Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 469

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, आता दर 2:30 मिनिटांनी मिळणार लोकल; नव्या सिस्टीममुळे वेळ वाचणार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेन (Mumbai Local Train) … असं समजा कि या लोकल ट्रेनवरच मुंबईकरांचं आयुष्य अवलंबून असतंय. कारण नोकरदार वर्ग दररोज लोकलच्या माध्यमातूनच आपल्या कामाच्या ठिकाणी पोचत असतो. त्यामुळे जर लोकल ४-५ मिनिटे जरी लेट झाली तरी संपूर्ण दिवसाचे गणित बिघडत. अनेकदा कोलमडणारे वेळापत्रक, तसेच तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांना ताटकळत राहण्याची वेळ येते. परंतु आता यावर मार्ग काढण्यात आला आहे. मुंबईकरांना आता दर २:३० मिनिटांनी लोकल ट्रेन मिळणार आहे. त्यासाठी नव्या सिस्टीमवर काम सुरु असून प्रवाशांचा वेळ नक्कीच वाचणार आहे.

वेळेचे अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत – Mumbai Local Train

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी लोकल ट्रेनसाठीच्या (Mumbai Local Train) नव्या प्रणालीविषयी माहिती दिली. रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे असं त्यांनी म्हंटल. सीबीटीसीयंत्रणेने सुसज्ज असणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरणार आहे. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला.

कवच ही स्वदेशी अँटी कॉलिजन यंत्रणा आहे, तर सीबीटीसीची जबाबदारी गाड्यांमधील अंतर कमी करण्याची आहे. दोन्ही तंत्रज्ञानाच्या विलीनीकरणामुळे मुंबईच्या उपनगरीय प्रवासात नवीन क्रांती होईल. CBTC हा मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (MUTP) फेज 3A च्या घटकांपैकी एक आहे जो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने विकसित केला आहे. या नवीन प्रयोगामुळं अपघात तर कमी होतीलच याशिवाय दोन गाड्यातील अंतरदेखील कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे प्रवाशांना जास्त वेळ रेल्वे स्थानकावर ताटकळत थांबावं लागणार नाहीये. या नव्या सिस्टीममुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होणार आहे. मात्र हि प्रणाली कधीपासून सुरु होणार हे मात्र अजून समोर आलेलं नाही.

कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास; उर्वरित कर्ज कोण फेडणार? जाणून घ्या नियम

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना मोठमोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याची गरज लागते. कारण एक रकमी त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात. त्यामुळे अनेक लोक बँकांमधून कर्ज घेतात. आजकाल कर्ज घेण्याची सुविधा देखील अत्यंत सहज आणि सोपी झालेली आहे. बँकांच्या माध्यमातून कर्ज घेणे अगदी सोपे झालेले आहे. अनेक लोक होम लोन, कार लोन तसेच वैयक्तिक लोन यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड देखील मोठ्या प्रमाणात आलेला आहे. क्रेडिट कार्ड हा देखील कर्जाचा एक प्रकार आहे. तुम्ही बँकेचे पैसे आधी वापरता आणि त्यानंतर तुम्हाला या क्रेडिट कार्डचे बिल भरावे लागते. जेव्हा आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतो. तेव्हा त्या बँकेच्या अनेक अटी असतात. त्यांच्या नियमात राहूनच आपल्याला ते कर्ज देत असतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले आणि अचानक त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशावेळी कर्जाची परतफेड कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

होम लोन

जर कोणत्याही व्यक्तीने होम लोन घेतले असेल, तर त्या बदल्यात आपण बँकेकडे तारण म्हणून घराचे कागदपत्र किंवा जेवढे कर्ज घेतले आहे, त्या रकमेची कोणती तरी मालमत्ता ठेवतो. परंतु जर तुम्ही होम लोन घेतल्यानंतर मध्येच अर्जदाराचा मृत्यू झाला, तर त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही व्यक्तीचा वारस किंवा त्याच्यासोबत जो कोणी अर्जदार असेल त्याच्यावर असते. परंतु जर या कर्जाचे परतफेड केली नाही, तर बँक कर्ज ठेवलेली तारण मालमत्ताचा लिलाव करते आणि पैसे वसूल करते.

