Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 473

डॉ. रसिका गोंधळे ठरल्या मिसेस इंडिया सुपर नॅशनल 2024 विजेत्या

Dr. Rasika Gondhale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 सप्टेंबर 2024 ला मुंबई येथील मुकेश पटेल ऑडिटोरियमला मिसेस इंडिया सुपर नॅशनल 2024 ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. झोया सिराज शेख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आठ राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महिलांनी भाग घेतला होता ज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर रसिका राजीव गोंधळे (Dr. Rasika Gondhale) यांनी फर्स्ट रनर अप विजेत्या हा मान पटकावला.

डॉक्टर रसिका गोंधळे या जनरल सर्जन असून सध्या गोविंदराव वंजारी आयुर्वेद कॉलेज आणि रिसर्च सेंटर नागपूर येथे डेप्युटी मेडिकल सुपरटेंडंट म्हणून कार्यरत आहेत सोबतच नागपूर दूरदर्शन ला “आरोग्य संपदा” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील करतात. अभिनयाची आवड असल्याने त्या एक थेटर आर्टिस्ट असून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत आणि व्यावसायिक नाटकांमध्ये देखील काम करत असतात.

सौंदर्य स्पर्धांमध्ये तसेच मिसेस भंडारा 2017, मिसेस नागपूर 2018, मिसेस विदर्भ 2019, मिसेस महाराष्ट्र 2023 हा मान पटकाविला आहे. त्यांची कारकीर्द बघता लोकमत तर्फे सखी सन्मान अवार्ड 2017, राणी लक्ष्मीबाई आवड 2022, टॅलेंट अवर्ड 2023, ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया अवॉर्ड 2024, याने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, मिसेस इंडिया सुपर नॅशनल च्या विजेत्या होऊन यापुढे मिसेस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करतील

स्वतःच्या वडिलाला सोडून नवा वडील शोधला; धर्मराव आत्राम यांची मुलीवर टीका

dharmrao aatram bhagyashri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या मंत्री धर्मराव आत्राम (Dharmrao Baba Atram) यांच्या कन्येने म्हणजेच भाग्यश्री (Bhaghyashree Atram) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे तसेच थेट वडिलांविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीही भाग्यश्री यांनी केली आहे. त्यामुळे धर्मराव आत्राम यांची चांगलीच आगपाखड झाली आहे. भाग्यश्री यांनी स्वतःच्या वडिलाला सोडून नवा वडील शोधला अशी टीका धर्मराव आत्राम यांनी केली आहे. माझ्याविरोधात उभ्या राहू द्या, पण त्यांनी जिंकूनही आलं पाहिजे असा खोचक टोलाही आत्राम यांनी लगावला.

प्रसारमाध्यांशी बोलताना धर्मराव आत्राम म्हणाले, मुलीने नवीन पार्टी, नवीन काम हातामध्ये घेतले. अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल. नवदुर्गा माझ्या घरामध्ये बसले आहेत, एक माणूस देवी बनू शकत नाही, त्या दृष्टिकोनातून ठीक आहे जे बोलले ते पाहू पुढे. माझ्या विरोधामध्ये जिंकून आल्या पाहिजे हीच अपेक्षा आहे.त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांचे मागे काय आहे काय नाही हे मी सांगू शकत नाही, फक्त त्यांची भाषा सुधारली पाहिजे. आपण बोलत असताना मर्यादा ठेवून बोललं पाहिजे हे मी त्यांना शिकवू शकलो नाही ही माझी चूक आहे अशी प्रतिक्रिया धर्मराव आत्राम यांनी दिली.

