Saturday, December 20, 2025
Home Blog Page 52

D Mart Employees Benefits : D Mart कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त ‘हे’ फायदेही मिळतात

D Mart Employees Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन D Mart Employees Benefits। DMart तर तुम्हाला माहितीच असेल किंवा तुमच्या घराच्या जवळील शहरात ते नक्कीच असेल.. माणसाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, एकाच छताखाली देणाऱ्या डीमार्टची स्थापना केली राधाकृष्ण दमाणी यांनी… मुंबईत सुरु झालेलं डीमार्ट नंतर संपूर्ण देशभर पसरलं… कपड्यांपर्यंत ते अगदी किचन मधील भांड्यांपर्यंत… आंघोळीच्या साबणापासून ते गहू- तांदळापर्यंत सर्वच वस्तू डीमार्ट मध्ये मिळत असल्याने ग्राहकांचीही तोबा गर्दी डीमार्ट मध्ये बघायला मिळते. त्यातच महत्वाचं म्हणजे इतर कंपन्यांच्या तुलनेत डीमार्ट मध्ये सर्वच वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळते. परंतु तुम्हाला माहितेय का? ज्याप्रमाणे डीमार्ट आपल्या ग्राहकांना अतिरिक्त कायदे देते त्याच प्रमाणे डीमार्ट आपल्या कर्मचाऱ्यांनाही पगारा व्यतिरिक्त अनेक फायदे देते. हे फायदे नेमके कोणकोणते आहेत ते आज आपण जाणून घेऊयात…..

D Mart कर्मचाऱ्यांना कोणकोणते फायदे मिळतात? D Mart Employees Benefits

EPF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी): डी मार्ट कर्मचाऱ्याच्या पगाराचा एक भाग EPF खात्यात जमा करते, ज्यामध्ये कंपनी देखील योगदान देते. ही ठेव निवृत्तीच्या वेळी दिली जाते, जी भविष्यासाठी आर्थिक आधार म्हणून काम करते.

कार्यक्षमतेवर आधारित बोनस: जे कर्मचारी चांगलं काम करतात त्यांना डीमार्ट मध्ये वार्षिक बोनस दिला जातो.. यामुळे कर्मचाऱ्यांना आणखी चांगलं काम करण्याचा हुरूप मिळतो. D Mart Employees Benefits

खरेदीवर डिस्काउंट – डीमार्ट आपल्या कर्मचाऱ्यांना खरेदीवर अतिरिक्त डिस्काउंट देते. इतर ग्राहकांपेक्षा हा डिस्काउंट जास्त असतो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत होते.

प्रशिक्षण आणि अंतर्गत पदोन्नती: डीमार्ट कर्मचाऱ्यांना उच्च पदांसाठी तयार करण्यासाठी नियमित प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करते. या विकास कार्यक्रमांमुळे अनेकांनी विक्री सहयोगींपासून व्यवस्थापकीय पदांपर्यंत यशस्वीरित्या झेप घेतली आहे. D Mart Employees Benefits

ग्रॅच्युइटी: जे कर्मचारी ५ वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत त्यांना डीमार्ट कडून ग्रॅच्युइटी दिली जाते. या ग्रॅच्युटी च्या माध्यमातून त्यांना सेवेच्या शेवटी एकरकमी रक्कम दिली जाते.

वैद्यकीय विमा: डीमार्ट केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबांसाठी देखील आरोग्य विमा कव्हर देते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा हॉस्पिटल मधील खर्च वाचतो.

Fashion Factory Exchange Festival : जुने कपडे द्या अन नवीन घेऊन जा; अंबानींची सर्वसामान्यांना खास भेट

Fashion Factory Exchange Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fashion Factory Exchange Festival। जुने कपडे द्या आणि नवीन कपडे घेऊन जा असं जर तुम्हाला कोणी म्हंटल तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण मित्रानो हे खरं आहे. रिलायन्स रिटेल फॅशन फॅक्टरीने तुम्हाला परवडणारी ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जुने ड्रेस देऊन नवीन कपडे घेऊन घरी जाऊ शकता. महत्वाची बाब म्हणजे साधीसुधी कपडे नव्हे तर अगदी ब्रँडेड ड्रेस तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. फॅशन फॅक्टरीची हि ऑफर २० जुलैपर्यंत आहे.

कसा मिळवाल लाभ? Fashion Factory Exchange Festival

जुने कपडे देऊन नवीन ड्रेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचे जुने ड्रेस शर्ट, टी-शर्ट मुलांचे कपडे फॅशन फॅक्टरी स्टोअरमध्ये आणावे लागतील. या जुन्या कपड्यांच्या बदल्यात कंपनी तुम्हाला एक्सचेंज कूपन देईल. यामध्ये डेनिमसाठी ४०० रुपयांपर्यंत कूपन, शर्टसाठी २५० रुपयांपर्यंत कूपन, टी-शर्टसाठी १५० रुपयांपर्यंत कूपन आणि मुलांच्या कपड्यांसाठी १०० पर्यंत कूपन देण्यात येईल. तुम्ही अशी अनेक कुपन्स गोळा करू शकता. कारण नंतर याच कुपन्सच्या बदल्यात तुम्हाला नवीन कपडे मिळणार आहेत. Fashion Factory Exchange Festival

कोणत्या ब्रँडवर फायदा मिळेल?

या एक्सचेंज फेस्टिव्हलमध्ये (Fashion Factory Exchange Festival) तुम्ही ली, ली कूपर, जॉन प्लेयर्स, रेमंड, पार्क अव्हेन्यू, कॅनो, पीटर इंग्लंड, अॅलन सॉली, व्हॅन ह्यूसेन, लुई फिलिप यासारख्या देशातील लोकप्रिय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कपडे खरेदी करू शकता. या कुपन्स व्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना नवीन खरेदीवर ५०% पर्यंत सूट सुद्धा देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना प्रचंड फायदा होत आहे. आगामी दिवस सणासुदीचे दिवस आहेत. श्रावण, गणपती, दुर्गमहोत्सव, दसरा आणि दिवाळी असे सण तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन कपडे खरेदीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना हि मोठी संधी म्हणावी लागेल. तसेच तुमचे जुने कपडेही यामुळे घरातून बाहेर पडतील आणि त्याचा आर्थिक फायदाही होईल. परंतु हि ऑफर फक्त रिलायन्सच्या फॅशन फॅक्टरी स्टोअरमध्येच उपलब्ध आहे.

MSRTC : शिवशाहीचे रूपांतर हिरकणी बसमध्ये!! राज्य परिवहन मंडळाचा निर्णय

MSRTC Shivshahi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एकेकाळीची लोकप्रिय आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी शिवशाही AC चे रूपांतर आता नियमित हिरकणी बस मध्ये करण्यात येत आहे. या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरु झाली असून सर्व शिवशाही AC बसचे हिरकणी बस मध्ये रूपांतर करण्यासाठी किमान २ वर्ष लागतील असं बोललं जात आहे.

काही वर्षापसून शिवशाही बसमध्ये तांत्रिक समस्या- MSRTC

खरं तर जेव्हा सुरुवातीला २०१७ मध्ये शिवशाही बस महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सेवेत आली तेव्हा सर्वसामान्यांना या बसची अक्षरशः भुरळ पडली होती. आतमध्ये AC ची सुविधा आणि आरामदायी सीट उपलब्ध असल्याने अनेक प्रवासी सध्या लालपरीला सोडून शिवशाहीने प्रवास करण्यास प्राधान्य द्यायचे. शिवशाही बसच्या किमती या इतर बसगाड्यांच्या तुलनेत महाग असल्या तरी लोकांची पसंती राहायची. परंतु मागील काही वर्षापसून शिवशाही बस मध्ये अनेक तांत्रिक समस्या बघायला मिळाल्या. अनेकदा शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याच्या, बसला आग लागल्याच्या आणि अपघात झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे शिवशाहीचे रूपांतर हिरकणी बस मध्ये करण्याचा प्लॅन राज्य परिवहन मंडळाने (MSRTC) आखला.

त्यानुसार, आता काही शिवशाही बसचे रूपांतर हिरकणी बस मध्ये करण्यात आलं आहे. या नव्या हिरकणी बसेस पुढच्या आठवड्यापासून प्रवाशांच्या सेवेत येतील असं बोललं जातंय. तर इतर सर्व बसगाड्यांचे रूपांतर करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे दोन वर्षे लागतील,” असे राज्य वाहतूक संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या सात बसगाड्यांचे रूपांतर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. “त्या बदलल्यानंतर, त्या काही काळासाठी तपासणीसाठी चालवल्या जातील. सध्या शिवशाहीच्या ताफ्यात एकूण ७९० बसेस आहेत आणि त्या सर्व टप्प्याटप्प्याने नियमित बसेसमध्ये बदलल्या जातील. या वर्षाच्या अखेरीस, सुमारे ४०-४५ शिवशाही बसेस हिरकणी बसेसमध्ये बदलण्याची अपेक्षा आहे.

Karad Bus Depot : सातारा जिल्ह्यातील ‘या’ ST आगाराला मिळाल्या 5 नवीन बस

Karad Bus Depot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Karad Bus Depot । सातारा जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कराड येथील ST आगाराला आणखी ५ नवीन बसेस मिळाल्या आहेत. कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण मानलं जाते. कोकणात जायचं असो, पुणे मुंबईला जायचं असो वा सांगली कोल्हापूरच्या दिशेने दक्षिण भारतात जायचं असो… कराड येथे यावंच लागत.. त्यामुळे कराड बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ बगायला मिळते. हाच विचार करून महाराष्ट्र एसटी महामंडळाने कराड एसटी आगाराला ५ नवीन बस दिल्या आहेत. त्याचे पूजन कर्मचाऱ्यांच्या हस्ते करून आज लोकार्पण करण्यात आले.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण – (Karad Bus Depot)

कराड बस स्थानकातून (Karad Bus Depot) दररोज सुमारे ५० हजारांवर प्रवाशांची ये- जा होते. बसच्या दररोज २८०० फेऱ्या होतात. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत येथे बसची संख्या तोकडी आहे. कऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून कोकणात, कर्नाटकात आणि पुण्या-मुंबईलाही सहज जाता येते. त्यामुळे येथे प्रवाशांचा मोठा ओघ असून, ग्रामीण भागाचे दळणवळणाचे अजूनही एसटी हेच साधन आहे. एसटी महामंडळाने ज्येष्ठ, विद्यार्थी, महिला यांना प्रवास तिकिटात सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीचे महत्त्व आजही कायम आहे. महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने प्रवाशांची संख्या दुप्पट वाढली आहे.

एसटी महामंडळाकडून येथील आगाराला (Karad Bus Depot) नवीन एसटी बस देण्यात याव्या, यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र देऊन नवीन बसची मागणी केली होती. त्याचबरोबर आमदार मनोज घोरपडे यांनीही पाठपुरावा केला. त्याचदरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघ, शेतकरी संघटनेच्या वतीनेही अनिल घराळ आणि सहकाऱ्यांनी नवीन यासंदर्भात आंदोलन केले होते.

सर्व पाठपुराव्यांची दखल महामंडळाने घेऊन नवीन पाच बस दिल्या. येथील आगारातील नवीन बसची संख्या दहा झाली आहे. नवीन बसचे पूजन चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ, विक्रम हांडे, सागर पांढरपट्टे, सुरेंद्र जगदाळे, वैभव साळुंखे, प्रकाश भांदिर्गे, अनिल लटके, तानाजी शेळके, नूरज पाटील, प्रमोद पोळ, नितीन गुरव, जगन्नाथ शिंदे, सुरेखा साळुंखे, शुभांगी जामदार, मीना साळुंखे, श्रीमती पवार, अमित कोळी, अनिल सावंत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

ITMS System : राज्यातील 9 राष्ट्रीय मार्गांवर ITMS सिस्टीम उभारणार; सरकारचा मोठा निर्णय

ITMS System

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ITMS System । राज्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने एकूण ९ राष्ट्रीय महामार्गांवर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास २००० किलोमीटर अंतरावर हि सिस्टीम बसवण्यात येणार आहे. सध्या आयटीएमएस सिटीम हि पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर सुरु आहे. मात्र येत्या १५ महिन्यात ती मुंबई पुणेसह, नागपूर, मराठवाडा, कोकण अंडी पश्चिम महाराष्ट्रात विस्तारली जाईल.

कोणकोणत्या मार्गावर असणार ITMS सिस्टीम? ITMS System

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी विद्यमान शासकीय व्यवस्था अपुरी ठरत असल्याने शासनाने ९ मार्गावर ITMS सिस्टीम (ITMS System) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठाणे-आछाड, मुंबई-कागल, नाशिक-धुळे, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-छत्रपती संभाजीनगर, नागपूर-अकोला, नागपूर-चंद्रपूर तसेच नागपूर-देवरी अशा ९ प्रमुख महामार्गाचा समावेश आहे. या यंत्रणेचा मुख्य उद्देश म्हणजे महामार्गावरील वाहतूक शिस्तीत आणि व्यवस्थित ठेवणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पुरवणे आणि टोल वसुली जलद, पारदर्शक व अचूक पद्धतीने होण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करणे होय.

या सिस्टीमच्या (ITMS System) माध्यमातून आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, वाहनांचा वेग मोजण्यासाठी ‘ॲव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ राहणार आहे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘लेन डिसिप्लीन व्हायोलेशन डिटेक्शन सिस्टीम’देखील राबवली जाणार आहे. ९ महामार्गांवर आणि २ सर्कल्समध्ये ब्लॅक स्पॉट्सवर आयटीएमएसची अंमलबजावणी करण्यासाठी १३८७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पाच सर्कल्समध्ये इन्फ्रा फर्म अशोका बिल्डकॉन लिमिटेड (एबीएल) आणि तिची उपकंपनी अशोका प्युरस्टडी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (एपीटीपीएल) यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमला ​​देण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mobile Recharge Hike : मोबाईल रिचार्ज महागणार!! सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका

Mobile Recharge Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mobile Recharge Hike मोबाईल आणि त्यासाठी लागणारा रिचार्ज हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु आता हाच अविभाज्य भाग तुमचा खिसा मोकळा करणार आहे. येत्या काळात मोबाईल रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जवळपास १० ते १२ टक्क्यांनी रिचार्ज महाग होणार आहेत. मे महिन्यात सक्रिय मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ हे या रिचार्ज दरवाढीचे कारण असल्याचं बोललं जातंय. या रिचार्ज दरवाढीचा फटका देशातील सर्वसामान्य ग्राहकांना बसणार हे नक्की.

मे महिन्यात मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांना विश्वास मिळाला आहे की ग्राहक आता महागडे प्लॅन देखील घेऊ शकतात. त्यामुळेच कंपन्या रिचार्ज प्लॅन वाढवण्याची तयारी (Mobile Recharge Hike) करत आहेत. परंतु यावेळी ते फक्त बेस प्लॅनपुरते मर्यादित राहणार नाही. गेल्या वेळी जुलै २०२४ मध्ये किमती वाढवल्या गेल्या होत्या, तेव्हा बेसिक प्लॅनमध्ये ११-२३% वाढ झाली होती. यावेळी कंपन्या मध्यमवर्गीय आणि उच्च श्रेणीच्या वापरकर्त्यांना लक्ष्य करतील, जेणेकरून जास्तीत जास्त महसूल वाढवता येईल

मे महिन्यात किती यूजर्स वाढले – Mobile Recharge Hike

मे महिन्यात सक्रिय मोबाईल युजर्सच्या संख्येत मोठी वाढ (Mobile Recharge Hike_ झाली आहे. हे वाढते ग्राहक पाहून कंपन्या या वर्षाच्या अखेरीपर्यंत पुन्हा एकदा रिचार्जचे दर वाढविण्याचा विचार करत आहेत. मे महिन्यात ७.४ दशलक्ष म्हणजेच ७४ लाख सक्रिय वापरकर्ते वाढले आहेत. मागील २९ महिन्यांतील हे सार्वधिक ग्राहक आहेत. यापूर्वी, जुलै ते नोव्हेंबर या काळात २.१ कोटी वापरकर्ते कमी झाले होते, परंतु आता सलग पाच महिने मोबाईलसिम कार्ड वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त यूजर्स जिओ ने जोडले आहेत. तर एअरटेलने १३ लाख नवीन सक्रिय यूजर्स जोडले.

दुसरीकडे, इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपन्या आणखी एक रणनीती आखण्याचा प्लॅन करत आहे. त्यानुसार, कंपन्यांचा विचार त्यांच्या प्लॅनमध्ये ‘टायर्ड प्राइसिंग’ लागू करण्याचा आहे. याचा अर्थ असा की सध्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाची मर्यादा कमी केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, ग्राहकांना पुन्हा पुन्हा डेटा पॅक रिचार्ज करावा लागू शकतो. सध्या लहान आणि स्वस्त डेटा पॅक देखील आणत आहेत जेणेकरून ग्राहक डेटा पॅकवर अधिक अवलंबून राहतील आणि भविष्यात, हे डेटा पॅक महाग (Mobile Recharge Hike) करून, कंपन्या अधिक पैसे छापू शकतील असेही बोललं जातंय.

Shivajinagar-Hinjawadi Metro : शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रोची ट्रायल यशस्वी!! प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

Shivajinagar-Hinjawadi Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shivajinagar-Hinjawadi Metro। बहुचर्चित असलेल्या शिवाजीनगर ते हिंजवडी पुणे मेट्रो प्रकल्पाची काल चाचणी पार पडली. गेल्या अनेक वर्षापासून मेट्रोचे काम चालू होते. अनेक अडथळे पार करत अखेर पुणे मेट्रोचे काम अखेर पुर्न्त्तावाकडे गेले आहे. ,म्हणजेच “शहराच्या आयटी हबला मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्ग ३ च्या बांधकामात पहिला महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. काल ४ जुलै २०२५ रोजी, मान डेपो आणि पीएमआर-४ स्टेशन दरम्यान मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात आली,” पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकल्पामुळे पुण्याची वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी पद्धतीतून राबविला जात आहे आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ या नावाने टाटा आणि सीमेन्स यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे विकसित केला जात आहे.

२३.३ किमी लांबी- Shivajinagar-Hinjawadi Metro

साधारणतः हा प्रकल्प (Shivajinagar-Hinjawadi Metro) सुमारे “२३.३ किमी लांबीचा हा पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्ग २३ स्थानकांसह बांधला जात आहे आणि प्रकल्पाची एकूण प्रगती ८७% झाली आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे आणि हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, त्याचाच भाग म्हणून काल या प्रकल्पाची चाचणी देखील झाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांगितले की काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे आणि मार्च २०२६ पर्यंत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण होणार आहे. मार्च २०२६ ला हा जनेतेच्या सवेत असेल असं पीएमआरडीए सांगितले आहे. या मार्गासाठी, ४ वातानुकूलित मेट्रो ट्रेन संच पुण्यात आले आहेत, प्रत्येक ट्रेनमध्ये ३ कोच आहेत आणि एकूण १००० प्रवाशांची क्षमता आहे. या मेट्रो गाड्यांचा वेग ताशी ८० किमी असेल. Shivajinagar-Hinjawadi Metro

पुण्यातील वाढलेल्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण आला होता. त्याला एक चांगल पर्याय म्हणून पुण्यात मेट्रोची निर्मिती झाली. मेट्रो मुळे पुणेकरांचा प्रवास तर सोप्पा झालाच आहे आणि त्यांचा वेळही वाचतोय. महत्वाची बाब म्हणजे पुणे मेट्रो मुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरचा ताण ही कमी होत आहे . पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांचीही संख्या वाढत असून, प्रादेशिक परिवहन यांच्या अहवालानुसार पुण्यामध्ये एकूण 40 लाख 42 हजार 659 इतकी वाहने रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे पुण्यातील रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी बघायला मिळते… याच्यावर उपाय म्हणून पुणे मेट्रो कडे अनेक प्रवासी वळत आहेत.

Ashadhi Special Trains : आषाढीसाठी स्पेशल ट्रेन!! या 16 स्थानकांवर थांबणार; कसा असेल रूट?

Ashadhi Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ashadhi Special Trains उद्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असून यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुखाचा आणि आरामात व्हावा यासाठी सरकारने सुद्धा मोठे प्रयत्न केलेत. अनेक जिल्ह्यातून आषाढी एकादशीनिमित्त विशेष बस आणि रेल्वेगाड्या सोडण्यात आल्यात. आता आषाढी एकादशी उद्या आली असताना आज आणखी एक स्पेशल ट्रेन पंढरपूरला सोडण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) नगरसोल ते मिरज दरम्यान धावणारी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन जाहीर केली आहे. हि ट्रेन १६ स्थानकांवर थांबणार आहे.

कसा असेल रूट? Ashadhi Special Trains

नगरसोल ते मिरज दरम्यान धावणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक ०७५१५) आज, ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता नगरसोल रेल्वे स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी, रविवार, ६ जुलै रोजी दुपारी ३:५५ वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचेल. छत्रपती संभाजीनगर मार्गे ती धावेल. छत्रपती संभाजीनगरला ती रात्री ८:३० वाजता पोचेल. रेल्वेच्या रिटर्न प्रवासाबद्दल सांगायचं झाल्यास, ही ट्रेन (Ashadhi Special Trains) रविवार, ६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:२५ वाजता मिरज येथून निघेल आणि सोमवार, ७ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता नगरसोल येथे पोहोचेल. या रेल्वेमुळे भाविकांना वेळेत पंढरपूरला जाता येईल आणि विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –

महाराष्ट्रातील विविध भागातील प्रवाशांना सेवा देण्यासाठी, ही ट्रेन (Ashadhi Special Trains) तिच्या मार्गावरील १६ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. यामध्ये रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर या स्थानकांचा समावेश आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तांने राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने हि विशेष ट्रेन सोडण्याची घोषणा केली आहे.

