Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 472

Ayushman Bharat Yojana | एका कुटुंबातील किती लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल? जाणून घ्या शासन निर्णय

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana | राज्य सरकारने केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात. नागरिकांच्या हिताचा आणि आर्थिक विचार करून या योजना आणल्या जातात. अशातच केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana ) चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे विविध आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केंद्र सरकारकडून दिले जाते. अशातच आता केंद्र सरकारने या योजनेमध्ये एक मोठा बदल केलेला आहे. तो म्हणजे आता आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत 70 वर्षावरील वृद्ध देखील लाभ घेऊ शकतात. त्यामुळे आता या योजनेबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी आयुष्मान कार्ड काढावे लागेल आणि त्या कार्डनुसार तुम्हाला केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या रुग्णालयांमध्ये तुम्हाला मोफत उपचार घेता येईल.

परंतु आता या आयुष्यमान भारत योजनेचा (Ayushman Bharat Yojana ) लाभ एका कुटुंबातील किती व्यक्ती घेऊ शकतात किंवा आयुष्मान काढ हे एकाच कुटुंबातील किती व्यक्ती बनवू शकतात? ही एक खूप मोठी शंका सगळ्यांच्या समोर उभी राहत आहे. त्यामुळे अनेक लोकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. परंतु या योजनेअंतर्गत जे काही नियम आहेत. ते नियम सरकारने आधीच सांगितलेले आहे. त्यामुळे हे आयुष्मान काळ हे कुटुंबनिहाय काढले जाणार आहेत. या योजनेत सगळ्या गरजू लोकांना लाभ घेता येणार आहे. म्हणजेच एका कुटुंबातील सर्व व्यक्ती या आयुष्मान कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच ते या योजनेसाठी पात्र असतील.

34 कोटींपेक्षा जास्त कार्ड तयार |Ayushman Bharat Yojana

सध्या या आयुष्मान भारत योजनेचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार 30 जून 2024 पर्यंत 34.7 कोटींपेक्षा जास्त आयुष्यमान कार्ड तयार झालेले आहेत. या कालावधीतच 1 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या 7.37 कोटी आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेली आहे.

पात्रतेचे निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही नागरिक हा ग्रामीण भागातील रहिवासी किंवा अनुसूचित जाती जमातीचा असावा. यामध्ये अपंग, असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक, रोजंदारी मजूर लाभ घेऊ शकतात.

आयुष्मान कार्ड कसे काढाल?

  • हे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • यानंतर होम पेजवर तुम्ही मी पात्र आहे का या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यात टाका.
  • मोबाईल नंबर टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरा.
  • त्यानंतर स्क्रीनवर तुमचे राज्य मोबाईल नंबर रेशन कार्ड नंबर टाका.
  • आणि त्यानंतर सगळी माहिती सबमिट करा.

Vande Metro : गुजरातला मिळणार देशातील पहिली Vande Metro; मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Vande Metro Gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन (Vande Metro) गुजरातला राज्याला मिळाली आहे. ही ट्रेन अहमदाबाद आणि भुज या दोन शहरादरम्यान धावेल. 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्यावहिल्या वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ट्रेनमुळे गुजरात मधील नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. या वंदे मेट्रोचे टाईमटेबल आणि तिकीट दर सुद्धा समोर आले आहेत. चला तर मग याबाबत सर्वकाही सविस्तर जाणून घेऊयात…

कस आहे वेळापत्रक? Vande Metro

अहमदाबाद आणि भुज या शहरांदरम्यान धावणारी वंदे मेट्रो (Vande Metro) आठवड्यातून सहा दिवस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. हि वंदे मेट्रो भुज येथून पहाटे 5:05 वाजता सुटेल आणि अहमदाबादला सकाळी 10:50 वाजता पोहोचेल आणि रिटर्न प्रवासात ही ट्रेन अहमदाबादहून संध्याकाळी 5:30 वाजता सुटेल आणि रात्री 11:10 वाजता आपल्या पुन्हा भुजला पोहोचेल. 5 तास 45 मिनिटांत या दोन्ही शहरामधील अंतर कापले जाईल. अहमदाबाद ते भुज वंदे मेट्रो अंजार, गांधीराम, भचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमती या मध्यवर्ती स्थानकांवर 2 मिनिटे थांबेल.

