Sunday, December 21, 2025
Home Blog Page 504

Hair Straightening Treatment | हेअर स्ट्रेटनिंग करणे बेतेल जीवावर; किडनी पूर्णपणे होते खराब

Hair Straightening Treatment

Hair Straightening Treatment | आज काल स्त्री आणि पुरुष सगळेच त्यांच्या केसांची खूप काळजी घेत असतात. आपले केस अत्यंत मऊसूद आणि चमकदार ठेवण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. बाजारात केसांच्याबाबत अनेक प्रोडक्ट्स देखील आलेले आहेत . त्या केमिकल प्रॉडक्ट्स देखील ते केसांवर लावले जाते. आज काल केसांना स्ट्रेटनिंग (Hair Straightening Treatment) करणे एक खूप ट्रेंडमध्ये आलेले आहे. यामुळे आपले केस अत्यंत मऊ आणि सरळ होतात. परंतु हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. त्याचप्रमाणे केस सरळ करण्यासाठी कॅरोटीन ट्रीटमेंटचा देखील वापर केला जातो. यामध्ये अनेक केमिकल प्रॉडक्ट तुमच्या केसांवर लावून तुमचे केस सरळ केले जातात.

परंतु एका अभ्यासात असे समोर आलेली आहे की, असे उत्पादन तुमच्या केसांना लावल्यामुळे तुमच्या किडनीला हानी पोहोचू शकते. आणि याचे पुरावे देखील समोर आलेले आहे 2019 ते 2022 या दरम्यान 14 केंद्रांमधून जवळपास 26 प्रकरने किडनी खराब झाल्याची समोर आलेली आहेत. यांपैकी 20 वर्षाची एक मुलगी होती. तिला मूत्रपिंडाचा एवढा आजार गंभीर झाला की, तिला तीन वेळा डायलेसिसची आवश्यकता होती. केरोटिन ट्रीटमेंटमध्ये मूत्रपिंडात ऑक्सिलेट क्रिस्टलच्या निर्मितीमुळे दुखापत होण्याचा धोका वाढतो.

किडनीला कसा त्रास होतो ? | Hair Straightening Treatment

यामध्ये ग्लायऑक्सीलिक ऍसिड एपीडरमिस मधून जाते. आणि रक्तामध्ये सोसले जाते. तेथे वेगाने ग्लाय ऑक्सिलेट मध्ये रूपांतरित होते. जे किडनीसाठी विषारी असते. केस सरळ करण्यासाठी ऑक्सिडीक ऍसिड वापरल्याने कॅल्शियम ऑक्सिलेट किडनीच्या उतींमध्ये जमा होते. आणि आपली किडनी चांगल्या पद्धतीने काम करत नाही.bपरंतु ही स्थिती जेव्हा गंभीर होऊ लागते. तेव्हा आपल्याला डायलिसिसची देखील आवश्यकता लागते. अनेकवेळा यामुळे इतकी मोठी दुखावत होते की, आपली किडनीचे काम काम करत नाही. उपचारानंतर तुम्हाला सतत खाज सुटणे, चिडचिड होणे, व्रण उठणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही कॅरोटीन ट्रीटमेंट केली असेल आणि त्यानंतर तुम्हाला असे काही लक्षणे दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संभाजीराजे संतप्त; मोदींकडे केली ही मागणी

Chhatrapati Shivaji maharaj statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात आणि किल्ले पण जिंकलेले आहेत. आणि त्यातील सगळे बऱ्यापैकी सगळे किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहे. हा इतिहास आज आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळतो हे आज आपलं भाग्यच आहे. शिवाजी महाराजांचे अनेक जलकिल्ले देखील आहेत. त्यातीलच एक किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला. काही दिवसापूर्वी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळा कोसळला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे राजकोट किल्ल्यावर नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन देखील करण्यात आले होते. परंतु हा पुतळा अचानक कोसळला. परंतु एवढा मोठा पुतळा अचानक कसा कोसळला? याचे कारण अजूनही समोर आलेले आहे नाही. या घटनेमुळे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती हे नाराज झालेले आहेत. आणि त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे.

नौदल दिनाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले होते. परंतु हा पुतळा अचानक कोसळल्याने आता शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलेले होते. या घटनेवरून संभाजी राजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारण्याची देखील मागणी केली आहे. तसेच आता निवडणुका असल्यामुळे कामात कोणत्याही प्रकारची गडबड करू नका. असे देखील त्यांनी उद्देशून म्हटलेले आहे.

