पाककला ही एक सुंदर कला आहे, अनेकांना जेवण बनवायला आणि दुसऱ्यांना विविध पदार्थ करून घालायला खूप आवडते. मात्र सध्याच्या काळात गृहिणी घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभाळतात त्यामुळे त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही हॅकचा अवलंब केला तर तुमचे काम अधिक सोपे होईल. किचन हॅक या मजेदार छोट्या युक्त्या आहेत ज्यामुळे तुमचे काम सोपे होते. या लेखात आम्ही तुम्हाला काही सोप्या किचन हॅकबद्दल सांगणार आहोत.
पुदिना आणि कोथिंबीर स्टोअर करा
पुदिना आणि कोथिंबीर ही स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. भाजी घेताना कोथिंबीर, पुदिना फुकट मागवण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हे तुमच्या जेवणाची चव वाढवतात. पण दुर्दैवाने ते फार काळ ताजे राहत नाहीत. त्यांना ताजे ठेवण्यासाठी, आपण त्यांना हवाबंद काचेच्या कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि कंटेनर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. यामुळे ते जास्त काळ ताजे राहतील.
लसूण
लसूण सोलण्यासाठी तुम्हाला फक्त झाकण असलेली भांडी किंवा दोन लहान वाटी एकत्र ठेवण्याची गरज आहे. लसूण पाकळ्या घालून जोरात शेक करा तुम्हाला दिसेल की लसणाच्या पाकळया वेगळ्या झालेल्या असतील. यामुळे तुमची नखं जास्त काळ अडकणार नाहीत आणि तुमचे कामही होईल.
ब्लेंडर ब्लेड करा धारदार
जास्त वापरामुळे ब्लेंडरचे ब्लेड बोथट होऊ शकतात. मग ते तुमच्यासाठी तुमच्या स्वयंपाकाचे साहित्य चांगले मिसळण्याचे काम करू शकणार नाही. रॉक सॉल्ट म्हणजे खडे मीठ वापर करून तुम्ही तुमचे ब्लेंडर च्या ब्लेडला धार करू शकता. तुमच्या ब्लेंडरमध्ये थोडं खडे मीठ घाला आणि एक किंवा दोनदा ब्लेंडर फिरवा.
भाज्या स्वच्छ ठेवा
पाण्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळा आणि त्यात तुमच्या भाज्या भिजवा. सोडा तुमच्या भाज्यांमधून सर्व प्रकारची घाण आणि कीटकनाशके काढून टाकेल. जर तुम्हाला तुमचे अन्न रसायनांपासून मुक्त ठेवायचे असेल तर ते झाकण असलेल्या काचेच्या डब्यात ठेवा. प्लॅस्टिकऐवजी, काच तुमच्या अन्नामध्ये कोणतेही हानिकारक रसायने मिसळत नाही.
लिंबाचा रस
लिंबू अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही स्वयंपाकघरात नियमित वापरता. बऱ्याच वेळा फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच त्यातून ज्यूस काढणे खूप अवघड वाटते. खूप मेहनत करूनही फारसा रस निघत नाही. त्यामुळे एक छोटी युक्ती आहे जी तुम्ही वापरून पाहू शकता, त्यामुळे तुमचे काम अधिक सोपे होईल. फ्रीजमधून लिंबू काढल्यानंतर 10-20 सेकंद मायक्रोवेव्ह करा, यामुळे तुमची मेहनत कमी होईल आणि लिंबाचा रस पिळण्यास मदत होईल.
Krishna Famous Temples: श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्ण म्हणजे बहुतांश जनांची आवडती देवता. अगदी बाळकृष्ण लीला असोत किंवा कृष्णवरची भजने असोत भारताच्या अनेक भागात भक्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये भाविक रंगून जातात. यंदाची कृष्ण जन्माष्टमी तुम्हाला खास पद्धतीने साजरी करायची असेल तर आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना सुचवत आहोत.
या शुभ मुहूर्तावर, तुम्हालाही भगवान श्रीकृष्णाच्या काही प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध मंदिरांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेऊ शकता. चला जाणून घेऊया त्या पाच प्रसिद्ध मंदिरांबद्दल.
जगन्नाथ पुरी
मथुरा व्यतिरिक्त जगन्नाथ पुरीला जाता येते. येथे भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा एकत्र बसलेले आहेत. या मंदिरात गेल्यावर परत आल्यासारखे वाटणार नाही. दरवर्षी, रथयात्रा येथे मोठ्या प्रमाणावर काढली जाते, जी भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
द्वारकाधीश मंदिर, द्वारका
या जन्माष्टमीला तुम्ही द्वारकाधीश मंदिराला भेट देऊ शकता. येथे समुद्राच्या काठी वसलेले श्री कृष्णाचे अप्रतिम आणि आकर्षक मंदिर आहे. येथील दृश्य खरोखरच पाहण्यासारखे आहे. तुम्हाला मंदिराभोवती समुद्राच्या लाटा दिसतील, ज्याने तुमचे मन जिंकेल. आम्ही तुम्हाला सांगतो की येथे भगवान श्रीकृष्णाची 7 फूट उंचीची मूर्ती स्थापित आहे.
