Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 479

PM Care Children Scheme | काय आहे सरकारची PM केअर चिल्ड्रन योजना? जाणून घ्या फायदे

PM Care Children Scheme

PM Care Children Scheme | केंद्र सरकार हे समाजातील प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक व्यक्तीचा विचार करून विविध योजना आणत असतात. ज्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. अगदी लहानांपासून ते दृष्टांपर्यंत सगळ्यांसाठी विविध योजना आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठी एक योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान केअर चिल्ड्रन योजना (PM Care Children Scheme) असे आहे. ही योजना 2021 मध्ये चालू झालेली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या आरोग्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा खर्च केला जातो. तो मुलगा 23 वर्षाचा पूर्ण होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत केली जाते. आताही पीएम केअर सेंटर नियोजन नक्की काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच आरोग्य सुविधा देखील पुरवण्यात येतात. यासोबत आयुष्मान कार्ड देखील बनवले जाते.

कोणत्या मुलांना मदत मिळणार ? | PM Care Children Scheme

केंद्र सरकारने 29 मे 2021 रोजी ही पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत covid-19 मुळे ज्या पालकांचा मृत्यू झालेला आहे. अशा मुलांना याचा फायदा होणार आहे. ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू हा 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान झालेला आहे, त्यांनाच मिळणार आहे. सरकार या मुलांचा खर्च या योजनेअंतर्गत पूर्णपणे उचलते. या योजनेअंतर्गत मुलांच्या आरोग्य विमा शिक्षणासाठीचा खर्च देखील उचलला जातो. ते मूल 23 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत सरकार त्यांचा पूर्ण खर्च करणार आहे. आता या योजनेअंतर्गत कोणाला फायदा मिळणार आहे हे जाणून घेऊया

या योजनेअंतर्गत कोणते फायदे होतात

या पीएम चिल्ड्रेन्स स्कीम अंतर्गत वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे असेल, तर त्याचे पूर्ण पालन पोषण संगोपन शाळेचा खर्च आरोग्य खर्च लसीकरण अंगणवाडी सेवा या सगळ्याचा खर्च दिला जातो. जर मुलाचे वय दहा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर या योजनेअंतर्गत त्याला जवळच्या शाळेत दाखल केले जाते. याला सरकारी खाजगी किंवा KV या योजनेअंतर्गत मोफत गणवेश दिले जातात. पुस्तक देखील दिले जाते किंवा एखाद्या खाजगी शाळेत त्याला कायद्या अंतर्गत फीमध्ये सूट देखील दिली जाते.

18 वर्षापर्यंत मुलांना कोणते फायदे मिळतील ? |PM Care Children Scheme

जर मुलाचे वय हे 11 ते 18 वर्षे दरम्यान असेल, तर आणि तो मोठ्या कुटुंबात राहत असेल. तर त्याला जवळच्या शाळेत ड्रेस कॉलर म्हणून प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर शाळा बंद झाल्यावर मुलाच्या राहण्याची व्यवस्था देखील केली जाते. या योजनेअंतर्गत मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीची माहिती पीएन चिल्ड्रन पोर्टलवर अपडेट केली आहे.

Realme NARZO 70 Turbo 5G : 12GB रॅम, 50MP कॅमेरासह Realme ने लाँच केला परवडणारा मोबाईल

Realme NARZO 70 Turbo 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : स्वस्तात मस्त मोबाईल साठी ओळखल्या जाणाऱ्या Realme ने भारतीय ग्राहकांसाठी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme NARZO 70 Turbo 5G असं या मोबाईलचे नाव असून सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा बजेट किमतीत हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या मोबाईल मध्ये 50MP 50MP , 12GB रॅम सह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. रिअलमी चा हा हँडसेट पिवळ्या, हिरव्या आणि पर्पल रंगात लाँच करण्यात आला असून येत्या 16 सप्टेंबर पासून हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत.

