Monday, December 15, 2025
Home Blog Page 5260

विराटच्या कामगिरीवर बोलताना गावस्करांनी अनुष्काबद्दल केलं ‘हे’ आक्षेपार्ह विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा तोल सुटला.विराट कोहलीच्या कामगिरी वर टीका करताना त्यांनी अनुष्का शर्मा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. गावसकारांनी केलेल्या त्या आक्षेपार्ह विधानामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये संतापाची भावना आहे. सोशल मीडियावर नेटकरी गावसकारांना ट्रोल करत आहेत. अनुष्का आणि विराटबद्दल केलेल्या त्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गावसकरांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

वास्तविक, पंजाबविरोधातील सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला. कोहलीने क्षेत्ररक्षणावेळी राहुलचे दोन झेल सोडले तर फलंदाजी करताना केवळ1 धाव काढून तो माघारी परतलाअपयशी ठरला. विराट कोहलीला आपल्या लौकिकास फलंदाजी करण्यात अपयश आलं. तो बाद होऊन माघारी परतताना भारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. गावसकर म्हणाले की, Virat Kohli has only trained against Anushka’s balls during the lockdown

गावसकरांच्या या आक्षेपार्ह विधानानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या चाहते चांगलेच भडकले आहेत. नेटकऱ्यांनी गावसकरांवर टीका केली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दारुण पराभव केला. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

कोरोनाचा कहर! देशात गेल्या २४ तासांत ८६ हजार ०५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंदतर तर १ हजार १४१बळी

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा फैलाव थांबताना दिसत नसताना दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना बळींची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ८६ हजार ०५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून १ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या एकून संख्येनं ५८ लाख १८ हजार ५७१ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ७० हजार ११६ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४७ लाख ५६ हजार १६५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ९२हजार २९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

याशिवाय देशातील कोरोनाच्या चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहे. दिवसभरात १३ लाख ८० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

रात्री झोप व्यवस्थित हवी असेल तर ‘या’ स्थितीमध्ये झोपा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । निरोगी शरीरासाठी ज्या पद्धतीने व्यायामाची गरज असते. त्याच पद्धतीने योग्य स्थितीत झोप आणि वेळेवर झोप या गोष्टी गरजेच्या असतात. त्या पद्धतींत दररोज कमीतकमी ७ ते ८ तास झोप जास्त गरजेची आहे. झोप लागणे आणि त्याच्या वेग वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचा वापर आपल्या दैन्यंदिन जीवनात केल्या तर त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. चांगली झोप येण्यासाठी पाच वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याबद्धल ची माहिती आपण घेणार आहोत.

पाहिली पद्धत म्हणजे सरळ पाठीवर आडवे झोपणे. त्यामुळे पाठीला आराम मिळतो. रात्री झोपताना नेहमी गुडग्याच्या खाली एक उशी ठेवून झोप म्हणजे तुमच्या पायाला आणि गुडग्याला आराम मिळू शकतो. त्यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळून त्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.

झोपेची दुसरी पद्धत म्हणजे डोक्याच्या खाली उशी ठेवून झोपणे. परंतु उशी हि मोठ्या आकाराची आणि जास्त जाड या असलेली वापरू नये. सायनन या आजाराचा ज्यांना ज्यांना त्रास आहे. त्या लोकांनी मोठी उशी घेऊन झोपू नये. पण काही प्रमाणात उशी घेऊन झोपा. यामुळे तुमचे डोके उंच राहील आणि तुम्हाला श्वास घेण्याचा त्रास निर्माण होणार नाही.

तिसरी पद्धत म्हणजे डोक्याची हालचाल फार कमी प्रमाणात करणे. अनेकांना अर्धशिशी सारखा तसेच डोके दुखीचा त्रास असेल तर हा त्रास होण्यापाठीमागचे कारण म्हणजे झोपण्याची चुकीची सवय यासाठी सरळ झोपावे आणि डोक्याच्या आसपास कमीत कमी तीन उश्या लावून झोपावे.

डोके उंच असल्याने तुमच्या तोंडातून लाळ बाहेर पडणार नाही. ऍसिडिटी , घोरणे, लठ्ठपणा, वजन वाढणे, यासारख्या समस्या निर्माण होणार नाही. त्यासाठी योग्य प्रकारे आणि वेळेत झोप घेणे गरजेचे आहे.