तिकीट दर किती –

वंदे मेट्रो ट्रेनचे तिकीट किती असेल हे सुद्धा समोर आलं आहे. यामध्ये किमान भाडे 30 रुपये असेल. यावर जीएसटीही भरावा लागेल. यामध्ये तुम्ही 50 किलोमीटरचा प्रवास केल्यास तुम्हाला 60 रुपये अधिक GST आणि इतर लागू शुल्क भरावे लागतील. म्हणजेच प्रति किलोमीटर किमान 1.20 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. ही नवीन वंदे मेट्रो ट्रेन गुजरात राज्यातील पहिली मेट्रो सेवा असेल, जी दोन मोठ्या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी वरदान ठरेल. या वंदे मेट्रो ट्रेन मुळे भारतीय रेल्वेचे जाळे आणखी विस्तारेल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव सुद्धा घेता येईल.

Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana | महिलेच्या नावाने 12 पुरुषांनी भरला लाडकी बहीण योजनेचा अर्ज; उघडकीस आल्यावर झाली कारवाई

Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana

Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana | राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. अनेक योजनांचा लाभ नागरिकांनी घेतलेला आहे. परंतु सध्या सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana) खूप चर्चेत आहे. जुलै महिन्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे देखील का अनेक महिलांना मिळालेले आहेत. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारने 1 कोटी 59 लाख महिलांना या योजनेचे दोन हप्ते दिलेले आहेत. राज्यातील महिलांचा विचार करता त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी सरकारने ही योजना खास महिलांसाठी चालू केलेली आहे. परंतु काही लोक या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न देखील करत आहे.

नवी मुंबईमध्ये या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार समोर आलेला आहे. यामध्ये महिलाच्या नावावर महिलां आधार क्रमांकाचा वापर करून एका पुरुषाने पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज दाखल केलेले होते. अशातच आता छत्रपती संभाजी नगरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आलेला आहे. कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलांचे फोटो लावून अर्ज भरल्याची घटना समोर आलेली आहे. आणि याबाबत कारवाई देखील करण्यात आलेली आहे.

पुरुष घेतायेत योजनेचा गैरफायदा |Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana

सरकारच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील 12 पुरुषांनी महिलेचे फोटो लावून स्वतःचा अर्ज भरलेला आहे. परंतु ही बाब महिला आणि बालकल्याण विभागाच्या लक्षात आली आणि या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. या तालुक्यातील जवळपास 12 असे अर्ज आले होते, त्यानंतर ते अर्ज रिजेक्ट देखील करण्यात आले आहेत. यात आधार कार्ड महिलांचे आणि नाव पुरुषाचं होतं.

अनेक महाराष्ट्रातील महिलांनी अजूनही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेला नाही. त्यासाठी राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढ करून ती 30 सप्टेंबर ही केलेली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 एवढ्या अर्ज भरण्यात आलेले आहेत. त्यातील 90957 अर्ज मंजूर झालेले आहे. तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे 428 अर्ज अपात्र ठरलेले आहे. तर 357 अर्ज रद्द झालेली आहे.

अर्जांची तपासणी करताना कन्नड तालुक्यामध्ये हा प्रकार समोर आलेला आहे. 12 जणांनी स्वतःच्या नावाने पोर्टलवर अर्ज अपलोड केलेले आहेत. तसेच आधार कार्ड ही स्वतःच्याच नावाचे केलेले आहेत. हमीपत्र स्वतःच्या नावाने भरून दिलेला आहे. परंतु पोर्टलवर महिलेचा फोटो अपलोड केलेला आहे. या आधीच अजित पवार यांनी सांगितले होते की, मुख्यमंत्री बालाजी लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेतला, तर त्यावर कारवाई देखील करण्यात येईल. आणि आता कन्नड तालुक्यातील या 12 पुरुषांवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आलेली आहे.