6.67-इंचाचा डिस्प्ले –

Realme NARZO 70 Turbo 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2400 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 180Hz टच सैंपलिंग रेट आणि 2 हजार nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. मोबिलबाबत खास बाब सांगायची झाल्यास यामध्ये रेन वॉटर स्मार्ट टचची सिस्टीम देण्यात आली आहे. म्हणजेच बोटे ओली असतानाही फोनचा डिस्प्ले तुम्ही हॅन्डल करू शकता. कंपनीने या मोबाईल मध्ये मीडियाटेक के डाइमेंस‍िटी 7300 Energy प्रोसेसर वापरला असून हा स्मार्टफोन Android 14 आधारित Realme UI 5 वर काम करतो . मोबाईलला IP65 रेटिंग मिळालं आहे, म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून कोणताही धोका नाही.

कॅमेरा – Realme NARZO 70 Turbo 5

Realme NARZO 70 Turbo 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतोय. यामध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी वापरण्यात आली असून हि बॅटरी 45W अल्ट्रा फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हा मोबाईल फक्त 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Realme NARZO 70 Turbo 5G च्या 6GB + 128G स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये, 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,999 आणि 12GB + 256GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 18,999 रुपये आहे. ग्राहक येत्या १६ सप्टेंबर पासून Realme वेबसाइट आणि Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

‘या’ तारखेला धावणार नव्या 10 वंदे भारत एक्सप्रेस’; PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा

pune nagpur vande bharat

संपूर्णपणे स्वदेशी बनावट असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या ट्रेनला प्रवाशांचे चांगलीच पसंती मिळत आहे. अवघ्या देशभरातून या ट्रेनची मागणी होत आहे. म्हणूनच भारत सरकारकडून ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या ट्रेनचा विस्तार देखील वेगाने होत आहे. अनेक मार्गावर ही सुपरफास्ट ट्रेन तयार करण्यात आली असून या ट्रेन बाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 सप्टेंबरला झारखंड मधील जमशेदपूर इथून देशातील विविध राज्यांसाठी आणखी दहा वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडे दाखवणार असल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठीही एक गाडी सुटणार असून पुणे- नागपूर गाडीचा सुद्धा यात समावेश असणार आहे.

नवीन सुरक्षा फीचर्ससह सुसज्ज

नव्याने रुळावर येणाऱ्या ट्रेनमध्ये कोणती कोणती वैशिष्ट्य असणार आहेत? याची माहिती आता आपण करून घेऊयात. या ट्रेनच्या आत मध्ये आवाज कमी येणाऱ आहे. या ट्रेनमध्ये नवीन कपलर् तंत्रज्ञान असणार आहे त्यामुळे ट्रेनचं वजन देखील कमी असणार आहे. शिवाय ही ट्रेन मजबूत असणार आहे. ट्रेनचे डबे आणि शौचालय अद्यावत करण्यात आले असून ट्रेनमध्ये अनेक नवीन सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही विशेष काळजी घेतली जाणार आहे कारण देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन या ट्रेनमध्ये असणार आहे.

प्रवाशांची खास सोय

तुम्ही जर वंदे भारतच्या या नव्याट्याने प्रवास करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला सीटवरच यूएसबी चार्जिंग, रिडींग लाईटची सोय असणार आहे. याशिवाय मॉड्युलर बॅटरी डिस्प्ले पॅनल आणि सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले आहेत. एसी प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शॉवर तुम्हाला मिळणार आहे. तसेच वरच्या बर्थ वर जाण्यासाठी पायऱ्यांची नवी रचना देखील करण्यात आली आहे. याशिवाय सामान ठेवण्यासाठी जास्त जागा आणि दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळा विशेष बर्थ असणार आहे.

या मार्गांचा समावेश

टाटानगर-पटना, वाराणसी -देवघर, टाटानगर- ब्रह्मपूर, रांची -गोड्डा, आग्रा- बनारस, हावडा- गया, हावडा -भागलपूर, दुर्ग- विशाखापट्टणम, हुबळी- सिकंदराबाद आणि पुणे- नागपूर या मार्गावर सुरु होणार नव्या वंदे भारत एक्सप्रेस.