कार लोन

सध्या कार खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक लोल कार खरेदी करण्यासाठी लोन घेत असतात. जर एखाद्या व्यक्तीने गाडी खरेदी केली आणि मध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ते कर्ज त्या व्यक्तीचे वारस किंवा कुटुंबातील सदस्यांना परतफेड करावी लागते. परंतु त्यांच्या कुटुंबाकडून त्या रकमेची परतफेड केली नाही, तर बँक फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून ती कार किंवा कोणतेही वाहन असेल ते जप्त करतात आणि त्या कारची विक्री करून फायनान्स कंपन्या त्यांच्या कर्जाची थकबाकी वसूल करतात.

पर्सनल लोन

आज-काल पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे असुरक्षित प्रकारातले कर्ज आहे. म्हणजेच पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोष्ट तारण ठेवण्याची गरज नसते. परंतु जर पर्सनल लोन घेतलेल्या व्यक्तीचा मध्येच मृत्यू झाला, तर बँकेच्या माध्यमातून कुटुंबातील कोणत्याही सदस्याला या कर्जाची परतफेड करावी लागते. हे पर्सनल लोन त्या व्यक्तीने त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर घेतलेले असते.

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्डवर आपण जी रक्कम वापरतो. ती देखील एक गरजेचे स्वरूपातच असते. या कर्जाची परतफेड करणे ही त्या संबंधित व्यक्तीची जबाबदारी असते. परंतु जर त्या क्रेडिट कार्डचा मृत्यू झाला, तर कर्जाची थकबाकी राईट ऑफ करते. तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला क्रेडिट कार्डवरील खर्च केलेल्या रकमेबद्दल परतफेड करण्यासाठी जबाबदार धरले जात नाही.

Oral Cancer | तोंडाचा कर्करोग झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात? ही आहेत कारणे

Oral Cancer

Oral Cancer | आजकाल कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लोकांची जीवनशैली बदललेली आहे तसेच त्यांच्या सवयी देखील बदललेल्या आहेत. या सगळ्यांमुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. अनेकदा लोकांना कॅन्सर झाल्याचे निदान होत आहे. त्यामुळे हा आजार आता संपूर्ण जगासाठीच एक धोकादायक बनलेला आहे. दरवर्षी कितीतरी लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होत आहे.

कर्करोगाची वेगाने वाढ | Oral Cancer

भारतात देखील कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आह. एका अहवालात भारतात सुमारे 27 लाख कर्करोगावर उपचार घेत आहेत, असे सांगण्यात आलेले आहेत. त्यापैकी 2020 मध्ये 8.5 लाख लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. या रुग्णांमधील केवळ पाच ते दहा टक्के लोकांमध्ये जीन्स जबाबदार आहेत. परंतु इतर सगळे लोक हे त्यांची खराब जीवनशैली, सवयी, पर्यावरण यांसारख्या गोष्टींमुळे कॅन्सरचे बळी पडलेले आहेत. परंतु कॅन्सर हा सुरुवातीच्या काळात ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्यावर उपचार घेता येईल आणि तुमचा जीव वाचवता येईल.आज काल तोंडाचा कर्करोग होण्याच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. अशावेळी तुमच्या जिभेचा रंग आणि इतर सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आता तोंडाचा कर्करोग कसा ओळखायचा हे आपण जाणून घेऊया.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जिभेचा रंग हा अचानक काळा होतो. तसेच घशातील संसर्ग बॅक्टेरिया संसर्गाची सुरुवात असते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांमध्ये देखील जीभेचा रंग काळा होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पोटात अल्सर तयार होतो. आणि बॅक्टेरियाच्या संसर्गामध्ये जिभेचा रंग काळा होऊ लागतो. आता तोंडाचा कर्करोग होण्याची आणखी काही लक्षणे आज आपण जाणून घेणार आहोत.

