Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 5259

आता ‘ही’ चिनी कार कंपनी भारतात 1000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक, मोदी सरकार परवानगी देणार कि नाही ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी कार निर्माता कंपनी एमजी मोटर्सला (MG Motors) भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या अभियानामुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आता कंपनीने असा निर्णय घेतला आहे की, ते प्रमोशन डिपार्टमेंटला (DPIIT) सांगतील की त्यांना भारतात पुन्हा गुंतवणूक करायची आहे. TOI च्या अहवालानुसार एमजी मोटर्स आपले नवीन मॉडेल्स लाँच करण्यासाठी आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. FDI नियमात बदल झाल्यामुळे आता कंपनीला गुंतवणूक करण्यापूर्वी DPIIT कडून मान्यता घ्यावी लागेल.

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हे अल्प मुदतीसाठी आहेः एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष
एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष व एमडी राजीव छाब्रा म्हणाले की,”देशासाठी काय योग्य आहे आणि काय नाही याचा निर्णय घेण्याचा भारत सरकारला सर्व हक्क आहे. प्रत्येक सरकारने देशाच्या भल्याचा विचार केला पाहिजे. जेव्हा त्यांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या भावनेबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की,” हे सर्व अल्पकालीन आहे, परंतु जर मध्यम ते दीर्घ मुदतीपर्यंत पाहिले तर कंपनी वाढेल.” त्यांनी सांगितले की,”अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात देशांमध्ये तणाव आहे, परंतु यामुळे व्यवसायावर मात्र काहीच परिणाम होत नाही.”

कंपनीने भारतात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे
एमजी मोटर्सने यापूर्वीच भारतात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याने जनरल मोटर्सचा प्लांटही विकत घेतला आहे. सध्या ही कंपनी भारतात हेक्टर प्रीमियम एसयूव्हीची विक्री करीत आहे. छाब्रा यांनी कंपनीचे नवीन मॉडेल ग्लॉस्टर विषयीही चर्चा केली जे लक्झरी एसयूव्ही आहे. ते म्हणाले की,”भारतातील एमजी मोटर्स आता लोकलायझेशन वाढवतील.” तथापि, ते असेही म्हणाले की,” चीनपेक्षा भारतामध्ये भाग अधिक महाग आहेत, परंतु तरीही ही कंपनी लोकलायझेशनवर जोर देईल.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

१४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्यवाढीस केंद्र सरकारची मान्यता 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकऱ्यांवर येणारी संकटे ही काही थांबणारी नसतात. त्यात पिकांना न मिळणारा योग्य हमीभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असतो.  गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा देखील  शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात  फटका बसला आहे. त्यांच्या  शेतमालाचेही  मोठे  नुकसान झाले आहे. शासकीय शेतमाल खरेदी पासूनही बऱ्याच  शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले आहे.  यामध्ये प्रामुख्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना  फटका बसल्याचे  दिसून आले आहे.  मात्र आता सरकरने खरीप पिकांना  हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२०-२१ साठी १४ खरीप पिकांसाठी जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली, याविषयीचे वृत्त कृषी नामा या वृत्त संस्थेने दिले आहे.   राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे.  शेतकऱ्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत  सरासरी  १४१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पिके घेतली आहेत. २०२० च्या खरिपात २४ ऑगस्टपर्यंत पेरा १४० लाख हेक्टरच्या पुढे गेल्याचे दिसून येते.  मागील हंगामात याच कालावधीत पर्यंत पेरा अवघा १३५ लाख हेक्टर होता.

“केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने देशातील १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजुरी दिली असल्याचे तोमर म्हणाले.   यामध्ये प्रति क्विंटल याप्रमाणे भात /धान १८६८, भात/धान ए ग्रेड १८८८, ज्वारी २६२०, ज्वारी मालदांडी २६४०, बाजरी २१५०, नाचणी ३२९५, मका १८५०, तूर ६०००, मूग ७१९६, उडीद ६०००, भुईमूग ५२७५, सूर्यफूल ५८८५, सोयाबीन ३८८०, खुरासणी ६६९५, कपाशी (मध्यम धागा) ५५१५, कपाशी लांब धागा ५८२५ अशाप्रकारे हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.  मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढवून मिळालेला हमीभाव शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Google Pay आपल्यासाठी घेऊन येणार आहे एक नवीन Feature, UPI सोबतच आता उपलब्ध होणार पेमेंटचे ‘हे’ पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील ऑनलाइन पेमेंटचा अनुभव सुधारण्यासाठी दिग्गज आयटी कंपनी Google Pay ने दोन नवीन पार्टनरशिप केल्या आहेत. Google Payने कार्ड नेटवर्क कंपनी व्हिसा आणि एसबीआय कार्ड सह पार्टनरशिप केली आहे. यानंतर, Google Pay युझर्सना टोकनायझेशन सुविधेचा लाभ मिळेल. Google Pay आणि NBA चे बिझिनेस हेड साजित शिवानंदन म्हणाले, “आम्हाला आशा आहे की, टोकन सुविधा सध्याच्या क्षणी युझर्सना सुरक्षितपणे व्यवहार करण्यास प्रोत्साहित करेल. तसेच ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही व्यवहाराचा विस्तार करेल. ”

