Sunday, December 21, 2025
Home Blog Page 517

Railway News : खुशखबर ! जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

Railway News : श्रावण महिना सुरु असल्यामुळे अनेक सण उत्सवांना सुरुवात झाली आहे. या निमित्ताने अनेकजण प्रवास करीत असतात. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील अधिक असते. म्हणूनच रेल्वे गाडयांना होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे या विशेष गाड्या जळगाव (Railway News) भुसावळ मार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. चला जाणून घेऊया काय आहे या गाड्यांचे वेळापत्रक

दादर-भुसावळ (Railway News)

गाडी क्र. ०९०५१ ही दादर-भुसावळ आणि गाडी क्र. ०९०५२ भुसावळ – दादर त्रि- साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दि. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत, ट्रेन क्र. ०९०४९ दादर-भुसावळ साप्ताहिक आणि क्र. ०९०५० भुसावळ – दादर साप्ताहिक विशेष गाडी २७ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बलसाड दानापूर (Railway News)

क्र. ०९०२५ बलसाड दानापूर साप्ताहिक गाडी ३० डिसेंबरपर्यंत, तर क्र. ०९०२६ दानापूर- बलसाड साप्ताहिक गाडीला ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राजकोट-मेहबूबनगर

ट्रेन क्रमांक ०९५७५ राजकोट-मेहबूबनगर ही रेल्वे ३० डिसेंबर २०२४ पर्यंत, तर क्र. ०९५७६ मेहबूबनगर-राजकोट ही ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे.

उधना-पाटणा (Railway News)

क्र. ०९०४५ उधना-पाटणा ही गाडी २७ डिसेंबर, तर क्र. ०९०४६ पाटणा- उधना साप्ताहिक विशेष गाडी २८ डिसेंबरपर्यंत. क्र. ०९०४१ उधना-छपरा ही गाडी २९ डिसेंबर, तर क्र. ०९०४२ छपरा-उधना साप्ताहिक गाडी ३० डिसेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे.

CIDCO Lottery 2024 : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; 903 घरांसाठी लॉटरी निघणार

CIDCO Lottery 2024 navi Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपलं हक्काचं घर असणं ही एक खूप मोठी बाब आहे. अशातच म्हाडा, सिडको अशा संस्थानकडून मुंबईत बजेटमध्ये घर घेण्याची संधी मिळते. म्हाडाची मुंबई लॉटरी आधीच निघाली आहे. यामध्ये 2030 घरांचा समावेश आहे. मात्र तुमची ही संधी हुकली असेल तर चिंता करू नका कारण सिडको (CIDCO Lottery 2024) तुम्हाला संधी देत आहे.मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतल्या 903 घरांसाठी लवकरच लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईत असणारी ही घर कोणत्या ठिकाणी आहेत असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही घरं खारघर, कळंबोली आणि घनसोली या नोड मध्ये असणार आहेत.

213 सदनिका उपलब्ध – CIDCO Lottery 2024

या तिन्ही नोड मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 38 सर्वसामान्य गटासाठी 175 अशा एकूण 213 सदनिका उपलब्ध असणार आहेत. तर खारघर मध्ये सिडकोच्या स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन संकुलातील 689 घरांसाठी यामध्ये समावेश असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ठिकाणे सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी आहेत म्हणजेच जवळपास रस्ते, मेट्रोसेवा आणि रेल्वे स्थानक आहेत. त्यामुळे इथे घर घेण्याची सुवर्णसंधी सिडको न उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुम्हाला जर नवी मुंबईमध्ये घर घ्यायचं असेल तर येत्या 27 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या जाहिरातीकडे आवर्जून लक्षात ठेवा.

