Air India Flight | अनेक लोक हे विमानाने प्रवास करत असतात. काही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करतात. तर काहीजण फिरायला जात असतात. परंतु विमानाचे तिकीट हे खूप महाग असते. परंतु आता ज्या लोकांना विमानाने प्रवास करायचा आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता टाटा ग्रुप इंडियाने एक विशेष फ्लाईटसाठी (Air India Flight) तिकीटची ऑफर दिलेली आहे. त्यामुळे आता या कंपनीच्या फ्लाईटने प्रवास पकरणाऱ्यांना केवळ 1700 रुपयांमध्ये फ्लाईट बुक करता येणार आहे. देशांतर्गत फ्लाईट ही प्रत्येकासाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे. हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही देखील या उपक्रमाचा नक्की भाग होऊ शकता आणि याचा लाभ देखील घेऊ शकता.
एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून ही संपूर्ण माहिती देण्यात आलेले आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईट किंवा मोबाईलवरून तिकीट बुक करावे लागेल. त्याचप्रमाणे सगळ्यात खास गोष्ट म्हणजे एचडीएफसी बँकेची तुम्ही जर ग्राहक असाल तर त्यांच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर करून तुम्हाला देशांतर्गत प्रवासासाठी अतिरिक्त 10 टक्के सूट देखील मिळू शकता.
कंपनीने ही ऑफर केवळ 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत ठेवलेली आहे. 24 ऑगस्टपर्यंत प्रवासी यामधून तिकीट बुक करू शकता. सणासुदीच्या काळात जर तुम्ही देशांतर्गत फ्लाईटने जायचा प्लॅन करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक अतिशय चांगली संधी आहे. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवता तुम्ही एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमचे तिकीट बुक करू शकता. तसेच तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त देखील मिळणार मिळणार आहे.
एअर इंडियाच्या या अनोख्या ऑफरमुळे आता अनेक सामान्य लोकांना देखील विमानाने स्वस्त दरात प्रवास करता येणार आहे. अनेक लोकांचे विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न असते. परंतु आर्थिकदृष्ट्या हा प्रवास करणे लोकांना परवडत नाही. परंतु आता केवळ 1700 रुपयांपासून हे तिकीट चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत भारतातील नवनवीन ठिकाणी जाऊ शकता. अगदी कमी खर्चामध्ये तुमची ही ट्रीप होऊन जाईल अगदी तीन दिवसासाठी या कंपनीने ही ऑफर ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या.
आता संपूर्ण महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना कामांना सुट्ट्या देखील असतात. यावेळी जर तुम्ही विमानाने प्रवास करण्याची योजना आखली, तर तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये हा प्रवास करू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी कमी पैसे खर्च करून आणि वेळेचा फायदा घेऊन एअर इंडियाच्या या ऑफरचा फायदा घेऊन भारतामध्ये प्रवास करू शकता.
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशातील सर्वात पॉवरफुल नेते मानले जातात. २०१४ पासून ते आजपर्यंत म्हणजेच जवळपास १५ वर्ष मोदी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत कायम राहणार आहे. देशात मोदींना आव्हान देईल असा त्यांच्या तोडीचा एकही नेता भाजपमध्येही नाही आणि विरोधी पक्षातही नाही. परंतु सध्या मोदींचे वय ७३ असून २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांचं वय ७८ वर्ष होईल. अशावेळी सत्ता आल्यास ते पुन्हा चौथ्यांदा पंतप्रधान होणार कि आपला उत्तराधिकारी म्हणून पक्षातील दुसऱ्या कोणत्या तरी नेत्याच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ टाकणार? हे बघायला हवं. भाजपमध्ये अमित शाह (Amit Shah), राजनाथ सिंह (Rajnath Singh) , योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), नितीन गडकरी (Nitin Gadkari) असे एक से बढकर एक नेते आहेत. मात्र जनता मोदीनंतर कोणाला स्वीकारेल हा प्रश्नच आहे. याच पार्श्वभूमीवर मूड ऑफ द नेशन 2024 सर्वेक्षणात, इंडिया टुडेने नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून कोणाला पाहायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक लोकांनी अमित शहा यांना पसंती दर्शवली आहे.
