Monday, December 22, 2025
Home Blog Page 537

… तर महिलांच्या खात्यावरील 1500 रुपये काढून घेणार; रवी राणांचे धक्कादायक विधान

ravi rana ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या रक्षाबंधनच्या खास निमित्ताने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण ३००० रुपये महिलांना मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यभरातील महिला वर्गात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान, अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी लाडकी बहीण योजेनेबाबत खळबळजनक विधान केलं आहे. आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर महिलांच्या खात्यावरील १५०० काढून घेणार अशी थेट धमकीच रवी राणा यांनी दिली आहे.

रवी राणा यांनी आज अमरावती मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. याचवेळी रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयांचे आम्ही 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असं रवी राणा यांनी म्हंटल. रवी राणा यांच्या या विधानाने महायुती सरकारची गोची होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीच्या हातात आयतं कोलीत सापडलं आहे.

दरम्यान, येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटल आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हि योजना म्हणजे महायुती सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक मानला जातोय. राज्यभरातील महिलांना सुद्धा हे पैसे कधी एकदा जमा होतात याची आतुरता लागली आहे.

BSNL | BSNLलवकरच सुरू करणार 4G-5G USIM सेवा; कोणत्याही समस्येशिवाय होणार सिम पोर्ट

BSNL

BSNL | सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरात वाढ केलेली आहे. त्यामुळे अनेक युजर्स हे आता बीएसएनएल कडे धाव घेताना दिसत आहे. बीएसएनएलने (BSNL) या वर्षभरात 4G आणि 5G युनिव्हर्सल सिम प्लॅटफॉर्मचे देखील घोषणा केलेली आहे. या संदर्भात दूरसंचार विभागाने असे म्हटलेले आहे की, लवकरच 4G आणि 5G रेड युनिव्हर्सल सिम आणि ओव्हर द इयर लॉन्च केले जाणार आहे. त्यामुळे आता बीएसएनएलच्या सेवेचा फायदा भारतातील लोकांना होणार आहे. आणि एक चांगली कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे.

या प्लॅटफॉर्मसह, वापरकर्त्यांना प्रादेशिक निर्बंधांशिवाय सिम कार्ड स्वॅप करण्याची सुविधा मिळते. म्हणजेच वापरकर्ता हे सिम कुठेही सक्रिय करू शकेल. टेलिकम्युनिकेशन डेव्हलपमेंट फर्म पायरो होल्डिंग्सने हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे.

दूरसंचार विभागाने त्यांच्या अधिकृत X हँडलमध्ये या सेवेची माहिती दिली आहे. विभागाचे म्हणणे आहे की 4G आणि 5G सेवा सुरू झाल्यानंतर, वापरकर्त्यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय मोबाइल नंबर आणि सिम बदलण्याची सुविधा मिळेल.

BSNL ने देखील आपल्या अधिकृत X हँडलद्वारे या प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली आहे. BSNL ने माहिती दिली की या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन चंदीगडमध्ये करण्यात आले आणि तिरुचिरापल्ली/त्रिची, तमिळनाडू येथे त्रिची येथे आपत्ती पुनर्प्राप्ती साइटची स्थापना करण्यात आली.

कव्हरेज चांगले होईल, नेटवर्क जलद होईल | BSNL

या प्लॅटफॉर्मबद्दल असा दावा केला जात आहे की संपूर्ण भारतातील नेटवर्कचा वेग वेगवान असेल आणि कव्हरेज अधिक चांगले असेल. याशिवाय, हा प्लॅटफॉर्म नंबर पोर्टेबिलिटी आणि सिम स्वॅपिंग देखील सुलभ करेल.

Bullet Train : आरबी समुद्राखालून 320 किमीच्या स्पीडने धावणार बुलेट ट्रेन ; मुंबईत तीन ठिकाणी खोदकाम

bullet train mumbai

Bullet Train : भारतामध्ये अनेक मोठमोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातही बुलेट ट्रेन , अंडरवॉटर मेट्रो अशा विविध घटकांचा समावेश आहे. भारतात मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन कडून 508 ​​किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर बांधला जात आहे. या कॉरिडॉरचा 21 किलोमीटरचा भाग भूमिगत असेल. विशेष म्हणजे हा बोगदा जमिनीखालील भागातच समुद्राखालून बांधला जात आहे. अरबी समुद्राखालील हा सात किलोमीटर लांबीचा बोगदा भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे (Bullet Train) बोगदा असेल.

