Sunday, December 21, 2025
Home Blog Page 503

श्रेयश अय्यरची नारायण स्टाईल बॉलिंग; Video पाहून म्हणाल क्या बात है!!

Shreyash Iyyer narine style bowling

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुची बाबू टूर्नामेंटमध्ये TNCA XI विरुद्ध मुंबईच्या श्रेयश अय्यरने (Shreyas Iyer) नारायण स्टाईल (Sunil Narine Style Bowling) गोलंदाजी केली आहे. ज्याप्रमाणे सुनील नारायण गोलंदाजी करतो अगदी त्याचप्रमाणे हुबेहूब ऍक्शनने गोलंदाजी करत श्रेयश अय्यरने सर्वानाच आश्चर्यचकित केलं. भलेही श्रेयसला विकेट घेण्यात यश मिळालं नसेल परंतु त्यांची बॉलिंग स्टाईल चर्चेत आली. सोशल मीडियावर श्रेयशच्या या बॉलिंग ऍक्शनचा विडिओ जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यानी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

खरं तर जेव्हापासून गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे तेव्हापासून टीम इंडिया मधील फलंदाज सुद्धा गोलंदाजी करताना आपल्या पाहायला मिळाले. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगने गोलंदाजी करत आपले हात साफ केले. त्याचप्रमाणे आता बुची बाबू टूर्नामेंटमध्ये मुंबईकर श्रेयश अय्यरनेही गोलंदाजी करत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. खास बाब म्हणजे श्रेयशची गोलंदाजी स्टाईल सुनील नारायणचाय स्टाईल सारखी होती. श्रेयश अय्यर आणि सुनील नारायण अनेक वर्ष कोलकाता नाईट रायडर्स कडून आयपीएल खेळतात. त्यामुळे नारायणनेच तर अय्यरला आपली स्टाईल शिकवली नाही का असं प्रश्न पडतोय.

TNCA XI विरुद्धच्या पहिल्या डावात मुंबईचा संघ विकेट मिळवण्यासाठी झगडत होता. त्यावेळी श्रेयश अय्यर गोलंदाजीला आलो. मात्र तो श्रेयश अय्यर आहे कि सुनील नारायण असा प्रश्न पडला, कारण नारायण जसा पाठीमागे हात ठेवतो, तसाच अय्यरही हात मागे ठेवताना दिसला, जेणेकरून फलंदाजाला तो कोणता चेंडू टाकणार आहे हे कळू नये. नारायणची हुबेहूब नक्कल अय्यरला जमली. श्रेयश अय्यरने हे एकमेव षटक टाकलं, यामध्ये त्याने 7 धावा दिल्या.

Y Chromosome In Male | पृथ्वीवरून पुरुषांचे अस्तित्व कायमचे नष्ट होणार? Y गुणसूत्र होणार लुप्त

Y Chromosome In Male

Y Chromosome In Male | एखादी महिला गरोदर असल्यावर आपल्या भारतामध्ये तिला मुलगी होणार की मुलगा होणार? याबाबत अनेक अंदाज लावले जातात. अनेक वेळा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून मुलगी होणार की मुलगा होणार हे सांगितले जाते. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर त्या स्त्रीला मुलगा होणार की मुलगी होणार हे त्या पालकांवर अवलंबून असते. स्त्रियांमध्ये XX ही गुणसूत्र असतात. तर पुरुषांमध्ये XY ही गुणसूत्र असतात. जेव्हा पुरुषांकडून X गुणसूत्र येते. तेव्हा स्त्रीचे X आणि पुरुषाचे X असे XX मिळून मुलीचा जन्म होतो. आणि जेव्हा पुरुषाकडून Y हे गुणसूत्र येते तेव्हा X आणि Y हे मिळून च2 मुलाचा जन्म होतो. म्हणजे तुम्हाला मुलगा पाहिजे असेल तर त्यासाठी पुरुषाकडून Y गुणसूत्र येणे खूप गरजेचे असते. परंतु एका अभ्यासात असे आढळून आलेले आहे की, भविष्यात हे Y गुणसूत्र नष्ट होण्याची भीती आहे. आणि शास्त्रज्ञांनी याबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे. जर भविष्यात जाऊन Y हे गुणसूत्र नष्ट झाले. तर मुलांचा जन्म होणार नाही. फक्त मुलींचा जन्म होईल. असा धोका एका संशोधनात व्यक्त करण्यात आलेला आहे.