संभाजी राजे छत्रपती यांनी एक्सवर माहिती देणारी एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की, “पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाईगडबडीत उभारलेला पुतळा आज कोसळलेला आहे. मुळातच आकारहीन आणि शिल्प शास्त्रास अनुसरून नसलेला आणि घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. परंतु आपले महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अगदी वर्षभरातच कोसळते. ही खूप दुर्दैवी घटना आहे. या परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यावर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? आता त्या ठिकाणी पुन्हा महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या परत काही गडबड करू नका. उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.”

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम देण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आलेला होता. 4 डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु पुतळा उभारलेला एक वर्ष देखील झालेले नाही. परंतु हा पुतळा कोसळला असल्याने छत्रपती संभाजी राजे छत्रपती यांचा संताप झालेला आहे.

Ration Card | आजच करा हे काम; अन्यथा रेशन मिळणे होईल कायमचे बंद

Ration Card

Ration Card | सरकारकडून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात. सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच सरकार विविध योजना आणत असतात. सरकारने दारिद्र्यरेषेखालील लोकांना दर महिन्याला रेशन देखील दिले जाते. शिधापत्रिके मार्फत हे रेशन दिले जाते. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही. सरकारकडून दर महिन्याला तुम्हाला राशन दिले जाते. अशातच राशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे जर तुम्ही तुमच्या राशन कार्डला तुमचे आधार कार्ड लिंक केले असेल, तरच तुम्हाला इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आज- काल बनावट राशन कार्डचा (Ration Card) वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा वापर रोखण्यासाठी ही प्रक्रिया समोर आलेली आहे. त्यामुळे कामकाजामध्ये देखील पारदर्शकता राहणार आहे त्यामुळे तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असणे खूप गरजेचे आहे. ही प्रक्रिया तुम्ही अगदी घरी बसून मोबाईलवर देखील करू शकता.

आधार-रेशन लिंकची शेवटची तारीख | Ration Card

सरकारने आधार कार्ड रेशन करण्यासाठी मुदत देखील दिलेली आहे. तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड रेशनला लिंक करू शकता. तुमच्यासाठी बराच वेळ आहे. परंतु शेवटच्या दिवसांमध्ये सर्वर डाऊनची समस्या निर्माण होते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या.

आधार-रेशन लिंक कसे करायचे ? | Ration Card

  • तुम्हाला सगळ्यात आधी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाईटवरून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर तुमचा रेशन क्रमांक आणि इतर माहिती भरायचे आहे.
  • ज्या सदस्यांची नावे आधारमध्ये नोंदणीकृत आहे. तुम्हाला त्यांच्या आधार कार्ड क्रमांक देखील टाकायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्ही आवश्यक असलेली सगळी माहिती भरा. आणि सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
  • तुम्ही तो ओटीपी भरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन कन्फर्मेशनचा एक मेसेज देखील येईल.

Red Banana Farming | इंजिनिअरने नोकरी सोडून केली लाल केळीची शेती; कमावतोय लाखो रुपये

Red Banana Farming

Red Banana Farming |आपल्या देशामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आपल्या देशाची जवळपास 50 टक्के लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी नेहमी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. आजकाल अनेक उच्च शिक्षित तरुण देखील नोकरी न करता शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत आहेत. आणि वर्षाला त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. पारंपरिक पिकांना बाजूला ठेवून आजकाल तरुणांनी आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळे पिके घेण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी यातून जगासमोर एक मोठा आदर्श देखील निर्माण केलेला आहे.

अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या एका उच्चशिक्षित तरुणाने एक शेतात वेगळा प्रयोग केलेला आहे. याची सर्वत्र सध्या चर्चा झालेली आहे. या तरुणाचे सिविल इंजिनिअरिंग झालेले आहे. त्याने त्याच्या चार एकरात लाल केळीचे (Red Banana Farming) उत्पादन घेतलेला आहे. आणि या केळीच्या पिकातून त्यांनी जवळपास 35 लाख रुपयांची कमाई केलेली आहे.

लाल केळी ही आपल्या सामान्य केळीपेक्षा खूप वेगळी असते. या केळीला जगभरात खूप जास्त मागणी आहे. फाईव्ह स्टारमध्ये तसेच मेट्रोच्या शहरांमध्ये या लाल केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.या तरुणाने नोकरीच्या मागे न पडता एक वेगळा निर्णय घेतला. आणि चार एकर त्याने 35 लाखाच्या केळीचं पीक पिकवले आहे. त्यामुळे या शेतकरी तरुणाचे सध्या देशभर कौतुक होताना दिसत आहे.