Mhada Lottery 2025 : म्हाडाची बंपर लॉटरी!! 2000 घरांसाठी सोडत; कुठे अन कधी?

Mhada Lottery 2025 Thane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mhada Lottery 2025 । सर्वसामान्यांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडाने तब्बल २००० घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. सर्वसामान्यांना कमी किमतीत घरे खरेदी यावीत यासाठी म्हाडा कडून ठाणे विभागात हि सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या शेजारी आणि एका मोठ्या महानगर पालिकेत तुम्हीही हक्काचं घर खरेदी करू शकता. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सध्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेच्या अंतर्गत घरांची विक्री सुरू आहे. पण आता नव्याने घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

जाहिरात कधी प्रसिद्ध होणार ? Mhada Lottery 2025

2000 घराच्या सोडती बाबत (Mhada Lottery 2025) ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. महत्वाची बाबा म्हणजे ही घरे मुंबई जवळ ठाणे, कल्याण, शीळ, विरार परिसरात आहेत. त्याची प्रक्रिया म्हाडाकडून सुरू करण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेश गृहयोजनेतील काही घरे उपलब्ध झाली आहेत. पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील काही घरे पूर्ण झाली आहेत. ऑगस्टमध्ये सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, ज्यात अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश असेल. म्हाडाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचं हक्काचं घर खरेदीचं स्वप्न साकार होणार आहे. कोकण मंडळातील विरार- बोळींज, खोणी, शिरढोणसह अन्य ठिकाणच्या घरांची काही कारणांमुळे विक्री झाली नव्हती. त्यामुळे आता या घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत आणि ‘बुक माय होम’ संकल्पनेनुसार केली जात आहे.

दरम्यान, म्हाडाने यापूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरी अंतर्गत अवघ्या ५ लाख रुपयांत तुम्हाला घर मिळू शकते. मात्र अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) लोकांनाच ५ लाखात घर खरेदीची संधी असणार आहे. म्हाडाच्या लॉटरी (Mhada Lottery 2025)अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे.

BOB Home Loan Rates : गृहकर्ज झालं स्वस्त!! या बँकेचा ग्राहकांना दिलासा

BOB Home Loan Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BOB Home Loan Rates तुम्हीही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल आणि कर्जाच्या चिंतेत असाल तर आता हि चिंता सापडून द्या….. देशातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या गृहकर्जांवरील व्याजदरात कपात केली आहे. यापूर्वी बँक ऑफ बडोदाचे गृहकर्जावरील व्याजदर ७.५० टक्के होते, ते आता ७.४५ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच यामध्ये ०.०५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यामुळे कर्जदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. तसेच पैशाचीही मोठी बचत होणार आहे.

तस बघितलं तर बँक ऑफ बडोदाने (BOB Home Loan Rates) जून महिन्यात सुद्धा गृहकर्जावरील व्याजदर कमी केले होते. त्यावेळी गृहकर्ज ८.०० टक्क्यांवरून ७.५० टक्के केले होते. आता ७.४५ टक्के वार्षिक नवीन दर लागू करण्यात आला आहे, जो मागील दरापेक्षा ०.०५ टक्के कमी आहे. व्याजदरात कपात करण्यासोबतच, बँकेने नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. यामुळे फक्त कर्जच स्वस्त होणार नाही तर गृहकर्ज प्रक्रियाही पूर्णपणे फ्री मध्ये होईल. सीएनबीसीच्या अहवालानुसार, बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले, “गृहकर्ज दरातील या नवीन कपातीचे उद्दिष्ट घर खरेदी करण्याच्या लोकांच्या इच्छेला पाठिंबा देणे आणि क्रेडिट ग्रोथ वाढवणे आहे.” तुम्ही गृहकर्जासाठी डिजिटल किंवा शाखेत अर्ज करू शकता.

बँक ऑफ बडोदा व्यतिरिक्त, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडिया (बीओआय) यांनीही त्यांच्या गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहे. या सर्व बँकांनी जुलैमध्ये त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआरमध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे.

EMI किती राहील? BOB Home Loan Rates

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा मधून २० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, आणि त्याचा कालावधी २० वर्षांसाठी असेल तर तुम्हाला ७.४५ टक्के वार्षिक व्याजदराने दर महिन्याला १६,०५१ रुपयांचा EMI भरावा लागेल.