Y गुणसूत्रांची घसरण | Y Chromosome In Male

संशोधनात असे म्हटलेले आहे की मानवी Y क्रोमोसम हळूहळू आता कमी होत चाललेले आहे. आणि भविष्यात जाऊन ते पूर्णपणे नाहीसे होण्याची देखील शक्यता वर्तवलेली आहे. परंतु हे पूर्णपणे संपायला लाखो वर्ष लागतील. माणूस अजूनही Y गुणसूत्राला पर्यायी असा जनुक विकसित केलेला नाही. जर या Y क्रोमोझोमची घसरण झाली. तर पुढे जाऊन पृथ्वीवरील पुरुषांची जात नाहीशी होऊ शकते. परंतु एका शोधनिबंधामध्ये नवीन जनुक विकसित करण्याची देखील अशा निर्माण केलेली जाते. हे एक पर्यायी क्रोमोसम असणार आहे. परंतु हे विकसित करणे इतके सोपे नाही. त्यासाठी अनेक धोके देखील घ्यावे लागणार आहे.

Y गुणसूत्र मानवी लिंग ठरवते

पुरुषांमध्ये XY ही गुणसूत्र असतात. C गुणसूत्रामध्ये 900 जीन्स असतात. Y गुणसूत्रांमध्ये 55 जीन्स असतात. यामध्ये भरपूर नॉन कॉलिंग डीएनए देखील असतात. Y क्रोमोझोम हे एक असे जनुक आहे. जो महिलांच्या गर्भामध्ये पुरुषाचा विकास करण्यास सुरुवात करते. हे गर्भामध्ये पुरुष संप्रेरक तयार करते आणि त्या बाळाचा एक मुलगा म्हणून विकास होण्यास सुरुवात होते.

परंतु आता वाय आणि एक्स गुणसूत्रामधील विषमता वाढत असल्याचे समोर आलेली आहे. गेल्या 166 दशलक्ष वर्षांमध्ये Y गुणसूत्राने 900 – 55 सक्रिय जीन्स गमावलेले आहे. यामध्ये दर दशलक्ष वर्षांमध्ये पाच जणूकांचे नुकसान होते. आता शेवटचे 55 शिल्लक आहेत आणि हे 55 संपण्यासाठी 11 दशलक्ष वर्ष लागतील. त्यामुळे Y क्रोमोझमबाबत आता शास्त्रज्ञ देखील चिंतेत आहेत.

दीपक केसरकरांना जोड्याने मारा; संजय राऊत संतापले

Deepak Kesarkar Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुतळा पडला ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल, वाईटातून काहीतरी चांगलं होईल असं बेताल विधान करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस जर खरे शिवभक्त असतील तर त्यांनी मंत्रालयासमोर केसरकारांना जोड्याने मारलं पाहिजे अशा शब्दात संजय राऊतांनी (Sanjay Raut) आपला राग व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, जर त्यांना वाटत असेल कि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बर झालं, त्यातून चांगलं होईल तर हे लोक अफजल खानाची औलाद आहे. ही माणसं मिंध्यांनी पोसली आहेत. हे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आम्ही तर म्हणतो बर झालं ही अशी घाणेरड्या मनोवृत्तीची माणसे आमच्यातून निघून गेली. हे सगळं देवेंद्र फडणवीस यांचे पाप आहे. मिंधे आणि त्यांच्या टोळीला पोसण्याचे पाप नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं. या लोकांनीच पैसे खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला असा थेट आरोप संजय राऊतांनी केला.

यावेळी संजय राऊतांनी नारायण राणे यांच्यावरही घणाघात केला. नारायण राणी यांनी पुतळा पडल्यानंतर विरोधकांवरच तोफ डागली होती. त्यावरून संजय राऊत यांनी म्हंटल कि, नारायण राणे या माणसाला वेड लागलं आहे. नारायण राणे तुम्ही खासदार आहात, मराठी माणूस आहात, तुम्ही तरी विचार करा.. तुम्ही कोणाची बाजू घेताय? हे जर इतर कोणत्या राज्यात झालं असत तर यांची पोर रस्त्यावर नागडी नाचली असती. पण आज त्यांच्या राज्यामध्ये छत्रपतींचा पुतळा बनवताना आज जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्याविरोधात स्थानिक खासदार म्हणून तुम्ही सरकार विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे, तुम्ही या सरकारचा धिक्कार केला पाहिजे. या पुतळ्याच्या कामात सर्वानी पैसे खाल्ले आहेत. कॉन्ट्रॅक्टर फरार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला विचारा कि शिवरायांचा पुतळा बनवणारा आपटे कुठे आहे असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांच्या वर्चस्वला धक्का बसण्याची शक्यता

