Monday, December 22, 2025
Home Blog Page 482

हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत; प्रसाद लाड यांची टीका

prasad lad jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हा शरद पवार आणि महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) माणूस आहे. मनोज जरंगेंच्या वक्तव्यांना मस्ती अन् माज नाही म्हणायचे, तर अजून काय म्हणायचे? मराठा समाजाला खड्ड्यात घालण्याचे काम मनोज जरांगे पाटलांनी केले त्यामुळे एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत अशा शब्दात प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

याबाबत प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक विडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं? विरोधात बोलणारं प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे, भाजपचा माणूस आहे म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना (Maratha Community) खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत”, असे प्रसाद लाड म्हणाले.

प्रसाद लाड पुढे म्हणाले, “मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी प्रथम मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात २८८ उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु, पवारांचं घातलेलं कातडं फाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Maharashtra Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून ओसरलेला महाराष्ट्रातील पाऊस (Maharashtra Rain Update) आजपासून पुन्हा एकदा झोडपण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या काळातच वरुणराजा पुन्हा एकदा कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. खास करून मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरात पावसाची बरसात पाहायला मिळेल. मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहील असं म्हणत हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता- Maharashtra Rain Update

आजपासून पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळाले. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग य तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय नाशिक आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तर संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, भंडारा, वाशीम आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. याशिवाय, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

Pooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pooja Khedkar dismissed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला IAS सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. यापूर्वी UPSC ने पूजा खेडकरवर कारवाई केली होती, आता केंद्राने सुद्धा तिला बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे.

अपंगत्वाची अनेक बनावट प्रमाणपत्र सादर करून तसंच नावात बदल करुन पुन्हा युपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप पूजा खेडकर वर होता. पूजा खेडकर यांनी अपंगत्व दाखवण्यासाठी दोन प्रमाणपत्रे सादर केली. त्यातील एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितलं होतं. इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचे लाभ फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं मिळविल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे. पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी UPSC ने केली होती कारवाई – Pooja Khedkar

UPSC ला फसवण्यासाठी पूजा खेडकरनं (Pooja Khedkar) वारंवार नावं बदलली. केवळ पूजाच नाही, तर तिच्या आईवडिलांचीही नावं वारंवार बदलण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर होता. एवढंच नव्हे तर पूजा खेडकरने परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं. तिने दोन ओळखपत्रांवर दोन वेगवेगळे पत्ते दिले . आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध पुणे येथील पत्ता दिला आहे तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिला होता. तिचे हे सर्व प्रताप उघड झाल्यानंतर युपीएससीनं तिला नुकतंच सेवेतून बडतर्फ केलं होतं. आता केंद्र सरकारने सुद्धा पूजा खेडकरला थेट प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करत मोठा निर्णय घेतला.

Mukhyamantri Yojana Doot : सरकार देणार महिन्याला 10 हजार रुपये; काय आहे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम?

Mukhyamantri Yojana Doot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जनतेला आर्थिक लाभ व्हावा, त्यांचे जीवनमान सोप्प व्हावं यासाठी सरकारकडून सतत नवनवीन योजना आणल्या जातात. मात्र अनेकदा असं होते कि सरकारच्या योजना तळागाळातील लोकांना माहितीच नसतात आणि या योजनांचा लाभ घेण्यापासून अनेकजण वंचित राहतात. परंतु आता शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम (Mukhyamantri Yojana Doot) सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड सरकार कडून केली जाणार आहे. या योजनादूतांना दर महिन्याला १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत (Mukhyamantri Yojana Doot) शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

काय आहेत अटी आणि पात्रता? Mukhyamantri Yojana Doot

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा.
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आणि आधार कार्ड लिंक असलेले बँक अकाउंट असावे.

कोणकोणती कागदपत्रे असावी?

