Sunday, December 21, 2025
Home Blog Page 505

पुण्यात भयानक कृत्य ! तरुणीचे डोके, हात ,पाय कापून धड फेकले नदीपात्रात

बदलापूर अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुण्यातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. पुणे शहरात खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले असून खराडी येथील नदीपात्रात या तरुणीच धड पोलिसांना आढळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खून झालेल्या तरुणीचे वय हे अंदाजे 18 ते 30 दरम्यान आहे. याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे. तिथून जवळच असलेल्या नदीपात्रात एका महिलेचे हात पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. मयत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून या तरुणीचं वय हे अंदाजे 18 ते 30 दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे.

एका अज्ञात इस्माने या तरुणीला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासून शीर, दोन्ही हात खांद्यापासून आणि दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या सहाय्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड मुळा- मुळा नदीपात्रात फेकून दिलं. अज्ञात व्यक्ती विरोध हत्याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

‘त्या’ अत्याचार प्रकरणावर काँग्रेस प्रवक्त्याचे मराठी माणसाबद्दल वादग्रस्त विधान; नव्या वादाला तोंड??

बदलापूरातील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मात्र याच प्रकरणावरून काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांना मराठी लोकांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले आहे . एवढेच नाही तर त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. एका हिंदी टीव्ही माध्यमाच्या चर्चेदरम्यान शर्मा यांनी मराठी माणसाला बलात्काऱ्यांशी जोडणारं एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली पहायला मिळत आहे. शिवाय राजकीय क्षेत्रात देखील याचे मोठे पडसाद उमटले आहेत.

काय केले वादग्रस्त विधान ?

प्रसिद्ध टीव्ही चॅनल वरील चर्चेदरम्यान, शर्मा यांनी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले ‘बदलापुरात मराठी माणसाने बलात्कार केला तर त्यालाही वाचवाल का?’ असे वक्तव्य त्यांनी केले असून मराठी पुरुषांना बलात्काराशी जोडणाऱ्या काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप आणि निषेध व्यक्त होत आहे.

राहुल गांधी यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी

शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करणाऱ्या हजारो पोस्ट आणि पोस्टर्ससह या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मराठी प्रेमी, इतिहासप्रेमी आणि सोशल मीडिया वापरकर्ते या सर्वांनीच आपला असंतोष व्यक्त केला आहे. भाजप आणि शिवसेनेने शर्मा यांच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. शर्मा यांच्यावर मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप करत शिवसेनेने पोलिसांत तक्रार दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शर्मा यांच्या वक्तव्याबाबत जगभरातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप आहे.

शर्मा यांच्या विधानाविरुद्धचा पक्ष आणि शहरांच्या पलीकडे पसरलेला आहे. महिलांवर अत्याचार करणारी व्यक्ती कोणत्याही भाषेचे, धर्माचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करत नाही तर ती केवळ बलात्कारी आहे, अशी सर्वसामान्य भावना आहे. अशा कृत्याचा मराठी समाजाशी संबंध जोडून शर्मा यांनी गंभीर गुन्हा केला आहे, असे मराठी समाजाचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत सोयीस्करपणे मौन ?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, ज्यांनी नेहमीच मराठीचा अभिमान जपला आणि मराठी भाषिकांना पाठिंबा दिला. त्यांनी मराठी भाषिकांचा बचाव केला आणि त्यांना न्याय दिला. मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठी भाषिक यांच्या विरोधात बोलणा-या कोणाचीही बाळासाहेबांनी चिरफाड केली असती. आलोक शर्मा यांनी एका राष्ट्रीय वाहिनीवर थेट मराठी भाषिकांना बलात्कारी म्हटले असले तरी बाळासाहेबांच्या वारशाचे वारसदार म्हणणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मात्र मौन बाळगून आहेत.महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आलोक शर्मा यांचा एक शब्दही निषेध केला नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनीही या विषयावर सोयीस्कर मौन बाळगले आहे. ते गप्प का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

महाराष्ट्राला महिलांचा आदर करण्याची परंपरा

महाराष्ट्राला महिलांचा आदर करण्याची अभिमानास्पद परंपरा आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. राज्यामध्ये पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या आद्य व्यक्तींचे घर आहे, ज्यांनी महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाची प्रगती केली. महाराष्ट्रात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन झाली आणि मराठी महिलांनी शिक्षण, विज्ञान आणि कला यासह विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. हा वारसा पाहता, मराठी माणसाला बलात्कारी असे लेबल लावणे खूप त्रासदायक आहे. या वक्तव्यामुळे केवळ मराठी माणसाचा अपमान झाला नाही तर महिलांच्या सन्मान आणि समानतेसाठी राज्याची दीर्घकालीन बांधिलकी कमी झाली आहे.

