Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 461

खुशखबर ! रेल्वेतही मिळणार Zomato ची सेवा ; IRCTC आणि Zomato यांच्यात मोठा करार

जर तुम्हाला ट्रेनमध्ये चविष्ट जेवण खावेसे वाटत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना झोमॅटोवर तुमचे आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकता आणि ते थेट तुमच्या सीटपर्यंत पोहचेल. या सेवेद्वारे, कंपनीने आतापर्यंत देशातील 100 हून अधिक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना 10 लाखांहून अधिक ऑर्डर वितरित केल्या आहेत. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती…

झोमॅटोच्या सीईओनी दिली माहिती

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी X वर रेल्वेसोबतच्या या भागीदारीची माहिती दिली. त्यांनी पोस्ट शेअर करून सांगितले की, आता IRCTC सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे 100 हून अधिक रेल्वे स्थानकांवर थेट तुमच्या ट्रेनच्या डब्यात जेवण पोहोचवले जाते. आम्ही ट्रेनच्या 10 लाख ऑर्डर आधीच पूर्ण केल्या आहेत. तुमच्या पुढच्या प्रवासात नक्की ऑर्डर करून पहा!’

ही घोषणा होताच नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत. एका युजरने प्रश्न केला आहे की जर ट्रेनला उशीर झाला तर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय येईल का ? ही चांगली गोष्ट आहे की झोमॅटो कडून ही नवी सोय करण्यात आलेली आहे. पण जर समजा जर एखाद्या प्रवाशाने रेल्वेमध्ये बसून खाद्यपदार्थ ऑर्डर केले आणि जर ट्रेन एक वाजता पोहोचण्याऐवजी तीन वाजता स्टेशनवर पोहोचली तर डिलिव्हरी बॉय इतका वेळ वाट पाहतो? असा सवाल एका युजरने केला आहे. शिवाय आणखी एका युजरने म्हटले आहे की ऑर्डर साठी कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय चांगला राहील.

पुणे यातही अव्वल ! रेल्वेत अलार्म चेन पुलिंगच्या नोंदवल्या गेल्या सुमारे 400 घटना

alarm chain puller

पुणे तिथे काय उणे ! हि उक्ती तर आपण ऐकलीच असेल. पुणेरी पाट्या , पुणेरी वामकुक्षी , पुणेरी भाषा , पुणेकरांचा स्वॅग काही औरच आहे. इतर सगळ्या गोष्टींप्रमाणे आता पुणेकर आणखी एका बाबतीत अव्वल आले आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर या वर्षी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील प्रवाशांनी गाड्यांमध्ये अलार्म चेन खेचण्याच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे, त्यानंतर अहमदनगर आणि दौंड रेल्वे स्थानकांचा नंबर लागला आहे.

400 अलार्म चेन पुलिंग प्रकरणे

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या अलीकडील आकडेवारीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान सुमारे 400 अलार्म चेन पुलिंग प्रकरणे नोंदवली गेली, तर अहमदनगर आणि दौंड रेल्वे स्थानकांवर अनुक्रमे 172 आणि 134 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये अहमदनगर आणि दौंडचा पुणे विभागात समावेश करण्यात आला असून, यापूर्वी सोलापूर विभागाचा भाग होता.

मागील वर्षी देखील पुणेच अव्वल

मागील वर्षी देखील याच कालावधीत, पुणे हे अंदाजे 570 प्रकरणांसह अव्वल रेल्वे स्थानक होते, त्यानंतर चिंचवड आणि लोणी स्थानकांवर अनुक्रमे 170 आणि 160 प्रकरणे नोंदवली गेली होती.पुणे विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, चेन पुलिंगनंतर सर्वाधिक वेळा नोंदवलेल्या घटनांमध्ये रेल्वेच्या खिडक्यांवर दगडफेक होते. पंक्चुलिटी टास्क अंतर्गत घटनांचा यात समावेश होतो. या RPF द्वारे मॅन्युअली नोंदवलेल्या तक्रारी आहेत.

