Sunday, December 21, 2025
Home Blog Page 519

Badlapur Crime : तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर….; बदलापूर घटनेनंतर राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

Badlapur Crime raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील २ अल्पवयीन मुलींवर सफाई कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची घटना (Badlapur Crime) समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अक्षय शिंदे असं सदर नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मात्र आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अजूनही आंदोलन सुरु आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि गृह विभागावर ताशेरे ओढल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनीही नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे.

याबाबत राज ठाकरेंनी ट्विट करत म्हंटल, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना (Badlapur Crime) घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.

आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. असं राज ठाकरेंनी म्हंटल.

महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र्र बंदची हाक – Badlapur Crime

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की, बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केला आहे. हि संस्था भाजप आणि आरएसएसची असल्याने त्यांची बदनामी होऊ नये याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. महायुतीला या घटनेचं काहीही घेणंदेणं नसून सत्तेची गुर्मी त्यांच्यात आहे. आम्हाला यामध्ये राजकारण करायच नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळिमा लावायचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी कडून देण्यात आली आहे. या बंद मध्ये महाविकास आघाडी आणि आमचे सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहोत. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्रातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकाराला आरसा दाखवायचा प्रयत्न करू असं आवाहन नाना पटोले यांनी केलं.

Vande Bharat Express : ‘शिर्डी-मुंबई वंदे भारत’ एक्स्प्रेसमधील जेवणात सापडलं झुरळ

Vande Bharat Express : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन खूप कमी वेळेत ही ट्रेन प्रवासांच्या पसंतीस उतरली असून राज्यभरातून देखील या ट्रेनच्या काही फेऱ्या होत असतात. मात्र शिर्डी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला वंदे भारत एक्सप्रेस मध्ये असुविधेचा सामना करावा लागला. कारण या प्रवाशाच्या जेवणामध्ये चक्क मेलेलं झुरळ सापडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वंदे भारत च्या केटरिंग सर्विस वर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रवाशाने ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणातील डाळीत झुरळ सापडल्यानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत तक्रार केली आहे. त्यानंतर मात्र ही पोस्ट व्हायरल झाली असून नेटकरी (Vande Bharat Express) यावर व्यक्त होत आहेत.

काय आहे घटना? (Vande Bharat Express)

मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत शिर्डीहून मुंबई येणाऱ्या ट्रेनमध्ये रिक्की जयस्वानी नावाचा प्रवासी प्रवास करीत होता. यावेळी ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणात त्याला झूरळ सापडलं. त्यानंतर त्याने आय आर सी टी सी कडे लेखी तक्रार केली. या प्रवाशाने याबाबतचा एक व्हिडिओ आणि फोटो एक्स या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला (Vande Bharat Express) आहे.

या प्रवाशाने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहले आहे की, “आम्ही वंदे भारत ट्रेनने शिर्डीवरून मुंबईला येत होतो त्यावेळी आम्हाला देण्यात आलेल्या जेवणातील डाळीत एक मृत झुरळ सापडला आहे. मॅनेजरनेही याला दुजोरा दिला आहे. आम्ही या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे. हा नवा भारत आहे” असा संताप या प्रवाशांने व्यक्त केलाय. या वापरकर्त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये मृत झुरळ (Vande Bharat Express) स्पष्ट दिसत आहे.

काय आहे IRCTC चे म्हणणे ?

दरम्यान या पोस्टला उत्तर देताना आय आर सी टी सी ने म्हंटले आहे की, ” सर तुम्हाला झालेल्या गैरसोयी बद्दल मनापासून खेद आहे. या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने पाहिले गेले असून सेवा पुरवठा करणाऱ्यालाही दंड ठरवण्यात (Vande Bharat Express) आला आहे. तसेच सेवा देणाऱ्यांच्या स्वयंपाक घरातील युनिटची पूर्ण तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे”.

महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक!! बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

maharashtra closed over badlapur case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur Case) झाल्याच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी सदर आरोपीला फाशी देण्याची मागणी वाढत चालली आहे. या घटनेनं राजकीय वातावरण सुद्धा पुन्हा एकदा तापलं आहे. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक (Maharashtra Closed) दिली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुत बैठक पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केला आहे. हि संस्था भाजप आणि आरएसएसची असल्याने त्यांची बदनामी होऊ नये याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. महायुतीला या घटनेचं काहीही घेणंदेणं नसून सत्तेची गुर्मी त्यांच्यात आहे. आम्हाला यामध्ये राजकारण करायच नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळिमा लावायचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी कडून देण्यात आली आहे. या बंद मध्ये महाविकास आघाडी आणि आमचे सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहोत. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्रातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकाराला आरसा दाखवायचा प्रयत्न करू असं आवाहन नाना पटोले यांनी केलं.

दरम्यान, बदलापूर घटनेतील नराधमाला आताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांवर जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड करणे, पोलिसांवर दगडफेक करणे या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तब्बल दीड हजारहून अधिक लोकांवर दाखल करण्यात आले. यातील 22 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. कोर्टाने या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ!! समरजीत घाटगे पवारांची तुतारी हाती घेणार?? मुहूर्तही ठरला

sharad pawar samarjit ghatge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरच्या राजकारणात (Kolhapur Politics) मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि कागलचे नेते समरजीत घाटगे ( Samarjit Ghatge) हे लवकरच भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Sharad Pawar Group) प्रवेश करणार आहे अशा चर्चा सुरु आहेत. येत्या २३ ऑगस्टला समरजीत घाटगे कागल येथे (Kagal) कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून या मेळाव्यात ते आपले भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.असं झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. कारण समरजीत घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते मानले जातात.

गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे हे शरद पवार गटात जातील, अशी चर्चा होती. खरं तर समरजित घाटगे हे कागल मतदार संघाचे भाजपचे नेते आहेत. त्याठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात. मात्र अजित पवारांचा गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर युतीचे संपूर्ण चित्र बदललं . युतीच्या जागावाटपात कागलची जागा हसन मुश्रीफ यांचयाकडे जाण्याची शक्यता आहे. हाच धोका ओळखून राजकीय भवितव्यासाठी समरजीत घाटगे हे पवारांची तुतारी हाती घेणार आहेत असं बोललं जातंय. समरजीत घाटगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरतील, असे सांगितले जात आहे. असं झाल्यास हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी वाढणार आहे हे निश्चित….

२०१९ च्या विधानसभेच्या मागील निवडणुकीत ‘कागल’मध्ये तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते. यावेळी समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. त्यानंतर ते थेट भाजपमध्ये सक्रिय झाले होते. विधानसभेसाठी त्यांनी तयारीही सुरु केली. मात्र महायुतीच्या जागावाटपात कागलची जागा हसन मुश्रीफ यांनाच मिळण्याचे संकेत अजित पवारांनी दिले होते. कागल मध्ये कार्यक्रमात हसन मुश्रीफ हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. त्यामुळे राजकीय भवितव्यसाठी समरजीत घाटगे हे पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जातंय.

Dark Pigmented Lips | ओठ गुलाबी आणि तुकतुकीत करण्यासाठी करा हे घरगुती उपाय; लगेच होईल फायदा