समुद्राच्या खालीही 320 किमीचे स्पीड (Bullet Train)

या बोगद्याची खोली 25 ते 65 मीटर असेल. बोगद्याच्या बांधकामासाठी तीन ‘जायंट’ मशिन्स वापरण्यात येणार आहेत. ही यंत्रे कामाला लावण्यासाठी घणसोली, शिळफाटा आणि विक्रोळी येथे खोदकाम सुरू आहे. पहिले टनेल बोरिंग मशीन (TBM) या वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या 21 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मार्गाच्या उभारणीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः, समुद्राच्या खाली 7 किलोमीटर भागात. येथे समुद्र केवळ खडतर आव्हानच उभे करणार नाही, तर अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल. समुद्राखाली बांधण्यात येणारा हा बोगदा सिंगल ट्यूब बोगदा असेल. यामध्ये बुलेट ट्रेनचे आगमन आणि झोन यासाठी दोन ट्रॅक टाकण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे समुद्राच्या खालीही बुलेट ट्रेन (Bullet Train) पूर्ण वेगाने म्हणजेच ताशी 320 किलोमीटर वेगाने धावेल.

महाकाय मशिन्सचा वापर (Bullet Train)

महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा हा 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जात आहे. ठाणे खाडीमध्ये (इंटरटाइडल झोन) समुद्राखाली ७ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. एकूण 21 किलोमीटरपैकी, 13.1 मीटर व्यासाचे कटर हेड बसवलेले बोरिंग बोरिंग मशीन 16 किलोमीटरचा भाग खोदण्यासाठी वापरला जाईल. मेट्रोसाठी बोगदा करण्यासाठी साधारणपणे 5-6 मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जाते. 16 किलोमीटर खोदकामासाठी तीन टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहेत. उर्वरित 5 किमीचा भाग न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे (NATM) खोदण्यात येणार आहे.

देशात प्रथमच समुद्राखाली बोगदा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे असे कोणतेही टनेल बोअरिंग मशिन अद्याप उपलब्ध नसून, आता वेगवेगळ्या देशांतून टीबीएमचे पार्ट्स आणले जात असून ते येथे असेंबल केले जाणार आहेत. त्यानंतर खोदाईचे काम सुरू होईल.

तीन ठिकाणी खोदकाम (Bullet Train)

बोगदा बांधण्यासाठी घणसोली, शिळफाटा आणि विक्रोळी या तीन ठिकाणी खोदकाम सुरू आहे. घणसोली येथे या वर्षाच्या अखेरीस पहिला टीबीएम बसविण्याचे नियोजन आहे. हे यंत्र ठाणे खाडीच्या दिशेने 39 मीटर खोल शाफ्टचे उत्खनन करतील . अभियंत्यांनी यापूर्वीच वांद्रे कुर्ला संकुलात 120 मीटर आणि शिळफाटा येथे 110 मीटरचे ब्लास्टिंग आणि उत्खनन पूर्ण केले (Bullet Train) आहे.

SAMEER Mumbai Bharti 2024 | SAMEER मुंबई अंतर्गत नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

SAMEER Mumbai Bharti 2024

SAMEER Mumbai Bharti 2024 | विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत कितीतरी तरुणांना झालेला आहे. आणि त्यांना एक चांगली अशी नोकरी देखील मिळालेली आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ज्या लोकांना मुंबईमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण SAMEER मुंबई (SAMEER Mumbai Bharti 2024 ) अंतर्गत एक मोठी भरती चालू होणार आहे. या भरती अंतर्गत पदवीधर डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदांच्या व्यक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 28 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजर राहावे. 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट रोजी ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | SAMEER Mumbai Bharti 2024

  • पदाचे नाव – पदवीधर डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या – 28 जागा
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – समीर आयआयटी बी कॅम्पस पवई मुंबई 400076
  • मुलाखतीची तारीख – 29 आणि 30 ऑगस्ट

पदसंख्या

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 20 जागा
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 8 जागा

वेतनश्रेणी | SAMEER Mumbai Bharti 2024

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी -10,500 रुपये
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 8500 रुपये

भरती प्रक्रिया

  • ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे.
  • त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
  • 29 आणि 30 ऑगस्ट रोजी ही मुलाखत घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीला जाण्याआधी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

Shaktipeeth Highway : महाराष्ट्र शासनाने अनेक रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. राज्य सरकारचा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे गोवा ते नागपूर ‘शक्तिपीठ महामार्ग’. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या राज्यामध्ये युद्ध पातळीवर सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) बाबत एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता शक्तिपीठ महामार्ग होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे दिली आहे. भूसंपादनासाठी निधी माझ्याच विभागाकडून जातो त्यामुळे मी निधी दिल्याशिवाय भूसंपादनाचा काम होणार नाही याबाबत मुंबईत गेल्यावर मी सविस्तरपणे माहिती घेईल. आवश्यकता असेल तर तुमच्या शिष्टमंडळाला बोलवेल (Shaktipeeth Highway) असंही पवार यांनी सांगितले.

