Sunday, December 21, 2025
Home Blog Page 499

… तर सत्तेतून बाहेर पडलेलं बरं; निवडणुकीपूर्वी दादा गटाने टाकला बॉम्ब

ajit pawar shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीतच महायुतीत (Mahayuti) मध्ये वादाचा खडा पडला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा वाद इतका वाढला कि अजित पवार यांच्या जवळच्या नेत्याने थेट आपण सत्तेतून बाहेर पडूया असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना केलं आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीत टशन पाहायला मिळत आहे. नेमकं घडले तरी काय ते आपण जाणून घेऊया….

तानाजी सावंत काय म्हणाले होते?

धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत असताना तानाजी सावंत म्हणाले की, मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही सर्वजण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही, ते आता वयाच्या 60 व्या वर्षी माणूस बोलू शकत नाही असे विधान तानाजी सावंत यांनी केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना दादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला.

उमेश पाटील काय म्हणाले?

ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही. तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू, आपल्याला सत्तेची गरज नाही. असं उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले. तानाजी सावंत यांचा बोलण्याचा काय संबंध आहे? एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले. त्याच भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले. हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाने घेतला होता. महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत. हे त्यांनी विसरू नये. या पद्धतीने जर राष्ट्रवादीला कोण बोलणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही”, असा इशारा प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला

Mumbai : मुंबईsss मेरी जान ! चीन्यांना मागे टाकत बनली आशियातील नंबर वन अब्जाधीशांची राजधानी

Mumbai : आर्थिक राजधानी, कधीही न झोपणारे शहर, गरीब श्रीमंत सगळ्यांना सामावून घेणारं शहर म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो. याच मुंबईच्या मुकुटात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चीनचे महानगर बीजिंगला मागे टाकत मुंबई प्रथमच आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. एका ताज्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. हुरुन इंडियाने देशातील श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. बीजिंगच्या 16,000 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक अब्जाधीश आता मुंबईच्या (Mumbai) 603 चौरस किलोमीटरमध्ये राहतात.

न्यूयॉर्क आणि लंडननंतर मुंबईचा जगात तिसरा क्रमांक (Mumbai)

जागतिक स्तरावर या यादीत मुंबई आता तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे, येथे 119 अब्जाधीश राहतात, तर लंडन दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे 97 लोक अब्जाधीश आहेत. अब्जाधीश असे लोक आहेत ज्यांच्याकडे 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 8,333 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

26 नवीन अब्जाधीशांची भर(Mumbai)

मुंबईने एका वर्षात 26 नवीन अब्जाधीशांची भर घालून चीनची राजकीय आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून बीजिंगला मागे टाकले आहे. त्याच वेळी, बीजिंगने 18 माजी अब्जाधीशांना निव्वळ आधारावर यादीतून काढून टाकले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतीय अब्जाधीशांच्या जागतिक क्रमवारीत थोडीशी घसरण झाली आहे. मुकेश अंबानी यांनी संपत्तीत भरीव वाढ करून दहावे स्थान कायम ठेवले आहे. त्याचप्रमाणे गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याने त्यांना जागतिक स्तरावर आठ स्थानांनी 15व्या स्थानावर नेले (Mumbai) आहे.हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2024 नुसार, मुंबईने भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या यादीनुसार मुंबईत तब्बल 93 अब्जाधीश राहतात.

भारतातील टॉप टेन अब्जजाधीश

  • गौतम अदानी- भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
  • रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर
  • एचसीएलचे शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर
  • चौथ्या क्रमांकावर सिरम इंस्टीट्यूटचे सायरस पूनावाला
  • पाचव्या क्रमांकावर सन फार्माचे दिलीप सांघवी
  • सहाव्या स्थानावर आदित्य बिर्ला समुहाचे कुमार मंगलम बिर्ला
  • सातव्या स्थानावर हिंदुजा ग्रुपचे गोपीचंद हिंदुजा
  • त्यानंतर आठव्या क्रमांकावर डिमार्टची मुख्य कंपनी अव्हेन्यू सुपरमार्टचे मालक राधाकिशन दमानी
  • नवव्या स्थानावर विप्रोचे अझीम प्रेमजी
  • बजाज उद्योगसमुहाचे निरज बजाज यांचा दहावा क्रमांक