आवश्यक कागदपत्रे

सिडकोच्या लॉटरीसाठी (CIDCO Lottery 2024) तुम्हाला अर्ज करायचा असेल तर काही कागदपत्र तुमच्या जवळ असणं गरजेचे आहे. मतदार ओळखपत्र,आधार कार्ड,पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आणि मिळकत दाखल्याचा प्रमाणपत्र अशी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत

MPSC Exam Postponed : MPSC परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

MPSC Exam Postponed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण विभागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमपीएससी परीक्षा (MPSC Exam Postponed) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. खरं तर एकाच दिवशी आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ठेवल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारलं होते. त्या आंदोलनाला आलेलं ये यश म्हणावं लागेल. कारण २५ ऑगस्टला होणारी हि परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( Maharashtra Public Service Commission) ट्विट करत म्हंटल, आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. आयोगाच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरलं आहे. कारण आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्यानं एक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन (MPSC Students Protest Pune) सुरू केले होते.

शरद पवारांनी आंदोलनात सहभाग घेण्यापूर्वीच निर्णय –

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यांनी ट्विट करत म्हंटल होते कि, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असं ट्विट शरद पवार यांनी केलं होते. मात्र शरद पवार या आंदोलनात उतरण्यापूर्वीच हाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

फडणवीसांनी मानले आभार – MPSC Exam Postponed

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आभार व्यक्त केलं. काल एमपीएससी अध्यक्षांना MPSC Exam Postponed) मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

Gold Price Today : सोन्याचा किंमतीत किरकोळ घसरण; ग्राहकांसाठी खरेदीची संधी

Gold Price Today 22 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव 71350 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 57 रुपयांची किरकोळ घट पाहायला मिळाली तर दुसरीकडे एक किलो चांदी सुद्धा 84428 रुपयांवर व्यवहार करत असून या दरात सुद्धा 160 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६६८०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ७२८७० रुपये प्रति तोळा आहे. तर एक किलो चांदीचा भाव ८७००० रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. भारतात वेगवगेळ्या शहरानुसार सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) सुद्धा वेगवेगळे आहेत.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66, 800 रुपये
मुंबई – 66, 800 रुपये
नागपूर – 66, 800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72, 870 रूपये
मुंबई – 72, 870 रूपये
नागपूर – 72, 870 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Thalapathy Vijay : थलापती विजयची सक्रिय राजकारणात एंट्री; पक्षाच्या झेंड्याचे केलं अनावरण

Thalapathy Vijay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनी योग्य वेळ ओळखून राजकारणात प्रवेश केल्याचं आपण बघितलं आहे. आत्तापर्यंत एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) ,जयललिता आणि रजनीकांत, कमल हासन आणि विजयकांत यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी रुपेरी पडद्यावरून थेट राजकारणात एंट्री मारली. आता यामध्ये स्टार अभिनेता विजय थलापती (Thalapathy Vijay) याचेही नाव जोडलं गेलं आहे. विजय थलापती हा सुद्धा सक्रिय राजकारणात उतरला असून आज त्याने पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केलं आहे.

चेन्नईच्या पायनूर येथील पक्षाच्या मुख्यालयात एका भव्य कार्यक्रमात पक्षाचा ध्वज आणि प्रतीक अधिकृतपणे लॉन्च केले. यावेळी तामिळनाडूच्या विकासासाठी एकत्र काम करण्यावर विजय थलापती यांनी भर दिला. विजय थलापतीच्या पक्षाचे नाव ‘तमिझागा वेत्री कषगम’ असे आहे. त्याचा अर्थ ‘तामिळनाडू विजय पार्टी’ असा होतो. तामिळनाडू मध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी विजय थलापती यांचा तमिझागा वेत्री कषगम’ पक्ष सज्ज झाला आहे. खरं तर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात आपल्या पक्षाची घोषणा केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी कोणताही सहभाग घेतला नव्हता आणि जाहीर केले नव्हते.

आज झेंड्याचे अनावरण करण्यापूर्वी विजय थलापती यांनी प्रतिज्ञा वाचून दाखवली. त्यात त्याने म्हंटल, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लढवय्यांचे आणि तामिळ मातीतील आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढलेल्या असंख्य सैनिकांचे आम्ही नेहमीच कौतुक करू. मी जात, धर्म, लिंग आणि जन्मस्थानाच्या नावावरील भेदभाव दूर करीन. लोकांमध्ये जागृती निर्माण करून सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळावेत यासाठी प्रयत्नशील राहीन. मी प्रतिज्ञा करतो की मी समानतेचे तत्त्व कायम ठेवीन असं विजय थलापती यांनी म्हंटल.

