Sunday, December 21, 2025
Home Blog Page 520

Namo Shetkari Mahasanman Yojana | शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता; 2021 कोटी रुपये मंजूर

Namo Shetkari Mahasanman Yojana

Namo Shetkari Mahasanman Yojana | राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने भारतातील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. ज्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आणि त्यांना आर्थिक मदत देखील मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये दिले जातात.

अशातच आता राज्य सरकारने देखील 2023 रोजी शेतकऱ्यांसाठी अशीच एक नमो शेतकरी महा सन्मान योजना(Namo Shetkari Mahasanman Yojana ) सुरू केली. या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे तीन हफ्ते म्हणजे 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे. आणि आता या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि या योजनेसाठी राज्य सरकारने जवळपास 2041 कोटी रुपये मंजूर देखील गेलेले आहेत.

राज्य सरकारने याआधी नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी 5521 कोटी रुपये वितरित केलेले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये या योजनेसाठी शेतकऱ्यांना एखादा 720 कोटी रुपये वितरित केले आहे. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत 1782 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. तसेच डिसेंबर ते मार्च या कालावधीत 2 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केलेले आहे. म्हणजे या योजनेचे तीन हप्ते आता गेलेले आहेत. आणि आता चौथा हप्ता देखील मंजूर झालेला आहे. या चौथ्या हप्त्यासाठी आता 2021 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झालेला आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता | Namo Shetkari Mahasanman Yojana

मागील वर्षी राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजना (Namo Shetkari Mahasanman Yojana ) चालू केली. आणि आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत. आता चौथा हप्ता देखील लवकरच येणार आहे. याबद्दल शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच चौथ्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएम किसान या योजनेच्या धर्तीव रही योजना सुरू केलेली आहे. पीएम किसान या योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हप्ते जमा झालेले आहेत.

राज्यसभा निवडणुकीआधीच सरकारने याआधी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवले आहेत. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. आणि याचा नक्कीच त्यांना विधानसभा निवडणुकीला फायदा होणार आहे.

OPPO F27 5G | भारतात पहिल्यांदाच लॉन्च झाला OPPO F27 5G फोन, 32MP सेल्फी कॅमेरासह मिळणार ही वैशिष्ट्ये

OPPO F27 5G

OPPO F27 5G | पूर्वी अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या. परंतु आता यामध्ये मोबाईल हा देखील समाविष्ट झालेला आहे. कारण आज काल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल अगदी एक तास जरी स्वतःपासून लांब राहीला, तरी लोकांना करमतच नाही. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्या देखील बाजारात विविध मोबाईल फोन लॉन्च करत असतात. ज्याचे वेगवेगळी वैशिष्ट्ये देखील असतात. अशातच आता एक OPPO चा नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च झालेला आहे. पहिल्यांदाच हा फोन भारतात लाँच झालेला आहे. OPPO F27 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेला आहे. हे या कंपनीचे फ्लॅगशिप मॉडेल आहे.

याआधी कंपनीने भारतात OPPO F27 Pro+ हे फीचर लॉन्च केले होते. मोबाईलच्या या फीचरबद्दल सांगायचे झाले, तर हा फोन 6.67 इंचाचा Aamold डिस्प्ले सह होता. या फोनला 50 MP कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. आता या फोनची किंमत नक्की काय असणार आहे? तसेच तो कुठे उपलब्ध असणार आहे?तुम्हाला कशाप्रकारे खरेदी करता येईल? आणि या फोनची विविध वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत.

OPPO F27 भारतात किंमत | OPPO F27 5G

कंपनीने OPPO F27 5G हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केलेला आहे. या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 28 जीबी स्टोरेज आहे. या फोनची किंमत 22999 रुपये आहे. त्याचप्रमाणे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 2499 एवढी आहे. हा फोन तुम्हाला भारतात ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येईल. कोणत्याही शॉपमध्ये जाऊन तुम्हाला याची खरेदी करता येत नाही. सध्या या फोनची विक्री फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि ओपो इंडियावर चालू झालेली आहे. तसेच या फोनवर तुम्हाला 2500 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या चांगल्या फोनच्या शोधात असाल, तर हा फोन तुमच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे.

