Monday, December 22, 2025
Home Blog Page 481

Saamana Editorial on Devendra Fadnavis : दुसऱ्यांचे बूड का खाजवताय? सामनातून फडणवीसांवर घणाघात

Saamana Editorial on Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्रिपदासाठी 3- 4 नावं आहेत. पण त्यात उद्धव ठाकरेंचं नाव नाही असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून फडणवीसांवर (Saamana Editorial on Devendra Fadnavis) जोरदार हल्लाबोल केला आहे. नसती उठाठेव करण्यापेक्षा आपल्या भरगच्च बुडाखाली काय जळतेय याची काळजी घ्या असा सल्ला सामनातून फडणवीस यांना देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असे फडणवीस सांगत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसली आहे असेही ठाकरे गटाने म्हंटल आहे.

सामना अग्रलेखात काय म्हंटल?

महाराष्ट्राला मोदी-शहा मान्य नाहीत व फडणवीसांचा बदनाम चेहरा राज्यातील जनतेने नाकारला आहे, पण स्वतःचा चेहरा झाकून फडणवीस यांनी जाहीर केले की, उद्ध ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील. ही नसती उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला? अशा उठाठेवी करण्याआधी आपल्या भरगच्च बुडाखाली काय जळतेय याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. मुळात त्यांच्या तथाकथित महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस-मिंधे व अजित पवार यांच्यातच खेचाखेची सुरू आहे. फडणवीस हे ठामपणे सांगू शकतील काय की, 2024 ला निवडणुका होताच मिंधे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील? अजितदादा तर मुख्यमंत्रीपदासाठी इतके उतावीळ आहेत की, त्यांनी स्वताला गुलाबी रंगात न्हाऊन घेतले आहे आणि फडणवीस तर नागपूरच्या खिडकीत बसून येणाऱ्या- जाणाऱ्यांना “शुक Is | शुकIs” करून बोलवत आहेत. या तिघांच्या तीन तरहा असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असे फडणवीस सांगत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसली आहे.

फडणवीस हे महाविकास आघाडीच्या चेहऱ्याची उठाठेव करतात, पण स्वताच्या महायुती वगैरेबाबत मात्र ते सांगतात की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीनंतरच ठरवू. विधानसभा निवडणूक मिंध्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, परंतु नंतर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही.’ यांच्याच बुडाखालची स्थिती ही असताना हे महाशय दुसऱ्यांचे बूड का खाजवत बसले आहेत? 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील व ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरतील असे फडणवीसांना किंचितही वाटले होते काय? पण ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून व जनतेला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढले. आपल्या साधेपणाने त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले असेही सामनातून म्हंटल आहे.

आपल्याला मुख्यमंत्री व्हायचेच नाही, पण महाविकास आघाडीने एक चेहरा समोर आणावा, मी त्यास पाठिंबा देतो, असा खुला आवाज ठाकरे यांनी शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला वगैरे प्रमुख नेत्यांसमोर दिला. कारण बिनचेहऱ्याने निवडणुकांना सामोरे जाणे अडचणीचे ठरेल. शरद पवार, नाना पटोले वगैरे नेत्यांनी आपापल्या पक्षातील कोणत्याही नेत्याचे नाव संमतीने पुढे करावे, शिवसेना त्यास पाठिंबा देईल. असे विधान करायला वाघाचे काळीज लागते. त्याबद्दल उद्धव ठाकरे हे कौतुकास पात्र आहेत. महाविकास आघाडीचा चेहरा कोण? यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी निकाल दिला आहे. महाराष्ट्राचे जनमानस वेगळे व नेत्यांच्या मनात वेगळे असे होणार नाही. सगळेच पक्ष रोज सर्वेक्षणे वगैरे करून निर्णय घेत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचा कौल त्यांच्यापर्यंत पोहोचलाच असेल.

काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख असे महत्त्वाचे चेहरे आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘बासुंदी’ उधळत आहेत. मात्र त्यामुळे त्यांचे गणित कच्चे आहे व त्यांना निराशेने ग्रासले आहे हेच स्पष्ट होते. स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे! असं म्हणत सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

Weather Update | कुठे ऊन, तर कुठे कोसळणार मुसळधार सरी; जाणून घ्या पावसाचे आजचे अपडेट

Weather Update

Weather Update | ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात हवामानात वेगवेगळे बदल झालेले आपण पाहत आहोत. कधी ऊन कधी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी चांगले वातावरण होत आहे. अशातच आता हवामान विभाग नेहमीच पावसाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. हवामान विभागाने सोमवारी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने केलेले अंदाजानुसार कोकणच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात देखील पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच राज्यातील तापमानात देखील चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी तापमान हे 31 अंशच्या पुढे असण्याची शक्यता आहे.

आज कोठे पाऊस पडणार |Weather Update

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पाऊस कोसळणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भात पाहायला गेले, तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर यांसारख्या जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड यांसारख्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Anandacha Shidha : गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचा मोठा निर्णय; फक्त 100 रुपयांत मिळणार ‘या’ 4 वस्तू

Anandacha Shidha Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. आता याच आनंदात सरकारच्या एका निर्णयाने आणखी भर पडली आहे. गणेश चतुर्थीचे निमित्त साधून शिंदे सरकार कडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ ( Anandacha Shidha) या उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा यंदाही अवघ्या १०० रुपयांत उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून ४ वस्तू देण्यात येणार आहेत.

कोणकोणत्या वस्तू मिळणार? Anandacha Shidha

महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त 100 रुपयांत चणाडाळ, तेल, साखर, रवा अशा ४ वस्तू मिळणार आहे. यात चणाडाळ 1 किलो, सोयाबीन तेल 1 लिटर, साखर 1 किलो, आणि रवा 1 किलो मिळेल. राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा सण गोड़ व्हावा यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे. मात्र यासाठी काही अटी सुद्धा आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा शिधा मिळणार आहे.

आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटपासाठी सरकारकडून तब्बल 562 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत. जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधरक आहे त्यांना सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल. एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाली त्यामुळे तेव्हा आचारसंहितेमुळे दोन महिने आनंदाचा शिधा बंद होता, आता मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेला या आनंदाच्या शिध्याचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणासुदीला आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता, आता गणपतीच्या सणाला सुद्धा आनंदाचा शिधा मिळणार असल्याने सर्वसामान्य जनतेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना झटका!! सरकारचा राजीनामा

Mamata Banerjee Jawhar Sircar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार (Jawhar Sircar) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जवाहर सरकार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण घटनेबाबत तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेबाबतच शंका उपस्थित करत जवाहर सरकार यांनी नाराजी व्यक्त केली.

जवाहर सरकार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्रही लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हंटल, ‘मला वाटत होते की तुम्ही आरजी कार हॉस्पिटलमधील क्रूरतेबाबत काही मोठे पाऊल उचलाल. जुन्या ममता बॅनर्जींच्या धर्तीवर तुम्ही यावर कारवाई करण्याची तयारी कराल. पण तुम्ही कोणतेही पाऊल उचलले नाही. आता तुम्ही जे पाऊल उचलले आहे त्याला खूप उशीर झाला आहे. आता तरी राज्यात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सरकार यांनी केली.

ते पुढे म्हणाले, या भयानक घटनेनंतर मला खूप वाईट वाटले. मला आशा होती की ममता बॅनर्जी त्यांच्या जुन्या शैलीत आंदोलक ज्युनियर डॉक्टरांच्या प्रकरणात हस्तक्षेप करतील, परंतु असे काहीही झाले नाही. कोलकाता येथे होत असलेले आंदोलन हे काही मर्जीतील लोकांच्या आणि भ्रष्ट लोकांच्या अनियंत्रित दबंग वृत्तीविरुद्धच्या जनक्षोभाचे प्रतिबिंब आहे. या निदर्शनाने संपूर्ण बंगाल हादरला आहे. राज्यातील आंदोलक तरुण-तरणींना राजकारण नको, तर न्याय हवा आहे. हे आंदोलन जितके महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी आहे तितकेच राज्य सरकारचे आहे. त्यासाठी सरकारने तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा जातीयवादी शक्ती या राज्याचा ताबा घेतील अशी भीती सुद्धा जवाहर सरकार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ!! अजित पवार विधानसभा लढवणार नाहीत?