shirdi vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विरोधक एकवटले… थोरातांच्या नेतृत्वाखाली राजकारण शिजलं… आणि सुजय विखे पाटलांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा दणका बसला… हा निकाल सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आणि प्रस्थापितांच्या विरोधात जाणारा होता… त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे की विखे पाटलांच्या पुत्राचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडणार याकडे… सलग सात टर्म शिर्डीवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील हे मुलाच्या पराभवानंतर आपला शिर्डीचा बालेकिल्ला तरी वाचवू शकतील का? विरोधकांनी लोकसभेला जशी एकजूट दाखवली अगदी तशीच विधानसभेलाही दाखवत शिर्डीचा पारंपारिक मतदारसंघही विखे पाटलांच्या हातातून हिसकावून घेतला जाईल का? शिर्डी विधानसभेला विखे पाटलांना भिडण्याची धमक नेमकी कोणत्या भिडुत आहे? त्याचंच हे सविस्तर विश्लेषण…

विठ्ठल सहकारी साखर कारखाना… महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना काढून कारखानदारीची सुरुवात ज्यांनी केली ते विठ्ठलराव विखे पाटील… अहमदनगर जिल्ह्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील एक मोठं प्रस्थ… विठ्ठलराव यांच्यानंतर राधाकृष्ण आणि आता सुजय विखे पाटील ही पितापुत्रांची जोडगोळी सध्या जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा ठेवून आहेत… प्रवरानगर सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर सुरू झालेला संस्थात्मक राजकारणाचा प्रवास यामुळे शिर्डीत फक्त आणि फक्त विखे असं आगळे वेगळे समीकरण बनवून गेलं…राधाकृष्ण विखे पाटील हे सलग सात टर्म या मतदारसंघात आमदार असून त्यांना आव्हान देणं हे अद्याप कुठल्याच पक्षाच्या नेत्याला जमलेलं नाही हे वास्तव आहे… असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांचा प्रभाव काहीसा ओसरल्याचं चित्र पहायला मिळालं… त्यांच्या हक्काचं मतदान असलेल्या शिर्डी लोकसभेत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा दारुण पराभव झाला… शिवाय राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनासुद्धा निलेश लंके यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला…

थोडक्यात काय तर विखे पिता पुत्रांसाठी हा राजकीय पडझडीचा काळ आहे… लोकसभेतील विजयबाबत ओव्हर कॉन्फिडन्स असतानाही नगर मधून पहिल्याच पराभवाला विखेंना तोंड द्यावं लागलं… अर्थात हा झटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही राधाकृष्ण विखे पाटलांचा मॉरल डाऊन करणार असेल, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको… 2009 आणि 2014 ला शिवसेनेच्या राजेंद्र पिपाडा आणि अभय शेळके यांना पुरून उरत राधाकृष्ण विखे पाटील आमदार झाले… मात्र 2019 च्या निवडणुकीआधीच विखे पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपची वाट धरली. थेट विरोधी पक्षनेता सत्तेत जाऊन बसल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्या… खरंतर आघाडीच्या काळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार हा विखे पाटलांना देऊनही त्यांनी पक्ष बदलल्यानं त्यांचा समर्थक वर्ग गोंधळात होता… मात्र चिन्ह बदलूनही भाजपच्या तिकिटावर काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा तब्बल 69 हजारांच्या लीडने दारून पराभव केला… यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर विखे पाटलांच्या खांद्यावर महसूल खात्याचा कारभार देण्यात आला, यावरून त्यांचा राज्याच्या राजकारणातील स्पेसही आपल्या लक्षात येऊ शकतो…

विखेंनी पक्ष बदलो… भूमिका बदलो.. तरीही एक हक्काची निर्णायक व्होट बँक ही कायम त्यांच्यासोबत असतेच… विखे पाटील हाच आमचा पक्ष अशी त्यांची राजकीय धारणा असल्याचं आढळून येतं… कारण संस्थात्मक राजकारणात जिल्ह्यात विखे पाटलांची बरोबरी कोणीच करू शकत नाही… विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखाना, मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्था, प्रवरा बॅंक, प्रवरा फळे व भाजीपाला उत्पादक संस्था, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा ग्रामीण नैसर्गिक-सामाजिक अध्ययन संस्था, साईबाबा संस्थान आदींच्या विविध पदांवर काम करताना उल्लेखनीय काम केलेलंय… रशिया, चिन, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स, अशा अनेक देशांचे दाैरे करून शेतकऱ्यांसाठी, नवीन शिक्षणाबाबत अनेक तंत्रज्ञान आणले. राज्याचे कृषी व पणनमंत्री असताना त्यांनी केलेली कामे राज्याच्या स्मरणात आहेत… काॅंग्रेसमध्ये असताना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद त्यांना मिळाले. या काळात त्यांनी भाजपवर अनेक प्रश्नांवर टीका केली. परंतु ती अत्यंत अभ्यासूपणे मांडली. केवळ आक्रमक न होता, त्यात अभ्यासूपणा दिसून येत होता… प्रशासन आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने शिर्डीची जनता त्यांच्या बाजूने नेहमीच आनंदाने कौल देत आलीय…