लवकरच वंदे भारत स्लीपर येणार

कार चेअर असलेली ‘वंदे भारत’ सध्या विविध मार्गांवर धावत आहे. तर ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनही लवकरच सुरू होणार असून येथे तीन महिन्यांमध्ये ही ट्रेन देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि स्लीपर वंदे भारतच्या पहिल्या मॉडेलची झलक दाखवली असून बंगळुरूच्या बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन चा पहिला प्रोटोक मॉडेल बनवून पूर्ण झाला आहे. या ट्रेनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Gold Price : सोन्याच्या किंमती आणखी वाढणार; ही आहेत 3 कारणे

Gold Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने (Gold Price) म्हणजे भारतीयांची आवडती वस्तू… प्रत्येकाला वाटत कि आपल्याकडे जास्तीत जास्त सोने असावे..खास करून महिलांना सोन्याचे प्रचंड आकर्षण असते. सणासुदीच्या दिवसात आणि खास क्षणानिमित्त आपण सोने खरेदी करतो. काहीजण तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरतात. जर तुम्ही सुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्याचा किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अजिबात उशीर करू नका. कारण आगामी काळात सोन्याच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. काही जाणकारांच्या मते, या वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यांत सोन्याचा भाव गगनाला भिडणार आहे.

खरं तर यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करत सर्वसामान्य मोठा दिलासा दिला होता. कस्टम ड्युटी कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव आपोआप कोसळले आणि तब्बल ३००० रुपयांचा फरक प्रति तोळा सोन्याच्या किमतीत पडला. पण अलीकडच्या काळात भारताने पुन्हा सोन्याच्या साठ्यात वाढ केल्याची घोषणा केली आहे, त्यामुळे सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत. त्यातच आता सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत, त्यामुळे सुद्धा सोने आणखी महाग होण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेऊयात अशी काही कारणे ज्यामुळे सोन्याचा भाव आणखी वाढू शकतात.

1) सण आणि लग्नाच्या हंगामाचा परिणाम

यातील पहिले कारण म्हणजे येत्या ३ महिन्यात अनेक सण, उत्सव आणि लगाच्या तारखा आहेत. अशावेळी मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात सुद्धा नक्कीच वाढ होईल हे नक्की. लग्नाच्या कार्यक्रमात सोने मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं जाते. त्याचा परिणाम किमतीवर होईल आणि सोने महागले.

2) यूएस रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली- Gold Price

दुसरं कारण म्हणजे, अमेरिकेतील वाढती मंदी लक्षात घेता, अमेरिकन रिझर्व्ह बँक (फेड रिझर्व्ह बँक) व्याजदरात कपात करण्याची घोषणा करू शकते. अशा स्थितीत सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. त्याचा फटका भारतीय सराफा बाजारात सुद्धा पाहायला मिळेल आणि भारतातील सोन्याच्या किमती वाढतील.

3) युद्धाचा परिणाम अनेक देशांमध्येही दिसून येईल

तिसरं कारण म्हणजे, सध्या जगातील अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहे. यापैकी रशिया-युक्रेन आणि मध्यपूर्वेतील तणावाचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसतोय. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती गगनाला भिडण्याची भीती सर्वच देशांना वाटत आहे. त्यामुळेच कि काय अनेक केंद्रीय बँकांनी सातत्याने सोने खरेदी करण्याचा सपाटा लावलाय आणि सोन्याच्या किमती (Gold Price) यामुळे वाढू लागल्या आहेत.

Adhar Card | घरबसल्या तपासा तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही? अशाप्रकारे करा चेक

Adhar Card

Adhar Card | राज्य सरकारकडून विविध योजना आणल्या जातात. त्यातीलच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. अनेक महिलांचे दोन हप्ते जमा देखील झालेले आहेत. परंतु अर्ज भरून दोन महिने झाले आहेत. परंतु अजूनही अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे अनेक महिलांचे आधार कार्ड (Adhar Card ) हे त्यांच्या बँक खात्याला लिंक नसल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. अशी माहिती समोर आलेली आहे.

त्यामुळे जर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ हवा असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करणे खूप गरजेचे आहे. तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तरी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक करणे खूप गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.

आपले आधार कार्ड हे आपले एक महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. यावर आपली बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन असते. त्यामुळे आपल्या आधार कार्ड जर बँक खात्याला लिंक अससेल तर आपल्या ओळखीचा एक मोठा पुरावा सरकारपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे असते. तुमच्या बँक खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्ही अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहता. आणि कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. आता अनेक लोकांना त्यांच्या आधार कार्ड बँकेची लिंक आहे की नाही याची माहिती नसते. परंतु आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून तुमच्या आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे की नाही हे तपासू शकता.

आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही तपासण्याच्या सोप्या स्टेप्स

  • सगळ्यात आधी तुम्ही https://uidai. gov.in/ या वेबसाईटवर जायचे आहे त्यावर तुम्ही माय आधार या टॅब वर क्लिक करा.
  • त्यानंतर ड्रॉप मेनू वर जा आणि आधार सेवा निवडा.
  • यानंतर आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. त्यावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक दिसेल. त्यावर तुम्हाला ओटीपीवरक्लिक करावा लागेल. जिथे तुमच्या नोंदणी कडून मोबाईल क्रमांकवर ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकायचा आहे.
  • हा ओटीपी टाकल्यावर तुम्हाला कळेल की तुमच्या आधार कार्ड हे कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे. अशाप्रकारे तुम्ही युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया माय आधारच्या अधिकृत पॅटर्नला भेट देऊन तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे की नाही हे तपासू शकता.

बँक खाते लिंक नसल्यास काय करावं?

  • आधार कार्ड जर बँकेची लिंक नसेल तर तुम्ही त्या बँकेत जा आणि आधार कार्ड लिंकचा एक फॉर्म भरून द्या
  • तुमचा आधार कार्ड आणि पॅन संदर्भात माहिती द्या
  • त्यानंतर तुमची केवायसी करा आणि काही मिनिटातच तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक केले जाईल.

Motorola Razr 50 : नादच नाय!! 2 डिस्‍प्‍ले वाला Moto चा फोल्डेबल मोबाईल लाँच; किंमत किती पहा

Motorola Razr 50

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने भारतीय बाजारात 2 डिस्‍प्‍ले वाला फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Motorola Razr 50 असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 8GB RAM, 4200mAh बॅटरी सह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. मोटोचा हा स्मार्टफोन ऑरेंज आणि ग्रे रंगात लाँच करण्यात आला असून उद्यापासून त्याची विक्री सुरु होणार आहे. आज आपण मोटोरोलाच्या या नव्या फोल्डेबल मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Motorola Razr 50 मध्ये बाहेरील बाजूला 3.6-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे आणि आतील बाजूस 6.9-इंचाचा LTPO पोल्ड स्क्रीन आहे. 3.6-इंचाचा POLED डिस्प्लेला 1066 x 1056 पिक्सेल रिझोल्युशन मिळते तर 6.9-इंचाच्या FHD+ poled LTPO डिस्प्लेला 2640×1080 पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. या डिस्प्लेला 3 हजार निट्स पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7300X प्रोसेसर वापरला असून मोटोचा हा मोबाईल Android 14 आधारित Hello UI या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

कॅमेरा किती? Motorola Razr 50

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola Razr 50 मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 4200mAh बॅटरी उपलब्ध असून हि बॅटरी 33W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोचा हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट मध्ये आणला गेला आहे.

किंमत किती?

Motorola Razr 50 हा स्मार्टफोन 64,999 रुपयांत लाँच झाला आहे. मात्र वेगवेगळ्या बँक ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही ५० हजार रुपयांपर्यंत हा मोबाईल खरेदी करू शकता. उद्यापासून Amazon.in, Motorola.in सह ऑफलाइन स्टोअरवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. ग्राहकांना 5,000 रुपयांचा फेस्टिव्हल डिस्काउंट आणि 10,000 रुपयांची झटपट बँक सवलत मिळेल.

मनोज जरांगेना विचारण्यात आले 11 प्रश्न, फडणवीस- ठाकरेंचा उल्लेख.. मराठा समाजाचे आंदोलन