पुढे बोलताना शर्मा म्हणाल्या “आमच्याकडे दोन श्रेणी आहेत: एक अनपेक्षितता-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि दुसरे Rail Madad ॲपद्वारे नोंदवलेल्या तक्रारी किंवा मदतीवर लक्ष केंद्रित करते. वक्तशीरपणा श्रेणी अंतर्गत, जिथे RPF चे प्राथमिक उद्दिष्ट ट्रेनला होणारा विलंब रोखणे हे आहे, तिथे प्रमुख आव्हाने म्हणजे अलार्म चेन खेचणे, दगडफेक करणे आणि ट्रॅक रनओव्हर प्रकरणे,” शर्मा यांनी स्पष्ट केले.

‘हा’ दंडनीय गुन्हा

शर्मा यांनी नमूद केले की बहुतेक अलार्म चेन पुलिंग तेव्हा होते जेव्हा प्रवासी रेल्वे स्थानकांवर उशिरा येतात किंवा त्यांच्या सहप्रवाशांची वाट पाहतात. त्यांनी असेही सांगितले की रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 141 नुसार, वाजवी कारणाशिवाय अलार्मची साखळी ओढणे हा दंडनीय गुन्हा आहे. या शिक्षेत एक वर्षापर्यंत कारावास, एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेचा समावेश आहे.

RPF कर्तव्यांच्या दुसऱ्या श्रेणीमध्ये Rail Madad ॲपद्वारे सादर केलेल्या प्रकरणांची देखरेख करणे समाविष्ट आहे. तक्रारी आणि मदत यामध्ये कोणताही महत्त्वाचा फरक केला जात नसला तरी शर्मा यांनी सांगितले की, नोंदवलेल्या बहुतांश प्रकरणात मागे सामान राहिले गेले तरी चेन ओढल्याच्या तक्रारी आहेत. “वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, मागे राहिलेले सामान सर्वात जास्त असते, त्यानंतर प्रवाशांनी प्रतिसाद न देणे किंवा गहाळ होणे आणि प्रवाशांच्या सामानाची चोरी करणे, जसे की फोन, इअरफोन आणि इतर वस्तू. उपद्रव तक्रारी, ज्यामध्ये एकतर प्रवासी किंवा फेरीवाल्यांद्वारे त्रास होतो, अशा घटनांचा समावेश आहे ” असे शर्मा म्हणालया.

कशा प्रकारे ओळखला जातो चेन पुलर

आरपीएफ चेन पुलर कसे ओळखते असे विचारले असता, शर्मा यांनी स्पष्ट केले, “जेव्हा अलार्म चेन खेचली जाते, तेव्हा प्रेशर ड्रॉपचा आवाज ऐकू येतो आणि प्रभावित कोचसाठी प्रवासी आपत्कालीन अलार्म इंडिकेटर सक्रिय केला जातो. LHB डब्यांमध्ये (भारतीय रेल्वेने वापरलेले प्रवासी डबे जे जर्मनीच्या Linke-Hofmann-Busch (LHB) द्वारे उत्पादित केले जातात) डब्याच्या विशिष्ट विभागातील किंवा क्यूबिकलमधील LED लाइट लुकलुकणे सुरू होते.

Lebanon Pager Blast | लेबनॉनमध्ये पेजरद्वारे झाला मोठा स्फोट; पेजर म्हणजे नेमकं काय?

Lebanon Pager Blast

Lebanon Pager Blast | सध्या इस्राईल जवळ असलेल्या लेबनॉन येथे युद्ध होत आहे. ते युद्ध आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हायला लागलेले आहे. अनेक शहरांमध्ये लोकांच्या खिशात असलेले पेजर अचानक रस्त्यात आणि बाजारात स्फोट लागलेले आहे. ठीक ठिकाणी या पेजर्समध्ये दहशतवादी संघटनेची जवळपास 2750 सदस्य जखमी झालेले आहेत. आतापर्यंत आठ लोक ठार झालेले आहे. पेजर हे माहितीची देवाण-घेवाण करणारे हे छोटेसे इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आहे. अनेक लोकांच्या मृत्यूसाठी हे पेजर कसे काय कारणीभूत ठरत आहे? एवढा मोठा हल्ला कसा काय होत आहे? इलेक्ट्रॉनिक उपकरण मधून इतक्या लोकांना कशी काय बाधा होत आहे? या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पेजर म्हणजे काय ? | Lebanon Pager Blast