UPI व्यतिरिक्त, गूगल पेवर इतरही अनेक पेमेंट पर्याय
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात टोकनायझेशनची घोषणा कर UPI यूपीआयकडूनच पैसे दिले जात असत, परंतु आता त्यामध्ये ग्राहक आपले कार्ड स्टोअर केल्यानंतर UPI आणि कार्ड या दोहोंसह पैसे देण्यास सक्षम असतील.

टोकनायझेशन म्हणजे काय?
कार्डवरील 16 अंकी क्रमांक म्हणजे ग्राहकांची ओळख. व्हिसा ते 16-अंकी रँडम नंबरमध्ये बदलून एका वॉलेटमध्ये ठेवते. यानंतर, ग्राहक कार्डद्वारे पेमेंट देण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर व्हिसा व्यापाऱ्याला वास्तविक क्रमांक न सांगता टोकन नंबर शेअर करतो, ज्यामुळे आपले पेमेंट अधिक सुरक्षित होते. याद्वारे हे सुनिश्चित होते की आपला कार्ड नंबर लपलेला आहे.

हे Google Pay मध्ये कसे काम करते?
गूगल पे मधील वन टाइम पासवर्ड (OTP) च्या मदतीने, कार्ड टोकन स्वरूपात स्टोअर केले जाऊ शकते. पेमेंट देण्यासाठी, Google पे उघडा आणि कार्ड फॉर ट्रान्सझॅक्शन सिलेक्ट करा. वन टाइम पासवर्डसह प्रमाणीकरण करा आणि मग आपले पेमेंट दिले जाईल. प्रत्येक वेळी सोळा अंकी कार्ड, सीव्हीव्ही क्रमांक आणि एक्सपायरी डेट शेअर करण्याची आवश्यकता नाही. हे ऑफलाइन मर्चंट पेमेंट, बिल आणि ई-कॉमर्स पेमेंट करते आणि ते सुरक्षित देखील आहे.

यात ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवरूनच पैसे द्यावे लागतील, जे NFC (Near Field Communication) एनेबल केले जावे. भारतातील ग्राहकांकडे असे मोबाइल खूपच कमी आहेत, त्यामुळे भारतात टोकन पेमेंट फारसे होत नाही. गुगल पेचा असाही एक फायदा म्हणजे भारतात कोणताही QR कोड स्कॅन केल्यानंतर कार्डद्वारे पेमेंट देऊ शकतो.

या सुविधेचा आपल्याला कसा आणि कोठे फायदा मिळेल?
भारतात डिजिटल पेमेंट स्वीकारणार्‍या सर्व व्यवसायिक संस्थांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. सुरुवातीला एक्सिस बँक आणि एसबीआयचे कार्डधारक याचा फायदा घेऊ शकतात, नंतर त्याला इतर बँकांशीही जोडले जाईल. यामध्ये एसबीआय बँक ही मुख्य पार्टनर आहे, त्यामुळे क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार देखील केले जातील. ते 25 लाख ट्रेडिंग पॉईंटवर स्वीकारले जाऊ शकते, त्यापैकी 15 लाख भारतीय क्यूआर कोड आहे.

Google Pay यामुळे UPI प्लॅटफॉर्मवरून थेट डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म बनेल. ग्राहक आता Google Pay वरून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्यासही सक्षम असतील. यामुळे Google Pay ला नवीन व्यवसाय संधीही निर्माण होतील. याव्यतिरिक्त, ते Google Pay साठी नवीन मर्चंट लोकेशन देखील उघडेल. मात्र, एकाधिक भागीदारीद्वारे ऍप वर मर्चंट पेमेंटसना प्रोत्साहित करण्याचा देखील प्रयत्न करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

ख्यातनाम गायक एस.पी. बालसुब्रमण्यम काळाच्या पडद्याआड!; वयाच्या ७४ वर्षीय घेतला अखेरचा श्वास

चेन्नई । प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं वयाच्या ७४ वर्षी निधन झालं आहे. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली होती.

दरम्यान, आज सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त होते. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. तेलुगु, तामिळ, हिंदी आणि इतर भाषांतील गाणी एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायिली आहेत.  त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

IMF ने केले पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ चे कौतुक म्हणाले,”विकासासाठीचे महत्वाचे पाऊल”*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ (Self-Reliant India) चा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून वर्णन केले आहे. IMF ने गुरुवारी याबद्दल सांगितले आहे. IMF च्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे संचालक गेरी राईस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ स्कीम अंतर्गत जाहीर केलेल्या आर्थिक मदत पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. तसेच कोविड -१९ चा अर्थकारणावर होणारा परिणामही कमी झाला आहे. आम्ही याला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून पहात आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेशी संबंधित प्रश्नावर ते म्हणाले,”जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची महत्त्वाची भूमिका असेल असे पंतप्रधानांनी जाहीर केले होते. याअंतर्गत जी धोरणे राबविली जातील ती अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या बाबींना कार्यक्षम व स्पर्धात्मक बनविण्यात मदत करतील.”

ग्लोबल व्हॅल्यू चेनमध्ये भारताची भूमिका
राईस म्हणाले की, भारताचे लक्ष्य ‘जगासाठी उत्पादन’ करण्याचे आहे. त्यासाठीच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे आणि ग्लोबल व्हॅल्यू चेनमध्ये भारताची भूमिका वाढेल. यामध्ये व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान यांचा समावेश असेल.

आरोग्य क्षेत्रावरील खर्च वाढवावा लागेल
दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”नीति आयोग आणि वित्त मंत्रालया बरोबरच्या IMF संयुक्त अभ्यासानुसार हे दिसून येते की, आरोग्यासह टिकाऊ विकासाचे उच्च कामगिरीचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताला आरोग्य क्षेत्रावरील एकूण खर्च वाढवावा लागेल. सद्यस्थितीत, भारतीय जीडीपीपैकी 3.7% आरोग्य क्षेत्रामध्ये खर्च केले जात आहेत.”

शाश्वत विकासासाठी ‘या’ गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे
ते म्हणाले की,”आरोग्य क्षेत्राव्यतिरिक्त इतर संरचनात्मक सुधारणांची आवश्यकता आहे. जेणेकरून, मध्यम कालावधीत अधिक चांगला, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करणे शक्य होईल.” ते पुढे म्हणाले की,” आम्ही यापूर्वीही अशा प्रकारच्या सुधारणांविषयी बोललो होतो. पायाभूत सुविधा, जमीन सुधारणे, प्रोडक्ट मार्केट, लेबर मार्केट, कामगार दलात महिलांचे योगदान, नोकरी आणि वित्तपुरते महिलांचे प्रवेश महत्त्वपूर्ण आहेत.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; ३ टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल

नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत”. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील असं सुनील अरोरा यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बिहारमधील मतदारांची संख्या ६.७ कोटीवरून ७.२ कोटीपर्यंत वाढली आहे. यामध्ये ३.७९ कोटी पुरुष आणि ३.३९ कोटी महिलांचा समावेश आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच कोरोनापासून सुरक्षेसाठी सहा लाख फेस शील्डचा वापर करण्यात येईल. कोरोना रुग्णांनाही या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.

बिहारची विधानसभा निवडणूक कशी पार पडणार?
* कोरोनाची लागण झालेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांना शेवटच्या एका तासात मतदान करता येईल. हे मतदान पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून पार पडेल.
* ८० वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींनाही पोस्टल बॅलेटच्या माध्यमतून मतदान करण्याची मुभा.
* राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रत्यक्ष शक्य नसल्यास ऑनलाईन अर्जही भरता येणार. डिपॉझिटची रक्कमही ऑनलाईन ट्रान्सफर करण्याची मुभा.
* राजकीय नेत्यांना निवडणूक अर्ज दाखल करताना आपल्यासोबत दोनच व्यक्तींना आणण्याची मुभा.
* मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ७ लाख सॅनिटायझर्स युनिट, ४६ लाख मास्क, सहा लाख पीपीई किट, ६.७ लाख फेस शिल्ड, २३ लाख हातमोजे आदी सामुग्रीची व्यवस्था.
* निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो करताना केवळ पाच गाड्यांना परवानगी. प्रचारावेळी सोशल डिस्टन्सिंगची पालन करण्याची सक्ती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

NCBचा तपास पोहोचला टीव्ही कलाकारांपर्यंत; टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहरवर गुन्हा दाखल

मुंबई । बॉलिवूड कलाकारांनंतर आता टीव्ही कलाकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या(NCB) रडारवर आले आहेत. टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्याविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबिगेल पांडे आणि सनम जोहर हे दोघे रिअल लाईफ कपल आहेत. टीव्हीमध्ये विविध मालिकांमध्ये दोघांनी काम केलं आहे.

मागील २ दिवसांपासून NCBकडून अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांची चौकशी केली जात होती. 23 सप्टेंबरला पहिल्यांदा दोघांना NCBकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्या दिवशी दोघांकडून दिलेल्या माहितीच्या आधारे 24 सप्टेंबरला एनसीबीकडून मुंबईमध्ये ३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सुरुवातीला जेव्हा अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्या घराची NCBकडून झडती घेण्यात आली, त्यावेळेस त्यांना तिथे गांजा सापडला.

आज पुन्हा अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्या घराची झडती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून घेण्यात आली. तसेच या दोघांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्सच सेवन केल्याप्रकरणी NDPSअॅक्ट 20 अंतर्गत गुन्हा देखील नोंदवण्यात आला. मात्र दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अबिगेल पांडे आणि सनम जोहर या दोघांकडून टीव्ही इंडस्ट्रीमधील अजून काही मोठी नाव ड्रग्स प्रकरणात समोर आली.

रिया चक्रवर्तीच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही ड्रग्स पेडलरला अटक केली होती आणि त्यांच्याकडूनच अबिगेल पांडे आणि सनम जोहर ही नावं समोर आली होती. ज्या नंतर एनसीबीच्या तपासाची दिशा टीव्ही इंडस्ट्रीकडे वळली. ड्रग्ज प्रकरणात टीव्ही इंडस्ट्रीमधील पहिल्यांदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून येणाऱ्या दिवसांमध्ये अजून मोठ्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

लॉकडाउननंतर भारतीय लोक विचारपूर्वक करत आहेत खर्च, कोठे होतो आहे सर्वाधिक खर्च करतात हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून भारतीय लोकांचा खर्च वाढला आहे. पण तरीही कोरोना व्हायरस या साथीच्या आजारानंतर 90 टक्के लोक पूर्वीपेक्षा जास्त सावध राहत आहेत. जागतिक स्तरावर 75 टक्के लोक त्यांच्या खर्चाबाबत सावध झालेले आहेत. एका सर्वेक्षणात याबाबतची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात, जागतिक स्तरावर 46 टक्के लोक त्यांच्या खर्चाबद्दल सावध राहिलेले दिसले. जुलैमध्येच भारतासाठी ही आकडेवारी जवळपास 56 टक्के आहे.

अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रभाव
स्टँडर्ड चार्टर्ड बँक सर्वेक्षणात (Standard Chartered Bank Survey) ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 76 टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की, कोविड -१९ मुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, म्हणूनच ते सावधपणे खर्च करीत आहेत.

जगाच्या तुलनेत ऑनलाइन शॉपिंगबाबत भारतीय सकारात्मक आहेत
जगभरातील 12 मार्केट्समध्ये याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, केनिया, मेनलँड चीन, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर, तैवान, युएई, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यासारख्या मार्केट्सचा समावेश आहे. या अभ्यासाचा हा तीन भागात होणारा हा दुसरा निकाल आहे. या सर्वेक्षणानुसार, 74 टक्के भारतीय ऑनलाइन शॉपिंगवर सकारात्मक दिसत आहेत. मात्र, जागतिक पातळीवर ही संख्या केवळ 64 टक्के आहे.

5 वर्षात कॅशलेस ट्रान्सझॅक्शन वाढण्याची अपेक्षा आहे
कॅशलेस खर्चाच्या बाबतीत या क्षेत्रामध्ये भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 87 टक्के लोकांचे म्हणणे आहे की येत्या 5 वर्षात कॅशलेस खर्चात मोठी वाढ होईल. जागतिक स्तरावर केवळ 64 टक्के लोकांचा यावर विश्वास आहे.

भारतातील 64 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, कोरोना कालावधीच्या तुलनेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रवास किंवा सुट्टी घेणे टाळले आहे. त्याच वेळी, 30 टक्के लोकांनी त्यांच्या एक्सपीरिएंसवरील खर्च कमी केला आहे. जागतिक पातळीवर ही संख्या 41 टक्के आहे. एकीकडे केवळ 56 टक्के लोकांनी नवीन कपड्यांची खरेदी केली आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर ही संख्या 55 टक्के आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

सोन्याचे दर हे गेल्या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले, आता पुढे काय होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी स्पॉट गोल्डच्या किंमती खाली आल्या आहेत. सणासुदीच्या हंगामाच्या अगोदर, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तसेच साथीच्या रोगामुळे पिवळ्या धातूची किंमत खाली येत आहे. गुरुवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 613 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 49,638 रुपयांवर गेले आहे. जगभरात सोन्याच्या वापराच्या बाबतीत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. सोन्याचा सर्वाधिक वापर हा चीनमध्ये होतो. फ्युचर्स मार्केटमध्ये ऑक्टोबरच्या सोन्याच्या किंमतीतही घट नोंदली गेली. तो 0.45 टक्क्यांनी घसरून तो प्रति 10 ग्रॅम 49,293 रुपये झाला आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम सुमारे 2500 रुपयांची घट झाली आहे.

