Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 462

तिसऱ्या आघाडीत MIM ला नो एन्ट्री; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

Bachchu Kadu MIM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून जोरदार तयारी सुरु असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचे काम चाललं आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या आघाडीबाबत लवकरच एक बैठक होणार आहे. मात्र तत्पूर्वी या तिसऱ्या आघाडीत एमआयएमला एंट्री मिळणार नाही असं बच्चू कडू ( Bachchu Kadu) यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “तिसऱ्या आघाडीने आम्ही महाशक्ती निर्माण करू. हि शक्ती जनतेची शक्ती असेल. उद्या आमची एक बैठक आहे. या बैठकीत राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, प्रकाश आंबेडकरांचे चुलत भाऊ राजदत्त आंबेडकर आणि इतर काही मुस्लिम संघटना असतील. ही एक वैचारिक बैठक असून यात आमचे सर्व मुद्दे स्पष्ट होतील. हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूकीला जाऊ. एमआयएमची प्रखरता पचवणं आम्हाला सहज शक्य होणार नाही. लोकांनाही ते शक्य होणार नाही. आमचा मुद्दा धर्म जातीच्या पलीकडे आणि कष्टकरी शेतकरी यांचा आहे. त्यामुळे धार्मिक कटूता निर्माण करणाऱ्या कोणत्याही पक्षापासून दूर राहण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी एमआयएमने महाविकास आघाडीसोबत सुद्धा आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली, माजी खासदार इम्तियाझ जलील यांनी तशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र महाविकास आघडीतील कोणत्याही नेत्याकडून त्यांना अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच आता बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीत सुद्धा एमआयएमला स्थान नसेल तर स्पष्टच सांगुन टाकलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमला एकला चलो चा नारा द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.

उपलब्ध गाड्यांचे आरक्षण फुल्ल ! दिल्लीसाठी धावणार विशेष रेल्वे

delhi train

राजधानी दिल्ली हे महत्त्वाचे शहर असून देशभरातून अनेक लोक इथं कामानिमित्त येत असतात. दिल्ली गाठण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून रेल्वे कडे पाहिलं जाते. रेल्वेने दिल्लीपर्यंतचा प्रवास अनेक लोक करतात. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंतचा प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे कडून दिल्लीला जाण्यासाठी 16 ,17 आणि 20 या तीन दिवशी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी १६ आणि १७ रोजी जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुटल्या आहेत मात्र अजूनही तुम्ही रेल्वेने दिल्लीला जाऊ इच्छित असाल तर २० तारखेच्या गाडीने तुम्ही प्रवास करू शकता.

महत्वाची बाब म्हणजे या गाड्या मिरज मार्गे जाणार असल्यामुळे उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना ट्रेन उपलब्ध झाली आहे. सांगली रेल्वे स्थानकाला यातील दोन गाड्यांचा थांबा मंजूर झाला आहे. दिनांक १८ रोजी सकाळी साडेदहा वाजता मिरज येथून मैसूर- निजामुद्दीन गाडी सुटणार आहे आणि सायंकाळी चार वाजून 25 वाजता ही गाडी पुणे येथून सोडणार आहे तर 19 रोजी रात्री अकरा वाजता निजामुद्दीन इथे पोहोचणार आहे

काय आहे वेळापत्रक ?

गाडी क्रमांक 0725 हुबळी निजामुद्दीन विशेष एक्सप्रेस ही गाडी दिनांक 20 रोजी रात्री नऊ वाजून 45 मिनिटांनी हुबळी इथून सुटेल दिनांक 21 रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी मिरज इथून व सकाळी आठ वाजून 45 वाजता पुणे इथून सोडणार आहे दिनांक 22 रोजी सकाळी साडेअकरा वाजता निजामुद्दीन इथं ही गाडी पोहोचणार आहे.