पेजर हे छोटेसे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन डिवाइस आहे. हे डिवाइस संदेश पाठवण्यासाठी वापरले जाते. 90 च्या दशकापर्यंत जगभरात पेजर मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. परंतु हळूहळू मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा शोध लागला. आणि पेजर वापरातून कमी झाले. परंतु अनेक दहशतवादी संघटना आणि गुन्हेगार पेजर वापरतात. या पेजवर स्क्रीनवर मेसेज दिसतो. तसेच एखाद्याचा क्रमांक देखील दिसतो. जेव्हा पेजवर मेसेज येतो तेव्हा व्हायब्रेशन जाणवते. किंवा बीप असते. त्याला बीपर असे म्हणतात. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी शांतता बाळगणे गरजेचे असते. त्यावेळी पेजरचा वापर केला जातो.

पेजर कसे काम करते ?

पेजर हे मोबाईल जेव्हा इतर कम्युनिकेशन डिवाइस पेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. या पेजरद्वारे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी डिवाइसमध्ये त्या व्यक्तीची रेडिओ रिक्वेन्सी सेट करावी लागते. आणि त्यानंतरच तुम्ही संदेश पाठवू शकता. परंतु यावर कॉलिंगची सुविधा नाही.

पेजरचे किती प्रकार पडतात ?

पेजरचे एकूण तीन प्रकार पडतात. पहिले म्हणजे वनवे पेजर. यामध्ये फक्त तुम्हाला मेसेज मिळू शकतो. तुम्ही दुसऱ्याला मेसेज पाठवू शकत नाही. दुसरा म्हणजे टू वे पेजर. यामध्ये तुम्हाला एसएमएस पाठवण्याची आणि रिसिव्ह करण्याची सुविधा असेल. तिसरा म्हणजे व्हॉइस मेसेज. यामध्ये तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड केलेले मेसेज पाठवू शकता.

पेजरद्वारे स्फोट कसे झाले ?

पेजरमध्ये स्फोटके आधीपासूनच असावी असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हेझबोलाने या हल्ल्यामागे इस्राईलचा हात असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे. दहशतवादी वापरत असलेल्या पेजरमध्ये लिथियम बॅटरीचा वापर केला जात होता. या बॅटरीमध्ये स्पॉट झाला असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. लिथियमची बॅटरी जर प्रमाणापेक्षा जास्त गरम झाली तर त्यातून धूर निघतो. त्यामुळे ही बॅटरी वितळण्याची आणि आग निर्माण होण्याची क्षमता निर्माण होते. तशाच प्रकारे बॅटरी तुमचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स वाहनात वापरल्या जातात. आणि या 590 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापल्या तर त्याला आग लागते.

Wheat Farming | कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञानी विकसित केली गव्हाची नवीन जात; मिळेल 80 ते 100 क्विंटल पर्यंत उत्पादन

Wheat Farming

Wheat Farming | महाराष्ट्रातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. बहुतांश लोक हे शेती करतात. सध्या खरीप हंगामातील भात आणि सोयाबीन ही पिके काढणीच्या मार्गावर आलेली आहेत. खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर लगेच रबी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. या हंगामात खास करून गव्हाची लागवड (Wheat Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. बाजारात देखील गव्हाला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो.