महाराष्ट्राबद्दल काँग्रेसला तिरस्कार ?

स्वातंत्र्यापासून मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला तुच्छतेने वागवल्याचा आरोप काँग्रेस पक्षावर होत आहे. ही भावना मराठी आकांक्षा आणि नेतृत्व कमी करण्याच्या प्रदीर्घ पद्धतीचा भाग म्हणून पाहिले जाते. ही भावना भूतकाळातील कृती प्रतिबिंबित करते, जसे की अखंड महाराष्ट्राच्या निर्मितीला काँग्रेसचा विरोध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रमुख मराठी नेत्यांना कमी करण्याचा प्रयत्न. कोणत्याही मराठी व्यक्तीला राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळू नये याची खातरजमा पक्षाने सातत्याने केली आहे आणि महाराष्ट्राला मान्यता व संसाधनांचा योग्य वाटा मिळू नये यासाठी त्यांनी काम केले आहे.

ऐतिहासिक अन्यायाचे आरोप

राज्यांच्या भाषिक पुनर्रचनेदरम्यान मराठी भाषिक प्रदेश (बेळगाव, बिदर, भालकी, कारवार, निपाणी आणि खानापूर) कर्नाटकात विलीन केल्याचा काँग्रेसवर आरोप आहे. सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना फार पूर्वीपासून वाटत आहे की आपल्यावर अन्याय झाला आहे आणि महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या त्यांच्या आवाहनाकडे लक्ष दिले गेले नाही. या ऐतिहासिक अन्यायाकडे मराठी भाषिक प्रदेशांवरील दुर्लक्ष आणि भेदभावाच्या व्यापक स्वरूपाचा भाग म्हणून पाहिले जाते.

काँग्रेस पक्षातील उच्चपदस्थांमध्ये मराठी नेत्यांची लक्षणीय अनुपस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पक्षाने कधीही मराठी व्यक्तीला अध्यक्षपदी नेमले नाही आणि प्रभावी मराठी नेत्यांना पद्धतशीरपणे कमकुवत केले आहे. या वगळण्यामुळे काँग्रेस पक्षाने नेहमीच मराठी नेत्यांच्या आणि लोकांच्या आशा-आकांक्षा धुडकावून लावल्याचा समज निर्माण झाला आहे.

Pan Card New Rule | पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; सरकारने आणला नवा नियम

Pan Card New Rule

Pan Card New Rule | आज-काल भारतीयांसाठी आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड देखील अत्यंत महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. यामध्ये जन्मतारीखेचा पुरावा, फोटोप्रूफ म्हणून तुमच्याकडे पॅन कार्ड (Pan Card New Rule) असायलाच हवे. पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असे कार्ड आहे. आता ज्या लोकांकडे पॅन कार्ड आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे. कारण पॅन कार्डच्या नियमांमध्ये सरकारने काही नियम बदल केलेले आहे.

सरकारने पॅन कार्डच्याबाबत काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत. आणि ही सरकारने बदल केलेले हे नियम 1 सप्टेंबर पासून चालू होणार आहेत. सुरुवातीला आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करणे बंधनकारक होते. परंतु आता या आणि यामधून पॅन कार्ड (Pan Card New Rule) धारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. कारण याबाबत एक नवीन नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जर तुम्ही देखील अजून तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले, नसेल तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण यापुढे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे गरजेचे नाही. ज्या व्यक्तींनी पॅन कार्ड काढताना त्यांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दिलेले आहे. अशा व्यक्ती आता त्याचं नवीन पॅन कार्ड काढताना त्यांचे आधार कार्डशी आपोआप लिंक होणार आहे. त्यामुळे अशा पॅन कार्ड धारकांना देणाऱ्या अपडेट करण्याची काही गरज नाही. केंद्र सरकारच्या वतीने याबाबत माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे आधार कार्ड असेल, तर यापुढे काळजी करण्याची काही गरज नाही.

