Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 478

हिमाचलमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?? राज्यात ड्रग्सचा सुळसुळाट

Sukhvindar singh sukhu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सगळा राज्यकारभार पाहत असतो. जनतेला कोणत्याही गोष्टींची कमतरता आहे? राज्यामध्ये कोणत्या सोयी सुविधांची गरज आहे? या सगळ्याचा विचार करूनही राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून वेगवेगळे निर्णय घेतले जातात. परंतु अशातच आता हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. सुखविंदर सिंग सुखू हे जेव्हा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी जनतेला मोठमोठे आश्वासन दिलेली होती. परंतु सध्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आणि त्यांनी चुकीचा कारभार देखील सांभाळला आहे. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. एकेकाळी सुखविंदर सिंग हे राज्याला समृद्धीकडे नेणारे एक सक्षम असे नेते होते. परंतु त्यांनी यावेळी त्यांचा कार्यभार चांगल्या पद्धतीने सांभाळला नाही. तसेच जनतेला दिलेले वचन देखील पाळले नाही. यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसत आहे.

आश्वासनांची पूर्तता नाही

ज्यावेळी सुखविंदर सिंग सुखू हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पदभार स्वीकारताना त्यांनी सांगितले होते की, ते सगळ्या पायाभूत सुविधांचा सुधारणा करतील. बेरोजगारी दूर करतील आणि हिमाचल प्रदेशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते सगळे प्रयत्न करतील. या प्रकारचे अनेक आश्वासने त्यांनी जनतेला दिली होती. परंतु अजूनही त्यांनी त्यांचे एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. याचे उदाहरण म्हणजे राज्याच्या बेरोजगार भत्ता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांना मोठे अपयश आलेले आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी एक कोणतीही योजना पूर्णपणे मार्गाने लावली नाही. त्याचप्रमाणे राज्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये रस्ते नीट झालेले नाही. पर्यटन क्षेत्राला देखील चालना दिलेली नाही. या सगळ्या बाबत आश्वासन त्यांनी दिलेले होते. परंतु त्यांनी त्यांच्या एकाही वचनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जनता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज आहे.

चुकीच्या कारभाराची यादी

सुखविंदर सिंग सुखू हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने राज्यकारभार सांभाळत आहेत .राज्यांमध्ये लोकांना आरोग्य सेवा तसेच शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक सेवा देखील नीट पोहोचत नाही. यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. सरकारी शाळांमध्ये शिक्षण तसेच संसाधनांची कमतरता देखील आहे. यंत्रणेमध्ये एक मोठ्या प्रमाणात गडबड झालेली दिसत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या प्रशासनाच्या अभावाबद्दल टीका केली गेली आहे. आणि ही सगळी संकटे वेगळीच रोखण्यासाठी त्यांच्याकडे एका आशेने देखील बघितले जात आहे.

विधानसभेच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांची डुलकी

विधानसभेची एक महत्त्वपूर्ण चर्चा चालू होती. आणि या अधिवेशनात मुख्यमंत्री सुखू हे झोप घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात संताप देखील व्यक्त केला होता. जेव्हा राज्य सरकार कर्मचाऱ्यांचे पगार रखडणे, शिक्षक आरोग्य सेवा कर्मचारी इत्यादीबद्दल चर्चा करत नाही. त्यावेळी लोकांमुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील घेत आहे. त्यामुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी झालेला दिसत आहे.

राज्यात वाढतोय ड्रग्सचा धोका

हिमाचल प्रदेशात सध्या ट्रकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी देखील सुखविंदर सिंग सुख यांचे या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही. आम्ल पदार्थाच्या गंभीर समस्याने हे संपूर्ण राज्य ग्रासलेले आहे. राज्यातील तरुणांमध्ये कुलू, मनाली, मंडी यांसारख्या भागात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि गुन्हेगारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. या सगळ्याचा प्रभाव तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आणत आहे.