OPPO F27 फोनची वैशिष्ट्ये

OPPO F27 या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. तसेच या फोन मीडियाटेक डेन्सिटी 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 8 जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट आहे तसेच या फोनचे स्टोरेज 256 जीबी एवढा आहे.

फोनची कॅमेरा क्वालिटी

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP OV50D कॅमेरा आहे. यासोबत 2MP दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोनची परिमाणे 163.05 × 75.75 × 7.69 मिमी आणि 187 ग्रॅम आहेत.

WhatsApp Feature | व्हॉट्सॲप आणणार सर्वात मोठे फिचर; कोणालाही दिसणार नाही मोबाईल नंबर

WhatsApp Update

WhatsApp Feature | सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये झालेले आहेत. परंतु त्यातील व्हाट्सअप हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. जे केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक लोक वापरत आहेत. व्हाट्सअप हे वापरण्यासाठी अगदी सरळ सोपे आणि साधे आहे. त्यामुळे अनेक लोक व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअप युजर्सला नवनवीन अनुभव देण्यासाठी तसेच व्हाट्सअप आणखी सोपे करण्यासाठी कंपनी नेहमीच व्हाट्सअपचे फीचर्स अपडेट (WhatsApp Feature) करत असते. नुकतेच कंपनीने तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी चेकअप नावाचे एक फीचर आणलेले आहे. यामध्ये कंपनी आता तुमची प्रायव्हसी आणखी जपत आहे. आणि पुढच्या स्तरावर देखील येत आहे. त्यामुळे मोठ्या बदल करणार आहे. ज्याच्या मदतीने तुमचा फोन नंबर देखील अगदी सुरक्षित राहणार आहे. म्हणजे ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाही त्या लोकांपासून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लपवू शकता. म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबर दिसणार नाही. आता हे अपडेट एक खूपच आश्चर्यकारक आहे. परंतु आता हे नेमके कसे होणार आहे? याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

खरंतर एका रिपोर्टमध्ये असे म्हटलेले आहे की whatsapp ही कंपनी लवकरच त्यांच्या सगळ्यात मोठे अपडेट लॉन्च करणार आहे. म्हणजेच तुम्हाला जर एखाद्याशी whatsapp वर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्या व्यक्तीशी तुमचा मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरऐवजी तुमच्या एखादा यूजर नेम सेट करू शकता. ज्यामुळे तुमचा मोबाईल नंबर कुठेही जाणार नाही. टेलिग्रामवर देखील ही सुविधा उपलब्ध आहे. परंतु आता हे फीचर व्हाट्सअपवर देखील येणार आहे.

नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये या फीचरचा (WhatsApp Feature) एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये तुमचे हे फीचर्स कसे काम करणार आहे? हे देखील सांगण्यात आलेले आहे. अनेक लोक व्हाट्सअपवर तुमच्याशी संपर्क साधू शकतील. परंतु त्या सगळ्या लोकांशी तुमचा मोबाईल नंबर शेअर करण्याची काही गरज नाही. यामुळे तुमची प्रायव्हसी देखील जपली जाणार आहे. अजून हे फीचर लॉन्च झालेले नाही. कारण या फीचरची अजून चाचणी चालू आहे. ही चाचणी एकदा सर्व प्रकारे यशस्वी झाली की लवकरच ते आणले जाईल अशी माहिती आलेली आहे.

व्हाट्सअपने याआधी देखील त्यांच्या युजरसाठी अनेक फीचर लॉन्च केलेले आहे. ज्याचा फायदाच लोकांना झालेला आहे. व्हाट्सअपची सगळ्यात खासियत म्हणजे व्हाट्सअप आपल्या प्रायव्हसीला जास्त प्राधान्य देते
त्यामुळेच आज जगभरात whatsapp चे युजर्स आहेत. या व्हाट्सअपवर आपण इन्स्टंट मेसेज करू शकतो. अगदीच व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकतो. तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करायचे असेल, तर तेही करता येतील. त्यामुळे हे अत्यंत रोजच्या वापरातील ॲप झालेले आहे. त्यामुळे व्हाट्सअपवर येणारे नवनवीन फीचर देखील युजर्स अगदी आनंदाने स्वीकारत आहेत आणि त्यांचा वापर देखील करत आहेत.