पॅन कार्ड (Pan Card New Rule) हे अत्यंत महत्त्वाचे असे एक कागदपत्र आहे. तुम्हाला जर बँकेत खाते उघडायचे असेल मोबाईलचे सिम घ्यायचे असेल, तरी पॅन कार्ड आणि आधार कार्डची गरज लागते. आजकाल सगळीकडे डिजिटल पद्धतीने कामे होतात आणि या सगळ्या कामांसाठी पॅन कार्ड खूप गरजेचे आहे. पॅन कार्डच्याबाबत सरकारकडून नेहमीच नवनवीन नियम बदल केले जातात काही दिवसांपूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्डला एकमेकांना लिंक असणे हा नियम सरकारनेच काढलेला होता. परंतु आता सरकारने या निर्णयातील असा दिलेला आहे. पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स 1961 नुसार ते दिलेले आहे. त्यावर दिलेल्या 10 डीजिटचा अल्फा न्यूमरिक कोड हा युनिक असतो. अगदी लहान मुले, विद्यार्थी तसेच सर्व वयोगटातील व्यक्ती पॅन कार्ड काढू शकतात.

Telegram Ban in India | टेलिग्राम भारतात होणार बंद ? जाणून घ्या कारण

Telegram Ban in India

Telegram Ban in India | सध्या सोशल मीडिया हे एक तरुणाईचे खूप मोठे व्यसन बनलेले आहे. सोशल मीडिया शिवाय लोक राहतच नाही. अगदी मिनिटा मिनिटाला त्यांना सोशल मीडियावर अपडेट्स चेक करायचे असतात. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यातील टेलिग्राम हा एक भारतातील सर्वात मोठा वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. Telegram वर आपल्याला अनेक सुविधा मिळतात. अनेक लोक हे स्टडी मटेरियल देखील टेडीग्रामवर शेअर करतात. त्याचप्रमाणे अनेक वेबसिरीज तसेच मुव्हीज देखील आपल्याला टेलिग्रामवर पाहता येतात तसेच टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन क्लासेसचे सबस्क्रीप्शन देखील घेता येते. थोडक्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला टेलिग्रामच्या मार्फत मिळते.

जे लोक ग्रामीण भागात राहतात त्यांना शहरात येऊन मोठमोठे क्लास लावायला जमत नाही. अशा सगळ्यांसाठी टेलिग्राम (Telegram Ban in India) हे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु आता टेलिग्रामच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वाईट बातमी आलेली आहे. ती म्हणजे टेलिग्राम हे प्लॅटफॉर्म भारतात बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु नेमके यामध्ये कारण काय आहे? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपवर आतापर्यंत अनेक आरोप झालेले आहे. तरी देखील हे ॲप अजून उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी टेलिग्रामवर पेपर लीक झाल्याचा प्रकार घडलेला आहे. तसेच टेलिग्रामवर वसुली आणि सट्टेबाजी यांसारख्या गोष्टी करण्याला प्रोत्साहन दिले जाते. असे देखील आरोप करण्यात आलेले होते. हाती आलेल्या माहितीनुसार सरकारकडून टेलिग्राम (Telegram Ban in India) अँपची चौकशी सुरू झालेली आहे आणि या आरोपामध्ये काही तथ्य देखील समोर आलेले आहे. त्यामुळे आता टेलिग्रामच्या वापरावर बंदी देखील केली जाऊ शकते. सरकारकडून टेलिग्रामची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे टेलिग्राम ॲप बंद होते की? काय असे सगळ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.