कोणाला किती टक्के समर्थन-
मूड ऑफ द नेशन 2024 (Mood Of Nation 2024) च्या सर्वेक्षणात 25 टक्क्यांहून अधिक लोकांनी अमित शहा यांना मोदींचे उत्तराधिकारी मानले आणि मोदी नंतर अमित शहा यांनाच पंतप्रधान पदासाठी आपली पसंती दर्शवली. यानंतर दुसरा नंबर लागला तो म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा… आदित्यनाथ यांनाही पंतप्रधान पदासाठी 19 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला. यात तिसरं नाव आले ते विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांचे… . 13 टक्के लोकांना असं वाटतं कि नरेंद्र मोदीनंतर नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान व्हावेत.
शिवराज सिंह आणि राजनाथ सिंह देखील शर्यतीत
अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांच्याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे सुद्धा मोदींच्या उत्तराधिकारीच्या शैर्यतीत आहेत. 5 टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान याना आणि 5 टक्के लोकांनी राजनाथ सिंह याना पंतप्रधान पदासाठी पसंती दिली आहे. गेल्या दोन सर्व्हेंच्या तुलनेत जर बघीतल तर राजनाथ सिंह यांना जनतेचे समर्थन वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. तर योगी आदित्यनाथ यांची पसंती घटल्याचे दिसत आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागावाटपाची अजून लांब लांब पर्यंत चर्चा नसताना अजितदादांनी कागलमध्ये मात्र हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून टाकली… अजित दादांनी एका दगडात अनेक पक्षी मारले… पण मुश्रीफांची उमेदवारी जाहीर झाल्याने एका मोठ्या राजकीय समीकरणांचा कागलमध्ये जन्म होण्याची शक्यताय… कागलचा आमदार कोण? असा साधा सोपा प्रश्न विचारला तरी हसन मुश्रीफ गट आणि दुसरीकडे समरजीत सिंग घाटगे गट अगदी कॉन्फिडंटली आमदार तर मीच! असं ठासून सांगतात… पण ज्या कागलच्या मातीचा अंदाज भल्या भल्यांना लागत नाही, त्याच कागलचं वर्तमान राजकारण सध्या शरद पवारांच्या हातातय… होय तुम्ही बरोबर ऐकलंत… यंदा निवडणूक कोणीही लढो, आमदार मात्र तुतारीचाच! असं आम्ही का म्हणतोय? मुश्रीफांच्या विरोधात लढत देण्यासाठी हातात तुतारी घेण्याचा घाटगेंचा प्लॅन खरच ठरलाय का? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
खरंतर जागा वाटपाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच कोल्हापुरातील सर्वात जास्त इंटरेस्टिंग असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघासाठी अजितदादांनी विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून कागलची राजकीय समीकरण बदलून टाकली… कारण या जागेसाठी मुश्रीफांचे पारंपारिक विरोधक समरजीतसिंह घाटगे देखील इच्छुक होते… सध्या भाजपात असणाऱ्या घाटगेंना भाजप हायकमांकडून उमेदवारीचाही शब्द दिल्याच्या चर्चा होत्या… त्यामुळे कागलच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत… यासोबतच मुश्रीफही आपल्या गटाकडूनच लढतील याचं भलं मोठं टेन्शन अजित दादांनी ही उमेदवारी जाहीर करून घालून टाकलं… त्यामुळे प्रतिस्पर्धी घाटगेंचा भाजपकडून उमेदवारी मिळण्याचा चान्स डायरेक्ट निकालात निघून आता त्यांच्याकडे केवळ अपक्ष किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच पर्याय हाताशी राहतो….