Ajit Pawar Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी बारामतीतून येत आहे. उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेचे विद्यमान आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची थेट संकेत दिले आहेत. तसेच जो कोणी दुसरा आमदार होईल त्याची आणि माझ्या कामाची तुलना करा असं अजित पवारांनी म्हंटल आहे. आज बारामतीमध्ये (Baramati Assembly Election 2024) एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी आपल्या भाषणातून खळबळ उडवून दिली आहे. तसेच इतकी विकासकामे करूनही बारामती लोकसभेत आमचा पराभव झाला अशी खंतही अजित पवारांनी मांडली.

अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. मात्र जेथे पिकते तेथे विकत नाही. त्यामुळे बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. त्यानंतर १९९१ ते २०२४ च्या काळात माझ्या कारकिर्दीची आणि त्याच्या कारकिर्दीची तुलना करा. बारामतीकराना सगळं काही न मागता मिळालं. न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात, आजीही किती तरी कोटींच्या योजनांची कामं सुरु आहेत. यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते. आता कसे आहेत? असा सवालही अजित पवारांनी केला.

अजित पवार पुढे म्हणाले, बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. काही चूकत असेल तर मला सांगा. महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. मला एका गोष्टीची जाणीव आहे, कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्या कण्यानं काम नाही केलं तर गडबड होते मान्य केलं पाहिजे. कोणतिही निवडणूक असो, त्या निवडणुतील यश हे कार्यकर्त्यांच्या जिवावर अवलंबून असते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदारी कार्यकर्त्यांमुळं मिळाली.

Deepika Padukone Baby : दीपिका पादुकोण बनली आई!! घरी आली साक्षात लक्ष्मी

Deepika Padukone Baby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय कपल असलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी आपल्या चाहत्यांना गु न्यूड दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळातच दीपिका आई बनली असून तिने एका गोड चिमुकलीला जन्म दिला (Deepika Padukone Baby) आहे. पापाराझी विरल भयानीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली करत याबाबत माहिती दिली आहे. आणि या प्रेमी जोडप्याने त्यांच्या आयुष्यात मुलीचे स्वागत केल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे दीपिका-रणवीरच्या चाहचे चांगलेच खुश झाले असून दोघांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.

 रणवीरची इच्छा पूर्ण– Deepika Padukone Baby

रणवीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत खास इच्छा बोलून दाखवली होती. रणवीरला मुलगी हवी होती आणि अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या खास क्षणापूर्वी दीपिका आणि रणवीर हे दोघेही त्यांच्या आलिशान कारमधून मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाताना दिसले. जिथे पापाराझींनी त्यांना प्रसूतीपूर्वीच पाहिले होते. तेव्हापासून, चाहते दोघेही आई-वडील झाल्याच्या बातमीची वाट पाहत होते. अखेर रणवीर आणि दीपिका आईबाबा झाल्याचे समोर आलं आहे.

नुकतेच दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात माथा टेकवून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला होता. हिरव्या रंगाच्या बनारसी साडीत दीपिका खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत होती. त्यापूर्वी गेल्या आठवड्यात, दीपिका आणि रणवीरने इंस्टाग्रामवर त्यांच्या जबरदस्त मॅटर्निटी फोटोशूटची छायाचित्रे शेअर केली, ज्याचे खूप कौतुक झाले. रणवीर आणि दीपिकाने 2018 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. आता ६ वर्षांनी या जोडप्याने एका गोड बाळाला जन्म (Deepika Padukone Baby) दिला आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा नवा निर्णय; बँकांना देणार ‘या’ सूचना

Ladki Bahin Yojana new decision

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील मात्र महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये सरकारकडून जम करण्यात येत आहेत. आत्तापार्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा २ महिन्याचे ३००० रुपये महिलांना मिळालं असून महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र काही बँकांकडून महिलांच्या खात्यातील रक्कम दंडापोटी बँकानी वजा केली जात आहे. जास्त दिवस खाते वापरात नसल्याने हा दंड कट करण्यात आल्याचे बँकांकडून सांगण्यात येत आहे. यावरून विरोधक आक्रमक होताच सरकारने एक महत्वाचे पाऊल उचललं आहे.