काही दिवसापूर्वी मेडिकल प्रवेश परीक्षेचा पेपर लीक झाला होता आणि या प्रकरणात टेलिग्रामचा सहभाग असावा. असे निदर्शनास आल्यानंतर सरकारने या ॲपचाची चौकशी सुरू केली आहे. Telegram वर असा आरोप केला जात आहे की, telegram च्या माध्यमातून मेडिकल पेपर 5 हजार ते 19 हजार रुपयांच्या किमतीला विकला गेला होता. तसेच टेलिग्रामवर खोट्या बातम्या पसरवल्याचा देखील आरोप होता. काही दिवसांपूर्वी टेलीग्रामचे सीईओ पावेल ड्युरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आले होते. फ्रान्समधील OFMIN या संस्थेने टेलीग्रामवर फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबरबुलींग आणि बालगुन्हेगारीमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता.

Mukhymantri Vayoshri Yojana | जेष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या अटी

Mukhymantri Vayoshri Yojana

Mukhymantri Vayoshri Yojana | आपले सरकार हे नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीला केंद्रस्थानी ठेवून ते नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. सरकार हे शेतकरी, महिला त्याचप्रमाणे वृद्ध नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. अशातच आता सरकारने आणखी एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांचे 65 वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांना सरकारकडून 3000 रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhymantri Vayoshri Yojana ) असे आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य केले जाते. सरकारच्या समाज कल्याण विभागातून या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. ज्या व्यक्तींचे कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत आहे. अशा वयोवृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी अर्ज देखील करू शकता.

वयोमानानुसार लोकांचे आजारपण वाढतात. त्या आजारपणासाठी त्यांना खर्च करता यावा. यासाठी ही योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत अशक्तपणावर उपाययोजना म्हणून आवश्यक ती साधने दिलेली जातात. तसेच योगा केंद्र, मनस्वस्थ केंद्र, शारीरिक स्वास्थ्य अबाधीत ठेवण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना आनंदाने जgता यावा यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात आलेली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाचे (Mukhymantri Vayoshri Yojana ) वय हे 65 वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच त्या व्यक्तीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांच्या आत असायला हवे. तसेच लाभार्थ्यांनी त्यांचे घोषणापत्र देखील सादर करणे गरजेचे आहे. पात्र असणाऱ्या नागरिकांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये वितरित केले जाणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत तुम्हाला जी आवश्यक उपकरणे खरेदी करायचे आहे. त्याचे प्रमाणपत्र देखील 30 दिवसाच्या आत सादर करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्र | Mukhymantri Vayoshri Yojana

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट साइझ 2 फोटो
  • उत्पन्नाचं स्वयंघोषणापत्र
  • उपकरण किंवा साहित्याचा दुबार लाभ न घेतल्याचं स्वयंघोषणापत्र

Weather Update | पुढील 4 दिवस महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा धोका; हवामान खात्याचा इशारा

Weather Update

Weather Update | गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसत आहे. हवामान खाते देखील सतत पावसाबद्दलचे अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे की, 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात चांगलाच मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. यामध्ये खास करून नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यांसारख्या 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवसात मुंबई तसेच कोकण, विदर्भ, खानदेश, नाशिक, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात देखील पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 ऑगस्टनंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक यांसारख्या जिल्ह्यांच्या धरणांतील पाण्याचा विसर्ग देखील होणार आहे. त्यामुळे नदीकाठची जी गावे आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्टनंतर 5 सप्टेंबर पर्यंत विदर्भ, खानदेश, नाशिक, मुंबई या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा(Weather Update) जोर कमी होण्याची शक्यता जाणवते. परंतु इतर ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. सध्या पावसामुळे अनेक नदी, नाले, धरणे सांडून वाहताना दिसत आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना धोका देखील निर्माण झालेला आहे. तसेच पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने अनेक पर्यटक हे पर्यटनासाठी जाताना दिसत आहे. त्यामुळे या लोकांना प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कारण पावसाचा जोर आणि वादळ वारा यांचा जोर देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

‘त्या’ दोघी असत्या तर बदलापूर अत्याचाराची घटना घडलीच नसती ; महत्वाची माहिती आली समोर

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बदलापूर अत्याचार घटनेबाबत एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. या घटनेबद्दल तीव्र चीड, तीव्र असंतोष निर्माण झाल्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळल्यानंतर सरकारने आता हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाच्या चौकशी करिता समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा रिपोर्ट आता आला असून यामध्ये काही धक्कादायक बाबी नोंदवण्यात आले आहेत.

