Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 476

Malaika Arora Father Death | मलायका अरोरावर कोसळला दुःखाचा डोंगर; इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून वडिलांनी संपवले आयुष्य

Malaika Arora Father Death

Malaika Arora Father Death | बॉलीवूडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मलायका आरोरा (Malaika Arora) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मलायका अरोरा हिचे वडील (Malaika Arora Father Death) अनिल अरोरा यांनी आज म्हणजे 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. त्यांनी वांद्रे येथील त्यांच्या इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलेले आहे. त्यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून त्यांचे आयुष्य संपवलेले आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलीवूडमध्ये खळबळ उडालेली आहे.

या घटनेचा घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले आहे. आणि त्यांनी प्राथमिक चौकशीला देखील सुरुवात केलेली आहे. परंतु मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या सारखे एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून याबाबत वेगवेगळे तपास सुरू झालेले आहेत. तसेच पोस्टमार्टमसाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात देखील पाठवला गेलेला आहे. वडिलांच्या आत्महत्याची बातमी समजली, त्यावेळी मला एका पुण्यात होती. ही बातमी समजली तेव्हा ती लगेच मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

मलायका अरोराचे वडील (Malaika Arora Father Death) अनिल अरोरा हे मागील वर्षी प्रकृतीच्या कारणामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. परंतु त्यांच्यावर नक्की कसे उपचार चालू होते? त्यांना मानसिक दृष्ट्या काही त्रास होत होता? का याबद्दलची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

Maruti Electric Car : Maruti लाँच करणार पहिली Electric Car; 500 KM पर्यंत रेंज देणार

Maruti Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : (Maruti Electric Car) भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये आजकाल इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच पाहायला मिळत आहे. पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. बाजारात दररोज नवनवीन इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक रिक्षा लाँच होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता देशातील दिग्गज आणि लोकप्रिय कंपनी मारुती सुझुकी सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उतरली आहे. कंपनी पुढील वर्षी जानेवारीमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. मारुतीची ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्ज मध्ये ५०० किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल असा कंपनीचा दावा आहे.

मारुती आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Maruti Electric Car) पुढील वर्षी 17-22 जानेवारी दरम्यान सादर करणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ हिसाशी ताकेउची यांनी एका इव्हेंटमध्ये सांगितले की, या वाहनाशिवाय कंपनी आणखी अनेक काही इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याचा विचार करत आहे. तसेच २०३० पर्यंत गाड्यांची निर्यात आणखी वाढवण्याची कंपनीची योजना आहे असेही त्यांनी म्हंटल. ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी मारुती सुझुकी ही इलेक्ट्रिक वाहने युरोप आणि जपानसारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात करणार आहे अशी माहिती हिसाशी ताकेउची यांनी दिली.

मारुतीच्या इलेक्ट्रिक कार मध्ये काय खास? Maruti Electric Car

मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार हि एक माध्यम आकाराची SUV कार असेल. EVX असं तिचे नाव असेल. या इलेक्ट्रिक कार मध्ये 60 kWh बॅटरी पॅक बसवण्यात येईल. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर मारुतीची ही इलेक्ट्रिक कार तब्बल ५०० किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकेल. या कारची किंमत 15 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात मारुतीची इलेक्ट्रिक कार, TATA आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या आगामी इलेक्ट्रिक कारला टक्कर देऊन शकते.

बावनकुळेंच्या मुलाने दारूसोबत गोमांस खाल्लं, तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? राऊतांचा प्रहार

sanjay raut on sanket bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. जर एखाद्या सामान्य माणसाने हा अपघात केला असता, तर त्याचे काय हाल झाले असते? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे. लाहोरी बार मध्य संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) आणि त्याचे मित्र दारू पीत बसले होते त्या बारचे बिल समोर आलं पाहिजे. त्यात दारूसोबत चिकन आणि बीफचेही बिल आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला. तसेच तुम्ही गोमांस खाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवताय? असा सवालही भाजपला केला.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, लाहोरी बार मध्ये जे बिल आहे ते लोकांसमोर आले पाहिजे. त्या बिलामध्ये दारूचा उल्लेख आहे. सोबतच त्यात चिकन, मटण आणि बीफ कटलेटचा अर्थात गोमांस याचा देखील त्यात समावेश आहे आणि हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. श्रावण आहे, गणपती आहे, असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे मटण, गोमांस खातात, हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात असं म्हणत संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला.