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आक्रमक असून सरकारवर आणि खास करून देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत. जरांगे पाटलांच्या विरोधामुळे लोकसभेत भाजपाला मोठं नुकसान सोसावं आणि महाविकास आघाडीला फायदा झाला, त्यामुळे जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचा माणूस आहे असा आरोपही त्यांच्यावर होत आहे. एकीकडे हे सगळ काही सुरु असताना सोलापूरमधील बार्शीतील एका मराठा नेत्याने आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते. त्यावर अजूनही उत्तरे न मिळाल्याने बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी अण्णासाहेब शिंदे म्हणाले, मी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारले पण त्यांनी उत्तरे दिले नाहीत मराठा आरक्षणाला खुट्टा शरद पवार यांनीच मारला. पण तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरली आहे. एकनाथ शिंदे सारखा मराठा मुख्यमंत्री लाभला आहे, तो कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून रात्रदिन राबला आहे. राजेंद्र राऊत सारख्या माणसाचा विरोधात तुम्ही बोलला, मात्र राजेंद्र राऊत म्हणजे बार्शी तालुक्याला सांभाळणारा ढाण्या वाघ आहे, त्यांच्या विषयी बोललात तर याद राखा, तुम्हाला बोलायला तोंड असेल तर आमच्याकडे ही तोंड आहे असा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी दिला.

मनोज जरांगेना विचारण्यात आले ११ प्रश्न कोणते?

महायुतीचे सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून दादा आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली.
लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे खासदार निवडूनही आणले, त्यांनी एकदाही निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही.
मनोजदादा आताही आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दादा आपल्या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल यात शंका नाही.
मग दादा आपण भूमिका घेतली, तर ती महायुतीच्या विरोधात विरोधात असणार आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे मान्य आहे.
दादा, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किती दिवसात गरजवंत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार आहे, ते लिहून घ्यावे.
दादा पूर्वी मुस्लिम-मराठा वाद रझाकाराच्या काळात झाला, त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे ३०० हून अधिक ओबीसी बरोबर वैमनस्य झाले. आपण आणखी किती जातींबरोबर वैर घ्यायचे, हेही ठरवा.
दादा आपण एका देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणार मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधात दिसणार नाही का?
दादा, विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीने पुन्हा म्हणू नये की, आमच्या हातात काही नाही. आरक्षण मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राच्या हाती आहे.
अन्यथा दादा गरजवंत मराठ्यांची फसवणूक झाल्यावर या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार? त्याची जबाबदार निश्चित करा, अन्यथा आपल्यासहित कोणत्याही मराठा नेतृत्वावर गरजवंत मराठा विश्वास ठेवणार नाही.

BSNL Plans | BSNL ने आणला सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; 120 रुपयात अनलिमिटेड कलिंगसह मिळणार डेटा

BSNL Plans

BSNL Plans | एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया या भारतातील काही प्रमुख अशा खाजगी टेलिफोन कंपनी आहेत. या टेलिकॉम कंपन्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या रिचार्जमध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे त्यांचे ग्राहक प्रचंड नाराज झालेले आहेत. या सगळ्यातच सरकारी कंपनी बीएसएनएलने चांगलीच उभारी घेतलेली आहे. बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा पुरवत आहेत. BSNL ने नुकतेच काही नवीन रिचार्ज प्लॅन जारी केलेले आहेत. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

बीएसएनएल 118 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या 118 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन ची वैधता 20 दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित वाईस कॉलची सुविधा मिळते. तसेच तुम्हाला 10 जीबी डेटा मिळतो. यास तुम्हाला हार्डी गेम्स, एरिना गेम्स, गेम्सऑन, लिस्टन, पोडो कॉस्ट, झिंग म्युझिक सारख्या विविध गोष्टींचा देखील फायदा मिळतो.

बीएसएनएल सुपरफास्ट इंटरनेट आणण्याच्या तयारी

बीएसएनएल ही लवकरच त्यांच्या लाखो ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणण्याच्या तयारीत आहे .याबाबत बीएसएनएलने त्यांच्या सोशल मीडियावर देखील एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओत ते लवकरच सुपरफास्ट इंटरनेटची कनेक्टिव्हिटी जारी करणार आहेत. याबाबतची माहिती दिलेली आहे. बीएसएनएल अनेक ठिकाणी 4 G टॉवर्स देखील बसवणार आहेत. बीएसएनएल हे दिवाळीपर्यंत 75 हजार 4G मोबाईल टॉवर्स बसवण्याची योजना करत आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातील लोकांना नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या येत होती. ती देखील दूर होणार आहे. तसेच बीएसएनएलच्या विकासामुळे इतर खाजगी कंपन्यांमध्ये देखील मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.

