Sunday, December 21, 2025
Home Blog Page 511

Success Story | या शेतकरी बंधूनी नोकरी सोडून केली शेतीला सुरुवात; महिन्याला कमावतात करोडो रुपये

Success Story

Success Story | भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतातील जवळपास 75% पेक्षा जास्त शेतकरी शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. शेतकऱ्यांनी आर्थिक मदत व्हावी, यासाठी सरकार नवनवीन योजना आणत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो. आजकाल अनेक शेतकरीहे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. आणि यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा देखील होत आहे. आजकाल अनेक तरुण लोक देखील त्यांचा नोकरी व्यवसाय सोडून शेतीकडे वळत आहेत. आणि चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. आज देखील आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. ज्याने शेती करून खूप चांगला नफा मिळवलेला आहे.

शेती करून धाराशिवमधील एक शेतकरी करोडपती झालेले आहेत. या शेतकऱ्यांचे नाव रामराजे गोरे आणि नागेश गोरे असे आहे. हे दोन शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा आहेत. हे दोघे एकेकाळी नाला बिल्डिंगमध्ये देखभाल कामगार होते. परंतु सध्या हे दोघेजण सध्या 1.5 कोटी रुपये उत्पन्न कमावतात. गोरे बंधू हे धाराशिव मधील भूम तालुक्यातील अंतर गावचे रहिवासी आहेत यांनी 1993 साली त्यांचे दहावीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु त्यावेळी त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. म्हणून त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण न करता नाला बांधकामात राहण्याच्या कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु ते होऊ शकले नाही, काही काळानंतर त्यांनी पुण्यात आले आणि टेल्को ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. हे सुरू करताना त्यांनी शेतात अनेक प्रयोग केले.

त्यानंतर त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न होत असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी पुण्यातील नोकरी सोडून दिली
आणि मिळेल त्या पैशातून शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून त्यांनी शेतीला सुरुवात केली. त्यांनी एक विहीर खोदली आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. त्यांचे भाऊ नागेश गोरे त्यांनी देखील या कामात त्यांना खूप मदत केली. आणि आजही दोघे बंधू खूप यशस्वीरित्या काम करत आहेत.

त्यांना जे थोडेफार उत्पन्न मिळायला लागले. त्यानंतर त्यांनी दीड एकर जमीन, तीन विहिरी, 9 एकर द्राक्ष, तीन एकर डाळिंब सात एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली. त्या पूर्ण त्यांच्या विहिरीतूनच पाणीपुरवठा होतो. त्यांनी सांगितले की दरवर्षाला ते दीड कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. अशा प्रकारे त्यांनी करोडपती होण्याचा एक प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि संपूर्ण शेतकऱ्यांसमोर हा एक खूप मोठा आदर्श आहे.

Viral Video : आली लहर केला कहर ! पठ्ठ्याने विमानाच्या दरवाजात मळली तंबाखू …

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ काहीतरी शिकवून जाणारे असतात. तर काही व्हिडीओ माहिती देणारे असतात. तर काही व्हिडीओ हास्यास्पद असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना चला जाणून घेऊया या (Viral Video) व्हिडिओबद्दल …

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमानाच्या दरवाजात उभा राहिलेला दिसतो आहे. विमानात प्रवेश करण्यापूर्वी त्याने दारात तंबाखू मळण्यास सुरुवात केली. व्हिडिओ पाहिल्यावर, हे समजू शकते की कर्मचारी देखील त्याच्या वागण्याने काहीसे निराश झाले आहेत. कारण ते त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते; पण लगेच तो तंबाखू लपवतो आणि आत जातो. हा व्हिडीओ अनेकांच्या मनोरंजनाचे साधन बनला असला तरी या व्हिडिओने (Viral Video) अनेक लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

23 ऑगस्ट रोजी ट्विटरवर व्हिडिओ हा पोस्ट करण्यात आला होता, ही पोस्ट करताना लिहले होते की “एका चांगल्या जेट विमानाला या माणसाने रिक्षाच करून टाकली”. ट्विटरवर अनेकांनी हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे. व्हिडिओला जवळपास 4000 लोकांनी लाईक केले आहे, तर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. पोस्टवर एकूण 104 कमेंट (Viral Video) आहेत.

