Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 468

40 गद्दारांचा सूड घ्यायचाय; मराठवाड्यात संजय राऊतांची तोफ धडाडली

sanjay raut on shinde group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड करून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आणि भाजपसोबत सत्तास्थापन केली, या घटनेला २ वर्षाहून अधिक काळ गेला, मात्र अजूनही शिवसैनिकांच्या मनातील जखम ताजी आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्याला या ४० गद्दारांचा सूड घ्यायचा आहे असं म्हणत थेट इशारा शिंदे गटाला दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी एका जाहीर सभेत बोलताना संजय राऊतांनी शिंदे गट आणि सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली.

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला सुखाचे दिवस येतील. मग राज्यातील शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, निवृत्त सैनिक आणि महिला असतील, या सर्वांचा विचार करनारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संपूर्ण देशात कोरोनाचे संकट थैमान घालत होते. मोदींच्या आणि योगींच्या राज्यात हजारो कोरोनाग्रस्त मृतदेह गंगेत फेकली जात होती. त्यावेळेला या महाराष्ट्रात आपला कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राची काळजी घेत होते, त्यांनी आपल्याला आधार दिला. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे आजारी पडले तेव्हा या ४० गद्दारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून आपलं सरकार पाडलं. त्याचा बदला आणि सूड आपल्याला घ्यायचा आहे असं संजय राऊतांनी म्हंटल.

यावेळी संजय राऊत यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. काही ठिकाणी प्रचंड महापूर येऊन गेला, लोकांची घरे आणि शेती पूर्णपणे वाहून गेली. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात येऊन गेलो, पण सरकार अजून शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं नाही. या राज्याचे कृषिमंत्री याच मराठवाड्यातील आहेत. मात्र खाली चिखल आहे म्हणून पुरग्रस्तांची पाहणी करताना ते गाडीतुन खालीही उतरले नाहीत. आपल्या पायाला माती लागेल म्हणून जो कृषिमंत्री गाडीतून खाली उतरत नाही अशा लोकांचं राज्य आपल्याला घालवायचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर घणाघात केला.

Warivo CRX Electric Scooter : 90 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमत 79,999 रुपये

Warivo CRX Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती येत आहेत. वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Varivo Motor ने हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रथमच Varivo CRX लाँच (Warivo CRX Electric Scooter) केली आहे. कंपनीने 79,999 रुपयांत हि इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 90 KM पर्यंत अंतर पार करेल असा दावा केला जात आहे. चला तर मग याबाबत अगदी सविस्तर जाणून घेऊयात…

डिझाईन-

Varivo CRX च्या लुक आणि डिझाईनबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये मजबूत प्लास्टिक बॉडी वापरण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता चांगला असो वा खडबडीत असो, स्कुटरला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये, 42 लिटरची बूट स्पेस, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि टर्न इंडिकेटर, आरामदायी आणि रुंद सीट, मजबूत शॉकर्स, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम, टेलिस्कोपिक सस्पेंशन यासह अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. सर्व वयोगटातील पुरुषांना तसेच महिलांच्या सुद्धा गरजा लक्षात घेऊन ही स्कूटर सादर करण्यात आली आहे.

90 किलोमीटरपर्यंत रेंज – Warivo CRX Electric Scooter

Varivo CRX इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.3 kwh बॅटरी आहे. हि बॅटरी फुल्ल चार्ज केल्यानंतर इको मोडमध्ये इलेक्ट्रिक स्कुटर 85-90 किलोमीटरपर्यंत रेंज देते तर पॉवर मोडमध्ये 70-75 किलोमीटरपर्यंत प्रवास तुम्ही करू शकता. यामध्ये वापरण्यात आलेली बॅटरी जलरोधक, अग्निरोधक आणि ब्लास्ट-प्रूफ आहे त्यामुळे स्कुटरला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 150 किलोग्राम पर्यंत लोड सहन करण्याची क्षमता या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये आहे. (Warivo CRX Electric Scooter)

किंमत किती?