पण 2024 उजाडताना बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत… नगरच्या राजकारणात नवनवीन सत्ताकेंद्र तयार होताना विखे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणाला एका मागून एक धक्के लागत गेले… विखे पाटील हे सर्व समावेशक राजकीय चेहरा असले तरी त्यांच्या विरोधकांच्या सातत्याने वाढ होत गेली… याचेच परिणाम लोकसभा निवडणुकीला पराभूत होऊन विखे पाटलांना भोगावे लागले आहेत… आता लोकसभेनंतर विधानसभेलाही राधाकृष्ण विखे पाटलांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखवण्याचा निर्णय घेतलाय… आणि त्यांचं नेतृत्व बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचं एकूणच शिर्डीचं सध्या चित्र आहे… शिर्डी विधानसभा मतदारसंघातूनच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विखे पाटील यांच्या उमेदवारीला जोराचा विरोध केला जातोय… राजेंद्र पिपाडा हे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत.. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची तशी मागणी देखील केली आहे… विखे पाटलांच्या विरोधात मतदारसंघात वातावरण आहे… त्यामुळे भाजपची हातची जागा वाया जाईल, असं म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी केलीये… शिर्डी विधानसभा मतदारसंघाची रचना पाहिल्यास संगमनेर, राहता, कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील गाव एकत्रित येऊन हा मतदारसंघ तयार झालाय… या तालुक्यात राजकीय वर्चस्वांचे वेगवेगळे चेहरे आहेत…

यातले बहुतांश राजकारणी, गट हे विखे पाटलांच्या विरोधात गेल्याचं सध्याचे चित्र आहे… त्यात कोपरगावमधील स्नेहलता कोल्हे विरुद्ध विखे पाटील यांच्यातील वैर साऱ्या जिल्ह्यास ठाऊक आहे… त्यामुळे सर्वांनी एकत्रित विखे पाटलांच्या विरोधात प्रयत्न केले तर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल काहीसा वेगळ्या वळणावर गेल्याच आपल्याला दिसू शकतं… लोकसभेला झालेली पिछाडी, विरोधकांची एकी आणि सत्ताधारी गटाच्या विरोधात तयार झालेले सहानुभूतीच वार हे सगळं जोडून पाहिलं तर प्रत्येक टर्मला शिर्डीमधून विखे पाटील ज्या भल्या मोठ्या लीडने निवडून यायचे… अशी परिस्थिती यंदा न राहता निकाल कट टू कट लागेल, एवढं मात्र निश्चित…

मराठा माळी धनगर ही जातीय समीकरणे शिर्डी विधानसभेत निर्णायक ठरतात… लोकसभेला या जातींचा सपोर्ट महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्याने… आणि जरांगे फॅक्टरनं मराठा समाजाचं सोशल इंजिनिअरिंग केल्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाल्याचं बघायला मिळालं… त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिली तर विखे पाटलांना यंदा निवडून येण्यासाठी थोडी ओढाताण करावी लागणारय… पण विखे पाटलांच्या संस्थात्मक राजकारणापुढे आव्हान देणं आणि तेही शिर्डी विधानसभा मतदारसंघातून… हे वाटतं तितकं सोपं नाहीये… त्यामुळे लोकसभेप्रमाणे विखे पाटलांचा आता विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी विरोधक काय खेळी करतात? कोणत्या चेहऱ्याला विखे पाटलांच्या विरोधात बळ देतात? बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव शिर्डी विधानसभेवर पाहायला मिळेल का? की भाजपच्या अंतर्गत गटबाजीतूनच राधाकृष्ण विखे पाटलांना पराभवाचा धक्का बसेल? तुमचा अंदाज काय सांगतो? शिर्डीचा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