यावेळी संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा जोरदार घणाघात केला. महाराष्ट्राच्या कायद्यासव्यवस्थेच्या बाबतीत सध्या धिंडवडे काढले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे आत्तापर्यंतचे सर्वात घतीया गृहमंत्री आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ज्या प्रकारे राज्यात या घटना घडत आहेत, ज्या पद्धतीने तुम्ही राज्य चालवत आहात, एकीकडे चार वर्षाचे प्रकरण उकरून काढत आमच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्याला निघाले आहात, मात्र तुमच्याच पक्षाच्या एका नेत्याच्या मुलाने अनेक गाड्यांना चिरडून निष्पाप लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही अभय देत आहात. हे पाप तुम्ही कुठे फेडाल? असा सवाल करत संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली.

लहान मुलांच्या स्किन केअर प्रोडक्टमध्ये आढळली धोकादायक रसायने; हार्मोन्सवर होतो थेट परिणाम

Child Skin care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल बाजारामध्ये लहान मुलांसाठी देखील अनेक सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. यामध्ये मुलांना लावायचे बॉडी लोशन, केसांचे तेल, कंडीशनर, मलम यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. परंतु यामध्ये उच्च पातळीच्या फॅथलेट्स आहेत. त्यामुळे तुमच्या स्किन केअर प्रॉडक्टचा लहान मुलांच्या त्वचेवर जास्त प्रभाव पडू शकतो. याबाबत एक अभ्यास देखील करण्यात आलेला आहे. आणि यात असे आढळून आले आहे की लहान मुलांच्या वंशिक उत्पत्तीवर आधारित फॅथलेट्स आणि त्याचे बदलणारे रसायने या प्रणालीवर विविध प्रभाव टाकतात. ज्याचा वापर प्लास्टिकची लवचिकता आणि टिकाऊपणे सुधारण्यासाठी केला जातो. वेगवेगळे रसायने शरीरातील नैसर्गिक संप्रेषणकाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करतात. त्यामुळे या उत्पादनांचा लहान मुलांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.

या अभ्यासात बाबत अभ्यासाचे प्रमुख तपासत मायकेल एस ब्लूम यांनी सांगितले आहे की, लहान मुलांमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. परंतु या स्किन केअर प्रॉडक्टच्या वापरामुळे आंतरस्त्रावी विघटन असणाऱ्या संपर्कात येण्याचा स्तर बदलू शकतो. याचे परिणाम मुलांच्या वंशिक ओळख आणि जन्माच्या वेळी नियुक्त केलेल्या लिंगावर देखील अवलंबून बदलू शकतात.

या संशोधनात चार ते आठ वर्षे वयोगटातील मुलांचा वैद्यकीय डेटा कलेक्ट करण्यात आला. यामध्ये जवळपास 603 मुलांचा वैद्यकीय डाटा अमेरिकेत गोळा करण्यात आला. तसेच पालकांनी आतापर्यंत त्यांच्या मुलांच्या त्वचेवर कोणकोणते उत्पादन लावलेली आहे. त्याची माहिती देखील घेतली आणि या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही एकापेक्षा जास्त स्किन केअर प्रॉडक्ट वापरत असाल, तर त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

यावेळी ब्लूम असे म्हणाले की, अशा परिणामामुळे मुलांच्या त्वचेची काळजी उत्पादकांमध्ये अंतर्स्त्रावी विघटन करणाऱ्या रसायनांचा वापरस सुचित केली जाऊ शकते. यामुळे पालकांनी मुलांसाठी उत्पादनाचा वापर करताना अगदी काळजीपूर्वक प्रोडक्ट किंवा ते खूप गरजेचे असते. अन्यथा लहान मुलांमध्ये याची खूप भयानक परिणाम होऊ शकतात. लहान मुलांच्या हार्मोनल संतुलन निरोगी विकासासाठी स्किन केअर प्रॉडक्ट काळजीने निवडणे खूप गरजेचे आहे.