यावेळी धर्मराव आत्राम याना जयंत पाटलांच्या विधानाचा संदर्भ देऊन प्रश्न विचारला. ‘एक बाबा गेले तरी शरद पवारांसारखे दुसरे बाबा पाठिशी आहेत’, या त्यांच्या विधानाबाबत विचारताच धर्मराव बाबा अत्राम यांनी त्यावरूनही मुलीवर टीका केली. “ठीक आहे. त्यांनी स्वत:चे वडील सोडून नवीन वडील त्यांनी शोधले असतील. बघू काय करतात ते. घर फुटले तर बघू काय पुढे आहे ? कोणी घर फोडले. मी तर सांगत होतो साहेबांनी असा प्रकार करू नये, आता जे झालं ते घडलं आता घोडा मैदान समोर आहे असं म्हणत धर्मराव आत्राम यांनी मुलगी भाग्यश्रीला थेट आव्हान दिले.

Mhada Mumbai : मुंबई म्हाडाच्या 2030 घरांसाठी किती आले अर्ज ? आकडेवारी आली समोर

mumbai mhada update

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची (Mhada Mumbai) उपलब्धता करून दिली जाते.

म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी अखेर सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये 2030 सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून प्रारंभ झाला. नंतर म्हाडा साठी अर्ज करण्याची मुदतही वाढवण्यात आली.

कधी निघणार सोडत ? (Mhada Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार ,म्हाडाच्या पोर्टलवर कालपर्यंत 68651 व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. तर, अनामत रक्कम जमा करणाऱ्यांची संख्या 49286 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती एका मराठी माध्यमाकडून देण्यात आली आहे. १९ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जुन्या वेळापत्रकानुसार म्हाडाकडून सोडत 13 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होती. आता नव्या वेळापत्रकानुसार 8 ऑक्टोबरला घरांची सोडत जाहीर केली जाईल.

कोणत्या ठिकाणांचा समावेश

मुंबई मंडळामध्ये मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल -वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड इत्यादी गृहनिर्माण प्रकल्पांमधील प्रकल्पांचा समावेश असणार आहे.

घरांच्या किंमती कमी केल्या (Mhada Mumbai)

म्हाडाच्या घराच्या किंमती या 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विविध पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मध्ये देखील याचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार 33 (5) आणि 33 (७) अंतर्गत करण्यात आलेल्या योजनेतील घरं विकासकांकडून म्हाडाला मिळालेली आहेत. या घरांच्या किमती कमी होणार आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी किमती दहा टक्के कमी होणार आहेत तर मध्यम गटासाठी पंधरा टक्के रक्कम कमी होणाऱ आहेत तर अल्पगटासाठी 20% रक्कम कमी होणार आहे. शिवाय अत्यल्प गटासाठी असलेल्या घरांच्या (Mhada Mumbai) किमतीमध्ये 25 टक्क्यांनी घसरण होणार आहे.

मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 12 मिनिटांत ; कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंक आजपासून खुला

आर्थिक राजधानी मुंबईत अनेक विकासकामांचा सपाटा सुरु आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुरळीत आणि कमी वेळेत होणार आहे कारण कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी या मार्गाचे उदघाटन होणार असून या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या बारा मिनिटात करता येणार आहे. या मार्ग बाबतची विशेष बाब म्हणजे दक्षिण मुंबई पासून वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत चा मार्ग हा सिग्नल मुक्त असणार आहे. त्यामुळे हा प्रवास वेगवान होणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोस्टल रोड आणि सीलिंग कनेक्ट झाल्यामुळे वरळीच्या बिंदू माधव चौकात होणारा वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचे आज उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे या नवीन मार्गामुळे बारा मिनिटांमध्ये प्रवास करण्यात येईल असा दावा करण्यात येतो आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार असून इंधनाची देखील बचत होणार आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका

या प्रकल्पाबाबत अधिक सांगायचं झाल्यास या प्रकल्पातील मुख्य टप्पा असलेला 136 मीटरचा पट्टा सर्वात मोठ्या बो स्टिंग आर्च गर्डरला जोडण्यात आला आहे 2000 मेट्रिक टन वजनाचा महाकाय गरडर जोडण्यात आला असल्यामुळे या प्रकल्पामुळे आता कोस्टल रोड सी लिंक ला वरळी इथं जोडला गेल्यामुळे वांद्रातून दक्षिण मुंबईत प्रवास वेगानं करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

