Monday, December 22, 2025
Home Blog Page 536

ITBP Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना ITBP अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती कॉन्स्टेबल म्हणजे स्वयंपाकघर सेवा या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 819 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 2 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल, तर 1 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या कालावधीतच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | ITBP Bharti 2024

  • पदसंख्या – 819 जागा
  • वयोमर्यादा – 18 – 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024
  • वेतनश्रेणी – 21700- 69100 रुपये दरमहा
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास

अर्ज प्रक्रिया | ITBP Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • 2 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
  • तसेच 1 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून देखील अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Cabinet Meeting: नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी 5 वर्ष: शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज (13) मंगळवारी पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची (Maharashtra Cabinet Meeting) मानली जात आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला (Maharashtra Cabinet Meeting) गती देण्यासाठी राज्य सरकारने 149 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet Meeting)

  • विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटींची मान्यता पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाअंतर्गत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आली आहे.
  • महसूल विभाग अंतर्गत मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोन च्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला असून लाखो नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
  • उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेला मान्यता देण्यात (Maharashtra Cabinet Meeting) आली आहे
  • सहकार विभाग अंतर्गत यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतींसाठी नोंदणीची अट मार्च 2025 पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.
  • वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापिकांना ठोक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
  • 6000 किमी रस्त्याच्या डांबरीकरण ऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण आणि सुधारित 37 हजार कोटी खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.
  • नगर विकास विभागाअंतर्गत नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याच्या (Maharashtra Cabinet Meeting) निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
  • ऊर्जा विभागाच्या अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी के एफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्यासदराने करार करण्याच्या निर्णयाला मंजुरी.

Ladli Lakshmi Yojana | सरकारने आणली लाडली लक्ष्मी योजना; मुलींना मिळणार 1 लाख रुपयांचा लाभ

Ladli Lakshmi Yojana

Ladli Lakshmi Yojana | आपले सरकार हे महिला सक्षमीकरण करण्यासाठी नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात. मुलींना चांगले शिक्षण मिळावे महिलांना आर्थिक ज्ञान मिळावे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अनेक योजना आल्या जातात. अशातच आता मुलींचे शिक्षणासाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचे नाव लाडली लक्ष्मी योजना (Ladli Lakshmi Yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

मध्यप्रदेश सरकारने खास मुलींसाठी ही योजना आणलेली आहे. मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एक लाख 70 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत (Ladli Lakshmi Yojana) मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. या योजनेत मुलींना इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी 2 हजार रुपये दिले जातात. इयत्ता नववीमध्ये 4 हजार रुपये दिले जातात. अकरावीत गेल्यावर 6 हजार रुपये दिले जातात. तर बारावीत प्रवेश घेण्यासाठी 6 हजार रुपये दिले जातात.

मुलींना जर दहावी किंवा बारावी नंतर व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना प्रवेशासाठी 25 हजार रुपयांची मदत केली जाते. हे पैसे या मुलींना दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. अनेक मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे सरकारने ही नवी योजना आणलेली आहे. यानंतर मुलींचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून 1 लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाते. या योजनेत तुम्ही मुलीच्या नावानेच बँकेत खाते उघडू शकता. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर अर्ज करावी लागेल. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, बँकेचे कागदपत्र आणि फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.

Travel : काय सांगता ! महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार ? कोकणातल्या ‘या’ ठिकाणी अनुभवा थ्रिल

Travel : हल्ली साहसी खेळांकडे अनेकांचा कल वाढलेला दिसून येतो आहे. साहसी खेळांपैकी एक असलेला खेळ म्हणजे ‘रिव्हर राफ्टिंग’… खळाळणाऱ्या , उसळणाऱ्या नदीच्या प्रवाहावर स्वार होण्याचा हा रोमांच … या खेळाचा अनुभव घेण्यासाठी भारतात ऋषिकेश हे ठिकाण तसे प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे? आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या खेळाचा थरार तुम्ही अनुभवू शकता. कुठे ? (Travel) कसे ? चला जाणून घेऊया…

ठिकाण (Travel)

कोलाड हे रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 (मुंबई-गोवा) वर मुंबईपासून 117 किमी अंतरावर आहे, कोलाड राज्य महामार्गाने पुण्याला देखील जोडलेले आहे. त्यामुळे हे ठिकाण पुणे आणि मुंबई दोघांसाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला येण्यास काही हरकत नाही.