Dark Pigmented Lips

Dark Pigmented Lips | प्रत्येकाला असे वाटते की, आपले खूप मोठे गुलाबी रंगाचे मऊ, तुकतुकीत आणि एकदम नाजूक असावेत. परंतु तुमच्या दैनंदिन जीवनातील काही सवयी तुमच्या ओठांना खराब करतात. तुम्ही जर अति धूम्रपान करत असाल, तरी देखील तुमचे ओठ खराब होतात. तसेच तुमच्या शरीरात पोष्टिकतेची कमतरता असेल, हार्मोनल बॅलन्स नसतील किंवा जर तुम्ही सातत्याने औषधांचे सेवन करत असाल, तर याचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर होतो. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणताही आजार झाला की, त्याचा सगळ्यात आधी परिणाम तुमच्या ओठांवर (Dark Pigmented Lips ) होतो. तुमचे मोठे अत्यंत निस्तेज दिसू लागतात. परंतु तुम्हाला यासाठी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही चांगला आहार, चांगली जीवनशैली आत्मसात करून तुमच्या ओठांची जर योग्य काळजी घेतली, तर तुमचे ओठ देखील चांगले राहतील. आता गडद रंगाचे गुलाबी ओठ करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? कोणत्या घरगुती उपाय केले पाहिजे? त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

हायड्रेट रहा | Dark Pigmented Lips

तुम्हाला जर तुमचे ओठ आतून एकदम हायट्रेट हवे असेल, तर त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी प्यावे लागेल. पाण्यासोबतच तुम्ही ज्यूस नारळाचे पाणी देखील पिऊ शकता. यामुळे तुमच्या ओठांना हायड्रेशन मिळते आणि तुमचे ओठ नेहमीच सुंदर दिसतात.

जिभेने ओठ चाटू नका

तुम्ही जर सातत्याने तुमचे ओठ चाटत असाल, तर ते कोरडे पडतात. आणि त्यातील रंगद्रव्य देखील निघून जातात. त्यामुळे असे करणे टाळावे. तुम्हाला जर असे वाटत असेल की, तुमचे ओठ कोरडे पडले असेल, तर त्यावर लिपबाम लावा. परंतु सातत्याने जिभेने चाटू नका.

लिंबाचा रस आणि मध

तुम्ही तुमच्या ओठांवर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून लावले, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुमच्या ओठांचा रंग देखील उजाळतो. तुम्ही रात्री झोपण्याआधी हेच ओठावर लावू शकता. आणि सकाळी उठून धुवू शकता. जर तुम्ही सातत्याने असे केले, तर तुमच्या ओठांचा रंग चांगला होईल.

बीटरूटचा रस

तुम्ही जर बीटरूटचा रस किंवा त्याची पावडर तुमच्या ओठांवर लावली, तर त्यामुळे तुमचे ओठ गुलाबी होऊन शकता. तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे हे तुमच्या ओठांवर ठेवा आणि नंतर सामान्यपणे धुवून टाका.

धूम्रपान टाळा | Dark Pigmented Lips

धूम्रपान करणे हे आपल्या शरीराच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. यामुळे तुमच्या फुफुसांना नुकसान होते. त्याचप्रमाणे तुमचे ओठ ही काळे होतात. त्यामुळे धूम्रपान करू नका.

गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध

तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यात मध मिसळून एक पेस्ट तयार करा. आणि तुमच्या ओठांना लावा. ही पेस्ट जवळपास पंधरा मिनिटं तशीच राहू द्या. त्यानंतर तुमचा ओठांना चांगला रंग येईल.

नारळाच्या तेल वापरणे

नारळाच्या तेलात विटामिन ई असते. त्यामुळे तुमच्या ओठांना मॉइश्चरायझर प्राप्त होते. आणि त्याचा रंग देखील बदलतो त्यामुळे दिवसातून तीन ते चार वेळा ओठांवर तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता.

बदामाचे तेल आणि मध | Dark Pigmented Lips

बदामाच्या तेलामध्ये विटामिन ई असते. त्यामुळे तुम्ही बदामाच्या तेलात मध मिसळून त्याची पेस्ट तयार करून तुमच्या ओठांवर लावू शकता. त्यामुळे तुमच्या ओठांचा रंग सुधारतो आणि ओठ एकदम मऊ होतात.