500 पैकी 70 % बहुराष्ट्रीय कंपन्यांचा होणार भारतात विस्तार; तरुणांना मिळणार रोजगाची संधी

Job update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन करण्यात आलेले आहे. यावेळी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर देखील झपाट्याने वाढताना दिसत आहेत. आता या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतामध्ये जास्त विस्तार झाल्याने त्या भारतातील तरुणांना भरपूर नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती समोर आलेली आहे. 2023 पर्यत जगभरातील 500 आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी जवळपास 70 टक्के कंपन्या या भारतात विस्तार करतील असे सांगण्यात आलेले आहे. सध्या भारताचे वजन आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत आहे. त्याचप्रमाणे भारताचा आर्थिक विकास देखील खूप वेगाने चालू आहे. तसेच भारतामध्ये एआय एक्सलन्स सेंटर उभे राहिलेले आहेत. या सगळ्याचा विचार करता आणि भविष्यातील फायद्याचा विचार करता जवळपास 70 टक्के कंपन्या या भारतात विस्तार करणार आहेत. या कंपन्या भारतातील तरुणांना आता रोजगार निर्मिती खूप तयार होणार आहे. आपल्या भारताला सुशिक्षित बेरोजगारीने ग्रासले आहे. परंतु या आंतरराष्ट्रीय कंपन्या जर भारतात स्थायिक झाल्या, तर आपल्या देशातील सुशिक्षित बेरोजगारांना खूप चांगल्या नोकरीची संधी मिळेल.

रोजगार वाढणार

  • जीसीसीचा जर विस्तार झाला, तर पुढील काही वर्षांमध्येच भारतात एक खूप मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.
  • जीसीसीमध्ये सध्या 19 लाख कर्मचारी संख्या आहेत. परंतु भविष्यात जाऊन ही संख्या 25 ते 28 लाख कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच भारतातील इतक्या जास्त तरुणांना या ठिकाणी नोकरी लागण्याची संधी आहे.

वेतनही वाढणार

सध्या आपण जीसीसीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्सला पाहिले तर त्यांना दर वर्षाला जवळपास 9 लाख ते 43 लाख रुपये एवढे वेतन मिळते. तर यातून भारतातील आयटी कंपन्यांमध्ये हेच वार्षिक वेतन कर्मचाऱ्यांना 6 ते 18 लाख रुपये एवढे मिळते. परंतु या जीसीसीचा विस्तार जर देशांमध्ये झाला, तर तरुणांना खूप चांगला रोजगार देखील मिळणार आहे. म्हणजेच त्यांचे ज्ञान आणि कौशल्याच्या आधारावर त्यांना मोबदला मिळणार आहे.

यंदाचे गणेश विसर्जन होणार दणक्यात; सुप्रीम कोर्टाने हटवले ढोल ताशा पथकावरील निर्बंध

Dhol Tasha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची धामधूम चालू आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. जसे गणेशोत्सव हा मोदक, डेकोरेशन, आरती, फुलं या सगळ्या गोष्टी शिवाय अपूर्ण आहे. तसेच गणेशोत्सव हा ढोल ताशाच्या पथकाशिवाय देखील अपूर्ण आहे. ढोल ताशा वाजला की, गणपती आलेले आहेत. असे आपसूकच सगळ्यांना समजते. दरवर्षी गणपती विसर्जन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. मिरवणुकीमध्ये ढोल ताशे असतात. परंतु आता यावर्षी ढोल ताशाच्या पथकावर कोणतीही बंदी असणार नाही. तसेच त्यावरील निर्बंध देखील शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यावर्षी कदाचित विसर्जन मिरवणुकीचा वेळ वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पुण्यातील गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन्याच्या मिरवणुका खूप प्रसिद्ध आहेत. संपूर्ण पुण्यात या दिवशी गर्दी पाहायला मिळते. रस्त्यावर ढोल ताशे वादन पाहायला मिळते. तसेच वेगवेगळ्या आपल्याला उपक्रम देखील पाहायला मिळतात. परंतु राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयामुळे ढोल ताशा पथकाच्या उत्साहाला देखील मर्यादा आल्या होत्या. परंतु आता या मर्यादा आणि निर्बंध काढल्यामुळे ढोल ताशा पथकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे.