बँकांसोबत बैठकीचे आयोजन करणार- (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) अनेक महिलांच्या खात्यावरील जमा झालेले पैसे बँकांकडून कट करण्यात आल्याच्या तक्रारी समोर येताच महायुती सरकारने लवकरच बँकांसोबत बैठक करुन त्यातून मार्ग काढण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी बँकांसोबत पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील संबंधितांनी दिली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संबंधी बँकासोबत पत्र व्यवहार केला आहे, तसेच बँकांसोबत बैठकीचे आयोजन करुनही त्यांना सूचना केल्या जातील अशी माहिती समोर येत आहे. असं झाल्यास महिलांना मिळालेला हा सर्वात मोठा दिलासा असेल.

दरम्यान, आता इथून पुढे फक्त अंगणवाडी सेविकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर केले जातील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यापूर्वी लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, समूह संघटक सीआरपी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन, ग्रामसेवक, आपले सेवा सरकार अशा 11 प्राधिकृत व्यक्तींना प्राधिकृत करण्यात आले होते. सरकारकडून त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये दिले जात होते. पण, आता केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील. राज्य सरकारने याबाबत शासन आदेश जारी केला आहे.

Moeen Ali Retirement : चेन्नईच्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

Moeen Ali Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केलेल्या मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Moeen Ali Retirement) जाहीर केली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी मोईन अलीची इंग्लडच्या संघात निवड झाली नाही, त्यानंतर त्याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, जेणेकरून युवा खेळाडूंना संघात जास्तीत जास्त संधी मिळू शकतील असं मोईन अलीने यावेळी म्हंटल.

कारकिर्दीबद्दल अभिमान – Moeen Ali Retirement

डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत मोईन अली म्हणाला, मी 37 वर्षांचा आहे आणि या महिन्यात ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी माझी निवड झाली नाही. मी इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळलो आहे. पण आता पुढच्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे असं मला वाटत. इंग्लंड क्रिकेटने सुद्धा मला हे सांगितलं. स्वतःच्या एकूण कारकिर्दीबाबत मला खूप अभिमान आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इंग्लंडकडून खेळता तेव्हा तुम्ही किती सामने खेळणार आहात हे तुम्हाला माहीत नसते. परंतु आजअखेर मी इंग्लंड कडून जवळपास 300 सामने खेळू शकलो या गोष्टीचा मला निश्चितच अभिमान आहे. सुरुवातीला मी फक्त कसोटी संघात होतो, मात्र इयॉन मॉर्गनने एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मला संधी दिल्यानंतर क्रिकेट खेळताना आणखी मजा आली असेही मोईन अलीने म्हंटल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून जरी निवृत्ती घेतली (Moeen Ali Retirement) असली तरी मी फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन कारण मला अजूनही क्रिकेट खेळायला आवडते. तसेच कोचिंग ही एक गोष्ट आहे जी मला करायला आवडेल अशी भावना मोईन अलीने व्यक्त केली.

मोईन अलीने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं. त्याने आत्तापर्यंत इंग्लंड कडून 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने तिन्ही फॉरमॅट मिळून इंग्लंडसाठी ६६७८ धावा केल्या. यामध्ये आठ शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 366 विकेट्स घेतल्या. मधल्या फळीत डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजीची जबाबदारी या काळात मोईन अलीने सांभाळली. मोईनच्या फिरकीमुळे इंग्लडच्या संघाला अतिरिक्त जलदगती गोलंदाज संघात घेणं सोप्प होत असे.