कोलाडमधील कुंडलिका नदी ही महाराष्ट्रातील व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. दररोज सकाळी स्थानिक धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते, ज्यामुळे राफ्टिंगसाठी चांगली संधी इथे निर्माण होते. पुणे मुंबईहून लोक (Travel) इथे आवर्जून भेट देत असतात.

कधी भेट द्याल ? (Travel)

कोलाडमध्ये वर्षभर आल्हाददायक हवामान असते, तर पावसाळा हा इथल्या रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठी उत्तम काळ आहे. याचे कारण म्हणजे नदी प्रवाहित होतात आणि पावसाळ्यात पाण्याची पातळी जास्त असते. शिवाय, सभोवतालच्या हिरवाईचे सौंदर्य आणि धबधब्यांचे सौंदर्य एक अनोखा अनुभव देते.

किती येतो खर्च (Travel)

खरेतर राफ्टिंग आणि राहण्यासाठीचा खर्च तुम्ही घेत असलेल्या सोयींनवर अवलंबुन आहे. येथे पॅकेज 800 – 2000 पासून सुरू होते. निवडलेल्या मार्गासाठी, हंगामासाठी, लोकांची संख्या, राफ्टिंगसह इतर पर्यटनाचे प्रकार , इत्यादीसाठी खर्च देखील बदलतो. अनेक राफ्टिंग ऑपरेटर आहेत जे रिव्हर क्रॉसिंग, कयाकिंग आणि झिपलाइन आणि लंचसह इतर साहसी क्रियाकलापांसह रिव्हर (Travel) राफ्टिंग सेवा देतात. (व्हेज आणि नॉन व्हेज). कोलाड रिव्हर राफ्टिंगची किंमत 3000 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते.

कोलकत्यातील घटनेचा निषेध करत; सरकारी डॉक्टरांनी आजपासून केले काम बंद

Doctors

वैद्यकीय विश्वामध्ये खळबळ उडवून टाकणारी घटना कोलकत्ता येथील एका सरकारी रुग्णालयात घडलेली आहे. या रुग्णालयात एका डॉक्टरची बलात्कार करून हत्या झालेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाला हादरा बसलेला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर नियमित काम करणार नाही. ही माहिती त्यांनी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स यांनी कळवलेली आहे.

या काळात काम जरी सुरू नसले, तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहे. याबाबतची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. परंतु रुग्णालयातील दैनंदिन कामावर मात्र या गोष्टीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील आहे. यावेळी फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सुद्धा डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केलेले आहे.

त्यामुळे आता राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात देखील काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे काम बंद आंदोलन चालू राहणार आहे. निश्चित काळासाठी हे आंदोलन चालू राहण्याची देखील त्यांनी सांगितलेले आहे. या वैद्यकीय क्षेत्रात कोलकत्ता येथील घटनेचा तीव्र शब्दात त्यांनी निश्चित देखील व्यक्त केलेला आहे.

शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर असणे, हे खूप गरजेचे आहे. तो डॉक्टर आरोग्य व्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यांच्या शिवाय कोणत्याही रुग्णालयाचे काम सुरळीतपणे चालू शकत नाही. त्यामुळे आता प्रशासनाला व्यवस्थित चालण्यासाठी अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करावे लागत आहे. परंतु या ठिकाणचे काम बंद असल्याने रुग्णांना याचा फटका बसू शकतो.कारण मुंबई महानगरपालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात.