MAHARERA : महारेराचा बिल्डर्सना आणखी एक दणका ! काय आहे नवा नियम ? ग्राहकांचे मात्र हित

MAHARERA : घर खरेदीदारांना कोणत्याही फसवणुकीला सामोरे जावे लागू नये. त्यांना नियमाप्रमाणे चांगले घर मिळावे बिल्डर कडून कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी महरेरा कडून अनेक चांगल्या नियमावली बनवून देण्यात आल्या आहेत. आता या नियमावली मध्ये आणखी एका नियमाची भर पडली असून प्रकल्पावर आधारित ‘गुणवत्ता हमी प्रमाणपत्र’ बिल्डरला प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी सादर करणे आणि हे वेबसाईटवर देखील जाहीर करणं बंधनकारक करण्यात आले आहे.

तुम्ही राहत असलेल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे सामग्री वापरली गेली आहे? कोणत्या प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत? याची माहिती आता सार्वजनिक रित्या उपलब्ध होणार असून याचा फायदा ग्राहकांना चांगल्या पद्धतीचे घर घेण्यासाठी सुद्धा होणार आहे.प्रत्येक बिल्डर आपला प्रकल्प सर्वच बाबतीत उत्तम आहे असा दावा करत असतो परंतु इथून पुढे तशी हमी (MAHARERA) बिल्डरला महारेरा मार्फत ग्राहकांना दरवर्षी द्यावी लागणार आहे. चला जाणून घेऊया याच नियमाबद्दल…

बिल्डरांची जबाबदारी वाढली (MAHARERA)

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराकडून राज्यातील सर्व बिल्डरांना यापुढे हा नियम लागू राहणार आहे. याबाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प अभियंते प्रकल्प परिवेक्षक यांनी प्रमाणित करून दिल्यानंतरच बिल्डरांना सर्व बाबींची पुन्हा एकदा खात्री करून गुणवत्ता हमीच प्रमाणपत्र स्वतः सादर करावे लागणार आहे. एवढेच नाही तर हे प्रमाणपत्र त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा त्यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे आता बिल्डरांची जबाबदारी वाढली असून ग्राहकांना मात्र चांगल्या पद्धतीची घरं उपलब्ध होण्याची आशा आणखी एकदा वाढली आहे.

हमी प्रमाणपत्र बंधनकारक (MAHARERA)

याबाबतीत महारेरांना डिसेंबर मध्ये सल्लामसलत पेपर जाहीर केला. त्यावर आलेल्या प्रतिसादावर परिपत्रक जाहीर केलं. त्यावर 23 मे रोजी सूचना मत मागवली होती. आलेल्या सूचना मत आणि या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी बोलल्यानंतर हे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र अंतिम करून ते आता बंधनकारक करण्यात आलं आहे.

याबाबत माहिती देताना महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात गुणवत्तेसाठी आग्रह धरला जातो. आता गृहनिर्माण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बांधकाम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी महारेरा प्राथमिक मापदंड (MAHARERA) ठरवण्यासाठी डिसेंबर पासून प्रयत्नशील आहे. नवीन प्रकल्पातील घरात ग्राहक प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर त्याला अडचणी येऊ नयेत म्हणून आता काळजी घेतली जात असून बिल्डर आता जी माहिती देईल ती सर्वांना सार्वजनिकरित्या उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यात बिल्डरच्या विश्वासाचा प्रश्न निगडित असल्याने बांधकामाबाबत ते अधिक सजग होतील परिणामी खरेदीदारांना चांगलं घर मिळेल. असे मेहता यांनी सांगितले.

