Sunday, December 21, 2025
Home Blog Page 510

Lakhpati Didi Yojana : महिलांना 5 लाखांपर्यंत मदत… काय आहे लखपती दीदी योजना?

Lakhpati Didi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये आज जळगाव मध्ये लखपती दीदी संमेलनात (Lakhpati Didi Yojana) सहभागी होणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटप आणि सत्कार करण्यात येणार आहे. केंद्राची हि योजना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत १ कोटी महिला लखपती झाल्यात तर एकूण ३ कोटी महिलांना लखपती करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. मात्र हि योजना नेमकी आहे तरी काय?महिलांना सरकार का आणि कशासाठी मदत करत आहे? त्यासाठी पात्रता काय आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

देशातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं, त्यांना जगण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे मागील काही वर्षात महिलांसाठी अनेक मोठमोठ्या योजना सरकार कडून राबवण्यात येत आहेत. लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) हा त्याचाच एक भाग आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. हि योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणेज पुरुषांप्रमाणेच महिलांचा सुद्धा उद्योग क्षेत्रात सहभाग वाढावा असा आहे. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जाते. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

काय आहे पात्रता? Lakhpati Didi Yojana

अर्जदार महिला भारताची नागरिक असावी
तिचे वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.
सदर महिलेचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
अर्जदार महिलेच्या घरातील कोणीही सरकारी कर्मचारी नसावा
महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे.

अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ‘सेल्फ हेल्प ग्रुप’ व्यवसाय योजना तयार करावी लागेल.
या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल.
या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल.
त्यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Accident News : अमरावती- नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; 28 जखमी, 1 ठार

Accident News Shivshahi Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती- नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. रस्त्यात आडव्या आलेल्या गाईला वाचवण्याच्या नादात शिवशाही बस पलटी झाली. या भीषण अपघातात 28 प्रवासी जखमी झाले तर एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे सदर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर अपघातग्रस्त शिवशाही बस नागपूरहून अकोल्याच्या (Nagpur To Akola Shivshahi Bus) दिशेने निघाली होती. यावेळी अमरावती-नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर अचानकपणे एक गाय या बसच्या आडवी आली. यावेळी बस चालकाने गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाईला वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आसपासच्या नागरिकांनी या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बसच्या चालकाने सांगितला घटनाक्रम- Accident News

दरम्यान, हा अपघात (Accident News) नेमका कसा झाला याची माहिती बस चालकाने सविस्तर सांगितली आहे. मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण बस पलटी झाली. अशी प्रतिक्रिया या अपघातग्रस्त शिवशाही बसच्या चालकाने दिली

या अपघातामुळे महार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. सध्या क्रेनच्या मदतीने शिवशाहीला सरळ करण्याचे काम सुरु आहे. समोरून शिवशाहीचा फोटो बघूनच अपघाताची तीव्रता किती मोठी आहे ते समजेल. समोरच्या बाजूने बसचे मोठं नुकसान झालं आहे.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला मोठी ऑफर!! या संघाचा कर्णधार होणार?

Suryakumar Yadav KKR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ साठी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन करता येईल आणि मेगा लिलाव होणार का याबाबत अजून तरी बीसीसीआयने कोणतीही घोषणा केली नाही. परंतु दररोज कोणत्या ना कोणत्या खेळाडूंबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. आता वर्ल्ड कप फायनल मध्ये जादुई झेल पकडणारा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबाबतीत एक चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी आयपीएल हंगामात सूर्याला कोलकाता नाईट रायडर्सने थेट कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

ट्रेड डीलमध्ये केकेआरचा खेळाडू मुंबईला जाऊ शकतो –Suryakumar Yadav

सध्या श्रेयश अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली २०२४ ची आयपीएल स्पर्धा कोलकात्याच्या संघाने जिंकली होती. मात्र तरीही केकेआरने सूर्याला कर्णधारपदाची थेट ऑफर दिल्याचे चर्चाना उधाण आलं आहे. मात्र मुंबई इंडियन्स सूर्याला सोडण्यासाठी तयार होणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे. ट्रेड डीलमध्ये केकेआरचा खेळाडू मुंबईला जाऊ शकतो किंवा केकेआर सूर्याचे पैसे मुंबईला देऊ शकतो. सूर्यकुमार यादव जर कोलकात्याच्या संघात दाखल झाला तर श्रेयश अय्यरचे कर्णधारपद धोक्यात येणार हे मात्र नक्की….