या इलेक्ट्रिक स्कुटरची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक लाल, पांढरा, ग्रे, निळ्या आणि काळ्या रंगात हि इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू शकतात. लवकरच Varivo CRX इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

चीनच्या मुद्द्यावरून खर्गेंचा मोदींवर गंभीर आरोप; देशासाठी घातक असल्याचे मत

Mallikarjun Kharge Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) गंभीर आरोप केला आहे. मोदींचे चीनवरील अपार प्रेम भारताच्या आर्थिक आणि भौगोलिक सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका आहे. गलवानमध्ये शहीद झालेल्या आपल्या २० शूर जवानांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून चीनला क्लीन चिट देण्यात आली आहे. मोदी सरकारने याआधीच चिनी नागरिकांना व्हिसा देणे सोपे केले असून चिनी गुंतवणुकीची तयारीही सुरू आहे. ॲपवर बंदी घालणे हा केवळ दिखावा होता, मोदी सरकार आता उघडपणे चिनी गुंतवणुकीचा पुरस्कार करत आहे असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

खर्गे यांचं ट्विट काय?

मोदींचे चीनवरील अपार प्रेम भारताच्या आर्थिक आणि भौगोलिक सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका आहे.आता परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे की, चीनसोबत 75% संबंध तोडण्यात आले आहेत. हा तोच परराष्ट्र मंत्री आहे ज्याने एप्रिल 2024 मध्ये मोदीजींच्या क्लीन चिटची कॉपी करून “चीनने आमची एकही जमीन ताब्यात घेतली नाही” असे विधान केले होते.चीनबाबत संसदेत विरोधकांच्या प्रश्नांवर पंतप्रधान आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री गप्प राहतात, पण परकीय भूमीवर विधाने करत राहतात, हे विचित्र आहे.

गलवानमध्ये शहीद झालेल्या आपल्या २० शूर जवानांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून चीनला क्लीन चिट देण्यात आली. डेपसांग मैदान, डेमचोक नाला आणि हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा पोस्टमधील अनेक पेट्रोलिंग पॉईंटपासून भारत अजूनही वंचित आहे हे खरे नाही का? मे 2020 मध्ये अनेक उल्लंघनाच्या ठिकाणी भारताच्या दावा केलेल्या रेषांमध्ये बफर झोन तयार करून, मोदी सरकारने चीनच्या बाजूने वास्तविक पूर्वाग्रह मंजूर केला हे खरे नाही का? असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

“मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” मध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले मोदी सरकार आता डोकलाम आणि गलवानला विसरून चिनी कंपन्यांसाठी “रेड कार्पेट” घालण्यात व्यस्त आहे. मोदी सरकारने याआधीच चिनी नागरिकांना व्हिसा देणे सोपे केले असून चिनी गुंतवणुकीची तयारीही सुरू आहे. गलवानपासून चिनी वस्तूंच्या आयातीत ५६% वाढ झाली आहे. ॲपवर बंदी घालणे हा केवळ दिखावा होता, मोदी सरकार आता उघडपणे चिनी गुंतवणुकीचा पुरस्कार करत आहे. स्विंग-डिप्लोमसीपासून गुजरातमधील गलवान शोकांतिकेपर्यंत…PMCARES मधील चिनी निधीपासून अयशस्वी PLI योजनेत चिनी सहभागापर्यंत… सरकारचे आवडते SEBI चेअरपर्सनही चिनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास अजिबात विरोध करत नाहीत, यात नवल नाही. नवीन खुलासे हे सिद्ध करतात की बरेच काही गुपित आहे. मोदींची चीनशी असलेली ओढ देशासाठी घातक आहे असं म्हणत खर्गे यांनी हल्लाबोल केला.

गडकरींच्या मनात पंतप्रधान होण्याची इच्छा, म्हणूनच थेट मोदींना इशारा?