काय आहेत प्रतिक्रिया ?

अनेकांनी हसणाऱ्या इमोजीसह पोस्टवर कमेंट केली, तर अनेकांनी त्यांना विमानात प्रवेश कसा दिला, असा प्रश्न उपस्थित केला.आहे एका युजर्सने त्याला लीजेंड म्हटले, तर अनेक युजर्सनी उपहासाने म्हटले की तो कदाचित यूपीमधून आला आहे. आणखी एका (Viral Video) वापरकर्त्याने कमेंट विभागात त्याला आजारी माणूस म्हटले आहे.

WhatsApp New Feature | व्हाट्सअप युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता चॅटिंग करणे होणार आणखी सोप्पे

WhatsApp New Feature

WhatsApp New Feature | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सोशल मीडिया शिवाय कोणत्याही व्यक्तीचे पान हलत नाही. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातही व्हाट्सअप हे अत्यंत जास्त प्रमाणात वापरले जाणारे एक सोशल मीडिया ॲप आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये व्हाट्सअप (WhatsApp New Feature) मोठ्या प्रमाणात वापरले जाते. व्हाट्सअपच्या मदतीने आपण व्हॉइस मेसेज देखील पाठवू शकतो.

ही एक बहुचर्चित सुविधा सध्या उपयोगात आलेली आहे. व्हाट्सअप त्यांच्या युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स लॉन्च करत असतात. त्याचा फायदा युजर्सला होतो. अशातच आता एक व्हॉइस मेसेजची बहु चर्चेत सुविधा दिलेली आहे. व्हाट्सअपमुळे तुम्ही कोणताही थर्ड पार्टी न वापरता थेट व्हाट्सअपवर तुमच्या आवाजात मेसेज तयार करू शकता. तुम्ही हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये हा पर्याय उपलब्ध आहे. आता आपण एक फीचरचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया.

फीचरचा वापर कसा करावा | WhatsApp New Feature

या फीचर्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला व्हाट्सअपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल..तिथे चॅट्स हा पर्याय निवडा.
त्यानंतर व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्टस हा पर्याय चालू करा
आता एखादा आवाज मेसेज आला की त्याच्याखाली ट्रान्सक्रिप्टसचा ऑप्शन दिसून येईल. त्या पर्यायावर क्लिक केल्यावर व्हाट्सअप मजकूर फाईल डाऊनलोड करायला आणि त्या मेसेज खाली मजकूर दाखवेल.

व्हाट्सअप हे अत्यंत विश्वासहार्य एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. येथे तुमच्या सगळे मेसेज सुरक्षित असतात. म्हणजेच तुमचे हे मेसेज केवळ मेसेज पाठवणारा आणि प्राप्त करताच पाहू शकता. या सगळ्या फाईल पूर्णपणे खाजगी असतात. त्यामुळे तुमच्या गोपनीयतेचा इथे आदर केला जातो.

व्हाट्सअप (WhatsApp New Feature) आता फक्त बॉईज मेसेज तयार करणे. त्या काळात अनेक नवनवीन ऑप्शन ग्राहकांसाठी येणार आहेत. आता व्हाट्सअपमध्ये तुम्हाला स्वतंत्रपणे थीम निवडण्याची सुविधा देखील येणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने ही थीम निवडू शकता. आणि whatsapp चा चांगला वापर करू शकता. आता व्हाट्सअपद्वारे एकमेकांशी संवाद साधने खूप सोपे होणार आहे. यामध्ये तुमच्या गोपनीयतेला प्राधान्य दिले जाणार आहे.

Agriculture Infrastructure Fund Scheme | सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 2 कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या नवी योजना

Government Scheme

Agriculture Infrastructure Fund Scheme | आपल्या देशाची 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणजेच आपल्या देशातील अन्नदाता शेतकरी नेहमीच महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपली सरकार देखील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल आणि चांगले पीक घेता येईल. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी. यासाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे कृषी पायाभूत सुविधा (Agriculture Infrastructure Fund Scheme) निधी. सरकारने ही योजना शेतकऱ्यांच्या पायाभूत विकासासाठी राबविण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रगती करण्यात यावी. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, जसे की रस्ते, पुल सिंचन यांसारख्या सुविधा देण्यासाठी सरकार नेहमीच कार्यरत असते.