या तरुणाचे नाव अभिजीत पाटील असे आहे. त्याने लाल केळीची लागवड केलेली आहे. उच्चशिक्षित झालेल्या इंजिनियर तरुणांना आजकाल नोकरीचे वेध लागलेले असतात. त्यापासून त्यांना कोणीही लांब करू शकत नाही. परंतु या तरुणाने चांगल्या पगाराचीची नोकरी धुडकावून शेती करण्याचा निर्णय घेतला. अभिजीतने चार एकरामध्ये 60 टन केळीचे उत्पादन घेतलेले आहे. त्याचा खर्च वगैरे काढून त्याला 35 लाख रुपयांचा नफा झालेला आहे.

कुठल्याही बाजारात न विकण्याचा निर्णय | Red Banana Farming

अभिजीत नेत्याचे इंजिनिअरिंगची डिग्री डी वाय पाटील कॉलेज पुणे इथून घेतलेली आहे 2015 साली त्याने शेती करण्याचा निर्णय घेतलेला होता. सात – आठ वर्षात त्यांनी शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले. त्यानंतर 2020मध्ये त्याने सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन चार एकरात लाल केळीची शेती केली. परंतु त्याने कुठल्याही बाजारात ही केळी विकली नाही. त्याने त्याचे मार्केटिंग कौशल्य वापरले आणि ही लाल केळी थेट पुणे, मुंबई, दिल्ली आणि येथील रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये विकलेली आहे. या लाल केळींना सध्या बाजारात खूप जास्त भाव आहे.

आरोग्यासाठी लाल केळी अधिक फायद्याची

आपल्या सामान्य केळीपेक्षा लाल केळीही आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायद्याची असते. या केळीची साल लाल असते. त्याप्रमाणे त्याचे फळ हे काहीशा प्रमाणात पिवळ्या रंगाचे असते. यामध्ये शुगर देखील मर्यादित असते. ही केळी खाल्ल्याने कॅन्सर तसेच हृदयविकाराचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे ही केळी खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यता देखील कमी असते.

Rent Agreement : भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठीच का? पूर्ण वर्षाचा का नाही ? जाणून घ्या

Rent Agreement : अनेकदा असे दिसून येते की अनेक लोक घरापासून दूर इतर शहरांमध्ये अभ्यास किंवा नोकरीसाठी राहतात आणि यापैकी बहुतेक लोक भाड्याने राहतात.त्याच वेळी, घर भाड्याने देण्यासाठी भाडेकरू आणि घरमालक यांनी भाडे करार करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्षांची नावे, पत्ता, भाड्याची रक्कम, भाड्याचा कालावधी आणि इतर अटी आणि तपशील समाविष्ट असतो. आता तुम्ही पाहिलेच असेल की आपल्या देशात बहुतेक लोक भाडे करार 11 महिन्यांसाठी करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दर करार 11 महिन्यांसाठी का केला जातो आणि संपूर्ण वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी का नाही? चला तर मग (Rent Agreement) जाणून घेऊया…

म्हणून भाडे करार 11 महिन्यांसाठी केला जातो (Rent Agreement)

यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नोंदणी कायदा, 1908. या कायद्याच्या कलम 17 नुसार, एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भाडेपट्टा करार नोंदणी करणे बंधनकारक नाही. याचा अर्थ असा की भाड्याचा कालावधी 12 महिन्यांपेक्षा कमी असल्यास, नोंदणीशिवाय करार केला जाऊ शकतो. यामुळे घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही उपनिबंधक कार्यालयात जाण्याचा आणि नोंदणी शुल्क भरण्याचा त्रास वाचतो.

अशा प्रकारे, असे शुल्क टाळण्यासाठी, सहसा 11-महिन्यांचा करार केला (Rent Agreement) जातो. याव्यतिरिक्त, भाड्याचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्यास, मुद्रांक शुल्क देखील वाचवले जाते, जे भाडे कराराच्या नोंदणीच्या वेळी भरावे लागते. त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू भाडेपट्टीची नोंदणी न करण्याचे परस्पर सहमत आहेत.

जास्त कालावधीसाठी भाडे करार करता येतो ?