थापेबाजी करणारा ‘नराधम ‘माणूस’….मुख्यमंत्री शिंदेंवर किरण मानेंची जहरी टीका

eknath shinde kiran mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील 2 चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराने (Badlapur Case) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी संतप्त मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय. या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्रातील वातावरण तापलं असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. चार महिन्यापुर्वी बलात्कार प्रकरणातील आरोपीला आम्ही फाशी दिली असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले होते, त्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली आहे.

याबाबत किरण माने यांनी इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा दाखला देण्यात आलाय. किरण माने म्हणाले, इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली ! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे??? इतक्या संवेदनशील विषयावर अशी थापेबाजी करणारा नराधम ‘माणूस’ म्हणवुन घ्यायच्या लायकीचा आहे का??? असा संतप्त सवाल किरण माने यांनी केला आहे. किरण माने यांच्या टीकेला आता शिंदे गट नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे बघायला हवं.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सडकून टीका केली. एकनाथ शिंदे हे एक नंबरचे खोटारडे आहेत. एकनाथ शिंदे यांनी सांगावं कि कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली? कोणत्या न्यायालयात हा फास्ट्रक्ट खटला चालला? कोणत्या न्यायालयात संबंधित आरोपीला फासावर लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात आरोपीला फाशी दिली याचा तपशील जाहीर करावा. फाशीची जागा कोणती ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं. वर्षा बंगल्यावर फाशी दिली कि राजभवनावर फाशी दिली हे एकनाथ शिंदे यांनी सांगावं असं आव्हान संजय राऊत यांनी दिले. एखाद्या राज्यामध्ये कोणाला फाशीची शिक्षा द्यायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते आणि आदेश काढावा लागतो. त्यामुळे राज्यपालांनी याबाबत काही नोंद असेल तर ती सांगावी असं संजय राऊत यांनी म्हंटल.

महाराष्ट्र पुन्हा हादरला!! चॉकलेटचं आमिष दाखवून शेजाऱ्याकडून चिमुकलीवर अत्याचार

Nagpur Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने अत्याचाराच्या (Rape Cases In Maharashtra) आणि बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. बदलापूर येथील ४ आणि ६ वर्षाच्या २ चिमुकलींवर अत्याचार केल्याची घटना अजूनही ताजी असतानाच आता असाच काहीसा प्रकार नागपूर मध्येही (Nagpur Crime) घडला आहे. नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या शेजारच्यानंच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नागपूरमध्ये कामठी शहरात एका ५० वर्षीय व्यक्तीने पीडित मुलीला खाण्याचे आमिष दाखवले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. चल तुला चॉकलेट देतो, असं सांगत आरोपीनं सदर पीडित मुलीला आपल्या घरी नेलं आणि तिथेच तिचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार केलं. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर चाकूचा धाक दाखवून पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पीडित मुलीन घडलेला प्रकार आईला सांगितला.

आईने तात्काळ पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर तातडीनं आरोपीला गाठलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. आदेश वासनिक असं सदर नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी पोलीस कोठडीत असून त्याचा कठोर शिक्षा देण्यासाठी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अत्याचार, बलात्कार आणि खुनाच्या घटना वाढतच चालल्या आहेत. बेलापूर येथील अक्षता म्हात्रे, उरण येथील यशश्री शिंदे, तसेच बदलापूर येथील २ चिमुकल्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. दिवसेंदिसव वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र नेमक्या कोणत्या दिशेला चाललाय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. तसेच या सर्व गोष्टींवर आला घालण्यासाठी सरकार कोणती पाऊले उचलणार आहे कि नाही असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारात आहे.

