Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 474

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या आयोजनामुळे भारताला 11,637 कोटींचा फायदा

World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या वर्षी भारतात पार पडलेल्या ५० ओव्हरच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) टीम इंडियाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया कडून पराभूत व्हाव लागलं आणि रोहित सेनेचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र या वर्ल्डकपचे यजमानपद भूषवल्याने भारताला मात्र तब्बल 11,637 कोटींचा फायदा झाल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. यात सर्वाधिक फायदा देशातील पर्यटन क्षेत्राला झाला. गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेली ही विश्वचषक स्पर्धा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली.

ICC चे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस म्हणाले, ‘ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 ने क्रिकेटची आर्थिक ताकद दाखवून दिली. या स्पर्धेमुळे भारताला 11,637 कोटी रुपयांचा फायदा झाला. यात सर्वाधिक फायदा हा पर्यटन क्षेत्राला झाला. ज्या ज्या शहरात विश्वचषकाचे सामने खेळवण्यात आले त्या सर्वाना मिळून एकूण 7.23 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. यात राहणे, फिरणे, जेवण यांचा समावेश होता. कारण मोठ्या संख्यने देशातील आणि परदेशातील क्रिकेटप्रेमींनी वर्ल्डकप सामन्यासाठी हजेरी लावली होती. भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे हे पुन्हा एकदा यानिमित्ताने स्पष्ट झालं. टूर्नामेंट, तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील इतर संस्थांच्या थेट सहभागातून या वर्ल्डकप वेळी 48,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या. त्यामुळे ICC इव्हेंट केवळ क्रिकेट चाहत्यांना खुश करत नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान देतात हे सिद्ध झालं आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतातील तब्बल 12 लाख 50 हजार प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाऊन सामने बघितले. यातील ७५ टक्के प्रेक्षक असे होते जे प्रथमच वर्ल्डकप सामना बघायला गेले होते. जे बाहेरील क्रिकेट चाहते होते त्यातील 55 टक्के क्रिकेटप्रेमी यापूर्वी सुद्धा भारतात सामने पाहायला आले होते तर 19 टक्के आंतरराष्ट्रीय चाहत्यांनी विश्वचषकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारताला भेट दिली होती.

MG Windsor EV : आकर्षक लूक, 331 KM रेंज; बाजारात धुमाकूळ घालणार ‘ही’ Electric Car

MG Windsor EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिसायला अतिशय आकर्षक लूक देणाऱ्या आणि इंधनाचा खर्च वाढवणाऱ्या गाड्या ग्राहकांना सुद्धा फायदेशीर ठरत आहेत. ग्राहकांची इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी पसंती पाहता सर्वच कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणत आहेत. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी एमजी मोटरने आपली MG Windsor EV नावाची इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच केली आहे. आज आपण या इलेक्ट्रिक कारचे खास फीचर्स, रेंज आणि किंमत याबाबत सविस्तर आढावा घेऊयात…

लूक आणि डिझाईन – MG Windsor EV

इतर इलेक्ट्रिक गाड्यांसारखाच MG Windsor EV सुद्धा दिसायला अतिशय आकर्षक आहे, बघताक्षणीच हि कार तुमच्या मनात भरेल इतकी आलिशान अशी कार आहे. कारची लांबी 4295 मिमी, रुंदी 2126 मिमी आणि उंची 1677 मिमी इतकी आहे. तर 2,700 मिमी व्हीलबेस आणि 604 लीटरची बूट स्पेस या इलेक्ट्रिक कार मध्ये देण्यात आली आहे.

इंटेरिअल बद्दल बोलायचं झाल्यास , MG Windsor मध्ये 8.8 इंच TFT डिजिटल मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID), 15.6 इंच इंटेलिजेंट कंट्रोल पॅनल, एर्गोनॉमिक इटालियन बबल स्टाइल सिंथेटिक लेदर सीट्स उपलब्ध आहेत. केबिनमध्ये 256 कलर ॲम्बियंट लाइटिंगची सुविधा मिळतेय. कारच्या मागील सीटला सोफा स्टाइल देण्यात आली आहे. ज्याला 135 अंशांपर्यंत रिक्लाइंड करता येते.जेव्हा तुम्ही लांबचा प्रवास कराल तेव्हा या सीट मुळे तुम्हाला आरामदायी प्रवासाचा फील येईल.

