Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 477

महामंडळाच्या ताफ्यात नवी ‘लालपरी’ दाखल ; प्रवास होणार सुखकारक

ST Bus

एस टी महामंडळाची लालपरी आता नव्या प्रवाहात नवी झाली आहे . राज्यातल्या वाड्या,वस्त्यांवर आजही ही लाल परी आपली चोख सेवा देते. मात्र मागच्या काही दिवसांत लाल परीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या , अनियमितता आणि मधेच प्रवासात गाडी बंद पडणे अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून मिळत होत्या. मात्र आता नव्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे.

5 हजारहून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात

राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या नवीन बस खरेदीबरोबरच भाडेतत्वावर गाड्या घेण्यावर भर देण्यात येतो आहे. या धोरणानुसार लवकरच 5 हजारहून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात येत आहेत. त्यापैकी 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. रोड टेस्टसाठी या बस अवतरल्या असून रोड टेस्ट झाल्यानंतर लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहेत.

‘या’ शहरात मिळणार नव्या गाड्या

मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांत लालपरी आता नव्या रूपात अवतरणार असल्याचे समजते. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 14 हजार बस आहेत. मात्र, या बसेसची दूरवस्था झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन नव्या कोऱ्या बसचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तीन बस दिसत असून प्रवाशांना लवकरच बसची सवारी करता येणार आहे.

कोकणवासीयांची परतीची चिंता मिटली ! सोडण्यात येणार जादा रेल्वे गाड्या

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. चाकरमानी आवर्जून कोकणात जात असतात. कोकणात जाण्यासाठी बस आणि रेल्वेची खास सोय परिवहन महामंडळ आणि रेल्वे विभागाकडून करण्यात आली होती. आता चाकरमान्यांना परतीची चिंता वाटत असेल तर काही काळजी करू नका कारण त्याची देखील सोय रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे. कोकणातून परतणाऱ्या प्रवांशांकरिता कोकण रेल्वे पुन्हा सज्ज झाली आहे.

रेल्वे विभागाच्या वतीनं मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेच्या वतीनं पनवेल ते मडगावदरम्यान अतिरिक्त दोन गणशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.

काय असेल वेळापत्रक ?

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01428 ही विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला ती त्याच दिवशी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी पोहोचणार आहे. 01427 ही गाडी 15 सप्टेंबरला पनवेलहून रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून, मडगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचणार आहे.

‘या’ स्थानकांवर घेणार थांबे

पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी अशा स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

याबरोबरच या गाडीला तीन तृतीय वातानुकूलित डबे, एक द्वितीय वातानुकूलित डबा, दोन तृतीय इकोनॉमी वातानुकूलित डबे, आठ स्लीपर, पाच सामान्य द्वितीय अशी व्यवस्था असेल.

कुठे कराल आरक्षण ?

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या रेल्वेसाठीचं आरक्षण आणि सर्व माहिती आरक्षण केंद्रांसह (IRCTC) आयआरसीटीसी या संकेस्थळावर च्या संकेतस्थळावर 10 सप्टेंबरपासून उपलब्ध असेल.

खरं की काय ? नागपूर- पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन 15 तारखेपासून सुरु होणार ? video होतोय व्हायरल

कमी वेळात आरामदायी सफर घडवणारी ट्रेन म्हणून ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेनचा नावलौकिक देशभर आहे. म्हणूनच देशभरातल्या वेगवेगळ्या भागात वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुरु करण्यात येत आहेत. माहितीनुसार येत्या 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या 10 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये नागपूर -पुणे या ट्रेनचा समावेश करण्यात आला आहे.

सध्या देशभर कार चेअर असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. मात्र लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुद्धा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून 15 तारखेला उदघाटन होणारी नागपूर -पुणे वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर कोचची असल्याचे म्हंटले आहे. एवढेच नाही तर या लक्झरी ट्रेनचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. चला जाणून घेऊया नक्की काय आहे व्हिडीओ ?

काय आहे व्हिडीओ ?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये सुरुवातीलाच “वंदे भारत स्लीपर ट्रेन नागपूर ते पुणे, 15 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत” असा मजकूर देण्यात आलेला आहे. त्यानंतर या ट्रेन बाबतचे एकापाठोपाठ एक सीन दाखवण्यात आले आहेत. यामध्ये ही गाडी बाहेरून कशी दिसते इथे पासून ते आत मध्ये त्याची असलेली सेटिंग अरेंजमेंट इथपर्यंत सर्व गोष्टी दाखवण्यात आले आहेत. या गाडीच्या खिडक्यांवरून दिसून येते की ही गाडी पूर्णपणे एसी आहे. शिवाय या गाडीमध्ये प्रवास करण्यासाठी आरामदायी सीट्स सुद्धा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ह्या व्हिडिओची झलक जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला नक्कीच या ट्रेनमध्ये प्रवास करावा असा वाटेल. मात्र या गाडीबाबत कोणतेही अधिकृत माहिती रेल्वे खात्याकडून समोर आलेली नाही.

nagpurkar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वंदे भारत स्लीपर ट्रेन नागपुर ते पुणे १५ सप्टेंबर पासुन आपल्या सेवेत..” असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलेय, “किती तिकिट आहे, फ्लाइटपेक्षा जास्त नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “हे खरं नाही. हा तीन महिन्याचा ट्रायल पिरेड आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे अजून पर्यंत निश्चित नाही. फक्त प्रस्ताव आहे.” काही युजर्सनी खोट्या बातम्या पसरवू नये, असा सल्ला दिला आहे.

Pune News : पुण्यात देखावे पाहण्यासाठी बाहेर पडणार आहात ? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा

pune news

Pune News : अवघ्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान आहेत. त्यातही पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध प्रकारचे देखावे केले जातात. हे देखावे पाहण्यासाठी पुणेकर आवर्जून गर्दी करीत असतात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन वाहतुकीसाठी अडथळा होऊ नये याकरिता शहराच्या मध्यवर्ती भागातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी सायंकाळी ५ वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. जाणून घेऊया याबाबत (Pune News) अधिक माहिती …

उद्यापासून म्हणजेच दिनांक 11 सप्टेंबर पासून शहरातील काही मध्यवर्ती भागातील रस्ते सायंकाळी ५ वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहेत यामध्ये पुण्यातील लक्ष्मी रोड ,शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, हा वाहतुकीस बंद केला जाणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात (Pune News) आले आहे.

गुरुवारपासून म्हणजेच 11 सप्टेंबर पासून शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकींपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत हे बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता अन्य सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाच नंतर मध्य भागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. (Pune News) गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असा आवाहन वाहतूक शालिकेचे पोलीस उपयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे

‘हे’ रस्ते बंद (Pune News)

वाहतुकीस बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ काॅमर्स ते हिराबाग चौक)

वाहतुकीस बंद असणारे अंतर्गत रस्ते

सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ)

‘या’ भागात पार्किंग साठी मनाई (Pune News)

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, , मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. आजपर्यंत आम्ही दिलेला नोकरीच्या संधीमधून अनेक लोकांना नोकरी देखील लागलेली आहे. आज आम्ही मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court Bharti 2024) अंतर्गत एक भरती घेऊन आलेलो आहोत. या भरती अंतर्गत आता जिल्हा न्यायाधीश या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 28 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 26 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Bombay High Court Bharti 2024

या भरती अंतर्गत जिल्हा न्यायाधीश या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

जिल्हा न्यायाधीश या पदाच्या एकूण 28 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागेविण्यात आलेले आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 35 ते 45 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

26 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला एक लाख 1,44,840 ते 1 लाख 94 हजार 660 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा? | Bombay High Court Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 26 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला पण पैसे कधी येणार ? करा हे महत्वाचे काम

Mukhymantri Ladaki Bahin Yojana

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकार हे नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात. आजपर्यंत महिलांसाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. परंतु या वर्षी आणलेली सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhymantri Ladaki Bahin Yojana ) ही खूप चर्चेत आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासूनच या योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देखील जमा झालेले आहेत. आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील करण्यात आलेली आहेत. महिला आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करू शकतात. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महिन्याचे असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत.आता सप्टेंबर महिन्यात देखील महिला अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत (Mukhymantri Ladaki Bahin Yojana ) ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 1 कोटी 59 लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे. अनेक महिलांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. किंवा अर्ज भरले जात नाही. त्यामुळे आता महिलांना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. सरकारची ही योजना महिला व बालविकास विभागाकडून राबवली जात आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. नुकताच राज्य शासनाने याबाबत निर्णय जारी केलेला आहे. आणि हा अर्ज मंजूर करण्याची वेळ देखील वाढवण्यात आलेली आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. किंवा तुमच्या गावाजवळील अंगणवाडी सेविकांच्या मार्फत देखील हा अर्ज करू शकता.

अनेक महिलांनी या योजनेचा अर्ज भरलेला आहे. त्यांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहेत. परंतु अजूनही त्यांना पैसे आलेले नाहीत. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर हे पैसे येणार नाही. जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसेल, तर लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही याची तपासणी करा. तसेच जर आधार कार्ड लिंक झाले, तर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकूण 4500 हजार रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वैयक्तिक बँक अकाउंट असणे गरजेचे असते. जॉईंट अकाउंट असणाऱ्या महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही.

Iphone 16 Series | जबरदस्त फीचर्ससह IPhone 16 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Iphone 16 Series

Iphone 16 Series | भारतामध्ये आयफोनचे अनेक युजर्स आहेत. अनेक लोकांना आयफोन खूप आवडतो आता. अनेक लोक आयफोनच्या नव्या सिरीजच्या प्रतीक्षेत होते. अशातच आता आयफोनने 16 सिरीज (Iphone 16 Series)भारतामध्ये देखील लॉन्च केलेली आहे. आता आयफोनच्या या नव्या सिरीजमध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर्स पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत जे फीचर्स तुम्हाला वापरता आले नाही, ते सगळे फीचर्स तुम्हाला वापरता येणार आहे. आता हा आयफोन 16 सिरीज (Iphone 16 Series) नक्की कसा असणार आहे? याची किंमत काय असेल? कोण कोणते नवीन फीचर्स असणार आहेत? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

एप्पलने एका सर्वात मोठ्या लॉन्च इव्हेंटमध्ये त्यांच्या आयफोन 16 फोनचे नव्या मॉडेलच्या अनावरण केलेले आहे. या सिरीजमध्ये आयफोन 16, आयफोन 16 प्लस आयफोन प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या मॉडेलचा समावेश आहे. या फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल बटन देखील देण्यात आलेले आहे. या फोनमध्ये तुम्हाला फोटोग्राफीचा चांगला अनुभव मिळणार आहे. त्याशिवाय ए 18 आणि ए 18 प्रोसह जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला अपडेट करण्यात येईल

आयफोन 16 ची वैशिष्ट्ये | Iphone 16 Series

आयफोन 16 हा एरोस्पेस ग्रेड अल्युमिनियम डिझाईन सह उपलब्ध होणार आहे. हा फोन पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. या मोबाईलला काचेच्या सिरॅमिक सील्सह चांगले संरक्षण देण्यात आले आहे. तसेच आयफोन 16 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच आयफोन 16 प्लस मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. ॲपलच्या इन हाऊसचा कोर्स सीपीयू आणि पाच कॉल जीपीयूसी तीन एमए तसेच एप्पल इंटेलिजन्स यांसारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. तसेच गेमिंगसाठी चांगल्या प्रकारच्या फोटो व्हिडिओसाठी देखील फायदा होणार.

या फोनच्या नवीन कॅमेरा कंट्रोल बटनामुळे आता फोटो क्लिक करणे खूप सोपे झालेले आहे. हे एक बटन क्लिक केल्यावर ती कॅमेरा उघडतो आणि जास्त वेळ टॅप केल्यावर थेट व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला जातो. या फिचरमध्ये तुम्हाला झूम यांसारखे पर्याय देखील आहे. युजर्सला या बटनासह लाईट प्रेस आणि क्लीन दोन्ही पर्याय मिळणार आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 18 मेगापिक्सल सह फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल सह अल्ट्रावाईड लेन्स सहज 18 मेगापिक्सल फ्युजन कॅमेरा मिळणार आहे.

भारतीय बाजारात आयफोन 16 ची किंमत | Iphone 16 Series

आयफोन 16 ची किंमत भारतीय बाजारात ही 69 हजार 99 रुपयांपासून सुरू होते. तर आयफोन 16 प्लस ची किंमत 89 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही मॉडेलमध्ये 128 जीबी स्टोरेज आहे. तसेच हा मोबाईल तुम्हाला पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये तुम्हाला अल्ट्रामरीन, टीन, गुलाबी, पांढरा आणि काळा रंग मिळेल. भारतीय बाजारात या फोनची प्री बुकिंग 13 सप्टेंबर पासून चालू होणार आहे. तर 20 सप्टेंबर पासून त्याची विक्री चालू होईल.

SIP Profit Tips | SIP सुरु करायची असेल तर हे सिक्रेट नक्की लक्षात ठेवा; होईल बंपर नफा

SIP Profit Tips

SIP Profit Tips | आज-काल भविष्याचा विचार करून अनेक लोक कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. महागाईचा विचार करता गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच लोक आपल्या पगारातून काही वाटा हा भविष्यासाठी राखून ठेवत असतात. सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. काहीजण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात. काही बँकांच्या एफडी मध्ये गुंतवणूक करतात. परंतु म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे आजकाल जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. अनेक लोक हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्वेस्ट प्लानमध्ये (SIP Profit Tips) गुंतवणूक करणारे लोकांची संख्या जास्त झालेली आहे. एसआयपीच्या माध्यमातून खूप जास्त नफा होतो. आणि यात वाढ होण्याची अनेक कारण होते देखील आह. त्यामुळे एफडी किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याकडे लोक जास्त येतात. प्रत्येक एसआयपी (SIP Profit Tips) करणाऱ्याला चांगला फायदा होतो. परंतु यामागे नक्की काय कारण आहे? लोकांना एवढे जास्त रिटर्न्स कसे काय मिळतात! याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कमी रकमेपासून सुरुवात करा | SIP Profit Tips

तुम्ही एसआयपीमध्ये अगदी कमीत कमी रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही अगदी महिन्याला 100 रुपये देखील गुंतवू शकता. म्हणजेच एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जास्त रकमेची गरज लागत नाही. अनेक लोकांना वाटते की, एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे लागतील, परंतु याबाबत तुम्हाला कोणतेही बंधन नाही.

नियमित गुंतवणूक

म्युच्युअल फंडातील एसआयपी द्वारे तुम्हाला नियमित बचत करण्याची सवय लागते. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याच्या एका तारखेला ठराविक अशी रक्कम जमा करावी लागते. त्यासाठी आधी तयारी करावी लागते. म्हणजेच तुम्हाला एक नियमित गुंतवणूक करण्याची सवय लागते. त्यामुळे तुम्ही फालतूचा खर्च करत नाही.

ऑटोमॅटिक डिपॉझिट | SIP Profit Tips

एसआयपीमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमचे बँक खाते तुमच्या गुंतवणुकीची लिंक असणे गरजेचे आहे. त्यामुळे गुंतवणूक करणे खूप सोपे जाते. तुमच्या दिलेल्या तारखेला तुमच्या खात्यातून पैसे ऑटोमॅटिक एसआयपी मध्ये गोळा केले जातात.

शिस्तबद्धता

तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करून भविष्यात जाऊन चांगल्या नफा मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शिस्त जागेवर लावावी लागेल. तुम्हाला गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. आणि ती सतत चालू ठेवली पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका अगदी कमीत कमी रकमेने तुम्ही एसआयपी चालू ठेवू शकता. आणि शिस्तीने दीर्घकाळ चालू ठेवल्यास तुम्हाला चांगला नफा होईल.

जास्त रकमेचे एसआयपी करू नका

तुम्ही जर दीर्घ काळासाठी एसआयपी चालू करणार असाल, तर सुरुवातीला जास्त रकमेने चालू करू नका. अनेक वेळा आपल्याला अडचणी येतात आणि या रकमेची एसआयपी चालू ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे एसआयपी मध्येच थांबवावी लागते. त्यामध्ये लोकांना फायदा होत नाही. त्यामुळे कमीत कमी रुपयांची एसआयपी चालू करा.

Apple Cider Vinegar | ऍपल सायडर व्हिनेगरचे शरीराला होतात आश्चर्यकारक फायदे: जाणून घ्या सविस्तर

Apple Cider Vinegar

Apple Cider Vinegar | ॲपल साइडर विनेगर हा आपल्या आहारामध्ये अत्यंत महत्त्व आहे. आणि काळापासून याचे सेवन केले जाते. आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते. यासोबत आरोग्याला अनेक फायदे होतात. परंतु आता हे एप्पल साइडर विनेगर (Apple Cider Vinegar) म्हणजे नक्की काय? आणि त्यापासून आपल्या शरीराला कसे फायदे होतात? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

ॲपल साइडर विनेगर म्हणजे काय ? | Apple Cider Vinegar

ॲपल साइडर विनेगर हे सफरचंदाच्या रसाला आंबवून तयार केले जाते. तुम्हाला हे बाजारामध्ये देखील सहज उपलब्ध होते. आणि वापरण्यासाठी देखील खूप सोपे आहे. तुम्हाला जर अत्यंत निरोगी आहार घ्यायचा असेल? तर अनेक आरोग्य तज्ञ हे सफरचंद साइडर विनेगर पिण्याची माहिती देतात. आता याचे नक्की काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊया.

वजन कमी होते

ऍपल सायडर व्हिनेगर परिपूर्णतेची भावना देते. व्हिनेगरमध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड काही प्रमाणात यासाठी जबाबदार आहे. हे भूक कमी करते, जे अनावश्यक लालसा थांबवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

रक्तातील साखर नियंत्रित राहते

ऍपल सायडर व्हिनेगर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, जे लालसा कमी करते आणि जास्त खाण्यापासून दूर जेव्हा रक्तातील साखर नियंत्रणात राहते, तेव्हा ते शरीराला साखरेच्या वाढीपासून आणि साखरेच्या क्रॅशपासून संरक्षण करते, जे अनावश्यक लालसा आणि भूक यासाठी जबाबदार असतात.

चयापचय क्रिया वाढवते

सफरचंद सायडर व्हिनेगर शरीरातील चयापचय वाढवते, ज्यामुळे कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सक्षम होते.

चरबी कमी होते

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड यकृत आणि पोटातील चरबीचा संचय कमी करते, ज्यामुळे शरीराचे सर्व अवयव निरोगी राहतात, शरीराची सर्व कार्ये सुरळीतपणे चालतात आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

डिटॉक्सिफाय | Apple Cider Vinegar

ऍपल सायडर व्हिनेगर पचन प्रक्रियेच्या सुरळीत कार्यामध्ये मदत करते, ज्यामुळे शरीरातून कचरा सहज बाहेर जातो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत मदत होते.

पुण्याच्या ट्रॅकवर धावणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’ काय असेल वेळापत्रक ? जाणून घ्या

देशभरात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्सला चांगली पसंती मिळत आहे. अशातच पुणेकरांसाठी साठी एक आनंदाची बातमी असून पुण्याच्या ट्रॅक वर आता आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस 15 सप्टेंबर पासून धावणार असून या रेल्वेला आठ डबे असणार आहेत. ही वंदे भारत एक्सप्रेस अद्यावत असणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा होती ही गाडी आता अखेर सुरू होणार असून हुबळी पर्यंत प्रवास करत असताना अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. चला जाणून घेऊया या खास वंदे भारत एक्सप्रेस बाबत…

मिळालेल्या माहितीनुसार पुणे स्थानकावर सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी ऑनलाइन पद्धतीने याचा उद्घाटन सोहळा असणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही रेल्वे पुणे विभागाची नसून हुबळी विभागाची असणार आहे. त्यामुळे या ट्रेनची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही हुबळी विभागाची असणार आहे. पुण्यात वंदे भारत एक्सप्रेस दाखल झाल्यानंतर मात्र डब्याची स्वच्छता केली जाणार आहे.

काय आहे वेळापत्रक?

पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस हुबळी स्थानकामधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुटणार आहे. मिरजेमध्ये ही गाडी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे तर पाच मिनिटांचा थांबा घेऊन कोल्हापूरला दहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे. कोल्हापूरला पंधरा मिनिटांचा थांबा ही गाडी घेईल त्यानंतर दहा वाजून 30 मिनिटांनी कोल्हापूरहून सुटेल आणि पुन्हा मिरजला सकाळी 11:15 मिनिटांनी येईल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही गाडी पुण्यात पोहोचेल तर पुण्याहून दुपारी चार वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि मिरजेला नऊ वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल हुबळीला रात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी पोहोचणार आहे.

110 किमी प्रतितास इतका वेग

मिळालेल्या माहितीनुसार या गाडीचा वेग हा ताशी 110 km इतका ठरवण्यात आला आहे मात्र काही मोजक्या ठिकाणी या वेगाने ही गाडी धावेल पुणे ते सातारा सेक्शन मध्ये काही छोट्या स्थानकांत 55 किलोमीटर प्रतितास वेगानं ही रेल्वे धावणार आहे.