या सगळ्या मधल्या राजकारणात समरजीतसिंह घाटगेंना गळाला लावण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केल्याच्याही चर्चा झाल्या… घाटगेंचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून घेण्यासाठी दोनदा संपर्क झाला… याची सगळी जबाबदारी जयंत पाटलांच्या खांद्यावर असल्याचेही बोलण्यात येतय… मात्र मी कुठेही जाणार नसून माझ्या विरोधात खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचं क्लेरिफिकेशन घाटगेंनी दिलं असलं तरी ग्राउंड स्पष्ट सांगतय की, घाटगेंना काटे की टक्कर द्यायची असेल किंवा मुश्रीफांचं वर्चस्व मोडीत काढून आमदार व्हायचं असेल तर सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय नाहीये…आम्ही असं का म्हणतोय? ते समजून घेण्याआधी कागलच्या वर्तमान परिस्थितीवर एकवार नजर टाकूयात…. शरद पवारांचा वरदहस्त होता म्हणूनच कागलमध्ये हसन मुश्रीफांना राजकीय बस्तान बसवता आलं, हे वास्तव आहे… सदाशिवराव मंडलिक यांच्या हाताला हात धरून राजकारण करणाऱ्या मुश्रीफांनी राष्ट्रवादीत स्वतःचा स्वतंत्र मुश्रीफ गट स्थापन केला… विशेष म्हणजे शरद पवारांसमोर जेव्हा मंडलिक की मुश्रीफ ? असा पेच होता तेव्हा शरद पवारांनी मुश्रीफांच्या पारड्यात वजन टाकलं… यावरून मुश्रीफांच्या राजकीय जडणघडणीत शरद पवारांचा किती वाट आहे? ते वेगळ्या शब्दात सांगायला नको… मुश्रीफांवर ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा दबाव होता… तरीदेखील ते हिंमतीने त्याला विरोध करत होते… कागल ची माती लढणाऱ्याच्या पाठीशी उभी राहते… इथेही तसंच होतं… ईडीच्या विरोधात फाईट दिल्यामुळे मुश्रीफांच्या बाजूने सहानुभूतीचा गट सोबत होता…
पण अजितदादांसोबत महायुतीत जाऊन मुश्रीफांच्या बाजूने असणारा हा सहानुभूतीचा टक्का वेगाने घसरला… आपल्याला याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठा लॉस होऊ शकतो, याचीही पुरेपूर कल्पना मुश्रीफांना आहेच… पण इथं समरजीतसिंह घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर कागलची फाईट घाटगे विरुद्ध मुश्रीफ अशी दोन गटांमध्येच होणार… गटाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मुश्रीफांचे पारड हे नेहमीच जड दिसतं… अशा वेळेस घाटगे जर शरद पवार गटात आले… तर ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार… आणि अप्रत्यक्षपणे शरद पवार विरुद्ध हसन मुश्रीफ अशी फाईट होते… इथं पारड अर्थातच शरद पवारांच्या बाजूने झुकतं… कागल च्या बाबतीत काही अभ्यासक सांगतात की, मतदारसंघात जवळपास 35000 मतदान असं आहे जे की, इमोशनसवर मतदान करतं… सध्याच्या घडीला हे सगळं मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे… त्यातही जेव्हा विषय शरद पवारांच्या तुतारीचा येतो, तेव्हा हे सारं मतदान तुतारीच्या उमेदवाराच्या पाठीशी येऊ शकतं… थोडक्यात हसन मुश्रीफांच्या राजकीय वर्चस्वाला मात द्यायची असेल तर शरद पवारांच्या तुतारी शिवाय पर्याय नाही, हे तर क्लिअर कट आहे…
सध्या शिवसेना ठाकरे गटात असणाऱ्या संजय घाटगेंनी महाविकास आघाडी धर्माला न जागता कागल विधानसभेसाठी हसन मुश्रीफांना पाठिंबा देऊन टाकलाय(sanjay ghatge with hasan mushrif)… त्यामुळे मुश्रीफ यांचं काकणभर का होईना, पण पारडं सध्या जड आहे… त्यामुळे मंडलिक गट नेमकं कोणाच्या बाजूने झुकतो? यावरही कागलची बरीचशी समीकरणे अवलंबून असणार आहेत… मुश्रीफ सध्या कागलमध्ये प्लस मध्ये आहेत का? असं जेव्हा आपण प्रश्न विचारतो… तेव्हा त्याचे उत्तर हो असंच येतं…. पण जेव्हा शरद पवार यांच्या बाजूने असणारी सहानुभूती, महायुतीला कंटाळलेली जनता, घाटगे गटाची ताकद आणि या सगळ्यांना मिळणारा कागलमधील अंतर्गत गटातटाचा पाठिंबा अशा स्केल वर हे चित्रं पाहिलं तर कागलमध्ये तुतारी आरामात वाजतेय, असं चित्र आहे… त्यामुळे आता घाटगे यास संधीचं सोनं करून तुतारी हाती घेतली? की काही वेगळा निर्णय घेतील हे त्यांचं त्यांनाच ठावूक…
Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. यामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना चांगली नोकरी देखील लागलेली आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता नेव्हल शिप रिपेयर यार्ड (Naval Ship Repair Yard Bharti 2024)यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती शिकाऊ या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 240 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल. त्याचप्रमाणे 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | Naval Ship Repair Yard Bharti 2024
