Monday, December 22, 2025
Home Blog Page 483

अरे बापरे ! कोरोनापेक्षा ‘हा’ रोग भयंकर, संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती

health news

मागच्या काही वर्षांमध्ये कोरोना अख्या जगभरात नाकीनऊ आणलं होतं. संपूर्ण जग या साथीच्या थैमानामुळे काहीसे थांबून गेल्यासारखं झालं होतं मात्र तुम्हाला माहिती आहे का एक रोग असा आहे जो कोविड पेक्षाही जास्त धोकादायक आहे. एका संशोधनात असं सिद्ध झालं असून हा रोग केवळ मृत्यूला आमंत्रित करत नाही तर तो दीर्घकालीन तुमच्या शरीरावर परिणाम करतो. एका संशोधनात आढळून आल्यानुसार डेंग्यू हा कोरोनापेक्षा जास्त धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. याचं कारण काय आहे ? नेमका कोणता परिणाम आपल्या शरीरावर होतो? चला जाणून घेऊया संशोधकांचा काय म्हणणं आहे?

हृदयाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की डेंग्यूच्या साथीचा थैमान सुरू होतं. या रोगावर वेळीच जर उपचार झाला नाही तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. योग्य उपचार झाल्यास डेंग्यू चा रुग्ण कसा बसा बरा होतो परंतु या रोगाचा प्रभाव त्या व्यक्तीवर फार काळ राहतो. कारण डेंग्यूच्या तापामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो असे संशोधनातून समोर आले आहे.

सिंगापूर येथील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली संशोधन झाले असून या संशोधनात असं समोर आलं आहे की डेंगूच्या रुग्णांना कोविड-19 च्या तुलनेत हृदयविकाराचा धोका 55% जास्त आहे. जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 11,700 पेक्षा अधिक डेंग्यू रुग्ण आणि बारा लाखांहून अधिक कोविड-19 च्या रुग्णाची चाचणी आणि वैद्यकीय डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देतानानानयांग टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी मधील संसर्गजन्य रोग मॉडलिंगचे सहाय्यक प्राध्यापक लिम जु ताओ यांनी सांगितले की डेंग्यू हा जागतिक स्तरावर सर्वात सामान्य रोगांपैकी एक आहे. दीर्घकालीन आरोग्य समस्या ही चिंतेची बाब आहे. माध्यमांनी सादर केलेलया रिपोर्टनुसार महाराष्ट्र आणि दिल्ली सह देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे अशा स्थितीत अहवाल आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण करतो.

कोविड-19 च्या साथी नंतर हृदयविकाराचा झटका म्हणजे कोविड 19 समीकरण जोडलं जात होतं. कोविडच्या साथी नंतर हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. कारण दीर्घ काळापर्यंत या तापामुळे रक्तामध्ये गुठळी निर्माण होते. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज सुरू होते. परंतु डेंग्यू हा कोविड-19 पेक्षा जास्त धोकादायक आहे. हा रोग कोविड पेक्षा प्रभावी असल्याचे सांगितले गेले आहे. याचाच अर्थ आगामी काळात डेंग्यू हाही हृदयविकाराचे प्रमुख कारण मानले जाऊ शकतो. सिंगापूर येथील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार डेंग्यू झाल्यानंतर हृदयाच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण या अहवालानुसार शास्त्रज्ञांना असा आढळून आले आहे की, डेंगूच भविष्यात शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात अनेक प्रकरणांमध्ये गंभीर डेंगी मूळ यकृताचे नुकसान मायोकार्डिटिस आणि न्यूरोलॉजिकल समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डेंग्यूमुळे रक्तस्त्रावी ताप येतो ज्यामुळे रक्त स्त्राव आणि प्लेटलेटची संख्या कमी झाल्यामुळे अवयव खराब होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका तर वाढतोच याशिवाय न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि स्मृती भ्रंश यासारख्या आजारांचा धोका 213 टक्क्यांनी वाढतो. डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे जो संक्रमित डासाच्या चावण्याद्वारे लोकांमध्ये पसरतो तर COVID-19 हा SARS-CoV-2 या विषाणूमुळे होतो