दिवाळीपूर्वी रेल्वे विभागाची भेट ! मुंबईसह 3 मोठी शहरे आणि 4 राज्यात धावणार ‘वंदे भारत ट्रेन’

दिवाळीपूर्वी, भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून (RKMP) पाटणा, मुंबई आणि लखनऊसाठी थेट वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावतील. पाटणा आणि मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत असेल, तर लखनऊसाठी वंदे भारत चेअर कार असेल. सप्टेंबरमध्ये या गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या भोपाळ ते पाटणा या मार्गावर फक्त विशेष गाड्या धावतात. त्यातही तिकिटे मिळत नाहीत. मात्र या गाड्यांमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

थेट ट्रेनची सुविधा नाही

सध्या भोपाळहून या शहरांसाठी थेट ट्रेन नाही, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पाटणा आणि मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला प्रत्येकी १६ डबे असतील आणि सर्व स्लीपर कोच असतील. लखनौला जाणाऱ्या वंदे भारतला ८ डबे असतील आणि सर्व चेअर कार कोच असतील.

सप्टेंबरमध्ये ट्रेनचे रेक उपलब्ध होतील

त्याचवेळी भोपाळ रेल्वे बोर्डाला सप्टेंबरमध्ये या गाड्यांसाठी रेक मिळणार आहेत. वरिष्ठ डीसीएम सौरभ कटारिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, रेक मिळताच ट्रायल रन सुरू करण्यात येईल. त्यानंतर गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. दिवाळीपूर्वी या गाड्या सुरू होतील, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईसाठीही दोन साप्ताहिक गाड्या

भोपाळ ते मुंबईसाठी सध्या फक्त दोनच साप्ताहिक गाड्या आहेत. लष्कर आणि एलटीटी एक्सप्रेस. त्याचवेळी पंजाब मेल, कुशीनगर, मंगला, कामायनी, राजधानी, तुलसी, पुष्पक, गोरखपूर-एलटीटी यासह २० हून अधिक ट्रेन धावतात. या सगळ्यात खूप प्रतीक्षा आहे. त्यामुळे मुंबईला थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती.

या नवीन वंदे भारत ट्रेन्समुळे भोपाळ आणि या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांना मोठी सुविधा मिळणार आहे. गाड्यांना स्लीपर कोच असल्याने लोकांना आरामात प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा या गाड्या चालवण्यामागचा उद्देश असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Badlapur Case : बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा

Badlapur Case : बदलापूर येथील एका नावाजलेल्या शाळेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांनी केलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. सकाळी रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी सातत्याने आवाहन करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक सुरू केली तर दुसरीकडे शाळेबाहेर असलेल्या आंदोलकांनी शाळेचं गेट तोडून आत मध्ये प्रवेश केला आणि तोड फोड करायला सुरुवात केली. बदलापूरकरांना न्याय हवा आहे, वारंवार आरोपीला फाशी देण्यात यावी असा एकच सूर येथील आंदोलकांनी पकडलेला आहे. आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी ची (SIT) घोषणा केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बदलापूर प्रकरणी एसआयटी (SIT) ची नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं असून फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा दिले आहेत “

दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर पालकांचा उद्रेक झाला आणि आज सकाळपासूनच नागरिकांनी येथील घटना झालेल्या शाळेला घेराव घातला. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांनी रेल रोको करत रेल्वे ट्रॅक वरच ठिय्या मांडला. वारंवार आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.

त्यानंतर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जाऊन बदलापूर येथील रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर उतरून रेल्वे रूळ रिकामे केल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. वारंवार पोलिसांनी सूचना करून देखील आंदोलक आक्रमक झाले होते. त्यावरूनच ह्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत आहे.