तोंडाचा कर्करोग होण्याची लक्षणे |Oral Cancer

  • दात मोकळे होणे
  • गळ्याभोवती ढेकूळ सारखे दिसणे
  • ओठांवर सूज येणे
  • झालेल्या जखमा लवकर बऱ्या न होणे
  • गिळताना त्रास होणे
  • शब्दांमध्ये बदल होणे
  • तोंडात रक्तस्त्राव होणे
  • जीभ आणि हिरड्यांवर लाल किंवा पांढरे टिपके पडणे
  • अचानक वजन कमी होणे

तोंडाचा कर्करोग होण्याची कारणे | Oral Cancer

  • तंबाखू किंवा दारूचे अति सेवन
  • अनुवंशिकता
  • तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष न देणे
  • डिंक रोग
  • सूर्यप्रकाशात जास्त संपर्क ठेवणे
  • सुपारी जास्त वेळ चघळणे

LG IPO : LG लाँच करणार सर्वात मोठा IPO; गुंतवणूकदारांनो, आता फक्त पैसा तयार ठेवा

LG IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दक्षिण कोरियातील मल्टि नॅशनल कंपनी म्हणून ओळख असलेली एलजी इलेक्ट्रॉनिक्स हि कंपनी भारतात सुद्धा चांगलीच लोकप्रिय आहे. देशात अनेक LG प्रॉडक्टची विक्री होत असते. आता कंपनी भारतात आणखी विस्तारासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून ही कंपनी आपला आयपीओ (LG IPO) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, LG Electronics IPO च्या माध्यमातून 8 ते 13 हजार कोटी रुपये जमा करू शकते. तज्ञांच्या मते, या IPO मधून LG Electronics India Private Limited चे मूल्यांकन 12 अब्ज डॉलर्स म्हणजेच एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. मात्र हा आयपीओ कधी लाँच होणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

2025 च्या सुरुवातीला येऊ शकतो LG IPO

परदेशी गुंतवणूकदार आणि कंपन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ बनली आहे. ज्याप्रमाणे भारताच्या विकासात मोठी वाढ होत आहे, आणि भारतीय शेअर बाजारात सुद्धा सतत तेजी पाहायला मिळत आहे, त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्या त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. LG चा आगामी IPO सुद्धा याचाच एक भाग असणार आहे. हा IPO पुढील वर्षी, 2025 च्या सुरुवातीला येऊ शकतो. या आयपीओचे (LG IPO) काम चार मोठ्या बँकांकडे दिल्याचा दावा केला जात आहे. बँक ऑफ अमेरिका (Bank of America), सिटीग्रुप इंक (Citigroup Inc), जेपी मॉर्गन चेस (JPMorgan Chase) आणि मॉर्गन स्टेनली (Morgan Stanley) असे या चार बँकिंग संस्थांचे नाव आहे. माहितीनुसार, कंपनी पुढील महिन्याच्या सुरुवातीला भारताच्या बाजार नियामकाकडे प्रॉस्पेक्टस दाखल करू शकते.

LG शिवाय ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी Hyundai Motor India Limited सुद्धा देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल कंपनी असलेलया Hyundai Motor India Limited च्या भारतीय युनिटने सार्वजनिक समस्या आणण्यासाठी SEBI कडे मसुदा कागदपत्रे सादर केली आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम चो यांनी ऑगस्टमध्ये ब्लूमबर्ग टेलिव्हिजनच्या मुलाखतीत सांगितले की, LG च्या भारतीय युनिटचा IPO हा दक्षिण कोरियन कंपनी ज्या पर्यायांचा विचार करत आहे त्यापैकी एक आहे. कारण कंपनीला 2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स महसुलात $75 अब्जाचे लक्ष्य गाठायचे आहे आणिआपला इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय पुन्हा एकदा रुळावर आणायचा आहे.

Kolhapur- Pune Vande Bharat Express | कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस रुळावर धावण्यासाठी सज्ज; जाणून घ्या वेळ आणि तिकिटाचे दर

Kolhapur- Pune Vande Bharat Express

Kolhapur- Pune Vande Bharat Express | कोल्हापूर ते पुणे या दोन शहरांदरम्यान अनेक नागरिक प्रवास करत असतात. त्यामुळे या दोन शहरांदरम्यान एक्सप्रेस चालू व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून चालू होती. अशातच आता कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता येत्या सोमवारपासून म्हणजेच 16 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही एक्सप्रेस आठवड्यातून केवळ तीन दिवस धावणार आहे. या एक्सप्रेसचा 16 तारखेला शुभारंभ होणार आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी देखील घेण्यात आलेली आहे. आता या चाचणीनंतर ही रेल्वे रुळावर धावण्यासाठी सज्ज झालेली आहे.