Cidco Lottery : म्हाडा आणि सिडकोच्या घरांसाठी किती रुपये डिपॉझिट भरावे लागणार?जाणून घ्या

Cidco Lottery : मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे स्वात:चे घर असावे असे कुणाला वाटणार नाही ? सध्या घरांचे दर हे गगनाला भिडले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत असतो.२०२४ च्या लॉटरीचा विचार करता मुंबई मंडळासाठी म्हाडा आणि सिडको दोन्हीच्या लॉटरी जाहीर (Cidco Lottery) झाल्या आहेत.

म्हाडा कडून मुंबईसाठी 2030 घरांची तर सिडको कडून 902 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. म्हाडाची ही घरं मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर- विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स, मालाड, गृहनिर्माण प्रकल्पामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर दुसरीकडे सिडको चा विचार केला तर कळंबोली, खारघर आणि घणसोली व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन येथे 902 घरांची उपलब्धता सिडकोच्या लॉटरी मध्ये करण्यात आली आहे. आता या दोन्ही साठी अनामत रक्कम किती (Cidco Lottery) भरावी लागणार याची माहिती आपण करून घेऊयात…

म्हाडा साठी अनामत रक्कम (Cidco Lottery)

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी सोडत जाहीर केली. म्हाडाने अर्ज नोंदणीला देखील मुदतवाढ दिली ती 19 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्जाचा शुल्क 590 तर अनामत रक्कम दहा हजार, पंचवीस हजार, पन्नास हजार, एक लाख, एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत आहेत. ही रक्कम अत्यल्प अल्प, मध्यम, उच्च उत्पन्न गट आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी अनुक्रमे असणार आहे.

सिडको साठी अनामत रक्कम (Cidco Lottery)

तर दुसरीकडे सिडकोच्या घरांसाठी अर्जाचा शुल्क हा जीएसटी सकट 295 रुपये इतका आहे. तर ई डब्ल्यू एस प्रवर्गासाठी 75 हजार रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी दीड लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. सिडकोच्या घरांसाठी अर्ज दाखल करण्याची (Cidco Lottery) अंतिम दिनांक 27 सप्टेंबर आहे.

Mobile Recharge : अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा रिचार्ज बंद होणार ? TRAI ने Airtel, Jio आणि Vi ला सूचना दिल्या

Mobile Recharge : गेल्या महिन्याच्या सुरुवातीला खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. एका रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारखे फायदे मिळतात परंतु त्यांना या प्लॅनसाठी जास्त पैसे द्यावे लागतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा स्मार्टफोन वापरणाऱ्याला या सर्व फायद्यांची फारशी गरज नसते. उदाहरणार्थ, डेटा आणि कॉलिंग या मूलभूत गरजा मानल्या जाऊ शकतात, परंतु एसएमएसची आवश्यकता केवळ क्वचित प्रसंगीच असते. त्याच वेळी, स्मार्टफोन वापरकर्त्याने रिचार्ज योजनेसाठी पैसे भरल्यास, त्याला अशा फायद्यासाठी शुल्क भरावे लागेल ज्याची त्याला खरोखर (Mobile Recharge ) गरज नाही.

अशा परिस्थितीसाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना बंडल पॅकऐवजी फक्त एसएमएस किंवा कॉल पॅक आणण्याची सूचना केली होती. महागड्या रिचार्ज प्लॅनमधून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दूरसंचार कंपन्यांनी (Mobile Recharge ) नकारार्थी उत्तर दिले आहे.