तथापि, करार 11 महिन्यांपेक्षा जास्त किंवा कमी कालावधीसाठी केला जाऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती भाडे कराराची नोंदणी करते तेव्हा भाड्याची रक्कम आणि भाड्याच्या कालावधीच्या आधारे मुद्रांक शुल्क निश्चित केले जाते. भाड्याचा कालावधी जितका जास्त तितका मुद्रांक शुल्क जास्त. म्हणून, करार जितका जास्त असेल तितके पक्षांना जास्त पैसे द्यावे लागतील. त्याच वेळी, 11 महिन्यांपेक्षा कमी (Rent Agreement) कालावधीच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

बहुतेक भाडे करार 11 महिन्यांसाठी असण्यामागील कारण म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क यासारख्या इतर कायदेशीर प्रक्रियांचा खर्च आणि त्रास टाळणे. हे घरमालक आणि भाडेकरूंना अनावश्यक शुल्काशिवाय भाडे करारावर वाटाघाटी करण्यासाठी एक सोपा आणि (Rent Agreement) सोयीस्कर पर्याय देते.

ATM मधून फाटक्या नोटा निघाल्यास काय करावे? जाणून घ्या नियम

ATM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल पैशांबाबतचे स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागते. विशेषतः एटीएममधून (ATM) पैसे काढताना काळजी घ्यावी लागते. आज एटीएम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. खरंतर एटीएम हे असे साधन आह, ज्यामुळे आपल्याला बँकेत न जाता कुठूनही पाहिजे तेव्हा पैसे काढता येतात. अगदी काही मिनिटातच आपण बँकेत न जाता पैसे काढू शकतो.

एटीएम (ATM) मशीनच्या माध्यमातून आपल्याला भारतातील कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येतात. परंतु अनेकदा आपल्याला एटीएम मधून फाटलेल्या नोटा मिळतात. आणि या नोटा कोणीच घेत नाही. त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. आजपर्यंत अनेक लोकांच्या बाबत असे झाले आहे की, एटीएममधून फाटक्या नोटा निघालेल्या आहेत. परंतु त्या नोटांचे पुढे काय करावे? हे त्यांना समजत नाही. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.

ATM मधून फाटलेली नोट निघाल्यास काय करावे?

तुम्ही एटीएममधून पैसे काढले आणि यामध्ये काही नोटा फाटक्या आल्या तर तुम्ही हे या नोटा बदलू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल बँकेत गेल्यानंतर फाटलेली नोट तुम्हाला सहज बदलून मिळेल. बँकेमधून तुम्हाला फाटलेल्या नोटांच्या जागी नवीन नोटा दिल्या जातील. याबाबत आरबीआयने काही नियम देखील तयार करून दिलेले आहेत. त्यानुसार एटीएममधून निघालेल्या नोटा जर फाटलेल्या असतील, तर त्या तुम्हाला बँकेत बदलून दिल्या जातील. बँक तुम्हाला या नोटा बदलून देण्यासाठी नकार देऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक अर्ज करावा लागतो.

किती नोटा बदलू शकता ?

तुम्ही बँकेत गेल्यावर तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. या अर्जात तुम्ही पैसे काढल्याची तारीख वेळ आणि ज्या एटीएममधून पैसे काढले आहे त्याची माहिती द्यावी लागेल तुम्ही एका वेळी एक व्यक्ती जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकतो. त्याचप्रमाणे या नोटांची किंमत 5000 पेक्षा जास्त नसावी.

September Bank Holiday | सप्टेंबर महिन्यात 15 दिवस असणार बँका बंद ; RBI ने दिली माहिती

September Bank Holiday

September Bank Holiday | ऑगस्ट महिना संपायला काहीच दिवस राहिलेले आहेत. आणि नंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे. नवीन महिना चालू झाल्यानंतर आपण संपूर्ण महिन्याचे प्लॅनिंग करत असतो. आपल्याला महिन्याभरात काय काय करायचे? कोणते आर्थिक व्यवहार करायचे आहेत? हे सगळे पाहत असतो. परंतु जर बँके संबंधित तुमचे काही काम असेल, तर सप्टेंबर महिन्यात (September Bank Holiday) अनेक मोठे सण येणार आहे. त्यामुळे बँकांना खूप सुट्टी आहे. त्यामुळे तुमचे जर काम असेल तर आधी सुट्टी आहे की नाही हे पाहूनच करा अन्यथा तुमचा वेळ वाया जाईल.