महाराज, या चोरांना माफी नाही; सामनातून एकनाथ शिंदेंवर घणाघात

eknath shinde sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलयानंतर (shivaji maharaj statue fall down) राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे पुतळा पडला असा निष्कर्ष काढला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल असं म्हणत सामनातून शिंदेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

नरेंद्र मोदी व त्यांचे भंपक लोक भारताचे हिंदू राष्ट्र बनवायला निघाले आहेत, पण त्यांना सगळय़ांना मिळून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा धड बनवता आला नाही व सिंधुदुर्ग किल्ल्यावर भक्कमपणे उभारता आला नाही. फक्त आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडला आहे. महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन, बान शान कोसळून पडली. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता. तो इतक्या घिसाडघाईने उभा करू नका असे बजावण्यात आले होते, तरीही लोकसभा निवडणुकीचा हिशेब करून पुतळय़ाचे अनावरण केले गेले. तो पुतळा आज राहिलेला नाही, त्याचे छिन्नविच्छिन्न अवशेष पाहणे मराठी जनांच्या नशिबी आले. पंतप्रधानांनी 4 डिसेंबर 2023 रोजी पुतळ्याचे अनावरण केले तेव्हा शिवरायांच्या विचारांची महती त्यांनी सांगितली, पण शिवरायांना भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचा तिटकारा होता व असे गुन्हे करणाऱ्यांना त्यांच्या दरबारात माफी नव्हती. कडेलोट हीच त्यांची शिक्षा होती हे सांगायला मोदी विसरले.

मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, बेइमानी, व्यभिचारास मुक्त रान आहे व आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात हे जास्त आहे. अशा राज्यकर्त्यांनी उभारलेला शिवरायांचा पुतळाच कोसळून पडला. महाराष्ट्राच्या जनतेने यामागचा अर्थ आणि संकेत समजून घेतले पाहिजेत. पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते सर्व कोसळताना दिसत आहे. त्यांनी उभारलेले एअरपोर्ट, अनेक पूल, अयोध्येतील राममंदिर आणि गळू लागले. सत्तर वर्षातले हे पहिले पंतप्रधान आहेत, जे आपल्याच कार्यकाळात आपल्याच हाताने बनवलेल्या वास्तू कोसळताना पाहत आहेत. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळाच कोसळला. मुख्यमंत्री मिंधे म्हणतात, जोरदार वारा, समुद्राच्या बदलत्या हवामानामुळे पुतळा पडला. ते खोटे बोलत आहेत. बेफिकिरी, घाणेरडे राजकारण, ठाण्यातल्या लाडक्या ठेकेदारांना पुतळा उभारणीचे दिलेले काम व त्यात झालेली खाऊबाजी यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला.

शिवरायांनी बांधलेला किल्ले सिंधुदुर्ग 375 वर्षे भर समुद्रात हाच वादळवारा, लाटा सहन करीत उभा आहे. गिरगावच्या चौपाटीवर समुद्राच्या शेजारी लोकमान्य टिळकांचा पुतळा 1933 साली उभा केला. तो ठामपणे उभा आहे. 1957 साली किल्ले प्रतापगडावर पंतप्रधान पंडित नेहरूंनी शिवरायांच्या पुतळयाचे अनावरण केले तो पुतळाही जसाच्या तसा आहे, पण सिंधुदुर्गातील राजकोटावरील पुतळा आठ महिन्यांत कोसळला. याची जबाबदारी घेऊन सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची हकालपट्टी करायला हवी असं सामनातून म्हंटल आहे.

ठाण्याच्या जयदीप आपटे या तरुण शिल्पकाराने हा पुतळा बनवला. 28 फूट उंचीचा हा असा भव्य ब्रॉन्झचा पुतळा बनवण्यास साधारण तीन वर्षे लागतात, पण आपटे यांनी हा पुतळा फक्त सहा महिन्यांत बनवून सरकारच्या हवाली केला. दुसरे असे की, नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवलेली शिल्पे न निवडता आपटे यांनी स्वतःच बनवलेले एक शिल्प सरकारला सोपवले व त्याच्या मजबुतीची, सुरक्षेची कोणतीही शहानिशा न करता हे शिल्प सिंधुदुर्गातील राजकोटावर उभे केले गेले. या पुतळय़ाची अल्पावधीतच दुरवस्था झाली. ज्या 18 बोल्टच्या सहाय्याने पुतळा उभा केला ते 18 बोल्ट गंजले व पुतळाही विद्रूप झाला. तो पुतळा आता चौथऱ्यावरून कोसळून पडला व मुख्यमंत्री मिंधे हसत सांगत आहेत की, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळयास लागता कामा नयेत. तुमच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे. लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल. लक्षात ठेवा! असा इशारा ठाकरे गटाचे सामनातून दिला आहे.

Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मीर निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसचा आगीशी खेळ? खर्गेंचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Jammu Kashmir Elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर विधानसभा (Jammu Kashmir Elections) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ३ टप्यात याठिकाणी निवडणुका होणार असून काँग्रेस- भाजपसह काश्मीर मधील प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीत विजय मिळवायचाच असा चंग सर्वच पक्षांनी बांधला आहे. मात्र निवडणूक जिंकण्याच्या नादात काँग्रेस आगीशी खेळ तर खेळत नाही असा प्रश्न आता पडला आहे आणि त्याच कारण ठरतंय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharage) यांचं एक विधान…. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय हा पक्षाला उर्वरित देशावर ‘दावा’ करण्याचा मार्ग मोकळा करेल असं खर्गे यांनी म्हंटल.

हुकूमशाही प्रवृत्तींबद्दल काँग्रेस पक्ष टीकेचा धनी- Jammu Kashmir Elections

अनेक राजकीय विश्लेषकांच्या ते मल्लिकार्जुन खर्गे यांचे विधान काँग्रेसच्या ‘कॅप्चर’ मानसिकतेचे वर्णन करतात. ही अशी मानसिकता आहे ज्याने संपूर्ण इतिहासात सत्ता आणि शासनाकडे पक्षाचा दृष्टिकोन दर्शविला आहे. 1975 मध्ये आणीबाणी लादल्यापासून, जिथे लोकशाही संस्था गंभीरपणे कमकुवत झाल्या होत्या, ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सत्तेच्या केंद्रीकरणापर्यंत अनेकदा हुकूमशाही प्रवृत्तींबद्दल काँग्रेस पक्ष टीकेचा धनी बनला होता. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 आणि कलम 35A लागू करणे हे काँग्रेसचे टीकाकार याचे उदाहरण मानतात. राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या या कलमांकडे काँग्रेसच्या काही व्होट बँकांना खूश करण्यासाठी हा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवण्याचे साधन म्हणून अनेकांनी पाहिले.अलिप्ततावाद आणि अतिरेक्यांना स्पष्टपणे प्रोत्साहन देत असतानाही हे कलम काढून टाकण्यास काँग्रेस पक्षाची अनिच्छा, अस्थिर क्षेत्रांवर नियंत्रण राखण्यासाठी अशा तरतुदींचा वापर करण्याच्या त्यांच्या व्यापक धोरणाचे प्रतिबिंबित करते.

खर्गे यांचं विधान वक्फ बोर्डाच्या कामकाजासह मिळतेजुळते आहे. मुस्लिम धार्मिक आणि धर्मादाय देणग्यांचे व्यवस्थापन करणारी वैधानिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वक्फ बोर्डावर अनेकदा धार्मिक अधिकाराच्या नावाखाली जमीन बळकावल्याचा आरोप केला जातो. ही प्रथा, ज्यामध्ये काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन आणि मालमत्ता बळकावण्याचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाच्या स्वतःच्या आणि त्यांच्या वोट बँकांच्या हितासाठी संसाधने आणि सत्ता बळकावण्याची व्यापक रणनीती प्रतिबिंबित करते. ज्याप्रमाणे वक्फ बोर्डाच्या कारभारावर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व नसल्याबद्दल टीका केली जाते, त्याचप्रमाणे पारदर्शकता नसल्यामुळे आणि निवडणूक जिंकण्यासाठी (Jammu Kashmir Elections) विशिष्ट समुदायांचेच भलं करण्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेकदा टीका केली जाते.

Cancer Symptoms | तरुणांमध्ये वाढलाय कर्करोगाचा धोका; सुरुवातीला ही लक्षणे दिसताच व्हा सावध

Cancer Symptoms

Cancer Symptoms | लोकांची जीवनशैली बदलल्याने आज काल अनेक आजार देखील बळावले आहेत. त्यातील कर्करोग हा एक अत्यंत मोठ्या प्रमाणात पसरणारा आजार आहे. आज-काल अगदी लहान मुलापासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेक प्रकारचे कर्करोग आपल्याला दिसून येतात. परंतु कर्करोग झाल्यावर आपण काहीच करू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केला, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या तर कर्करोगाचा धोका हा आपल्याला कमी करता येतो. कर्करोगाचा धोका कमी करणे याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुम्ही वेळेतच कर्करोगाची लक्षणे (Cancer Symptoms) ओळखणे गरजेचे आहे. जेव्हा कर्करोगाच्या पेशी आपल्या शरीरात तयार व्हायला सुरुवात होतात. त्यावेळी आपल्या शरीर आपल्याला वेळोवेळी वेगवेगळे संकेत देत असतात. त्याकडे आपण चुकूनही दुर्लक्ष करता कामा नये. अशी लक्षणे कोणती आहेत? आणि त्यापासून बचाव कसा करायचा? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसली? तर तुम्ही अजिबात दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