दोन गाड्या सांगलीत थांबणार

गाडी क्रमांक 0 6 2 1 5 म्हैसूर निजामुद्दीन व गाडी क्रमांक 06 585 या दोन्ही गाड्या अनुक्रमे 17 आणि 18 सप्टेंबरला सकाळी 11:45 वाजता सांगली स्थानकावर येणार आहेत व या दोन्ही गाड्यांची तिकीट उपलब्ध करण्यात आली आहेत

याबाबत माहिती देताना सांगली रेल्वे सल्लागार समितीचे उमेश शहा यांनी सांगितले की दिल्लीकडे जाणाऱ्या दोन विशेष रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला असून सांगली शहर व परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांनी सांगलीतून पुढील प्रवासाचे बुकिंग करावे. तर मध्य रेल्वेचे क्षत्रिय सल्लागार सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितले की, सध्या दिल्लीला नियमित जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा आरक्षण फुल आहे. त्यामुळे तात्काळ तिकिटाची वाट पहावी लागणार नाही रेल्वेची आरक्षित कन्फर्म तिकिटे उपलब्ध असल्याने विशेष रेल्वे गाड्यांचा कोल्हापूर मिरज सांगली प्रवाशांनी लाभ घ्यावा.

Virat And Gambhir Interview : काय सांगता!! विराट-गंभीरची एकत्र मुलाखत; नुसती धमाल (Video)

Virat And Gambhir Interview

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) … टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू.. मात्र जेव्हा जेव्हा दोघांचा विषय येतो तेव्हा तेव्हा आठवत ते फक्त त्यांच्यातील वाद आणि भाडणं.. भारतीय संघाकडून एकत्रित क्रिकेट खेळलेले हे दोन्ही महारथी आयपीएलमध्ये मात्र २ वेळा भर मैदानातच एकमेकांशी भांडताना संपूर्ण देशाने बघितलं आहे . त्यामुळे दोघांमध्ये नातं इतकं काही खास नाही असं बोललं जात होते. मात्र आता गंभीर हा टीम इंडियाचा मुख्य कोच बनलाय, तर कोहली अजूनही संघाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे दोघांच्याही नात्यात पुन्हा एकदा गोडवा आलाय. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने याबाबत थेट संकेत देत दोन्ही खेळाडूंचा एकत्रित मुलाखतीचा व्हिडिओ (Virat And Gambhir Interview) शेअर केला आहे. यामध्ये दोघेही एकमेकांची स्तुती आणि धमाल करताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओत? Virat And Gambhir Interview

तुम्ही या व्हिडिओत (Virat And Gambhir Interview) बघू शकता कि, कोहली आणि गंभीर खूप दिवसांनी असं मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत आणि एकमेकांचे कौतुक करत आहेत. गंभीरने आपल्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे क्षण आठवून संवादाला सुरुवात केली. तसेच ऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले. या व्हिडिओत गंभीर म्हणतो, मला आठवते की तुझी ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका किती आश्चर्यकारक होती. तू खूप धावा केल्या होत्या. त्या सीरिजने तुला झोनमध्ये आणले आणि माझ्यासाठी तोच झोन होता जेव्हा मी नेपियरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी केली होती. गंभीरने नेपियर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध १३७ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली होती. यानंतर गंभीर पुढे म्हणाला की, त्यानंतर तो कधीही त्या झोनमध्ये येऊ शकला नाही. तो पुढे म्हणाला की त्या झोनमध्ये राहून काय वाटतं याची मी कल्पना करू शकतो. माझ्यापेक्षा जास्त वेळा तुम्ही तो झोन अनुभवला असेल.

त्यानंतर कोहलीने गंभीरला विचारले की जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता आणि तुमचा विरोधी पक्षांशी थोडासा संवाद असतो, तेव्हा तुम्हाला असे वाटते का की ते तुम्हाला त्या झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला आऊट करण्याचा तो एक प्लॅन असतो तेव्हा तुम्ही स्वतःला कसे प्रेरित करता . कोहलीच्या प्रश्नाला गंभीरने लगेच उत्तर दिले आणि या प्रश्नाचे उत्तर माझ्यापेक्षा तू चांगले देऊ शकतो, कारण माझ्यापेक्षा तू मैदानावरील वादांना अनेकदा सामोरे गेला आहेस. यानंतर दोघेही हसायला लागतात. त्यानंतर कोहली म्हणतो की,मी तर माझ्याशी कोणीतरी सहमत व्हावं हे शोधतोय. हे चुकीचं आहे असं सांगत नाही. कोणीतरी म्हणावं हो, असचं होतं”. विराट आणि गंभीरच हा विडिओ भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खूपच मजेशीर आहे.