लालबागच्या राजाचा रुबाबच न्यारा ! अनंत अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण

lalbaghcha raja

देशातल्या गर्भश्रीमंत व्यक्तींच्या मध्ये अंबानी कुटुंबाचं नाव आवर्जून घेतलं जातं. मागच्या काही दिवसांपासून अनंत आणि राधिका अंबानी यांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात देशामध्ये रंगली होती आता पुन्हा एकदा ही नावं एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहेत. सद्या देशभरात गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे. मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणपती म्हणजे ‘ लालबागचा राजा ‘… 21 फुटी गणपती असलेल्या या लालबागच्या राजाला बघ्यांची खूप मोठी गर्दी होते.

यंदाच्या वर्षीची मूर्ती कशी असणार ? इथे पासून ते अगदी आरास आणि सजावट काय असणार इथपर्यंत लोकांची उत्सुकता ताणली गेलेली असते. मात्र लालबागच्या राजाला यंदाच्या वर्षी सोन्याचा मुकुट अर्पण केला गेला आहे. विशेष म्हणजे हा मुकुट अनंत अंबानी यांच्याकडून अर्पण केला गेला आहे.

अनंत आणि राधिका यांचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असणार आहे. लालबागच्या मंडळाचं हे 91 वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाला आनंद अंबानी यांच्याकडून सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. हा मुकुट २० किलो सोन्याचा आहे.

यावर्षीचा लालबागचा राजा कसा असणार आहे ? याच्याबद्दल बोलायचं झाल्यास लालबागच्या राजाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान झालेली आहे. नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी लालबागच्या गणपतीची ख्याती आहे. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीस लाखो लोक दरवर्षी गर्दी करतात. त्याचप्रमाणे मुकेश अंबानी यांचीही सहकुटुंब उपस्थिती लालबागच्या राजाच्या दर्शनाला असते. यावर्षी अनंत आणि राधिका यांचा लग्न सोहळा पार पडला यानंतर लालबागचा राजा कार्यकारिणी मंडळाच्या विश्वस्त पदावर अनंत अंबानींची नियुक्ती करण्यात आली. महिनाभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आता अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.

१५ कोटींचा सोन्याचा मुकुट

यावर्षी लालबागच्या राजाला मरून रंगाचं वेलवेटचं सोवळं नेसवण्यात आले आहे. तर काशी विश्वनाथ मंदिराच्या थीमचा देखावा साकारण्यात आलाय लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्त पदी नियुक्त झालेल्या अनंत अंबानी यांनी राजाला सोन्याचा मुकुट भेट दिला आहे. या मुकुटाचे वजन हे २० किलो असून त्याची किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकुट बनवण्याकरता कारागिरांना दोन महिने मेहनत करावी लागली होती. अशी माहिती लालबागच्या राजाचे मानव सचिव सुधीर साळवी यांच्याकडून देण्यात आली आहे.

Ganesh Chaturthi 2024 : गणेश स्थापना , गौरी आवाहन, विसर्जन कोणत्या वेळेत कराल ? जाणून घ्या एका क्लिक वर

ganesh festival time

Ganesh Chaturthi 2024 : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहाने धुमधडाक्यात साजरा करण्याची प्रथा आहे. अगदी काही तासांत गणेश चतुर्थीला सुरुवात होणार आहे. मात्र त्याकरिता तयारीची लगबग आधीपासूनच सुरू झालेली आहे. गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. तुम्ही देखील उद्या तुमच्या घरात गणेशाची स्थापना करणार असाल तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे ? याची माहिती या लेखात करुन घेणार आहोत. चला (Ganesh Chaturthi 2024) तर मग जाणून घेऊया…

गणेश स्थापना (Ganesh Chaturthi 2024)

उद्या शनिवार भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्ता पासून म्हणजे पहाटे 4:50 ते दुपारी 1: 51 पर्यंत आपल्या सोयीने घरातील गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्यान नंतर देखील करता येऊ शकते अशी माहिती पंचांग करते मोहन दाते यांनी एका माध्यमाला दिली आहे.