मागील वर्षी महाराष्ट्रात पाऊस खूप कमी पडला, तरी देखील गव्हाची (Wheat Farming) मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली होती. परंतु यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत चांगलाच पाऊस पडलेला आहे. त्यामुळे यावर्षी गव्हाची लागवड करण्याचे क्षेत्र देखील महाराष्ट्रात वाढू शकते असे म्हटले जाते. गव्हाची लागवड अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. तरीदेखील नैसर्गिक आपत्ती, वादळवारा यासारख्या गोष्टींमुळे पिकांना नुकसान होते. तर कधी कधी बाजारात देखील चांगला भावना मिळाल्याने शेतकऱ्याचे परिणामी आर्थिक नुकसान होते.

रबी हंगाम सुरू झाला की, हवामानात सातत्याने बदल होत असतात. कधी तापमान वाढत वाढते, तर कधी अचानक परतीचा पाऊस येतो. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाचे उत्पादन घेण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या बाजारात गव्हाच्या नवनवीन जाती विकसित झालेल्या आहेत. अशातच देशातील कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाची एक नवीन जात विकसित केलेली आहे. या जातीचे नाव एचडी 3385 असे आहे. आता ही जात नक्की काय आहे? त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

एचडी 3385 जातीची वैशिष्ट्य | Wheat Farming

भारतीय कृषी संशोधन संस्थेने या एचडी 3385 गव्हाची जात विकसित केलेली आहे. कर्नाल या संस्थेने ही जात विकसित केलेली आहे. गव्हाची ही जात प्रामुख्याने उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व मैदानी क्षेत्रासाठी आहे. या जातीची वेळेवर पेरणी केली जाऊ शकते. तसेच वेळेवर काढणे देखील होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचे चांगले उत्पादन मिळते. याची खास वैशिष्ट्य म्हणजे ही जात तांबेरा या रोगास प्रतिकारक असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच पिवळा तपकिरी आणि काळा या तिन्ही प्रकारचा तांबेरा रोगास ही जात प्रतिकारक आहे. या जातीची लागवड केल्यास तुम्हाला साधारणपणे 60 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते

गव्हाच्या या जातीची लागवड करण्यासाठी वातावरण अनुकूल लागते. ही जात 38 सेंटीमीटर पर्यंत वाढते. तसेच हेक्टरी तुम्हाला 73 ते 74 क्विंटल पर्यंत उत्पादन घेता येते. या जातीची कमाल उत्पादन क्षमता ही 80 ते 100 क्विंटल एवढी आहे. तुम्हाला जर योग्य नियोजन आणि हवामानाची साथ मिळाली, तर तुम्ही 100 क्विंटल पर्यंत देखील याचे उत्पादन घेऊ शकता. या जातीची ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी केली जाते.

BSNL Recharge Plan : 7 रुपयांच्या खर्चात दररोज 3GB डेटा; BSNL प्लॅन बाजारात घालतोय धुमाकूळ

BSNL Recharge Plan 599 rs (1)

BSNL Recharge Plan । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्यानंतर पैसे वाचवण्यासाठी अनेक ग्राहकांनी BSNL चे सिम खरेदी करण्यावर भर दिला आहे. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन अतिशय स्वस्त असून सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्याना खरा आधार बीएसएनएल मुळे मिळत आहे. त्याचमुळे मागील महिन्यापासून बीएसएनएलचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तुमच्याकडे सुद्धा BSNL सिम असेल आणि तुम्ही सुद्धा स्वस्तात मस्त रिचार्जच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 7 रुपयांच्या खर्चात दररोज 3GB इंटरनेट डेटाचा लाभ घेऊ शकता. चला तर मग हा रिचार्ज प्लॅन कोणता आहे? त्यात कोणकोणते फायदे मिळतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

BSNL चा 599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन– BSNL Recharge Plan

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे बीएसएनएलचा हा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन … हा मोबाईल रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. या प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड कॉलिंग,100 एसएमएस, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसाला 3GB इंटरनेट डेटाचा आनंद घेता येतोय. ५९९ आणि ८४ दिवसांचे गणित बघितलं तर दिवसाला अवघ्या ७ रुपयांचा खर्च तुम्हाला पडेल, याबदल्यात तुम्ही 3GB इंटरनेट वापरू शकता. तुम्ही बीएसएनएलचा हा प्लॅन बीएसएनएल सेल्फकेअर ॲपद्वारे खरेदी करू शकता.