ट्रायने काय सुचवले? (Mobile Recharge )

दूरसंचार नियामक ट्रायने गेल्या महिन्यातच दूरसंचार कंपन्यांना सल्लापत्र जारी केले होते. यामध्ये कंपन्यांना टॅरिफ प्लॅनशी संबंधित प्रस्ताव देण्यात आला होता. ट्रायने म्हटले आहे की कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना फक्त व्हॉईस आणि एसएमएस रिचार्ज योजना ऑफर कराव्यात. ट्रायने याबाबत कंपन्यांकडून १६ ऑगस्टपर्यंत सूचना मागवल्या होत्या. यासोबतच 23 ऑगस्टपर्यंत प्रतिवाद देण्यास सांगण्यात आले.

काय आहे दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे ? (Mobile Recharge )

दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे आहे की बंडल पॅकऐवजी फक्त एसएमएस किंवा कॉल पॅक आणण्याची गरज नाही. सर्व फायदे देणाऱ्या विद्यमान योजना वापरकर्त्यांसाठी चांगले काम करत आहेत.

जिओ

जिओने आपल्या उत्तरात एका सर्वेक्षणाचे निकाल दिले आहेत. या सर्वेक्षणानुसार, 91 टक्के मोबाइल वापरकर्ते मानतात की सध्याचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत. ९३ टक्के वापरकर्ते म्हणतात की त्यांच्याकडे रिचार्ज प्लॅनसाठी अनेक पर्याय आहेत.

एअरटेल

एअरटेलचे म्हणणे आहे की सध्याचे प्लॅन सोपे आहेत. वृद्ध ग्राहकांना या प्रकारच्या योजनेचे फायदे समजणे सोपे आहे. या योजना सर्व फायद्यांसह येतात आणि कोणतेही छुपे शुल्क नसतात. विविध योजना आणून, वापरकर्त्यांना त्यांचे फायदे समजण्यात (Mobile Recharge ) अडचण येऊ शकते.

व्होडाफोन-आयडिया

व्होडाफोन-आयडियाचे म्हणणे आहे की केवळ एसएमएस किंवा कॉल पॅक आणल्याने डिजीटल डिव्हाइस स्थिती मिळेल. डेटा नसलेल्या वापरकर्त्यांना डिजिटल सेवा वापरण्यापासून परावृत्त केले (Mobile Recharge ) जाईल.

Cidco Lottery 2024 : मुंबईत घर घेण्याचा स्वप्न होणार साकार ! आचारसंहितेपूर्वी सिडकोचा 25 हजार घरांचा धमाका

cidco lottery 2024

Cidco Lottery 2024 : मुंबईसारख्या भल्या मोठ्या मायानगरीमध्ये स्वतःचं घर घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. सध्या घरांचे दर हे गगनाला भेटले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत असतो. आता मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडको 25000 घर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विक्रीस आणणार (Cidco Lottery 2024) असल्याची माहिती मिळाली आहे.

सिडकोला मागील सात वर्षात विविध घटकांसाठी 25 हजारांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली असून पुढच्या चार वर्षात चार टप्प्यात आणखी 67000 घर बांधण्याचं नियोजन केलं आहे. त्यातील 41000 घरांचा बांधकाम हे प्रगतीपथावर असून सर्व घर ही ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पने अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती (Cidco Lottery 2024) आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचा स्वप्न आता साकार होणार आहे.

या भागातील घरांचा समावेश (Cidco Lottery 2024)

सिडको सध्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी विविध नोड मध्ये घरे बांधत आहे. सध्याचा विचार करता तळोजा, वाशी, जुईनगर, खारघर, कामोठे, मानसरोवर, करंजाडे, कळंबोली या नोडमध्ये सिडकोच्या गृह प्रकल्पांची बांधकामे सुरू असल्याची माहिती आहे. त्यातही जवळपास 21000 घर हे एकट्या तळोजा नोड मध्ये बांधली जात आहेत. असं असलं तरी मानसरोवर, खारघर,जुईनगर आणि वाशी येथील घर मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ग्राहकांना या प्रकल्पातील घरांच्या योजनेची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. आचारसंहितेपूर्वी प्रस्तावित केलेल्या गृह योजनेत कोणत्या प्रकल्पातील घरांचा समावेश करायचा या संदर्भात संबंधित विभागांना चाचपणी (Cidco Lottery 2024) सुरू केल्याची माहिती आहे.