या भरती अंतर्गत शिकाऊ या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
पदसंख्या
या भरती अंतर्गत शिकाऊ या पदाच्या 240 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
वयोमर्यादा
21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.
Pune Metro : राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुणे आता झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येऊन वसले आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी पुण्याच्या वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्यातही सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस आणि मेट्रो हे दोन्ही घटक महत्वाची भूमिका बजावत आहेत.
नव्याने सुरु झालेल्या मेट्रोला पुणेकरांनी चांगलीच पसंती दर्शवली असून कार्यालयीन वेळेत मेट्रोच्या काही मार्गांवर गर्दी पहायला मिळते. म्हणूनच आता पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या मार्गांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांची नक्कीच मोठी सोय होणार (Pune Metro) आहे.
दर 7 मिनिटांनी मेट्रो
सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी हे 2 मेट्रो मार्ग सुरू आहेत. या दोन्ही मार्गावरील मेट्रोला पुणेकरांची गर्दी पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवेच्या फेऱ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आधी या दोन्ही मार्गांवर सकाळी व सायंकाळी जास्त गर्दी असण्याऱ्या वेळेत प्रत्येक साडेसात मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होत असे. सकाळी ८ ते ११ व दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची वारंवारिता ७.५ मिनिट होती. पण आता ही वारंवारिता ७ मिनिटे करण्यात आली आहे. म्हणजे आता प्रवाशांसाठी दर ७ मिनिटाला मेट्रो उपलब्ध होणार आहे.
मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ
पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गावर 113 ऐवजी आता 117 मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत. तसेच वनाज ते रामवाडी या मार्गावर 114 ऐवजी 118 मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन वेळेत मेट्रोने ये-जा करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
येरवडा मेट्रो स्थानक सुरु
वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम आता पूर्ण झालं असून दिनांक 21 ऑगस्ट पासून येरवडा स्थानक सुरू करण्यात आले आहे त्यामुळे पुणेकरांना या सेवेचा आज पासून लाभ घेता येणार आहे. पुण्यातील इतर मेट्रोस्थानाकांप्रमाणेच येरवड्यातील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आता मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. सध्याची पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या पाहता मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. येरवडा मेट्रोस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्यामुळे (Pune Metro) वनाज ते रामवाडी पर्यंतची मेट्रो लाईन पूर्णपणे कार्यान्वित होत आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या २ महिन्यावर आली असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी सुद्धा पुनः एकदा कामाला लागली आहे. मुंबईत महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) भव्य असा मेळावा सुद्धा पार पडला. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकदिलाने प्रचार करत आहेत. मात्र सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल? यावरून महाविकास आघाडीतच बिघाडी पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण तो चेहरा जाहीर करावा असं आवाहन दोन्ही मित्रपक्षांना केलं. मात्र आधी निवडणूक, मग मुख्यमंत्री असं म्हणत काँग्रेस (Congress) नेत्यांनी ठाकरेंच्या या आवाहनाला ठेंगा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यात.