तर तिकडे शाळेच्या बाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी शाळेची तोडफोड देखील केली आहे. शाळेच्या बाहेर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधाराच्या फोडाव्या लागल्या. काही काळ हिंसक झालेल्या आंदोलनाला पुन्हा शांततेत सुरुवात झाली असून पोलिसांचा मोठा फौज फाटा बदलापुरात तैनात करण्यात आला आहे. एवढंच नाही तर शाळेच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

Badlapur School Sexual Assault Case | बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा निर्णय; सर्व शाळांमध्ये करणार मोठा बदल

Badlapur School Sexual Assault Case

Badlapur School Sexual Assault Case | आपल्या भारत देश स्वतंत्र होऊन आता 78 वर्षे उलटलेली आहेत. परंतु या भारत देशात अजूनही मुलींना स्वतंत्र मिळालेला आहे का? अजूनही अगदी लहान मुलींपासून ते तरुणींपर्यंत सगळ्याच मुली बिनधास्तपणे सगळीकडे वावरू शकतात का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांनाच पडलेला आहे. कारण कोलकत्तातील अत्याचार प्रकरणानंतर आता बदलापूरमध्ये देखील एक अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहेत. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतीलच कर्मचाऱ्यांकडून अत्याचार (Badlapur School Sexual Assault Case) झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ही घटना घडलेली आता आठवडा झाला आहे.

त्यानंतर आता ही घटना समोर आलेली आहे. आणि प्रशासन देखील आरोपीवर कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचे मत मांडलेले आहे. आणि आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, असे देखील सांगितलेले आहे. अगदी आपल्या राज्यातील लहान मुली देखील सुरक्षित नसल्याची भीती या सगळ्या घटनेतून पुढे आलेली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शाळांमध्ये अशी घटना परत कधीही घडू नये आणि लहान मुलींना या शारीरिक अत्याचाराला सामोरे जाऊन लागायला नको. यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील माहिती दिलेली आहे.

बदलापूरमध्ये (Badlapur School Sexual Assault Case) झालेली घटना समोर येताच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक तात्काळ बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यासाठी शाळेमध्ये सखी सावित्री समिती कार्यान्वित करण्याची सूचना देखील देण्यात आलेली आहे. प्रशासनाने ही सूचना देऊन जर ही समिती स्थापन झाली नाही, तर ब्लॉक ऑफिसवर कारवाईचे आदेश केले जातील.असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेले आहे.

पॉस्को अंतर्गत ही ईबॉक्स संकल्पना समोर आलेली आहे. त्यासोबत एक तक्रार पेटी देखील ठेवली जाणार आहे. आणि या तक्रारीवर कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. तसेच याबाबत अधिसूचना देखील काढण्यात येणार आहे. शाळा पातळीवर या सगळ्या गोष्टींचे नियोजन करायला शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेले आहे.

बदलापूरमध्ये ही घटना 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान घडलेली आहे. 17 ऑगस्टला ही तक्रार दिली होती. परंतु त्यावर अजून कोणतीही कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला देखील कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, संबंधित शिक्षिका आणि इतर इतरांना निलंबित करण्यात येत असल्याचे देखील केसरकर यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेली आहे की, कारवाई केल्यानंतर शाळेची जबाबदारी संपणार नाही. यावेळी शाळेची सीसीटीव्ही देखील बंद होती. सीसीटीव्हीचे जबाबदारी ही पूर्णतः शाळेची असणार आहे. याबद्दल देखील परिपत्रक काढणार आहे. गुन्हेगार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून ही केस एकदम फास्ट ट्रॅकवर चालवली जाणार आहे. यासाठी विशेष वकील देखील नेमला जाणार आहे. आणि ही महिन्याभरातच कोर्टात आणली जाईल असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

Reliance Jio | रिलायन्स – जिओचा मोठा धमाका! लॉन्च केले नवीन प्रीपेड डेटा प्लॅन

Reliance Jio

Reliance Jio | मागील जुलै महिन्यातील रिलायन्स जिओने त्यांच्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ केलेली होती. त्यामुळे त्यांचे बरेच ग्राहक त्यांच्यावर नाराज झाले होते. परंतु अशातच आता जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आणलेली आहे. ती म्हणजे जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी काही गुप्तपणे प्रीपेड प्लॅन लॉन्च केलेले आहेत. हे डेटा प्लॅन मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. परंतु यातून तुम्हाला भरपूर डेटा प्रदान होणार आहे. ज्यांना कमी कालावधीसाठी जास्त डेटा लागतो. त्यांच्यासाठी जिओचे हे प्लॅन अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

जिओने( Reliance Jio) त्यांचे नवीन प्लॅन लॉन्च केलेले आहे. त्या प्लॅनची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. टेलिकॉम ऑपरेटर कडून हे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. यात सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत ही 189 रुपये आहे. तर तुम्हाला 198 आणि 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील यामध्ये मिळणार आहे. आता या रिचार्ज प्लॅनचे नक्की फायदे काय असणार आहे? ते आपण जाणून घेऊया.

198 दिवसाचा प्रीपेड प्लॅन | Reliance Jio

रिलायन्स जिओचा 198 दिवसाच्या प्रीपेड प्लॅन हा 14 दिवसांचा असणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित वाईस कॉल, 2 जीबी डेटा, 100 एसएमएस फ्री मिळणार आहे. तसेच तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मिळणार आहे.

जिओचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

199 रुपयांच्या प्लॅनची ​​सेवा 18 दिवसांची वैधता आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5G डेटा आणि दररोज 100 एसएमएससह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. JioCinema, JioTV आणि JioCloud हे या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त ॲप्स आहेत.

189 रुपयांचा प्रीपेड प्लॅन | Reliance Jio

रिलायन्स जिओचा आणखी एक प्लॅन जो 200 रुपयांच्या खाली येतो तो 189 रुपयांचा आहे. आत्तासाठी, ही टेल्कोची सर्वात स्वस्त सेवा वैधता योजना आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 300 SMS मिळतात. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. त्याच Jio ॲप्सचाही या प्लॅनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Viral Video : पुण्यात पुन्हा वाढला पावसाचा जोर ! वाढीव पुणेकरांची भलतीच शक्कल ; व्हिडीओ झाला व्हायरल

Viral Video : राज्यभरात पावसाने थोडी उसंत घेतली होती मात्र मागच्या दोन दिवसांत पुण्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस बरसायला सुरुवात केली आहे. आता पुणे म्हंटल्यावर गोष्ट एवढी साधी सोपी असते का ? पुणेकरांचा स्वॅगच जरा हाय लेव्हल आहे. हे काही वेगळे सांगायला नको. मग पुणे पाट्या म्हणा किंवा पुणेकरांचा स्वभाव म्हणा येथे हटके काहीतरी बघायला मिळतच. पुणेकरांच्या अशाच हटके गोष्टीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की हसू येईल. चला मग जाणून घेऊया काय (Viral Video) आहे व्हिडीओ ?

काय आहे व्हिडिओत ? (Viral Video)

या व्हिडिओमध्ये तीन तरुण एका दुचाकी वर बसलेले दिसत आहेत. शिवाय पुण्यात पावसाचा जोर असल्यामुळे सगळीकडे पाऊस पडतोय आणि अशा पावसातून वाचण्यासाठी या पुणेकरांनी एक अनोखा जुगाड शोधला असून मोठी छत्री डोक्यावर घेतली आहे. ही जी छत्री आहे ती साधीसुधी छत्री नाही तर ही टपऱ्यांसाठी वापरण्यात येते अशी छत्री आहे. जी एका दोघाला नाही तर चक्क सहा-सात जणांना या छत्रीमध्ये सामावू शकते. ही भली मोठी छत्री घेऊन हे तिघे तरुण एका बाईक वरून पावसापासून वाचण्यासाठी जात आहेत. हे तरुण ट्रिपल सीट प्रवास करीत आहेत जे कायद्यात बसत नाही आणि एवढी मोठाली छत्री घेऊन जात आहेत त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास कसा झाला असेल याबाबत प्रश्नचिन्हच आहे मात्र हा (Viral Video) व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी याची मजा घेत आहेत.

