Sunday, December 21, 2025
Home Blog Page 506

Credit Card Rules | क्रेडिट कार्ड युजर्ससाठी मोठी बातमी; 1 सप्टेंबरपासून होणार मोठे बदल

Credit Card Rules

Credit Card Rules | आजकाल क्रेडिट कार्डचा वापर अनेक लोक करत असतात. क्रेडिट कार्डचा वापर हा नेहमीच अनेक लोकांसाठी फायद्याचा ठरतो. कारण यातून त्यांना पाहिजे तेव्हा खर्च करता येतो. आणि यातून चांगले रिवार्ड देखील मिळतात. अशातच आता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे आता 1 सप्टेंबरपासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहे. ते म्हणजे आता एचडीएफसी बँकेच्या रीवार्ड पॉईंट्समध्ये मोठे बदल होणार आहे. या बदललेल्या नियमानुसार तुम्हाला दर महिन्याला फक्त दोन हजार रुपयांचे रीवार्ड पॉईंट्स मिळणार आहेत. यामुळे आता एचडीएफसी बँकेच्या ट्रान्सफरवर आधारित मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तुमच्या खर्चाचे श्रेणीमध्ये नियमन करणे आहे.

त्याचप्रमाणे निघालेल्या नवीन नियमानुसार आता एचडीएफसी बँक इतर कोणत्या रीवार्ड पॉईंट्स नाही जर तुम्ही केवळ एचडीएफसी बँकेचे ॲपवरून व्यवहार करत असाल, तर तुम्हाला रिपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे बँकेच्या ॲपवरून व्यवहार करण्यात प्रोत्साहन दिले जात आहे. आता एचडीएफसी बँक सोबतच आयडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या (Credit Card Rules) नियमांमध्ये देखील अनेक बदल होणार आहे. ती म्हणजे आता या क्रेडिट कार्डवरील किमान रक्कम कमी करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना पेमेंट करण्याचा कालावधी देखील कमी होऊ शकतो. तुम्हाला केवळ 18 ते 15 दिवसांच्या आतच हे पेमेंट करता येणार आहे.

तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या बँकेतर्फे कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्सद्वारे शैक्षणिक पेमेंट साठी एचडीएफसी बँक यापुढे रिमोट देणार नाही. 1 सप्टेंबर पासून हा मोठा बदल होणार आहे. इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी Rupay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पेमेंट सर्विस प्रोव्हायडरचे क्रेडिट वापरणाऱ्या ग्राहकांना रीवार्ड पॉईंट्स मिळणार आहे. अशाच जाता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देखील बँकांना रीवार्ड पॉईंट आणि रुपये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फायदा देण्याचे सांगितलेले आहे.

आपल्या देशात आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. अनेक बँकांतून क्रेडिट कार्ड कंपन्यातून मोफत कार्डच्या ऑफर देखील देतात. परंतु काही जण खरी माहिती देतात तर काहीजण खोटी माहिती देत असतात. अनेकजण सगळेजण क्रेडिट कार्डवर असलेल्या सवलत यांनी रीवार्ड बद्दल सांगतात. परंतु क्रेडिट कार्डवर कोणत्या प्रकारच्या चार्जेस लावले जातील याबद्दल कोणीही सांगत नाही.

Flipkart : सुरु झालाय फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक सेल ; केवळ 7 हजारांत विकत घ्या स्मार्ट फोन

Flipkart : आपल्याला माहितीच असेल की सध्या सण आणि उत्सवांचा काळ सुरू आहे. या काळामध्ये अनेक ई-कॉमर्स वेबसाईट जसं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा यांच्यावर सेल सुरू होतो. या सेल मध्ये अनेक वस्तूंच्या किमती ह्या घटतात त्यामुळे ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असते. यापूर्वी देखील स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सेल या दोन्ही वेबसाईटवर सुरू झाले होते. मात्र ती तुमची संधी चुकली असेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण आजपासून फ्लिपकार्ट चा इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट विक्री असणारा मोठा सेल सुरू (Flipkart) झाला आहे.

हा सेल दिनांक 28 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. या सेलमध्ये टॉप कंपन्यांचे उत्तम ऑफर्स असणारे स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये सॅमसंग,मोटोरोला, विवो अशा कंपन्यांचे जबरदस्त फोन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल तर ही संधी चुकू नका कारण यामध्ये तुम्हाला केवळ 6,999 रुपयांमध्ये मध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची (Flipkart) संधी आहे.

Motorola G 04 S (Flipkart)

या फोनची रॅम ही चार जीबी असून 64 जीबी इंटरनल स्टोरेज याला उपलब्ध आहे आणि याची किंमत 6999 रुपये आहे. तुम्ही हा फोन सेल मध्ये पाच टक्के कॅशबॅक सह खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन 247 रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआय वर देखील खरेदी करू शकता. हा फोन एक्सचेंज ऑफर मध्ये 5800 रुपयांच्या डिस्काऊंट सह खरेदी करता येऊ शकतो. डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी डिस्प्ले मिळतो. फोनचा प्राइमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आहे. तर या हा फोन unisock त 606 या प्रोसेस वर (Flipkart) काम करतो.