या एक्सप्रेसची चाचणी करण्यात आली, त्यादरम्यान कोल्हापूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नक्की किती वेळ लागतो? तसेच रेल्वेवर जाताना इतर काही अडथळे येत आहेत का? या सगळ्याची चाचणी घेण्यात आली. आठवड्यातून केवळ तीन वेळा ही रेल्वे धावणार आहे. सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना हे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या रेल्वेला हिरवा कंदील दाखवणार आहेत. कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत (Kolhapur- Pune Vande Bharat Express) एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावणार आहे. ही रेल्वे कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल, तर दुपारी ती दीड वाजता पुण्यात पोहोचेल. तसेच पुण्याहून ही गाडी बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी 2 वाजता सुटेल आणि संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूर स्थानकात येणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना पुणे ते नाशिक असा प्रवास करायचा आहे. त्यांच्यासाठी हा एक सोयीचा पर्याय आहे.

वंदे भारत एक्सप्रेसला किती तिकीट असणार | Kolhapur- Pune Vande Bharat Express

कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे. तसेच कोल्हापूर पुणे या प्रवासांचे दर चेअर कारसाठी 1160 रुपये आहे. तसेच एक्झिक्युटिव्ह साठी 2005 रुपये एवढे आहे. तसेच वंदे भारत कोल्हापूर ते पुणे या मार्गावर 16 सप्टेंबर पासून धावणार आहे. या एक्सप्रेससाठी कोल्हापूरकरांना खूप वाट पाहावी लागलेली आहे. तसेच खूप संघर्ष देखील करावा लागला आहे. परंतु कोल्हापूरकरांसाठी ही एक चांगली बातमी आहे.

Nitin Gadkari : विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती; गडकरींचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) संपूर्ण देशात आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर देशभरात ठसा उमटवणाऱ्या गडकरींचे सर्वच राजकीय पक्षासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे नितीन गडकरी सुद्धा भारताचे पंतप्रधान होऊ शकतात असं नेहमीच बोललं जात. त्यातच आता गडकरींनी एका कार्यक्रमांत बोलताना मोठा खुलासा केला आहे. २०२४ चाय लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, मात्र आपण ती फेटाळून लावली असं गडकरींनी सांगितलं.

पंतप्रधानपदासाठी पक्षाशी प्रतारण करणार नाही– Nitin Gadkari

नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मी त्या नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

विरोधी पक्षाच्या कोणत्या नेत्याने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) पंतप्रधान पदाची ऑफर दिली हे मात्र गडकरींनी सांगितलं नाही. मात्र त्यांच्या या नव्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा नितीन गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं हे मात्र नक्की. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी सुद्धा नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुरु होते, तशा चर्चा माध्यमात झळकत होत्या, मात्र तेव्हाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होत, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नेते आहेत, मला पंतप्रधान होण्यात काहीही रस नाही. मी पदासाठी नाही तर संघटनेसाठी काम करतो.

Atal Setu | अटल सेतूवरून होणार बस सेवा सुरु; जाणून घ्या बस स्थानक आणि तिकीट

Atal Setu

Atal Setu | सरकारने नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा अटल सेतू केलेला आहे. याचा प्रवाशांना खूप जास्त फायदा झालेला आहे. या अटल सेतूच्या बांधकामामुळे जो प्रवास करायला नागरिकांना दीड तास लागायचा. तो प्रवास आता केवळ 20 मिनिटात ते पूर्ण करू शकत आहे. आता या मार्गावरून एसटी बस किंवा बेस्ट सुरू करावी. अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने येत होती. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने देखील याबाबत विचार केला आहे. आणि लवकरच प्रवाशांसाठी या मार्गावरून बस सेवा सुरू केली जाणार आहे. प्रवाशांना केवळ 20 मिनिटात मुंबई गाठता येणार आहे.