गौरी आवाहन, पूजन, विसर्जन

आता गौरी आवाहनाबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास 10 सप्टेंबर रोजी मंगळवारी गौरी आवाहन आहे. अनुराधा नक्षत्रावर रात्री 8 वाजून 4 मिनिटांपर्यंत कधीही तुम्ही गौरी घरी घेऊ शकता. ज्येष्ठ नक्षत्र मध्येही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने दिनांक 11 सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरीची पूजा करावी आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचे आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री 9 : 53 पर्यंत तुम्हाला गौरी विसर्जन करता येणार आहे. काही जणांकडे (Ganesh Chaturthi 2024) घरगुती गणपती आणि गौरी एकाचवेळी विसर्जन करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गौरीसोबत गणपती विसर्जन करू शकता.

गणेश विसर्जन

17 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासूनचा अकरावा दिवस आहे. ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जातं त्यांच्याकडे 11 दिवसांचा उत्सव असेल. तसंच या दिवशी मंगळवार म्हणजेच गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशी गणेश चतुर्थीची तिथी दुपारी पावणे बारा वाजताच (Ganesh Chaturthi 2024) संपत आहे. तरीही त्यानंतर देखील विसर्जन करता येणार आहे. अशी माहिती दाते यांनी दिली आहे.

Vinesh Phogat Joined Congress : कुस्तीपटू विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजपवर साधला निशाणा

Vinesh Phogat Joined Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश (Vinesh Phogat Joined Congress) केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही खेळाडूंनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे. मी अशा पक्षात आहे जो महिलांवरील अन्यायाविरोधात उभा आहे आणि रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे अशी प्रतिक्रिया विनेश फोगटने काँग्रेस प्रवेशावेळी दिली. तसेच भाजपवर गंभीर आरोप सुद्धा तिने केलेत. विनेश फोगटला हरियाणा मधुऊन काँग्रेस कडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

असहाय्य महिलांच्या पाठीशी उभी राहणार- Vinesh Phogat Joined Congress

काँग्रेस प्रवेशावेळी (Vinesh Phogat Joined Congress) विनेश म्हणाली, मी काँग्रेस पक्षाचे आभार मानते , कारण म्हणतात ना कि आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हाच समजत कि आपलं कोण आहे. जेव्हा आम्हाला रस्त्यावरून फरफटत नेलं जात होते तेव्हा भाजप सोडून सर्व पक्ष आमच्या पाठीशी उभं राहिले आणि आमच्या भावना आणि दुःख समजून घेतलं. आज मला अभिमान वाटत आहे कि मी अशा पक्षात आहे जो महिलांवरील अन्यायाविरोधात उभा आहे आणि रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे. इथून पुढे मी सर्व असहाय्य महिलांच्या पाठीशी उभी राहणार आहे असेही विनेश फोगटने म्हंटल. मला हवे असते तर मी जंतरमंतरवरही कुस्ती सोडू शकले असते. भाजपने मला सांगितलं होतं कि, नॅशनल खेळायचे नाही, पण तरीही मी नॅशनल खेळले, मी ऑलिम्पिकमध्ये गेली आणि फायनलमध्येही धडक मारली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी विनेश फोगट आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा बजरंग पुनिया यांनी बुधवारी काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही खेळाडूंसोबत राहुल गांधी यांनी 15 मिनिटे चर्चा केली, तेव्हाच हे दोन्ही खेळाडू काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्यांनी अधिकृतपणे काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला. देशसेवेसाठी मला मिळालेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन. मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे/वैयक्तिक कारणांमुळे ती OSD/क्रीडा म्हणून आपली कर्तव्ये पार पाडू शकत नाही असं तिने राजीनामा देतं म्हंटल.