प्राणनाथ मंदिर, दिल्ली
जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि जन्माष्टमीच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हाला देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही दिल्लीतील प्राणनाथ मंदिरात जाऊ शकता. याशिवाय तुम्ही इस्कॉन मंदिरालाही भेट देऊ शकता. येथे तुम्हाला अनेक देवांचे दर्शन घडेल.
इस्कॉन मंदिर, वृंदावन
याशिवाय वृंदावन येथील इस्कॉन मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊ शकता. हे मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांना समर्पित आहे. इथलं वातावरण इतकं शांत आहे की स्वर्गात आल्यासारखं वाटतं. या सर्व मंदिरांना भेट देऊन तुम्ही जन्माष्टमीचा हा शुभ सोहळा संस्मरणीय बनवू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येकाचे एक वेगळी काम असते. त्यातील आपला डोळा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असावा अवयव आहे. कारण या डोळ्यांमुळेच आपण संपूर्ण जग बघू शकतो. अनुभवू शकतो जगातील वेगवेगळ्या गमती जमती पाहू शकतो. आपला डोळा हा आपल्या मज्जासंस्थेची जोडलेला असतो. म्हणजेच आपण डोळ्यांनी जे काही पाहतो. त्याचे संदेश आपल्या मेंदूला जातात. आणि आपल्या मेंदूमध्ये त्या प्रकारच्या आठवणी तयार होतात. म्हणजेच आपला डोळा एका कॅमेराप्रमाणे काम करत असतो. या जगात असा एक व्यक्ती आहे. ज्याने स्वतःचा खरा डोळा काढून कॅमेरा बसवलेला आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. परंतु हे अगदी खरे आहे. चित्रपट निर्माता रॉब स्पेन्सने हे केले आहे. लोक त्याला रियल लाइफ टर्मिनेटर किंवा आयबॉल असे देखील. म्हणतात टर्मिनेटर हा एक हॉलीवूडचा चित्रपट आहे. परंतु त्याने हा एक आगळावेगळा आणि जीवघेणा प्रयत्न का केला असावा? याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
रॉब स्पेन्स यांनी 2007 मध्ये त्यांचा खरा डोळा काढून टाकला आहे. आणि त्या जागी डोळ्याचा आत कॅमेरा बसवलेला आहे. ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. यात बाहेर सर्किट बोर्ड कॅमेरा बसवलेला आहे. परंतु त्यांनी नक्की असे का केले आहे हे आपण जाणून घेऊया.
लहानपणी झालेला मोठा अपघात
रॉब स्पेन्स यांनी सांगितलेले आहे की, जेव्हा ते लहान होते. तेव्हा त्यांच्यासोबत एक खूप मोठी घटना घडली आणि त्या.घटनेनंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यावेळी ते गोळी चालवत होते. बंदुकीतील गोळी त्यांनी चुकीच्या पद्धतीने चालवली. आणि ती गोळी त्यांना स्वतःला लागली. त्यामुळे त्यांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सर्जरी झालेल्या आहेत. या शस्त्रक्रिया नंतर त्यांना हा कृत्रिम डोळा बसवला आहे. परंतु जो पारंपारिक कृत्रिम डोळ्याच्या विरोधात होता. त्यामुळे त्यांनी तो कृत्रिम डोळा काढून कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला.
डोळ्यात बसवला वायरलेस कॅमेरा
रॉब स्पेन्सचे कर्मचारी डिझायनर कोस्टाग्राम मॅटीस यांनी त्यांना यामध्ये खूप मदत केलेली आहे. त्यांच्यासाठी त्यांनी वायरलेस कॅमेरा डिझाईन केलेला आहे. जो कृत्रिम डोळ्याच्या आत ठेवता येतो. यासाठी इलेक्ट्रिक इंजिनियर मार्टिन यांनी देखील मदत केलेली आहे. त्यांनी एक छोटा सर्किट बोर्ड तयार केला. ज्या सर्किटच्या मदतीने वायरलेस कॅमेरा डेटा प्राप्त करू शकतो. आणि आपल्या मेंदूपर्यंत पाठवू शकतो.