331 किमीची रेंज-

या कार मध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 136PS ची पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक कारमध्ये 38 kWh क्षमतेचा लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी पॅक आहे. 50kW चार्जरसह, त्याची बॅटरी केवळ 55 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक कार तब्बल 331 किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल असा कंपनीचा दावा आहे. एमजी मोटरची ही इलेक्ट्रिक कार 80 पेक्षा जास्त कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांना आणि 100 पेक्षा जास्त व्हॉइस कमांड सिस्टमला समर्थन देते. यात डिजिटल कीचीही सुविधा सुद्धा आहे.

कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष्य दिले आहे. त्यानुसार कार 35 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ज्यामध्ये 6 एअरबॅग्ज, सर्व चाकांवर सर्व-डिस्क ब्रेक, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), EBD, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, हिल-होल्ड यांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे

राहुल गांधी, तुमचीच आज्जीसारखीच अवस्था होईल; कोणी दिली धमकी?

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘शीख’ समुदायाशी संबंधित वक्तव्यावरून देशाच्या राजकारणात गदारोळ उडाला आहे. भारतातील शीख समुदायामध्ये चिंता आहे की त्यांना पगडी आणि ब्रेसलेट घालण्याची परवानगी दिली जाईल की नाही? असं विधान राहुल गांधी यांनी केलं होते. तात्यांच्या या विधानानंतर शीख समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून याच पार्श्वभूमीवर भाजप समर्थित शीख सेलने बुधवारी (11 सप्टेंबर) दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या निदर्शनादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह (Tarvinder Singh) यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. राहुल गांधी, तुमचीच आज्जीसारखीच अवस्था होईल असं तरविंदर सिंग यांनी म्हंटल. त्यांचा एक व्हिडिओ काँग्रेसने शेअर करत कारवाईची मागणी केली आहे.

काय म्हणाले तरविंदर सिंह?

या निदर्शनावेळी तरविंदर सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हंटल की, राहुल गांधी, थांबा, नाहीतर भविष्यात तुमचीही आजीसारखीच अवस्था होईल.’ राहुल गांधींनी अमेरिकेत भारत आणि शीखांचा अपमान केला आहे. परदेशी भूमीवर त्यांनी आपल्या देशाची बदनामी केली. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी सुद्धा शीख सेलने यावेळी केली.

तरविंदर सिंह यांचा हा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. ‘ भाजपचा हा नेता उघडपणे विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे, नरेंद्र मोदीजी, तुमच्या पक्षाच्या या नेत्याच्या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही’, ही अत्यंत गंभीर बाब आहे. तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या कारखान्याची ही निर्मिती आहे. यावर कारवाई करावी लागेल. अशी पोस्ट करत काँग्रेसने कारवाईची मागणी केली.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील कार्यक्रमावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही. एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वारात जाऊ शकते की नाही. यासाठी लढाई आहे आणि ही केवळ शीख समाजासाठी लढाई नाही तर सर्व धर्मांसाठी आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.

Ayushman Bharat : आता 70 वर्षांवरील सर्वांसाठी 5 लाखांपर्यंत फ्री उपचार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ayushman Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा (Ayushman Bharat) लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ७० वर्षाच्या वरील वृद्धांना उपचाराचा खर्च या योजनेच्या माध्यमातूनच केला जाईल. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने आश्वासन दिले होते की ते आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करतील. आता सरकारने आपला शब्द पाळला आहे.

4.5 कोटी कुटुंबांना फायदा – Ayushman Bharat

सरकारने सांगितल्यानुसार, आयुष्मान भारत (Ayushman Bharat) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा समावेश केला जाईल. यामुळे जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल आणि ६ कोटी वृद्ध नागरिकांना ५ लाखांपर्यंत फ्री उपचार मिळेल. यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. जी कुटुंबे सध्या आयुष्मान भारत योजनेत नाहीत. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा त्यात समावेश केला जाईल आणि त्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे शेयर्ड कव्हर मिळेल.

७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे आधीच केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS), माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) इत्यादी इतर सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचा लाभ घेत आहेत. त्यांना एकतर त्यांची आधीची योजना निवडावी लागेल किंवा आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची निवड करू शकता.

मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणपतीची आरती; राजकीय चर्चाना उधाण

Narendra Modi CJI DY Chandrachud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि गणपती बाप्प्पाच्या आरतीत सहभाग घेतला. यावेळी चंद्रचूड यांच्या घरी त्यांची पत्नी कल्पना दास यांनी मोदींचे स्वागत केलं. समारंभात पंतप्रधानांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन टोपी परिधान केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदी गणपती पूजनात सहभागी होताना दिसत आहेत.

अतिशय पारंपारीक मराठी लूक मध्ये मोदी दिसत आहेत. सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड जी यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो. भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो असं मराठी भाषेतून मोदींनी ट्विट केलं. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सुनावणी आज होणार आहे. त्यापूर्वीच मोदींनी चंद्रचूड यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वातावरण सुद्धा गरम झाल आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टीका सुद्धा केली आहे.

प्रधानमंत्री किती जणांच्या घरी गणेशोत्सवाला गेले मला माहित नाही, पण काल ते सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या घरी गेले आणि धर्मनिरपेक्ष अशा या देशात आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं. खरं म्हणजे हे संविधानाला आणि प्रोटोकॉल ला धरून आहे का याबाबत घटनातज्ञांमध्ये चर्चा सुरु आहे. आमच्या मनात प्रश्न येतोय कि महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार बसलं आहे, त्याविरोधात न्याय का मिळत नाही? आम्हाला सतत तारखांवर तारखा का पडत आहेत याबद्दल आमच्या मनात शंका आहे. हे का होतंय? सरन्यायाधीश चंद्रचूड पदावरून असताना सुद्धा ३ वर्षांनी निर्णय आणि निकाल होत नाही आणि आता तर थेट पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी पोचले. मग वेगळं काहीतरी घडतंय का? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखी महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले पक्ष संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जात आहे का? या शंका घट्ट झाल्या असं म्हणत संजय राऊतांनी निशाणा साधला.

Onion Price | ऐन सणासुदीत बळीराजा सुखावला ! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ

Onion Price

Onion Price | ऐन गणेशोत्सवात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 80 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे सरासरी कांद्याचे दर पाहिले तर आपण 50 रुपये किलोच्या आसपास आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे. त्या शेतकऱ्यांचे आता चांगले दिवस येणार आहेत. कांद्याचा (Onion Price) बाजारामध्ये दर वाढल्याने आता शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फायदा होणार आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. सरकार कांद्याचे दर कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. परंतु कारल्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालत दिसत आहेत.

सरकार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि कांद्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु अनेक शहरांमध्ये कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. कांद्याची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होती. परंतु आता कांद्याचे दर कमी झाल्याने विक्री देखील कमी होत आहे. आणि दरात देखील वाढ झालेली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे सध्या 80 रुपये किलोवर आहेत. तर काही ठिकाणी 27 रुपयांपर्यंत स्वस्त दराने देखील कांदा विकला जात आहे. 10 सप्टेंबर रोजी देशभरात कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 49 रुपये प्रति किलो दर एवढी होती. त्याचप्रमाणे शहरानुसार कांद्याच्या दरांमध्ये कमी अधिक प्रमाणात फरक दिसत आहे.

सरकारी संस्थांकडे कांद्याचा किती पुरवठा |Onion Price

सरकारी संस्था तसेच एनसीसीएफ आणि नाफेडकडून स्वस्त दरात कांदा विकला जात आहे. तसेच मोबाईल द्वारे या कांद्याची विक्री देखील होत आहे. सध्या सहकारी संस्थांकडे 4.7 लाख टन कांदा आहे. जर सरकारने या संस्थांनी सवलतीच्या दरात कांद्याची विक्री केली तर त्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.

मागील आठवड्यापासून कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे या कांद्याच्या भावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मागील आठवड्यापासून सवलतीच्या दरात कांद्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील कमीत कमी 35 रुपये किलो दराने सवलतीच्या दारात कांदा उपलब्ध आहे. सरकारने 5 सप्टेंबर पासून हा उपक्रम सुरू केला होता. तरी देखील कांद्याचे किमतींमध्ये जास्त कमी झालेले नाही.

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. तर दुसरीकडे मात्र आर्थिक संकटांनी आणि नैसर्गिक संकटांनी कोलमडलेल्या शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण यावर्षी पाऊस खूप जास्त प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. परंतु आता कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना एकीकडे चांगलाच आर्थिक दिलासा मिळत आहे.

Malaika Arora Father’s Death | मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या की आणखी काय? वेगळीच कारणे आली समोर

Malaika Arora Father's Death

Malaika Arora Father’s Death | प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा (Malaika Arora Father’s Death) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी सकाळी तिचे वडील अनिल अरोरा यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण सिने सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. परंतु आता त्यांच्या मृत्यूचे एक वेगळंच कारण समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. आणि मुंबई पोलिसांनी याबद्दल माहिती दिलेली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार अनिल अरोरा हे बाल्कनी जवळ उभे होते आणि अचानक ते खाली पडले त्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचा मृत्यू झाला आहे, असे घोषित केलेले आहे. आज काल अनेक वृद्ध लोकांचे पडून मृत्यू होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. अनेक लोकांना काही आजारांचा सामना करावा लागत आहे. आता अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू देखील कशाप्रकारे झाला आहे, याची कारणे शोधणे चालू आहेत.

वयोवृद्ध माणसे खाली पडण्याची कारणे

ऑस्टीओपोरोसीस

ब्रिटिश हेल्थ सर्विस यांच्यानुसार हा आजार वृद्धांमध्ये खूप सामान्य आहे. वृद्ध लोकांच्या हाडांसाठी आवश्यक असलेले घटक आहारात कमी पडतात. त्यामुळे त्यांच्या हाडांची घनता कमी होते आणि हाडांमधील खनिज बाहेर पडतात. त्यांची हाड कमकुवत होतात. त्यामुळे अनेकदा ते खाली पडतात.

स्नायू कमकुवत होतात

हाडे कमकुवत होण्यासोबत स्नायू देखील कमकुवत होत असतात. वृद्धांमध्ये हे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा त्यांचे स्नायू कमवत होतात. तेव्हा संतुलन राखण्यास अडचण येते. आणि त्यांना कुठेही पडण्याची भीती असते. यामुळे त्यांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण होते. आणि त्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

डोळ्यांच्या समस्या

वयानुसार लोकांचे डोळे देखील कमकुवत होत जातात. त्यांची दृष्टी कमी कमी होत जाते. वय वाढले की त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो डोळ्यांमध्ये मोतूबिंदू होण्याची समस्या अगदी सामान्य आहे. अनेकवेळा असे लोक चष्म्याशिवाय फिरतात. त्यामुळे ते पडण्याची शक्यता असते.

स्मृती भंश

वृद्धांमध्ये स्मृती भंश हा आजार अगदी सामान्य आहे. अनेक वृद्ध लोकांना हा आजार होतो. अशा स्थितीत ते कुठेही जाण्याची तसेच पडण्याची भीती असते. त्यामुळे देखील वृद्धांमध्ये पडून वृत्ती होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

हृदयरोग

वृद्ध व्यक्तींना म्हातारपणात हृदयविकाराचा झटका येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे चक्कर येणे, रक्तदाब कमी जास्त होणे. यामुळे काही वेळा अशा व्यक्ती बेशुद्ध होतात आणि पडतात.

अशातच आता मलायका अरोराचे वडील हे बालकणीतून खाली पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नक्की ही त्यांची आत्महत्या होती की इतर कोणत्या शारीरिक व्याधींमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्याची उत्तर देखील शोधण्याचे काम चालू आहे.

राज्यातील 3 महत्वकांक्षी रास्तेप्रकल्पांच्या कामांना ब्रेक ; भूसंपादन प्रक्रिया रद्द

महायुती सरकारने राज्यात अनेक महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. यापैकी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला ब्रेक लागणार आहे.राज्यातल्या अनेक भागांमधून शेतकऱ्यांमधून शक्तिपीठ महामार्गाला भूसंपादनासाठी नकार देण्यात आला आहे. एवढेच नाही तर काही शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा देखील घेतला आहे.

नागपूर ते गोवादरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्ती पीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाडा त्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला या विरोधामुळे मराठवाड्यात महायुतीला देखील फटका बसल्याचे पाहायला मिळालं म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शक्तिपीठ महामार्गाबरोबर महाराष्ट्रातील आणखी दोन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आली. शक्तिपीठ महामार्गाबरोबरच पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग आणि सिंदखेडराजा शेगाव भक्तीपीठ मार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रकल्प सुमारे 25 ते 30 हजार कोटी रुपये खर्चाचे आहेत.