या प्रकल्पामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओवर ते वरळी सीलिंग असा 10.58 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव ते हाजीवली पर्यंत ६.२५ किलोमीटरचा मार्गही सुरू करण्यात आला आहे तर याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किलोमीटर लांबीचा वांद्रे वरळी सीलिंग जोडण्यात आला आहे त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे

Sitaram Yechury Death : माकपचे नेते सीताराम येचुरी यांचं निधन; 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sitaram Yechury Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माकपचे नेते सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन (Sitaram Yechury Death) झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. सीताराम येचुरी हे एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनने त्रस्त होते. त्यांना 19 ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस आणि पक्षाच्या संसदीय गटाचे नेते होते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. येचुरी 1974 मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले आणि एका वर्षानंतर, ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) मध्ये सामील झाले. 1984 मध्ये त्यांना सीपीआय(एम) च्या केंद्रीय समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले. 2015 मध्ये त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. 1992 पासून ते CPI(M) च्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते. त्यांना 2016 मध्ये राज्यसभेत सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये असताना त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर ते सलग तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत म्हंटल, सीताराम येचुरीजी माझे मित्र होते. ते भारताच्या कल्पनेचे संरक्षक होते आणि त्यांना आपल्या देशाची सखोल माहिती होती. मी आमच्या प्रदीर्घ चर्चाना आता मुकणार आहे. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अनुयायांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.असं म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Jio Recharge Plan : Jio च्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनसमोर Airtel- Vi ढेर; पहा काय काय फायदे मिळतात?

Jio Recharge Plan 349 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio, Airtel- Vi सारख्या देशातील बड्या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती महाग केल्यानंतर कमीत कमी खर्चासाठी कोणता रिचार्ज करावा याची माहिती ग्राहक घेत आहेत. देशातील बहुतांश ग्राहकांकडे Jio, Airtel- Vi चे सिमकार्ड असल्याने याच तिन्हीपैकी कोणत्या कंपनीकडे स्वस्त रिचार्ज आहे का? याकडे ग्राहकांचे लक्ष्य आहे. तुम्ही सुद्धा यातीलच एक ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशा एका रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) बाबत सांगणार आहोत ज्यांच्यासमोर Airtel- Vi सुद्धा ढेर आहे. एअरटेल आणि vi पेक्षा ग्राहकांना जास्त फायदे जिओच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये मिळत आहे. हा रिचार्ज प्लॅन किती रुपयांचा आहे? त्याची व्हॅलिडिटी किती आहे? याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Jioचा 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन- Jio Recharge Plan

आम्ही ज्या प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे Jioचा 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन… जिओचा हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएसचा लाभ घेता येतोय. तसेच दररोज 2GB इंटरनेट डेटाचा आनंद घेता येतोय. ज्यांना जास्त इंटरनेटची गरज असते त्यांच्यासाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय आहे. याशिवाय, या प्लॅनसोबत ग्राहकांना 5G अनलिमिटेड डेटा आणि OTT ॲप्स म्हणून Jio Cloud, Jio TV आणि Jio Cinema चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Airtel- Vi पेक्षा बेस्ट का?

Airtel आणि Vi सुद्धा 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) ऑफर करते, तरीही मग जिओचा प्लॅन बेस्ट आहे असं आम्ही का म्हणतोय यांचा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या कि, जरी Airtel आणि Vi चा रिचार्ज सुद्धा 349 रुपयांचा असला आणि त्यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग, आणि एसएमएस ची सुविधा असली तरी Vi आणि Airtel फक्त 1.5GB इंटरनेट दररोज देत आहे. त्यामुळे जिओ चा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना चांगलाच परवडतोय असं म्हणायला हवं.