एवढेच नाही तर कोल्हापूर दौऱ्यावर असताना शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी शिष्ट मंडळाने शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन चर्चाही केली आहे. शिवाय आपल्या मागण्यांचे निवेदनही (Shaktipeeth Highway) सादर केले आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे पाहायला मिळतंय. शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा अशी मागणी होत आहे. शिवाय मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे केवळ तोंडी स्थगिती देत असल्याचं सांगतात. पण दुसरीकडे शेतकऱ्यांना नोटीसा देत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

शेतकऱ्यांनी काळजी करू नये (Shaktipeeth Highway)

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की मी वेश बदलून दिल्लीला गेल्याच्या बातम्या चालल्या त्या खोट्या होत्या. तसंच ही पर्यावरण विभागाची बातमी ही खोटी आहे. शेतकऱ्यांना नोटिसा येत आहेत जर स्थगिती असेल तर नोटीसा का येतात? या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करता जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिफिकेशन दाखवलं. भूसंपादनाबाबत बोलताना पवार म्हणाले अर्थ खाते माझ्याकडे आहे. मी पैसे दिल्याशिवाय प्रकल्पच काय भूसंपादनही होऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं आश्वासन (Shaktipeeth Highway) अजित पवार यांनी दिला

शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे माझा देखील या शक्तीपीठ महामार्गाला ठाम विरोध आहे हा महामार्ग होणार नाही पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा कोणाकडे नाही असेही (Shaktipeeth Highway) त्यांनी म्हटले आहे.

… तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांच्या विधानाची जोरदार चर्चा

ajit pawar jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) … महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव…. राज्याच्या राजकारणात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा पराक्रम अजितदादांनी केला. मात्र मुख्यमंत्रीपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. क्षमता आणि कामाची तयारी असूनही मुख्यमंत्रीपदाची संधी अजूनही न मिळाल्याची सल अजित पवारांच्या मनात अजूनही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ती बोलूनही दाखवली… देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे माझ्यापेक्षा ज्युनिअर असून पुढे गेले आणि मी मात्र मागेच राहिलो असं दादांनी आपल्या भाषणात म्हंटल.. आता एकेकाळीचे अजित पवारांचे साथीदार आणि सध्याचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

माढा दौऱ्यावर असताना जयंत पाटलांना विचारण्यात आलं कि जर अजित पवार महाविकास आघाडीसोबत असते तर ते मुख्यमंत्री झाले असता का? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, हो, अजित पवार महाविकास आघाडीकडून नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. महाराष्ट्रात सध्या चांगलं वातावरण आहे. राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असं चित्र आहे. त्यामुळे अजित पवार महाविकास आघाडीसोबत असते तर त्यांना सोईची परिस्थिती निर्माण झाली असती,” असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. जयंत पाटील यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा कर्मयोगी’ या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्यावेळी अजित पवार यांनी म्हंटल होते कि, देवेन्द्रजी, जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो, तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी सगळा पक्षच घेऊन आलो असतो. जाऊद्या आता काय…शेवटी हा नशिबाचा भाग असतो. देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म १९९९ ला सुरू झाली, तर एकनाथ शिंदे यांची २००० ला सुरुवात झाली. यांच्यात सर्वांत सिनियर मी आहे, माझी सुरुवात १९९० मध्ये झाली. पण मी मागे राहिलो असं म्हणत अजित पवारांनी हसत हसत मनातील खंत बोलून दाखवली.

Pune Metro : रामवाडी- वाघोली, वनाझ -चांदणी चौक विस्तारासाठी महा मेट्रोची तयारी

Pune Metro : मागच्या काही दिवसांपासून पुण्यामधील मेट्रो ही पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेमधील महत्त्वपूर्ण भाग बनली आहे. पुणे मेट्रोला लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. असे असताना पुणे मेट्रोच्या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे.