Viral Video | तरुणांना लाजवेल असा आजोबांचा उत्साह ! ‘खेळताना रंग बाई होळीचा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे, जिथे दररोज आणि फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ हे आपल्याला ज्ञान देणारे असतात, तर काही व्हिडिओ आपले मनोरंजन करत असतात. म्हणजे सोशल मीडिया कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला सोयीचे असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच एका वृद्ध आजोबांचा व्हिडिओ व्हायरल( Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये ते आजोबा मनसोक्त डान्सचा आनंद घेताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांचा डान्सचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. कोणत्याही प्रकारचे बंधन न ठेवता त्यांनी वयाचेही भान न ठेवता डान्स केलेला आहे. आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या आजोबांचा उत्साह पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एका लावणीच्या कार्यक्रमात आजोबांनी जबरदस्त डान्स केलेला आहे. त्यांनी खेळताना रंग बाई होळीचा या गाण्यावर ती चांगलाच ठेका धरलेला आहे. त्यांना पाहून आजूबाजूच्या लोकांचा उत्साह देखील वाढला. आणि त्यांनी आजोबांचा व्हिडिओ काढला. या गाण्यावर डान्स करताना आजोबांनी चष्मा देखील घातलेला आहे. या आजोबांचे वय 70 च्या आसपास असेल असा अंदाज लावला जात आहे. इतक्या वयातही त्यांचा हा डान्स आणि उत्साह पाहून सगळेजण त्यांच्या कौतुक करत आहे.

हा व्हिडिओ instagram वर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर करता क्षणार्धात वायरल झालेला आहे. अनेक लोक या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत आहे. तसेच अनेक नेटकरांनी या व्हिडिओवर कमेंट देखील केलेली आहे. एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, “आजोबाचा विषय हार्ड” तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “याला वय लागत नाही नाद लागतो.” अशाप्रकारे वेगवेगळ्या कमेंट करून नेटकरी आजोबांच्या डान्सचे कौतुक करत आहेत.

Fruits And Vegetables | महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला केला जाणार गोव्यातील विक्री केंद्राला लिंक; शेतकऱ्यांना होणार फायदा

Fruits And Vegetables

Fruits And Vegetables | महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला आता गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसत आहे. याबाबतची माहिती गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री रवींद्र नाईक यांनी दिलेली आहे. यावेळी गोव्याचे फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष यांनी फळ आणि भाजीपाला (Fruits And Vegetables) सप्लाय करण्याबाबत देखील सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

नागरिकांना फळे आणि भाजीपाला (Fruits And Vegetables) पुरवण्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. आणि याच अडचणींबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आलेली आहे. या बैठकीत पहिल्या टप्प्यात फळे पुरवठा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. गोवा सरकाराचा दीड हजार आउटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना भाजीपाला आणि फळे देण्याचा उपक्रम सुरू करणार आहे. हा उपक्रम आता गोवा राज्यातच राबवला जाणार आहे.

या बैठकीमध्ये अनेक लोक उपस्थित होते. गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कृषी भूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये कोल्हापूर शेतकरी शिष्टमंडळाने देखील भाजीपाला आणि फळे सप्लाय करण्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. यावेळी त्यांनी गोव्यातील फळे आणि भाजीपाला 20 विक्री केंद्रांना भेट दिलेली आहे आणि सविस्तर माहिती देखील घेतलेली आहे.

गोव्यामध्ये जे फळे आणि भाजीपाला (Fruits And Vegetables) विक्री केंद्र सुरू केलेले आहेत. हे केंद्र आपल्या देशासाठी एक आदर्श विक्री मॉडेल ठरणार आहे याबाबतची माहिती कृषी भूषण अंकुश पडवळे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहे. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा हा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे आता गोवा सरकारला देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या गरजेनुसार फळे आणि भाजीपाला विकत घेता येणार आहे. शिष्टमंडळाच्या बैठकीत हा एक मोठा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. अनेक लोक या बैठकीत सामील होते. आणि सगळ्यांच्या उपस्थिती हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Gold Price Today : पितृपक्षात सोने-चांदी झालं स्वस्त; पहा आजचे भाव

Gold Price Today 18 sept

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव संपल्यानंतर १७ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. पितृपक्ष १५ दिवस साजरा केला जातो. या काळात लोक आपल्या पूर्वजांना प्रसन्न करत असतात, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचं ऋण व्यक्त करतात. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये केली जात नाहीत असं म्हंटल जात. याच पार्श्वभूमीवर पितृपक्षाच्या सुरुवातीला सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुमच्या शहरात आज सोन्याचा भाव किती रुपये तोळा आहे याची माहिती जाणून घेऊयात….

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३१८० रुपयांनी सुरु झाला, मात्र मार्केट सुरु झाल्यापासून सोन्याच्या किमती घसरायला सुरुवात झाली. १० वाजून ३० मिनिटांनी सोन्याच्या किमतींनी ७२९१४ रुपयांचा निच्चांक गाठला. त्यानंतर या किमतीत थोडी वाढ पाहायला मिळाली. सध्या १ तोळा २४ कॅरेट सोने ७३०३० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत सुद्धा 336 रुपयांची घसरण झाली असून १ किलो चांदीचा दर 88734 रुपये आहे. भारतात वेगवगेळ्या शहरानुसार सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) सुद्धा वेगवेगळे आहेत.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 68, 500 रुपये
मुंबई – 68, 500 रुपये
नागपूर – 68, 500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 74, 730 रूपये
मुंबई – 74, 730 रूपये
नागपूर – 74, 730 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Royal Enfield Bullet 350 : 349cc इंजिनसह Royal Enfield ने लाँच केली बुलेट 350 बटालियन ब्लॅक

Royal Enfield Bullet 350

Royal Enfield Bullet 350 : आपल्या स्पोर्ट लूक आणि साठी आणि मजबूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या Royal Enfield ने बुलेट 350 बटालियन ब्लॅक बाईक लाख केली आहे. या बाईकचा लूक आधीपेक्षा खूपच रेट्रो दिसत आहे. एकूण पाच काळ्या रंगांमध्ये हि दिमाखदार अशी बुलेट ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याव्यतिरिक्त, ही बाईक आता स्टँडर्ड ब्लॅक, स्टँडर्ड मरून, ब्लॅक गोल्ड, मिलिटरी ब्लॅक, मिलिटरी रेड आणि मिलिटरी सिल्व्हररेड आणि मिलिटरी सिल्व्हरब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध आहे. आज आपण या नव्या बुलेटचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

Royal Enfield बुलेट 350 बटालियन ब्लॅक बाईकच्या सीट डिझाईनमध्ये आधीच्या बाइकपेक्षा मोठा बदल झालेला दिसतो. बुलेट 350 बटालियन ब्लॅकमध्ये सीटची कमी उंची आणि रायडरसाठी लंबर सपोर्ट आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करतानाही रायडर्सना आरामदायी फील अनुभवता येईल. हे रेट्रो सीट डिझाइन 1989 मध्ये लॉन्च झालेल्या 500cc बुलेटमध्ये दिसले होते. नवीन बुलेट 350 बटालियन ब्लॅक मॉडेलसह आणखी एक अपडेट म्हणजे पॉलीगोनल टेल लॅम्प. (Royal Enfield Bullet 350)

गाडीच्या लूक आणि डिझाईनबाबत सांगायचं झाल्यास, रॉयल एनफील्ड बुलेट 350 बटालियन ब्लॅकला हेडलॅम्प युनिट, सस्पेंशन, टर्न सिग्नल आणि हँडलबारवर क्रोम ॲक्सेंट मिळतात. बुलेटचे रियर-व्ह्यू मिरर काळ्या रंगाचे आहेत, जे बटालियन ब्लॅक मॉडेलचे आणखी एक खास असं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गाडीच्या इंधन टाकीवर दोन्ही बाजूंना आणि वरच्या भागात सोनेरी पिनस्ट्रिपिंग देखील मिळते.