भारतातील सर्व सरकारी आणि खाजगी कृषी क्षेत्राच्या विकासात मदत करण्यासाठी सरकारने ही खास योजना राबवलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान मिळते. शेती आधुनिक पद्धतीने कसे करायचे? या गोष्टीची देखील माहिती मिळते. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या अनेक सुविधांची पूर्तता देखील सरकारकडून होत असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट, गोदाम, पॅकेजिंग, युनिट या सगळ्या गोष्टी उभारण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी जवळपास दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देत असते. सात वर्षासाठी हे दोन कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज किंवा 3 टक्के व्याजदरावर दिले जाते.

कृषी पायाभूत सुविधा निधीचे फायदे | Agriculture Infrastructure Fund Scheme

  • कृषी क्षेत्राच्या विकासासाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा गोदाम तयार करण्यासाठी कर्ज दिले जाते.
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य आर्थिक मदत आणि इतर सेवा देखील सरकारच्या माध्यमातून दिल्या जातात.
  • अर्थव्यवस्थेसाठी कृषी हा एक प्रमुख स्त्रोत आहे.
  • त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून शेती व्यवसाय त्यांची प्रगती केली जावी. या उद्देशाने त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात विश्वजीत कदमांना नडणाऱ्या देशमुखांची ताकद किती?

Prithviraj deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विश्वजीत कदम – विशाल पाटील या जोडगोळीने लोकसभा निवडणुकीत विषय खोल केला… आणि आमदारकी आपल्या खिशात टाकत सांगलीचे आपणच वाघ हे दाखवून दिलं…पण आजचा विषय आपला लोकसभेचा नाहीये… आपण बोलणार आहोत सांगलीत खासदारकीला किंगमेकर ठरलेल्या आमदार विश्वजीत कदमांच्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाबाबत… कारखानदारी, संस्थात्मक जाळं उभारून वडिलांचा राजकीय वारसा नेटाने पुढे चालवणाऱ्या विश्वजीत कदमांना यंदा परंपरेप्रमाणे फाईट देणार आहे ते देशमुख घराणं… देशमुख विरुद्ध कदम हा या मातीतला तसा जुना संघर्ष… आता अगदी दुसऱ्या पिढीपर्यंत झिरपत येऊन पोहोचलाय… याच देशमुखांनी ना सलग दोनदा धूळ चारली होती… त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आता देशमुख घरातला एक चेहरा विश्वजीत कदमांना चितपट करण्यासाठी फिल्डिंग लावून बसलाय… विधानसभेच्या आखाड्यात बघायला मिळणारी पलूस कडेगाव मधील देशमुख विरुद्ध कदम ही बिग फाईट नेमकी आहे तरी काय? विश्वजीत कदमांना पाणी पाजण्याची धमक देशमुख यांच्यात खरंच आहे का? येणाऱ्या विधानसभेला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होतोय? त्याचाच हा इंडेप्थ आढावा…

पूर्वीचा वांगी-भिलवडी मतदार संघ पुनर्रचनेनंतर पलूस-कडेगाव या नावाने ओळखला जाऊ लागला… माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांचा हा बालेकिल्ला…. स्व.वसंतदादा पाटील यांच्या हयातीमध्येच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व संपतराव चव्हाण यांनी केल होतं…. मात्र १९८५ मध्ये पतंगराव कदमांनी अपक्ष मैदानात उतरून आमदारकी आपल्या बाजूला खेचून आणली.. त्यानंतर डायरेक्ट काँग्रेसमध्ये ॲक्टिव्ह होत मतदार lसंघातील लोकांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देत असतानाच मतदारसंघात कारखानदारीला प्रोत्साहन दिलं… संस्थात्मक जाळ घट्ट बांधत मतदारसंघात आपली हक्काची एक वोट बँक तयार केली… यानंतर पतंगराव कदम हेच वांगी भिलवडी मतदारसंघातून वन साईड निवडणूक खेचून आणत असताना त्यांना खरा धक्का बसला तो 1995 साली… संपतराव देशमुख यांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या बिग बी पतंगराव कदमांना पराभवाची धूळ चारत आमदारकी खेचून आणली… तेव्हापासून कदम आणि देशमुख या घराण्यात राजकीय विस्तवाला सुरुवात झाली… ज्याची झळ पुढच्या पिढीलाही बसतेय…