महा मेट्रो रामवाडी ते वनाज आणि रामवाडी ते वाघोली या मार्गाचा विस्तार करण्याच्या योजनेसह पुढे जात आहे, 11 मार्च 2024 रोजी राज्यसरकारने या दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिली. आता या मेट्रो विस्ताराचा चेंडूं केंद्राच्या गोटात जाऊन पडला आहे. केंद्र सरकारने अद्याप या प्रकल्पाला मंजुरी दिलेली नाही. मंजुरी मिळताच याच्या बांधकामाला सुरुवात होईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे.

महामेट्रोने वनाझ ते चांदणी चौक मार्गावरील दोन स्थानकांसाठी आणि रामवाडी ते वाघोली विस्तारातील 11 उन्नत स्टेशन्ससाठी तपशीलवार डिझाईनच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. वनाझ ते चांदणी चौक विस्तार 1.12 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये दोन स्थानक कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक यांचाही समावेश आहे.

7 ऑगस्ट 2024 रोजी महा मेट्रोने निविदा काढल्या आहेत. मेट्रो स्थानांसाठी सल्लागाराची नियुक्ती ही केली आहे. रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक विस्ताराच्या खांब डिझाईनच्या कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. रामवाडी ते वाघोली हा भाग 11.36 किलोमीटरचा आहे. यामध्ये विमान नगर खराडी बायपास आणि वाघोली या सह 11स्थानक आहेत एकत्रितपणे हा विस्तार एकूण 13 स्टेशन सह 12.75 किलोमीटर परिसर काबीज करणार आहे या प्रकल्पाचे अंदाजे किंमत 3756.58 कोटी इतकी आहे.

कोणाला होणार फायदा ?

या दोन्ही प्रकल्पांमुळे अहमदनगर रोडवरील रहिवाशांना फायदा होणार आहे. तसेच या भागात काही आयटी पार्क सुद्धा आहेत जसे की इऑन आयटी पार्क आणि मगरपट्टा सिटी त्यामुळे या भागामध्ये नोकरदार वर्गाची रस्त्यांवर मोठी गर्दी असते. विशेषतः ऑफिसच्या वेळेमध्ये इथे ट्रॅफिक जॅम ची समस्या निर्माण होते. तासंतास ट्रॅफिक जाम असते. मात्र जर ही मार्गिका सुरू झाली तर आयटीयन्सना , शिक्षण घेणाऱ्यांना आणि नोकरदार वर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय ट्रॅफिक पासून सुटकाही मिळणार आहे. याबाबत माहिती देताना मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की वनाज ते रामवाडी मार्गिका विस्तार प्रकल्पामुळे अहमदनगर रोडवरच्या रहिवाशांना फायदा होईल. आयटी कंपन्या आर्थिक आणि शैक्षणिक संस्थांचा प्रवेश वाढेल असे ते म्हणाले.

Realme C63 5G मोबाईल स्वस्तात लाँच; किंमत 10000 रुपयांपेक्षा कमी

Realme C63 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी पैशात आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वस्त मोबाईल साठी प्रसिद्ध असणाऱ्या रिअलमी कंपनीने Realme C63 5G नावाचा नवा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईलची सुरुवातीची किंमत 10999 रुपयांपासून सुरु होते. किंमत जरी कमी असली तरी यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. येत्या 20 ऑगस्ट रोजी realme.com आणि Flipkart वर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…..

डिस्प्ले – Realme C63 5G

Realme C63 5G मध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1604 x 720 पिक्सल रिझोल्युशन आणि 625 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने यामध्ये मीडियाटेक डायमेंशन 6300 प्रोसेसर बसवला असून यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. तुम्ही SD कार्डने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवू शकाल. रिअलमीचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित realme UI 5.0 वर काम करतो.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 32MP मुख्य कॅमेरा LED Flash सह येतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनला IP 64 रेटिंग देण्यात आले आहे म्हणजेच धूळ आणि पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करू शकतो.

किंमत

realme C63 5G च्या . 4GB+128GB मॉडेलची किंमत 10999 रुपये, 6GB + 128GB मॉडेलची किंमत 11999 रुपये आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत 12999 रुपये आहे. या सर्व मोबाईल वर 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. हिरव्या आणि सोनेरी रंगात हा मोबाईल उपलब्ध असून 20 ऑगस्ट रोजी realme.com आणि Flipkart या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

जर्मनी देशात बांधतीये वैशिष्ट्यपूर्ण महाकाय विहीर? जाणून घ्या फायदे

Garmany

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल हवामानामध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून भूगर्भातील पाणी पातळीवर याचा खूप परिणाम होत आहे. आणि भूगर्भातील पाणी पातळी देखील कमी कमी होत चाललेली आहे. आपल्या रोजच्या वापरातील गोड पाण्याच्या पातळीत घट होताना दिसत आहे. पृथ्वीवरचे हे पाणी जर संपले, तर मानव आणि प्राणी यांना जगण्यास खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यांच्या अस्तित्व नष्ट व्हायला जास्त वेळ देखील लागणार नाही. जर्मनी या सगळ्या गोष्टींवर नेहमीच काही ना काही प्रयत्न करत असते. अशातच आता जर्मनी या देशाने त्यांच्या देशात एका महाकाय विहिरी खोदण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु या विहिरीत भारतातील विहिरींप्रमाणे नाही. त्या एका टाकीप्रमाणे दिसतात. एवढेच नाही तर त्यावर चांगली प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य देखील बनवणार आहेत.

भारताप्रमाणे जर्मनीतील बर्लिन या ठिकाणी देखील नेहमीच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. उन्हाळ्याच्या दिवसात येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या देखील निर्माण होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता प्रशासनाने मोठ्या विहिरींचे बांधकाम सुरू करण्यास सुरुवात केलेली आहे. जर असे केले तरच पावसाच्या पाण्याद्वारे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल असे देखील तज्ञांचे मत आहे.

जर्मनीतील या विहिरीत भारतातील सामान्य विहिरींपेक्षा खूप वेगळे आहेत. त्या एका टाकी प्रमाणे आहेत. यामुळे तुम्ही पाणी साठवून ठेवू शकता आणि त्यात आपोआप प्रक्रिया केली जाईल. आणि ते पाणी पिणे योग्य होईल. 2026 पर्यंत जर्मनीचे सर्वात मोठे खोरे निर्माण होईल. यामध्ये जवळपास 17 हजार घनमीटर एवढे पाणी देखील जमा होऊ शकते.

भारतामध्ये कधी अतिवृष्टी होते तर कधी अगदीच दुष्काळ पडतो. जर कोरडा दुष्काळ पडला तर उन्हाळ्यामध्ये तसेच इतर ऋतूंमध्ये देखील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी तुम्ही पाणी साठवून ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत देखील वाढ होईल. आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील निर्माण होणार नाही. भारत सरकारने देखील अशा काही प्रकारच्या गोष्टी सुरू केल्या, तर भारतातील भूगर्भ पाणी पातळीत नक्कीच वाढ होईल

शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार; म्हणाले, कारण नसताना माझं नाव का घेतलं?

sharad pawar raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यातील वातावरण दूषित करताय, शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता पवारांनी (Sharad Pawar) आपल्या शैलीत राज ठाकरेंवर (Raj Thackeray) पलटवार केला आहे. राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला माहीत नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही, संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखतो असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला कळलेले नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही. मला माझा महाराष्ट्र ओळखतो. माझी अशी पार्श्वभूमी नाही, मी कधीही आग्रह केलेला नाही करणार नाही. त्यांनी कारण नसताना माझे नाव घेतले आहे. आज मी पण संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. माझ्या पण गाड्या अडवल्या जात आहेत. आता हे पण पवारांनी सांगितलय का मला अडवा… असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच मणिपूरबाबत मी जे काही बोललो त्यातहातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो. मी बोललो हे हातभाराचे लक्षण आहे की सौजन्याचे लक्षण आहे? असा प्रतिसवाल शरद पवारांनी केला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी म्हंटल होते कि, मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत आहेत. आज आपण बघतोय कि जातीच्या आधारवर आरक्षण देण्याची मागणी होतीये आणि यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा हात आहे. शरद पवार म्हणतात कि महाराष्ट्राचा मणिपूर होईल म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे ते समजतंय. हे जे काही सुरु आहे ते सर्व विधानसभेसाठी सुरू आहे. जरांगेच्या मागून मते मिळवण्यासाठी या लोकांचे प्रयत्न आहेत. पुढच्या तीन महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्लॅन आहे. पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी सुरू केली, तेव्हापासुन जाती- जातीमध्ये द्वेष निर्माण झाला. शरद पवारांनी आरक्षणासाठी मोदींकडे शब्द का टाकला नाही? असा सवाल करत राज ठाकरेंनी पवारांना आपलं लक्ष्य केलं होते.