बीएसएनएलचे यूजर संपूर्ण भारतात पसरलेले आहे. शहरापासून ते खेडंपाड्यापर्यंत अनेक लोक बीएसएनएलचे ग्राहक आहेत. परंतु अजूनही बीएसएनएलने त्यांची 4G सेवा चालू केलेली नाही. यामुळे अनेक ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. बीएसएनएल लवकरच या समस्येवर तोडगा काढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर भारतातील सर्व बीएसएनएल ग्राहकांना 4G नेटवर्कचा आनंद घेता येणार आहे.

Pune-Shirur Elevated Road : पुणे – शिरूर या 53 किमीच्या मार्गाचे अद्ययावतीकरण करण्यास राज्य सरकारची मान्यता

pune shirur road

Pune-Shirur Elevated Road : राज्यभरात वाहतुक मार्गाचे जाळे अधिक मजबूत करण्याकडे भर दिला जातो आहे. यासाठी समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग , कोस्टल रोड यासारखे महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातही समृद्धी महामार्गाचे काम आता अखेरच्या टप्प्यात आले असून लवकरच हा मार्ग पूर्णपणे खुला केला जाणार (Pune-Shirur Elevated Road) आहे. या मार्गाबाबतची एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. चला जाणून घेऊया…

पुणे ते शिरूर रोड हा ५३ किमीचा एलिव्हेटेड सहापदरी मार्ग छत्रपती संभाजीनगरमार्गे बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रस्तावित एक्स्प्रेस वेची सुरुवात केसनांद (वाघोली) आणि लोणीकंद येथील पुणे बायपास रोडपासून होणार आहे. पुणे ते शिरूर या ५३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सहा टप्प्यात अद्ययावत करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. प्रस्तावित एक्स्प्रेस वे केसनांद आणि लोणीकंद येथील पुणे बायपासपासून सुरू होईल, छत्रपती संभाजीनगर ओलांडून हा मार्ग समृद्धी द्रुतगती मार्गाला जोडला (Pune-Shirur Elevated Road) जाईल.

MSIDC द्वारे होणार कार्यान्वित (Pune-Shirur Elevated Road)

हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) द्वारे कार्यान्वित केला जाईल. याबाबत माहिती देताना PWD च्या आधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, “मार्च 2024 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार, PWD आणि महाराष्ट्र सरकार दोन वर्षांत प्रकल्प सुरू होईल याची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू करतील, त्यात अयशस्वी झाल्यास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ( MORTH) सार्वजनिक हितासाठी संपूर्ण प्रकल्प ताब्यात घेण्याचा विचार करू शकते.

एकूण मार्गासाठी 9,565 कोटी रुपयांना मंजुरी (Pune-Shirur Elevated Road)

गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाचे अपग्रेडेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. MSIDC द्वारे राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी पुणे-शिरूर रोडसाठी 7,515 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि अहमदनगर बायपास मार्गे छत्रपती संभाजीनगर रस्ता सुधारण्यासाठी अतिरिक्त 2,050 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. महामार्गाची एकूण किंमत 9,565 कोटी रुपये इतकी आहे.

या भागातील वाहतूक कोंडी होणार दूर

सध्याच्या घडीला नगर रोडला वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र या उन्नत मार्गामुळे येरवडा, खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर आणि शिरूर यांसारख्या भागातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि वाघोली आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल.

काय आहेत वैशिष्ट्ये ? (Pune-Shirur Elevated Road)

  • नवीन पुणे-शिरूर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सध्याच्या पुणे-नगर-छत्रपती संभाजीनगर रोडला समांतर असेल .
  • हा एक्सप्रेसवे सहापदरी असेल.
  • या मार्गामुळे शिरूर, अहमदनगर, नेवासा, देवगड, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांना अधिकृत प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग मिळेल.
  • या एक्स्प्रेस वेची एकूण लांबी अंदाजे 250 किमी असेल.
  • PWD ने शिरूर ते अहमदनगर मार्गावरील टोलवसुली पूर्ण केल्यानंतर, तो MSIDC कडे हस्तांतरित केला जाईल.
  • त्याचप्रमाणे देवगड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील टोलवसुली पूर्ण झाल्यानंतर तो सुधारणेसाठी (Pune-Shirur Elevated Road) एमएसआयडीसीकडे वर्ग केला जाईल.