आधार कार्ड
पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र
आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
हमीपत्र

HDFC MCLR Rate Hike : HDFC बँकेच्या ग्राहकांना धक्का!! गृहकर्ज, कार लोन महागणार

HDFC MCLR Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची बँक असलेल्या HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या किरकोळ कर्ज-आधारित व्याज दरांमध्ये (MCLR) वाढ (HDFC MCLR Rate Hike) केली आहे. हि वाढ 5 बेस पॉईंटने झाली असली तरी बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कारण MCLR दरात वाढ झाल्याने ग्राहकांचे कार लोन, गृहकर्ज आणि महिन्याचा EMI आपोआपच वाढणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या या काळातच ग्राहकांना आर्थिक झळ बसणार आहे.

MCLR रेट 5 बेस पॉईंटने वाढव- HDFC MCLR Rate Hike

HDFC बँकेने फक्त 3 महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR रेट 5 बेस पॉईंटने वाढवला आहे. इतर सर्व कालावधीसाठी हा दर समान राहील. तीन महिन्यांचा MCLR दर आता 9.25 टक्क्यांवरून 9.30 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा MCLR रेट 9.40 टक्के आहे. सर्व दीर्घ कालावधीसाठी, MCLR रेट 9.45 टक्के आहे, HDFC बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईट वर याबाबतची माहिती दिली आहे. MCLR रेट हा बँकांना विविध प्रकारच्या कर्जांसाठी म्हणजेच उदारहर्णार्थ गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, कार लोन वर त्यांचे व्याजदर निश्चित करण्यात मदत करतो. त्यामुळे MCLR रेट वाढला (HDFC MCLR Rate Hike) कि हि सर्व कर्जेही वाढतात.

MCLR म्हणजे काय?

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट. सोप्या भाषेत सांगायचं तर निधी आधारित कर्ज दराची सीमांत किंमत. MCLR हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. यामध्ये निधीची किंमत, ऑपरेटिंग खर्च, CRR (कॅश रिझर्व्ह रेशो) वर शून्य परतावा, प्रीमियम या घटकांचा समावेश आहे. 2016 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मूळ दर प्रणालीची जागा MCLR आधारित कर्जदरांनी घेतली. परंतु ज्या कर्जदारांनी 2016 पूर्वी कर्ज घेतले होते ते अजूनही मूळ दर किंवा बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) द्वारे शासित आहेत. MCLR रेट वाढल्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला आपल्या कर्जावर अधिक व्याज भरावे लागणार आहे. परिणामी ग्राहकांचा EMI सुद्धा वाढतो, आणि बँकेला मात्र याचा फायदा होताना दिसतो .

Masked Aadhaar Card : हॉटेल किंवा OYO रूममध्ये आधार कार्ड देताय? आधी ‘ही’ गोष्ट करा अन्यथा डेटा होईल लीक

Masked Aadhaar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण कोणत्या हॉटेल वर किंवा OYO रूममध्ये राहण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला कोणता तरी पुरावा मागितला जातो. आपण सहसा अशावेळी आधार कार्डच सगळीकडे देत असतो. परंतु आधार कार्डवर आपले सर्व डिटेल्स असतात, त्यामुळे त्याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता असते. तुमचे बँक खातेही रिकामे होऊ शकते. त्यामुळे हॉटेल किंवा OYO रूममध्ये आधार कार्ड देणं तुम्हाला अडचणीत टाकू शकते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही मची माहिती लीक होण्यापासून पासून शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात….

तुमचे आधार कार्डचे सर्व डिटेल्स कुठेही लीक होऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल, तर हॉटेल किंवा ओयो रूममध्ये जाण्यापूर्वी तुम्ही Masked Aadhaar Card ओळखपत्र म्हणून द्या. हे आधार कार्ड दिल्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स सुरक्षित राहू शकतात. कारण Masked Aadhaar Card मध्ये आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक लपलेले असतात, म्हणजेच लोकांना फक्त शेवटचे 4 अंक पाहता येतात. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचे सर्व डिटेल्स कोणाला समजत नाहीत आणि त्यामुळे कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही.