याबाबतची माहिती देताना वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलेले आहे की, या निवासी डॉक्टरांचे काम बंद असलेले आंदोलनामुळे अनेक शस्त्रक्रिया देखील रद्द करावे लागणार आहेत. तसेच शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची रुग्णांना देखील दाखल करून घेतले जाणार नाही. तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवेची आवश्यकता नसेल, तर त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. या रुग्णालयामध्ये आता रुग्णांना उपचार घेण्यासाठी काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

या रुग्णालयांना बसणार फटका

  • जे. जे. समूह रुग्णालये (जी टी, कामा आणि सेंट जॉर्जेस)
  • केइएम रुग्णालय
  • सायन रुग्णालय
  • नायर रुग्णालय
  • कूपर रुग्णालय

काय आहेत मागण्या?

सरकारी निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन चालू केलेले आहे. त्या आंदोलनामध्ये कोलकत्ता निवासी डॉक्टरांची जर मृत्यू झाला आहे. त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आहे त्याचप्रमाणे संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये. तसेच तज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षित करावी. वस्तीगृहाची व्यवस्था करून डॉक्टरांची चांगल्या खोल खोलीत व्यवस्था करावी. रुग्णालयाचे परिसरात सीसीटीव्ही बसवावेत आणि सुरक्षारक्षकांची देखील नियुक्ती करावी.

Mumbai-Pune Railway: लोणावळ्याशिवाय पुणे गाठता येणार ? मध्य रेल्वेचा नव्या मार्गासाठी प्रस्ताव

Mumbai-Pune Railway: देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. तर त्या पाठोपात सर्वात झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणजे पुणे. पुणे मुंबई असा दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. त्यामुळे पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे हे अंतर कमीत कमी कसं होईल? यासाठी नवनवीन विकास प्रकल्प शासनाकडून हाती घेतले जात आहेत.

दरम्यान पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा ट्रेन ने सफर करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवीन रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामुळे काय होणार आहे ? तर लोणावळा शिवाय रेल्वे प्रवाशांना थेट पुणे गाठता येणार आहे. नव्या मार्गावर मेल एक्सप्रेस चा वेग दुप्पट होणार आहे. त्यामुळे वेगाने पोहोचता येणार आहे. शिवाय या मार्गावर नव्या 10 रेल्वे गाड्या चालवण्याचा पर्यायही खुला राहणार आहे चला जाणून (Mumbai-Pune Railway) घेऊया मध्य रेल्वेच्या या नव्या प्रस्तावाबाबत…

तसे पाहायला गेले तर मुंबई ते पुणे दरम्यान रेल्वे मार्गामध्ये लोणावळा आणि खंडाळा हे घाट आहेत. प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घाटामध्ये ताशी 60 किलोमीटर अशी वेगमर्यादा मेल एक्सप्रेसला आहे. तर नव्या प्रस्तावित असलेल्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वे गाड्या ताशी 110 किलोमीटर वेगाने धावू शकणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मार्गांचा प्रस्ताव (Mumbai-Pune Railway) तयार करण्यात आलाय. यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यानंतर त्याचं काम सुरू करण्यात येणार आहे.

कसा असेल मार्ग (Mumbai-Pune Railway)

मिळालेल्या माहितीनुसार कर्जत ते तळेगाव दरम्यान ७२ किलोमीटरच्या नव्या मार्गावर घाटातील ग्रॅडियंट 1.100 होणाऱ्या सध्या लोणावळा घाटात 1.37 ग्रेडियंट होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. कर्जत ते तळेगाव हे अंतर 57 km असून नव्या मार्गात अंतर 72 किलोमीटर पर्यंत पोहोचेल. कर्जत ते कामशेत दरम्यान सध्या 44 किलोमीटर अंतर असून या नव्या मार्गानुसार 62 किलोमीटर अंतर असणार आहे. घाटाऐवजी पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्यानं नव्या मार्गात अंतर अधिक आहे. मात्र नव्या मार्गावरून जादा (Mumbai-Pune Railway) स्पीडने जाता येणार आहे.