बिल्डरला कोणती माहिती देणे बंधनकारक? (MAHARERA)

  • बिल्डरने ज्या मातीमध्ये हा प्रकल्प उभारला आहे त्या मातीची चाचणी केली आहे का?
  • प्रकल्पासाठी संरचना अभियंता नेमला आहे का?
  • कामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी नोंदवही प्रकल्प स्थळी ठेवली आहे का?
  • बांधकामासाठी वापरलेल्या सामग्रीची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रकल्प स्थळी चाचणीची सोय आहे का?
  • बहुमजली इमारत असल्यास भूकंप रोधक यंत्रणा आहे का?
  • गरजेनुसार पूर प्रतिबंधक तरतूद आहे का?
  • काँक्रीट, स्टील, इलेक्ट्रिक वायर, प्लंबिंग आणि मलनिस्सारण फिटिंग्ज ही सामग्री प्रमाणित आहे का?
  • बांधकामासाठी योग्य पाणी वापरलं आहे का?
  • भिंतीत गळती आणि दमटपणा राहणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे का?
  • त्र्यस्थनमार्फत प्रकल्प स्थळी बांधकाम काळात आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता चाचणी घेतली असेल तर त्याचा तपशील असावा.
  • अग्निशामक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत का? असेल तर त्याचा तपशील

Beetroot Powder Benefits | बीटरूट पावडर तुमच्या त्वचेला करेल आणखी चमकदार; अशाप्रकारे करा वापर

Beetroot Powder Benefits

Beetroot Powder Benefits | प्रत्येक जण आपल्या त्वचेची खूप काळजी घेत असतात. त्वचेला अत्यंत निर्मळ आणि सुंदर करण्यासाठी अनेक लोक केमिकल ट्रीटमेंट घेतात. परंतु या केमिकल ट्रीटमेंटमुळे आपल्या त्वचेला नंतर इजा होण्याची भीती असते. परंतु तुम्ही जर काही नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेतली, तर तुमच्या त्वचेला खूप चांगला फायदा होतो. यातीलच आज आम्ही बीटरूटच्या पावडरपासून त्वचेची काळजी कशी घ्यावी? हे सांगणार आहोत. बीटरूट (Beetroot Powder Benefits) हे आपल्या शरीरासाठी जेवढे फायदेशीर आहे. तेवढेच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे एक औषधापेक्षा कमी नाही. बीटरूटमध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट यांसारखे पोषकतत्व आढळतात. त्यामुळे त्वचेला चांगले पोषण मिळते. आणि त्वचा चमकदार होते. बीटरूटच्या पावडरचा (Beetroot Powder Benefits) वापर केल्याने तुमच्या त्वचेचा पोत आणि रंग देखील सुधारतो. त्यामुळे तुमचे सौंदर्य आणखी वाढते. आता बीटरूट पावडरचा वापर करून घरच्या घरी कशी त्वचा चमकदार होईल आणि ते कसे वापरायचे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

बिटरुट पावडरचे फायदे | Beetroot Powder Benefits

नैसर्गिक चमक

बीटरूट पावडरमध्ये मुबलक प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे तुमच्या त्वचेला एक गुलाबी चमक येते. त्याचप्रमाणे त्वचेला आतून पोषण मिळते. तुमची त्वचा अत्यंत ताजी आणि चमकदार दिसते. आणि फ्री रॅडिकल्स पासून होणारे नुकसान देखील कमी करतात.

डार्क सर्कल आणि पिगमेंटेशन कमी करतात

बीटरूट पावडरमध्ये विटामिन सी असतात. त्यामुळे डोळ्याखाली असणारे ब्लॅक सर्कल्स त्याचप्रमाणे त्वचेवर येणारे पिंपल पिगमेंटेशन देखील कमी होते. तसेच तुमच्या त्वचेच्या पोत देखील आणखी चांगला होतो.

अँटीएजिंग गुणधर्म |Beetroot Powder Benefits

बीटरूट पावडरमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि इतर घटक असतात. जे त्वचा वृद्धत्व होण्याची प्रक्रिया बंद करतात. त्यामुळे तुम्ही जास्त काळ तरुण दिसता आणि तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील नाहीशा होतात.

डाग कमी करणे

बीटरूटची पावडर ही तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि पिंपल्स कमी करतात. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्सचे डाग राहिले, असेल तरी देखील बीटरूटच्या पावडरमुळे ते हळूहळू कमी व्हायला लागतात.