16 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच जो कोणी चेहरा असेल त्याला आपला जाहीर पाठिंबा असेल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र त्यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जात आहे. त्यानंतर किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्यानंतर मात्र काँग्रेस नेत्यांनी हा प्रस्तावही पूर्णपणे फेटाळल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून कोणतीही चर्चा नको अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता त्यांची हि मागणी ठाकरे गट स्वीकारणार का ते पाहायला हवं.
दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र अतिशय सावध भूमिका घेतली आहे. आम्ही शरद पवारांच्या नावावरच आणि चेहऱ्यावरचं निवडणूक लढवणार आहोत. मात्र महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी जो कोणी चेहरा देईल त्याला आमचा पाठिंबा राहील असं म्हणत पवार गटाने ठाकरेंच्या भूमिकेला फार काही आडकाठी केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून खरी चुरस असेल ती म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातच…. येत्या काही दिवसात सांगलीतील कडेगाव येथे महाविकास आघाडीतील बडे नेते पुन्हा एकदा एकाच स्टेजवर दिसणार आहे तेव्हा मुख्यमंत्री पदाबाबत कोणती घोषणा करण्यात येते का? हे पाहायला हवं.
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शरद पवारांना झेड प्लस (Sharad Pawar z+ Security) सुरक्षा देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना शरद पवारांना हि सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्या अवतीभोवति आता 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. मात्र या सुरक्षा वाढीवरून शरद पवारांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्यासाठी हि झेड प्लस देण्यात आली असावी असं शरद पवारांनी म्हंटल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांना त्यांच्या वाढीव सुरक्षेबाबत विचारण्यात आलं, त्यावेळी ते म्हणाले याबाबत मला काही माहिती नाही, गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की 3 लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती तीन लोकं म्हणजे मी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. आता मला सुरक्षा कशासाठी दिली ते माहीत नाही. पण निवडणुका डोळ्यासमोर आहेत, म्हणून सुरक्षा दिली असावी. माझ्या दौऱ्याची ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, बाकी मला काही माहिती नाही. अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केली तसेच यासंदर्भात मी गृहमंत्रालयातील जबाबदार व्यक्तीशी संवाद साधणार आहे, त्यांच्याशी बोलून माहिती मिळाली की पुढे काय निर्णय घ्यायचा, काय करायचं ते ठरवणार आहे असंही शरद पवारांनी म्हंटल.
राणेंची पवारांवर टीका –
दरम्यान, शरद पवारांना केंद्र सरकार कडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत निलेश राणे म्हणाले, शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, ५५ CRPF त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे?? बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?? असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता.
ISRO Chandrayaan 3 | आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या अंतराळात नक्की काय चाललेले आहे? इथे कोणत्या गोष्टी असतील? या सगळ्याची उत्सुकता नेहमीच असते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था देखील अवकाशातील विविध गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. अवकाश क्षेत्रामध्ये खूप मोठी मोठे योगदान त्यांनी दिलेले आहेत. अंतराळामध्ये अनेक मोहिमा केलेल्या आहेत. आणि त्या यशस्वी देखील झालेल्या आहेत. परंतु आता यशामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. ती म्हणजे आता चंद्रयान 3 (ISRO Chandrayaan 3) ने एक मोठी उकल केली आहे. ज्यामुळे एक मोठे सत्य जगासमोर आलेले आहे.