याआधी ताशा ढोल आणि झांज पथकामध्ये 30 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते. आणि या विरोधात सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती. परंतु आता एनजीटीच्या या निर्बंधावर स्थगिती दिलेली आहे. तसेच ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण राखण्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

एनजीटीचे आदेश काय होते?

एनजीटीने 30 ऑगस्ट रोजी ढोल कशापदकाबाबत काही आदेश दिले होते. या आदेशात त्यांनी ढोल ताशा पथकाबाबत निर्बंध घातलेले होते. त्यांनी म्हटले होते की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जन मिरवणुकी दरम्यान रियल टाईम ध्वनी प्रदूषण मोजावे. तसेच ढोल ताशा आणि झांज पथकामध्ये 30 पेक्षा जास्त सदस्य असू नये.

एनजीटीने काही विचार करून हे निर्बंध लावले होते. परंतु पुणे हे गणेशोत्सवाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे इथे निर्बंध लावणे योग्य नाही. आणि हा त्यांचा एकतर्फी निर्णय झाला होता. त्यामुळे आता या सगळ्या निर्णयांना सगळी माहिती दिलेली आहे. आणि ढोल ताशा पथकावर कोणतीही संख्या मर्यादित राहणार नाही. ढोल ताशा हे आपल्या महाराष्ट्राच्या एक पारंपारिक वाद्य आहे. आणि तो आपल्या संस्कृतीचा खूप मोठा भाग आहे. त्यामुळे अनेक लोकांना गणेश मिरवणुकीमध्ये ढोल ताशा या पथकामध्ये भाग घ्यायला तसेच ती मिरवणूक पाहायला खूप आवडते.

विचारसरणीशी प्रतारणा न करणारे… ; सीताराम येचुरीना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरेंनी काय म्हंटल पहा

sitaram yechury raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. सीताराम येचुरी हे एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनने त्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही आपल्या ट्विटर हॅन्डल वरून भलंमोठं ट्विट करत सीताराम येचुरी याना श्रद्धांजली वाहिली आहे. कुठलीही प्रतारणा न करता, शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर श्रद्धा ठेवणारे भारतीय राजकारणात आता फक्त कम्युनिस्टच उरलेत असं राज ठाकरेंनी म्हंटल.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन झालं. येचुरी यांचा किंवा एकूणच कम्युनिस्ट पक्षाचा माझा तसा कधी सहवास आलेला नाही, पण एक विचारसरणी एकदा का स्वीकारली की तिच्याशी कुठलीही प्रतारणा न करता, शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर श्रद्धा ठेवणारे भारतीय राजकारणात आता फक्त कम्युनिस्टच उरलेत असं म्हणावं लागेल, आणि याचंच मला खूप कौतुक आहे. सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातले तसे बऱ्यापैकी प्रगतिशील विचारांचे नेते. कम्युनिस्टांचा काँग्रेस विरोध कडवा. पण किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी कम्युनिस्टांच मन वळवण्यात सीताराम येचुरी यांचा वाटा मोठा.

‘सत्ता’ हाच किमान समान कार्यक्रम झालेला असताना, सैद्धांतिक विरोध बाजूला ठेवून, काही मूलभूत प्रश्नांवर एकत्र येणे हे आता दुर्मिळच झालं आहे. एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या खासदाराची राज्यसभेची मुदत संपताना, सभागृहातील सदस्यांनी भावनिक निरोप देणे, हे येचुरींच्या बाबतीत घडलं. विचारसरणीला घट्ट धरून राहण्याची परंपरा अस्तंगत होत असताना येचुरींसारख्या नेत्यांचं वेगळेपण जाणवत राहतं. सीताराम येचुरींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली… असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस आणि पक्षाच्या संसदीय गटाचे नेते होते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. येचुरी 1974 मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले आणि एका वर्षानंतर, ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) मध्ये सामील झाले. 1984 मध्ये त्यांना सीपीआय(एम) च्या केंद्रीय समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले. 2015 मध्ये त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. 1992 पासून ते CPI(M) च्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते. त्यांना 2016 मध्ये राज्यसभेत सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये असताना त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर ते सलग तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