Top Rich City In Maharashtra : महाराष्ट्रातलं दुसरं श्रीमंत शहर ! ज्याचा GDP जवळपास 69 अब्ज डॉलर्स इतका

Top Rich City In Maharashtra : आपल्याला माहितीच आहे की जगभरात भारताचा डंका अनेक गोष्टींमध्ये आहे. श्रीमंतांच्या यादीत देखील भारताचे सदस्य आहेत. याशिवाय आपलं महाराष्ट्र ही काही मागे नाही. महाराष्ट्र हे भारतातलं तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत राज्य आहे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर हजारो शहर आहेत यापैकी सर्वात श्रीमंत शहर कुठलं? तर सर्वात श्रीमंत शहर म्हणजे ‘आपली मुंबई’… देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि या मुंबईचा तामझाम याचं काही वेगळं उदाहरण देण्याची गरज नाही. पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावरचं सर्वात श्रीमंत शहर कोणतं आहे बरं? महाराष्ट्रातलं दोन नंबरचं जे सर्वात श्रीमंत शहर आहे आजच्या लेखामध्ये आपण त्याचीच (Top Rich City In Maharashtra) माहिती घेणार आहोत.

मुंबईपाठोपाठ राज्यामध्ये सर्वात श्रीमंत शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक आहे. मुंबईच्या पाठोपाठ पुणे सर्वाधिक औद्योगीकरण झालेलं महाराष्ट्रातलं दुसरं शहर आहे सर्वात मोठा आयटी हब पुण्यात आहे. याशिवाय बजाज ऑटो, टाटा मोटर्स यासारख्या बड्या कंपन्यांचे प्लांट देखील पुण्यात आहेत. पुण्याचा जीडीपी 69 अब्ज डॉलर्स इतका (Top Rich City In Maharashtra) आहे

शिवाय आपल्याला माहितीच असेल पुण्याला शिक्षणाची पंढरी असं म्हटलं जातं त्यामुळे देश-विदेशातून इथं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात याशिवाय कुणाला संस्कृतिक वारसा सुद्धा लाभलेला आहे पुणे ऐतिहासिक शहर देखील आहे. आता भारतात पुण्याचा कितवा नंबर लागतो याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत पुण्याचा (Top Rich City In Maharashtra) क्रमांक सातवा आहे.

जगातील श्रीमंत शहराच्या यादीत मुंबईचा समावेश होतो तर इंटरनॅशनल सिटी अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई हे शहर महाराष्ट्राचा आर्थिक केंद्रबिंदू आहे. शिवाय मुंबईमध्ये भारताच्या दहा टक्के रोजगार, 40% प्राप्ती कर, 20 टक्के केंद्रीय कर, 60% आयात कर, 40% परदेशी व्यापार आणि जवळपास 40 अब्ज व्यावसायिक कर हा एकट्या मुंबईतून (Top Rich City In Maharashtra) येतो.

देशविदेशातील अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालय मुंबईत आहेत याशिवाय मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा गोदरेज आणि रिलायन्स ग्रुप अशा बड्या उद्योग समूहांचा हेड ऑफिस मुंबई (Top Rich City In Maharashtra) मध्ये आहे.

Food Poisoning | पावसाळ्यात घ्या या गोष्टींची काळजी; अन्यथा अन्नातून होऊ शकते विषबाधा

Food Poisoning

Food Poisoning | अनेक लोकांना पावसाळा खूप आवडतो. परंतु पावसासोबत अनेक आजारांचा धोका देखील वाढत असतो. विशेषता पावसाळ्यामध्ये ओलावा निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे खूप इतरत्र घाण देखील निर्माण होत असते. या सगळ्याचा जास्त परिणाम अन्न पदार्थांवर होतो. कारण पावसाळ्यामध्ये अन्नपदार्थावर बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ खूप लवकर होते. त्यामुळे या ऋतूमध्ये अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून अन्न खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. आता आपण पावसाळ्यात अन्नपदार्थाच्या बाबत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

शिळे अन्न खाऊ नये | Food Poisoning

पावसाळ्यात बाहेरून आलेले शिळे अन्न खाणे टाळावे. या हंगामात अन्न लवकर खराब होते, त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. फक्त ताजे आणि गरम अन्न खा.