मागील वर्षी चंद्रयान 3 चे (ISRO Chandrayaan 3) लँडिंग झालेले आहे. आणि 1 वर्षा नंतरही हे चंद्रयान 3 कार्यरत आहेत. या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला पृथ्वीवर पोहोचत आहे. भारताने दक्षिण ध्रुवापासून चंद्रयान 3 ची मोहीम सुरू केलेली आहे. असे म्हटले जाते की, दक्षिण ध्रुवावर गेल्या अनेक वर्षापूर्वी समुद्राचा अच्छादन होतं. म्हणजेच असे म्हटले जाते की, चंद्राच्या पृष्ठभागापासून आतल्या भागांमध्ये लावारस होता. या लाभार्थ्याच्या साठ्यांना मॅग्मा ओशन किंवा लावारसाचा महासागर असे देखील म्हटले जाते.
याबद्दल अनेक शास्त्रज्ञांनी आणि अभ्यासकांनी त्यांचे मत मांडलेले आहेत. आणि त्यांनी मांडलेले मतानुसार 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा चंद्राची उत्पत्ती झाली होती. तेव्हा त्याचे तापमान हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर फेरोन आणि एनर्थोसाइड या नावाचं एक खनिज चंद्राच्या पृष्ठभागावर साचू लागलं. हे खनिज वजनाने अगदी हलकं होतं. त्यामुळे ते चंद्रावर ते तरंगत राहिले. आणि त्यामुळे या वितळलेल्या पर्वतावर चंद्राच्या पृष्ठभागावर एक थर तयार झाला. .
अनेक शास्त्रज्ञांनी चंद्राच्या उत्पत्ती संदर्भात अनेक सिद्धांत मांडलेले आहे. आणि ते सिद्धांत दिवसेंदिवस भक्कम होताना दिसत आहे. भारताने देखील याबाबत अनेक उकल मांडलेले आहेत. ते आपल्या मोहिमेदरम्यान त्यांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. चंद्रावर जी काही नवीन माहिती मिळत आहे. ती माहिती पृथ्वीवर येत आहे.
चंद्राचे केलेले निरीक्षण आणि मांडण्यात आलेल्या सिद्धांतानुसार चंद्राची उत्पत्ती ही प्रोटोप्लेनेट ग्रह निर्माण होण्यापूर्वीच झालेली आहे. यापूर्वी लादण्याच्या क्रियेमुळे ही झाली आहे. यातूनच एक मोठा ग्रह म्हणजे पृथ्वी आणि लघुग्रह चंद्र निर्माण झाला. चंद्र हा खूप उष्ण होता. त्यामुळे त्याच्यावरील सगळ्या आवरण वितळले आणि मॅग्मा महासागराची उत्पत्ती झाली.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील ४ आणि ६ वर्षांच्या २ चिमुकल्यांवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात उद्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्याच्या बंद मध्ये अनेक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या सेवांवर परिणाम होणार? Maharashtra Bandh
महाराष्ट्र बंदचा सर्वात मोठा परिणाम हा दळणवळ्णावर होऊ शकतो. एसटी बस आणि रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसू शकतो. २-३ दिवसांपूर्वी बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता, त्यामुळे उद्याही महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवेवर परिणाम होईल असं वाटतंय. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते त्यामुळे एसटी सेवाही काही ठिकाणी ठप्प होऊ शकते. या बंदच्या माध्यमातून विरोधक ताकद दाखवण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. दूध, भाजीपाला मार्केट, किराणा दुकाने बंद असतील. तसेच हॉटेल्स सुद्धा बंद असू शकतात. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावे असं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे, त्यामुळे या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
बंदमध्ये सहभागी व्हा – उद्धव ठाकरे
मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद (Maharashtra Bandh) पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महाराष्ट्र बंदमध्ये राजकारण नाही – नाना पटोले
बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केला आहे. हि संस्था भाजप आणि आरएसएसची असल्याने त्यांची बदनामी होऊ नये याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. महायुतीला या घटनेचं काहीही घेणंदेणं नसून सत्तेची गुर्मी त्यांच्यात आहे. आम्हाला यामध्ये राजकारण करायच नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळिमा लावायचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी कडून देण्यात आली आहे. या बंद मध्ये महाविकास आघाडी आणि आमचे सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहोत. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्रातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकाराला आरसा दाखवायचा प्रयत्न करू असं आवाहन नाना पटोले यांनी केलं.