खरं तर सूर्यकुमार (Suryakumar Yadav) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) चे खास नातं सुद्धा आहे. कारण केकेआर कडूनच त्याने आयपीएल मध्ये पदार्पण केलं होते. मात्र त्यावेळी त्याला तळाला फलंदाजी करावी लागायची. सूर्या 2014 ते 2017 दरम्यान केकेआर संघात होता आणि या काळात त्याने 54 सामन्यांमध्ये 22.52 च्या सरासरीने आणि 131.89 च्या स्ट्राइक रेटने 608 धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सच्या संघात गेल्यावर सूर्याला वरच्या फळीत फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने त्याच सोन करून दाखवलं.सूर्यकुमार यादव हा ३३ वर्षाचा असून सध्या T20 इंटरनॅशनलमध्ये जगातील नंबर वन बॅट्समन आहे. एवढं नव्हे तर T20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन देखील आहे. सूर्यकुमार यादवने आयपीएल मध्ये मुंबईकडून खेळताना अनेक अश्यक्यप्राय विजय मिळवून दिलेत.

सूर्यकुमार यादवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 150 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 3594 धावा कुटल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 2 शतके आणि 24 अर्धशतके आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट १४५ राहिला आहे. सूर्यकुमार फलंदाजीला उतरताच आक्रमक फटके मारून समोरच्या गोलंदाजांवर दबाव टाकतो त्याचा फायदा संघाला होत असतो. त्यामुळे प्रत्येक संघाला सूर्या हवाहवासा वाटतो.

कुठे आहेत ते 56 इंच छातीवाले? अत्याचाराच्या घटनांवरून राऊतांचा मोदींवर निशाणा

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील आठवडाभरात महाराष्ट्र्रात आणि देशात बलात्कार, अत्याचार आणि हत्या यांसारख्या अनेक घटना समोर आल्यात. खास करून लहान मुलींना नराधमांकडून टार्गेट केलं जात आहे. देशातील या बदलेल्या वातावरणामुळे सर्वसामान्य माणूस संताप व्यक्त करत आहे तसेच अशा पराकारचे कृत्य करणाऱ्या आरोपीना लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. या एकूण संपूर्ण घटनांनी राजकारण सुद्धा तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधलाय. कुठे आहेत ते ५६ इंच छातीवाले या मथळ्याखाली राऊतांनी देशातील बलात्कारी घटनांचा पाढाच वाचला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

जिथे जिथे भाजप’ची सरकारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महिलांवरील अत्याचार, बलात्काराची प्रकरणे किळसवाण्या पद्धतीने समोर आली व त्यावर भाजपने आणि त्यांच्या महिला मोर्चाने कधीच तोंड उघडले नाही. कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशात उमटावेत यामागे भाजपची यंत्रणा पद्धतशीर काम करीत असते, पण महाराष्ट्रातील बदलापूर, उरण, उत्तर प्रदेशातील हाथरस, उन्नावसारख्या प्रकरणांवर भाजप व त्यांचे नेतृत्व गप्प बसते. महिला अत्याचाराच्या बाबतीत सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे दुहेरी मापदंड आहेत. बलात्कार, विनयभंग अशा आरोपाखाली अटकेत असलेल्या व त्या गुह्याबाबत शिक्षा ठोठावलेल्या अनेक आरोपींवर भाजपची खास मेहेरनजर आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचारांबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलने केली, पण मोदी व त्यांच्या सरकारने काहीच कारवाई केली नाही. जणू बलात्काराला मोदींच्या सरकारने राजमान्यताच बहाल केली. जगातला सर्वात मोठा बलात्कारी प्रज्वल रेवण्णा याच्या लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकात गेले व या त्यांच्या लाडक्यास शाबासकी दिली.