‘त्या’ दोघी असत्या तर

याबाबत माहिती देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की,” शिक्षण विभाग समितीला तपासात असं आढळून आलं की कामिनी कायकर आणि आणि निर्मला बुरे या दोन महिला कर्मचारी शाळेमध्ये कार्यरत आहेत. या दोन्ही सेविकांवर मुलांना शौचास नेण्याची जबाबदारी होती. त्या दोघी चौकशीसाठी आल्या नाहीत. त्यांना काही सांगायचं नाही असं गृहीत धरून पुढील कारवाईसाठी प्रकरण पाठवले आहे. त्या दोघी असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे दोघींना सह आरोपी करण्यास सांगितलं आहे. ” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

या प्रकरणाबाबत पुढे बोलताना केसरकर यांनी सांगितले की, “आम्ही सध्या फक्त वस्तुस्थिती तपासत आहोत. पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. पीडित मुलीला दहा लाखांची मदत केली जाईल. ज्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला तिला तीन लाखांची मदत मिळणार आहे. दोन्ही मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी आम्ही घेऊ त्यासाठी लागणारे आर्थिक मदत दर महिन्याला धनादेशाच्या माध्यमातून देऊ. मुलीची ओळख उघड होणार नाही याची काळजी घेऊन दोन्ही मुलींना आम्ही मदत करू” अशी घोषणा देखील केसरकर यांनी केली.

शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब

बदलापूर प्रकरणांमध्ये मागील पंधरा दिवसांचे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहे. शिक्षण विभागाच्या समितीने केलेल्या चौकशीत हे समोर आलं असून शाळेच्या पदाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती होती. पण त्यांनी काहीही कारवाई केली नाही. प्रत्यक्षात सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. संबंधित शाळेचे पंधरा दिवसांचे फुटेज रेकॉर्डिंग गायब आहे. त्याची आता चौकशी करत आहोत. मुलींच्या कुटुंबीयांची लवकरच आम्ही भेट घेणार आहोत अशीही माहिती केसरकर यांनी दिली.

MSRTC Yavatmal Bharti 2024| ST महामंडळात 78 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

MSRTC Yavatmal Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024 | विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि नवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत (MSRTC Yavatmal Bharti 2024) एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला आणि पुरुष या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 78 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | MSRTC Yavatmal Bharti 2024

या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला आणि पुरुष वर्गाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 78 रिक्त जागा आहेत

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या पदावर भरती झाल्यावर उमेदवाराला यवतमाळ या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्जा पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

रिक्त पदे

  • लिपिक – 35 पदे
  • सहाय्यक – 20 पदे
  • शिपाई – 10 पदे
  • प्रभारक – 2 पदे
  • दुय्यम अभियंता – 2 पदे
  • वीजतंत्री स्थापत्य – 2 पदे
  • इमारत निरीक्षक – 3 पदे

अर्ज कसा करावा ? | MSRTC Yavatmal Bharti 2024

  • त्या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

जास्त सोशल मीडिया वापरणे बेतू शकते जीवावर; वाढते डोपामाईनची पातळी

Dopamine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा होत्या. परंतु आता त्यात मोबाईल हा एक मूलभूत गरजांपैकी एक झालेला आहे. आज काल देशातील प्रत्येक नागरिक हा मोबाईल वापरत असतो. आणि मोबाईलवर जास्त वेळ तर सोशल मीडियावर घालवत असतो. त्यामुळे लोकांच्या बौद्धिक पातळीत फरक जाणवायला लागलेला आहे. लोकांच्या शरीरात आजकाल डोपामाईन या हार्मोनची पातळी वाढत आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे डोपामाईन नक्की काय आहे? डोपामाईन (Dopamine) हे एक प्रकारचे रसायन आहे. जे आपले मेंदूमध्ये असतं. आपल्या आनंदी ठेवण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी हे रसायनिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु डोपामाईनचे जास्त प्रमाण हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते.

डोपामाईन म्हणजे काय ?