Nitin Gadkari Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी ती ऑफर नाकारली असा मोठा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गडकरींना कोणी सल्ला दिला असेल तर त्यात चुकीचं काही वाटत नाही असं संजय राऊत यांनी म्हंटल होते, मात्र ठाकरे गटाच्या आणखी एक नेत्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मात्र वेगळंच मत मांडलं आहे. गडकरींच्या मनात पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, त्यांनी विरोधकांच्या नावाखाली थेट मोदींनाच संदेश दिलाय असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हंटल आहे.

नितीन गडकरीजी सर्वोच्च खुर्चीवर बसण्याची मनापासून इच्छा व्यक्त करत आहेत, विरोधी पक्षांच्या बहाण्याने ते मोदीजींना इशारा देत आहेत. इंडिया आघाडीकडे देशाचे नेतृत्व करू शकणारे अत्यंत सक्षम नेते आहेत, त्यामुळे पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीला भाजपकडून उसना नेता घेण्याची गरज आणि इच्छा नाही. गडकरीजी तुम्ही चांगली खेळी करताय असं ट्विट प्रियांका चतुर्वेदी यांनी केलं आहे.

गडकरी काय म्हणाले होते?

नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मी त्या नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. विरोधी पक्षाच्या कोणत्या नेत्याने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) पंतप्रधान पदाची ऑफर दिली हे मात्र गडकरींनी सांगितलं नाही. मात्र त्यांच्या या नव्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा नितीन गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं हे मात्र नक्की….

राऊत म्हणतात यात चुकीचे काय?

संजय राऊत यांनी मात्र आपल्याला यात चुकीचे असं काहीच वाटत नसल्याचे म्हंटल आहे. नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वसामान्य असे नेते आहेत. पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही सुरु आहे. गेल्या दहा वर्षांपासून आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याच्याशी तडजोड करु नका, त्या प्रवृत्तीशी तडजोड करु नका, ही भूमिका जर विरोधी पक्षातील एखाद्या प्रमुख नेत्याने त्यांच्यापुढे कोणी मांडली असेल, तर त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही असं राऊत यांनी म्हंटल.

आज जे कोणी सरकारमध्ये बसून देशातील मूल्यांची तडजोड करत आहेत तो एक राष्ट्रीय अपराध आहे. नितीन गडकरी या सगळ्याच्या विरोधात बोलत राहिले, आपला आवाज मांडत राहिले. म्हणूनच त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या नेत्याने सल्ला दिला असेल तर फास त्रास होण्याचे कारण नाही. जगजीवन राम यांनी १९७७ साली काँग्रेस पक्षातून याच मुद्द्यावरुन बंड केले होते. देशात लोकशाही टिकवायची असेल तर काही जणांना सत्तेचा त्याग करावा लागतो, असं संजय राऊतांनी म्हंटल.

Arvind Kejriwal : 2 दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी मोठी घोषणा केली आहे. २ दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारा आहे असं केजरीवाल यांनी म्हंटल आहे. मनीष सिसोदिया हे सुद्धा मुख्यमंत्री होणार नाहीत, तर नवा कोणता तरी चेहरा दिल्लीचा मुख्यमंत्री होईल, याबाबतचा निर्णय विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. केजरीवाल यांच्या या निर्णयाने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

…. तोपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही- Arvind Kejriwal

कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘मी आजपासून दोन दिवसांनी राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता केजरीवाल प्रामाणिक असल्याचा निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. काही लोक म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत, गेल्या 10 वर्षांत त्यांनी अटी लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. केंद्र सरकारने कायदा करून माझे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तो काळ सुद्धा आम्ही अनुभवला आहे. मात्र जनतेच्या आशीर्वादाने भाजपच्या सर्व कारस्थानांना तोंड देण्याची ताकद आमच्यातआहे. आम्ही भाजपपुढे झुकणार नाही, थांबणार नाही आणि विकले सुद्धा जाणार नाही असं म्हणत केजरीवाल यांनी भाजपला इशारा दिला.