गुरमीत राम रहिम हा बाबा भाजपचा खास प्रिय आहे. बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली हे बाबा तुरुंगात आहेत व त्यांना या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. गेल्या दीड वर्षात हे बाबा किमान 17 वेळा पारोलवर बाहेर आले. त्यांच्या वाढदिवसाला तसेच लोकसभा, पंजाब, हरयाणाच्या निवडणुकांत सरकार या बाबांवर मेहेरबानी करते व ते मोठ्या सुट्टीवर बाहेर येतात. हे काँग्रेसच्या राज्यात घडले असते तर स्मृती इराणी छाप नेत्यांनी रस्त्यावर उतरून धिंगाणा घातला असता. सध्या आसाराम बापूही पारोलवरच आहे. वाराणसी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत भाजपचे जे पदाधिकारी करतात ते पुढे बलात्काराचे आरोपी होतात. भाजपच्या विकृत चारित्र्याच्या अशा किती कहाण्या सांगाव्यात?

बदलापुरातील दोन लहान मुलीवर शाळेतच अत्याचार झाले. शाळेचे पालकत्व भाजपशी संबंधित व्यक्तीकडे आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या हुकुमाने अत्याचार झाले असा होत नाही. पण ही संस्था काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असती तर एव्हाना देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महिला मंडळाने बदलापुरात जाऊन शाळेच्या पायरीवर फतकल मारली असती, पण आज ते बलात्कारावर वेगळेच प्रवचन झाडत आहेत. बदलापुरात उद्रेक सुरू असताना भाजपचे योगीराज असलेल्या उत्तर प्रदेशात दोन युवतींवर बलात्काराच्या घटना घडल्या. मुरादाबादच्या ठाकूरद्वारा भागात एका इस्पितळात डाक्टरने एका नर्सला ‘बंधक’ बनवून तिच्यावर बलात्कार केला. कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाइतकेच हे प्रकरण गंभीर आहे. त्याच वेळी प्रयागराजमध्येही याच पद्धतीचे बलात्कार कांड घडले. पाटण्यात एका मुलीस गुंडांनी घरातून उचलून नेले. बलात्कार करून तिची हत्या केली. या घटना देशभरात घडत आहेत.

बलात्कार, विनयभंग, महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे व त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. बलात्कार करणारा मुसलमान असेल तर हिंदू समाजाला भडकवून रस्त्यावर उतरवले जाते. ‘लव्ह जिहाद’च्या नावाने आरोळ्या ठोकल्या जातात. उरण येथील यशश्री शिंदवर अत्याचार करणारा मुसलमान होता. त्याविरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले, पण बदलापूर प्रकरणातील नराधम हा हिंदूच आहे व जेथे अत्याचार झाला ती शिक्षण संस्था हिंदुत्ववाद्यांची आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. कारण संस्था भाजपवाल्यांची होती. गृहमंत्री फडणवीस भाजपचेच.

देशातील महिला अत्याचारांची मालिका मोठी आहे. खैरलांजी, दिल्लीची निर्भया, मुंबईतील शक्ती मिल, कठुआ, उन्नाव, कोपर्डी, हैदराबाद, हाथरस, बलरामपूर, उरण, उत्तराखंड, केरळ, मध्य प्रदेश म्हणजे संपूर्ण भारतभर बलात्काराच्या विकृतीने थैमान घातले आहे. पर्यटनासाठी भारतात येणाऱ्या परदेशी महिलांच्या विनयभंग प्रकरणांतही वाढ झाली आहे. मणिपूरसारख्या भारतीय राज्यात महिलांना रस्त्यावर आणून त्यांच्यावर बलात्कार करण्याचे प्रकार घडल्यावरही देशाचे राज्यकर्ते षंढासारखे गप्प बसले. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना दरबारातील सर्वच छप्पन इंच छातीवाले माना खाली घालून बसले होते. त्याच हिंदुत्ववादी पद्धतीने देशाचा सत्ताधारी पक्ष गप्प बसला आहे. विकृतीचा उगम राज्यकर्त्यांकडून होतो. तो खाली प्रजेत झिरपतो. 370 कलम काढणे, सेक्युलर समान नागरी कायदा आणणे, कायद्याचे कलम बदलणे किंवा ब्रिटिशकालीन कायद्यांचे नामांतर करणे अशा फुटकळ कामात भाजपला भलताच रस आहे. हिंदुस्थानात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. कायदा व सुव्यवस्था ढेपाळत आहे आणि देशाचे गृहमंत्री श्री. शहा हे बांगलादेशातील हिंदूंची संख्या कशी घटली यावर भाषणे देत देशाचा छळ करीत आहेत. असे राज्यकर्ते लाभल्यावर देशातील महिलांची सुरक्षा बदलापूर, हाथरस, उन्नावच्या चव्हाट्यावरच येणार! असं म्हणत सांज राऊतांनी संताप व्यक्त केलाय .