Travel: भारतीय रेल्वेकडून गणेशोत्सव स्पेशल टूर, करा मुंबईसह हैद्राबाद, तिरुपतीची सफर

IRCTC tour

Travel: केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रात या उत्सवाची धामधूम काही औरच असते. मुंबई ,पुणे , कोकण या भागातील गणेशोत्सव पाहण्यासारखा असतो . अशातच तुम्ही देखील मुंबईत गणेशोत्सवाचा आनंद घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण IRCTC कडून खास टूर पॅकेज नियोजित करण्यात आले (Travel) आहे. चला जाणून घेऊया…

मुंबई गणेश चतुर्थी टूर पॅकेज (Travel)

मुंबई गणेश चतुर्थी टूर पॅकेज 12 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हे टूर पॅकेज 1 रात्र आणि 2 दिवसांसाठी आहे. या पॅकेजमध्ये कॅबने प्रवास करण्याची संधी असेल. पॅकेज फी दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 15900 आहे. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 15800 रुपये आहे. तर मुलांसाठी पॅकेज फी 15000 (Travel) रुपये आहे.

हैदराबाद आणि मुंबई टूर पॅकेज

या पॅकेजमध्ये तुम्हाला हैदराबाद आणि मुंबईला भेट देण्याची संधी मिळेल. हे पॅकेज 12 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पॅकेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पुणे आणि सोलापूर येथून सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही या तिन्ही शहरांमधून या टूरमध्ये सहभाग घेऊ शकता. हे टूर पॅकेज 4 रात्री आणि 4 दिवसांचे आहे. पॅकेजमध्ये ट्रेनने प्रवास करण्याची संधी असेल. या पॅकेजच्या फी बद्दल सांगायचे झाल्यास दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 19200 रुपये आहे. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति (Travel) व्यक्ती पॅकेज शुल्क 18500 रुपये आहे. मुलांसाठी पॅकेज फी 14700 रुपये आहे.भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.

मुंबई आणि तिरुपती टूर पॅकेज (Travel)

IRCTC चे हे पॅकेज 15 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला मुंबई आणि तिरुपतीला भेट देण्याची संधी मिळेल. हे पॅकेज कल्याण, लोकमान्य टिळक (LTT), मुंबई, पुणे, सोलापूर आणि ठाणे येथून सुरू करण्यात येत आहे. हे टूर पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांचे आहे. पॅकेजमध्ये कॅबने प्रवास करण्याची संधी असेल. पॅकेज फी दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7390 रुपये आहे. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 7290 रुपये आहे. मुलांसाठी पॅकेज फी 6500 रुपये आहे. IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून (Travel) तिकीट बुक करा.

Tecno Pova 6 Neo 5G : फक्त 12,999 रुपयांत लाँच झाला 108MP कॅमेरावाला मोबाईल

Tecno Pova 6 Neo 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर स्वस्तात मस्त आणि चांगली कॅमेरा क्वालिटी असलेला ,मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय बाजारात 108MP कॅमेरावाला नवा स्मार्टफोन लाँच झाला आहे ज्याची किंमत अवघी 12,999 रुपये आहे. होय, मोबाईल निर्माता ब्रँड Tecno ने Tecno Pova 6 Neo 5G नावाचा मोबाईल बाजारात आणला आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…..

6.67 इंचाचा डिस्प्ले –

Tecno Pova 6 Neo 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 720×1600 पिक्‍सल्‍स रिझोल्युशन आणि 480 निट्स पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट बसवली असून त्यानुसार हा मोबाईल 8GB रॅम सह येतोय. मात्र व्हर्चुअल रॅम द्वारे हीच रॅम तुम्ही 16GB पर्यंत वाढवू शकता. तसेच मायक्रोएसडीच्या मदतीने स्मार्टफोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकाल. टेक्नोचा हा हँडसेट Android 14 आधारित HiOS 14.5 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा- Tecno Pova 6 Neo 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Tecno Pova 6 Neo 5G मध्ये 108Mचा मुख्य कॅमेरा मिळतो, या कॅमेराला AI फीचर्स मिळतात. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5 हजार mAh ची बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 18 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर, एनएफसी आणि लाईट सेन्सरची सुविधा आहे.