मला न्यायालयाकडून न्याय मिळाला आहे. आता जनतेच्या न्यायालयात जाऊन मी न्याय मागणार आहे. जनता सुद्धा नक्कीच मला न्याय देईल. दिल्ली विधानसभा निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत, मात्र लवकरात लवकर निवडणूक व्हाव्यात अशी आमची मागणी असल्याचे केजरीवाल यांनी म्हंटल. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राबरोबरच दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका व्हाव्यात असं केजरीवाल म्हणाले. जर तुम्हाला केजरीवाल प्रामाणिक वाटत असतील तर त्यांच्या बाजूने मतदान करा असं केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.

देशात लोकशाही टिकवायची असेल तर… ; गडकरींच्या पंतप्रधानपदाच्या ऑफरवर राऊत स्पष्ठच बोलले

Sanjay Raut Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी ती ऑफर नाकारली असा मोठा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारला असता गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात काय चूक आहे? असा उलट सवाल राऊतांनी केला. तसेच ज्या कोणत्या नेत्याने गडकरींना हा सल्ला दिला असेल, मला यात काहीही चुकीचं वाटत नाही असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वसामान्य असे नेते आहेत. पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही सुरु आहे. गेल्या दहा वर्षांपासून आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याच्याशी तडजोड करु नका, त्या प्रवृत्तीशी तडजोड करु नका, ही भूमिका जर विरोधी पक्षातील एखाद्या प्रमुख नेत्याने त्यांच्यापुढे कोणी मांडली असेल, तर त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही असं राऊत यांनी म्हंटल.

आज जे कोणी सरकारमध्ये बसून देशातील मूल्यांची तडजोड करत आहेत तो एक राष्ट्रीय अपराध आहे. नितीन गडकरी या सगळ्याच्या विरोधात बोलत राहिले, आपला आवाज मांडत राहिले. म्हणूनच त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या नेत्याने सल्ला दिला असेल तर फास त्रास होण्याचे कारण नाही. जगजीवन राम यांनी १९७७ साली काँग्रेस पक्षातून याच मुद्द्यावरुन बंड केले होते. देशात लोकशाही टिकवायची असेल तर काही जणांना सत्तेचा त्याग करावा लागतो, असं संजय राऊतांनी म्हंटल.

गडकरी काय म्हणाले होते?

नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मी त्या नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. विरोधी पक्षाच्या कोणत्या नेत्याने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) पंतप्रधान पदाची ऑफर दिली हे मात्र गडकरींनी सांगितलं नाही. मात्र त्यांच्या या नव्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा नितीन गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं हे मात्र नक्की….

पृथ्वीला मिळणार 2 चंद्र!! अवकाशात घडणार मोठी खगोलीय घटना

Moon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या सौरमालेमध्ये अनेक ग्रह तारे एकमेकांभोवती परिभ्रमण करत असतात. सूर्यमालेत पृथ्वी, चंद्र, सूर्य यासोबत गुरु, शुक्र, शनि, बुध यांसारखे अनेक ग्रह आहेत. प्रत्येक ग्रहाला त्यांच्याशी वेगळे काही चंद्र आहेत. शनी या गृहाभोवती 146 चंद्र फिरत असतात. तर पृथ्वीला केवळ एकच चंद्र आहे. आणि तो पृथ्वीभोवती फिरत असतो. पृथ्वीला एकच चंद्र आहे. हे शतकानुशतकापासून चालत आलेल्या एक मोठा सत्य आहे. पण आपल्या अवकाशामध्ये काहीतरी खगोलीय घटना घडत असतात. त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होत असतो. आणि अशातच या खगोलीय घटनेमुळे आता दोन महिन्यासाठी आपल्या पृथ्वीला आणखी एक चंद्र पाहायला मिळणार आहे. त्याला मिनी चंद्र असे नाव ठेवण्यात आलेले आहे. अमेरिकन ऍस्ट्रॉनॉमिकल यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातून अशी माहिती समोर आलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मिनी चंद्र 7 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्यांदा दिसलेला आहे.