बीटरूट पावडरचा कसा वापर करावा ?

फेस मास्क

तुम्ही बीटरूटचा फेस मास्क बनवण्यासाठी बीटरूट पावडर घ्या आणि त्यामध्ये थोडे गुलाब पाणी आणि किंवा दही घाला. हे मिश्रण करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. आणि तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा.

लिप बाम बनवणे

तुम्ही खोबरेल तेल किंवा सिया बटरमध्ये बीटरूटची पावडर घालून ती मिसळून ठेवू शकता. आणि तुमच्या ओठांवर देखील लावू शकता. यामुळे तुमचे ओठांना मॉइश्चरायझर पुरेल आणि तुमच्या ओठांचा रंग देखील गुलाबी होईल.

स्क्रब करणे | Beetroot Powder Benefits

तुम्ही बीटरूटच्या पावडरमध्ये साखर आणि मध मिसळून स्क्रब तयार करा. तुमच्या हलक्या हाताने तुमच्या चेहऱ्यावर मसाज करा. आणि नंतर धुवा या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेतील मृत त्वचा निघून जाते. आणि तुमची त्वचा अत्यंत मुलायम आणि चमकदार दिसते.

वळवण्यात आल्या 24 मेल एक्सप्रेस ; 50 लोकलच्या फेऱ्या केल्या रद्द

बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रुळावरच ठिय्या मारला होता. याचा परिणाम येथून ये-जा करणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर झाला. यामुळे कर्जत खोपोली या मार्गावरील लोकल सेवा ठप्प पडली होती या मार्गावरील पन्नास लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर 24 मेल आणि एक्सप्रेस ठाणे, दिवा, पनवेल मार्गे सीएसएमटीच्या दिशेने वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना सीएसएमटी गाठण्यासाठी 15 ते 30 मिनिटे उशीर झाला होता

सुमारे 10 तासांनी वाहतूक सुरु

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ सीएसएमटी या लोकल सेवा सुरू असल्या तरी विलंबाने धावत असल्यामुळे उर्वरित स्थानकांवर संध्याकाळी पीक आवरला गर्दी झाली होती. सुमारे दहा तासांनी म्हणजे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी बदलापूर आणि कर्जत खोपोली दरम्यान लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यापूर्वी हलके इंजिन मार्गावरून चालवून मार्गाची सुरक्षितता निश्चित करण्यात आली. मंगळवारी सकाळी 9:30 नंतर सीएसएमटी ते अंबरनाथ पर्यंतच्या अपडाऊन मार्गावरील सेवा सुरू होऊन सर्वसाधारण वेळेत धावत होत्या अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

बसेस चालवण्याची मागणी

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कल्याण कर्जत यादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी 100 बसेस चालवण्यात याव्यात अशी विनंती रेल्वे कडून येथील विविध प्राधिकरणांना करण्यात आली होती. त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 55 बसेस चालवण्यात आल्या होत्या असं रेल्वे कडून सांगण्यात आलं. कोयना एक्सप्रेस बदलापूर ते कल्याण आणि नंतर दिवा आणि पनवेल मार्गे कर्जत कडे पाठवण्यात आली.

‘या’ गाड्या वळवण्यात आल्या

डाऊन मार्गावर उदयपूर, मैसूर, सीएसएमटी, चेन्नई, श्री गंगानगर, तिरुचिरापल्ली, सी एस एम टी -हैदराबाद सुपरफास्ट, सीएसएमटी- भुवनेश्वर या गाड्या वळवण्यात आल्या. तर अप मार्गावरील चेन्नई एलटीटी, हैदराबाद- सीएसएमटी, यशवंतपुर, बारमेर, कोईमतुर- एलटीटी, सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत, पुणे -निजामुद्दीन, दुरंतो, चेन्नई -सीएसएमटी या गाड्या वळवण्यात आल्या