Biggest Mall in India: भारतात बनणार सर्वात मोठा मॉल ; मिळणार 3000 लोकांना रोजगार

lulu mall

Biggest Mall in India: पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे भारतात देखील मॉल संस्कृती उदयास आली आहे. भारतभरातल्या मोठ्या शहरांमध्ये मोठ-मोठे मॉल्स पाहायला मिळतात. एवढेच नाही तर लोक तिथे आवर्जून भेटीही देतात. शिवाय हे मॉल उद्योग धंद्यासह अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देतात. आता भारतात आणखी एक मोठा मॉल बांधला जाणार आहे. युएई मधल्या एका मोठया कंपनीद्वारे हा मॉल बांधला जाणार असून यामुळे जवळपास ३००० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हा मॉल नेमका कुठे बांधला जाणार आहे ? कोणत्या कंपनी मार्फत बांधला जाणार आहे?
(Biggest Mall in India) चला जाणून घेऊया सर्व माहिती

UAE चा लुलु ग्रुप भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल बांधणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ अली भारतातील सर्वात मोठ्या मॉलच्या बांधकामाबाबत खूप उत्साहित आहेत. भारतातील गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, आपल्या सहकारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देताना मला खूप आनंद होत आहे. याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून या संदर्भात पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरातमध्ये होणार मोठा मॉल (Biggest Mall in India)

लुलू ग्रुप भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल बनवणार आहे. यासाठी लुलू इंटरनॅशनलला गुजरातमधील अहमदाबादमध्ये जमीनही मिळाली आहे. या मॉलच्या उभारणीसाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. युसूफ अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मॉल 3,50,000 स्क्वेअर फुटांवर बांधण्यात येणार आहे. लुलू ग्रुपचे सीएमडी एम.ए. युसुफ अली यांनी आशा व्यक्त केली आहे की या वर्षापासूनच त्याचे बांधकाम सुरू होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की लुलू ग्रुपमध्ये एकूण 65,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. त्याचा व्यवसाय 42 देशांमध्ये पसरलेला आहे. समूहाची उलाढाल सुमारे 8 अब्ज डॉलर आहे. युसूफ अली म्हणाले की, त्यांनी सुरू केलेला हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.

मिळणार 3,000 रोजगार (Biggest Mall in India)

मॉलच्या बांधकामामुळे 3,000 मुला-मुलींना रोजगार मिळत असल्याची माहिती लुलू ग्रुप इंटरनॅशनलचे सीएमडी एमए युसूफ यांनी दिली आहे. अशा स्थितीत आपल्या सहकारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने त्यांना खूप आनंद होत आहे.

‘या’ शहरांमध्ये लुलू ग्रुपचे मॉल्स

UAE च्या लुलु ग्रुपचे देशातील अनेक शहरांमध्ये मॉल्स आहेत. यामध्ये बेंगळुरू, कोईम्बतूर, हैदराबाद, कोची, लखनौ आणि तिरुवनंतपुरम या शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका मुलाखतीदरम्यान लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ (Biggest Mall in India) यांनी माहिती दिली होती की ते अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये देशातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल बनवणार आहेत.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणार 13,600 रुपयांची मदत

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या वर्षीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांना मदत करावी या उद्देशाने जिरायती पिकांच्या नुकसानासाठी सरकारकडून याआधी प्रती हेक्टर 8500 रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जात होते. परंतु आता ही मर्यादा वाढवलेली आहे. ती म्हणजे आता प्रति हेक्टर 13, 600 रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादित मर्यादित सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.

याबाबत महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे या पावसामध्ये नुकसान झालेले आहे. त्यांच्यासाठी सरकारकडून मदत होणार आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे की, नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिराईत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 13600 रुपये हे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असले तरी आता सरकारकडून मिळणारे या मदतीमुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाळ्यात भाताचे पीक घेतले जाते. परंतु भाताचे पीक लावल्यानंतर काही दिवसांनी अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपत्तीग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी मदत केली जाणार आहे.

Copper Bottle Cleaning Tips | तांब्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी वापरा या घरगुती गोष्टी; क्षणार्धात येईल चमक

Copper Bottle Cleaning Tips

Copper Bottle Cleaning Tips | आपल्याकडे अनेक शतकापासून तांब्याची भांडी वापरतात. अगदी स्वयंपाक करण्यापासून ते पाणी पिण्यापर्यंत तांब्याचा भांड्याचा वापर केला जात होता. आणि पुन्हा एकदा ही प्रथा प्रचलित होत आहे. अनेक लोकांनी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करून तांब्याच्या बाटल्यांमध्ये पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे. तांब्याच्या बाटल्यांमधून पाणी पिले तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असते. त्याचप्रमाणे आपल्या पर्यावरणासाठी देखील चांगला पर्याय ठरू शकते. आता या तांब्याच्या बाटलीत पाणी पिल्याने आपल्या शरीराला नक्की कोणते फायदे होतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तांब्याच्या बाटलीत पाणी ठेवण्याचे फायदे | Copper Bottle Cleaning Tips

तांब्याच्या बाटलीत पाणी ठेवून ते पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे पाण्यात जर काही हानिकारक बॅक्टेरिया असेल तर ते नष्ट करण्याचे काम हे तांबे करते. तसेच पाण्याची पीएच पातळी देखील संतुलन राहते. यामुळे आपल्या आरोग्य चांगले राहते परंतु तांब्याच्या बाटलीत जर तुम्ही पाणी पीत असाल, तर त्या तांब्याच्या बाटलीची काळजी घेणे आणि स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते. अन्यथा त्याचे तुमच्या आरोग्यावर उलटे परिणाम होऊ शकतात. आता ही तांब्याची बाटली तुम्ही कशा प्रकारे साफ करू शकता?याची माहिती आपण जाणून घेऊया.

तांब्याची बाटली साफ कशी करायची | Copper Bottle Cleaning Tips

लिंबू आणि मीठ

तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करून तांब्याची बॉटल साफ करू शकता. यासाठी तुम्ही अर्धे लिंबू कापून त्यावर थोडे मीठ शिंपडा आणि बाटलीच्या आत आणि बाहेरून घासून घ्या. लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते आणि मीठ तांब्यावरील घाण काढून टाकण्यास मदत करते. यामुळे तांब्याची चमक कायम राहते आणि हानिकारक बॅक्टेरिया देखील काढून टाकले जातात.

विनेगर आणि मीठ

तुम्ही विनेगर आणि मिठाच्या सहाय्याने देखील तांब्याची बाटली साफ करू शकता. यासाठी तुम्ही एक कप विनेगरमध्ये एक चमचा मीठ वीज मिसळा. हे मिश्रण तुम्ही बाटलीच्या आत लावा आणि बाटली चांगली धुऊन घ्या. जेणेकरून हे विनेगर बाटलीच्या आत संपूर्ण पसरेल आणि ब्रशने तुम्ही घासून घ्या. एक दोन मिनिट ते तसेच राहू द्या आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

बेकिंग सोडा आणि लिंबू

तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाची पेस्ट बनवून देखील तांब्याची बॉटल साफ करू शकता. तुम्ही ही पेस्ट बाटलीच्या आत आणि बाहेर लावा. आणि हलक्या हाताने स्क्रब करा. नंतर ही बॉटल पाण्याने धुऊन कोरडी करा. बेकिंग सोडा हा तांब्यावरील स्केलला नुकसान पोहोचू न देता त्यावरील सगळी घाण काढतो.

टोमॅटो पेस्ट

तुम्ही तांब्याच्या बाटलीवर टोमॅटोची पेस्ट लावून देखील बाटली साफ करू शकता. यासाठी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे टोमॅटोच्या रसाने बाटली घासत रहा. आणि नंतर पाण्याने धुवा टोमॅटोमध्ये असलेले ऍसिड तांब्याच्या पृष्ठभागावर असलेली सगळी घाण साफ करते आणि नैसर्गिक चमक देते.

Weather Update | राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | गेल्या काही दिवसापासून पावसाचे चक्र फिरलेले दिसत आहे. कधी ऊन पडत आहे, तर कधी पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मध्येच खूप पाऊस पडत आहे, तर लोकांना खूप गरम होत आहे. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. या सोबतच पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभाग दररोज पावसाविषयी (Weather Update) अंदाज व्यक्त करत असतात. पण अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबत पुण्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यासोबत हा हवामान विभागाने विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे आता विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या गणपतीची धूमधाम सर्वत्र चाललेली दिसत आहे. आणि पावसाचा (Weather Update) जोर मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच आता मराठवाड्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 9 सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील दोन दिवस काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

कुकरमधून डाळ शिवताना फसफसते ? वापरून पहा सोप्या टिप्स

भारतीय आहार पद्धतीमध्ये डाळ भात हा पदार्थ आवर्जून केला जातो. अधिक डाळ भांड्यात शिजवली जायची मात्र सध्या प्रत्येक घरात डाळ शिजवण्यासाठी कुकरचा वापर होतोच. मात्र बऱ्याचवेळा कुकरमध्ये डाळ शिजवताना ती फसफसते. म्हणूनच आजच्या लेखात आपण यासंदर्भातले काही महत्वाचे टिप्स जाणून घेणार आहोत…

कुकर मध्ये बऱ्याच डाळ शिजवत असताना त्याचे प्रमाण व्यवस्थित घेणे गरजेचे असते. कुकरमध्ये डाळ शिजत असताना आपण जास्त प्रमाणात डाळ शिजवायला टाकल्याने असे होऊ शकते. शिवाय कुकरमध्ये प्रमाणाच्या बाहेर जर जास्त पाणी भरलं असेल तरीसुद्धा डाळ पाण्यात मिसळून शिट्टीद्वारे बाहेर पडू शकते. याबरोबरच आणखी एक महत्त्वाची चूक म्हणजे बरेच जण पटकन कुकरची शिट्टी वाजवी यासाठी मोठ्या आचेवर डाळ शिजवायला घालतात त्यामुळे देखील डाळ बाहेर पडू शकते.

कुकर मधून पाणी बाहेर येत असेल तर काय करावे?

कुकरमधून पाणी बाहेर येऊ नये यासाठी तुम्ही जेव्हा डाळ शिजवायला घालता तेव्हा त्यामध्ये एक चमचा किंवा छोटी वाटी टाका. जेणेकरून कुकरचे पाणी शिटी द्वारे बाहेर येणार नाही तसंच पदार्थ शिजण्यासाठी लागणारी योग्य वाफ त्यामध्ये निर्माण होण्यास मदत मिळेल.

म्हणून कुकर मधून पाणी गळते

  • कुकरचे रबर सैल असल्यामुळे
  • कुकरची शिट्टी व्यवस्थित नसेल
  • कुकरच्या आत मध्ये दाब निर्माण होत नसेल तर

कुकर मध्ये डाळ शिजवत असताना आणखी एक महत्त्वाची टीप तुम्ही जाणून घ्या त्यासाठी जेव्हा तुम्ही डाळ शिजवायला घालतात त्याआधी गरम पाण्यात 15 मिनिटे डाळ भिजत ठेवा त्यानंतर कुकरमध्ये जेव्हा तुम्ही डाळ टाकता तेव्हा गरजेनुसार पाणी घालून ते चमच्याने हलवून घ्या मसूर डाळ बनवताना अनेकदा कुकरच्या तळाला डाळ चिकटते तसंच कच्ची राहते पण ही काळजी घेतली तर चांगली शिजेल.

खुशखबर ! रविवार पासून पुणे -हुबळी मार्गावर सुरु होणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’

pune hubli

अल्पावधीतच लोकप्रियतेचा शिखर गाठलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आता देशातल्या अनेक भागांमध्ये पोहोचणार आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार 15 सप्टेंबर रोजी देशात नव्या दहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. यामध्ये पुणे ते नागपूर अशी एक वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा धावणार आहे. तर दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस मंजूर केली आहे.

ही वंदे भारत एक्सप्रेस हुबळी ते पुणे (२०६६९) आणि पुणे ते हुबळी (२०६७०) असा प्रवास करणार असून या गाड्यांमुळे मिरज सांगली आणि सातारा येथील प्रवाशांना फायदा होणार आहे. याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयांना प्रसिद्ध केली आहे.

मागणी झाली मान्य

यापूर्वी पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्टचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबण्याची विनंती रेल्वे कडे केली होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी पुणे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेसना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा देखील मंजूर केला आहे.

काय असेल वेळापत्रक

हुबळीहुन पहाटे पाच वाजता वंदे भारत एक्सप्रेस सुटणार असून धारवाडला ही गाडी पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल. बोळगाव ला ही गाडी सहा वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. तर मिरजेत हे गाडी 9:15 पोहोचणार आहे. सांगलीमध्ये ही गाडी नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचणार आहे तर सातारा स्थानकावर ही गाडी 10 वाजून 35 मिनिटांनी तर पुण्यात दीड वाजता पोहोचेल.

पुण्याहून हुबळीला जाणाऱ्या गाडीबद्दल सांगायचं झाल्यास दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून हुबळी करता सुटणार आहे. सातारा इथं चार वाजून आठ मिनिटांनी ही गाडी पोहोचेल. सांगलीत सहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. तर मिरजमध्ये ही गाडी सहा वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर बेळगावला ही गाडी 8 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. शिवाय धारवाडला ही गाडी दहा वाजून वीस मिनिटांनी तर हुबळीत ही गाडी रात्री पावणे अकरा वाजता पोहोचेल.

किती वेळात होणार प्रवास ?

या नव्या मध्ये भरत एक्सप्रेस मुळे पुणे ते सांगली हा प्रवास केवळ तीन तास 55 मिनिटांचा होणार आहे. तर सांगली ते बेळगाव दोन तास 23 मिनिटात गाठता येणार आहे. तसंच सांगली ते हुबळी हा प्रवास चार तास 33 मिनिटांचा असेल तर बेळगाव ते हुबळी हा प्रवास दोन तास दहा मिनिटांचा असेल आणि पुणे ते हुबळी हा प्रवास साडेआठ तासाचा असेल.

काय आहेत वैशिष्ट्ये ?

  • मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत एक्सप्रेस आठ कोचची असून पूर्णपणे वातानुकूलित असेल.
  • सोमवार सोडून ही गाडी दररोज धावणार आहे.
  • या गाडीच्या वेगाबद्दल सांगायचं झाले 66 किलोमीटर प्रति तास या गाडीचा वेग असेल
  • पुणे -हुबळी अंतर 558 किलोमीटर इतके असेल.

महागड्या घरांना ग्राहकांची पसंती ? 75 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तांसाठी कर्ज दीड पटीने वाढले

real estate home loan

आताच्या घडीला घर घेणे काही सोपी गोष्ट राहिली नाही. घरांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. केवळ राहण्यासाठी म्हणून नाही तर एक उत्तम परतावा देणारी गुणतंवणूक म्हणून सुद्धा घर घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. त्यातही सध्या घर घेणाऱ्यांना प्रिमिअम आणि लक्झरी विभागातील घरे पसंतीस उतरत आहेत. एका आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. चला जाणून घेऊया नेमकी काय संगतीये ही आकडेवारी…

प्रीमियम आणि लक्झरी विभागातील घरांची विक्री सातत्याने वाढत आहे. अलीकडच्या काळात घर खरेदीच्या ट्रेंडमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसून येतो. आता एका अहवालातील गृहकर्जाचे आकडे याची पुष्टी करत आहेत. आता लोक महागड्या घरांना पसंती देत ​​असल्याचे गृहकर्जाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

महागड्या घरांसाठी गृहकर्जाचा हिस्सा वाढला

एका इंग्रजी माध्यमाच्या अहवालानुसार, गेल्या 4 वर्षांत महागड्या घरांसाठीच्या कर्जाचा हिस्सा एकूण गृहकर्जांपैकी 75 लाख रुपयांवरून दीड पटीने वाढला आहे. मार्च 2020 मध्ये, एकूण गृहकर्जांमध्ये अशा महागड्या घरांसाठी गृहकर्जाचा वाटा केवळ 19 टक्के होता. मार्च 2024 मध्ये, एकूण गृहकर्जांमध्ये त्यांचा हिस्सा 31.4 टक्क्यांपर्यंत वाढला.

अहवालानुसार, 75 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांचा हिस्सा वर्षानुवर्षे वाढला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात त्यांचा वाटा केवळ 19 टक्के होता, तर 2020-21 या आर्थिक वर्षात त्यांचा वाटा 20.6 टक्के झाला. अशा घरांचा वाटा 2021-22 या आर्थिक वर्षात 24 टक्के आणि 2022-23 या आर्थिक वर्षात 27.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

नाइट फ्रँकचा हवाला देत, अहवालात म्हटले आहे की जर आपण 1 कोटी रुपयांच्या वर श्रेणी पाहिली तर घरांच्या एकूण विक्रीमध्ये 41 टक्क्यांहून अधिक योगदान आहे. नाईट फ्रँकचा असा विश्वास आहे की, आता बाजारात स्थिरतेची स्पष्ट चिन्हे आहेत, कारण गृहकर्ज अर्जांची संख्या सतत वाढत आहे. आकडेवारी दर्शवते की हा कल तात्पुरता नसून कायमस्वरूपी असल्याचे दिसते.

महागड्या घरांसाठी कर्ज देण्यात खासगी बँका पुढे

अहवालात असे म्हटले आहे की 75 लाख रुपयांच्या खाली असलेल्या गृहकर्जाच्या श्रेणीत सरकारी बँकांचे वर्चस्व आहे, तर 75 लाखांपेक्षा अधिकच्या श्रेणीत खासगी बँका पुढे आहेत. 35 लाखांपेक्षा कमी श्रेणीतील गृहनिर्माण वित्त कंपन्यांचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. सीआरआयएफच्या अहवालाचा हवाला देत हे सांगण्यात आले आहे.