या वायरलेस कॅमेरामध्ये मायक्रो ट्रान्समीटर छोटी बॅटरी मिनी कॅमेरा आणि मॅग्नेटिक स्विच देण्यात आलेला आहे. तो कॅमेरा चालू आहे आणि बंद देखील करू शकतो. एकदा ही बॅटरी चार्ज केल्यानंतर कॅमेरा 30 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. हा कॅमेरा ऑप्टिक नर्व सीस्टमला जोडला नसला, तरी हा व्हिडिओ त्याच्या फिल्म मेकिंगमध्ये देखील वापरला जातो. या डोळ्यात बसवलेल्या कॅमेरामध्ये तीन पर्याय उपलब्ध असतात. जैविक दृष्ट्या वास्तववादी चकाकणारी लाल गोष्ट देखील उपलब्ध आहे. 2009 मध्ये गिनीज वर्ल्ड बुकमध्ये याची नोंद देखील करण्यात आलेली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजना अंतर्गत सामान्य नागरिकांना त्यांच्या आयुष्यात प्रगती करता येते. यामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक यांसारख्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळत असतो. समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांना एका स्तरावर आणण्यासाठी शासन नियमित नवनवीन योजना आणत असतात. अशातच आता सरकारने एक वेगळी योजना आणलेली आहे. सरकारच्या या योजनेचे नाव सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प योजना असे आहे. यामध्ये नागरिकांना मोडी लिपीचे शिक्षण शासनामार्फत दिले जाणार आहे.
या योजनेतील खास गोष्ट म्हणजे हे प्रशिक्षण घेतानाच तुम्हाला 10 हजार रुपये विद्या वेतन देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता. यामुळे तुमच्या ज्ञानात देखील वाढ होईल आणि तुम्हाला आर्थिक मदत देखील होणार आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थांच्या वतीने मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सारथी या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला या अर्जाबाबतची सविस्तर माहिती मिळेल. तसेच तुम्हाला अर्ज देखील करता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच तो नॉन क्रिमिलियर असणे गरजेचे असते. तो उमेदवार मराठा किंवा कुणबी समाजाचा असावा. तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र असावे. जातीचे प्रमाणपत्र नसल्यास किंवा ईव्हीएस प्रमाणपत्र असावे. तसेच उमेदवाराला त्याचा जन्माचा दाखला आणि दहावीचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.
महिन्याला मिळणार विद्यावेतन
या प्रशिक्षणासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना दहा हजार रुपयांचे विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. दोन महिन्यांचा 60 ऑनलाइन तासांचा हा अभ्यासक्रम असणार आहे. परंतु यामध्ये काही मर्यादित विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
या योजनेचा उद्देश काय ?
शाहू महाराजांच्या काळातील कोल्हापूर संस्थानातील पारित ठराव प्रशासकीय अहवाल यातील अनेक कागदपत्र ही मोडी लिपीत आहे. जी जास्त कोणाला कळत नाही. त्यामुळे हे अहवाल प्रकाशित करण्याचा सारथी यांचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून मराठा आणि कुणबी समाजाच्या उमेदवारांसाठी ही योजना असण्यात आलेली आहे. यातून त्यांना मोडी लिपीचे ज्ञान मिळेल आणि त्यांना दर महिन्याला विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा आणि कुणबी समाजाच्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या.
Tourist Place In Mansoon | पावसाळा आला की, संपूर्ण निसर्ग अत्यंत शांत आणि हिरवागार होऊ होऊन जातो. त्यामुळे सगळ्यांचा मूड देखील अगदी फ्रेश असतो. आणि याच पावसाळ्यामध्ये निसर्गाचे वेगवेगळे चित्र पाहण्यासाठी कुठेतरी लांब फिरायला जावं निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा. असे अनेकांना वाटते. खरंतर निसर्ग तोच असतो, परंतु पाऊस आल्यावर संपूर्ण निसर्गाने जणू काही अंगावर हिरवी चादरच पांगरली आहे, असे वाटते. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेकजण जातात. या ठिकाणी गेल्यावर अत्यंत शांततेचा आणि समाधानाचा अनुभव घेता येतो. देशात असे अनेक पर्यटन स्थळ (Tourist Place In Mansoon) आहेत. जिथे पाऊस पडल्यावर लोकांची खूप गर्दी होते.
पावसाळ्यामध्ये आपल्याला विविध वनस्पती त्याचप्रमाणे फुले, झाडे या सगळ्या गोष्टी समजतात. निसर्गात गेल्यावर तेथील धबधबे, नद्या,तलाव यांसारख्या गोष्टींचा देखील अनुभव घेता येतो. त्याचप्रमाणे रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये शांतपणे चहा पिणे आणि निसर्गाचा आनंद घेणे यापेक्षा जास्त मोठे समाधान आयुष्यात काहीच नसते. जर तुम्ही देखील नाशिकच्या जवळपास राहत असाल आणि तुम्ही नाशिकमध्ये पावसाळ्यात पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी योग्य जागा शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला नाशिकच्या जवळपास असणाऱ्या काही नयनरम्य पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट देऊ शकता.
नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Tourist Place In Mansoon
रतनवाडी
रतनवाडी हे नाशिक जिल्ह्याच्या जवळ असलेले एक ठिकाण आहे. हे ठिकाण अत्यंत नयनरम्य आणि निसर्गाने वेगळे आहे. अहमदनगर जिल्ह्यात असलेले हे एक सुंदर आणि मनमोहक असे गाव आहे. या ठिकाणी पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य खूपच सुंदर असते. अनेक लोक या ठिकाणी पावसाळ्यामध्ये भेट देतात. त्यामुळे तुम्हाला जर इथे जाणे शक्य असेल, तर तुम्ही रतनवाडीला नक्कीच भेट देऊ शकता. हे गाव संपूर्ण डोंगराळ भागात आहे. तसेच हिरवागार निसर्ग ओले झालेले रस्ते या सगळ्या गोष्टी लोकांना खूप आवडतात. तसेच ज्या लोकांना ट्रेकिंगची आवड आहे. त्यांच्यासाठी हे पर्यटन स्थळ खूप चांगले आहे
डहाणू | Tourist Place In Mansoon
डहाणू हे नाशिकच्या जवळ असलेले एक ठिकाण आहे. संपूर्ण निसर्गाने वेढलेले हे एक नयनरम्य ठिकाण आहे. डहाणू हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते प्रेक्षकांसाठी एक आकर्षण स्थळ आहे. या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.
सापुतारा
सापुतारा हे नाशिकपासून जवळ असलेले एक हिल स्टेशन आहे. हे गुजरात राज्यातील एक हिल स्टेशन आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरपर्यत पर्वत रांगांमध्ये वसलेले हे एक ठिकाण आहे. तुम्ही जर पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला भेट दिली, तर तुम्हाला अगदी स्वर्ग सुखाचा आनंद घेता येईल. तसेच या ठिकाणी फोटोशूटचा देखील आनंद घेता येईल.
सिल्वासा
हे ठिकाण पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी अत्यंत उत्तम असे ठिकाण आहे. हे ठिकाण पोर्तुगीज संस्कृतीतील एक प्रसिद्ध असे शहर आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे तसेच या ठिकाणी अनेक संस्कृतीच्या खानाखुणा देखील पाहायला मिळेल. नाशिकपासून हे ठिकाणी 128 ते 130 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला, तर तुमच्यासाठी खूप उत्तम ठरेल. कारण पावसामध्ये येथील निसर्ग आणखीनच खुलून येते.
IRCTC : तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सुंदर डोंगरांचा प्रदेश असलेल्या लडाखला तुम्हाला फिरायला जायची इच्छा असेल तर IRCTC कडून एक खास टुरिंग पॅकेज आयोजित करण्यात आले आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पॅकेजच्या अंतर्गत तुम्ही विमानाने अतिशय कमी किमतीमध्ये आणि आरामदायी प्रवास करू शकता. कारण या टूर पॅकेजची खासियतच ही आहे . या पॅकेज मध्ये तुम्हाला हॉटेल, खाणं पिन, आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी पूर्ण सुविधा दिल्या जाणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया…
IRCTC कडून लडाख टूर पॅकेजच्या अंतर्गत असणारी ही टूर सहा रात्री आणि सात दिवसांची असेल. यामध्ये लेह लडाख सह अनेक ठिकाणांना भेटी देण्यात येतील. ही टूर 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान नियोजित केली असून याच्या माहितीसाठी irctctourism.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
कोणती ठिकाणे पहाल?
IRCTC ने नियोजित केलेल्या या टूर पॅकेजच्या अंतर्गत तुम्हाला लेह सह लडाख, लेह, नुब्रा, तुर्तुक, पँगॉन्गची व्हॅली पाहण्याची संधी मिळेल. शिवाय यासाठी लागणारे प्रवासाची वाहन आणि इतर वाहतूक सुविधा देखील IRCTC द्वारे पुरवलया जातील त्यामुळे पर्यटकांना स्वतःच्या खिशातून कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
काय आहे किंमत?
जर तुम्हाला एकट्याने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला 60 हजार 100 रुपये द्यावे द्यावे लागतील. जर तुम्ही या टूर अंतर्गत दोघेजण प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रत्येकी 55 हजार 100 रुपये तर तीन लोकांसाठी तुम्हाला प्रतिव्यक्ती 54 हजार सहाशे रुपये मोजावे लागतील. या पॅकेज मध्ये एकूण 30 जागा आहेत.