BMC Recruitment 2024 | मुंबई महानगर पालिकेअंतर्गत 1846 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. अनेक विद्यार्थ्यांना देखील आजपर्यंत अनेक संधीचा फायदा झालेला आहे. अशातच आम्ही एक नवीन नोकरीची संधी घेऊन आलेला आहोत. अनेक लोकांना मुंबई या शहरात जाऊन नोकरी करण्याची आणि तिथे स्थायिक होण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मुंबई महानगरपालिके अंतर्गत (BMC Recruitment 2024) एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 1846 रिक्त जागा आहेत. त्यामुळे आता उमेदवारांना लवकरात लवकर या भरतीचा अर्ज करायचा आहे या भरतीची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 20 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. त्याचप्रमाणे 9 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. आणि तिथे जाऊन अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

भरतीचे नाव | BMC Recruitment 2024

ही भरती मुंबई महानगरपालिके अंतर्गत होणार आहे.

पदाचे नाव

मुंबई महानगरपालिके अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदांची संख्या

या भरती अंतर्गत 1846 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा

20 ऑगस्ट 2024 पासून या भरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे 9 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या भरती अगोदरच अर्ज करा.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत खुल्या प्रवर्गात उमेदवारांना 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा ठेवली आहे. त्याचप्रमाणे मागास प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा ठेवली आहे.

शैक्षणिक पात्रता | BMC Recruitment 2024

अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. त्याचप्रमाण त्याने प्रथम प्रयत्नात 45% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे शासनाचे मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील असले पाहिजे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कृषी सेवेच्या 258 पदांबाबत निर्णय जाहीर; वाचा सविस्तर

MPSC

MPSC | अनेक विद्यार्थी हे MPSC त्याचप्रमाणे UPSC या परीक्षेची तयारी करत असतात. MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा आता येत्या 25 ऑगस्ट रोजी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करणार आहे. त्यामुळे आता सगळेच विद्यार्थी जोरदार तयारीला लागलेली आहेत. या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी जागा भरल्या जातात. अशातच आता या परीक्षेमध्ये कृषी सेवेत पदांचा देखील समावेश व्हावा, यासाठी विद्यार्थी आंदोलन केले होते. त्यांच्या मते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कृषिसेवेतील 258 पदांचा समावेश केला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा दिला होता. आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी देखील या प्रकरणावर त्यांची मांडलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ, गट ब, गट ब कनिष्ठ या संवर्गातील 258 पदांचा समावेश महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परिपूर्व परीक्षेत करणे शक्य होणार नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काय भूमिका मांडली ? | MPSC

महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि गट ब या संवर्गातील एकूण 258 पदे भरावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. हे मागणी पत्र लोकसेवा आयोगाला 16 ऑगस्ट 2024 रोजी शासनाकडून मिळालेले आहे. परंतु आता ही पदे या संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार नसल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. परंतु ही परीक्षा संदर्भात दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे मागणी पत्र शासनाकडून प्राप्त झाले, नसल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता जाहिरातीमध्ये या पदांचा समावेश करणे शक्य नसल्याची भूमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मांडलेली आहे.

येत्या 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता या परीक्षेसाठी तरी कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. परंतु या भरती प्रक्रियेबद्दल पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येणार आहे. असे देखील लोकसेवा आयोगाने सांगितलेले आहे.

विद्यार्थ्यांची मागणी काय होती?

येत्या 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. आणि या परीक्षेमध्ये कृषी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदांची वाढ व्हावी. अशी त्यांची मागणी होती. या परीक्षा 258 कृषी पदे भरली जवित असे विद्यार्थ्यांचे हणणे होते. आणि त्यांनी या प्रकरणात त्यांची बाजू देखील मांडली होती. परंतु कृषी विभागाकडून ही मागणी 16 ऑगस्ट रोजी देण्यात आली. परंतु त्यावेळी उशीर झाल्याने लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही मागणी फेटाळली आहे. परंतु पुढील येत्या परीक्षेत या पदांची नियोजन करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.