Monday, December 22, 2025
Home Blog Page 535

राज्यात ठाकरे सरकार येताच लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांत भरगोस वाढ होईल

uddhav tahckeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे महिलावर्गत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सरकारमधीलच आमदार रवी राणा आणि महेश शिंदे यांनी मात्र आम्हाला आशीर्वाद नाही दिला तर तुमचे १५०० रुपये काढून घेऊन असा दम महिलांना दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. यावरून शिवसेना ठाकने सामना अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला आहे. तसेच निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे सरकार आलं तर लाडक्या बहिणींच्या १५०० रुपयांत भरगोस वाढ होईल अशी ग्वाहीही दिली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

पैशांचा वापर करून मते विकत घेण्याचा फंडा म्हणून राज्य सरकारने आता ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. बहिणींच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये सरकारी तिजोरीतून जातील व त्या बदल्यात या बहिणींनी घटनाबाहय सरकारला मते द्यावीत असे एकंदरीत नियोजन आहे. म्हणजे सरकारी पैशांनी मते विकत घेण्याची ही योजना आहे. हे आम्ही म्हणत नसून सरकार पक्षाचे आमदार व नेतेच तसे वक्तव्य करून लाडक्या बहिणींना धमक्या देऊ लागले आहेत. सरकारचे एक लोचट मजनू आमदार रवी राणा यांनी अमरावतीत जाहीर केले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत मलाच मते द्या, नाहीतर तुमच्या खात्यातून ‘लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये काढून घेईन. ही धमकीच म्हणायला हवी. भाजपची लाडकी बहीण व रवी भाऊची लाडकी पत्नी नवनीत राणा यांचा दारुण पराभव अमरावतीच्या सुजाण जनतेने केल्यापासून राणा महाशयांचा तोल सुटला आहे व ते मतदारसंघातील बहिणींना धमक्या देऊ लागले आहेत. राणांपाठोपाठ मिंधे गटाचे एक आमदार महेश शिंद यांनीही असेच फूत्कार सोडले आहेत. “विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केले तर ‘लाडकी बहीण’ योजनेतून नाव वगळून टाकू, अशी धमकी या महाशयांनी दिली आहे.

वास्तविक पैसा सरकारचा, योजना सरकारची आहे. पुन्हा हा सरकारी पैसा काही मुख्यमंत्री महोदयांच्या खिशातून आलेला नाही. त्यामुळे या सरकारी योजनेचा लाभ बहिणींनी घ्यायला हवा, पण पैशांच्या बदल्यात मत हवे असा फूत्कार सरकार पक्षाचे लोक सोडत आहेत. फक्त रवी राणाच नव्हे, तर सत्ताधारी पक्षांचे अनेक आमदार, मंत्री, पदाधिकारी याच सुरात बोलत आहेत. ही बाब निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. राज्यातील भगिनींनी सध्या हे 1500 रुपये जरूर घ्यावेत, मात्र राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच या 1500 मध्ये भरघोस वाढ होईल याची खात्री बाळगा. रवी राणा यांच्यासारखे सरकारी लोचट मजनू लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे काढून घेण्याची भाषा करतात हा समस्त लाडक्या बहिणींचा अपमान आहे. हा पैसा यांच्या बापजाद्यांचा आहे काय किंवा सरकारी लुटीतला आहे काय? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

मिथ्यांचे राज्य हे पेशांचे राज्य आहे. पेशांतून आलेले राज्य हे बदफैलींचे राज्य असते. तसे नसते तर लाडक्या बहिणींचा असा अपमान झाला नसता. एकीकडे बहीण म्हणून दरमहा 1500 रुपये देण्याच्या बतावण्या सरकार करीत आहे आणि दुसरीकडे आम्हाला मत दिले नाही तर हे पैसे तुमच्या खात्यातून काढून घेऊ, ‘लाडकी बहीण’ योजनेतून नाव वगळू अशा जाहीर धमक्या सत्तापक्षातील लोचट मजनू [देत आहेत. मिधे सरकारची खरी ‘नियत’च त्यामुळे चव्हाटय़ावर आली आहे. राज्यातील समस्त भगिनी या अपमानाचा योग्य बदला योग्य वेळी घेतील, याविषयी आमच्या तरी मनात शंका नाही! असं म्हणत सामनातून सरकारवर निशाणा साधला आहे.