झपाट्याने वजन कमी होणे | Cancer Symptoms

वजन कमी होणे हे अत्यंत सामान्य लक्षण आहे. कर्करोगा व्यतिरिक्त इतर अनेक रोगांमध्ये देखील वजन कमी होते.परंतु जर एखाद्या व्यक्ती व्यवस्थित जेवण करत असेल. शारीरिक हालचाली देखील व्यवस्थित असेल तरीही त्याचे वजन झपाट्याने कमी होत असेल, तर ही एक चिंतेची बाब आहे. जर अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही नियमित शारीरिक हालचाली करा. त्याचप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

सतत थकवा आणि अशक्तपणा येणे

आपण जेव्हा शारीरिक हालचाली करतो काम करतो. तेव्हा आपल्याला थकवा येतच असतो. परंतु जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय अगदी बसल्याबसल्या देखील थकवा आणि अशक्तपणा येत असेल, तर हे कर्करोगाचे एक लक्षण आहे. अशावेळी तुम्हाला पुरेशी झोप मिळत आहे का? याची काळजी घ्या. तसेच चांगला आहार घ्या आणि हायड्रेट रहा. तरीही थकवा जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.

वारंवार संक्रमण | Cancer Symptoms

जर एखादा व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल दुसऱ्या कुठल्याही आजाराचा संसर्ग होत असेल. तर त्याची रोगप्रतिकार शक्ती कमवत देखील असू शकते. आणि हे ल्युकेमिया म्हणजेच कर्करोगाची लक्षणे असू शकते. वारंवार येणारा ताप अस्पष्ट जखमा किंवा रक्तस्त्राव यांकडे दुर्लक्ष करू नका. तर अशी लक्षणे दिसत असेल तर तुम्ही स्वच्छता, सकस आहार आणि लसीकरण या गोष्टींकडे लक्ष द्या.

सूज आणि गुठळ्या

तुम्हाला जर मान, बगल पोट किंवा कमरेच्या अवतीभोवती कोणत्याही कारणाशिवाय सूत जाणवत असेल, तर ते देखील कर्करोगाचे लक्षण असू शकते. या गुठळ्या वेदना रहीत असतात परंतु त्या कालांतराने हळूहळू वाढत जातात. अशा पद्धतीने जर तुम्हाला लक्षणे दिसत असेल, तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

सतत वेदना

तुमची हाडे किंवा सांधे सतत दुखत असेल, तर हा देखील एक कर्करोगाची सुरुवातीचे लक्षण आहे. जर तुम्हाला वारंवार अशा वेदना होत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यासाठी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार चाचण्या करून घ्या.

आशा सेविकांना मिळणार 10 लाख रुपये; सरकारचा मोठा निर्णय

Asha Workers And Group Promoters 10 LAKH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सर्व आशा सेविकांसाठी (Asha Workers) राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक (Asha Workers And Group Promoters) यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास 5 लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 1 एप्रिल 2024 पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे पाठविणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात. त्याच्या कामाचे हे स्वरूप पाहता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत आशा सेविकांना केली जाणार आहे.

यासाठी प्रतिवर्ष १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद कऱण्यात आली आहे. तसेच आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ७४ हजार आशा सेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक यांना लाभ होणार आहे. यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आशा सेविकांच्या मानधनात ५००० रुपयांची घसघशीत वाढ केली होती. आणखी १० लाख रुपयांचा विमा काढण्यात आल्याने आशा सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाशिकमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 10 ई बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल

राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या इलेकट्रीक बसेस धावत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात इ बसेस ची संख्या वाढल्यामुळे एस टी चा प्रवास अधिक सुखकर होऊ लागला आहे. २०२१ साली ठरवलेल्या धोरणानुसार राज्य परिवहन महामंडळातील किमान १५ टक्के गाड्या इलेक्ट्रिक प्रकारातील असतील असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यभरात आंलबजावणी करण्यात येत असून महामंडळामार्फत ५१५० इलेक्ट्रिक बस चालनात आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