Vivo Y300 Pro 5G : 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरीसह Vivo चा मोबाईल लाँच; किंमत किती पहा?

Vivo Y300 Pro 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल निर्माता कंपनीVivo ने चिनी बाजारात Vivo Y300 Pro 5G नावाचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरीसह या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. एकूण ४ व्हॅरिएंट मध्ये हा हँडसेट लाँच करण्यात आला असून त्याची किंमत सुद्धा त्यानुसार वेगवेगळी आहे. सध्यातरी चीनमध्ये मोबाईलचे लौंचिंग झालं असलं तरी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सुद्धा येण्याची शक्यता आहे. आज आपण विवोच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.77 इंचाचा डिस्प्ले –

Vivo Y300 Pro मध्ये 60Hz, 90Hz आणि 120Hz दरम्यानच्या रिफ्रेश रेटसह 6.77 इंचाचा फुल-एचडी+AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1080×2392 पिक्सेल रिझोल्युशन आणि 5000 nits ची पीक ब्राईटनेस मिळते. कंपनीने मोबाईल मध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेट वापरली असून विवोचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित OriginOS 4 वर काम करतो. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी फोन IP65 रेटिंगसह येतो.

कॅमेरा – Vivo Y300 Pro 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y300 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 6500mAh ची महाशक्तीशाली बॅटरी आहे. हि बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विवोच्या या मोबाईल मध्ये ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS आणि Wi-Fi सारखी अन्य वैशिष्ट्ये आहेत.

किंमत किती?

हा स्मार्टफोन एकूण ४ स्टोरेज व्हेरियंटमध्ये येतो. यातील 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,799 (अंदाजे 21,000 रुपये) आहे. 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,999 (अंदाजे 23,000 रुपये) आहे. 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,199 (अंदाजे रु. 26,000) आहे. तर 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,499 (अंदाजे 29,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल काळ्या, सोनेरी, पांढरा आणि टायटॅनियम रंगाच्या पर्यायात येतो.

Mumbai News : पश्चिम रेल्वे मार्गावर होणार नवीन टर्मिनस ;लांब पल्ल्याच्या गाडयांना मिळणार थांबा

Mumbai News : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक लोक येथे काम धंद्यानिमित्त येत असतात. त्यामुळे मुंबईमध्ये नेहमीच गर्दी असते. देशभरातल्या इतर शहरांना मुंबईशी जोडण्याचे काम रेल्वे करते. त्यामुळे मुंबईत रेल्वे वाहतुकीला मोठे महत्व आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या (Mumbai News) प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना लांब पल्याच्या गाड्या पकडण्यासाठी वांद्रे सीएसएमटी आणि कुर्ला एलटीटी हे स्थानक गाठावी लागतात. मात्र आता पश्चिम रेल्वे मार्गावर ही एक नवीन टर्मिनस होत असून मुंबईतले हे सातवे टर्मिनस आहे. यामुळे (Mumbai News) पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीबाबत सांगायचे झाल्यास या टर्मिनसचे काम आता 76% पर्यंत पूर्ण झालं असून लवकरच हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुले जाणार आहे.

पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्या पकडायच्या असतील तर त्यासाठी सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस इथे जावे लागते. लांब पल्ल्याच्या गाड्यांना बांद्रे व बोरिवली स्थानकातही थांबा देण्यात आला आहे. मात्र तेथेही मर्यादित स्वरूपातच (Mumbai News) गाड्या सोडल्या जातात. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी व राम मंदिरा लगतच नवीन टर्मिनस उभारण्यात येत असून या टर्मिनस वर वांद्रे व मुंबई सेंट्रल येथून जवळपास बारा लांब पल्ल्याच्या गाड्या स्थलांतरित होऊ शकतात. त्यामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण या नव्या टर्मिनस मुळे कमी होणार आहे. सध्याच्या प्रकल्पावर लेबर शेडचं काम आता पूर्ण झाले आहे.