इंजिन- Royal Enfield Bullet 350

इंजिनबाबत बोलायचं झाल्यास, नवीन बटालियन ब्लॅक मॉडेलमध्ये आधीसारखंच 349cc, सिंगल सिलेंडर एअर-ऑइल कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 5-स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्सला जोडलेलं असून 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. या बुलेट मध्ये सिंगल चॅनेल एबीएससह फ्रंट डिस्क आणि मागील ड्रम ब्रेक मिळतात. तसेच ABS सह ड्युअल डिस्क ब्रेक यामध्ये देण्यात आले आहेत.

किंमत किती?

Royal Enfield Bullet 350 च्या 5 कलर ऑप्शनची किंमत वेगवेगळी आहे. यातील मिलिटरी रेड आणि मिलिटरी ब्लॅकची किंमत 1,73,562 रुपये,बटालियन ब्लॅकची एक्स-शोरूम किंमत 1,74,875 रुपये, मिलिटरी सिल्व्हर रेड आणि मिलिटरी सिल्व्हर ब्लॅकची किंमत 1,79,000 रुपये , स्टँडर्ड – मरून आणि स्टँडर्ड – ब्लॅकची किंमत 1,97,436 रुपये आणि .ब्लॅक गोल्डची एक्स-शोरूम किंमत 2,15,801 रुपये आहे.

ST Mahamandal Bharati 2024 | ST महामंडळात या पदांसाठी नोकरीची संधी; अशाप्रकारे करा अर्ज

ST Mahamandal Bharati 2024

ST Mahamandal Bharati 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एसटी महामंडळात काम करण्याची एक मोठी संधी आहे. एस टी महामंडळाने नुकतीच एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. आणि या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे ज्यांना एसटी महामंडळात काम करायचे होते, त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी लाडकी भाऊ भाऊ योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गतच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एसटी महामंडळात (ST Mahamandal Bharati 2024) भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती एसटी महामंडळाच्या यवतमाळ या विभागात आयोजित करण्यात आलेली आहे. आता ही भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | ST Mahamandal Bharati 2024

यवतमाळ एसटी महामंडळ मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लिपीक, सहाय्यक शिपाई आणि इलेक्ट्रिशियन या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

यावरती अंतर्गत तब्बल 68 रिक्त पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कमीत कमी दहावी पास किंवा आयटीआय, डिप्लोमा पास असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या पदांनुसार 6 हजार रुपये ते 10 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Ganpati Arrested : गणपती बाप्पाला अटक?? तणाव वाढला, हिंदू समाजात संताप

Ganpati Arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातुन एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गणपतीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चक्क गणपतीची मूर्ती ताब्यात घेतल्याचा फोटो व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या अनोख्या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्नाटकातील पोलिस कारवाईव्यतिरिक्त महाराष्ट्रातील हिंदू समाजात सुद्धा प्रशासनाबाबत निराशेची लाट आहे. धार्मिक कार्यक्रमात देवाची मूर्ती जप्त केल्याचे चित्र भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे.

खरं तर गणपती बाप्पा हिंदूंचे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला हिंदू समाजात मोठं स्थान आणि मान आहे. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपतीच्या आरतीला हजेरी लावली, त्यावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीनेही टीका केली होती. मात्र या सगळ्यातच कर्नाटकातील गणपती बाप्पाच्या मूर्ती जप्त केल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. कर्नाटकात काँग्रेसशासित सरकार आहे. त्यामुळे हिंदू संघटना आणि संपूर्ण समाज या एकूण प्रकरणावर चांगलाच आक्रमक झाला.

भाजपचा काँग्रेसला आरसा –

2009 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि केजी बालकृष्णन सरन्यायाधीश होते. मनमोहन सिंग यांनी सरकारी निवासस्थानात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात सरन्यायाधीशही उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या गणपती आरतीवर आक्षेप घेणारे विरोधकांना मनमोहन सिंग आणि बालकृष्णन यांच्या घटनेचा विसर पडला का? असा सवाल भाजपकडून केला जात आहे.