rutik_jagtap_2005 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Viral Video) व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये प्रॉपर पुणेकर असं लिहिला आहे. या व्हिडिओवर अनेक सोशल मीडिया युजर्सने कमेंट केल्या असून एका युजरने लिहिला आहे एम एच बाराचा नाद नाही करायचा. आणखी एका युजरने पुढे लिहिले आहे ‘पोलीस’ पुढे तुमचा पत्ता विचारत आहेत’ तर आणखी एका युजरनी हा व्हिडिओ आवडला असून हसण्याच्या इमोजीज शेअर केल्या आहेत.

Flipcart | फ्लिपकार्टच्या ग्राहकांना झटका; प्रत्येक ऑर्डरवर द्यावे लागणार अतिरिक्त पैसे

Flipcart

Flipcart | काही महिन्यांपूर्वी स्विगी आणि झोमॅटो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने ग्राहकांकडून प्रत्येक ऑर्डरवर फी घेण्यास सुरुवात केलेली होती. अशातच आता फ्लिपकार्टने देखील त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता फ्लिपकार्ट देखील प्रत्येक ऑर्डरवर त्यांच्या ग्राहकांकडून 3 रुपये प्लॅटफॉर्म फी घेणार आहे. अलीकडे झोमॅटो आणि स्विगीने देखील त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. फ्लिपकार्टने (Flipcart) ऑनलाइन पेमेंट आणि कॅश ऑन डिलिव्हरी या दोन्हींवर हे शुल्क चालू केलेले आहे. फ्लिपकार्ट ही फी प्लस प्रोग्रॅम आणि नॉन प्लस प्रोग्रॅम या दोन्ही युजर्सकडून घेणार आहे. परंतु जर तुम्ही फ्लिपकार्ट मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवरून जर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली, तर हे शुल्क आकारले जाणार नाहीत.

शुल्क कधी आकारले जाणार | Flipcart

झोमॅटो स्विगीनंतर फ्लिपकार्टने 17 2024 पासून अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केलेली आहे. या कंपनीचे असे म्हणणे आहे की, यामुळे प्लॅटफॉर्म कार्यक्षमतेने चालवता येते. आणि त्यात सुधारणा देखील करण्यात करता येते. परंतु सध्या ॲमेझॉन हे प्लॅटफॉर्म कोणत्याही प्रकारची प्लॅटफॉर्म फी घेत नाही. अमेझॉन ही फ्लीपकार्टची सगळ्यात प्रमुख अशी प्रतिस्पर्धी कंपनी आहे.

फि का घेत आहेत?

झोमॅटो आणि स्विगी या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मने त्यांचा नफा आणि महसूल वाढवण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केलेली आहे. जानेवारीमध्येच ही फी वाढवलेली आहे. जानेवारीमध्ये स्विगीने त्यांच्या काही निवडक यूजरसाठी 10 रुपये प्लॅटफॉर्म फी सुरू केलेली आहे. याआधी मार्केटमध्ये या कंपन्यांकडून 5 रुपये शुल्क आकारले जात होते. सध्या स्विगी 7 रुपये प्लॅटफॉर्म फी घेत आहेत. दोन्ही कंपन्यांनी मागील वर्षीही प्लॅटफॉर्म सुरू केली होती. सुरुवातीला प्रत्येक ऑर्डरवर ते 2 रुपये एवढी प्लॅटफॉर्म फी घेत होते. परंतु आता तीच प्लॅटफॉर्म फी 10 रुपये झालेली आहे.

याबद्दल माहिती देताना कॅपिटल माईंडचे सीईओ दीपक सेना यांनी सोशल मीडियावर माहिती दिलेली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्लॅटफॉर्म फी ग्राहकांना त्रास देणार आह म्हणूनच मी आता स्विगी आणि झोमॅटोपासून अंतर ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि हे करताना मला खूप आनंद होत आहे. यावर त्यांनी असे लिहिलेली आहे की, या कंपन्या प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांकडून 6 रुपये घेत आहे. याशिवाय हे लोक रेस्टॉरंटमधून हेच फी 30 टक्के घेतात.