नवी मुंबईमधील असे अनेक लोक आहेत. जे लोक कामासाठी मुंबईमध्ये येत असतात. परंतु रेल्वे मार्गाने खूप जास्त गर्दी असते. आणि खर्चिक देखील असते. त्यामुळे या प्रवाशांनी अटल सेतूचा वापर करण्यासाठी तसेच या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. आणि आता त्यांची ही मागणी पूर्ण झालेली आहे. वाहतूक कोंडीमुळे त्यांना मुंबईत पोहोचायला खूप वेळ लागत होता. परंतु आता अटल सेतूवरून (Atal Setu) ते केवळ 20 मिनिटात मुंबईत पोहोचू शकतात. आणि इंधनाची देखील बचत होणार आहेत. तसेच नवी मुंबईतील प्रवाशांना मंत्रालय गाठणे देखील खूप सोपे होणार आहे. प्रवाशांनी केलेली ही मागणी पाहता गणेशोत्सवापासून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अटल सेतूद्वारे मुंबईतला पोहोचणे खूप सोपे होणार आहे.

या अटल सेतूवरून बस क्रमांक 116 आणि 117 या दोन बसेस चालवण्यात येणार आहे. बस क्रमांक 116 ही नेरूळ बस स्थानक पूर्व ते मंत्रालय उलवे मार्ग, मोठा उलवा गाव प्रभात, रामशेठ ठाकूर स्टेडियम, खारकोपर रेल्वे स्थानकामार्गे सेतूवरून मंत्रालयात जाणार आहे. ही बस सेवा सोमवार ते शनिवार सुरू राहणार आहे. तसेच या बसचे भाडे 230 रुपये एवढे असणार आहे. त्याचप्रमाणे 117 क्रमांकाची बस ही खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय मार्ग पनवेल, पळस्पे, गव्हाण टोल, नाका, खारघर येथून हायवे पनवेल बस स्थानक पळसपे फाटा या मार्गावरील मंत्रालयापर्यंत जाणार आहे. या बसचे भाडे 270 रुपये एवढे असणार आहे.

अटल सेतूचे (Atal Setu) लोकार्पण हे 12 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले. त्याचप्रमाणे 13 जानेवारी रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला होता. जानेवारी ते ऑगस्ट या सात महिन्याच्या कालावधीत या सेतूवरून 50 लाख 4 हजार 350 वाहनांनी प्रवास केलेला आहे. या सेतूवरून प्रवास करताना प्रवाशांच्या वेळ खूप वाचणार आहे.

पंतप्रधानाच्या घरी नवीन सदस्याचे आगमन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक गोष्टींची माहिती ते सोशल मीडिया पोस्टमार्फत सगळ्यांना देत असतात. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट केली आहे. जी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आजपर्यंत आपण नरेंद्र मोदी यांच्या प्राण्यांबद्दलची ओढ नेहमीच पाहिलेली आहे.

मोदींच्या निवासस्थानातील बाग, झाडे, झुडपे, पक्षी, प्राणी या सगळ्याचे दर्शन ते त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट मधून देत असतात. आणि त्यांचे निसर्गावरील आणि प्राण्यांमधील प्रेम या पोस्टवरून स्पष्टपणे दिसत असते. नुकतेच त्यांच्या बागेतील एका गाईने वासराला जन्म दिलेला आहे. आता याच वासरा सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही फोटो शेअर केलेले आहे.

Narendra Modi

नरेंद्र मोदी देवघरात पूजा करताना देखील त्या गाईच्या वासराला घेऊन पूजा करत आहे. तसेच त्यांच्या वासराच्या गळ्यात एक हार घातलेला आहे. हे वासरू पंतप्रधानांच्या संपूर्ण घरात त्यांच्या मागे बागडताना दिसत आहे. त्यांनी याबाबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहेत. त्यामध्ये हे वासुदेवघरापर्यंत आलेले दिसत आहे. व्हिडिओमध्ये मोदी त्या वासराला जवळ घेतात. त्याच्या गळ्यात हार घालतात. तसेच अंगावर शाल देखील टाकतात आणि त्याला मायेने जवळ घेताना दिसत आहे.