स्वच्छतेची काळजी न घेणे

पावसाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जेवण्यापूर्वी आणि नंतर हात धुवा. स्वयंपाकघर आणि खाण्याची जागा स्वच्छ ठेवा, जेणेकरून जीवाणू आणि विषाणू वाढू शकत नाहीत.

पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष

पावसाळ्यात पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. दूषित पाणी प्यायल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. नेहमी स्वच्छ आणि उकळलेले पाणी प्या. शक्य असल्यास, फिल्टर वापरा.

अन्न उघडे ठेवणे

अन्न नेहमी झाकून ठेवा. उघडे अन्न लवकर खराब होऊ शकते आणि त्यावर जंतू देखील येऊ शकतात. अन्न नेहमी स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा आणि ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

दूषित भाज्या आणि फळे खाणे टाळा

पावसाळ्यात माती आणि धुळीचा जास्त परिणाम भाजीपाला आणि फळांवर होतो. ते वापरण्यापूर्वी ते चांगले धुवा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे जंतू किंवा बॅक्टेरिया टाळता येतील.

अन्न योग्य तापमानात न ठेवणे

पावसाळ्यात अन्न लवकर खराब होऊ शकते, त्यामुळे ते योग्य तापमानात ठेवणे गरजेचे आहे. जर अन्न थंड करायचे असेल तर ते फ्रिजमध्ये ठेवा आणि जर ते गरम करायचे असेल तर ते चांगले गरम करा. पावसाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात. ते खरेदी करताना, ताजेपणा लक्षात ठेवा आणि त्यांना बर्याच काळासाठी साठवून ठेवू नका.

अन्न पुन्हा गरम करणे | Food Poisoning

पावसाळ्यात अन्न वारंवार गरम केल्याने त्याचे पोषण कमी होते आणि बॅक्टेरिया वाढतात. म्हणून, एकाच वेळी जेवढे खाऊ शकता तेवढेच अन्न तयार करा.

Skin Redness | पावसाळ्यात ॲलर्जीमुळे चेहरा लाल झाला असेल; तर ‘या’ घरगुती उपायांचा करा अवलंब

Skin Redness

Skin Redness | उन्हाळा पावसाळा किंवा दमट ऋतूमध्ये त्वचे संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे. ते लोक घराबाहेर पडताच त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण लालसरपणा येतो, खाज सुटते. परंतु अशावेळी नक्की काय करायचे? हे समजत नाही. कारण यावर जर केमिकल प्रॉडक्ट वापरले, तर त्यामुळे त्वचेची आणखी आग होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा (Skin Redness) आल्यास किंवा खाज येत असल्यास कोणत्याही प्रकारचे केमिकल प्रॉडक्ट्स वापरू नका. आज आम्ही तुम्हाला अशा परिस्थितीत घरच्या घरी चेहऱ्यावर लावण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होऊ शकतो.

गुलाबपाणी | Skin Redness

त्वचेवर गुलाबपाणी वापरल्याने कूलिंग इफेक्ट मिळतो. सनबर्नमुळे खराब झालेले त्वचेस बरे होण्यास मदत होते. तुमच्याही चेहऱ्यावर लालसरपणा येत असेल तर तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता किंवा काकडीचा रस गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्याला लावू शकता. हे लावल्यानंतर 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. गुलाबजलाचा नियमित वापर केल्यास काही दिवसातच लालसरपणा दूर होतो.