BSNL चा 797 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL चा आणखी एक रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) आहे तो म्हणजे 797 रुपयांचा… या रिचार्ज प्लॅन मध्ये 300 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग मिळेल. प्लॅन सुरू झाल्यापासून ६० दिवसांत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच दररोज २ जीबी डेटाही मिळतो. या ६० दिवसांच्या कालावधीत तुम्हाला मोफत एसएमएसची सुविधा मात्र मिळणार नाही. इतकंच नव्हे तर पहिल्या 60 दिवसांनंतर, ग्राहकांना आउटगोइंग कॉल करता येणार नाही. परंतु समोरून तुम्हाला कॉल येऊ शकतात.

तुरटीच्या खड्याचे अफलातून फायदे ; केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर

Alum stone tricks

पूर्वीच्या काळी शेविंग करून झाल्यानंतर आफ्टर शेविंग क्रीम उपलब्ध नसायची तेव्हापासून तुरटीचा उपयोग दाढी करून झाल्यानंतर त्वचेवर फिरवण्यासाठी केला जायचा. पण तुम्हाला माहिती आहे का? तुरटीचे खूप सारे उपयोग आहेत. अगदी इवल्याशा तुरटीचे तुकड्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात आजच्या लेखांमध्ये आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत

केसांच्या वाढीसाठी

केसांच्या वाढीसाठीही तुरटी उपयोगी ठरते. यासाठी तुरटीची पावडर तयार करून खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून ती केसांवर लावावी. हे मिश्रण रात्रभर तसंच राहू द्यावं. हलक्या हाताने मालिश करून घ्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी केस शाम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावेत हा उपाय सलग काही दिवस केल्यानंतर फरक दिसून येईल.

केसातील कोंडा दूर होण्यासाठी

अनेकांच्या केस गळतीचं प्रमुख कारण म्हणजे केसांमध्ये कोंडा असणं हे आहे. सध्याचे प्रदूषित वातावरण आणि बदललेली जीवनशैली यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण जास्त आहे. अशात तुम्ही केसांमधला कोंडा दूर करण्यासाठी तुरटीची पावडर तयार करा आणि त्यामध्ये थोडं लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी त्वचेची मालिश करा असं केल्यानंतर केसांमधील कोंडा दूर होईल.

केस काळे होण्यासाठी

अकाली केस पांढरे होणे ही मोठी समस्या आहे. तुरटीचा एक उपाय करून तुम्ही तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे करू शकता. यासाठी तुरटीची पावडर कलोंजीच्या तेलामध्ये मिक्स करा. कलोंजीचे हे तेल कलोंजीच्या बियांपासून तयार केले जाते. या बियांना सीड्स ऑफ ब्लेसिंग असं हे म्हटलं जातं कारण या बिया अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत. त्यामुळे जर कलोंजीच्या तेलामध्ये तुरटीची पावडर टाकून त्वचेला मालिश केल्यानंतर डोक्यामध्ये ब्लड फ्लो वाढतो आणि केसांची समस्या ही दूर होते.

मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीसच, पाडापाडी झाली तर माझ्या नावाने ओरडू नका