पण संपतराव देशमुख यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देशमुख गटाकडून मैदानात उतरलेल्या बंधू पृथ्वीराज देशमुख यांनी कदम गटावर पुन्हा मात करीत आमदारकी पटकावली…. थोडक्यात तालुक्याच्या राजकारण्यातून पतंगराव कदम काही काळ बॅकफुटला फेकले गेले… हा सिलसिला असाच कायम राहिला असता तर आज देशमुख हे सांगलीतील मोठं प्रस्थ झालं असतं… पण पतंगराव कदमांनी राजकीय छक्केपंजे वापरत मतदार संघावर पुन्हा ठाण मांडली ती कायमचीच…यानंतर या मतदार संघावर कब्जा मिळविण्याचे देशमुख गटाचे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरी थांबलेलेही नाहीत. यामुळे कदम गटाला या मतदार संघात एकहाती यश मिळेलच याची आजही खात्री देता येत नाही….

मतदारसंघात देशमुख गटाला पुन्हा एकदा स्पेस मिळाला तो पतंगराव कदम यांच्या निधनानंतर… सहानुभूतीची लाट आणि पक्षाचा प्रभाव पाहता पोटनिवडणूक बिनविरोध झाली… आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची सूत्र विश्वजीत कदमांच्या हातात आली… 2019 ला भाजपची लाट असताना देशमुख विश्वजीत कदमांच्या राजकारणाला हादरा देतील… बालेकिल्लाला भगदाड पाडतील… अशा चर्चा सुरू असतानाच युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली… संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागे घेत विश्वजीत कदमांसाठी घोडे मैदान सोपं करून दिलं… शिवसेनेने या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना उमेदवारी दिली. मात्र, ही निवडणुक चुरशीची तर झाली नाहीच, पण देशमुख गटाकडून नोटाला झालेले मतदान पाहून विश्वजीत कदमांच्याही काळजाचा ठोका चुकला असावा, हे वेगळ्या शब्द सांगायला नकोच…पण आता नाही तर कधीच नाही… असं म्हणत सध्या देशमुख गट आक्रमक झालाय… काही केल्या विश्वजीत कदमांना विधानसभेला पाणी पाजायचंच… अशी जणू शपथ घेऊन संग्रामसिंह देशमुख तयारीला लागलेत..

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या कारकि‍र्दीत त्यांनी मतदारांशी थेट संपर्क राखला असून त्यांचे चुलत बंधू आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची साथ त्यांना राहील अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत… लोकसभेवेळीही पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला होता. मात्र, त्यांना डावलून पुन्हा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानं देशमुखांनी विरोधाची भूमिका घेतली… मात्र, यात संग्राम देशमुख यांनी पक्षाचा आदेश मानत भाजपसाठी काम केल… तरीही या मतदारसंघात विशाल पाटलांना ३६ हजार १८२ चं लीड मिळालं… थोडक्यात देशमुखांच्या ताकदीपेक्षा कदमांचीच हवा सध्या तरी पलूस कडेगाव मध्ये दिसतेय….

क्रांती कारखान्याच्या माध्यमातनू अरुण लाड गट सक्रिय आहे. या गटाचा आता कडेगाव नगरपंचायतीपर्यंत विस्तार झाला असून या गटाची मर्यादित ताकद असली तरी काटाजोड लढतीमध्ये या गटाची भूमिका मतदार संघाचा निकाल बदलण्याइतपत निश्‍चितच राहणार आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये देशमुख आणि लाड यांच्यातच लढत झाली होती.. लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. ही उर्जा आता या गटाची ताकद बनली असून नव्या पिढीचे तरूण नेतृत्व म्हणून क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड मैदानात उतरण्यासाठी चाचपणी करत आहेत. गटाची ताकद वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातून त्यांची ताकद कोणाच्या पारड्यात पडते की, ताकद अजमावण्यासाठी फक्त ते मैदानात उतरतायत? हे देखील इथं महत्वाचं ठरेल… पण शरद पवारांनी लक्ष घातलं तर हे एकगठ्ठा मतं कदमांच्या पाठीशी जाऊ शकतं, ही वस्तुस्थिती देखील नाकारून चालणार नाही….