Bmc Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक पदासाठीची ‘ती’ अट रद्द; भरली जाणार तब्बल 1846 पदे

Bmc Recruitment 2024

Bmc Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका (Bmc Recruitment 2024) अंतर्गत एक भरती निघाली होती. ही भरती कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदासाठी निघालेली होती. या पदाच्या एकूण 1846 रिक्त जागा आहेत.आणि यासाठी राज्यातून अनेक तरुणांनी अर्ज देखील केलेले आहे. परंतु बीएमसीने दहावी उत्तीर्ण प्रथम प्रयत्नात पास असणे ही अट घातली होती. त्यामुळे अनेक लोकांना अर्ज देखील करता आला नाही. या अटीविरुद्ध राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. असेच आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत रद्द करण्याची मागणी केलेली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून ही मागणी केलेली आहे. यानंतर आता बीएमसी प्रशासनाला एक परिपत्रक जारी केलेले आहे. आणि अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे. ती म्हणजे आता या भरतीसाठी दहावी तसेच पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्यात आलेली आहे. आता या भरतीसाठी राज्यातील लाखो उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

15 दिवसात नवीन जाहिरात |Bmc Recruitment 2024

बृण्मुंबई महानगरपालिके अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदाच्या जागा भरण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झालेली होती. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले आहेत. परंतु अर्ज करताना पदवी परीक्षेत आणि दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे. ही शिक्षणाची अट लागू करण्यात होती. परंतु आता ही प्रथम प्रयत्नात रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही मागणी देखील रद्द करण्यात आलेली आहे. आता येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

सध्या बीएमसी कडून शैक्षणिक पात्रतेमध्ये सुधारणा करण्याची प्रयत्न देखील चालू झालेले आहेत. आता या सुधारित शिक्षण अहर्तेनुसार कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जाहिरात नव्याने प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ 15 दिवसाच्या आतच ही भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे. अशी माहिती महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहेत. महानगरपालिकेने घेतलेले या निर्णयामुळे आता राज्यभर ते लाखो उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे. आता अनेक लोकांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. परंतु ज्या लोकांनी आधी अर्ज केलेली आहेत. त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. त्यांचे हेच अर्ज पुढील भरती प्रक्रियेत देखील ग्राह्य धरले जाणार आहेत. असे महानगरपालिका प्रशासनाने सांगितलेले आहे.

Weather Update | गणेशभक्तांचा आनंद होणार कमी; राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update

Weather Update | यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. सध्या सगळीकडे गणेश उत्सवाची धुमधाम दिसत आहे. तर दुसरीकडे पावसाने (Weather Update) देखील चांगलीच जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आणि आज देखील या पावसाच्या शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभाग रोज पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मुंबई देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता राज्यात कसे हवामाना असणार आहे. हे आपण जाणून घेऊया.

हवामान विभागाने आज कोकणामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना आज गेलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, गडचिरोली, परभणी, हिंगोली, बुलढाणा, जालना, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या भागात वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आज मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील या ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे गणेश भक्तांची चांगली तारांबळ उडणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण दिल्लीत देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राजस्थान या राज्यात देखील आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाबद्दल नागरिकांच्या आनंदाला थोडीशी गालबोट लागण्याची शक्यता आहे. कारण शहरांमध्ये गणेशोत्सवात गणपती बघण्यासाठी खूप जास्त गर्दी असते. परंतु या पावसामुळे लोकांचा आनंद कमी होण्याची शक्यता आहे.

उदयनराजे म्हणतात डॉल्बी वाजणारच, तर शंभूराजेंनी दिला कारवाईचा इशारा; साताऱ्यात पुन्हा राडा?