fadnavis jarange patil

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना इशारा दिला आहे. मला राजकीय बोलायचे नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही, फक्त आरक्षणाविषयी आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या. नाहीतर पुन्हा पाडा पाड्या झाल्या तर मग माझ्या नावाने ओरडायचं नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच मराठ्यांचे कल्याण न होण्यासाठी फडणवीसच दोषी आहेत. गरीब मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीस आहेत, असा आरोप सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुमच्या राजकारणाशी मला काही देणं-घेणं नाही. ‘महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो तुम्ही खड्ड्यात जा, मात्र मराठ्यांना सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी हवी, ही मराठा समाजाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. ७ महिने झालं तुम्ही नुसती प्रक्रिया करताय. आता 2-4 दिवसांमध्ये आमच्या मागण्यांचे तुकडे पाडा, एकदा का मी मी रस्त्यावर आलो तर तुमचा खेळ खल्लास होईल. सरकारने जर मागण्या मान्य नाही केल्या तर तुम्ही फक्त आता पुढचं बघा’, आमचा कचका कसा असतो तेच दाखवतो. मराठ्यांचे पोर आता गप्प राहणार नाहीत .. २०२४ ला वाटच लावणार असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस याना दिला.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, आमरण उपोषण कठोर करून आम्ही इथे जीवाची बाजी लावली आहे. आमचा प्रवास इथून पुढे आणखी खडतर आहे. माझ्या समाजाची लेकरं मोठी व्हावीत म्हणून हे आमरण उपोषण सुरु केलं आहे. सरकारला शेवटची संधी दिली. आम्हाला राजकारणात नाही जायचं. फक्त मराठ्यांच्या मागण्यांची अमंलबजावणी करा, माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग पाडा पाड्या कशा झाल्या याबाबाबत माझ्या नावाने ओरडू नका. मला राजकीय वाटांवर फडणवीस यांनी जाऊ देऊ नये. असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. भारतात अशी जात नाही की जिने वर्षभर सरकारला सहकार्य केले. आम्ही सहकार्यच केले. आता सरकारला लाज वाटायला हवी. 2-4 दिवसांत सगळ्या विषयाची अंमलबजावणी करावी. फडणवीसांनी कितीही गणिते करू द्या सगळे गणित मोडून टाकणार. फडणवीस हेच सगळ्यांच्या आरक्षणाला अडथळा आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.

Pune: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका ; RTO आणि PMC राबणार खास उपाययोजना

pune traffic

Pune : मुंबई खालोखाल राज्यामध्ये पुणे शहराचा नंबर लागतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षण , नोकरी आणि कामानिमित्त पुण्यात येत असतात. तर काही कामानिमित्त आलेले लोक पुण्यातच स्थायिक झाले आहेत. याचा परिणाम मात्र पुण्याच्या लोकसंख्येत झाला असून पुण्याची लोकसंख्या तर वाढली आहेच शिवाय पुण्यामध्ये वाहनांची संख्या देखील वाढली असून पुण्यातल्या काही मार्गावर तासंतास वाहतूक कोंडी होते. शहरातील हीच समस्या लक्षात घेऊन RTO कडून एक खास उपाययोजना राबवण्यात येणार आहे. येत्या २१ सप्टेंबर पासून ही ट्राफिक समस्या नियंत्रण (Pune) योजना लागू केली जाणार असून त्यासाठी शहरातलया वाहतूक व्यवस्थेत काही बदल देखील केले जाणार आहेत.

शहरातील 32 अत्यंत गर्दीच्या रस्त्याची नोंद (Pune)

वाहतूक नियंत्रणासाठी शहरातील 32 अत्यंत गर्दीच्या रस्त्याची नोंद केली गेली असून यावर काही विशेष बदल करत या अत्यंत वर्दळीच्या आणि नेहमी ट्रॅफिक जाम होणाऱ्या भागांमध्ये काही बदल केले जाणार आहेत. वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी आणि प्रवासांचा वेळ वाचवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आणि बीएमसीना काही उपाययोजनांची एक मालिका तयार केली आहे. यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण, बिल बोर्डस आणि इलेक्ट्रिकल पोल्स सारखे अडथळे हटवणे, ड्रेनेज दुरुस्ती, खड्ड्यांची दुरुस्ती, ट्रॅफिक सिग्नलची देखभाल आणि सुधारित चौरस व्यवस्थापनाचा समावेश असणार आहे. शिवाय ट्राफिक नियंत्रण उपकरण आणि विभाजन तंत्राचा वापर गुगलच्या मदतीने केला जाणार आहे. त्यामुळे ट्राफिकचं (Pune) व्यवस्थापन करणं प्रभावी होणार आहे.