Swiggy IPO | Swiggy आणणार वर्षातील सर्वात मोठा IPO; 1.25 लाख कोटीचे असू शकते मूल्य

Swiggy IPO

Swiggy IPO | सध्या भारतामध्ये अनेक कंपन्या आहेत. त्यातील स्विगी ही कंपनी खूप जास्त लोकप्रिय आहे. अनेक लोक हे स्वीगीवरून ऑर्डर घेत असतात. स्वीगी ही कंपनी सर्वात जलद आणि चांगल्या दर्जाचे अन्न लोकांना देत असते. त्यामुळे अनेकांची पसंती स्वीगीला आहे. फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) तिच्या इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) च्या तयारीत व्यस्त आहे. सॉफ्टबँक-गुंतवणूक केलेल्या कंपनीने त्यांच्या IPO द्वारे1 ते 1.2 अब्ज डॉलर्स उभारण्याची योजना आखली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कंपनीला 15 अब्ज डॉलर (सुमारे 1.25 लाख कोटी रुपये) च्या मोठ्या मुल्यांकनात आपला IPO लॉन्च करायचा आहे. हा स्वीगीचा या वर्षातील सर्वात मोठा IPO असू शकतो. फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये स्विगीची मुख्य स्पर्धा झोमॅटोशी आहे, जी आधीच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहे. दोन्ही कंपन्यांनी अलीकडेच इ कॉमर्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे, जिथे किराणा सामान आणि इतर उत्पादने 10 मिनिटांत वितरित केली जातात.

स्विगीने एप्रिलमध्ये IPO द्वारे 1.25 लाख कोटी रुपयापर्यंत उभारण्यासाठी आपल्या भागधारकांकडून मंजुरी घेतली होती. कंपनीचा IPO अर्ज बाजार नियामक सेबीकडून एक किंवा दोन महिन्यांत मंजूर केला जाऊ शकतो. मंजुरी मिळाल्यानंतर, कंपनी सेबीकडे अंतिम दस्तऐवज सादर करेल, ज्यामध्ये IPO लाँच करण्याची तारीख देखील दिली जाईल.

कंपनीने 15 अब्ज मूल्यात IPO लाँच करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, शेवटच्या क्षणी हा आकडा बदलू शकतो; अशी देखील माहिती समोर आलेली आहे. कंपनी IPO द्वारे उभारलेल्या पैशाचा वापर Instamart व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि अधिक स्टोरेज उघडण्यासाठी करेल, जेणेकरून ती Zomato शी स्पर्धा करू शकेल.

याआधी स्विगीने शेवटचा 2022 मध्ये निधी गोळा केला. त्यावेळी कंपनीचे मूल्यांकन 10.7 बिलियन इतके होते. 2021 मध्ये झोमॅटोच्या शेअर्सच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप सध्या सुमारे 28 अब्ज आहे. Goldman Sachs ने एप्रिलमध्ये सांगितले की, क्विक कॉमर्स सेगमेंटमध्ये सध्या देशातील ऑनलाइन किराणा बाजाराचा 45 टक्के हिस्सा आहे, ज्याचा आकार सुमारे 5 अब्ज आहे. अहवालात म्हटले आहे की 2023 पर्यंत, द्रुत व्यापाराचा हिस्सा 70 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट!! खडकवासला धरणातून विसर्ग सुरु

Pune Rain Update

Pune Rain Update । गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी वरुणराजा धो- धो कोसळत आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज हवामान विभागाकडून पुणे, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज म्हणजेच रविवारी याठिकाणी २०४ मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.

नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये – Pune Rain Update

पुण्यातील खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळी क्षेत्रात गेल्या काही तासांमध्ये रिमझिम पाऊस (Pune Rain Update) सुरु आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून साधारण 35,310 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. आज सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग २३ १२२ क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला. तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढल्यास खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग वाढवला जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात आणखी तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत वरुणराजा धो धो कोसळेल असा अंदाज आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, रायगड या ३ जिल्ह्याना रेड अलर्ट दिला आहे तर पालघर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात आज मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

CISF Recruitment 2024 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1130 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

CISF Recruitment 2024

CISF Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊ आलेलो आहोत. ती म्हणजे आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल फायरमन (CISF Recruitment 2024) या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या तब्बल 1130 रिक्त जागा आहेत. आणि त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरतीसाठी 21 ऑगस्ट रोजी नोटिफिकेशन जारी झालेले आहे. 30 ऑगस्ट 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीचा अर्ज करा.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल फायरमन या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदे | CISF Recruitment 2024

कॉन्स्टेबल फायरमन या पदाच्या एकूण 1130 रिक्त जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण वर्गासाठी 466 जागा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 114 रिक्त जागा आहेत. अनुसूचित जातींसाठी 153 रिक्त जागा आहेत.
अनुसूचित जमातीसाठी 161 जागा आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीयांसाठी 236 रिक्त जागा आहेत.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख 30 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024

अर्ज पद्धती | CISF Recruitment 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई आणि रत्नागिरी येथे जेट्टींचा होणार विकास ; भगवती बंदरात क्रूझ टर्मिनल साठी 302 कोटी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या भगवती बंदरात क्रूज टर्मिनल उभारण्यासाठी 302 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. यामध्ये गाळ काढणे, खोदकाम करणे, लाट रोधक भिंतीची उंची वाढवणे, टर्मिनल इमारत उभारणे, रस्ते वाहनतळ व फुटपाथ उभारणे, संरक्षक भिंत उभारणे, विद्युतीकरण सांडपाणी योजना, उद्यान, अग्निरोधक यंत्रणा उभारणे यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.

निधीचे वाटप

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी राज्य सरकार 50%, केंद्र सरकार 50% निधी देणार आहे. राज्य सरकार 2024 -25 मध्ये एक कोटी, 2025- 26 मध्ये 70 कोटी आणि 2026- 27 मध्ये 80.81 कोटी असा 151 कोटी 81 लाख रुपयांचा निधी देणार आहे, तर केंद्र सरकार आहे तेवढाच वाटा उचलणार आहे. भगवती बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं मध्यवर्ती ठिकाण आहे.

इतर कामांचा समावेश

  • मोरा तालुका उरण येथे रोरो जेट्टी बांधणे – 88.72 कोटी
  • खारवाडीश्री इथे जेट्टी आणि अन्य सुविधा निर्माण करणे – 23.68 कोटी
  • ठाणे येथे बांधकाम करणे 36.66 कोटी.
  • मीरा-भाईंदर येथे जेट्टीचे बांधकाम 30 कोटी
  • डोंबिवली येथे जेट्टी 24.99 कोटी
  • काल्हेर इथे जेट्टी 27.72 कोटी.
  • गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब जवळ जेट्टी उभारणी व अन्य कामे 229 कोटी.
  • एलिफंटा इथे जेट्टी ची सुधारणासाठी 87.64 कोटी.
  • उत्तम येथे रोरो जेट्टीचा बांधकाम 30.89 कोटी.
  • असे एकूण 579 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

गडद रंगाच्या कपड्यावर पडतात पांढरे डाग ? वॉशिंग मशीन मध्ये घाला ‘ही’ गोष्ट

हल्ली घरोघरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरले जाते. मात्र अनेकदा आपण मशीनमध्ये फिकट आणि गडद रंगांचे कपडे एकत्र टाकतो त्यामुळे गडद रंगाच्या कपड्यांवर पांढरे डाग पडतात. तुम्ही सुद्धा या समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला एक ट्रेक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे गडद रंगाचे कपडे पांढरे डाग न पडता आहे तसे राहतील. चला जाणून घेऊया…

काय कराल उपाय ?