किंमत किती?

Tecno Pova 6 Neo 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे, तर 8GB रॅम आणि 256GB मॉडेलची किंमत 13,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. येत्या 14 सप्टेंबरपासून हा मोबाईल Amazon आणि निवडक रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.

टीम इंडियाविरुद्ध बांगलादेशचा संघ जाहीर; पहा कोणाकोणाला संधी?

Bangladesh Team Squad against India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानला त्यांच्याच देशात जाऊन चारीमुंड्या चित करणाऱ्या बांगलादेशची नजर आता भारतावर आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार असून यासाठी बांगलादेशचे आपल्या संघाची घोषणा केली आहे. नजमुल शांतो याचीच पुन्हा एकदा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा असूनही त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अतिशय हुशारीने आणि भारतीय परिस्थितीत सूट होणार संघ निवडला आहे.

नजमुल हुसेन शांतो, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक हे प्रमुख फलंदाज बांगलादेशच्या संघात असतील. मुशफिकुर रहीम आणि लिटन दास हे दोन मुख्य यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडतील. तर शकीब अल हसन आणि मेहिदी हसन मिराझ यांसारखे जागतिक दर्जाचे अष्टपैलू बांगलादेशच्या चमूत आहेत. गोलंदाजी विभागात तैजुल इस्लाम, नईम हसनसारखे भारतीय खेळपट्टी वर फलंदाजांना नाचवण्याची क्षमता असलेले फिरकीपटू आहेत तर हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद सारखे तेज गोलंदाजांना भारताविरुदधच्या मालिकेसाठी निवडण्यात आले आहे.

असा आहे बांगलादेशचा संघ –

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा , जाकेर अली, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद.

भारताचा संघ पहा-

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल , सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

Ayushman Bharat Card : घरबसल्या डाउनलोड करा आयुष्यमान भारत कार्ड; पहा सोप्पी प्रोसेस

Ayushman Bharat Card Download

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करत ७० वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या वृद्धांना सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचा (Ayushman Bharat Card) लाभ मिळणार असल्याचे जाहीर केलं आहे. या योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. सामाजिक-आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून या योजनेचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो. यासाठी त्यांना नवीन आयुष्मान कार्ड दिले जाईल. ते कार्ड तुम्ही घरबसल्या सुद्धा अगदी आरामात काढू शकता. त्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे ते खाली स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात….

आयुष्यमान भारत कार्ड साठी अर्ज कसा करावा – Ayushman Bharat Card

सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरुन आयुष्मान ॲप डाउनलोड करा.
यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा.
लॉगिन केल्यानंतर, त्यात तुमची पात्रता तपासा.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय वर्ष असणाऱ्या कोणत्याही उत्पन्न गटातील लोक यासाठी पात्र आहेत.
त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार ई-केवायसी करावे लागेल.
आता फोटो अपलोड करावा लागेल, त्यानंतरच तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करु शकता.

दरम्यान, मोदी सरकारने 2017 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरु केली होती. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे, जी सध्या देशातील सर्वात गरीब 40 टक्के लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार प्रदान करते. आता मोदी सरकारने या योजनेत आणखी बदल करत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय वर्ष असणाऱ्या व्यक्तींनाही आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यास परवानगी दिली आहे.

सरकारने सांगितल्यानुसार, आयुष्मान भारत (Ayushman Bharat Card) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा समावेश केला जाईल. यामुळे जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल आणि ६ कोटी वृद्ध नागरिकांना ५ लाखांपर्यंत फ्री उपचार मिळेल. यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. जी कुटुंबे सध्या आयुष्मान भारत योजनेत नाहीत. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा त्यात समावेश केला जाईल आणि त्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे शेयर्ड कव्हर मिळेल.