महाविकास आघाडीची ताकद प्लस संस्थात्मक जाळ्यांनी तयार झालेलं हक्काचे मतदान प्लस लाड गट प्लस खासदार विशाल पाटलांची ताकद या सगळ्यांची गोळा बेरीज करून पाहिली तर विश्वजीत कदम हे सध्याच्या स्थितीला तरी अनबिटेबल वाटतायत… 2019 ला शिवसेनेला तिकीट मिळाल्याने विश्वजीत कदमांकडूनच ही सीट मॅनेज झाल्याची चर्चा खमंगपणे आजही राजकीय वर्तुळात होत असते… तेव्हा देशमुखांनी माघार घेतली… पण आता काहीही झालं तरी आपलं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी संग्राम देशमुख यंदाच्या निवडणुकीत जीव तोडून लढणार, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको… त्यात कदमांच्या संस्थात्मक वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी देशमुखांनीही साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ उभारून शेरास सव्वाशेर होण्याचा प्रयत्न केलाय…त्यामुळे विश्वजीत कदम विरुद्ध संग्राम देशमुख या राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज असणाऱ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा यंदाचा आमदार कोण होतोय? पक्षाची राज्याच्या राजकारणाची सूत्र हातात घेऊ पाहणाऱ्या विश्वजीत कदमांना स्वतःच्याच मतदारसंघात देशमुख दणका देतील का? तुम्हाला काय वाटतं? पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा आमदार कोण? तुमच मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…

भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीला उडवलं; 2 जण ठार

jaykumar goore conway accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजप नेते आणि माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीला उडवलं. या अपघातात (Satara Accident) दुचाकीवरील दोनही व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निकेत नितीन मगर (वय २६ ) व रणजित राजेंद्र मगर (वय ३२, रा. शेरेवाडी, ता. माण) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही बिदाल शेरेवाडी गावचे रहिवासी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सकाळी आमदार गोरे हे आपल्या ताफ्यासह जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. त्यांच्या ताफ्यातील सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती. याच सुमारास बिदाल व दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनिकेत मगर व रणजित मगर हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे निघाले होते. त्याच दरम्यान जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एका कारने त्यांचा दुचाकीला उडवलं. हि धडक इतकी भीषण होती कि कार आणि दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि दोन्ही तरुण हवेत उडून पडले. तसेच स्कॉर्पिओ रस्ता सोडून बाजूला गेली. यात स्कॉर्पिओचे सुध्दा मोठे नुकसान झाले

या भीषण अपघातानंतर दोन्ही दुचाकीस्वारांना तातडीने उपचारासाठी दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बिदाल-शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? यात चूक कोणाची होती हे अद्याप समोर आलेलं नाही.

ई-कॉमर्स क्षेत्रात वाढणार नोकऱ्यांची संधी, सणासुदीच्या काळात हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली

E commerce

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ई-कॉमर्स हा व्यवसाय मोठ्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आणि या ई कॉमर्स कंपन्या सध्या लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या देखील मिळत आहेत. 2023 च्या शेवटी ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये जवळपास 7 लाख लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहे. त्यामुळे आजकाल अनेक लोकांना रोजगाराची संधी देखील निर्माण झालेली आहे. या कंपन्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना चांगला आणि लक्षात राहील असा अनुभव देण्यासाठी तात्पुरत्या गरजेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढे भारतात अनेक सण साजरे होतात. या सणाच्या वेळी ग्राहक देखील नवनवीन गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी अनेक कंपनी आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहे.