हल्ली बऱ्याच घरांमध्ये वॉशिंग मशीन चा वापर केला जातो. मात्र वॉशिंग मशीनचा वापर करत असताना जर तुम्ही डिटर्जंट किंवा लिक्विड डिटर्जंट कलरच्या कपड्यांमध्ये घातले तर काही वेळेला कलर जाण्याची शक्यता असते. गडद रंगाच्या कपड्यांवरील पांढरे डाग काढून टाकण्यासाठी एक सोपा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी वॉशिंग मशीन मध्ये वॉशिंग पावडर आणि कपड्याचे कंडिशनर आणि पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पांढरे डाग पडलेले किंवा काळे किंवा गडद रंगाचे कपडे घाला आणि सगळ्यात शेवटी मशीनमध्ये ॲल्युमिनियम फॉईलचा एक गोळा करून घाला.

म्हणून पडतात पांढरे डाग

तसे पाहायला गेल्यास गडद रंगाचे कपडे धुताना त्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. त्यामुळे यावर लिंट तयार होऊन पांढरे डाग तयार होतात. असे कपडे धुताना त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल चे काही गोळे घातले तर ॲल्युमिनियम फॉइल स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीला आपल्याकडे खेचून घेतो. त्यामुळे गडद रंगाच्या कपड्यावर पांढरे डाग पडत नाहीत. यासोबतच शक्यतो काळा किंवा गडद रंगाचे कपडे धुवायला टाकताना नेहमी उलटे करून टाका म्हणजे आतली बाजू वर जाऊन धुवायला टाकावे त्यामुळे फारसे काळे डाग पडत नाहीत.

Real Estate : घरांच्या किंमती वाढणार की घटणार? काय सांगतोय नाइट फ्रॅंकचा अहवाल

Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये तर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना घर घेणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबतचा एक अहवाल आता समोर आला असून त्यामध्ये मोठी महत्वाची माहिती समोर आली आहे. रिअल इस्टेट कन्सलटंट फर्म नाइट फ्रॅंक यांनी हा अहवाल सादर केला असून या अहवालानुसार २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत देशातील मालमत्तेच्या किंमतीत मोठी वाढ झाली (Real Estate)आहे. चला जाणून घेऊया…

मुंबई जगात दुसऱ्या क्रमांकावर (Real Estate)

अहवालात मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील तीन मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरू यांचा समावेश आहे. त्यातही मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जगातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये मुंबईतील घरांच्या किमती वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अर्थात मागील वर्षीच्या जुनच्या तिमाहीमधील घरांच्या किंमतींच्या तुलनेत यावर्षीच्या तिमाहीत मुंबईतील घरांच्या किंमती १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हा आकडा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर (Real Estate)

दिल्लीच्या बाबतीत सांगायचे झाले तर नवी दिल्लीच्या रहिवासी भागातील किंमतीमध्ये १० टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये 10.6 टक्क्यांनी वाढले आहेत. तर बंगळुरू बद्दल सांगायचं झाल्यास बंगळुरू येथील घरांच्या दरात वार्षिक आधारावर 3.7 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. घरांच्या किंमती सर्वाधिक वाढणाऱ्या शहरांमध्ये नवी दिल्ली तिसऱ्या तर बंगळुरू जागतिक (Real Estate) पातळीवर १५ व्या स्थानावर आहे.

घरांच्या किंमती चढ्याच राहणार ? (Real Estate)

त्यामुळे येत्या काळात भारतीय बाजारात घरांच्या मागणीत वाढ होऊन, घरांच्या किंमती या चढ्याच राहण्याची शक्यता असल्याचे नाइट फ्रॅंकने आपल्या अहवालात म्हटले आहे.