Samsung Galaxy m14 4G (Flipkart)

चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 8798 रुपयांच्या सेलमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन 5% कॅशबॅकसह खरेदी करू शकता. तुम्हाला फ्लिपकार्ट आणि ॲक्सिस बँक कार्ड द्वारे यासाठी पेमेंट करावे लागेल. डिस्काउंट ऑफर मध्ये हा फोन बाराशे रुपयांनी आणखी स्वस्त होऊ शकतो बँक ऑफर्स हा फोन तुम्हाला 778 रुपयांनी खरेदी करता येईल. या फोनचा ईएमआय 310 रुपयांपासून सुरू होतो तर या फोनमध्ये 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा आणि 6000 मेगा एंपियर ची बॅटरी देण्यात (Flipkart) आली आहे.

Vivo T3 Lite 5G

फ्लिपकार्टच्या सेल मध्ये चार जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत दहा हजार 499 रुपये इतकी आहे. सेलमध्ये हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड द्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक मिळेल. फोनचा ईएमआय ३७० रुपयांपासून सुरू होतो. तुम्ही हा फोन एक्सचेंज ऑफर मध्ये 8900 रुपयांपर्यंत खरेदी करू (Flipkart) शकता. फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा आणि डायमेन्शन 6300 प्रोसेसर पाहायला मिळेल.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठे अपडेट; उरलेल्या महिलांच्या खात्यात कधी येणार पैसे?

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | आपले राज्य सरकारने केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. त्यातही महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवण्यात आलेली आहेत. अशातच आता राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात देणार आहेत. जुलै महिन्यापासूनच या योजनेचा अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. अशातच ज्या महिलांनी 31 जुलै पूर्वी अर्ज केलेला आहे? त्यांची जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पैसे महिलांच्या खात्यात आलेले आहेत. दोन महिन्याचे तीन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे. आता सगळ्या महिलांना सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या हप्त्याचे उत्सुकता आहे. परंतु यात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी 31 जुलै पूर्वी अर्ज केलेला आहे. परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता या महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केलेले आहेत. त्या महिलांच्या खात्यात आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकूण 4500 रुपये पुढील महिन्यात त्यांच्या खात्यात जमा येणार आहेत. आता सरकारकडून याबद्दल एक मोठी पद्धत समोर आलेली आहे. ती म्हणजे 31 जुलै नंतर त्यांनी अर्ज केलेले आहे. त्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सुरू आहे. त्यांची मान्यता आल्यावर ही यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे. आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 3 महिन्याचे पैश महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) अर्जाची पडताळणी सातत्याने सुरू आहे. 31 जुलै पर्यंतच्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु 31 जुलै नंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे. त्यांची अर्जाची पडताळणी सुरू आहे. आता राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 7 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झालेले आहे. त्यातील जवळपास 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरलेले आहे. तर उर्वरित अर्जांची अजूनही पडताळणी चालू झालेली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात विखे पाटील पराभवाचा वचपा काढणार

Sangamner vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नगरच्या राजकारणातील दोन बडे प्रस्थ… एक विखे पाटील तर दुसरे बाळासाहेब थोरात… नगरमध्ये विखे पाटलांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला बाळासाहेब थोरात संगमनेर मधून आव्हान देतात… त्यामुळे संगमनेर हा जिल्ह्याच्या राजकारणातील सत्ता संतुलन करणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो… अनेकांनी प्रयत्न करून पाहिले… लढत दिली… पण संगमनेरमध्ये सलग आठ टर्म निवडून जात थोरातांनी विरोधकांना नावापुरतं देखील शिल्लक ठेवलं नाही… पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला सुजय विखेंचा पराभव झाल्यानंतर आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी आपला मोर्चा वळवलाय तो थोरातांच्या संगमनेरकडे… त्यामुळे एकमेकांच्या राजकारणात फारशी ढवळाढवळ न करणारे विखे विरुद्ध थोरात आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेरच्या जागेवरून एकमेकांना भिडण्याचे चान्सेस वाढलेत… त्यात बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांचा मतदारसंघातील वाढलेला वावर पाहता यंदा विखे आणि थोरात कुटुंबाची तिसरी पिढी देखील संगमनेर मध्ये एकमेकांच्या विरोधात लढत देऊ शकते… त्यामुळे संगमनेरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवून राज्याच्या राजकारणात प्रभाव पाडणाऱ्या थोरात यांचा मतदारसंघच यंदा धोक्यात आहे का? सुजय विखे पाटील लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वतः मैदानात उतरतील की विरोधी उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करतील? संगमनेरचा 2024 चा आमदार नेमका कोण होतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

अगदी मोदी लाट असूद्या किंवा लोकसभेला विरोधी बाजूनं लीड… विधानसभेला मात्र संगमनेरमध्ये फक्त आणि फक्त थोरात पॅटर्नच चालतो… तब्बल 40 वर्ष प्रतिनिधित्व करूनही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत थोरातांचं लीड कमी होण्याचे ऐवजी नेहमी वाढतच गेलं… अगदी मोदी लाट असतानाही 2014 ला तब्बल 60 हजारांचं लीड घेतलं होतं तर 2019 ला याच थोरातांनी नवा इतिहास रचत तब्बल 64 टक्के मतं पारड्यात घेत दणक्यात विजय मिळवला होता… शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा या निवडणुकीत दारून पराभव झाला… खरंतर 2019 लाच विखे पाटील पिता पुत्रांनी भाजपची वाट धरल्यानंतर विखेंनी थोरातांचा बालेकिल्ला पोखरण्याचं काम केलं होतं… शालिनीताई विखे पाटील यांना संगमनेरमधून भाजपच्या तिकिटावर उभी करण्याची खेळी विखेंनी केली देखील होती… जनसंपर्क कार्यालय तयार होऊन शालिनीताईंच्या प्रचाराला धारही आली होती… मात्र शिवसेनेने उमेदवारीसाठी आग्रह धरल्याने विखे पाटलांचा नाईलाज झाला… आणि त्यांनी दोन पावलं मागे घेत शिवसेनेला निवडणूक लढवू दिली…

पण आता नगरच्या लोकसभेत झटका बसल्यानंतर सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे… त्यात त्यांचा सर्वाधिक भर संगमनेर मतदारसंघाकडे असल्याने इथं सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात किंवा सुजय विखे विरुद्ध जयश्री थोरात अशी अटीतटीची लढत होऊ शकते… विखे पाटलांचा नगरच्या राजकारणावर दबदबा असला तरी थोरातांच्या संगमनेरमधील वर्चस्वाला आव्हान देणं, वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीय… संगमनेर मधल्या सहकाराच्या, संस्थात्मक उभारणीच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक नाड्या या झाडून थोरातांच्याच हातात आहेत… तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनेक ग्रामपंचायती तसंच स्थानिक संस्थांवर थोरातांचं वर्चस्व आहे… संगमनेर शहराला निळवंडे धरणातून केलेली पिण्याच्या पाण्याची थेट पाईप लाईन, शहरातील सर्वंच सहकारी संस्थांचा आदर्श आणि स्वच्छ कारभार, कार्यकर्त्यांची मजबूत फळी या बाळासाहेबांसाठी जमेच्या बाजू ठरतात… यासोबतच अमृतवाहिनी हॉस्पिटल, मेडिकल-फार्मसी कॉलेज, इंजिनीयरिंग कॉलेज आदींच्या माध्यमातून त्यांच्या अनेक लोकोपयोगी कार्यक्रम चालवले जातात. मतदारांना बांधून ठेवण्यात अमृतवाहिनी उपक्रमाचा वाटाही मोठा असतो….

अर्थात हे सगळं वन लाईन मध्ये पाहिलं तर थोरात हे आपल्या विरोधकांपेक्षा दस पटीने अधिक सरस ठरतात… पण प्रश्न जेव्हा थोरात विरुद्ध विखे पाटील असा येतो तेव्हा त्यांच्यातील संघर्षाचा इतिहासच बरच काही सांगून जातो… सुरुवातीला एकाच पक्षात असूनही विखे आणि थोरात यांच्यातला सुप्त संघर्ष सुरूच होता… पण दोघांनीही एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात कधीच ढवळढवळ केली नाही… मात्र सुजय विखेंच्या पराभवात थोरातांनी मोठी ताकद लावली होती… अशी चर्चा दबक्या आवाजात होत असते… म्हणूनच आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सुजय विखे यांनी आता थेट संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवण्याची इच्छा बोलून दाखवलीय… या सगळ्यात बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातही मतदारसंघात ऍक्टिव्ह झाल्या आहेत… संगमनेर युवा काँग्रेसचा पदभार यासोबतच मतदार संघातील त्यांचा वावर वाढल्याचही सध्या पाहायला मिळतय…त्यामुळे तब्बल चाळीस वर्षांच्या वर्चस्वानंतर बाळासाहेब थोरात आपला राजकीय वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्त करतील का? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात जलसंधारण, शिक्षण, कृषी, महसूलसारखी महत्त्वाची खाती भूषवली. त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठीही घेतलं जात होतं. त्यांचं पक्षात वेगळं स्थान आहे. संगमनेर थोरात यांच्या विरोधकांत कधीच एकवाक्यता राहिलेली नाही. त्याचा फायदा थोरातांना सातत्यानं मिळाला. इतर ठिकाणी घराणेशाहीविषयी लोकांच्या मनात तिडीक असते; परंतु संगमनेरमध्ये ती दिसत नाही. त्याचं कारण घराणेशाही असली, तरी थोरात यांची नातेवाइक मंडळी लोकशाही पद्धतीनं निवडून येत असतात. त्यांचं काम चोख असतं. त्यामुळं तर त्यांच्यावर जनता वारंवार विश्वास टाकते…. पण हेच सेट झालेलं पॉलिटिकल नरेटीव खोडून काढण्याची जणू शपथच विखे पाटील पिता पुत्रांनी घेतलीय… लोकसभेला थोरातांना मिळालेलं मायनस मधील लीड पाहता विधानसभा निवडणुकीत इथं विखे विरुद्ध थोरात अशीच लढत होईल, असं चित्र सध्यातरी दिसतंय… मात्र शिवसेना शिंदे गटाने हट्ट धरलाच तर 2019 सारखीच संगमनेरची आमदारकी कॉम्प्रमाईज करायची का? असा मोठा पेच विखेंपुढे असणार आहे…

महाविकास आघाडीच्या बाजूने असणारे वातावरण, थोरातांची सहकार – संस्थात्मक जाळ आणि राज्याच्या राजकारणावरची पकड हे सगळं पाहता इथं महायुतीला बाळासाहेब थोरातांच्या विजयाचा वारू अडवण, वाटतो तितका सोपा नाही… बाकी तुम्हाला काय वाटतं? विखे विरुद्ध थोरात या संघर्षाच्या दुसऱ्या अंकाची ठिणगी संगमनेरच्या विधानसभेला पडणार का? संगमनेरच्या विधानसभेला विखे विरुद्ध थोरात यांच्यातील दुसरी की तिसरी पिढी एकमेकांना लढत देईल? शिवसेनेने उमेदवारीसाठी हट्ट धरलाच तर विखे पाटील पिता-पुत्रांची भूमिका नेमकी काय राहील? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या 10 च्या घरात, पण आमदार ही महिला होतेय

shrigonda vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॅलो सलग सहा टर्म पक्ष बदलले मात्र श्रीगोंद्यात आमदारकीचा चेहरा एकच राहिला… तो म्हणजे बबनराव पाचपुते… तालुक्याच्या राजकारणात पाचपुते या नावाची क्रेझ वेगळीच होती… पण 2014 ला राष्ट्रवादीच्या राहुल जगतापांनी पाचपुतेंच्या विजयाचा वारू अडवला…याच पराभवाचे उट्टे पाचपुतेंनी 2019 ला काढले… आणि पाचपुते यांचा निसटत्या लिडने विजय झाला… यावरून श्रीगोंदा म्हटलं की फक्त पाचपुतेच! असं तालुक्याचं समीकरण बनून गेलं… पण 2024 ला परिस्थिती बदललीये… आजारपणामुळे पाचपुते यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झालाय… मात्र पत्नी प्रतिभाताई आणि चिरंजीव विक्रमसिंह सातपुते यांचा वावर बघता आमदारकी घरातच रहावी, असा त्यांचा हट्ट दिसतोय… दुसऱ्या बाजूला शिवाजीराव कर्डिलेंपासून ते छोट्या बड्या दहा प्रस्थापितांनी यंदा काहीही झालं तरी श्रीगोंद्याचे आमदार व्हायचंच, असा जणू मनाशी चंग बांधलाय… पण आकडेवारी बघितली तर श्रीगोंद्याला इतिहासात पहिल्यांदाच महिला आमदार मिळण्याचा चान्स या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आलाय… श्रीगोंद्याची विधानसभा निवडणुकीची हीच ती स्पेशल ए टू झेड कहानी…

आजारी असले तरी पाचपुते आपल्या राजकारणाची लेगसी पुढच्या पिढीकडे देण्यासाठी पत्नी किंवा मुलगा यांना मैदानात उतरवणार, हे सध्या तरी स्पष्ट दिसतय… पण या वेळेस गेल्या वेळेस सारखा एकटा – दुकटा नाही तर विरोधकांची मोठीच्या मोठी फळी निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे… मागीलवेळी अवघ्या चार- सहा हजार मतांनी विजयी झालेल्या पाचपुते यांच्यासमोर यावेळी आव्हान असणार आहे ते माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा राजेंद्र नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार ते थेट शिवाजीराव कर्डिलेंसारख्या प्रस्थापित नेत्याविरुद्ध…आता कर्डिलेंचं नाव या सगळ्या सीनमध्ये कसं आलं ते सांगतो, लोकसभेला पडल्यानंतर सुजय विखे पाटलांनी राहुरीतून लढण्यासाठी तयारी केल्यानं म्हणूनच कर्डिले सध्या श्रीगोंदा विधानसभेसाठी आग्रही आहेत…

नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटातील गावे या मतदारसंघात आहेत. या दोन गटांमधील गावांना गेल्या काही वर्षात सापत्न वागणूक मिळाली आणि त्याच मुद्यावर यावेळी ही गावे एकत्र आली आहेत आणि आपलाच माणूस आमदार करायचा अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळेच कर्डिले यांच्या नावाला इथं गांभीर्याने घ्यावं लागतं… त्यातही कर्डिलेंचा श्रीगोंदा तालुक्यात नातेवाईक आणि मित्र परिवाराचा मोठा गोतावळा आहे…. याशिवाय मांडवगण गटात अरुणकाका जगताप यांचा मोठा संपर्क आणि काम आहे… हे सगळं कर्डिलेंना प्लस मध्ये ठेवू शकत… पण ही यादी काही इथंच थांबत नाही यासोबतच यातलं पुढचं नाव येतं ते अनुराधा नागवडे यांचं. लोकसभेपूर्वी नागवडे कुटुंबाने काँग्रेस बायबाय करुन अजितदादांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळीच त्यांनी अजितदादांकडून विधानसभेचा शब्द घेतल्याचे बोलले जातेय. आता वळूयात राहुल जगताप यांच्याकडे.. पाचपुतेंना एकास एक फाईट द्यायची, म्हणून गेल्यावेळी राहुल जगतापांनी माघार घेतली होती. यावेळी ते लढण्याच्या मूडमध्ये आहेत. शरद पवार गटाकडून आपल्यालाच तिकीट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

इच्छुकांत पाचवं नाव येत, ठाकरे गटात गेलेल्या साजन पाचपुते यांचं… साजन यांनाही खा. संजय राऊत यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. तालुक्यात सहावे इच्छुक आहेत, गेल्यावेळी पाचपुतेंकडून फक्त साडेचार हजारांनी पराभूत झालेले घनश्याम शेलार… शेलार सध्या काँग्रेसमध्ये आहेत. मात्र काँग्रेसमध्ये जाताना त्यांनाही नाना पटोले यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. म्हणजेत श्रीगोंद्यात प्रत्येक पक्षाचा तगडा नेता, विधानसभेसाठी इच्छुक आहे. ..मात्र श्रीगोंदा तालुक्यात रंगत आलीय, ती दुसऱ्या फळीतील इच्छुकांमुळे…जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णा शेलार यांनीही काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुक लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी आपल्या मुलाला बेलवंडीचा सरपंच ऋषिकेश शेलार याला सोबत घेत तालुक्यात बैठकाही सुरु केल्या. ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून किंवा थेट अपक्ष लढण्याचीही त्यांची तयारी आहे. शेलारांशिवाय भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांनीही निवडणूक रिंगणात उतरणारच असं ठामपणे सांगितल्याने श्रीगोंद्याचा राजकीय तिढा आणखीनच वाढलाय… या सगळ्यात पाचपुतेही आपण माघार घेतली तर आपल्या जागेवर पत्नी किंवा मुलगा यांपैकी एकाला तिकीट मिळायला हवं यासाठी धडपड केली आहे… त्यामुळे तिकीट वाटपाच्या कार्यक्रमापासून ते प्रत्यक्ष निकालापर्यंत श्रीगोंदा ही महाराष्ट्रातील सर्वात अटीतटीची लढत ठरू शकते…

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत एकही महिला आमदार झालेली नाहीये… यंदा इच्छुकांच्या यादीत बहुतांश महिलांची नाव असल्याने दोन्ही बाजूंनी महिला उमेदवारी देण्यावर भर दिला जाऊ शकतो… भाजपकडूनच सुवर्णा पाचपुते यांनीही दंड थोपटलेत. त्यापूर्वी अनुराधा नागवडे यांनीही प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केलाय. एवढ्या सगळ्या महिला उभ्या राहणार असतील, तर सहाजिकच राहुल जगताप हेही आपल्या पत्नी डाँ. प्रणोती जगतापांना पुढे करु शकतात. म्हणजेच श्रीगोंद्यात पहिल्यांदा महिला आमदार होण्याची शक्यता वाढते….श्रीगोंदा विधानसभेसाठी भाजपकडून आणखीन एका नव्याकोऱ्या नावाची चर्चा मतदारसंघात होऊ लागलीय ते नाव म्हणजे राज देशमुख यांचं… राज देशमुख हे आर्थिक विश्लेषक असून चांगुलपणाची चळवळीच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात महाराष्ट्रात अग्रेसर असतात….. या सगळ्या वरून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांचा आकडा दोन डझन पार गेल्यामुळे कार्यकर्त्यांसह इच्छुकांचाही श्रीगोंद्याच्या राजकारणात पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय? याची कल्पना नाहीये… पण गटातटाच्या राजकारणाला शह देत, राजकीय गोळा बेरीज करण्यावर भर देऊन सहानुभूतीच्या फॅक्टरवर जो स्वर होईल, त्याला इथून जिंकण्याचे चान्सेस सध्या तरी जास्त आहेत…

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निकालाच्या आकडेवारीवर एक वार नजर टाकली तर श्रीगोंदा विधानसभेमुळेच निलेश लंके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, ही वस्तुस्थिती आहे… श्रीगोंद्यांनं महाविकास आघाडीच्या म्हणजेच लंकेच्या पारड्यात तब्बल 32 हजारांचं लीड टाकलंय… त्यामुळे इथं महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार होणार, हे तर कन्फर्म आहे… पण तो आमदारकीचा चेहरा कोण? यासंदर्भात आत्ताच स्पष्टपणे बोलता येणार नाही…स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकही श्रीगोंद्याला यंदा महिला आमदार मिळेल, असं सूचक विधान करत असतात… त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी पहिली आमदार महिला होण्याचा मान नेमका कुणाला मिळतोय? की येणाऱ्या काही दिवसात श्रीगोंदा तालुक्यासमोर काही नव राजकारण वाढून ठेवलय का? तेही येणाऱ्या काळात स्पष्ट होईल…बाकी तुम्हाला काय वाटतं? प्रस्थापितांना डावलून श्रीगोंदा मध्ये पहिल्यांदाच नवा कोरा चेहरा आमदार म्हणून निवडून येईल का? श्रीगोंदा मध्ये एका महिलेच्या कपाळाला आमदारकीचा गुलाल लागेल का? आणि लागलाच तर ती महिला उमेदवार नेमकी कोण असेल? तुमचा अंदाज मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

कंगणाची शेतकरी आंदोलनावर टीका, भाजपचा मात्र No Support; पक्षाने झटकले हात

bjp on kangana statement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपची खासदार कंगना राणावतने (Kangana Ranaut) केला होता. तिच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं तसेच विरोधकांनी सुद्धा समाचार घेतला. यानंतर आता भाजपने कंगनाच्या विधानावर आपले हात झटकले आहेत. कंगना राणावत जे काही बोलल्या त्याला पक्ष म्हणून भाजपचे समर्थन नाही असं भूमिका पक्षाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र सुद्धा भाजपने प्रसिद्ध केलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या (Bhartiy Janata Party) केंद्रीय माध्यम विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात म्हंटल आहे कि, भाजप खासदार कंगना राणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणौत यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाकडून असहमती व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाच्या वतीने, कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही. आता थेट भाजपनेच कंगनाच्या विधानानंतर हात वर केल्यानंतर आता ती काय प्रतिक्रिया देते ते पाहायला हवं. कंगना तिचे विधान मागे घेते कि आपल्या विधानावर ठाम राहते ते आता पाहायला हवं.

कंगना काय म्हणाली होती?

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत धक्कादायक विधान केलं होते. मागच्या वर्षीच्या शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी अनेक बलात्कार झालेत, हत्यादेखील झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या. आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार सुरु होता, अनेकांवर त्यावेळी बलात्कार झाले तसेच अनेकांच्या हत्याही करण्यात आल्या होत्या असा आरोप कंगणा राणावतने केला होता.

MUCBF Recruitment 2024 | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेत नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

MUCBF Recruitment 2024

MUCBF Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ज्या लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत (MUCBF Recruitment 2024) एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती बाबतचे अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी झालेले आहे. या भरती अंतर्गत ज्युनिअर क्लर्कच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 7 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला अर्ज भरताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.

पदाचे नाव | MUCBF Recruitment 2024

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनिअर क्लर्क चरित्र जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त जागा

कनिष्ठ लिपिक या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा आहेत. आणि त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 22 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

परीक्षा शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 1 हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत असेच 18 रुपयाची एसटी देखील भरावा लागणार आहे.

मासिक पगार

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना दर महिना 20 हजार 760 रुपये एवढा पगार मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | MUCBF Recruitment 2024

7 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंके आमदारकी कॉम्प्रमाईज करणार?

parner vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अघळ पघळ, साधासुधा, अस्सल गावरान, मनान कोरा पण डोक्याने भल्या भल्यांचा गेम करणारा कार्यकर्ता ते डायरेक्ट विखे पाटलांसारख्या जिल्ह्यातल्या बड्या राजकारणाला पराभवाचं पाणी पाजून खासदार झालेला अवलिया म्हणजे निलेश लंके… पहिल्याच टर्मला आमदार आणि खासदार झालेला निलेश लंकेंचा प्रवास जणू स्वप्नवत वाटावा असा… पण लोकसभा झाली नाही तोच पारनेरमधून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आमदार होणार, अशी पोस्टर बॅनर आणि सोशल मीडिया पोस्ट वायरल होऊ लागल्या… शेवटी कार्यकर्ताच तो… पण यामुळे झालं असं की शिवसेनेची मशाल दुखावली… खासदारकीच्या बदल्यात आमदारकी कॉम्प्रमाईज करणार असल्याचा शब्द लंकेंनी आधीच दिला असल्याचं बोललं जातं… त्यामुळे काळजावर दगड ठेवून निलेश लंके आपला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार? की शरद पवारांच्या मदतीनं राणीताईंना विधिमंडळात पाठवणार? या सगळ्यात नगर मधील बिग बी विखे पाटील नेमकं कुणाच्या पारड्यात वजन टाकणार? येणाऱ्या विधानसभेला पारनेरचा आमदार कोण होतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

अहमदनगरमधला पारनेर हा तसा शिवसेनेचा स्ट्रॉंग बालेकिल्ला… इथं अनेकांनी प्रयत्न केले पण शिवसेनेचा भगवा पारनेर मधून कधीच खाली सरकला नाही… शिवसेनेच्या विजय औटी यांनी तर पारनेरचा पर्मनंट आमदार अशी जणू स्वतःची आगळीवेगळी ओळख तयार करत सलग तीन टर्म… पंधरा वर्ष… मतदार संघावर आपला दबदबा कायम ठेवला… राष्ट्रवादीच्या सुजित झावरे यांनी औटी यांना सलग दोनदा आव्हान देण्याचा प्रयत्न केला… पण गुलाल लागला तो औटी यांनाच… पण पारनेरच्या राजकारणात खऱ्या अर्थाने ट्विस्ट आला तो 2018 साली…

2018 ला उद्धव ठाकरेंच्या पारनेरच्या सभेत गोंधळ झाला अन् स्थितीच बदलली. या गोंधळाचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडून शिवसेनेने लंकेंची पक्षातून हाकालपट्टी केली… पण ही एक गोष्ट आपल्या राजकारणाला किती लांबवर घेऊन जाईल याची लंकेंनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसावी… लंके यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आणि ज्या पक्षात राजकारणाची बाराखडी गिरवली त्याच शिवसेनेच्या विजय औटी यांच्या साम्राज्याला धूळ चारत आमदारकी पटकावली… साधासुधा कार्यकर्ता पारनेरचा आमदार झाला… यानंतर कोरोना काळात केलेली कामे, जनतेत मिळून मिसळून राहण्याची त्यांची सवय, वायरल होणारे फोटो यामुळे पहिल्याच टर्मला आमदार निलेश लंके यांचं नाव पुऱ्या महाराष्ट्रात जाऊन पोहोचलं… हे कमी होतं की काय म्हणून राष्ट्रवादीत फूट पडणे… संधी साधून घड्याळ बाजूला सारून पॉलिटिक्स मधलं टाइमिंग साधत तूतरी हाती घेणं… आणि जिल्ह्यातले बिग बी आणि बडे प्रस्थ समजल्या जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांना दणका देत थेट दिल्ली गाठली…

निलेश लंके यांच्या विजयाची गुंगी अजून उतरली नसेल तोच आता आमदारकीचं मैदान काही दिवसांवर येऊन ठेपलय… पण अगदी लोकसभेच्या प्रचारातच विधानसभेसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा प्रचार सूक्तपणे चालू होता, असं चित्र मतदारसंघात होतं… लंकेचे कार्यकर्तेही यंदा आमदार वहिनीसाहेबच! असं म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष राणी लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला… पण लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच काही दिवसात उद्धव ठाकरेंनी पारनेरमध्ये केलेल्या हालचाली – मतदारसंघात मशाल पेटवण्याची केलेली भाषा अन् पारनेरमध्ये ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या तीव्र भावना लक्षात घेता पारनेर मतदारसंघ थोड्या ना खुशीने का होईना पण ठाकरे गटाला सोडण्याची वेळ निलेश लंकेंवर येऊन ठेपलीये…खरं म्हणजे पारनेर मतदार संघातील शिवसेनेच्या ताकदीला नाकारून चालणार नाही… ठाकरे गटाने प्रामाणिकपणे काम केलं म्हणूनच पारनेर मतदारसंघातून निलेश लंके यांना तब्बल 38 हजारांचं निर्णायक लीड मिळालं… यात शिवसेनेच्या ताकतीकडे कानाडोळा करून चालणार नाही… मुळात पारनेरची जागा ठाकरे गटासाठी सोडण्याच्या अटीवरच लंकेंना नगरची उमेदवारी मिळाली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते… हे जर खर असेल तर लोकसभेच्या मदतीची परतफेड पारनेर मतदारसंघ कॉम्प्रोमाइज करून येणार आहे…

सध्याचं वातावरण बघितलं तर लोकसभेला मिळालेला यश – पारनेर मधून मिळालेलं घवघवीत लीड हे सगळं पाहिलं तर महाविकास आघाडी पारनेरची जागा आरामात जिंकतेय, असं म्हणायला हरकत नाही… पण इथेच एक अडचण आहे आणि ती म्हणजे इच्छुक उमेदवारांची… शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी काहीही झालं तरी यंदा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे… त्यामुळे तिकीट वाटपाचा कार्यक्रम सामोपचाराने नीट सोडवता आला नाही, तर बंडखोरी होऊन याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो… महायुतीत ही जागा राष्ट्रवादीची असल्याने अजितदादा गटाकडून बाजार समितीचे माजी अध्यक्ष – जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, सुजित झावरे, काशिनाथ दाते हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत… भाजपकडूनही प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात ही नाव उमेदवारीसाठी फ्रंटला आहेत…