‘बुक माय सिडको होम’ चा अवलंब (Cidco Lottery 2024)

  • ‘बुक माय सिडको होम’ अर्थात ‘निवडा तुमच्या आवडीचं घर’ या संकल्पनेचा अवलंब करण्याची सिडकोची योजना आहे.
  • यांतर्गत ग्राहकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्या तत्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • ही प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.
  • या अंतर्गत विमान तिकिटाच्या धरतीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचं स्वातंत्र्य आहे.
  • ही सर्व घरे संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहेत.
  • यात घराच्या क्षेत्रफळ नकाशा तसेच किंमत आदींचा इत्यंभूत तपशील असेल.
  • कागदपत्र अपलोड केल्यानंतर डिपॉझिट भरून घर आरक्षित करता येणार आहेत.

आतापर्यंतची सर्वात मोठी ग्रह योजना (Cidco Lottery 2024)

सिडकोच्या माध्यमातून आतापर्यंत विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घर बांधून त्यासाठी वेगवेगळ्या गृह योजना जाहीर केल्या गेल्यात. 2018 मध्ये दोन टप्प्यात जवळपास 18000 घरांची योजना जाहीर केली होती. (Cidco Lottery 2024) आतापर्यंतची ती सर्वात मोठी गृह योजना ठरली होती. मात्र आता सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच 25 हजार घरांची बंपर योजना प्रथमच जाहीर होत आहे

Realme 13 आणि Realme 13+ मोबाईल भारतात लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

Realme 13 and Realme 13+ launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वस्तात मस्त मोबाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme 13 आणि Realme 13+ नावाचे २ नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत. 6 सप्टेंबरपासून Flipkart, Realme वेबसाइट, Realme Store ॲप आणि रिटेल आउटलेटवर हे दोन्ही मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असतात. आज आपण रिअलमीच्या या दोन्ही स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Realme 13 चे फीचर्स –

Realme 13 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 580 nits पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर बसवला असून Realme चा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित कस्टम यूजर इंटरफेस UI 5.0 वर चालतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme 13 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, आणि 2MP मोनो कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 45W अल्ट्रा चार्जला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन IP65 रेटिंगसह येतो. तसेच यामध्ये वाय-फाय 6, व्हेपर कूलिंग सिस्टम, स्टिरिओ ड्युअल स्पीकर यांसारखी फीचर्स मिळतात.

किंमत किती?

Realme 13 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. हा मोबाईल पर्पल आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे.

Realme 13+ 5G चे फीचर्स –

Realme 13+ 5G मध्ये 6.67-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy प्रोसेसर बसवला असून या स्मार्टफोन Android 14 वर आधारित realme UI 5.0 वर काम करतो. बाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme 13 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, आणि 2MP मोनो कॅमेरा देण्यात आला आहे, तर समोरील बाजूला 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 80W अल्ट्रा चार्जला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास मोबाईल मध्ये IP65 रेटिंग, रेनवॉटर स्मार्ट टच टेक्नॉलॉजी, वाय-फाय 6 आणि व्हेपर कूलिंग सिस्टम यांसारखी फिचर आहेत.

किंमत किती?

Realme 13+ तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे, 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन गोल्ड आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे.

Reliance AGM 2024 : मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीत लॉन्च होणार Jio Ai Cloud

Reliance AGM 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीची 47 वी सर्वसाधारण सभा (Reliance AGM 2024) आज म्हणजेच २९ ऑगस्टला पार पडली. यावेळी समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. येत्या दिवाळीपासून कंपनी आपली Jio AI क्लाउड सेवा सुरू करणार असल्याचे अंबानी यांनी जाहीर केलं. या क्लाउड सेवेच्या अंतर्गत Jio वापरकर्त्यांना 100GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. तसेच मुकेश अंबानी यांनी यावेळी 2G मुक्त भारताचा नारा दिला.