पुढील सप्टेंबर महिन्यात (September Bank Holiday) बँकांना खूप सुट्ट्या आहेत. रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि सप्टेंबर महिन्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार आहेत? याची माहिती समोर दिलेली आहे. आरबीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सप्टेंबर महिन्यात किती दिवस बँका बंद असणार आहेत? हे सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जर सप्टेंबर महिन्यात काही काम करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस म्हणजे अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. परंतु वेगवेगळ्या राज्यात सुट्ट्यांचा कालावधी कमी जास्त आहे. आता राज्यानुसार सुट्ट्यांची यादी बदलणार आहे आपण पाहूयात की किती सुट्ट्या असणार आहेत.

सप्टेंबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या खालीलप्रमाणे | September Bank Holiday

  • 1 सप्टेंबर – या दिवशी महिन्यातील पहिलाच रविवार आहे त्यामुळे संपूर्ण देशात सगळ्या बँका बंद राहणार आहेत.
  • 4 सप्टेंबर – या दिवशी श्रीमंत शंकर देवाची तिरू भाऊ तिथे असल्याने गुवाहाटी मधील सर्व बँका बंद राहणार आहेत.
  • 7 सप्टेंबर – 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे या दिवशी गणपतीची स्थापना होते त्यामुळे संपूर्ण भारतात बँका बंद असणार आहे.
  • 8 सप्टेंबर – 8 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.
  • 14 सप्टेंबर – या दिवशी दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण भारतात या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे
  • 15 सप्टेंबर – या दिवशी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.
  • 16 सप्टेंबर – बारावाफट याच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
  • 17 सप्टेंबर या दिवशी मिलाद ऊन नबी निमित्ताने गंगा टोक आणि राईपुर या ठिकाणातील बँका बंद असणार आहेत.
  • 18 सप्टेंबर – पंग-लाहबसोल निमित्ताने गंगटोक येथील बँकांना सुट्टी राहणार आहे.
  • 20 सप्टेंबर – या दिवशी ईद-ए-मिलाद-उल-नबी निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील बँकांना सुट्टी राहणार आहे.
  • 21 सप्टेंबर – या दिवशी श्री नारायण गुरु समाधी दिवस निमित्ताने कोची, तिरुवनंतपुरम येथे बँकांना सुट्टी राहणार आहे.
  • 22 सप्टेंबर – या दिवशी रविवार असल्याने देशातील संपूर्ण बँका बंद असणार आहे.
  • 23 सप्टेंबर – या दिवशी महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिन असल्याने जम्मू, श्रीनगर येथील बँकांना सुट्टी राहील.
  • 28 सप्टेंबर – चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
  • 29 सप्टेंबर – रविवार असल्याने या दिवशी देशातील सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे.

महाराष्ट्रात वाढणार रोजगाराची संधी; छत्रपती संभाजीनगरमध्ये वसणार औद्योगिक शहर

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये गेले काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विकास घडलेला दिसत आहे. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी देखील नवनवीन प्रकल्प राबवले जातात. यासाठी आता बारा ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्याचे काम देखील घेण्यात येणार आहे. यासाठी सरकारने एक मोठी योजना घेतलेली आहे. 2024 मध्ये आर्थिक अर्थसंकल्प सादर झाला यावेळी निर्मला सीतारामन यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे अनेक नवीन महामार्ग एक्सप्रेस तयार करण्यावर जास्त भर दिला जाणार आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा संपूर्ण चेहरा बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने आता 12 नवीन शहरांना औद्योगिक हब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश आहे.

आपले देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील 12 नवीन औद्योगिक शहरे स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातील आंध्र प्रदेशमध्ये दोन आणि बिहारमध्ये एक आहे. या औद्योगिक शहरांमुळे आता राज्यात रोजगाराची संधी देखील निर्माण होणार आहे. अनेकांना काम देखील मिळणार आहे.