त्यांनी दिलेल्या अहवालात असे सांगितले आहे की, अवकाशात जेव्हा कोणतीही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यावर त्याच्या मार्गाला अनुसरून अशी वाटचाल करत असते. त्या वस्तूचा वेग हा पृथ्वीच्या सूर्यमालेत परिभ्रमणाच्या वेगाच्या तुलनेत खूप कमी असतो. त्यामुळे ही वस्तू ठरलेल्या मार्गाने पुढे निघून जाते. या घटनेला मिनीमुन असे म्हणतात. संशोधकांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही अवकाशातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. त्यावेळी आपल्याला पृथ्वीला दोन चंद्र दिसतात.

हे कशामुळे घडते ?

मिनी चंद्र ही घटना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाहायला मिळते. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या काळामध्ये लघुग्रह हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येईल. त्यानंतर काही काळ हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरतील. परंतु त्याचे परिभ्रमण पूर्ण करणार नाही. या खगोलीय घटनेमुळे अवकाशात काही काळासाठी एक नवीन पाहुणा दिसेल तो अगदी चंद्रासारखा हुबेहूब दिसेल.तो चंद्राप्रमाणे असेल चंद्रापेक्षा त्याचा आकार खूप कमी असणार आहे. तो एका लघुग्रहाच्या रूपात सगळ्यांना दिसणार आहे.

शास्त्रज्ञांनी त्याचे नाव 2024 पिटी5 असे ठेवले आहे. हा लघुग्रह अवकाशात पहिल्यांदा 7 ऑगस्ट रोजी दिसला होता. त्यावेळी त्याचा व्यास 10 मीटर इतका होता. हा मिनी चंद्र खूपच लहान असणार आहे. त्यामुळे अगदी तुम्ही टेलिस्कोपने जरी पाहिले, तरी तो स्पष्टपणे दिसणार नाही. खगोल शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार असे मिनी मून याआधी देखील दिसले आहेत. या आधी अशा घटना 1981 आणि 2022 मध्ये घडलेले आहे. परंतु त्याचा आकार अगदी लहान होता. आणि वेग देखील जास्त होता त्यामुळे ओळखता आलेले नाही.

रोहित शर्मा म्हणजे माझ्यासाठी ‘लगान’ मधील अमीर खान; युवा खेळाडूने केलं कौतुक

rohit sharma sarfaraz khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नेहमीच युवा खेळाडूंना पाठिंबा देत असतो. कोणतेही टेन्शन न देता नव्या खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य रोहितच्या नेतृत्वाखाली मिळत असते. आजपर्यंत रोहितने अनेक नवे खेळाडू घडवले आहेत. सर्वांशी हसतखेळत राहणारा रोहित त्यामुळेच प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. आता टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) यानेही आपल्या कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केलं आहे. रोहित शर्मा म्हणजे माझ्यासाठी लगान चित्रपटातील आमिर खान आहे असं सर्फराजने म्हंटल.

जिओ सिनेमावर बोलताना सर्फराज खान म्हणाला, माझा आवडता चित्रपट लगान आहे आणि त्यात आमीर खानने ज्या पद्धतीने काम केले आहे, अगदी तसेच मला रोहितकडे बघितल्यानंतर वाटत. जेव्हा मी रोहित भाई कडे बघतो तेव्हा मला तो लगान चित्रपटाची आमिर खान वाटतो, माझ्यासाठी तो लगान मधील आमिरच आहे. त्याच्यासोबत असताना आपल्या कुटुंबातीलच कोणीतरी आहे असं फील होते. तो नेहमीच मला मोठ्या भावासारखा वाटतो. रोहितला बघण्यात आणि त्याच्यासोबत खेळण्यात एक वेगळीच मजा येते. रोहित कधीही ज्युनिअर- सिनिअर भेद करत नाही, तर सर्वाना समान वागवतो. रोहित शर्मा खूप सकारात्मक बोलतो, आणि हिंमत देतो. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो असं म्हणत सर्फराज खानने रोहितवर स्तुतिसुने उधळली.