फोटो, व्हिडिओ राहणार सुरक्षित – Reliance AGM 2024

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी AGM मध्ये सांगितले की, दिवाळीपासून Jio AI Cloud वर वेलकम ऑफर सुरू होणार आहे, ज्या अंतर्गत Jio वापरकर्त्यांना 100GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. त्याच्या मदतीने प्रत्येक भारतीयाला प्रत्येक उपकरणावर AI सेवा आणि क्लाउड स्टोरेजची सुविधा मिळू शकेल. कंपनीच्या मते, हा एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. या क्लाउड स्टोरेजमध्ये युजरला त्यांचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्ससह इथर डिजिटल कंटेट सुरक्षित ठेवता येईल.

मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणात 2G मुक्त भारताचा नारा दिला. अंबानी यांच्या मते जिओने 50 टक्के वापरकर्ते 3जी शी जोडले आहेत. आज रिलायन्सचा जिओ कंपनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली असून जिओकडे 5G, 6G मध्ये 350 हून अधिक पेटंट आहेत. कंपनीने 5G स्मार्टफोन सर्वसामान्यांपर्यंत नेले आहेत आणि 2 वर्षात Jio चे 13 कोटी ग्राहक 5G शी जोडले गेले आहेत. (Reliance AGM 2024)

मुकेश अंबानी यांनी यावेळी AI वर सुद्धा भाष्य केलं.I प्रत्येक भारतीयापर्यंत AI पोहोचवण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे अंबानींनी म्हंटल. मग ते कोणत्याही वर्गातील व्यक्ती असो, एआय आणि त्याची वैशिष्ट्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवणे हेच अंबानी यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीत प्रत्येकजण कनेक्टेड बुद्धिमत्ता वापरण्यास सक्षम असेल, ज्यामध्ये एआय सेवा आणि क्लाउड स्टोरेज इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय मुकेश अंबानी यांनी एआय डॉक्टर आणि एआय टीचर यांचा समावेश असलेल्या इतर एआय सेवांबद्दलही सांगितले. अनेक लोकांना त्यांच्या मदतीचा फायदा होत आहे, विशेषत: ज्या भागात सेवा सहज पोहोचू शकत नाहीत. अनेक लोक त्यांच्या शिक्षणात एआय टीचरचा फायदा घेत आहेत.

रोहित शर्मासाठी लखनौने 50 कोटी ठेवलेत? मालकांनी सगळंच सांगून टाकलं

Rohit Sharma LSG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा एक मेगा लिलाव होऊ शकतो. अशावेळी प्रत्येक संघ काही खेळाडूंना संघात कायम ठेवेल आणि काही खेळाडूंना रिलीज करेल. रिलीज करण्यात आलेले खेळाडू पुन्हा एकदा लिलावात दिसतील. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांत अशा बातम्या पसरल्या होत्या कि मुंबई इंडियन्सने जर रोहित शर्माला (Rohit Sharma) रिलीज केलं आणि तो मेगा लिलावात उतरला तर लखनौ सुपरजाईंटने (Lucknow Super Giant) रोहितला खरेदी करण्यासाठी तब्बल ५० कोटींची तयारी ठेवली आहे. मात्र या बातमीत कितपत तथ्य आहे याबाबत खुद्द फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयंका यांनी समोर आणलं आहे.

स्पोर्ट्स टाकवरील एका मुलाखतीदरम्यान संजीव गोयंका यांना विचारण्यात आले कि, लखनौ सुपरजाईंटने रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये बाजूला ठेवल्याच्या अफवा पसरत आहेत. ते खरे आहे का? त्यावर उत्तर देताना संजीव गोयंका म्हणाले, ‘मला एक गोष्ट सांगा, रोहित शर्मा लिलावात येत आहे की नाही हे तुम्हाला किंवा कोणाला माहीत आहे का? हे सर्व तर्क- वितर्क लावण्यात येत आहेत. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार की नाही, तो लिलावात येतोय की नाही, याबाबत कोणालाच माहिती नाही. तो आला तरी तुम्ही तुमच्या पॉकेट मधील५० टक्के रक्कम एका खेळाडूवर कशी वापरणार?असा सवाल सुद्धा गोयंका यांनी केला.