satara dolby udayanraje shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश विसर्जन मिरवणुकीवरील वेळेचं बंधन आणि वाद्यांवरील निर्बंधावरून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात मतभेद पाहायला मिळाले. प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा उभा करून गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालू नये. असे कितीसे पोलीस आहेत. तेवढा पोलीस फोर्स जिल्ह्याला पुरेसा नाही. त्यामुळं इथं पण युपी, बिहारच होईल, या गोष्टीचं पोलिसांनी भान ठेवावं. लाठीचार्ज झाला तर ‘अरे ला कारे’ने उत्तर देता येईल, असं उदयनराजेंनी सुनावलं आहे. तर दुसरीकडे कोणी नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देत शंभूराज देसाई यांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई, पुण्यात डॉल्बी वाजविला जात असताना साताऱ्यात याला का बंदी? असा सवाल करत डॉल्बी नियमात राहून वाजवावा, असं उदयनराजे भोसले यांनी म्हंटले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल आहे, १२ वाजेपर्यंत मिरवणूक काढायची आणि सकाळी ६ वाजेपर्यंत ती तशीच रस्त्यावर सोडायची हे कोंणत्या नियमात बसते. तुम्ही सलग मिरवणूक काढा आणि डेसिबल च्या हिशोबाने डॉल्बी लावा असं उदयन राजेंनी म्हंटल.

त्यावर प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई यांनी कारवाईचा इशारा दिला शासनाचे नियम आणि हायकोर्टाचे काय निर्देश आहेत, त्याची माहिती उदयनराजेंना दिली जाईल. कोणी नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे. शासन नियमांचा बागुलबुवा उभा करुन, प्रशासनाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रकार करु नये अशी रास्त अपेक्षा आहे. डॉल्बीच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करावी तथापि एखादी बाब करुच नये यासाठी एका मर्यादेपलीकडे अट्टाहास करु नये, गणेश मंडळांना गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होणार नाही अशी दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी आवाहनात्मक सूचना आज प्रशासन आणि सर्व संबंधीतांना केली आहे अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana | ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चे सुधारित निकष समोर, 31 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana | राज्यात सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. आणि नागरिक या योजनांचे स्वागत देखील करतात. परंतु सध्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय होत आहे. या योजनेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार देखील चालू आहे. अशातच आता सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) सुरू केलेली आहे. आणि या योजनेसाठी देखील नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

सरकारच्या या योजनेअंतर्गत आता राज्यातील सर्व धर्मीयांमधील जेष्ठ नागरिक जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहे. आणि ज्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा आहे. ती इच्छा आता मुख्यमंत्री पूर्ण करणार आहेत. यासाठी सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) राबवली आहे. या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 11 जुलै रोजी मान्यता देखील देण्यात आलेली आहे. या योजनेनुसार आता अर्जदारांना सुधारित निकनुसार ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे 31 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सरकारने या योजनेचा नवीन शासन निर्णय 11 ऑगस्ट रोजी जाहीर केलेला आहे. यासाठी आता आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी 31 जुलै 2024 आणि 5 ऑगस्ट 2024 यांनी सादर केलेल्या सर्व निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचारात घेतली होती.

सुधारित निकष | Mukhyamantri Tirth Darshan Yojana

  • या योजनेचा अर्ज उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2024
  • ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे या लोकांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.

लाभार्थ्यांची निवड

  • या योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या प्रवाशासाठी जिल्हा निहायक कोण निश्चित केला जाणार आहे. यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या आधारित यादी तयार केली जाईल.
  • जर पती आणि पत्नीने दोघांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला असेल तर केवळ एकाची निवड या योजनेअंतर्गत होईल तर जिल्हास्तरीय समिती किंवा यात्रेही वर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.

Maharashtra Lok Poll Survey : महाविकास आघाडी 150 पार, भाजपची झोप उडवणारा सर्वे पहाच

Maharashtra Lok Poll Survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून जागावाटप आणि अन्य मुद्द्यांवर सर्वांच्याच चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती (Mahayuti) असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभेतील यशानंतर आता विधानसभा निवडणुकीतीही आम्हाला यश मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीला आहे, तर लोकसभेतील चूक पुन्हा होणार नाही असं म्हणत महायुती विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून जनतेला आकर्षित करण्यासाठी सरकार कडून वेगवेगळ्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी एका सर्वेंने महायुती सरकारची अक्षरशः झोप उडवली आहे. या सर्व्हेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची थेट सत्ता येईल असं म्हंटले आहे.