दरम्यान, 26 वर्षीय सरफराज खानने भारतासाठी आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 5 डावात 200 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही सर्फराजने दमदार कामगिरी केली आहे. सरफराजने फर्स्ट क्लासमध्ये ४१६७ धावा, लिस्ट ए मध्ये ६२९ धावा आणि टी-२० मध्ये ११८८ धावा केल्या आहेत. याशिवाय आयपीएलचे ५० सामनेही ती खेळले असून त्यात त्याने ५८५ धावा केल्या आहेत. 19 सप्टेंबरपासून, बांगलादेशविरुद्ध च्या कसोटीसाठी सर्फराजची संघात निवड करण्यात आली असून त्याच्याकडून टीम इंडियाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Ration Card | ‘या’ लोकांचे रेशन कार्ड 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे रद्द; वाचा सविस्तर

Ration Card

Ration Card | सरकार मार्फत नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात यातील. असे सगळ्यात मोठी आणि फायद्याची योजना म्हणजे रेशन कार्ड (Ration Card) योजना. अशातच आता रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी सरकारकडून समोर आलेली आहे. ती म्हणजे आता पुढील महिन्यापासून लोकांना राशन मिळणार नाही. ज्या लोकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई केवायसी केले नाही. त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून रेशन मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई केवायसी केले नाही. तर तुम्ही पुढील महिन्यात धान्य मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत जे ई केवायसी करणार नाही. त्यांचे पूर्ण रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. जर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून तुमची नावं वगळली, तर तुमचे रेशन कार्ड देखील रद्द केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ई केवायसी केले नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या. अन्यथा तुमच्या रेशन कार्ड बंद होऊ शकते.

आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत रेशन मिळवण्यासाठी कुटुंबियांसाठी पीओएस मशीन द्वारे नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी करणे आवश्यक आहे. याद्वारे रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांची ई-केवायसी बायोमेट्रिक तपासणी केली जाते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आलेले आहे. आणि त्यांच्या आदेशाचे पालन केले बंधनकारक केलेले आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे लोक केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना इथून पुढे राशन दिले जाणार नाही. तसेच जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर तुमचे राशन कार्ड देखील रद्द केले जाईल. संपूर्ण राज्यात रेशन दुकानात ई केवायसी करण्यासाठी सध्या गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु जर अजूनही तुम्ही केवायसी केले नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे लागेल. तुमचे एक केवायसी आधार कार्ड लिंक झाल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर ग्राहकांच्या बोटांचे ठसे घेतले जाईल. सरकारकडून 30 सप्टेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्याचे आव्हान देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही ई केवायसी केले नाही, तर तुम्ही यांपासून वंचित रहा त्यामुळे आता लवकरात लवकर करून घ्या.

Railway Recruitment 2024 | रेल्वे अंतर्गत मेगा भरतीला सुरुवात; भरली जाणार तब्बल ८११३ पदे

Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेकांना झालेला आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती 8113 पदांसाठी होणार आहे. आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झालेली आहे. रेल्वे भरती मंडळ(Railway Recruitment 2024) अंतर्गत ही भरती चालू झालेली आहे.13 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

भरती |Railway Recruitment 2024

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी साठी ही भरती राबवली जात आहे.

रिक्त जागा

या भरती अंतर्गत तब्बल 8113 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेणे गरजेचे आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख

14 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी 18 ते 36 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क |Railway Recruitment 2024

या भरती अंतर्गत खुल्या गटातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी, महिला, माजी सैनिक उमेदवारांना 250 रुपये शुल्क असणार आहे.

रिक्त जागा

  • मुख्य व्यवसायिक कम तिकीट पर्यवेक्षक – 1736 जागा
  • स्टेशन मास्तर – 994 जागा
  • गुड्स ट्रेन मॅनेजर – 1507 जागा
  • कनिष्ठ लेखक सहाय्यक सह टंकलेखक – 732 जागा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा