Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 5258

” बिहारमध्ये कोरोना संपलाय का “?, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा संतप्त सवाल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये करोना संपलाय का ?असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की कोरोना संपला तर मग तसं जाहीर करा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. “हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये लोकांना फक्त काळी शाई लावून घ्यायची नाही असेही राऊतांनी स्पष्ट केले. लालूप्रसाद यादव आज इस्पितळात आहेत. काँग्रेसचं तिथं फार अस्तित्व नाही. अशावेळी जनता दल युनायटेड आणि भाजपा एकतर्फी निवडणुका लढणार का? अशी लोकांच्या मनात शंका आहे. पण लोकशाहीत शंकांचा विचार न करता लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. “निवडणुका घाईघाईत होत नसून वेळेतच होत आहेत, मात्र सध्या निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नाही,” असंही ते म्हणाले.

बिहारमध्ये कृषी आणि कामगार बिलाचा काही फरक पडणार नाही. तिथे फक्त जात आणि धर्म हा मुद्दा असून अनेकदा गरीबी हादेखील मुद्दा नसतो. नितीश कुमार २४ वर्ष तिथे मुख्यमंत्री आहेत. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी सुप्त राग असल्याचं दिसत आहे. समोर विरोधी पक्ष किती ताकदीने उभा राहतो यावर सर्व अवलंबून आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवढणुकीचा निकाल जाहीर होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

मराठा आरक्षणावर राजकारण नको, ठाकरे सरकारला आम्ही सहकार्य करू – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये. मराठा आरक्षण हे राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहेत. असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

सणासुदीपूर्वी मोदी सरकार देणार आहे सर्वात मोठे मदत पॅकेज, आता ‘या’ गोष्टींवर दिले जाणार अधिक लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे तसेच कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत 23.9% घट झाली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज पासून ते पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजची घोषणा केली, पण त्याचं पुढे काही झालं नाही. आता केंद्र सरकार अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करणार आहे.

मोदी सरकार सध्याचा सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करेल. हे मदत पॅकेज आत्मनिर्भर भारत पॅकेज आणि पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजपेक्षा मोठे असेल. या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका-यांनी मनी कंट्रोलला सांगितले की,’ केंद्र सरकार 35,000 कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर करू शकते, ज्याचा मेन फोकस हे शहरी आणि ग्रामीण भागातील नोकरीवर असेल.’

या गोष्टींवर जोर दिला जाईल
35,000 कोटींच्या या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजमध्ये शहरी रोजगार योजना, ग्रामीण रोजगार, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प, शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणि जास्तीत जास्त कॅश ट्रान्सफर करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावर्षी किमान 25 मोठे प्रकल्प पूर्ण करावेत अशी सरकारची इच्छा आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना रोजगार मिळू शकेल. या मदत पॅकेजची घोषणा दसऱ्यापूर्वी होऊ शकते. या आर्थिक वर्षाचा तिसरा तिमाही (ऑक्टोबर-डिसेंबर) ग्राहक-आधारित कंपन्यांसाठी, विशेषत: वाहन क्षेत्रातील कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादकांसाठी अतिशय महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ शकेल म्हणून केंद्र सरकारला Fiscal stimulus package ची घोषणा करून मागणी वाढवायची आहे.

शहरी आणि नीम शहरी भागांसाठी जॉब्स प्रोग्राम
केंद्र सरकार नरेगा (NREGS) च्या धर्तीवर शहरी आणि नीम-शहरी भागातील लोकांसाठी नोकरी कार्यक्रम (jobs programme) सुरू करणार असल्याचे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मनी कंट्रोलला सांगितले. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तथापि, नरेगाप्रमाणे, अंमलबजावणीसाठी कोणत्याही कायदेशीर कारवाईची (legislative action) आवश्यकता नाही. त्यासाठी एक ड्राफ्ट कॅबिनेट नोट (draft cabinet note) तयार करण्यात आला आहे. ही योजना पहिले टियर 3 आणि टियर 4 अर्थात लहान शहरांमध्ये आधी लागू होईल त्यानंतर मोठ्या शहरांमध्ये लागू केली जाईल.

इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर भर
केंद्र सरकार National Infrastructure Pipeline अंतर्गत अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणार असून ज्यामध्ये अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे 20-25 प्रोजेक्ट्सची निवड केली गेली आहे ज्यामध्ये जास्त पैशांची गुंतवणूक केल्यास कमीत कमी वेळात अधिक रोजगार निर्माण होतील. या नोकऱ्याकुशल व अप्रशिक्षित अशा दोन्ही लोकांसाठी असतील. या व्यतिरिक्त या मदत पॅकेजमधील शेवटच्या दोन आर्थिक प्रोत्साहन पॅकेजेसप्रमाणेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भर दिला जाईल. कॅश ट्रान्सफरची योजना ही पुढे आणखी वाढविण्याची सरकारची योजना असून त्याबरोबरच लोकांना मोफत धान्यही दिले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘ब्लॅक टी’ आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ; जाणून घेऊया ‘ब्लॅक टी’ चे जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक जणांना सकाळी सकाळी चहा नाही पिला तर काही तरी चुकिचे घडते असे वाटते. चहा हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सर्वच घरात हा हा सकाळचा एकदा तरी चहा हा बनतच असतो. भारतीय संस्कृतीत घरी नवीन आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार हा सुद्धा चहानेच सुरुवात होते. आपल्यापैकी बहुतेकांचा दिवस चहानेच सुरू होतो. आपल्यामध्ये चहाप्रेमी खूप आहेत. काहीजण तर चहाची तुलना अमृता प्रमाणे करतात. चहाचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. चहामध्ये कोरा चहा, दुधाचा चहा, काळा चहा, ग्रीन टी असे आहेत. यामधील कोरा म्हणजेच काळा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे.

ब्लॅक टी चे फायदे-

काळा चहा पिण्याची पारंपरिक पद्धत आहे. पाहिल्या जमान्यात काळा चहा हा सर्वाना दिला जात होता. त्या काळात सुद्धा काळ्या चहाचे खूप महत्व होते. ब्लॅक टी हा आपल्या हृदयाला फार गुणकारी असतो. हा चहा प्याल्याने आपले हृदय निरोगी आणि बळकट रहाते. तसेच या चहामध्ये दूध नसते त्यामुळे फॅट वाढण्याचे प्रमाण कमी होते. या चहामुळे वजन हे कमी होण्यास मदत होते. दररोज दोन ते तीन कप ब्लॅक टी प्राशन करण्याने आपण प्रोस्ट्रेट, फुफ्फुस आणि किडनी यांच्या कर्करोगापासून या आजरापासून मुक्त राहू शकता. .

या चहात टॅनीन हे द्रव्य असते आणि ते आपल्या पचन संस्थेला गुणकारी ठरते. पचनाची ताकद वाढवते आणि गॅसेस वगळता पचन संस्थेचे अनेक दोष दूर करण्यास ते उपयोगी ठरते.काळा चहा हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पिला जातो. या चहामुळे मेंदूच्या पेशींनाही प्रेरणा मिळते. मेंदूतील पेशी या चागल्या पद्धतीने काम करू शकतात. .काळा चहा प्याल्याने मेंदूच्या पेशींना रक्ताचा पुरवठा वाढतो. दिवसातून चार वेळा हा चहा प्राशन केला तर सगळ्या प्रकारच्या तणावापासून सुटका होते.

या चहामध्ये कॅफिन चे प्रमाण हे इतर चहापेक्षा कमी असते. चहातल्या विशिष्ट घटकांमुळे तरतरी आणि उत्साह वाढतो. कोणतेही काम करताना चहा पिला जातो कारण त्यामुळे शरीराला तर ऊर्जा मिळतेच तसेच काम करण्याची इच्छा प्राप्त होते. आणि त्यामुळे कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. ब्लॅक टी प्यायल्यामुळे अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो.

चहा सेवनामुळे यात असलेल्या मधुमेहासाठी उपयोगी असणारे पॉलीफेनॉल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारते. मधुमेहासारख्या आजाराला दूर ठेवू शकतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी तर दररोज हा काळा चहा पिला पाहिजे.सिगारेटमुळे उद्भवणाऱ्या फुफुस्साच्या कर्करोगावर काळा चहा वरदान ठरू शकत. नियमित काळा चहा प्यायल्यामुळे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो.

दररोज काळा चहा पिल्याने मुतखड्यापासून बचाव होऊ शकतो. अनेक वेळा समोर आले आहे कि, काळ्या चहाच्या सेवनाने मुतखड्याचा त्रास हा कधीच जाणवत नाही. स्त्रिया नियमित ब्लॅक टी घेतात त्यांच्यामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता कमीत कमी ८ टक्के असते. कोरा चहा घेण्याने आपल्या शरीरातील जी मेटापॉलिसीम प्रोसेस आहे म्हणजेच चयापचय प्रक्रिया याचा वेग वाढतो. तसेच लठ्ठपणाचा धोका हा कमी उद्भवतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

सुशांत सिंह केसचा निकाल बिहार निवडणूक निकालादिवशी लागेल, तोपर्यंत.. ; शिवसेनेच्या नेत्यानं साधला निशाणा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करून बिहार निवडणूक व सुशांत सिंह प्रकरणावरून टीका केली आहे.

“बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंह केसचा निकाल व एनसीबीचा अहवाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार. तसेच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील, त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,” असं म्हणतं सरनाईक यांनी विरोधांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून अनेक वळणं घेत हा तपस ड्रग्स प्रकरणावर थांबला आहे. ड्रग्ज सेवन प्रकरणाची चौकशी एनसीबीकडून सुरू असून, एनसीबीनं या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत इतर काही जणांना अटक केली आहे. याशिवाय एनसीबीनं याप्रकरणात बॉलिवूडमधील दीपिका पदुकोणसह, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर या अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

केंद्राने केले नियमांचे उल्लंघन आणि जीएसटी नुकसान भरपाईचा निधी इतर ठिकाणी वापरला: CAG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत माहिती दिली की, राज्यांना GST भरपाई देण्यासाठी भारतीय समेकित निधीतून (CFI) निधी सोडण्याची कायदेशीर तरतूद नाही. मात्र, नियंत्रक व महालेखा परीक्षकांचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणतात की,’ सरकारने स्वतःच या नियमांचे उल्लंघन केले आहे.’ याबाबत कॅगचे म्हणणे आहे की,’ सन 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने CFI मध्ये GST भरपाईचे 47,272 कोटी रुपये ठेवले आहेत. हा निधी इतर कामांसाठी वापरला गेला. यामुळे त्यावेळी महसूल पावत्या वाढल्या आणि वित्तीय तूट कमी झाली.

कॅग म्हणाले, ‘स्टेटमेंट 8, 9 आणि 13 च्या ऑडिट टेस्टची माहिती GST भरपाई उपकर संकलनात कमी फंड क्रेडिट असल्याचे दाखवते. आर्थिक वर्ष 2017-18 आणि 2018-19 साठी 47,272 कोटी कमी फंड क्रेडिट GST भरपाई उपकर अधिनियम 2017 च्या नियमांचे उल्लंघन आहे.

GST भरपाई कायद्याची तरतूद काय आहे?
या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही वर्षी गोळा केलेला एकूण उपकर नॉन-लेप्ड फंड (GST कंपेनसेशन सेस फंड) मध्ये जमा केला जातो. हा सार्वजनिक लेखाचा एक भाग आहे आणि जीएसटीच्या महसुलाची भरपाई करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

मात्र, एकूण जीएसटी उपकर (GST Cess) जीएसटी कंपेनसेशन सेस फंडामध्ये वर्ग करण्याऐवजी केंद्र सरकारने ते CFI मध्ये ठेवले. नंतर त्याचा उपयोग इतर काही कामांसाठी केला गेला.