अशा प्रकारे डाउनलोड करा Masked Aadhaar Card

यासाठी सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावा.
यानंतर, आता आधार विभागात जा आणि ‘माय आधार’ या पर्यायावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर, तुम्हाला येथे तुमचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा भरावा लागेल. यानंतर Send OTP पर्याय निवडा.
आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल जो तुम्हाला भरावा लागेल.
ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर डाउनलोडचा पर्याय तुमच्या समोर येईल.
तुम्ही डाउनलोड पर्याय निवडताच, तुम्हाला चेकबॉक्समध्ये विचारले जाईल की तुम्हाला मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करायचे आहे का.
तुम्हाला इथे बरोबर अशी खूण करावी लागेल.
चेकबॉक्सवर टिक करून सबमिट केल्यानंतर, मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड केले जाईल.
Masked Aadhaar Card पासवर्डसह सुरक्षित असते.
या पासवर्डसाठी तुम्हाला तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्म वर्ष भरावे लागतील.
एकदा का हे सर्व डिटेल्स भरले कि मग तुम्हाला तुमचे मास्कड आधार कार्ड दिसेल.

Jio Recharge Plan : Jio चा 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; 2.5GB इंटरनेट आणि बरंच काही…..

Jio Recharge Plan 75 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जीओ, एअरटेल सारख्या देशातील टॉपच्या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढवल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडलं आहे. त्यामुळे स्वस्तास कोणता रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) उपलब्ध आहे का याचा शोध ग्राहक घेत असतात आणि आपल्याकडील पैशाच्या उप्लब्धततेनुसार रिचार्ज मारत असतात. परंतु जिओच्या पोर्टपोलियो मध्ये असेही काही रिचार्ज आहेत जे अतिशय कमी पैशात आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत जो अवघ्या ७५ रुपयांत उपलब्ध आहे. चला तर जाणून घेऊयात या रिचार्ज प्लॅन मध्ये नेमक्या काय काय सुविधा मिळतात.

Jio चा 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – Jio Recharge Plan

Jio चा 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन हा 23 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. यामध्ये ग्राहकांना २.५ GB इंटरनेटचा आनंद घेता येईल. हे इंटरनेट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 kbps पर्यंत कमी होते. याशिवाय या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 एसएमएस मेसेजचा लाभ मिळतोय. खास बाब म्हणजे म्हणजे या प्लॅनमध्ये 200 एमबी डेटा बोनस म्हणून उपलब्ध आहे.

एक्सट्रा बेनेफिट्स काय मिळतात?

एक्सट्रा बेनेफिट्सबाबत सांगायचं झाल्यास, जिओच्या या ७५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये (Jio Recharge Plan) ग्राहकांना JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity सारख्या फीचर्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. अवघ्या 75 रुपयांमध्ये या सर्व सुविधा मिळत आहेत हे सुद्धा ग्राहकांना नक्कीच परवडेल.

कुठे उपलब्ध आहे रिचार्ज प्लॅन –

Jio चा 75 रुपयांचा प्लान रिचार्ज करणे खूप सोपे आहे. तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाइट किंवा माय जिओ ॲपद्वारे हा रिचार्ज रिचार्ज करू शकता. यासह, तुम्ही Google Pay आणि PhonePe सारख्या थर्ड पार्टी अँप्सच्या माध्यमातून सुद्धा रिचार्ज करू शकता. मात्र हे लक्षात ठेवा कि हा प्लॅन फक्त JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे. अँड्रॉइड मोबाईल असणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ चा हा ७५ रुपयांचा प्लॅन उपलब्ध नाही.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं; एकनाथांच्या भावनेनं चर्चाना उधाण

Eknath Khadse MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन झालं असून भक्तांकडून गणेशाला साकडं घातलं जात आहे. एकीकडे गेणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असल्याने राजकीय आखाडा सुद्धा तापला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या एका विधानाने चर्चाना उधाण आलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊ दे असं साकडं आपण गणरायाला घातलं आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हंटल आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने त्रस्त आहे. पण दुसरीकडे महायुती सरकार आल्यापासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी सीबीआय सारख्या कारवाया करत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे . त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत यावं यासाठी मी गणरायाला साकडं घातलं आहे. हे सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे, असं आपल्याला वाटत असं खडसे यांनी म्हंटल.