IRCTC ने आयोजित केलेल्या या टूर अंतर्गत लेह आणि लडाख येथील ठिकाणांना भेटी देण्यासाठी फ्लाईट तिकीट, विमा, हॉटेल, निवास याच्या अंतर्गत नाश्ता आणि रात्रीचे जेवण असेल. शिवाय वाहतुकीची सुविधा देखील प्रवाशांना देण्यात येत आहे
लडाख पर्यंत विमान प्रवास
IRCTC कडून आयोजित केलेल्या या पॅकेजमध्ये तुम्हाला विमानाने लडाखला पाठवलं जाईल. हे विमान लखनऊ इथून असणार आहे. बुकिंग साठी तुम्हाला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सोळा वर असलेल्या टुरिस्ट सेंटरमध्ये भेट द्यावी लागेल. तुम्ही तिथे जाऊन बुकिंग करू शकता याशिवाय IRCTC च्या वेबसाईटवर देखील तुम्ही बुकिंग करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या सध्या अंतराळात गेलेल्या आहेत. या आधी देखील त्यांनी अनेकवेळा अंतराळवारी केलेली आहे. यावेळी त्या बुच विल्मोर यांच्यासोबत गेलेल्या आहेत. परंतु पृथ्वीवर परत येण्याच्या त्यांच्या प्रवासात सध्या अनेक अडचणी येत आहेत. त्या केवळ आठ दिवसांसाठी अंतराळवीरात गेल्या होत्या. परंतु त्यांचा हा मुक्काम गेल्या दोन महिन्यापासून तिथेच आहे. हाती आलेल्या माहितीनुसार त्यांच्या वाहनात तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे त्यांच्या परतीचा प्रवास लांबलेला आहे. तसेच त्यांना कॉर्नियाचा देखील आजार झाल्याचे उघड झालेले आहे. परंतु अशातच नासाने त्यांच्या या प्रवासा संदर्भात एक मोठी बातमी समोर आणलेली आहे.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे परत येणार होते. परंतु त्याच्या त्यांच्या कॅप्सूल थस्टरमध्ये बिघाड झाली. त्यामुळे त्या नक्की पृथ्वीवर कधी परतणार आहेत?याची माहिती अजून मिळालेली नाही. तसेच अनेक लोकांनी त्यांच्या परत येण्याबाबत शंका देखील व्यक्त केलेल्या आहे. त्यामुळे त्या परत येतील की नाही? या गोष्टीची चिंता आता संपूर्ण भारतीयांना सतावत आहे. अशातच आता माझी अमेरिकी लष्कर अवकाश प्रणाली कमांडक रुडी रिडल्स यांनी काही शक्यता व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यांच्या येण्याबाबतचे संभाव्य धोके सांगितलेले आहेत.
त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार स्टार लायनरच्या सुरक्षित परतीच्या प्रवासासाठी त्याच्या सर्विस मॉड्युच्या कॅप्सूलला योग्य दिशेने ठेवणे गरजेचे असते. यामध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी धोका निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टार लाइनर व्यवस्थित अपेक्षित ठिकाणी ठेवलं गेलं नाही, तर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतेवेळी ते पेट देखील घेऊ शकते. आणि अवकाशाच्या मागच्या बाजूला फेकले जाऊ शकते. त्यामुळे परतीच्या प्रवासाबाबत हे धोके निर्माण होऊ शकतात. यातील पहिला धोका म्हणजे चुकीच्या कोनामध्ये ठेवूनच या स्टार लाइनरचा प्रवास सुरू केला, तर तो वातावरणात पुन्हा मागच्या दिशेने जाऊ शकतो. असे केल्याने ते लोक अंतराळातच अडकू शकतात.