मात्र जस दिसतंय तस अजिबात नाही… गणपती बाप्पाची मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली नसून मूर्तीच्या सुरक्षतेसाठीच पोलीस गाडीत ठेवण्यात आली होती. माहितीनुसार, कर्नाटकातील मंड्या येथे गणेश विसर्जन दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलकांचा एक गट बेंगळुरूच्या टाऊन हॉलसमोर निदर्शने करत होता. हे आंदोलक गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील गणेशमूर्ती काढून पोलीस व्हॅनमध्ये ठेवली. नंतर या मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले. याबाबत बेंगळुरूचे डीसीपी सेंट्रल शेखर आरएच टेकनवार यांनी म्हंटल कि, लोकांचा एक गट उच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध करत होता आणि यावेळी त्यांच्यासोबत गणपतीची मूर्तीही होती. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण विधीपूर्वक गणेशमूर्तीचे विसर्जन केले.

EPFO सदस्यांसाठी गुड न्यूज ! आता PF खात्यातून काढू शकता इतकी रक्कम

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांच्यासाठी निवृत्तीनंतर पेन्शन योजना असते परंतु जे खाजगी नोकरी करतात. त्यांच्यासाठीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही संघटना आहे. या मध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम या खात्यात टाकली जाते. आणि निवृत्तीनंतर त्यांनाही रक्कम वापरता येते. त्यांचे निवृत्तीनंतरच्या आयुष्य सुखकर आणि आरामदायी व्हावे, यासाठी ही योजना आहे अशातच आता ईपीएफओ सदस्यांसाठी एक सगळ्यात मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल झालेले आहे. ते म्हणजे आता कर्मचारी त्यांच्या ईपीएफओ खात्यातून त्यांच्या आर्थिक गरजांसाठी एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. आधी ही रक्कम काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये इतकी होती. परंतु केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी मोठी बातमी दिलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसत आहे.

याबाबत कामगार मंत्रालयाने ईपीएफओच्या नवीन डिजिटल आर्किटेक्चर सहकाही बदल दाखवलेले आहेत. यामध्ये अनेक चांगल्या नियमांचा देखील समावेश केलेला आहे. सदस्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये. या सगळ्याचा विचार करूनच हे नियम बदललेले आहे. त्याचप्रमाणे जे कर्मचारी नवीन नोकरी करत आहेत. म्हणजेच नोकरी करताना त्यांचे सहा महिने पूर्ण झालेले नाहीत, आता ते नागरिक देखील ही रक्कम काढण्यास पात्र आहे परंतु पूर्वी ही रक्कम नवीन नोकरी करणाऱ्या लोकांना काढता येत नव्हती. परंतु हे नियम आता शिथील करण्यात आलेले आहे.

यासंबंधी माहिती देताना असे जे कामगार मंत्री मनसुख मांडीविया यांनी सांगितले की, “लग्न तसेच वैद्यकीय उपचार यांसारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोक ईपीएफओची मदत घेतात. त्यामुळे आम्ही एका वेळी पैसे काढण्याची मर्यादा एक लाखापर्यंत वाढवलेली आहे. आत अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.”प्रॉव्हिडंट फंड या संघटित क्षेत्रातील दहा लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे उत्पन्न देत असतात. ईपीएफओ हा लोकांसाठी बचतीचा एक मुख्य भाग आहे.

आता या ईपीएफ खाते संबंधित एका महत्त्वाच्या बदलांमध्ये सरकारने ईपीएफओचा भाग नसलेल्या संस्थांना राज्य संचलित सेवानिवृत्ती व्यवस्थापकाकडे जाण्याची देखील सूट दिलेली आहे. व्यवसायिकांना त्यांच्या खाजगी सेवानिवृत्ती योजना चालवण्याची परवानगी आहे.
याबाबत ते म्हणाले की, अशा एकूण 17 कंपन्या आहेत. ज्यात एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी 1000 कोटींचा निधी आहे. परंतु जर त्यांना त्यांच्या स्वतःच्या निधीऐवजी ईपीएफओमध्ये स्विच करायचे असेल, तर यासाठी त्यांना परवानगी देण्यात येईल.

त्याचप्रमाणे 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या फर्मसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि त्यांच्या तरतुदी अधिनियम 1952 अंतर्गत बचत करणे अनिवार्य आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातील किमान 12 टक्के रक्कम ही भविष्य निर्वाह निधीमध्ये कापली जाते. सरकारने घेतलेल्या या नवीन काही निर्णयांचा कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.