आवाहन बच्चू कडू यांनी उपस्थित जनतेला केलं.

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला; 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?

solar panel project gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीचे सरकार (Vijay Wadettiwar) आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेलेत. यावरून विरोधक नेहमीच सत्ताधार्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. वेदांता फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आधीच गुजरातला गेल्यानंतर आता विदर्भात उभारण्यात येणारा सोलर पॅनल प्रकल्प (Solar Panel Project) गुजरातला गेल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हंटल, महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे! महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे.

वडेट्टीवार आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, हिंदू – मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा… सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत. वडेट्टीवार यांच्या या आरोपावर सरकार कडून काय प्रत्युत्तर येत ते आता पाहावे लागेल.

दरम्यान, महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे असा आरोप विरोधक सातत्याने करत असतात आणि त्याला कारणही तस आहे. मागील २ वर्षात महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेले. त्यानंतर हिरे उद्योगही गुजरातला गेला. एवढच नव्हे तर बॉलीवूडमधला सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये पार पडला होता. त्यामुळे मोदी शाह हि जोडगोळी महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याची भावना विरोधक व्यक्त करत असतात. आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकार साठी मात्र हा मोठा धक्का असेल.

One Nation One Election : EVM मध्ये एकदाच घोटाळा करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन

sanjay raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये मोठा निर्णय घेत एक देश एक निवडणूक One (Nation One Election) प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेत सुद्धा हा प्रस्ताव मंजूर करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चौफेर टीका करत एक देश एक निवडणूक प्रस्तावाला विरोध केला आहे. EVM मध्ये एकदाच घोटाळा करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन चा घाट घातला जात असल्याचे संजय राऊतांनी म्हंटल.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणूक व विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. जेणेकरून ईव्हीएममध्ये एकदाच घोटाळा करायचा, यंत्रणा हाताशी धरून एकाच वेळी सर्व निवडणुका जिंकायच्या, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांना एक राष्ट्र, एक निवडणूक घ्यायची असेल तर आधी महापालिकांच्या निवडणुका एकत्र येऊन दाखवा. राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा. भविष्यात नो इलेक्शन नो नेशन चा नारा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं असेही संजय राऊतांनी म्हंटल आहे.

ते पुढे म्हणाले, जे मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांची निवडणूक एकत्र घेऊ शकले नाहीत. मुंबई महापालिकेसह 14 पालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये तीन वर्ष निवडणूक घेऊ शकले नाहीत त्यांनी एक देश एक निवडणुकीचा फंडा आणावा हे खूप आश्चर्यकारक आहे. संस्कृती बदलण्याचा आणि संविधान बदलण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आपल्या संविधानात काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती बदलण्याचा प्रयत्न चालवला जात आहे, द्या निवडणुका बंद करायलाही हे लोक घाबरणार नाहीत असा आरोप संजय राऊतांनी भाजपवर केला आहे. तुम्हाला एकाचवेळी निवडणुका जिंकायच्या म्हणून हे फंडे करत असाल तर देशाच्या दृष्टीने उपयोगाच नाही. निवडणूक ही लूट नाही, ही लोकशाहीची गरज आहे अस म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच विरोधी पक्ष एकत्र बसून या प्रस्तावावर चर्चा करेल आणि एक देश एक निवडणूक या विधेयकाला कसा विरोध करायचा ते ठरवू अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

चहा-कॉफी, जेवण आणि Wifi; रेल्वे स्थानकांवर अवघ्या 2 रुपयांत मिळणार या सुविधा

railway news

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वेला महत्वाचे स्थान असून प्रवासी रेल्वेला अधिक पसंती देतात. आजही भारतातील प्रवासाचे सर्वात सोपे आणि स्वस्त साधन म्हणजे भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या एक्झिक्युटिव्ह लाउंजची सुविधा देशातील अनेक मोठ्या रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे. या एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये तुम्ही आरामात बसून ट्रेनची वाट पाहू शकता.नुकतेच उत्तर प्रदेशातील प्रयागराज स्टेशनवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या सुविधेबद्दल

कोणत्या सुविधा मिळणार ?

विमानतळांप्रमाणे रेल्वे लाउंजमध्ये प्रवाशांना चहा-कॉफी, मासिके, वाय-फाय, वर्तमानपत्रे, ट्रेनची माहिती, टॉयलेट, बाथरूम आदी सुविधा मिळतात. मात्र, ही सुविधा वापरण्यासाठी शुल्क भरावे लागेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही या सुविधा फक्त 2 रुपयांमध्ये मिळवू शकता.

क्रेडिट कार्डांवर रेल्वे लाउंज प्रवेश सुविधा

आता तुम्ही म्हणाल केवळ 2 रुपयांत एवढ्या सुविधा कशा ? तर हल्ली क्रेडिट कार्ड्स सर्वांकडे असतात. त्याचा वापर करून तुम्ही रेल्वेची ही सुविधा घेऊ शकता. हा फायदा देणारी अनेक क्रेडिट कार्डे बाजारात आहेत. 2 रुपयांमध्ये रेल्वे लाउंज ऑपरेटरकडून नॉन-रिफंडेबल कार्ड व्हॅलिडेशन शुल्क आकारले जाईल.

या क्रेडिट कार्डवर मिळेल सेवा

IDFC First Bank Millennia Credit Card
IDFC First Bank Classic Credit Card
IDFC First Bank Select Credit Card
IDFC First Bank Wealth Credit Card
ICICI Bank Coral Credit Card
IRCTC SBI Platinum Card
IRCTC SBI Card Premier
IRCTC BoB Rupay Credit Card
HDFC Bank Rupay IRCTC Credit Card
MakeMyTrip ICICI Bank Platinum Credit Card
MakeMyTrip ICICI Bank Signature Credit Card
ICICI Bank Rubyx Credit Card

रेल्वे स्थानकांवर मिळेल सुविधा

ट्रॅव्हलर्स एक्झिक्युटिव्ह लाउंज- नवी दिल्ली – प्लॅटफॉर्म क्रमांक 16
एक्झिक्युटिव्ह लाउंज- नवी दिल्ली – प्लॅटफॉर्म क्रमांक 1
एक्झिक्युटिव्ह लाउंज- मदुराई – प्लॅटफॉर्म क्रमांक 1
एक्झिक्युटिव्ह लाउंज- जयपूर – प्लॅटफॉर्म क्रमांक 1
एक्झिक्युटिव्ह लाउंज- आग्रा – प्लॅटफॉर्म क्रमांक 1
एक्झिक्युटिव्ह लाउंज- अहमदाबाद – प्लॅटफॉर्म क्रमांक 1
एक्झिक्युटिव्ह लाउंज- वाराणसी – प्लॅटफॉर्म क्रमांक 1
एक्झिक्युटिव्ह लाउंज- सियालदाह – प्लॅटफॉर्म क्रमांक 1