Ladka Shetkari Yojana : आता “लाडका शेतकरी योजना”… मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Ladka Shetkari Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना (Ladka Shetkari Yojana) आणि लाडका भाऊ योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत सरकार कडून केली जात आहे तर लाडक्या भावांना सुद्धा नोकरी करत पैसे दिले जाणार आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठी घोषणा केली आहे. आता राज्यात “लाडका शेतकरी योजना” राबवणार आहे असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. त्यामुळे राज्यातील बळीराजाला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

सुखी शेतकरी हेच सरकारचं धोरण- Ladka Shetkari Yojana

बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना (Ladka Shetkari Yojana) राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरही लाडका होणार . महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं होय. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना केवळ १ रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबिनला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे करणार आहोत. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीनला ५ हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही ५ हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा २ हेक्टरपर्यंत असणार आहे”, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात!! पुण्यातील आंदोलनात सहभागी होणार

sharad pawar mpsc protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (IBPS & MPSC Exam) या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुण्यात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसाद सुद्धा आता पाहायला मिळत आहेत. कारण विद्यार्थ्यांसाठी खुद्द जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)आता मैदानात उतरणार आहे. शरद पवारांनी याबाबत ट्विट करत थेट राज्य सरकारला इशारा दिला आहे.

काय आहे शरद पवारांचे ट्विट?

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे शरद पवार आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठीही मैदानात दिसतील . तसेच सरकार आता यावर काय उपाय काढत ते सुद्धा पाहायला मिळेल.

आज दुपारी बैठक-

दरम्यान, आज दुपारी एक बैठक घेऊन यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!! राज्यातील सर्व शाळांना 6 महत्वाच्या सूचना

education department 6 important instructions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur Case) झाल्याच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच हा अत्याचार केल्यानंतरच सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न आणखी निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार सुद्धा खडबडून जाग झालं असून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने बुधवारी नव्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. एका महिन्यात सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. अन्यथा सदर शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा शिक्षण विभागाने (Education Department) दिला आहे.

1) शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे

विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणखी मजबूत होण्यासाठी शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेत. येत्या एक महिन्याच्या आत हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे अन्यथा सदर शाळांचे अनुदान रोखण्यासह शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आलाय. शाळा व्यवस्थापन समितीवर हे सीसीटीव्ही लावण्याची जबाबदारी असेल.

2) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची काळजी

नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांबाबत शाळा व्यवस्थापनामार्फत काटेकोर तपासणी करणे आवश्यक आहे. सदर व्यक्तीची चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे. शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असेही सूचविण्यात आले आहे.

3) तक्रार पेटी

शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. शाळा व्यवस्थापनावर याबाबतची जबाबदारी असेल. तक्रार पेटीत विद्यार्थी त्यांच्या तक्रारी नोंदवतील आणि त्यानंतर या तक्रारींचा तपास योग्य पद्धतीने करणे हि जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची असणार आहे.

4) सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे पालन होणे गरजेचे

शाळांमधील सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे पालन होणे गरजेचे आहे असं सरकारने म्हंटल आहे. यानुसार समितीने करावयाची कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आली असून राज्यातील समित्यांनी त्यांना नेमून दिलेले कार्य विहित कालावधीत पार पाडणे आणि त्यांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे.

5) विद्यार्थी सुरक्षा समिती

विद्यार्थी सुरक्षा समिती’चे गठन एक आठवड्यात करण्यात यावे असा सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून हि समिती गठीत करण्यात यावी. ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी देखील अशा उपाययोजना होणे गरजेचे आहे. यासाठी शाळास्तरावर शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून ‘विद्यार्थी सुरक्षा समिती’चे गठन एक आठवड्यात करण्यात यावे, जेणेकरून ही समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल.

6) राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. या समितीमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), तसेच शालेय शिक्षण आयुक्त यांनी नामनिर्देशित केलेल्या शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या गट-अ मधील दोन महिला अधिकारी हे सदस्य असतील. तर, शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयातील सहसंचालक (प्रशासन) हे या समितीचे सदस्य सचिव असतील.