या नव्या टर्मिनस बाबतची खास गोष्ट म्हणजे या टर्मिनस वरून 24 डब्याच्या रेल्वे गाड्या देखील चालवता येऊ शकतात. तसंच या टर्मिनस वर सार्वजनिक सुविधा व्हावी यासाठी वाहनांसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात येणार आहे पादचारी प्रवेशासाठी (Mumbai News) राखीव क्षेत्र करण्यात येणार असून खाजगी वाहनांसाठी सुद्धा स्वतंत्र पार्किंगची सोय इथं असणार आहे. पश्चिम रेल्वे वरील राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामध्ये अंतर सुमारे 500 मीटर आहे राम मंदिराच्या विरार दिशेकडील पादचारी पुलाच्या पादचारी पुलाच्या उतरणीच्या पायऱ्यांची जोडणे जोगेश्वरी टर्मिनसला देण्यात येणार आहे.

कनेक्टिव्हिटी वाढणार (Mumbai News)

या टर्मिनस या खर्चाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास 76 कोटींचा खर्च या नव्या टर्मिनस साठी अपेक्षित आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डा कडून 2019 मध्ये आणि पुन्हा एकदा 2021 मध्ये मंजुरी मिळाली होते. बेट आणि होम प्रकारचे एकूण दोन प्लॅटफॉर्म आणि तीन मार्गीका या नावाने टर्मिनस मध्ये असणार आहेत. दोन (Mumbai News) मजली सेवा इमारती आणि पाच मजली स्टेशन इमारत असणाऱ्या त्याचबरोबर मेट्रो मार्ग सात मेट्रो मार्ग दोन आणि मेट्रो मार्ग सहाच्या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या ट्रेन्स पर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे

जिन्ना नंतर ओवेसी भारताची दुसरी फाळणी करतील; भाजप मंत्र्यांचे विधान

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोहम्मद अली जिना यांच्याप्रमाणेच AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) हे भारताची दुसरी फाळणी करून देतील अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसी नेहमीच कायद्याच्या विरोधात बोलतात आणि आपापल्या जाहीर सभेतून प्रक्षोभक वक्तव्य करतात असा आरोपही गिरीराज सिंह यांनी केला आहे. आता AIMIM कडून त्यांच्या या आरोपावर काय प्रत्युत्तर येते ते पाहायला हवं.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गिरीराज सिंह म्हणाले, असदुद्दीन ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात. जिना यांच्यानंतर ओवेसी भारताच्या दुसऱ्या फाळणीचे नेतृत्व करतील. भारताच्या फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तान आणि बांगलादेशात राहिले. दोन्ही देशांमध्ये त्यांच्यासोबत अनेक घटना घडल्या पण ओवेसी यांनी या गोष्टीचा कधी निषेध केला नाही. पाकिस्तान किंवा बांगलादेश असता तर ओवेसींचा आवाज आतापर्यंत दाबला गेला असता, असे गिरीराज म्हणाले.

यापूर्वीही ओवैसींवर साधला होता निशाणा-

दरम्यान, गिरीराज सिंग यांनी यापूर्वी सुद्धा ओवैसी याना जिना म्हंटल होते. ओवेसी ज्या पद्धतीने भारत तोडण्याचे राजकारण करत आहेत, त्यामुळे ते भविष्यात देशाचे जिना बनतील. असुद्दीन ओवेसी यांच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप फरक आहे. ज्याची मानसिकता ‘डोके आणि शरीर वेगळे करा’च्या घोषणांनी आहे, ओवैसी सतत भारताला तोडण्याचा प्रयत्न करत असून ते देशाची एकता आणि अखंडता कस टिकवणार? असा सवाल यापूर्वी गिरीराज सिंह यांनी केला होता.