2023 – 24 चा अर्थसंकल्पात उत्पादन वाढवण्यासाठी आणि राज्य तसेच खाजगी क्षेत्राच्या भागीदारीत 100 शहरात प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. याबद्दलची माहिती राजेश कुमार सिंग यांनी दिलेली आहे. या आधीच आठ शहरांमध्ये औद्योगिकीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. या चार शहरांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आंध्र प्रदेशमध्ये सुरुवात देखील झालेली आहे. आणि उद्योगासाठी आता जागा वाटपाचे काम देखील सुरू झालेले आहे. त्यामुळे या शहरांमध्ये जळणवळण सुविधा पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधा देखील लवकरात लवकर होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात 8 शहरांचा समावेश

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीला आठ औद्योगिक शहरात पायाभूत सुविधा विकसित केलेले आहे. बजेटमध्ये यावर्षी 12 नवीन शहरांचा समावेश देखील केलेला आहे. परंतु येथे काही दिवसातच या शहरांची संख्या 20 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या देशात रोजगार निर्मिती होणार आहे. आणि इतर राज्य स्थलांतरित होणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील कमी होणार आहे.

कार खरेदीवर मिळणार 25 हजारापर्यंत डिस्काउंट ? गडकरी यांच्या ‘त्या’ निर्णयाचा फायदा

श्रावण महिना सुरू झाल्यापासून भारतीय सणांना सुरुवात होत असते. या सणासुदीच्या काळामध्ये अनेक जणांकडून खरेदी केली जाते. त्यामध्ये गाड्यांच्या खरेदीमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या देखील सणादरम्यान विशेष सूट ग्राहकांना देत असतात. एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या रिपोर्टनुसार जर एखाद्या ग्राहकाने त्याची जुनी गाडी स्क्रॅप करून नवीन गाडी खरेदी करत असेल तर त्या व्यक्तीला यांना नवीन गाडीवर १.५ ते ३.५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार असल्याची माहिती आहे. पण या निर्णया मागे रस्ते विकास आणि परिवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांचा हात असल्याचं बोललं जात आहे चला जाणून घेऊया काय आहे नक्की हे प्रकरण?

माध्यमांच्या रिपोर्टनुसार काही टॉप लक्झरी कार कंपन्या जवळपास 25 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यासाठी तयार झालया आहेत तर इतर कंपन्याही तितकाच डिस्काउंट देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इंडस्ट्री आणि सरकार या प्लांटची घोषणा लवकरच करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान 2021 मध्ये नितीन गडकरी यांनी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली होती या घोषणेनंतर गडकरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ग्राहकांना त्यांच्या जुन्या कार स्क्रॅप करून त्यावर डिस्काउंट आणि कमी जीएसटी यासारखी सूट मिळण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर 2022 मध्ये मंत्रालयाने ऑटोमोबाईल युनियन्सना त्यांच्या ग्राहकांना स्क्रॅपिंग वाहनांच्या बदल्यात विक्री किमतीवर पाच टक्के पर्यंत सूट द्यायला सांगितलं होतं. परंतु कंपन्यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. सरकारने 60 नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा आणि 75 स्वयंचलित चाचणी केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

काय आहे नक्की स्क्रॅपिंग पॉलिसी?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांना 26 जुलै 2019 रोजी मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या पंधरा वर्षांहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे अशी तरतूद करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर देशात स्क्रॅपिंग पॉलिसी अमलात आणली गेली. जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर त्याला आपल्याला पाच टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल मात्र या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे असं सांगण्यात आलं होतं.

Pune Airport : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव ; मंत्री मोहोळ यांचा पुढाकार

Pune Airport : अगदी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल्सचं उद्घाटन झालं असून या टर्मिनल ची सेवा आता सुरू झाली आहे. नवीन टर्मिनल सुरू होण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. याबरोबरच आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे (Pune Airport)पाठवावा अशी भूमिका पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे.

म्हणून ‘या’ नावाला पसंती (Pune Airport)

याबाबत माहिती देताना मोहोळ यांनी सांगितलं की, यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून नावासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा यासाठी मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पुण्याचे विमानतळ असलेले लोहगाव हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं हे जिव्हाळ्याचं होतं. याशिवाय लोहगावच्या गावकऱ्यांची ही अशीच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचीही संवेदना याविषयी जोडलेली आहे त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला संत तुकोबारायांचं नाव देणं हे अधिक समर्पक असणार आहे अशी माहिती मोहोळ यांनी (Pune Airport) दिली आहे.

नावावर लवकरच शिक्कामोर्तब (Pune Airport)

मिळालेल्या माहितीनुसार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. मग विमानतळाचे नामकरण करताना त्यांच्या नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो त्यानंतर या नावावर लवकरच शिक्का मोर्तब होईल असंही मंत्री मोहोळ यांनी स्पष्ट केलं (Pune Airport) आहे.