‘या’ रस्त्यांचा समावेश (Pune)

वाहतूक नियंत्रणाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये अहमदनगर रोड, नॉर्थ मेन रोड (कोरेगाव पार्क) आणि सोलापूर रोड इथं अमलात आणला जाणार आहे. तर फातिमानगर, वानवडी आणि काळुबाई या मुख्य चौकांवर ट्रॅफिक वळणांचा प्रभाव राहील आणि पर्यायी मार्ग दिले जाणार आहेत. तर अहमदनगर रोड चौकावर चौरस रस्ते बंद केले जाणार आहेत आणि अग्निबाण आणि सोमनाथ नगर चौकावर यू टर्न लागू केले जाणार आहे. ज्यामुळे वाहतुकीचे नियोजन होईल असे (Pune) महापालिकेचे मत आहे.

ही नवी योजना गणेश खिंड (पुणे विश्वविद्यालय) रोडवरील ट्राफिक व्यवस्थापना सारखेच कार्य करणार आहे. तसेच नवले पूल, राधा चौक आणि आंबेडकर चौक वर एक ट्राफिक योजना तयार केली गेली आहे. या उपाययोजनांचा उद्देश शहरातले ट्रॅफिक सुधारण्याचा आहे

One Nation One Election : मोठी बातमी!! एक देश एक निवडणूक प्रस्ताव केंद्राकडून मंजूर

One Nation One Election

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये मोठा निर्णय घेतला आहे. एक देश एक निवडणूक (One Nation One Election) या प्रस्तावाला मोदी यांच्या मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य झालं आहे. यामुळे निवडणुकीत होणारा खर्च सुद्धा वाचण्यास मदत होणार आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ धोरण (One Nation One Election) कितपत शक्य आणि व्यवहार्य आहे, याचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत एक अहवाल सादर केला होता. या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे समजते. आता या धोरणाला संसदेत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. 5 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात वन नेशन-वन इलेक्शनचा उल्लेख केला होता. वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीत अडथळे आणत असल्याचे ते म्हणाले होते.

सरकारने आपला शब्द खरा करून दाखवला – (One Nation One Election)

खरं तर एक देश एक निवडणूक हि संकल्पना अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मोदी सरकारच्या मागच्या कार्यकाळापासूनच यावर गंभीर चर्चा सुरु होती. मात्र तेव्हा सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपकडून एक देश एक निवडणूक धोरणाचा पुनरुच्चार करण्यात आला होता. आता केंद्र सरकारने आपला शब्द खरा करून दाखवला आहे आणि या धोरणाला मान्यता दिली आहे. या प्रस्तावावरील विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. मात्र विरोधक या धोरणाबाबत काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहायला हवं.

PM Modi Gifts E-Auction | सुरु झाला PM मोदींच्या भेटवस्तूंचा ई-लिलाव; या वस्तूंचा असणार समावेश

PM Modi Gifts E-Auction

PM Modi Gifts E-Auction | आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजे 17 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. सामान्यतः आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी भेट वस्तू मिळतात. पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाढदिवसाची भेट वस्तू तसेच स्मृती चिन्ह भेटवस्तू म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा ई लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील असे त्यांनी सांगितलेले आहे. गेल्या वर्षभरात मोदींना अनेक भेटवस्तू मिळालेल्या आहेत. मोदींना गेल्या वर्षभरात जवळपास 600 वस्तू मिळालेल्या आहेत आणि त्यांचा लिलाव होणार आहे.

ई लिलावात कोणत्या भेट वस्तूंचा समावेश असणार | PM Modi Gifts E-Auction

या लिलावामध्ये पारंपारिक कलेची मालिका आहे. तसेच या चित्र गुंतवणुकीची शिल्पे, देसी हस्तकला, सुंदर लोक आदिवासी कलाकृती तसेच पारंपारिक वस्त्र, शाल, हेडगेअर औपचारिक तलवारी तसेच पारंपारिक सन्मानचिन्ह प्रतीके इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, “600 हून अधिक भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचा ऑनलाइन लिलाव केला जात आहे. ई-लिलावात सहभागी होणारे अधिकृत वेबसाइट https://pmmementos.gov.in/ ला भेट देऊ शकतात. द्वारे नोंदणी करून तुम्ही यात सहभागी होऊ शकता.