यामध्ये नाशिकचा देखील समावेश असून पहिल्या टप्प्यात नाशिक विभागात१४ ई-बसेस नाशिक-बोरीवली, नाशिक-स.गड, नाशिक-त्र्यंबक व नाशिक-शिर्डी या मार्गावर चालनात आहे. तर दुस-या टप्प्यात १० ई-बसेस प्राप्त झाल्या आहे. उद्यापासून म्हणजेच २८ ऑगस्ट पासून या बसेस नाशिक-शिर्डी, नाशिक-सित्रर व नाशिक-त्र्यंबक मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सकाळी ५.०० ते सं. २२.०० वाजेपर्यंत दर एक तासाच्या वारंवारीतेने सदरच्या बसेस नाशिक-सित्रर / नाशिक-त्र्यंबक या नविन बसस्थानकावरुन (ठक्कर) व नाशिक-शिर्डी महामार्ग बसस्थानक येथुन सुरु होणार आहेत.

काय आहेत बसची वैशिष्टे ?

या बसची सेवा पर्यावरणपुरक असून त्यामुळे प्रदूषण होणार नाही.
सदर बस सेवेमध्ये ५ ते १० वर्षा पर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकीटाची सवलत अनुज्ञेय राहील.
सदर बस सेवेमध्ये महिला, अमृत जेष्ठ नागरीक, जेष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे साथीदार अर्जुन / द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी, विद्यमान तसेच माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांच्या विरपत्नी यांना सवलतीच्या दराने प्रवास अनुज्ञेय राहील. सदर पर्यावरणपुरक सेवेचा लाभ घ्यावा.

Get Rid Off Earthworms : पावसाळ्याच्या दिवसात घरात गोम, गांडूळ येतात ? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा

Get Rid Off Earthworms : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेक प्रकारचे कीटक घरामध्ये यायला सुरुवात होते. विशेषतः ओल असणाऱ्या, सिंक असणाऱ्या ठिकाणी तसेच बाथरूम मध्ये गांडूळ, गोम, गोगलगाय तुम्हाला आढळून येईल. हे प्राणी छोटे जरी असले तरी हे अत्यंत किळसवाणे वाटतात. शिवाय गोम कानात जाऊन आपल्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये हे कीटक तुमच्या घरापासून दूर घालवायचे असतील तर काय करावे याच्या ट्रिक्स जाणून (Get Rid Off Earthworms) घेऊयात…

बाथरूम स्वच्छ ठेवा

खरंतर गांडूळ हा बाथरूमच्या सिंक मधून येतो किंवा जर तुमचे बाथरूम काही ठिकाणी फुटले असेल किंवा त्याला चिरा पडल्या असतील, त्यातील फरशांना तडा गेला असेल तर अशा ठिकाणांमधून ते तुमच्या बाथरूम मध्ये प्रवेश करतात. याशिवाय जिथे साफसफाई नीट केली जात नाही बाथरूम चा उपयोग केल्यानंतर ते स्वच्छ केले जात नाही किंवा तिथे व्हॅक्यूम क्लिन ती जागा केली जात नाही (Get Rid Off Earthworms) तिथे हे कीटक येत असतात त्यामुळे तुमचा बाथरूम आधी स्वच्छ ठेवा.

रिफाइंड तेल

जर बाथरूमच्या किंवा सिंगच्या नळीतून सतत कीटक बाहेर येत असतील तर एक जाळी फिट करून घ्या. त्यानंतर काही दिवस बाजारात मिळणाऱ्या स्प्रेचा तुम्ही वापर करू शकता. शिवाय एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा आणि त्यात रिफाईंड तेल (Get Rid Off Earthworms) मिसळा त्यानंतर बाथरूमच्या कानाकोपऱ्यात जिथे कीटक येतात तिथे हा नियमित स्प्रे करा.

पेपर मेंट ऑइल स्प्रे (Get Rid Off Earthworms)

हा उपाय करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पेपर मेंट ऑइल घ्या. आता त्यामध्ये पाणी घाला आणि व्यवस्थित शेक करा. रात्री झोपण्याच्या आधी हे मिश्रण बाथरूमची पाईप, बेसिन सिंक आणि ज्या ठिकाणी हे कीटक येतात तिथे स्प्रे करा. हा उपाय नियमित केला तर घरात गांडूळ शिरणार नाही. शिवाय जर तुमच्याकडे पेपर मेंट ऑइल नसेल तर पुदिनाच्या सुकलेला पानांचाही तुम्ही वापर (Get Rid Off Earthworms) करू शकता.