दरम्यान, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरूनही एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना आणली आहे , जनतेलाही ते कळते असं म्हणत ही योजना आणायची होती तर पाच वर्ष पूर्वीच आणायला पाहिजे होती असं मत एकनाथ खडसे यांनी मांडलं. लाडकी बहीण योजनेला माझा विरोध नाही, पण या योजनेसाठी जितका खर्च करण्यात आला आहे तोच खर्च जर धरणे उभारणी ,रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार ही निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यासाठीही प्रयत्न करायला हवं, असं एकनाथ खडसे म्हणाले.

चमत्कारी ATM!! 1000 रुपये काढले की 1600 मिळतात; ग्राहकांची तोबा गर्दी

Nagpur ATM Issue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल आपण सर्वच जण पैसे काढण्यासाठी बँकेत रांग न लावता थेट एटीएम (ATM) मध्ये जातात. आजवर आपण एटीएममधून पैसे काढताना नोटा फाटक्या आल्या, कमी पैसे आले किंवा पैसे अडकले अशा अनेक समस्यांना सामोरे गेला असेल. मात्र नागपुरात एक असं एटीएम आहे ज्यामध्ये 1000 रुपये काढले असता मशीन मधून चक्क 1600 रुपये निघत आहेत, तर 500 रुपये काढले तर 1100 रुपये मिळत आहेत. एटीम मधून जास्तीचे पैसे मिळत आहेत हे कळताच ग्राहकांनी एटीएम मशीन बाहेर तोबा गर्दी केली. मात्र नक्की घडतंय का हे उघडकीस येताच सदर एटीएम बंद करण्यात आलं आणि जी काही तांत्रिक अडचण होती ती दूर करण्यात आली. मात्र तोपर्यंत अनेकांनी जास्तीचे पैसे काढत आपले खिसे भरून घेतले.

नेमकं घडलं काय?

सदर घटना हि ५ सप्टेंबरची आहे. नागपूरमधील खापरखेडा येथील अ‍ॅक्सेस बँकेच्या एटीएममध्ये हा विचित्र प्रकार घडला. एका व्यक्तीने ५०० रुपये काढल्यानंतर एटीएम मधून त्याला ११०० रुपये मिळाले, तर दुसऱ्या व्यक्तीने १००० रुपये काढताच मशीन मधून १६०० रुपये आले. म्हणजेच प्रत्येक व्यवहारामागे ६०० रुपये जास्त येत होते. एकाकडून दुसऱ्याला आणि दुसर्याकडून तिसऱ्याला असं वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि काही क्षणातच पैसे काढण्यासाठी अनेकांनी एटीएम बाहेर गर्दी केली. या तांत्रिक बिघाडामुळे एटीएम मशीन मधून जास्तीचे पैसे येत होते, मशिनमध्ये पैशांच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्या होत्या आणि लोक याचा फायदा घेत पैसे काढत होते.

मात्र खापरखेडा येथील स्थानिक नागरिक अरुण महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस आणि संबंधित बँकेला कळवले. तेव्हा दुपारी एटीएम बंद करून दुरूस्ती करण्यात आली. मात्र तोपर्यंत तब्बल 3 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे एटीएम मधून काढण्यात आले होते. त्यामुळे बँकेला मोठं नुकसान सहन करावे लागले. त्या सुज्ञ नागरिकाने वेळीच हा प्रकार समोर आणला नसता तर बँकेला आणखी मोठ्या अडचणींना आणि नुकसानीला सामोरे जावं लागलं असते हे मात्र नक्की…

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये बदल!! सरकारने घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. आत्तापर्यंत २ महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. मात्र अजूनही काही महिलांनी अर्ज भरले नाहीत किंवा त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत. मात्र आता या योजनेत राज्य सरकारने एक बदल केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती. लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, समूह संघटक सीआरपी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन, ग्रामसेवक , आपले सेवा सरकार अशा 11 प्राधिकृत व्यक्तींना प्राधिकृत करण्यात आले होते. सरकारकडून त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये दिले जात होते. पण, आता केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील. राज्य सरकारने याबाबत शासन आदेश जारी केला आहे.

गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारचं पाऊल- Ladki Bahin Yojana

राज्यभरातील कोट्यवधी महिला या योजनेशी जोडल्या गेल्याने आता, सदर योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या कमी होत आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. पुन्हा अशा प्रकारे गडबड होऊ नये यासाठी सरकार खबरदारी घेत आहे.