Nicotine | आजकाल अनेक लोक हे धूम्रपान आणि तंबाखूच्या आहारी गेलेले असतात. या धूम्रपान आणि तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे एक रसायन असते. ज्यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होतो. परंतु आता या पदार्थांशिवाय बाकी असे अनेक खाद्यपदार्थ देखील आहेत. ज्यामध्ये निकोटिन (Nicotine) आढळते तसेच. निकोटिनमुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो का? असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. परंतु आज आपण निकोटीन आणि कर्करोग यांच्यातील नेमका संबंध काय आहे? आणि निकोटीन कोण कोणत्या खाद्यपदार्थांमध्ये आढळते? त्यापासून कसा बचाव करायचा? या सर्वांची माहिती पाहणार आहोत.
निकोटीन आणि कर्करोग संबंध | Nicotine And Cancer
निकोटीन हा थेट कर्करोगाला कोणत्याही कर्करोगाला कारणीभूत ठरत नाही. परंतु हे निकोटीन आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. तंबाखूमध्ये असणारे मेन रसायन हे निकोटीन असते. निकोटीनमुळे तंबाखूची चव तशी लागते. अनेक लोकांना निकोटिनचे व्यसन देखील लागते. त्यामुळे ते तंबाखूचे वारंवार सेवन करतात. परंतु ही तंबाखू आणि त्यातील निकोटीन आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. तंबाखूमध्ये निकोटीन व्यतिरिक्त टार आणि कासिनोजेन्स यांसारखे रसायने आढळतात. आणि या रसायदनामुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढतात. आणि कर्करोगाचा धोका देखील निर्माण होतो. या रसायनांमुळे फुफुस, तोंड, घसा आणि इतर अवयवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार तंबाखू खात असते, तेव्हा त्या व्यक्तीला तंबाखूची नाहीतर त्यात असलेल्यांनी निकोटिन लागत असते. त्यामुळे त्याला ते व्यसनच लागून जाते.
निकोटीन कोणत्या खाद्य पदार्थांमध्ये आढळते?
टोमॅटो – टोमॅटोमध्ये नैसर्गिकरित्याने निकोटिन आढळते परंतु ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये असते.
बटाटा – बटाटामध्ये देखील नैसर्गिक निकोटीन असते. परंतु त्याची मात्र देखील अगदीच कमी असते.
वांगी – वांग्यांमध्ये देखील निकोटीन असते. परंतु ते आपल्या शरीराच्या दृष्टीने अगदी योग्य प्रमाणात असते.
हिरवी मिरची – हिरव्या मिरच्यांमध्ये देखील निकोटीनचे प्रमाण अगदी कमी असते. या सगळ्या पदार्थांमध्ये निकोटीनचे प्रमाण अगदी कमी असते. त्यामुळे आपल्या आरोग्याला यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही.
निकोटीन म्हणजे काय? | What Is Nicotine ?
निकोटीन हे एक नैसर्गिक असे रसायन आहे. ते तंबाखू या वनस्पतीमध्ये आढळते. निकोटीन हा व्यसनाधीन करणारा एक पदार्थ आहे. म्हणजेच जर या निकोटीनचे सेवन कोणी केले, तर ते सातत्याने त्याचे व्यसन करू शकतात. या निकोटीनचा मध्यवर्ती मज्जा संस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक बद्दल होतात. निकोटिन अतिसेवनामुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. त्याचप्रमाणे लोकांचा मूड सुधारतो आणि त्यांना एकदम आरामदायी वाटते. त्यामुळे या गोष्टीचे व्यसन लागते. निकोटीन हे स्वतः कर्करोगास कारणीभूत नसतात. परंतु तंबाखूमध्ये इतर काही घटक असतात. ते घटक निकोटिन या रसायनाशी एकत्र झाल्यावर कर्करोगाचा गंभीर धोका निर्माण होतो.