पण सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाकडून श्रीकांत पठारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आतल्या गोटातून येतेय… यामागच कारण असं की, नीलेश लंके यांना खासदार करण्यामागे पारनेरमधील ठाकरे गटानं जीवाचं रान केलं होतं… यात श्रीकांत पठारे यांनी महाविकास आघाडीकडून एकहाती पारनेर तालुका सांभाळला… पण दुसऱ्या बाजूला महायुतीकडून कोण? याचं उत्तर याक्षणी तरी देता येत नाही… त्यामुळे पारनेरचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल? यावर आत्ताच भाष्य करणं थोडं धाडसाचं ठरेल… पण एवढं मात्र निश्चित की उमेदवार कोणताही असो तरी मविआच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निलेश लंके आपली सारी यंत्रणा कामाला लावतील… तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी विखे पाटीलही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी फोर्स लावतील… त्यामुळे आता यात राजकीय कुरघोड्या, डावपेच, चाली, गटतट, जातीय समीकरण आणि बेरजेचं राजकारण जो करणार तो यशस्वी होणार… असं म्हणायला हरकत नाही… पण राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी खासदार साहेब अडून बसले तर इच्छुकांची फाटाफुटी होऊन पारनेरची आमदारकी इंटरेस्टिंग वळणावर जाऊन पोहचायला जास्त वेळ लागणार नाही… त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका कसा लागेल? लंके मोठ्या मनानं आपल्या मतदारसंघात मशालीचा उजेड येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील का? पारनेरचा 2024 चा आमदार नेमका कोण? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

Mumbai Local : आता चुकूनही चुकणार नाही तुमची लोकल ; पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. अनेकदा ऑफिसला जाण्याच्या गडबडीत प्रवासी चुकीच्या लोकलमध्ये चढतात. किंवा बऱ्याचदा आपण घाई गडबडीत आणि गर्दीत कोणत्या लोकलमध्ये चढलो हेच समजत नाही. पण आता असे होणार नाही. कारण मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवला जाणार आहे. प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्मकडेच्या बाजूने देखील सर्व माहिती समजणार आहे.

तिन्ही भाषांमध्ये लोकलची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये लोकलची माहिती ३ सेकंदांच्या अंतराने दिसणार आहे. एक्स्प्रेस ट्रेनप्रमाणे आता लोकलला डिजीटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर डिजीटल डिस्प्लेचा प्रयोग केला जाणार आहे.

प्लॅटफॉर्म वर बसून मिळणार लोकलची माहिती

उपनगरी रेल्वेच्या १२ डब्यांच्या गाडीच्या दर्शनी भागावर दोन्ही बाजूला मिळून एकूण आठ डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, ट्रेन सुरू होण्यापूर्वी गार्डने दिलेली माहिती आता प्लॅटफॉर्मवर बसूनदेखील मिळविणे शक्य होणार आहे. सध्या एका गाडीवर असा डिस्प्ले बसविण्यात आला असून, येत्या काळात पश्चिम रेल्वेच्या आणखीन १० गाड्यांवर असे डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत.

पॅनरोमा डिस्प्ले म्हणजे काय ?

  • हा डिजिटल डिस्प्ले फुल एचडी टीएफटी (थिन फिल्म ट्रान्झिस्टर) आहेत.
  • हा डिस्प्ले काचेने संरक्षित आहेत
  • त्याच्या ब्राइटनेसमुळं लोकांना स्क्रीनवर कोड सहज पाहता येईल
  • डिस्प्ले स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट सेन्सरद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केला जातो जेणेकरून मजकूर 5 मीटरपर्यंतच्या अंतरावरून स्पष्टपणे दिसतो
  • डिस्प्लेची किंमत अंदाचे १.७५ लाख रुपये इतकी असून, रेल्वेच्या एका गाडीवर बसविण्याचा खर्च सुमारे १४ लाख इतकी असणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा कोसळला; राजकोट किल्ल्यावरील घटना

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजकोट किल्ल्याच्या किनारी शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) हा पुतळा उभारण्यात आला होता. हैराण करणारी बाब म्हणजे २०२३ च्या डिसेंबर मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मालवण मध्ये येऊन या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण केलं होते. मात्र अचानक का पुतळा कसा काय कोसळला याचे कारण समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र आता अवघीय ८ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नाराज झाले आहेत. पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामामुळेचाहा प्रकार घडला असा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळला असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरं तर ज्यावेळी हा पुतळा तयार करण्यात येत होता त्यावेळीच स्थानिक लोकांनी कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या मात्र जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहेत असं समजून पद्धतशीरपणे याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करु असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

दुसरीकडे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळला ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. तिथले पालकमंत्री सर्व प्रकरणाची चौकशी करतील, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवरायांचा पुतळा लवकर उभा करणं हे आमचं पहिलं कर्तव्य असेल असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.