सरकारचा मोठा निर्णय!! या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

Government Employee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऐन गणेशोत्सवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगाराच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या तीनही कंपन्यांमध्ये जे कर्मचारी आहेत. त्यांना 19% वेतन वाढ सरकारने जाहीर केलेली आहे. ही वेतन वाढ आता मार्च 2024 पासून मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना मार्च 2024 पासूनची थकबाकी देखील आता मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली होती. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही वेतन वाढ केली होती. त्यानंतर आत्ता जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे. तेव्हा देखील त्यांनी 19 टक्क्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त वेतन मिळणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. अखेर महानिर्मिती कंत्राट कामगार संघटना यांच्या आंदोलनांना यश आलेले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सह्याद्री अतिगृह येथे बैठक करण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या देखील मान्य केलेल्या आहेत. मागील काही वर्षांपासून या मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या. परंतु आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे गणेश उत्सवात महानिर्मिती कंत्राट कामगारांच्या आनंदाला सीमा राहिलेली नाही.

‘या’ महत्वाच्या प्रमाणपत्राशिवाय रिअल इस्टेट डेव्हलपर फ्लॅट देऊ शकता नाही : सर्वोच्च न्यायालय

real estate

एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान रिअल इस्टेट डेव्हलपरने घर खरेदीदाराला फ्लॅट पूर्ण केल्या शिवाय तसेच अग्निशमन मंजुरी प्रमाणपत्राशिवाय घराचा ताबा देता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही प्रमाणपत्रे नसणे हे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेतील कमतरता असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे.

एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे यांच्या खंडपीठाने आग्रा विकास प्राधिकरणाला धर्मेंद्र शर्मा यांना पूर्णत्व आणि अग्निशमन मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यास असमर्थता दर्शविल्याने त्यांना 15 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले. पूर्णत्व प्रमाणपत्र आणि अग्निशमन मंजुरी प्रमाणपत्र नसल्याबद्दल अपीलकर्त्याच्या मुख्य वादाचा गांभीर्याने विचार करणे योग्य असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

ताबा देण्यापूर्वी ‘ही’ प्रमाणपत्रे घेणे आवश्यक

“या कागदपत्रांशिवाय ताबा देता येणार नाही, असे प्रतिपादन करून अपीलकर्त्याने हा मुद्दा सातत्याने मांडला,” खंडपीठाने नमूद केले.UP अपार्टमेंट (बांधकाम, मालकी आणि देखभाल प्रोत्साहन) कायदा, 2010 चे कलम 4(5) आणि RERA कायदा, 2016 चे कलम 19(10) आदेश देते की विकसकाने ताबा देण्यापूर्वी ही प्रमाणपत्रे घेणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले आहे.

“अपीलकर्त्याने वारंवार विनंती करूनही, ADA ही प्रमाणपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे त्याचा ताबा अपूर्ण आणि कायदेशीररित्या अवैध ठरला,” खंडपीठाने म्हटले.न्यायालयाने असे मत मांडले की देबाशिस सिन्हा वि आर एन आर एंटरप्राइझ (२०२३) मध्ये आवश्यक पूर्णता प्रमाणपत्राशिवाय दिलेला ताबा बेकायदेशीर आहे, आणि अशा परिस्थितीत खरेदीदाराला ताब्यात घेण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. या प्रमाणपत्रांची अनुपस्थिती देखील सेवेतील कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले.

“सध्याच्या प्रकरणात, आवश्यक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात ADA चे अपयश अपीलकर्त्याने ताबा घेण्यास नकार दिल्याचे समर्थन करते. त्यामुळे, 11 जुलै 2020 पासून परताव्याच्या तारखेपर्यंत प्रतिवर्ष 9% व्याज दराने अपीलकर्त्याने जमा केलेल्या संपूर्ण रकमेच्या परताव्याच्या व्यतिरिक्त, न्यायालयाने ADA ला अतिरिक्त रक्कम भरण्याचे निर्देश दिले. ADA ने अपीलकर्त्याला रु. 15 लाखाची अतिरिक्त रक्कम भरावी आणि 3,99,100 रूपये किमतीचे गैर-न्यायिक मुद्रांक देखील अपीलकर्त्याला तीन महिन्यांच्या आत परत करावे.