त्याचप्रमाणे हे यान पेट घेण्याची देखील शक्यता वर्तवलेली आहे. हे या अतिरिक्त घर्षणामुळे पेट घेऊ शकते. आणि अंतराळवीरांचi तिथे राख होऊ शकते त्यांचा वापर होऊ शकते असे देखील सांगण्यात आलेले आहे. हे सगळे धोके लक्षात घेता आता ना असा अतिशय सावधानगिरीने निर्णय घेत आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न देखील करत जात आहे. परंतु आता नक्की त्यांच्या प्रयत्नांना कशाप्रकारे यश येत आहे. हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
सुनिता विल्यम्स यांनी याआधी देखील अंतराळ प्रवास केलेला आहे. परंतु त्यावेळी त्यांचे सगळे प्रयत्न यशस्वी झालेल्या होते. परंतु या प्रयत्नात त्या अंतराळात सुरक्षित गेलेल्या आहेत. परंतु आता त्यांना परत पृथ्वीवर येण्यासाठी अनेक धोके निर्माण होत आहे. त्यांच्या यानात बिघाड झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांना कॉर्नियाचा आजार झाल्याचे देखील समोर आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या या संकटांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. परंतु आता नासा या दोघांबाबत काय निर्णय घेतात. आणि त्यांना पृथ्वीवर कशाप्रकारे परत आणू शकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुणाचाबी नाद करायचा… पण शरद पवारांचा सोडून… असं म्हणायची वेळ लोकसभेला आली… भलेभले नादाला लागले… आणि बाद झाले… अनेक मातब्बर भुईसपाट झाले… या वादळात पंकजा मुंडेही सापडल्या… बालेकिल्ल्यातच पराभवाची नामुष्की साहेबांमुळे पंकजाताईंवर आली… बीडमध्ये बराच राडा झाला… शरद पवारांनी सांगून तुतारीचा आवाज लोकसभेला काढला… पण आता वेळ आहे ती विधानसभेची… आता शरद पवारांचं नेक्स्ट टार्गेट असणार आहेत धनंजय मुंडे… ज्यांच्या विजयासाठी पवारांनी 2019 ला ताकद लावली आता त्याच धनुभाऊंना आमदारकीला पाडण्यासाठी शरद पवारांनी तीन नेत्यांवर डाव टाकलाय… परळी सारख्या बालेकिल्ल्यातच धनु भाऊंना घाम फोडणारे ते चार चेहरे नेमके कोण आहेत? त्यांचे राजकारणातील प्लस मायनस काय आहेत? आणि यापैकी नेमक्या कोणत्या चेहऱ्यावर उमेदवारीचा शिक्का पवार मारू शकतात? त्याचीच ही इन साईड स्टोरी…
2009 मध्ये पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा मतदारसंघ सोडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले… त्यामुळे पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांचं आमदारकीला लॉन्चिंग झालं… त्यांनी काँग्रेसच्या प्रा. टी. पी. मुंडे यांचा पराभव करून दणक्यात विजय मिळवला… खरंतर याच वेळेस धनंजय मुंडे विधानसभेसाठी इच्छुक होते… पण सत्ता संतुलन करण्यासाठी धनुभाऊंना विधान परिषदेवर घेण्यात आलं… पण या भाऊ बहिणींमधला राजकीय विस्तव वाढत गेला… तो थेट धनुभाऊंचा राष्ट्रवादीतील प्रवेश होण्यापर्यंत… 2010 ते 2012 या दरम्यान धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मध्ये अनेक विषयावरून खटके उडाल्याचं उभ्या राज्याने पाहिलं… याच विस्तवातून मुंडे विरुद्ध मुंडे, बहिण विरुद्ध भाऊ, पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी 2014 ची विधानसभा निवडणूक झाली… मात्र 26 हजार 184 इतक्या भरघोस लीडने पंकजाताईंनी बाजी मारलीच… अर्थात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा पंकजाताईंना झाल्याचंही यावेळेस बोललं गेलं…
पण तत्कालीन कॅबिनेट मंत्री असतानाही… भाजप सत्तेवर असतानाही… पंकजा मुंडेंचा गेम झाला… आणि धनुभाऊ परळीतून आमदार झाले… थोडक्यात परळी विधानसभा मतदारसंघ नुसता हाय व्होल्टेज नाही.. तर मुंडे घराण्याचा…ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचा… राष्ट्रवादी विरुद्ध भाजप वादाचा सेंटर पॉईंट ठरला… पण यानंतर पंकजाताईंना पक्षातूनच डावललं जाणं… राष्ट्रवादी फुटणं… पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्यात सलगी होणं… महायुती म्हणून एकाछताखाली येणं… पंकजा ताईंना लोकसभेची उमेदवारी मिळणं… आणि नामुष्की होत खासदारकी हरणं… या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून परळीचं राजकारण आतून बाहेरून ढवळून निघालं… मराठा आणि वंजारी यांच्यातला संघर्ष टोकाला गेला… मराठा आरक्षणाची झळ पंकजा मुंडेंना बसली पण परळी विधानसभेतील संघर्षाची आग मात्र अजूनही धूमसत आहे… हे सगळ सुरू असताना विधानसभेची चाहूल लागल्याने परळी हा जिल्ह्याचा नाही तर राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे… पंकजाताईंची विधान परिषदेवर वर्णी लागल्यामुळे आता महायुतीकडून धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे… पण लोकसभेला करिष्मा करून दाखवणाऱ्या पवारांनी आता विधानसभेला धनुभाऊंना त्यांच्याच होम पिचवर मात देण्यासाठी आता एक नवा डाव खेळलाय… शरद पवार या तीन मोहऱ्यांवर नशीब आजमावून यापैकी एकाला डन तर करतीलच… पण यातल्या एकाला निवडून आणण्याची धमकही या उमेदवारांमध्ये आहे… मुंडेंच्या परळीतल्या वर्चस्वला शेवटचा हदरा देण्याचा चान्स शरद पवार काही केल्या सोडणार नाही, एवढं मात्र नक्की…