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग

एमएसआरडीसीने महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे म्हणजेच पुणे आणि नाशिक या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या महामार्गाची लांबी जवळपास २१३ किमी एवढी प्रस्तावित होती. या महामार्गामुळे दोन शहरांचे अंतर केवळ दोन तासांत पार होईल असा दावा केला जात होता. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली होती. मात्र आता ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

सिंदखेडराजा-शेगाव भक्ती पीठ महामार्ग

राज्य रस्ते विकास महामंडळाने सिंदखेडराजा ते शेगाव दरम्यान भक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित केला. समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यासाठी हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. या महामार्ग प्रकल्पामुळे समृद्धी महामार्गावरून तीर्थक्षेत्र शेगावला अतिजलद वेगात जाता येणार होते. हा 109 किमी लांबीचा ‘भक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्प चार पदरी राहणार होता. या प्रकल्पाच्या संरेखनास सुद्धा सरकारने मान्यता दिली होती. तसेच, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी झाली होती. मात्र आता या प्रकल्पाचे भूसंपादन देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राहकाचा पारा चढला अन OLA शोरूम पेटवलं; कुठे घडली घटना

OLA showroom was set on fire

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ओला ही इलेक्ट्रिक (Ola Electric) स्कुटर निर्माता कंपनी सर्वानाच माहित आहे. भारतीय बाजारात ओलाच्या स्कुटरची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र अनेकदा स्कुटरमध्ये काही तांत्रिक समस्या असल्याच्या तर कधी कधी भर रस्त्यात ओला स्कुटरला आग लागल्याच्या घटना आपण बघितल्या आहेत. अजूनही या समस्या कायम असून ग्राहकांमध्ये नाराजी आहे. मात्र आज तर एका ग्राहकाने हद्दच केली. ओला इलेक्ट्रिक स्कूटर दुरुस्त करण्यास उशीर लागल्याने संतापलेल्या ग्राहकाने चक्क शोरूमच पेटवून दिले. कर्नाटकातील कलबुर्गी येथे हि धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, २६ वर्षीय मोहम्मद नदीम असं आग लावलेल्या ग्राहकाचे नाव असून तो व्यवसायाने मेकॅनिक आहे. त्याने २८ ऑगस्ट रोजी ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. 1.4 लाख रुपये खर्च करून त्याने नवी कोरी स्कुटर विकत घेतली होती. मात्र स्कुटर खरेदी केल्यापासून त्याला वेगवेगळ्या समस्या उद्भदु लागल्या. स्कूटरच्या बॅटरी आणि साऊंड सिस्टममध्ये काही टेक्निकल अडचणी होत्या. मोहम्मद नदीमने याबाबत कंपनीकडे तक्रार करून आणि शोरूमला सातत्याने भेट देऊनही ओला इलेक्ट्रिकचे कर्मचाऱ्यांना त्याची अडचण दूर करता आली नाही. त्यामुळे त्याच्या मनात संताप निर्माण झाला.

याचाच राग मनात घेऊन मोहम्मद नदीमने पेट्रोलच्या मदतीने ओला इलेक्ट्रिकच्या शोरूमला आग लावली. सुदैवाने ज्यावेळी आग लावण्यात आली त्यावेळी त्यावेळी शोरूम बंद होते त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत सहा स्कूटर जळाल्याने कंपनीचे एकूण साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मात्र ओलाचे नेमकं चाललंय काय? स्कुटर मध्ये सतत प्रॉब्लेम का येत आहेत? हा प्रश्न अजूनही कायम आहे.

आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा मनसुबा; एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींना सुनावलं

rahul gandhi eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिका दौऱ्यावर असून एका कार्यक्रमात बोलताना आरक्षणाबद्दल वेगळं मत व्यक्त केलं. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्यातरी अशी स्थिती नाही असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजप आक्रमक झाली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही टीका करत राहुल गांधींना सुनावलं आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधींनी व्यक्त केला मात्र आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.

याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विटर करत म्हंटल, विदेशात जाऊन सातत्याने भारताची ,येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला.आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू.

आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.