लालबागचा राजा गुजरातला हलवण्याचा प्रस्ताव? अमित शहांचं नाव घेत कोणी केला आरोप?

lalbaugcha raja gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मुंबईच्या लोकप्रिय अशा लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत येत आहेत, त्यांना येउद्या, पण मला सारखी भीती वाटते कि ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग, संस्था त्यांनी गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे एकदिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केला. तसेच ही सर्व लोक महाराष्ट्राला आपला दुश्मन मानतात त्यामुळे ते काहीही करू शकतात असेही संजय राऊत यांनी म्हंटल.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री म्हणून त्यांना मुंबईत येण्यासाठी त्यांना परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आमचा अमित शाहांना विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करुन महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महाराष्ट्रातून व्यापार, उद्योग, रोजगाराबरोबरच अनेक महत्त्वाची आर्थिक केंद्रं गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शाह यांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तिव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत. पण ते कमजोर गृहमंत्री आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जम्म-ूकाश्मीर असेल मणिपूर असेल किंवा इतर भागांचाही विचार केला तर या गृहमंत्र्यांचं देशाच्या सुरक्षेकडे अजिताब लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लुटमार याना पाठिंबा देतात. मुंबईला लुटलं. लुटमार करणाऱ्यांना पाठिंबा देतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करणे अशा प्रकारची कामे त्यांनी केली. ही गृहमंत्र्यांची कामं नाही. त्यामुळे महाराष्ट्राची जनता अमित शाह याना शत्रू मानते. आज ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत येत आहेत, त्यांना येउद्या, पण मला सारखी भीती वाटते कि ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग, संस्था त्यांनी गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे एकदिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाही का?

हे होऊ शकतं. हे लोक काहीही करु शकतात. लालबागचा राजाचे एवढं मोठं नाव आहे, त्याच्या दर्शनाला देशभरातून लोक येतात त्यामुळे चला गुजरातला घेऊन चला असं ते करु शकतात. लालबागचा राजा गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्तावही देऊ शकतात. लालबागचा राजा उद्यापासून गुजरातमध्ये पाहिजे, असं म्हणतील. हे व्यापारी लोक आहेत. मी सांगतोय तुम्हाला आणि फार विचार करुन सांगतोय, कारण अमित शाह हे महाराष्ट्राला आपला दुष्मन मानतात असं संजय राऊत यांनी म्हंटल.

पाकिस्तानला समुद्रात सापडलं घबाड; आर्थिक स्थिती सुधारणार

Pakistan substantial In Sea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तान (Pakistan) या आपल्या शेजारील देशाची आणि कट्टर विरोधकांची भुके मरे अवस्था आपल्याला माहीतच आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली असून देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. मात्र याच दरम्यान, पाकिस्तानी जनतेच्या चेहऱ्यावर हसू आणणारी घटना घडली आहे. पाकिस्तानला समुद्रात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. हा साठा जगातील सर्वात मोठा चौथा मोठा साठा असून यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारू शकते. याशिवाय अनेक देशांतील महागड्या तेलाचा प्रश्नही सुटू शकतो असं बोलले जातंय.

बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचा हा शोध (पीएके जिओग्राफिक सर्व्हे) तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे. एका मित्र देशाच्या सहकार्याने पाकिस्तानने हा प्रचंड साठा शोधला आहे. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिक सर्वेक्षणातून या ठिकाणाची ओळख पटली असून संबंधित विभागाने पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात या शोधांची माहितीही सरकारला दिली आहे.

तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात

एका अधिकाऱ्याने या उपक्रमाला ‘ब्लू वॉटर इकॉनॉमी’चा फायदा घेण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हटले आहे. बिडिंग आणि एक्सप्लोरेशनच्या प्रस्तावावर विचार केला जात असल्याचे त्यांनी सूचित केले, यावरून त्याचा आकार निश्चित करण्याचे आणि शोधण्याचे काम लवकरच सुरू होऊ शकते. परंतु ड्रिलिंग आणि तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसव्यतिरिक्त या समुद्रातून अन्य मौल्यवान खनिजा आणि तत्वे मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर पुढील कारवाईवर जोर देण्यात येणार आहे असेच अधिकऱ्यानी सांगितले.