डॉलर मजबूत झुल्याचा परिणाम
गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या. दरम्यान, अलीकडील घसरणीव्यतिरिक्त बहुतेक विश्लेषक आणि व्यापारी अजूनही सोन्याच्या दराबाबत आशावादी आहेत. सध्या अमेरिकन चलन डॉलरचा परिणाम सोन्याच्या दरावर दिसून येत आहे. या आठवड्यात, अमेरिकन चलन मध्ये मजबुती दिसून आली आहे.

व्याजदरामुळे खेळ खराब झाला
तज्ञांचे म्हणणे आहे की, विकसित देशांमधील व्याजदर शून्याच्या जवळ पोहोचले आहेत. केंद्रीय बँकांनीही असे सूचित केले आहे की, व्याज दर बर्‍याच काळासाठी समान राहतील. सामान्यत: व्याज दराचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आता अशी अपेक्षा आहे की, व्याज दर हा शून्याच्या जवळ असल्याने बहुतेक लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करणे निवडू शकतात. यामुळे किंमती वाढण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकेत वाढत्या बेरोजगारीमुळे सोन्याला दिलासा मिळेल
अमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, ऑगस्टच्या अखेरीस सुमारे 3 कोटी अमेरिकन लोक बेरोजगारी भत्तेचा लाभ घेत आहेत. यानंतर, अशीही एक आशा आहे की फेड रिझर्व्ह आणि अमेरिकन सरकार पुढील उत्तेजन पॅकेजेस घोषित करू शकतात जेणेकरून अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणता येईल. तज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, केंद्रीय बँका अजूनही अर्थव्यवस्थेतील लिक्विडिटी वाढवतील. सोन्याच्या किंमतीसाठी हे सकारात्मक असेल.

दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीची घसरण झाली
गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या मजबुतीमुळे गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 485 रुपयांनी स्वस्त झाले आणि 50,418 रुपयांवर पोचले. मात्र, चांदीच्या दरात 2081 रुपये प्रतिकिलो घट झाली. त्यानंतर चांदीचा नवा दर हा 58,099 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. बर्‍याच काळापासून चांदीची किंमत प्रति किलो 60 हजार रुपयांवर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

ठाण्यात शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची सावत्र भावानेचं केली गोळ्या घालून निर्घृण हत्या

ठाणे । ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मालमत्तेच्या वादातून सावत्र भावानेच ही हत्या केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. माणिक पाटील यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करुन मृतदेह वाशीच्या खाडीत टाकण्यात आला. पाटील यांच्या घरातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने देखील चोरीला गेले असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. बंगल्याची वाटणी आणि मालमत्तेच्या वादातून ही हत्या केल्याचे सांगितले आहे.

राकेश माणिक पाटील (३४) असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवक पुत्राचे नाव आहे. शिवसेनेचे नगर माणिक पाटील हे ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहण्यास आहे. राकेश हा जवळच असणाऱ्या शिवसृष्टी इमारत येथे राहण्यास होता. २० सप्टेंबर रोजी रात्रीपासून बेपत्ता असणाऱ्या राकेश पाटील यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्यामुळे माणिक पाटील यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

राकेशचा शोध सुरू असताना माणिक पाटील यांच्या बंगल्यातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने गायब असल्याचे माणिक पाटील यांच्या लक्षात आले. नगरसेवक पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांना कळवले. मुलगा आणि सोनं गायब झाल्यामुळे कासारवडवली पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी राकेशच्या शोधासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले.

राकेशचा शोध सुरू असताना त्याची मोटारसायकल माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह यांच्याकडे पोलिसांना सापडली. पोलिसांनी संशयावरून गौरव सिंह याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करताच त्याने राकेशची हत्या करून मृतदेह वाशीच्या खाडीत फेकला असल्याची कबुली दिली. सचिन पाटील हा राकेशचा सावत्र भाऊ असून त्याने बंगल्याच्या वाटणीवरून राकेशची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून मृतदेह वाशीच्या खाडीत फेकला असल्याची कबुली गौरव सिंह याने पोलिसांकडे दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.