यानंतर संजीव गोयंका याना असेही विचारण्यात कि रोहित शर्मा तुमच्या अपेक्षित खेळाडूंच्या यादीत आहे का? तयावे ते म्हणाले, “प्रत्येकाची एक अपेक्षित खेळाडूंची यादी असते. तुम्हाला संघात सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम कर्णधार हवा असतो. जे तुम्हाला मिळालं आहे आणि जे उपलब्ध आहे त्यातून निवड करायची असते. मला कोणत्याही खेळाडूची अपेक्षा असू शकते. पण फ्रँचाईजीचं मतंही महत्त्वाचं असतं. तुम्हाला प्रत्येकजण मिळत नाही,” असं गोयंका यांनी म्हंटल.

दरम्यान, रोहित शर्मा हा आयपीएल मधील दिग्गज खेळाडू आहे. २००८ पासून म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रोहित खेळतोय. सुरुवातीला तो डेक्कन चार्जर्स कडून खेळत होता, त्यानंतर २०११ मध्ये तो मुंबईच्या गोटात आला. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे नातं अतिशय घट्ट जमलं. वानखेडे स्टेडियम फक्त रोहितची फटकेबाजी पाहायला फुल्ल भरते. रोहित शर्माने मुंबईला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. यादरम्यान त्याने अनेक नवीन खेळाडू घडवले. यापूर्वी आयपीएल 2022 पूर्वी मुंबई संघाने रोहितला 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. पण गेल्या हंगामात मुंबईने हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेतलं आणि थेट कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या नेहमीच सुरु असतात.

Indian Railway : देशात 14 नवीन रेल्वे स्थानके उभारणार ; 1300 गावं जोडली जाणार

Indian Railway : भारतामध्ये सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय दोन ठिकाणांमधली कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर तिथल्या अर्थकारणाला गती मिळते. म्हणूनच मोदी सरकार मागच्या अनेक दिवसांपासून दळणवळणाच्या सुविधा भक्कम करण्यावर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणूनच काल दिनांक 28 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये भारताच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे वाहतुकीला देखील प्राधान्य दिल्याचे दिसून येते. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रेल्वेसाठी नेमक्या कोणत्या घोषणा झाल्या ? याची माहिती (Indian Railway) आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत…

खरं तर केंद्रातील मोदी सरकारने देशातल्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम अंतर्गत 12 स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय त्यासाठी 28 हजार 602 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यासोबतच रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्याचा संदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. मालवाहतुकीला गती मिळत देशातील व्यापार वाढून अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होणार (Indian Railway) आहे.

देशात 14 नवीन रेल्वे स्थानके उभारणार (Indian Railway)

केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी आम्ही सांगितलं की आज देशभरात 14 नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन रेल्वे स्टेशन मुळे देशातील तब्बल 1300 गावं रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने 6456 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. अशी माहितीही (Indian Railway) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

पुढे बोलताना गोयल म्हणाले की, ” रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणे आणि नवीन रेल्वे मार्ग बांधणं यामुळे मालवाहतुकीला गती मिळेल देशातील पुरवठा साखळी मजबूत होईल त्यामुळे देशाचा व्यापार वाढून अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय नवीन रेल्वे लाईन टाकल्यामुळे जे भाग अजूनही रेल्वेशी जोडले गेलेले नाहीत त्यांना थेट देशभरातील रेल्वे मार्गशी जोडले जाणार आहे. त्यामुळे देशातील वाहतूक साखळीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांवर पायाभूत सुविधांचा विकास होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Railway) हातभार लागेल असे ते म्हणाले.

मालवाहतुकीसाठी मोठा फायदा होणार (Indian Railway)

रेल्वे नेटवर्क वाढवत असताना प्रामुख्याने ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. या प्रकल्प अंतर्गत 14 नवीन स्थानक बांधण्यात येणार आहेत. त्या राज्यातील अनेक क्षेत्रांना रेल्वेशीष जोडले जाणार आहे. यामुळे नवीन मार्गामुळे तेराशे गावं सुमारे 19 लाख लोकांना रेल्वेशी जोडण्याची संधी मिळणार आहे असं ते म्हणाले. शिवाय रेल्वे मार्गामुळे देशातील कृषी उत्पादने खते कोळसा लोखंड पोलाद सिमेंट चुनखडी इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे अशी माहिती अश्विनी (Indian Railway) वैष्णव यांनी दिली.