तेव्हा रोहितने रात्री 2:30 वाजताच …; चावलाने उघड केलं मोठं सिक्रेट

rohit sharma piyush chawla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा फिरकीपटू पियुष चावलाने (Piyush Chawla) कर्णधार रोहित शर्माबद्दलची (Rohit Sharma) एक सिक्रेट गोष्ट उघड केली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये भारताकडून शेवटचा खेळलेल्या चावलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहितसोबत ड्रेसिंग रूमही शेअर केली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये पियुष चावला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. रोहित शर्मा हा फक्त मैदानावरच नव्हे तर मैदानाच्या बाहेर सुद्धा संघाचं कसा विचार करतो ते सांगताना पियुष चावलाने रोहित शर्माबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. समोरच्या फलंदाजाला आऊट करण्यासाठी रोहितने एकदा रात्री २:३० वाजताच गेम प्लॅन सांगितल्याचे चावलाने सांगितलं.

शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट मध्ये बोलताना पियुष चावला म्हणाला, रोहित शर्मासोबत मी भरपूर क्रिकेट खेळलो आहे कि आमच्यातील नातं घट्ट झालं आहे. मैदानाबाहेरही आमच्यात बोलणं होत असते. एकदा तर रात्री २:३० वाजता रोहितने मला मेसेज करून विचारलं कि जागे आहात का? त्यानंतर त्याने मला रूम मध्ये बोलावलं आणि एका कागदावर फिल्ड पोझिशन लिहिली आणि डेव्हिड वॉर्नरला कसं बाद करायचं याबाबत गेम प्लॅन सांगितला. म्हणजेच रात्रीच्या वेळीही माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी होईल याचा विचार रोहित करत असल्याचे पियुष चावलाने सांगितलं.

यावेळी पियुष चावलाने रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केलं आहे. पियुष चावला म्हणाला, एक असतो कर्णधार आणि एक असतो लीडर…. रोहित हा फक्त कर्णधारच नव्हे तर लीडर सुद्धा आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात आणि 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहितने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि अशा प्रकारे आपला इन्टेन्ट सेट केला त्यामुळे बाकी फलंदाजांना बॅटिंग करणे सोप्प झालं. खरा लीडर तोच आहे जो तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देतो असं म्हणत पियुष चावलाने रोहित शर्मावर कौतुकांचा वर्षाव केला.

दरम्यान, पियुष चावलाने भारताचा ऑल टाईम बेस्ट XI संघ सुद्धा निवडला. पियुष चावलाने आपल्या संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, कपिल देव, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह, झहीर खान. या खेळाडूंना स्थान दिले आहे.

Mukhyamantri Yojana Doot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; दरमहा मिळेल 10 हजार रुपये मानधन

Mukhyamantri Yojana Doot

Mukhyamantri Yojana Doot | सरकारकडून सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. सामान्य नागरिकांच्या हिताचा आणि भवितव्याचा विचार करूनच विविध योजना सरकारमार्फत आणल्या जातात. आता याच योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना करून देण्यासाठी आणि त्यांची माहिती लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सरकारने एक मुख्यमंत्री योजना उपक्रम सुरू केलेला आहे. आणि ज्या लोकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. म्हणजे सरकारच्या ज्या काही योजना आहेत, त्यांची माहिती हे लोक त्यांच्या परिसरातील लोकांना देतील. आता या उपक्रमाचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे आज म्हणजे शुक्रवार 13 सप्टेंबर ही या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याकडून अर्ज लवकरात लवकर अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

ही योजना महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालना मार्फत राबविण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत पातळीवर 1000 तर शहरी भागात प्रत्येक 5000 लोकसंख्येमागे अशा पद्धतीने राज्यात 50 हजार योजनादुतांची 6 महिन्यासाठी निवड केली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजना दुतांना (Mukhyamantri yojana doot) दर महिन्याला 10 हजार रुपये एवढे मानधन देखील दिले जाणार आहे. हे योजनादूत सामान्य नागरिकांना सरकारच्या कल्याणकारी योजनाबद्दल माहिती देतील. या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे.