Monkey Pox | मंकी पॉक्स रुग्णाची भारतात एंट्री! संशयित रुग्णावर चाचण्या सुरु; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

Monkey Pox

Monkey Pox | सध्या जगभरात मंकीपॉक्स (v) या आजाराने थैमान घातलेले आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्यांमध्ये दिवसेंदिवस जगभरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता संशयित मंकीपॉक्स रुग्णाची भारतात देखील नोंद झालेली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिलेली आहे. तसेच या रुग्णाला वेगळे ठेवण्यात देखील सांगण्यात आलेले आहे. सध्या आफ्रिकन देशात मंकीपॉक्सच्या (Monkey Pox) आजाराची संख्या वाढत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडूनही या देशांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. गेल्या तीन वर्षात दुसऱ्यांदा ही वेळ आलेली आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर देखील या आजाराबाबत जागरूकता पसरवत आहेत आणि काळजी देखील घेतली जात आहे.

याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, संशयित रुग्णाला रुग्णालयात दाखल केलेले आहे. आणि विलगीकरणात देखील ठेवण्यात आलेले आहे. सध्या या रुग्णांची स्थिती स्थिर आहे. मंकीपॉक्सच्या आजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी देखील केली जात आहे. हा रुग्ण परदेशातून आलेला असल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. म्हणूनच त्याची तपासणी चालू आहे असे सांगण्यात आलेले आहे.

मंकी पॉक्स आजार म्हणजे काय ?

मंकी पॉक्स हा आजार सध्या मध्य आणि पश्चिम आफ्रिकामध्ये आढळणारा एक साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या आजारासारखा असतो. पण कमी संसर्गजन्य आहे. जर त्या एखाडी व्यक्ती एमपॉक्स झालेल्या व्यक्तीचा प्राण्यांच्या संपर्कात आला किंवा या विषाणूने दूषित असलेले मांस खाल्ले तर हा रोग खूप झपाट्याने पसरत आहे. गर्भवती महिलांवर देखील याचा खूप जास्त परिणाम होताना दिसत आहे.

जगभरात आढळली 99176 मंकीपॉक्सची प्रकरणे

जागतिक स्तरावर सध्या या रोगाने थैमान घातलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी 2022 ते 30 जून 2024 या कालावधीत जगभरात मंकीपॉक्स जवळपास 99176 प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत. या थायलंडमध्ये 5 प्रकरणे आणि दहा जणांचा मंकी मंकी पॉक्समुळे मृत्यू झालेला आहे. इंडोनेशियामध्ये 88 प्रकरणे, भारतात 87 प्रकरणे आणि एक मृत्यू, श्रीलंकामध्ये चार प्रकरणे आणि नेपाळमध्ये एक मृत्यू झालेला आहे.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे

मंकी (Monkey Pox )झाल्यावर रुग्णाला सातत्याने ताप येतो. डोकेदुखी होते, स्नायू दुखतात तसेच सूज येते यातील महत्त्वाचे लक्षण म्हणजे अंगावर पुरळ उठतात. आणि हे पुरळ चेहऱ्यावर उठण्यापासून सुरुवात होते. तसेच संपूर्ण अंगावर हे पसरतात. ही लक्षणे दोन ते चार आठवडे राहतात. हा आजार एक संसर्गजन्य आजार असून पूर्वी देवी आजारासारखा आहे. सध्या आफ्रिकन देशा व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशांमध्ये हे रुग्ण नाही. तरीही काही लोक आंतरराष्ट्रीय प्रवास करतात. त्यांच्याकडून हा आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आजार प्रामुख्याने खोकल्यातून पसरू शकतो. त्यामुळे लोकांनी काळजी घेतली पाहिजे, असे देखील सांगण्यात आलेले आहे.

मंकी पॉक्सची लक्षणे दिसल्यास काय करावे

  • वरील लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीला विलगीकरणात ठेवावे.
  • बाधित झालेल्या व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • सदर रुग्णाची माहिती ही आरोग्य केंद्रात द्यावी.
  • बाधित झालेल्या रुग्णांनी ज्या गोष्टींचा वस्तूंचा वापर केलेला आहे त्या वस्तू वापरू नये.
  • तसेच इतर नागरिकांनी साबण आणि पाण्याचा वापर करून हात स्वच्छ करावेत.