Badlapur Case : भय इथले संपत नाही ! बदलापुरात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार,आत्तापर्यंत काय घडलं?

Badlapur Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकता येथील शिकावू डॉक्टरच्या हत्येनंतर आता महाराष्ट्रातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला असून ज्या मुलींना काहीही समजत नाही अशा अजाणत्या वयातच या दोन चिमुकल्यांना असंख्य वेदना सोसाव्या लागल्यामुळे बदलापूरकर आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी करत आहेत. बलापूरकरांनी प्रशासनाला यामुळे चांगलंच धारेवर धरलं असून चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर (Badlapur Case) नराधमाला फासावर लटकवा असा एकच सूर लावून धरला आहे.

या घटनेनंतर संतप्त बदलापूरकरांनी शाळेच्या समोर ठिय्या आंदोलन केलं ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. शिवाय बदलापुरातील मुख्य रेल्वे मार्गावर देखील आंदोलन (Badlapur Case) करण्यात आलं आहे

दरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्टट्रॅकवर चालवण्याचे आश्वासन दिले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असेही सांगितले आहे. तरीदेखील बदलापूरकरांचा रोष काही कमी होताना दिसत नाहीये. बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करीत असताना तेथे आलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक केल्याची घटना घडली आहे. पोलीस सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र बदलापूरकरांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही एकच मागणी करण्यात येत (Badlapur Case) आहे.

याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना देखील सेवेतून कमी करण्यात आला आहे. काही साजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. आता प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं (Badlapur Case)

बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यापैकी एक मुलगी चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेमध्ये नुकतेच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षाच्या नराधमाने हे अमानवी कृत्य केल्याची घटना घडली आहे. 12 ऑगस्ट रोजी ही घडलेली घटना आहे. अक्षय शिंदे हा एक ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या या आरोपीने त्याच्या कामाचाच गैरफायदा घेत मुलींवर (Badlapur Case) अत्याचार केला.

12 ऑगस्ट दिवशी एका मुलीने शाळेतून घरी गेल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. “आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत…” असं त्या कोवळ्या मुलीचं वाक्य होतं. सातत्याने ही मुलगी तिच्या पालकांकडे तक्रार करू लागल्याने पालकांना संशयाला आणि त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारणा केली. त्यावेळी तिने शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमाना तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचे उघड झालं. त्यानंतर पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला नुकतीच त्यांची मुलगी ही शाळेत जायला घाबरत असल्याचं समजलं होतं. दोन्ही मुलींची अवस्था ही संशयास्पद असल्याने पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचे ठरवलं आणि तपासणीनंतर शाळेतीलच नराधमान त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) केल्याचे उघडकीस आलं.

पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार संताप्त पालकांनी या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर आरोपीला (Badlapur Case) अटक केली.

बदलापूर आंदोलनाचा घटनाक्रम (Badlapur Case)

  • सकाळी 7:30 वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं
  • सकाळी10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात जाऊन रेल रोको सुरू केला. मध्य रेल्वे वरील कल्याण कर्जत आणि अंबरनाथ वरून बदलापूर कडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद
  • सकाळी 11:10 वाजता मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत संयम ठेवण्याचा आवाहन केलं.
  • सकाळी 11:30 वाजता गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले
  • दुपारी 11:45 वाजता आंदोलकांकडून शाळेचे गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न
  • दुपारी बारा वाजता आंदोलकांनी शाळेत जाऊन तोडफोड केली
  • दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तातडीची पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली.
  • दुपारी 12:40 वाजता पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला. संतप्त आंदोलकांनी दगडफेक सुरू केली.
  • दुपारी एक वाजता पुन्हा आंदोलक रेल्वे ट्रॅकवर आले. पोलिसांकडून पुन्हा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू झाला
  • दुपारी 1:10 वाजता शाळेबाहेर तणाव वाढला पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या