झोपण्याच्या पाचव्या प्रकार म्हणजे डाव्या कुशीवर झोपणे. रात्री उशिरा जेवण करून झोपल्याने बुध्दिकोष्टतेचि समस्या निर्माण होते. झोपण्याच्या वेळेत थोडासा बदल केल्याने शरीराला चांगला आराम मिळतो. गरोदर स्त्रियांनी डाव्या कुशीवर झोपणे त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

दीपिकासोबत चौकशीच्या वेळी उपस्थित राहू द्या; रणवीरची NCB ला विनंती दिलं ‘हे’ कारण

मुंबई । NCB एनसीबीकडून दीपिका आणि बॉलिवूडमधील काही आघाडीच्या कलाकारांना समन्स बजावण्यात आलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी जोडून चौकशी सुरु असणाऱ्या ड्रग्ज कनेक्शनबाबतच्या चौकशीअंतर्गत हे समन्स या कलाकार मंडळींना बजावण्यात आलं आहे. ज्यानंतर आता शनिवारी दीपिकाची चौकशी होणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) अखेर एनसीबीचं समन्स मिळाल्यानतंतर ती पती रणवीर सिंग (Ranveer Singh) हे गोव्यातून मुंबईत दाखल झाले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाचा पती अर्थात अभिनेता रणवीर सिंग यानं तिच्या चौकशीच्या वेळी सदर ठिकाणी तिच्यासोबतच उपस्थित राहण्याची विचारणा एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. दीपिकाला अशा प्रसंगी अत्यंत भीती आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. शिवाय तिचा गोंधळ उडतो त्यामुळं तिच्यासोबत चौकशीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विचारणा त्यानं आपल्या अर्जात केली आहे.

कायद्याबाबत आपल्याला आदर असून, चौकशीदरम्यान त्याच ठिकाणी उपस्थित राहण्यास परवानगी दिली जात नसल्याचं आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. असं असलं तरीही, आपल्याला एनसीबीच्या कार्यालयात येण्यास अनुमती द्यावी यासाठी तो आग्रही दिसत आहे. रणवीरनं केलेली ही विचारणा पाहता एनसीबी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

कशी घ्याल मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक आई हि आपल्या मुलांची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते. कधी कधी मुलांच्या तोंडाचा वास हा अतिशय घाण येत असतो. त्याच वेळी आई वडिलांनी मुलांना आपल्या मौखिक भागाची कशी काळजी घ्यावी हे सांगितले जाते. लहान मुलांना दात न येण्याअगोदर पासून च्या मुखाची काळजी घेतली गेली पाहिजे.

लहान वयातच मुलांना योग्य पद्धतीने सांगितले गेले तर ते मोठ्या पणी सुद्धा खूप चागल्या पद्धतीने आरोग्याची काळजी घेतात. लहान वयात मुलांना येणारे दुधाचे दात सुद्धा त्याच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. हे दात जास्त दिवस टिकले तर पुढील आरोग्यास त्यांना धोका निर्माण होत नाही. लहान वयात मुलांना चुकीच्या पद्धतीने खाण्याची सवय असते. तसेच ते योग्य प्रमाणात आहार घेतल्यानंतर पाणी पित नाहीत. त्यामुळे त्याच्या तोंडामध्ये खाल्लेल्या पदार्थचे कण तसेच राहतात. त्यामुळे दातांना कीड लागू शकते. त्यामुळे दात अनेक वेळा किडतात. अनेक वेळा लहान मुलांचे दात किडलेले दिसतात.

आई आणि बाळाच्या शरिराची एकमेकांशी संबंध आहे. आई आजारी पडली तरी लहान बाळ आजारी पडते. त्यामुळे आईने आपल्या आरोग्याची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. दिवसातून कमीत कमी दोनदां दात घासावेत तसेच तोंडाचा खूप घाण वास येत असेल तर दररोज सकाळी उठल्या उठल्या बेकिंग सोडा याच्या साहाय्याने चूळ भराव्यात. यासाठी गोड खाणे कमी करावे. त्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात दात किडतात. हिरड्यांमधून जर मोठ्या प्रमाणात रक्त येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

मोदी सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे आज देशव्यापी भारत बंद आंदोलन

नवी दिल्ली ।मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशातील जवळपास 250 शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरल्या आहेत. अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होतील.

कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील २ महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली जाईल. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती पुर्नरविचारासाठी परत पाठवण्याची विनंती केली आहे.