नेवासा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची गुंतागुंत वाढली, आमदार फिक्स ‘हा’ चेहरा होतोय

Nevasa Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या हवामानाचा आणि नेवासाच्या अंदाज लावणं फार कठीण… इथं जनतेनं अनेक मातब्बरांना घरचा रस्ता दाखवला… नव्यांना संधी दिली… कधी कधी बंडखोरी दाखवत कम्युनिस्ट नेत्यांनाही संधी दिली.. सध्या इथले विद्यमान आमदार आहेत शंकरराव गडाख… 2019 ला अपक्ष निवडून आलेल्या गडाखांनी भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब मुरकुटेंना घरचा रस्ता दाखवला होता… गडाख अपक्ष असले तरी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देत कॅबिनेट मंत्रीपदाचाही अनुभव आपल्या पारड्यात पाडून घेतला… त्यामुळे यंदा ठाकरेंकडून शंकरराव गडाख तर भाजपकडून बाळासाहेब मुरकुटे अशी आपल्याला प्लेन लढत दिसत असली तरी इच्छुकांनी प्रचाराचा धुराळा उडवल्याने तालुक्यातील अनेक प्रस्थापितांनी उमेदवारीसाठी राजकारणाची पेरणी करायला सुरुवात केलीये… त्यामुळे नेवासात यंदा उमेदवारी कशी असेल? विरोधात भाजपचा चेहरा असतानाही शिंदे गटाने नेवासासाठी कसं राजकारण वाढवून ठेवलंय? गडाख विरुद्ध गडाख अशा नवीनच संघर्षाला विधानसभेच्या निमित्ताने सुरुवात होऊ शकते का? त्याचाच घेतलेला हा आढावा…

गोदावरी प्रवरा आणि मुळा या तीन नद्यांचं मिलन होणारा प्रवरा संगम… जिथं ज्ञानेश्वरीचे अभंग उमटले ते धार्मिक तीर्थक्षेत्र… शनिशिंगणापूर पासून ते थेट देवगड देवस्थान सारखा मोठा धार्मिक वारसा जसा या नेवासा विधानसभेला लाभलाय तितकाच मोठा राजकीय वारसा देखील… माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय पेरणीतून तयार झालेला हा मतदारसंघ… मुळा सहकारी साखर कारखाना – मुळा एज्युकेशन सोसायटी यांसारख्या सहकारी आणि संस्थात्मक जाळ्यांची प्रवराला माहिती झाली ती गडाखांमुळेच… स्थानिक स्वराज्य संस्था असो की शनिशिंगणापूर सारख देवस्थान या सगळ्या सत्तेच्या स्थानांवर गडाख फॅक्टरच आजही जोरात चालतो… हे सगळं सांगण्याचा मूळ कारण म्हणजे गडाख या कुटुंबाला नेवासाच्या राजकारणातून वगळून चालत नाही, हे आपल्या ध्यानात यावं… यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे पाटील, तुकाराम गडाख, नरेंद्र घुले, असा खासदारकीचा प्रवास करत मतदारसंघाचा इतिहास येऊन पोहोचतो तो 2009 पर्यंत…