उपक्रमात सहभाग घेण्यासाठी पात्रता |Mukhyamantri Yojana Doot

  • या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 35 दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे त्या व्यक्तीकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराला बेसिक संगणक ज्ञान असावे.
  • उमेदवाराकडे स्वतःचा स्मार्टफोन असावा.

मुख्यमंत्री योजना दुत उपक्रमासाठी लागणारी कागदपत्र |Mukhyamantri yojana doot

या उपक्रमासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे त्याच्या आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असलेले कागदपत्र, तसेच अधिवास दाखला, बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

TCIL Bharti 2024 | टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत 225 पदांसाठी भरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

TCIL Bharti 2024

TCIL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीच्या अशाच काही संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (TCIL Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत नर्सिंग ऑफिसर लॅब, टेक्निशियन फार्मासिस्ट, ज्युनिअर रेडिओग्राफर, इसीजी टेक्निशियन, फीजिओथेरपीस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट डायटीशियन पोस्टमार्टम टेक्निशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर प्लास्टर सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या तब्बल 225 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 13 सप्टेंबर 2012 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | TCIL Bharti 2024

नर्सिंग ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ज्युनियर रेडिओग्राफर, ईसीजी टेक्निशियन, रिफ्रॅक्शनिस्ट, ऑडिओमेट्री असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, पोस्टमार्टम टेक्निशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर सहाय्यक

पदसंख्या

या भरती अंतर्गत विविध पदांच्या 225 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 32 वर्षे पर्यंत असणे गरजेचे आहे

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करायचा ? | TCIL Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 13 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Konkan Expressway : मुंबई ते गोवा अवघ्या 6 तासांत; सरकारने आखलाय मास्टर प्लॅन

Konkan Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहुन गोव्याला जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र त्यासाठी मुंबई गोवा महामार्ग हा एकच पर्याय आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे, त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि खराब रस्त्यामुळे मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी १२-१२ तास गाडीत बसावं लागतंय. यावर उपाय करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी सरकार कोकण एक्स्प्रेसवे (Konkan Expressway) हा पर्यायी मार्ग बनवत आहे. कोकण एक्सप्रेस वे साठी डीपीआर बनवण्याचे काम जवळपास पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत असून या नव्या महामार्गामुळे मुंबई गोवा दरम्यानचा प्रवास १२-१३ तासांवरून केवळ ६ तासांवर येईल.

17 तालुक्यामधून जाणार महामार्ग – Konkan Expressway

कोकण एक्सप्रेस वे हा सुमारे 376 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल. 6 लेन रुंदीचा हा महामार्ग 17 तालुक्यामधून जाणार आहे. संपूर्ण मार्गावर 14 इंटरचेंज असणार आहेत. कोकण एक्सप्रेसवे हा मुंबईला सिंधुदुर्गला जोडेल. या महामार्गामुळे मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या क्षेत्राच्या आर्थिक विकासात देखील वाढ होईल तसेच दोन्ही ठिकाणच्या पर्यटनालाही चालना मिळेल. सध्या मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर कापण्यासाठी १२-१३ तासांचा वेळ लागत आहे, मात्र नव्या कोकण एक्सप्रेसमुळे अवघ्या ६ तासांत तुम्ही मुंबईतून कोकणात जाऊ शकणार आहात.

हा द्रुतगती मार्ग पनवेल (नवी मुंबई) ते रायगड आणि रत्नागिरीमार्गे सिंधुदुर्गला जाणार असून, या प्रकल्पासाठी 68 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कोकण एक्स्प्रेसवे (Konkan Expressway) प्रकल्पासाठी सुमारे 3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे. कोकण एक्सप्रेसवरून प्रवास करताना अनेक डोंगर आणि नदी नाले पार करावे लागतील. तसेच निसर्गाचा देखावा प्रवाशांना अनुभवता येणार आहे. एकीकडे मुंबई- गोवा महामार्गाचे काम कासव गतीने सुरु असताना दुसरीकडे या कोकण एक्सप्रेसमुळे मुंबईकरांना आणि कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.