तर महाराष्ट्रातही हे आंदोलन तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारचे जमीन अधिग्रहण बिलात बदल करण्याचे प्रयत्न ज्याप्रकारे उधळण्यात आले त्या प्रकारे कृषी कायद्याचा अंमल करण्याचे सरकारचे प्रयत्न शेतकरीच उधळून लावतील, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप या सगळ्याला कशाप्रकारे सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

सर्वसामान्यांना दिलासा! राज्यात प्लाझ्मा दर निश्चित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. राज्य सरकारने सिटीस्कॅन आणि प्लाझ्माचे दर निश्चित केले आहेत. सिटीस्कॅनचे दर 12 हजारावरुन 3 हजारांवर आणले आहेत. तर कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

एचआरसीटी चाचणी १६पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर समितीने निश्चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यासंदर्भात समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते.

कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार रुपये इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले नवीन पाऊल, काय बदल केले आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे.

प्रदूषणामुळे पर्यावरणाचे नुकसानही कमी होईल
मंत्रालयाने याबाबत असे म्हटले आहे की,’ स्वच्छ उर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याअंतर्गत नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.’ यासंदर्भात माहिती देताना मंत्रालयाने म्हटले आहे की,’ या पावलामुळे देशातील हायड्रोजन इंधन सेल आधारित वाहनांना चालना मिळण्यास मदत होईल आणि पर्यावरणास अनुकूल अशी उर्जा वापरणार्‍या वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान देखील कमी होईल. अशा वाहनांचे उत्पादक आणि पुरवठा करणारे यांच्याकडे वाहन चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय मानके उपलब्ध केली गेली आहेत.’

व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याची सरकार करत आहे तयारी
यासह जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याचीही तयारी केंद्र सरकार करीत आहे. या संदर्भात रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने एक प्रस्ताव सादर केला असून त्यावर मंत्रिमंडळाकडून विचार केला जात आहे. 2018 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये 10 वर्षापेक्षा जुन्या डिझेल आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी घातली. तेव्हापासून या पॉलिसीचा विचार केला जात होता. जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्याबाबत अद्याप भारतात कोणतेही स्पष्ट अशी वाहनांची पॉलिसी नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आता खिशात डेबिट कार्ड जरी नसले तरी आपण पेमेंट करू शकाल, ‘ही’ बँक लवकरच घेऊन येत आहे नवीन सुविधा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) सेफपे सुविधा सुरू करणार आहे. या डिजिटल सुविधेच्या माध्यमातून ग्राहक पॉईंट ऑफ सेल (POS) टर्मिनलद्वारे मान्यता प्राप्त नेयर फील्ड कम्युनिकेशन (NFC) वर त्यांच्या स्मार्टफोनद्वारे पेमेंट करू शकतील. NFC ला सेफपेद्वारे आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मोबाइल अॅपमध्ये समाविष्ट केले जाईल, ज्याद्वारे बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्डद्वारे सुरक्षित पेमेंट केले जाऊ शकते. यानंतर, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे कार्ड असलेल्या ग्राहकांना POS मशीनला स्पर्श करावा लागणार नाही किंवा कार्डही वापरावे लागणार नाही. ही प्रोसेस कॉन्टॅक्टलेस, वेगवान आणि सुरक्षितही असेल.

मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध होईल
हे असे पहिलेच तंत्रज्ञान आहे जे मोबाइल अॅप्ससह जोडले जात आहे. सेफपेच्या फीचर्सची यशस्वीरित्या चाचणी आणि सत्यापित केली गेली आहे. पुढील एका आठवड्यात ते बँकेच्या मोबाइल अॅपद्वारे ग्राहकांना उपलब्ध होईल.

लिमिट किती असेल?
सेफपेद्वारे प्रत्येक व्यवहारासाठी 2000 रुपयांपर्यंत पैसे दिले जाऊ शकतात आणि त्याचे डेली लिमिट 20,000 रुपयांपर्यंतचे आहे. याद्वारे दररोजची खरेदी देखील सुलभ केली जाऊ शकते.