मध

ब्युटी प्रोडक्ट म्हणून मधाचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेची लालसरपणा आणि सूज दूर करण्यास मदत करतात. त्वचेवर रॅशेस आणि खाज येण्याची समस्या दूर करण्यातही खूप मदत होते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणाची समस्या असेल तर प्रभावित भागात मध लावा आणि 15-20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर पाण्याने धुवा. असे दिवसातून २-३ वेळा केल्याने लालसरपणा लवकर निघून जाईल.

कोरफड | Skin Redness

कोरफडमध्ये बरे करण्याचे गुणधर्म आहेत. जे चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यास मदत करतात. तुमच्याही चेहऱ्यावर लालसरपणा येत असेल तर एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. दिवसातून किमान 2-3 वेळा असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.

बर्फ

लालसरपणा दूर करण्यासाठी बर्फ हा रामबाण उपाय आहे. बर्फ लावल्याने लालसरपणा कमी होण्यास मदत होते. यासाठी एका मऊ सुती कपड्यात बर्फाचा तुकडा घालून चेहऱ्याला लावा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचा चेहरा थंडगार पाण्याने धुवू शकता, यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

नारळ तेल

नारळाच्या तेलामध्ये बुरशीविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. खोबरेल तेल त्वचेची एलर्जी आणि लालसरपणा दूर करण्यास मदत करते. जर तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा येत असेल तर बाधित भागावर खोबरेल तेल लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, TRAI ने आणला नवा नियम

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल फोन्स कॉलच्या बाबत खूप जास्त मोठ्या प्रमाणात फ्रॉड व्हायला लागलेला आहे. त्यामुळे नको असलेले हे फ्रॉड कॉल रोखण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले गेलेले आहेत. परंतु त्याने काहीही मदत झाली नाही. त्याचप्रमाणे एक नवीन AI फीचर देखील आणलं होतं. परंतु त्यांनी देखील हे फ्रॉड रोखण्यापासून जास्त मदत झाली नाही. अशातच आता टेलिकॉम रेगुलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI , 1 सप्टेंबर 2024 पासून एक नवीन नियम लागू करणार आहे. ज्यामुळे आता ग्राहक हे फसवे कॉल आणि लिंक्स यापासून लांब राहणार आहे. आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक नुकसान होणार नाही. हा नियम 1 सप्टेंबर पासून देशभरातील मोबाईल युजर्ससाठी लागू होणार आहे. या अशा आता टेली मार्केट्सना ब्लॅक लिस्ट देखील केली जाणार आहे.

TRAI याबाबत टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर्स एअरटेल, जिओ, बीएसएनएल, व्हीआय यांच्यासह टेली मार्केट मधील सोबत 8 ऑगस्ट रोजी मीटिंग घेतल्या. आणि या मीटिंगमध्ये मार्केटिंगच्या कॉल संदर्भात देखील निर्देश जारी करण्यात आलेले आहे. जर एखादी संस्था स्पॅम कॉल करण्यासाठी त्यांच्या लायसन्स गैरवापर करत असेल, तर त्यांना डिरेक्ट ब्लॅक लिस्ट केले जाणार आहे. असे सांगण्यात आलेले आहे.

ही माहिती दूरसंचार सेवा प्रदा त्याद्वारे पीएसपी इतर सर्व टीएसपी यांना शेअर केली जाईल. यासाठी सर्व दूरसंचार संसाधने दोन वर्षाच्या काळासाठी ब्लॅकलिस्ट देखील केली जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही या फसव्या कॉलपासून सावध राहू शकता. त्याचप्रमाणे ब्लॅक लिस्टिंगच्या काळात कोणत्याही टीएसपीला नवीन स्थूलसने संचार संसाधने दिली जाणार नाही. जर एखाद्या मेसेजमध्ये स्पॅम युआरएल किंवा एपीके फाईल असतील, तर ते कोणत्या मेसेजला पाठवण्याची परवानगी आता मिळणार नाही. आणि हा नियम 1 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर आणि टेली मार्केटर चेन बाईडींगची अंमलबजावणी करण्यासाठी आता 31 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ दिला जाणार आहे.