लोक पोलच्या सर्वेक्षणाच्या (Maharashtra Lok Poll Survey) निष्कर्षातून असं समोर आलंय की, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीला 115 ते 128 जागा मिळू शकतात, तर त्यांची मतं 38-41 टक्के असू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पुन्हा एकदा मुसंडी मारेल असं या सर्वेक्षणात बोललं जातंय. यंदाच्या विधानसभेत महाविकास आघाडीला 141-154 जागा मिळू शकतात, तर त्यांची मतं 41- 44 टक्के असू शकतात असेही लोक पोलच्या सर्वेक्षणात म्हंटल जातंय . तर इतर जे काही पक्ष आहेत त्यांना पाच ते 18 जागा मिळू शकतात. महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोणत्या झोन मध्ये किती जागा?

फडणवीसांचे होम पीच असलेल्या विदर्भात भाजपला मोठा फटका बसू शकतो. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. त्याठिकाणी महाविकास आघाडीला 40-45 जागांवर यश मिळेल तर महायुतीला अवघ्या 15 ते 20 जागांवर समाधान मानावे लागेल.

उत्तर महाराष्ट्रात मात्र महविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीनाही समसमान यश मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात 47 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी महाविकास आघाडीला 20-25 आणि महायुतीला सुद्धा 20-25 जागा जिंकता येतील.

ठाणे आणि कोकणात मात्र महाविकास आघाडीला मोठा फटका बसेल असं या सर्वेक्षणात म्हंटल आहे. या भागात विधानसभेच्या 39 जागा आहेत. यात महाविकास आघाडीला अवघ्या ५ ते १० जागा जिंकता येतील तर महायुतीला 25-30 जागा मिळू शकतात. लोकसभेला सुद्धा याच झोन मध्ये महायुतीला दमदार यश मिळालं होते.

मुंबईमध्ये मात्र महाविकास आघाडीची सरशी पाहायला मिळेल. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यामध्ये महाविकास आघाडीला 20 ते 25 तर महायुतीला 10 ते 15 जागा जिंकता येतील. उद्धव ठाकरेंच्या या बालेकिल्ल्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची एकमेकांना साथ राहील आणि निकालात हे स्पष्ट होईल असं म्हंटल जातंय.

यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी महाविकास आघाडीला 30 ते 35 आणि महायुतीला 20 ते 25 जागा मिळतील .

गणेशोत्सवात बांधकाम कामगारांसाठी गुड न्यूज; मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान

Construction Workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. सरकार देखील बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आणि सोयीसुविधा आणत असतात. या बांधकाम कामगार त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. अशातच आता ऐन गणेशोत्सवात बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता सरकारकडून हे अर्थसहाय्य आता दुप्पट होणार आहे. बांधकाम कामगारांना एक लाख रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे.

यानुसार आता जिल्हा नियोजनाच्या निधीतूनच अनुसूचित जाती तसेच जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत सौर विद्युत संसदेच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन मधील अनुसूचित जाती तसेच जमाती प्रवर्गासाठी राखीव निधीतून रस्ते प्रकाश व्यवस्था यांसारखी कामे करण्यात येणार आहेत. तसेच या कामांच्या ते पुनरावृत्ती होणार आहे. तसेच लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौर घर योजने अंतर्गत फायदा होतो. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सौर पंप तसेच विहिरी देण्यासाठी आता परवानगी देण्यात यावी असे देखील फडणवीस यांनी सांगितलेले आहे.

या बैठकीमध्ये फडणवीस यांनी सांगितले की, आदिवासी गावांमध्ये जंगली प्राणी आहेत. त्यांच्या बचावासाठी कुंपण देण्यात यावे. तसेच बांधणे देखील शासन निर्णय जाहीर करावा. मानव विकास निधीची कामे राज्यामध्ये 125 तालुक्यांमध्ये करण्यात येतात. यासाठी देखील मान्यतेचे अधिकाराचा जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हा नियोजन निधीतील कामांचे तांत्रिक मान्यता प्रस्ताव मंजुरीचे अधिकार आता जिल्हा स्तरीय यंत्रणाकडे देण्यात आले आहे. तसेच आता या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना अर्ज त्याची कामे 21 दिवसाच्या आत करावी असे देखील सांगितले आहे.