कसे वापरायचे?
सेफपे चालू करण्यासाठी ग्राहकांना एकदा त्यांचे आयडीएफसी फर्स्ट बँक डेबिट कार्ड हे मोबाईल अॅपशी लिंक करावा लागेल. एकदा अॅक्टिव्ह झाल्यानंतर ग्राहक व्यापाऱ्याच्या NFC द्वारे व्हेरिफाय केलेल्या POS टर्मिनलवर त्यांचा फोन अनलॉक केल्यानंतर पेमेंट करू शकतात. याद्वारे, एनक्रिप्टेड कार्डची माहिती वायरलेस टर्मिनलवर पाठविली जाते. या मोबाइल अॅपद्वारे डेबिट कार्डे जोडली जाऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार ते हटविली देखील जाऊ शकतात. पेमेंट देण्यासाठी, NFC व्हॅलिड स्मार्टफोनला अनलॉक केल्याच्या 30 सेकंदात टर्मिनलवर फिरवावे लागेल.

हे फीचर्स त्या बचत खातेधारकांना उपलब्ध आहे ज्यांच्याकडे NFC वर व्हिसा कार्ड आणि आयडीएफसी फर्स्ट मोबाइल अॅप आहे आणि ज्याने OS-5 आणि त्यावरील वरील Android डिव्हाइस सक्षम केले आहेत.

सेफपे कसे अॅक्टिव्ह करावे:
1. आपले डेबिट कार्ड आयडीएफसी फर्स्ट बँक मोबाइल अॅपसह लिंक करा.
2. पेमेंट देण्यासाठी NFC सक्षम स्मार्टफोन अनलॉक करा
3. NFC व्हॅलिड POS टर्मिनल समोर फिरवा, एन्क्रिप्टेड कार्डची माहिती वायरलेस टर्मिनलवर पाठविली जाईल.

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या रिटेल लायबिलिटीचे प्रमुख अमित कमर म्हणाले, “वायरलेस जगातील लोकांना पेमेंटची पद्धत बदलण्याची इच्छा आहे. आतापर्यंत ही सुविधा डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी चालू आहे. आता साथीच्या रोगाने आपला वेग वाढविला आहे. डिजिटल जगात आपल्याला असे वाटते की, NFC तंत्रज्ञानाची भूमिका जगात विशेष बनत चालली आहे. ” ते म्हणाले, “सेफपेद्वारे पेमेंट देण्याचा अनुभव ते अधिक चांगले करते. यामुळे कार्ड गहाळ होण्याची चिंता देखील दूर होते. तसेच ग्राहक काही क्षणात पैसे भरू शकतात आणि स्टोअर सोडू शकतात.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

श्रेय घेण्यावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा चढाओढ; आता ‘या’ मुद्दयावर रंगला सामना

बीड । राज्य सरकारने अडचणीत असलेले साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी थकहमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या ३४ सहकारी साखर कारखान्यांना ३९१ कोटी रुपयांची थकहमी दिली आहे. या ३४ कारखान्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबर विरोधातील भाजप नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या थकहमीवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आता जुंपली आहे. परळीतल्या वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या थकहमीवरुन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भावाबहिणीत पुन्हा श्रेयाची लढाई दिसून येत आहे.

सुडाचे राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी ११ कोटी रुपयांची थकहमी दिल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्या कारखान्याला मदत कशी दिली गेली असा प्रश्न येतो. पण जेव्हा मदत दिली गेली तेव्हा आम्ही सूडाचे राजकारण केलेले नाही. भलेही ५ वर्ष आम्हाला या सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी व्हावे लागले, तरीसुद्धा आम्ही सत्तेत आल्यानंतर असे राजकारण करणार नाही हे आम्ही ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा दावा पंकजा मुंडे यांनी फेटाळला आहे. वैद्यनाथला मिळालेल्या थकहमीचे श्रेय इतरांनी घेऊ नये असा टोला पंकजांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पंकजा म्हणाल्या.

तर दुसरीकडे पंकजा यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनीही त्यांना प्रतिसवाल केला आहे. त्यांनी पाठपुरावा कसा केला, कुठून केला, इथून केला की परदेशात बसून केला हे मला सांगता येणार नाही. पण तिथल्या पाठपुराव्याने ही थकहमी मिळते, की मंत्रिमंडळात एक मंत्री म्हणून कामकाजात पाहताना सकारात्मक बाजू घेऊन त्या कारखान्याची शिफारस करतो, त्यावेळी थकहमी मिळते एवढे समजायला महाराष्ट्रातील जनता ज्ञानी आहे, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हाणला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.