यातलं पहिलं नाव येतं ते सुदाताई गुट्टे यांचं…. यंदा काहीही झालं तरी परळीतून धनंजय मुंडेंना पाणी पाजणारच… असं ठासून सांगणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ सुदाताई गुट्टे… शरद पवारांशी उत्तम संपर्क असणाऱ्या डॅशिंग आणि निर्भीड नेत्या म्हणून सुदाताई गुट्टे यांनी ओळख… शिक्षण संस्था – कारखानदारी या माध्यमातून त्यांचा मतदार संघावर प्रभाव राहिला आहेच… पण शरद पवार गटात असल्याने वंजारी प्लस मराठा असं दुहेरी जातीय गणित त्यांच्या फायद्याचे ठरणार आहे… धनुभाऊंना निवडणुकीच्या धामधुमीत जशास तस, खमक्या भाषेत प्रत्युत्तर देण्याची हिंमत सुदाताई गुट्टे यांची आहे… त्यामुळे पवार सध्या तरी त्यांच्या नावाबाबत पॉझिटिव्ह मोडवर आहेत, असं बोलायला हरकत नाही…
शरद पवारांचा दुसरा मोहरा येतो तो राजेसाहेब देशमुख यांचा… राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे… जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत त्यांनी तळागाळापर्यंत आपला जनसंपर्क वाढवलाय… मागच्या तीस वर्षांपासून एकाच पक्षात सक्रिय राजकारणात असल्यामुळे काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार म्हणून त्यांना ओळखलं जातं… अगदी जिल्हा परिषदेचे शिक्षण व कृषी सभापती असताना त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही जनतेच्या मनावर उमटला आहे… जनतेच्या सुखदुःखात मिसळल्यामुळे लोकनेता म्हणूनही त्यांची ओळख आहे… त्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जिल्ह्यात आणि पर्यायाने मतदारसंघात बळ देण्यात देशमुख यांचा मोठा वाटा राहिलाय… त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी या लाईन अपने परळीची निवडणूक न्यायची असेल तर महाविकास आघाडी देशमुखांच्या नावाचा सिरियसली विचार करू शकते… फक्त ही जागा राष्ट्रवादीची असल्याने उमेदवारी मिळवायची असेल तर देशमुखांना पक्ष बदलावा लागेल… पण ते याला तयार होतील का? यावर पुढचा सगळा डोलारा अवलंबून आहे… पण सध्यातरी पक्ष आणि चिन्ह हे त्यांच्यासाठी येणाऱ्या विधानसभेला अडचणीत टाकणाऱ्या गोष्टी आहेत…
तिसरं नाव बबन गीते यांचं… मुंडेंच्या सावलीत ज्यांचं राजकारण वाढलं ते गीते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मात्र आधी पंकजाताईंच्या बाजूने आणि नंतर धनुभाऊंच्या बाजूने गेले… पण हे करत असताना त्यांनी आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व कधीही संपू दिलं नाही…. म्हणूनच लोकसभेच्या धामधुमीत जेव्हा बबन गीते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या… बबन गीते यांनी लोकसभेला तर काम फत्ते करून दाखवलं… पण आता आमदारकीसाठी ते प्रयत्न करत आहेत… उमेदवारीच्या स्पर्धेत त्यांचंही नाव फ्रंटला आहेच… पण गुंडगिरी, खून आणि मोक्काचे दाखल झालेले गुन्हे यामुळे शरद पवार बबन गीते यांना उमेदवारी देतील का? हा प्रश्न आहेच… पण पैसा खर्च करण्याची ताकद… आरेला का रे म्हणण्याची हिंमत… आणि वंजारी समाजाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची गीते यांची ताकद पाहता त्यांना परळीत हलक्यात घेऊन चालणार नाही, एवढं मात्र नक्की…
आता आपण बोलूयात शेवटच्या नावाबद्दल ते म्हणजे रत्नाकर गुट्टे… तसं पाहायला गेलं तर रत्नाकर गुट्टे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासप पक्षाकडूनचे उमेदवार… 2019 ला जेलमध्ये राहूनही निवडणूक लढवून ते जिंकले… यावरून त्यांच्या पॉलिटिकल ताकतीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो… विकासकामांच्या बाबतीत रत्नाकर गुट्टे चोख असतात… युती सरकारचा पुरेपूर वापर करून घेत त्यांनी भरीव निधी मतदार संघासाठी खेचून आणला… रोजगार मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून गुट्टे हे मतदारसंघात सक्रिय आहेत… त्यांच्या गंगाखेड शुगर मिल कारखान्याचे कार्यक्षेत्र अगदी परळीतही असल्याने गुट्टे सध्या गंगाखेड किंवा परळी या दोन जागांसाठी निवडणूक लढवू इच्छित आहेत… मनी – मसल पॉवर या सगळ्याचा विचार केला तर ते एन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात… पण ती कधी आणि कशी यावर आत्ताच अधिक भाष्य करणं तसं चांगलं राहणार नाही…बाकी अजितदादांचा खासमखास माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनुभाऊंना चितपट करण्यासाठी आता शरद पवार या चौघांपैकी कुणाच्या हातात तुतारी देणार? हे तर येणारा काळ ठरवेलच… तुम्हाला काय वाटतं? यंदा परळी मध्ये आमदारकीचा गुलाल कुणाचा? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्याची ऑल टाइम बेस्ट XI जाहीर केली आहे. मात्र गंभीरच्या संघात ३ पाकिस्तानी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. मात्र भारताच्या एकाही खेळाडूला गंभीरच्या ऑल टाइम बेस्ट XI मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. भारतात सचिन तेंडुलकर, राहूल द्रविड, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी असे अनेक दिग्गज खेळाडू असताना गंभीरने या खेळाडूंना संघात का स्थान दिल नाही असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
स्पोर्ट्सकीडाशी संवाद साधताना गंभीरला त्याच्या ऑल टाइम संघाबाबत (Gautam Gambhir All Time World XI) नाव जाहीर केली. सलामीवीर म्हणून त्याने ऑस्ट्रेलियाचा महान यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन या डावखुऱ्या जोडीची निवड केली. मधल्या फळीत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा, पाकिस्तानचा दिग्गज इंझमाम उल हक आणि दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलिअर्सची निवड केली आहे. अष्टपैलू म्हणून ऑस्ट्रेलियाचा अँड्रू सायमंड, इंग्लंडचा अँड्रू फ्लिंटॉफ आणि पाकिस्तानचा अब्दुल रझ्झाकला गंभीरने आपली पसंती दिली आहे. गोलंदाजी विभागाबाबत सांगायचं झाल्यास, गंभीरने श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनला एकमेव फिरकीपटूच्या रूपात निवडलं आहे. तर गंभीरच्या संघात शोएब अख्तर आणि मोर्ने मॉर्केल या दोन फास्ट बॉलर्सना स्थान मिळालं आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, झहीर खान, अनिल कुंबळे, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा असे अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले.. मात्र तरीही यातील एकही खेळाडूला संघात स्थान द्याव असं गौतम गंभीरला का वाटलं नाही असं प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
Pune Metro : पुणेकरांसाठी आता एक खुशखबर आहे. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत नव्याने दाखल झालेल्या मेट्रोच्या स्थानकांमध्ये आणखी एका स्थानकाची भर पडली आहे. या स्थानकामुळे वनाज ते रामवाडी असा मेट्रो प्रवास पूर्ण होणार आहे. तर आम्ही(Pune Metro) बोलत आहोत पुण्यातील येरवडा मेट्रो स्थानकाबद्दल…
वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम आता पूर्ण झालं असून आजपासून म्हणजेच दिनांक 21 ऑगस्ट पासून येरवडा स्थानक सुरू करण्यात आला आहे त्यामुळे पुणेकरांना या सेवेचा आज पासून लाभ घेता येणार आहे. याबाबतची माहिती (Pune Metro) महामेट्रो कडून देण्यात आलेली आहे.
वनाज ते रामवाडी लाईन पूर्णपणे कार्यान्वित (Pune Metro)
पुण्यातील इतर मेट्रोस्थानाकांप्रमाणेच येरवड्यातील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आता मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. सध्याची पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या पाहता मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. येरवडा मेट्रोस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्यामुळे (Pune Metro) वनाज ते रामवाडी पर्यंतची मेट्रो लाईन पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
कोणाला होणार फायदा ? (Pune Metro)
दरम्यान येरवडा स्थानकामुळे येरवडा येथील रहिवासी आणि उर्वरित भाग मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार असून पुणे शहराशीही जोडले जातील. त्यामुळे विद्यार्थी, व्यवसायीक, कर्मचारी वर्ग, येरवडा स्थानकाच्या जवळणार असणाऱ्या आयटी हब मधील (Pune Metro) कर्मचारी आणि रहिवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या वेळेत सेवा (Pune Metro)
महा मेट्रो कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून येरवडा मेट्रोस्थानक प्रवासी सेवेसाठी सुरू होणार असून सकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान ही सेवा नियमित सुरू राहणार आहे.