PM मोदींच्या भेटवस्तू 600 रुपयांनाही विकत घेता येतील

सर्वात कमी आधारभूत किमतीच्या भेटवस्तूमध्ये कापूस अंगवस्त्रम, टोपी आणि शाल यांचा समावेश आहे आणि त्यांची किंमत 600 रुपये आहे. दरवर्षीप्रमाणे या वेळीही पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळालेली रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दिली जाणार आहे. हा पैसा गंगा नदीच्या संवर्धनासाठी आणि तिच्या नाजूक परिसंस्थेच्या सुरक्षेसाठी भारत सरकारचा एक मोठा उपक्रम आहे.

पंतप्रधान मोदींना कोणत्या भेटवस्तूंची सर्वाधिक किंमत आहे?

यामध्ये पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते नित्या श्री सिवन आणि सुकांत कदम यांचे बॅडमिंटन रॅकेट आणि रौप्यपदक विजेते योगेश खातुनिया यांच्या ‘डिस्कस’चा समावेश आहे. त्यांची मूळ किंमत सुमारे 5.50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. पॅरालिम्पिक ब्रँड पदक विजेते अजित सिंग आणि सिमरन शर्मा आणि रौप्य पदक विजेता निषाद कुमार यांनी भेट दिलेल्या शूज व्यतिरिक्त, रौप्य पदक विजेते शरद कुमार यांनी स्वाक्षरी केलेल्या टोपीची मूळ किंमत सुमारे 2.86 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 5.50 लाख रुपयांची राम मंदिराची प्रतिकृती, 3.30 लाख रुपयांची मोराची मूर्ती, 2.76 लाख रुपयांची राम दरबारची मूर्ती आणि 1.65 लाख रुपयांची चांदीची वीणा या भेटवस्तू आहेत आणि त्यांची मूळ किंमत सर्वोच्च ठेवण्यात आली आहे ,

या लिलावात काय खास आहे?

लिलावाचा एक भाग भारताच्या शूर योद्ध्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित आहे, जे देशाच्या इतिहासातील गौरवशाली अध्याय साजरे करतात. या लिलावाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पॅरालिम्पिक गेम्स, 2024 मधील स्पोर्ट्स स्मृतीचिन्ह जे वेगवेगळ्या पदक विजेत्यांनी पंतप्रधान मोदींना दिले आहेत.

ई-लिलाव कोण आयोजित करतो? | PM Modi Gifts E-Auction

केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींच्या या भेटवस्तूंच्या लिलावासाठी सरकारी समिती आधारभूत किंमत ठरवते. ई-लिलावामधील किंमती किमान 600 रुपये ते कमाल 8.26 लाख रुपये आहेत. सर्व भेटवस्तूंच्या ई-लिलावाचा पर्याय सर्वसामान्यांसाठी खुला आहे आणि ते 600 रुपयांपासून ते सुमारे 8.25 लाख रुपयांच्या स्मृतीचिन्हांपर्यंतच्या भेटवस्तूंच्या ई-लिलावात सहभागी होऊ शकतात.

भेटवस्तूंचा हा ई-लिलाव किती दिवसांपासून सुरू आहे?

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची पहिली आवृत्ती जानेवारी 2019 मध्ये सुरू झाली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पंतप्रधानांच्या स्मृतिचिन्हांच्या यशस्वी लिलावाच्या मालिकेची ही सहावी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती जानेवारी 2019 मध्ये लाँच झाली. पाच आवृत्त्यांमध्ये आतापर्यंत 50 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. संस्कृती मंत्रालयाच्या मते, लिलावाचा एक भाग भारताच्या शूर योद्ध्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतो तसेच देशाच्या इतिहासातील गौरवशाली अध्याय साजरे करतो.