इथे झालं असं की, नगर नेवासा आणि शेवगाव नेवासा या दोन मतदारसंघाचं एकत्रीकरण करण्यात येऊन… यातला काही भाग वगळून… स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला… आणि याच स्वतंत्र मतदारसंघात यशवंतराव गडाखांनी आपला राजकीय वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केला… आणि शंकरराव गडाख पहिल्यांदा आमदार झाले…. मात्र या प्रस्थापित गडाख कुटुंबाची पाळमुळ घराघरात पोचलेली असतानाही 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक जायंट किलर ठरले… प्रस्थापित गडाखांना पराभवाचा मोठा धक्का बसला…. मात्र 2019 ला पराभवाचे उट्टे काढत ते पुन्हा आमदार झाले पण कुठल्या पक्षाच्या तिकिटावर नाही तर अपक्ष म्हणून… अर्थातच राष्ट्रवादीनं त्यांना बाहेरून पाठिंबा दिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता… महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला… जलसंधारणाचं कॅबिनेट मंत्रीपदही सांभाळलं… शिवसेनेच्या फुटीतही ते ठाकरेंशीच एकनिष्ठ राहिल्याने सध्या महाविकास आघाडी कडून मशालीच्या चिन्हावर शंकरराव गडाख विधानसभेच्या रिंगणात दिसतील, हे तर जवळपास कन्फर्म आहे… मात्र लोकसभा निवडणुकीत नेवासात शिवसेनेच्या शिंदे गटाला लीड होतं… त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळेल म्हणून वाट पाहत बसलेल्या बाळासाहेब मुरकुटेंसाठी शिवसेना शिंदे गटानं नेवासा मतदारसंघावर क्लेम केल्याने महायुतीचा उमेदवार कोण? या चा मोठा झांगडगुत्ता झाला आहे…

बाळासाहेब मुरकुटे, ऋषिकेश शेटे हे दोघेही भाजपकडून इच्छुक असले तरी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली पाहता भाजपच्या स्वप्नांवर विरजन पडेल की काय? याची शक्यताही नाकारता येत नाही… कारण शिंदेंनी मतदारसंघात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केलीय.. शिवसेनाच साखरपट्ट्यात परिवर्तन आणू शकते, असं म्हणत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्रमकपणे नेवासाच्या उमेदवारीची मागणी केली आहे… विधानसभा निरीक्षक डेव्हिड जेरी यांनी जातीने लक्ष घालत धनुष्यबाण मतदार संघातील घराघरात कसं पोहोचेल? यासाठी तालुका पिंजून काढायलाही सुरुवात केली आहे… बाळासाहेब पवार, भगवान गंगावणे, नितीन औताडे ही नाव शिंदे गटाकडून इच्छुक असली तरी गडाखांच्या वर्चस्ववादी राजकारणाला सुरुंग लावतील, इतकी त्यांच्यात ताकद नक्कीच नाहीये… त्यामुळे मतदारसंघातील एक युवा चेहऱ्याचा तातडीने पक्षप्रवेश शिंदे गटाकडून होऊ शकतो… यात क्रमांक एकवर नाव येत ते माजी खासदार तुकाराम गडाख यांचं… गडाख यांचे सुपुत्र रविराज गडाख आणि त्यांचे बंधू किसनराव गडाख यांपैकी एका चेहऱ्याने धनुष्यबाण हाती घेतलं तर गडाख विरुद्ध गडाख असा ऐतिहासिक सामना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो… पण यात भाजपच्या इच्छुकांची भूमिका काय राहणार? यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत…

मतदारसंघात बंडखोरी झाली तर त्याचा फायदा गडाखांना होत आल्याचे राजकीय पुरावे आहेत… त्यामुळे मुरकुटे आणि शेटे यांनी शांत राहणं… शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करणं… यावर नेवासाच्या निकालाबद्दल स्पष्टपणे बोलता येईल… विद्यमान आमदार गडाखांच्या पाठीशी सहकार संस्थांच जाळ, शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणि सहानुभूती, आघाडीची ताकद, मुस्लिम – दलित समाजाचे मतदान असणार आहे… तर दुसऱ्या बाजूला लोकसभेला मिळालेलं लीड, गडाख विरोधी नेत्यांची एकजूट, बंडखोरांची ताकद आणि राज्याची सत्ता असणार आहे… त्यामुळे या दोन्ही बाजूंची आकडेमोड करून पाहिली तर नेवासाचा आमदार नेमका कोण होतोय? तुम्हाला काय वाटतं? गडाखांच्या वर्चस्ववादी राजकारणाला कुणी खिंडार पाडेल की तेच पुन्हा एकदा या अनप्रेडिटटेबल मतदारसंघाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करतील? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…