महिलांसाठी महालक्ष्मी योजना, दर महिना 3000 रुपये देणार; नाना पटोलेंची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत आमचं सरकार आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) आणू तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला ३००० रुपये देऊ अशी मोठी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. महिलांच्या सुरक्षितेची आम्ही काळजी घेऊ अशी ग्वाही सुद्धा नाना पटोले यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. बहिणाना पैसे मिळावे हीच काँग्रेसची भूमिका असलयाचे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

नाना पटोले म्हणाले, आम्ही लाडकी बहीण योजनेचं स्वागत केलं आहे. फक्त ती कायम राहावी अशी आमची इच्छा आहे. महिलांना त्रास होऊ नये, बँकेत जमा झालेले पैसे कट होऊ नये. आता हे लोक इव्हेंट करत आहेत. जनतेचा पैसा लुटून इव्हेंट करत आहेत. प्रसिद्धीसाठी इव्हेंटवर या सरकारने ४७० कोटी रुपये खर्च केले. पण भगिनींना बँकेत किती त्रास होत आहे हे या सरकारला माहीत आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. राज्यात आमचं सरकार आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणू, या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांना ३००० रुपये देऊ, इतकंच नव्हे तर दरवर्षी या रकमेत १००० रुपयांची वाढ करू अशी मोठी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार कोर्टात गेले असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, त्यावरही नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनिल वडपल्लीवार आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले. सदावर्ते जसा फडणवीस यांच्यासाठी काम करतो. मी नाव नाही घेत. फडणवीस म्हणतात ना, मी कुठे गेलो कोर्टात .तो माझा माणूस नाही असच फडणवीस म्हणतात ना. हा वडपल्लीवार आमच्या मंत्र्याचा पीएस होता. पीएस कोणीही राहू शकतो. फडणवीस यांचेही अनेक पीएस आहेत. ते पक्षाचे कार्यकर्तेच नाहीत, मग त्यांनी असं काही केलं तर फडणवीस जबाबदारी घेणार का? घेणार का जबाबदारी?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

घराच्या छतावर BSNL टॉवर बसवल्यास 35 लाख रुपये मिळतात? पहा कंपनीने काय सांगितलं?

BSNL Tower Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) आपल्या घरावर टॉवर (BSNL Tower) बसवण्यासाठी दर महिन्याला ५० हजार रुपये आणि ऍडव्हान्स मध्ये ३५ लाख रुपये देत आहे असा फोन कॉल तुम्हाला आला तर नक्कीच तुम्ही खुश व्हाल आणि या गोष्टीला तयार सुद्धा व्हाल कारण दर महिन्याला तुम्हाला कोणतेही काम न करता पैसे मिळतील. मात्र खुद्द BSNL ने याबाबत इशारा देत अशा प्रकारे कोणतीही योजना कंपनीची नसल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच याबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. बीएसएनएलच्या नावाखाली लोकांचे वैयक्तिक आणि बँक तपशील देऊन नागरिकांची फसवणूक करणे हा सदर फ्रॉड लोकांचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हंटल आहे.

बीएसएनएलने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर याबाबत ट्विट करत सांगितलं कि, https://bsnltowerindia.com/page/about-us.html या बनावट वेबसाइटचा बीएसएनएलशी कोणताही संबंध नाही. ग्राहकांनी सावधगिरी बाळगा आणि या बनावट वेबसाइटमध्ये अडकू नका. ही वेबसाईट लोकांना टॉवर बसवण्याच्या बदल्यात अनेक फायदे देण्याचे अमिश दाखवते . 5G टॉवर्सच्या नावाखाली पैसे उकळण्याचा हा प्रयत्न असू शकतोय. या ट्विट मध्ये एक स्क्रिन शॉट सुद्धा टाकण्यात आला आहे त्यामध्ये ३ प्लॅन दिसत आहेत. एक ग्रामीण पॅकेज, दुसरे निमशहरी पॅकेज आणि तिसरे शहरी पॅकेज. यामध्ये 25 ते 35 लाख रुपये ॲडव्हान्स आणि दरमहा 25 ते 55 हजार रुपये भाडे सांगण्यात आले आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.