सणासुदीच्या काळात जॉबची संख्या वाढणार

एका अहवालात असे म्हटलेले आहे की, ई-कॉमर्स कंपन्या या सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या सेवा पूर्ण करण्यासाठी सज्ज असतात. अनेक लोक हे सणासुदीच्या काळात वार्षिक खरेदी करतात. आणि याच काळामध्ये या कंपन्या देखील त्यांच्या ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी खूप चांगली सेवा देतात. आणि या चांगल्या सेवेसाठी आता ई-कॉमर्स सेक्टरमध्ये जवळपास 25 टक्क्यांनी नोकरीच्या संख्येत वाढ होणार आहे.

ई-कॉमर्स सेक्टर हे खूप आशावादी आहे. सणासुदीच्या काळामध्ये अनेक शहरांमध्ये कामगारांची संख्या वाढणार आहे. यामध्ये बेंगळूर, दिल्ली, मुंबई या शहरांमध्ये तर वाढणार आहे. यासोबत वडोदरा, पुणे यांसारखे शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संख्या वाढणार आहे. सध्या मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरांमध्ये वियरहाऊस, ऑपरेशन्स लाईन, डिलिव्हरी आणि कॉल सेंटर ऑपरेशनमध्ये लोकांना खूप जास्त मागणी आहे. ग्रामीण भागात देखील खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करताना. कंपन्या कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नाही. त्यामुळे ते कामगारांची संख्या वाढवणार आहे.

याबाबत टीमप्लीज सर्विसचे उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षापासून टमटम कामगारांची मागणी वार्षिक आधारावर 20 टक्क्यांनी वाढत आहे. आणि ही वाढ पुढील दोन ते तीन वर्षापर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात खूप मोठ्या बदल झालेला आहे. आणि कामगारांना रोजगाराची संधी देखील प्राप्त होत आहे.

Pune: पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर क्रॅश ; मुंबई येथून हैद्राबादला जात असताना अपघात

Pune: पुणे जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आता हाती येत असून पुणे जिल्ह्यातील पौड रोड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथून हैद्राबादला जात होते. यामध्ये चार (Pune) प्रवासी प्रवास करीत असल्याची असल्याची माहिती आहे.

मागच्या दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण असून काहीच ठिकाणी जोरदार पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे मात्र या खराब हवामानामुळेच हेलिकॉप्टर क्रॅश (Pune) झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पायलट सोबत चार जण असल्याची माहिती असून यामध्ये असलेले लोक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली असून यातील दोघेजण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती समजतात पोलीस आणि (Pune) बचाव यंत्रणा पथकासह घटनास्थळी पोहोचलेली आहे.

नक्की काय घडलं? (Pune)

हेलिकॉप्टर काही वेळ घोटवड्याच्या दिशेने आकाशात घिरट्या घालत होते. अचानक हे हेलिकॉप्टर खाली पडल्यामुळे मोठा आवाज झाला. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. दोन जण गंभीर जखमी आहेत. ही माहिती कळताच स्थानिक आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावून आले. त्यावेळी पायलट काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजतात 200 ते 300 ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच कोसळलेल्या हेलिकॉप्टर च्या आजूबाजूला जाऊ नये असं आवाहन नागरिकांना केले आहे. कारण हेलिकॉप्टरचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो असे म्हटले आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शी कडून देण्यात आली आहे.

हेलिकॉप्टर चे नाव- AW 139

हेलिकॉप्टर मधील व्यक्ती-
1) आनंद कॅप्टन (जखमी) हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आली आहे
2) दिर भाटिया (प्रकृती स्थिर)
3) अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर)
4) एस पी राम (प्रकृती स्थिर)

हेलिकॉप्टरची कंपनी- ग्लोबल हेक्ट्रा

बलात्कार करणाऱ्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे: अजित पवार संतापले

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील काही दिवसांपासून लहान मुलींवर बलात्कार, अत्याचार आणि हत्या केल्याच्या घटना (Maharashtra Crime) सातत्याने वाढतच चालल्या आहेत. बदलापूर, नागपूर, कोल्हापूर, नालासोपारा, अकोला अशा जवळपास १० ते १२ घटना मागच्या आठवड्याभरात घडल्या आहेत. या एकूण सर्व घटनांनी महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये संतापाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बलात्कार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. त्याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आले आहे. बलात्कार करणाऱ्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे असं अजित पवारांनी संतप्तपणे म्हंटल आहे.