डोपामाईन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे. जे आपल्या मेंदूमध्ये असते हे रसायन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. त्यामुळे आपल्याला आनंद होतो सोशल मीडिया वापरल्याने व्हिडिओ गेम्स खेळल्याने व्यक्तीच्या मेंदूत हे डोपामाईन सक्रिय होते. त्यामुळे व्यक्तीला त्याच त्याच गोष्टी पुन्हा करूशी वाटतात. म्हणून जास्त लोकांनी डोपामाईन देखील धोकादायक असते.

आरोग्यासाठी हानिकारक डोपामाईन हे शरीरासाठी चांगले आहे. परंतु जर त्याचा अतिरेक झाले, तर ते शरीरासाठी हानिकारक होऊ शकते. तसेच तो मानसिक दृष्ट्या कमजोर देखील होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीचा व्यसनामुळे माणूस आपला स्वभाव गमावू शकतो तर चिडचिड करतो.

सोशल मीडियामुळे वाढते डोपामाईन प्रमाण

आज-काल सोशल मीडियावर लोक जास्त सक्रिय असतात. सोशल मीडिया वापरायला सगळ्यांनाच आवडते
त्यामुळे मेंदूमध्ये डोपामाईन हे हार्मोन सोडले जाते. डोपामाईन हे हार्मोन सोडल्यामुळे लोकांचा संयम देखील कमी होत चाललेला आहे. जगातील जवळपास 20 दशलक्ष लोक सोशल मीडियाच्या व्यसनाने ग्रस्त आहेत. हे टाळण्यासाठी अनेक लोक डोपामाईन डिटॉक्स देखील अवलंब करत आहे.

डोपामाइन डिटॉक्स कसे करावे

डोपामाइन हिटची निवड- लोकांना अशा क्रियाकलापांकडे लक्ष द्यावे लागते ज्यामुळे डोपामाइन लवकर बाहेर पडतात. सोशल मीडिया, तासनतास गेम खेळणे, जंक फूडचे सेवन करणे, अशा गोष्टींमुळे डोपामाइन लगेच बाहेर पडतात. त्यामुळेच डिटॉक्ससाठी या सर्व गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे.

मर्यादा सेट करा – जर तुम्ही पहिल्यांदाच डोपामाइन डिटॉक्स करत असाल, तर दिवसाच्या सुरुवातीला आणि झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास आधी डोपामाइन लवकर सोडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा.

कमी-डोपामाइन क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करा – डोपामाइन डिटॉक्ससाठी, आपण कमी डोपामाइन सोडणाऱ्या क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामध्ये पुस्तके वाचणे, ध्यानधारणा, बागकाम यासारख्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. असे केल्याने तुम्ही डोपामाइन देखील डिटॉक्स करू शकता.

मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांनी कापले 18 हजार चालान; 7 लाखांचा दंड वसूल

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे म्हणजे राज्यातील दोन महत्वाच्या शहरांना एकमेकांशी जोडणारा मार्ग आहे. या मार्गावरून दरोरोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या देखील अधिक असते. या एक्सप्रेस वे वरून दररोज साधारणतः 40,000 गाड्या ये जा करत असतात तर वीकेंडला हाच आकडा 60 हजारापर्यंत जातो. मात्र या मार्गावर अनेकदा नियम न पाळल्यामुळे अपघात देखील घडतात . जुलै महिन्यात या मार्गावर ITMS प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने मोठा दंड या मार्गावरून वसूल केला आहे.

7 लाख 50 हजारांचा दंड वसूल

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई -पुणे एक्सप्रेसवे वर गेल्या महिन्यात नव्याने सादर करण्यात आलेल्या ITMS म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लॉन्च झाल्यानंतर पहिलया पंधरा दिवसांतच वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 18 हजार 488 वाहनधारकांचे ई चलन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संयुक्त परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे. याद्वारे आतापर्यंत सात लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वेगनियंत्रणाच्या 90% केसेस

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी 19 जुलै रोजी ही प्रणाली सुरू केली होती. पहिल्या दोन आठवड्यात जवळपास 90% केसेस या गाडी वेगात चालवल्याबद्दल. चार टक्के लेन कटिंग साठी आणि बाकीच्या इतर गुन्ह्यांसाठी जसे की सीट बेल्ट न लावण्याबद्दल महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग इत्यादीसाठी करण्यात आला आहे. या ITMS प्रणालीमुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरील वेगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.