बनवत वेबसाईट कशी ओळखायची?

वेबसाइट पत्ता तपासा: वेबसाईटचा पत्ता “https://” ने सुरू होतो आणि वेबसाइटचे नाव बरोबर असल्याची खात्री करा. फसवणूक करणारे अनेकदा योग्य वेबसाइटच्या नावात किरकोळ बदल करतात.

टायपिंगच्या चुका तपासा: बनावट वेबसाइट्समध्ये अनेकदा स्पेलिंग चुका असतात. वेबसाइटच्या सामग्री किंवा पत्त्यातील कोणत्याही विसंगतीकडे लक्ष द्या.

वेबसाइट गुणवत्ता तपासणी:जर तुम्हाला आलेल्या वेबसाईटवर खराब डिझाइन, कमी रिझोल्यूशन असलेले फोटो , चुकलेली डिझाईन असेल तर समजून घ्या कि त्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे.

Insurance Sector Update | विमाधारकांसाठी मोठी बातमी; आता केवळ 3 तासात होणार क्लेम सेटलमेंट; तर सात दिवसात पेमेंट

Insurance Sector Update

Insurance Sector Update | सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य विमा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनेक लोक हा आरोग्य विमा काढतच असतात. परंतु या विमा क्षेत्रांमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने आरोग्य आणि जीवन क्षेत्रामध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहे. सध्या डिजिटलायझेशनची दुनिया आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमातून सगळ्या गोष्टी होत असतात. आणि यातूनच अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून सामान्य नागरिकांना या सगळ्यातून वाचवण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत आहेत. अशातच आता भारतीय विमा नियम आणि विकास प्राधिकरणाने याबाबत महत्त्वाचे निर्णय दिलेले आहे. आणि ससणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. तो म्हणजे आता जीवन आणि आरोग्य विमा अवघ्या 3 तासात क्लेम सेटलमेंट होणार आहे. आणि सात दिवसांच्या आत पेमेंट देण्याचे आदेश देखील विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे

सगळ्या विमा कंपन्यांनी आता त्यांच्यात देय तारखेच्या कमीत कमी एक महिना आधी प्रीमियर देय तारीख आणि पॉलिसी पेमेंट या सगळ्याची माहिती पाठवणे खूप गरजेचे आहे. जर याबाबत कुठलीही तक्रार आढळली तर ग्राहक लोकपालाकडेही तक्रार करू शकतात. आरोग्य विमा क्षेत्रात कॅशलेस सेटलमेंट आणि फ्री लुक पीरियड या संबंधात देखील कंपन्यांनी सूचना कंपन्यांना सूचना देण्यात आलेला आहे.

फ्री लुक पिरियडचा कालावधी वाढवा | Insurance Sector Update

आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीसाठी विमा कंपन्यांनी तीस दिवसांचा फ्री लूक कालावधी वाढण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली होती. परंतु आता फ्री लुक कॅन्सलेशन केल्यावर ग्राहकांना सात दिवसात प्रीमियम रक्कम रिफंड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

तीन तासात होणार कॅशलेस क्लेम सेटलमेंट

आरोग्य विमा बाबत आता IRDAI ने माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ग्राहकांची कॅशलेस क्लीनचे सेटलमेंट तीन तासात व्हायला पाहिजे. तसेच त्यांना विमा संबंधी सर्व माहितीसाठी सूचना देखील दिली पाहिजे. तसेच ही माहिती ग्राहकांना त्यांच्या स्थानिक भाषेत देण्याचे आदेश देखील करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे विमा कंपन्यांनी त्यांच्या देत तारखेच्या किमान एक महिना आधी प्रीमियर तारीख आणि पॉलिसी पेमेंट पाठवणे गरजेचे आहे. परंतु यात जर कंपन्यांकडून काही चूक झाली, तर ग्राहकांना लोकपालाकडे तक्रार करता येते.