अजित पवार हे नेहमीच आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांची याच स्वभावामुळे अडचणही झाली आहे. मात्र त्यांचा स्वभाव हा असाच कायम आहे. आज यवतमाळ येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज्यातील बलात्काराच्या घटनांवरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला. राज्यात महिलांवर, मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानच काढले पाहिजे. परत नाहीच. हे केलंच पाहिजे इतके नालायक असे काही लोक आहेत असं अजित पवारांनी म्हंटल .

काही विकृत माणसे असतात काही नराधम असतात. पण जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, आमच्या बहिणीवर जे हात घालतात त्याच्यावर कडक कारवाई करणार. मग तो कितीही मोठ्या बापाचा असूद्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याच्याबद्दल कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. महिलांसाठीचा शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे, तो लवकर मंजूर करुन आणायचा आहे. असं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या निषेध आंदोलनावरही भाष्य केलं. विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने जो काय विरोध करायचा तो करा . लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, असं अजित पवार म्हणाले.

Women Travel : महिलांना विना तिकीट रेल्वेने प्रवास करणं शक्य आहे? काय आहे नियम?

Women Travel : भारतातील ट्रेन एक असे माध्यम आहे ज्याद्वारे लाखो लोक दररोज एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करतात. लाखो पुरुष, मुले आणि महिला देखील दररोज ट्रेनमधून प्रवास करतात. अनेकवेळा असे घडते की अचानक किंवा काही कामामुळे रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि तिकीट नसते. ट्रेनमध्ये प्रवास करताना, तिकीट नसताना, अनेक वेळा टीटीई प्रवाशांना खाली उतरवायला लावतात, पण आता असं होणार नाही.

होय, एखादी महिला तिकिट नसतानाही ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, तर टीटी तिला खाली उतरण्यास सांगू शकत नाही. या लेखात आम्ही तुम्हाला देशातील एका कायद्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती घेतल्यानंतर टीटीई महिलेला ट्रेनमधून (Women Travel) काढण्याऐवजी तिला सुरक्षा देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया…

तर TTE खाली उतरवू शकत नाही (Women Travel)

भारतीय रेल्वे कायदा 1989 ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना विशेष अधिकार देतो. भारतीय रेल्वे कायदा 1989 च्या कलम 139 नुसार, जर कुणीही सोबत नसलेली महिला किंवा लहान मूल रात्रीच्या वेळी तिकिटाविना ट्रेनमधून प्रवास करत असेल, तर TTE त्यांना या कायद्यानुसार खाली उतरवू शकत नाही. मध्यरात्री टीटीईने एखाद्या महिलेला ट्रेनमधून उतरवल्यास ती महिला संबंधित महिला रेल्वे अधिकाऱ्याकडे टीटीईविरुद्ध गुन्हा दाखल करू शकते.

पुढील स्टेशनवर उतरण्याची विनंती करू शकते

जर महिलेकडे तिकीट नसेल आणि ती प्रवास करत असेल तर TTE त्या महिलेला कोणत्याही ठिकाणी सोडू शकत नाही. यासाठी ज्या भागात ट्रेन धावत आहे, त्या ठिकाणच्या जिल्हा मुख्यालयाच्या स्थानकावरच टीटीईला सोडावे लागेल. जिल्हा मुख्यालयाच्या रेल्वे स्थानकावर महिलेला उतरवण्यापूर्वी टीटीईने रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी लागते आणि त्यानंतर त्या महिलेला त्या स्थानकावरून दुसरी ट्रेन पकडता यावी म्हणून (Women Travel) महिलेला उतरवावे लागते.

घाई किंवा इतर कोणत्याही कारणामुळे महिला विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करत असल्याचे अनेकदा दिसून येते. हे चुकीचे असले तरी टीटीई महिला किंवा मुलाचे नुकसान करू शकत नाही. जर एखादी महिला किंवा मूल तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर, TTE दंडासह ट्रेनचे तिकीट जारी करू शकते, परंतु मध्यरात्री ट्रेनमधून उतरू शकत नाही. मात्र TTE ट्रेनमधून उतरण्याचा आग्रह धरू शकतो.