Narendra Modi

नरेंद्र मोदींनी या नवीन वासरा सोबतच्या अनेक फोटो एक्सवर शेअर केलेले आहे. यातूनच नरेंद्र मोदी यांचे त्या वासरा प्रतीआणि प्राण्यांप्रती असलेले प्रेम दिसून येते. त्यांनी पोस्ट करून त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वासराच्या जन्माचा एक उत्सव साजरा केलेला आहे. त्याचप्रमाणे ते वासरू देखील नरेंद्र मोदी यांच्या कुशीत अगदी शांत बसलेले आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषयाची शिकवला जावा. यासाठी शासन प्रयत्न करत आहे. अशातच आता सरकारने मराठी हा विषय राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये सक्तीच्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच नाही तर आता इथून पुढे परीक्षेचा निकाल हा ग्रेड ऐवजी मार्क्स देऊन लावला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवला जाणार आहे. तसेच या विषयाची परीक्षा घेऊन त्याचे मार्क्स दिले जाणार आहेत. काही खाजगी शाळांमध्ये मराठी हा विषय गांभीर्याने शिकवला जात नसल्याचे लक्षात आले आहे. त्यानंतरच राज्य सरकारकडून आता हा एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे केलेले आहे.

या आधी देखील 1 एप्रिल 2020 रोजी मराठी भाषा ही सर्व माध्यमातील शाळांमध्ये शिकवली जावी. या संदर्भात शासनाने निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राज्यभरात हा टप्प्याटप्प्याने मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न देखील केला जात होता. परंतु मराठी या विषयाकडे थोडासा कानाडोळा करून जास्त गांभीर्याने हा विषय शिकवला जात नाही. याकडे सरकारने लक्ष दिलेले आहे. त्यामुळे आता इथून पुढे माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषय हा शिकून त्याची परीक्षा देखील घेतली जाणार आहे.

सरकारने मराठी भाषेचे शिक्षण प्रत्येक शाळांमध्ये देण्याचा निर्णय 2020 – 21 च्या काळातच घेतला होता. परंतु या काळात कोरोना हा विषाणू होता. त्यामुळे मुलांच्या शाळा अनियमित होत्या. त्यानंतर आता सरकारने पुन्हा एकदा मराठी भाषा ही खाजगी तसेच सरकारी शाळांमध्ये शिकवणे सक्तीचे केलेले आहे .आणि परीक्षा घेऊन त्याचे मूल्यांकन करण्यास देखील सांगितले आहे. याआधी इतर माध्यमातून शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेतली जायची. परंतु त्याची श्रेणी दिली जात होती. परंतु आता शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून मराठी भाषा विषयाची परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना श्रेणी ऐवजी गुण दिले जाणार आहेत.

Aadhaar Card Free Update : आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय!! जनतेला मिळाला दिलासा

Aadhaar Card Free Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट (Aadhaar Card Free Update) करण्याची मुदत सरकारने आणखी वाढवली आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 म्हणजेच आज होती आणि आता ही तारीख पुढील तीन महिन्यांसाठी आणखी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी अजूनही आपले जुने आधार कार्ड अपडेट केलेलं नाही अशा व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. क आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिलेली नवीन तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे त्यापूर्वी आता जुने आधारकार्ड अपडेट करावं लागेल.

१० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची (Aadhaar Card Free Update) अंतिम तारीख अनेकदा वाढवण्यात आली आहे. सर्वात आधी ती 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. नंतर ही अंतिम तारीख पुन्हा एकदा 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आज त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. आता आधार कार्ड वापरकर्ते 14 डिसेंबरपर्यंत मोफत मध्ये आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतात. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर मात्र ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल.

असे करा आधारकार्ड अपडेट- Aadhaar Card Free Update

सर्वात आधी uidai.gov.in/en च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
येथे तुम्हाला ‘अपडेट आधार’चा पर्याय मिळेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला येथे 12 अंकी आधार क्रमांक भरावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल.
हा ओटीपी टाकून तुम्हाला लॉग इन करावे लागेल.
त्यानंतर डॉक्युमेंट अपडेट ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल.
आता तुम्हाला खाली यावे लागेल
तुम्हाला तुमच्या ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्ता पुरावा अपडेट करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल.
यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट क्रमांक मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार अपडेट झाले आहे की नाही हे तपासू शकाल.