हा अहवाल जर आपल्याला सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर, 2018-19 या आर्थिक वर्षात या फंडामध्ये 90,000 कोटी रुपये ट्रान्सफर करण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. जीएसटी भरपाई म्हणून तीच रक्कम राज्यांना देण्यात येणार होती. मात्र, यंदा जीएसटी कंपेनसेशन सेस म्हणून 95,081 कोटी रुपये जमा झाले. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने यामधून केवळ 54,275 कोटी रुपये नुकसान भरपाई फंडामध्ये ट्रान्सफर केले. या निधीपैकी 69,275 कोटी रुपये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाई म्हणून देण्यात आले. या निधीमध्ये आधीपासूनच 15,000 कोटी रुपये जमा होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

नव्या कायद्यानंतर बदलला ग्रॅच्युइटीचा नियम, आता कुणाला आणि कधी पैसे मिळणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत तीन कामगार संहिता बिले (Labour Code Bills) मंजूर झाली आहेत. यामध्ये ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन बिल- 2020, इंडस्ट्रियल रिलेशन बिल- 2020 आणि सोशल सिक्योरिटी बिल- 2020 यांचा समावेश आहे. सोशल सिक्योरिटी बिल, 2020 चा चॅप्टर 5 मध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात….

सर्वप्रथम ग्रॅच्युइटी बद्दल माहिती घेऊ – एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना पगार, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त ग्रॅच्युइटीही दिली जाते. ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून एखाद्या कर्मचार्‍यास मिळालेले बक्षीस. जर कर्मचार्‍याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर एखाद्या विहित सूत्रानुसार त्याला ग्रॅच्युइटीची हमी दिली जाईल. ग्रॅच्युइटीचा छोटा भाग कर्मचार्‍याच्या पगारामधून कट केला जातो, मात्र मोठा भाग कंपनीकडून दिला जातो.

नवीन नियम काय म्हणतो – सरकारने ठराविक मुदतीच्या कर्मचार्‍यांसाठी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणार्‍यांसाठी ही व्यवस्था केली आहे. जरी एखाद्याने एका कंपनीकडे एक वर्षाच्या निश्चित मुदतीच्या कॉन्ट्रॅक्टवर काम केले तरीसुद्धा त्यांना ग्रॅच्युटी मिळते. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणार्‍या कर्मचार्‍याला आता नियमित कर्मचार्‍यांप्रमाणेच सोशल सिक्योरिट अधिकार देण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांव्यतिरिक्त हंगामी संस्थांमध्ये काम करणार्‍यांनाही हा लाभ देण्यात येईल.

याचा फायदा कोणाला मिळू शकेल – इतरांसाठी जुना नियमच कायम राहील. सध्या ग्रॅच्युइटी प्रत्येक वर्षाच्या 15 दिवसाच्या पगाराच्या आधारे पाच वर्षांची नोकरी पूर्ण झाल्यावर निश्चित केली जाते. कंपनीच्या वतीने कर्मचार्‍यांना ग्रॅच्युटी दिली जाते. त्याची कमाल मर्यादा 20 लाख रुपये असते. जर एखादा कर्मचारी एकाच कंपनीत 20 वर्षे काम करत असेल आणि त्याचा शेवटचा पगार 60 हजार रुपये असेल. तर हा पगार 26 ने विभागला जातो, कारण ग्रॅच्युइटीसाठी 26 दिवस मानले जातात. यातून 2,307 रुपये रक्कम मिळेल.

कंत्राटी कामगारांना लाभ मिळेल – निश्चित मुदतीच्या कर्मचार्‍यांसाठी किमान मुदतीची अट नाही – याअंतर्गत आता निश्चित मुदतीच्या कर्मचार्‍यांनाही ग्रॅच्युटी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आता किमान सेवा कालावधीसाठी कोणतीही अट नसेल. पहिल्यांदाच, ठराविक मुदतीसाठी काम करणाऱ्या कर्मचार्‍याला नियमित कर्मचार्‍याप्रमाणेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार दिला आहे. फिक्स्ड टर्म हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना सूचित करते.

आता तुम्हाला ग्रॅच्युइटीचे पैसे कधी मिळतील – चॅप्टर 5 मध्ये असे म्हटले गेले आहे की, नोकरीच्या शेवटी कर्मचार्‍यांना सलग पाच वर्षे सेवा दिल्याबद्दल ग्रॅच्युइटी दिली जाईल. हे सेवानिवृत्ति, रिटायरमेंट किंवा राजीनामा, अपघात किंवा आजाराने मृत्यू किंवा अपंगत्व यावर असेल. मात्र, वर्किंग जर्नलिस्टच्या बाबतीत ते पाच वर्षांच्या ऐवजी तीन वर्षे असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

चेन्नईचे दिग्गज खेळाडू विरुद्ध दिल्लीचे युवा शिलेदार ; आज होणार जबरदस्त मुकाबला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतर दुसर्‍या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे दिल्लीसाठी हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात दिल्लीने पंजाबविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये रोमांचक विजय मिळवला. त्यामुळे एकीकडे दिल्लीकडे युवा खेळाडूंचा उत्साह असेल तर दुसरीकडे चेन्नईकडे अनुभवी खेळाडूंचा ताफा. त्यामुळे आज रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.

चेन्नई संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यांची संपुर्ण फलंदाजी फाफ डू प्लेसिसवर अवलंबून आहे. सोबतीला शेन वॉटसन असला तरी तो म्हणावा तसा फॉर्मात नाही. मागील सामन्यात त्यांच्या फिरकी गोलंदाजांची खराब कामगिरीमुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. महेंद्रसिंग धोनी, मुरली विजय , रवींद्र जडेजा याना आज जबरदस्त खेळ करावा लागेल.

तर दुसरीकडे युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली संघात पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत, कॅप्टन श्रेयस अय्यर आणि शेवटच्या सामन्याचा नायक मार्कस स्टोइनिस सारखे मोठे हिटर आहेत. पण खांद्याच्या दुखापतीमुळे रविचंद्रन अश्विनच्या खेळण्यावर शंका आहे. अशा परिस्थितीत दिल्लीला त्यांच्या गोलंदाजांमध्ये काही बदल करावे लागतील. अश्विन जर खेळत नसेल तर अमित मिश्रासह अक्षर पटेलला साथ देण्यासाठी पर्याय असू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

… आणि आता नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केल्यानं रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. शेतकऱ्यांनी मोदी सरकाराच्या कृषी विधेयकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील, अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. “एका चुकीच्या GST करानं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील,” अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली.

तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “शेतकऱ्यांना कंत्रीटी शेतीद्वारे अब्जाधीशांचं गुलाम बनवण्यास प्रवृत्त केलं जाईल. यामुळे ना शेतकऱ्यांना मोबदला मिळेल, ना सन्मान. शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल, भाजपाचं कृषी विधेयक ईस्ट इंडिया कंपनीची आठवण करून देत आहे. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही,” असंही त्यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

खूप राग येतोय ?? चला पाहूया रागाला नियंत्रित ठेवण्याचे काही उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा राग येतो अगदी लहान मुलांसपासून ते मोठया लोकांपर्यत सर्वाना राग येतो. पण राग व्यक्त करण्याची एक कला आहे आणि हि कला ज्या लोकांना अवगत आहे. ते लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. राग येण्याची अनेक कारणे आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून अनेक जन हायपर होतात. त्याच्यासाठी पण ते चांगली गोष्ट नसते. ज्या वेळी लोक जास्त हायपर होतात. त्यावेळी त्याचे आपोआप ब्लड प्रेशर वाढते. त्यामुळे हृदयाचा त्रास होण्यास सुरुवात होते.

काय आहेत उपाय

जेव्हा राग अनावर होतो त्यावेळी चक्क आपण लहान मुलासारखे शांत राहून १ ते १० अंक मोजण्याचे प्रयत्न करावेत. त्यामुळे आपला राग शांत होण्यास मदत होते. अश्या वेळी खूप कमी बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर प्रचंड राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी कोणत्याही पद्धतीची सल्लामसलत करत बसू नये. आणि आपले म्हणणे त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्याशी नजर मिळवू नका. त्याला तू किती चुकीचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. आणि मनात १० पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा. बघा तुमचा राग शांत होतो. एक छान ब्रेक घ्या . त्या अनुषंगाने निवांत ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. समोरचा जर चर्चा करण्यास तयार असेल तर त्याच्याबरोबर चर्चा करा. नाहीतर विषय तेथेच सोडून द्या. त्याला भेटणे वगैरे टाळा.

कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे. निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो . महिलांना जास्तीत जास्त झोप मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा महिला राग कोणावर हि काढायचा प्रयत्न करतात. त्यावेळी काहीच काम न करता शांत झोपणे हा त्याच्यावर एक उपाय आहे. प्राणायाम मुळे सुद्धा राग जाण्यास
मदत होऊ शकते. प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो. तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’