Beauty Tips : माथ्यावरचे केस झालेत पांढरे ? केसांना डाय न लावता अशा पद्धतीने करा काळे

Beauty Tips : बदलती जीवनशैली, बदलता आहार, प्रदूषण अशा काही घटकांमुळे केस पांढरे होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातही अकाली केस पांढरे होण्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत (Beauty Tips) असतीलच . अगदी शाळेला जाणारी मुला – मुलींचे सुद्धा आता केस पांढरे होताना दिसत आहेत.

पांढऱ्या केसांमुळे वय जास्त दिसू लागते. परिणामी आत्मविश्वास कमी होतो. मग आपोआपच अनेक लोक हे हेअर डाय ,केमिकल युक्त डायच्या आहारी जातात. पण हे केमिकल युक्त डाय आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी ही हानिकारक असतात. म्हणूनच आम्ही आजच्या लेखांमध्ये असे काही हेअर पॅक तुम्हाला सांगणार आहोत जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. शिवाय हे हेअरमास्क लावण्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. शिवाय नैसर्गिकरीत्या केस काळे होण्यास मदत होणार आहे चला तर मग (Beauty Tips) जाणून घेऊया…

भृंगराज आणि नारळाचं तेल (Beauty Tips)

  • नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की एकलिप्त अल्वा म्हणजे भृंगराज केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो.
  • हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये भृंगराज पावडर घाला.
  • त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून थंड करून घ्या
  • नंतर हे मिश्रण गाळून एका बाटलीमध्ये भरा.
  • आता हे मिश्रण तुम्हाला केस आणि स्कॅल्प वर लावायचा आहे.
  • सकाळी उठल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. भृंगराज केसांना नैसर्गिक रंग देतो आणि नारळाचा तेल केसांमधील प्रोटीन वाढवतात. त्यामुळे केस पांढरे होण्याच्या समस्या पासून सुटका मिळेल.

आवळा आणि मेथी (Beauty Tips)

आवळ्यामध्ये विटामिन सी असते जे केसांच्या मेलॅनिनचे उत्पादन वाढवते. मेथीच्या बियांमध्ये अमिनो ऍसिड असतात. ज्यामुळे पांढरे केस रोखण्यास मदत होते.

  • आवळा आणि मेथी असलेला हेअरमास्क बनवण्यासाठी एका कढईमध्ये ऑलिव्ह ऑइल व्यवस्थित गरम करून घ्या.
  • त्यामध्ये मेथी आणि आवळा यांची पावडर घालून मिक्स करून घ्या
  • हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये भरा
  • हे मिश्रण केसांना रात्रभर तसेच राहू द्या
  • आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शाम्पू न हेअर वॉश (Beauty Tips) करून घ्या.

Kitchen Tips : फ्रिजचा रबर झालाय चिकट आणि काळाकुट्ट ; अशा पद्धतीने करा चकाचक

Kitchen Tips : फ्रिज म्हणजे रोजच्या वापरातील महत्वाची वस्तू आहे. आपण फ्रीजचा वापर दररोज करतो. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी फ्रिजची भूमिका महत्वाची आहे. आपण बऱ्याचदा फ्रिज आतून व्यवस्थित आणि वारंवार साफ करतो मात्र फ्रिजचा रबर तितका स्वच्छ केला जात नाही. त्यामुळे कालांतराने फ्रीजचा रबर कला पडतो. अनेकदा चिकट होऊन त्यावर बुरशी देखील चढते. म्हणूनच आम्ही (Kitchen Tips) आजच्या लेखामध्ये फ्रीजचा रबर साफ करण्याचा एक फंडा सांगणार आहोत चला तर मी जाणून घेऊया…

फ्रीज च्या आत मध्ये तापमान ज्या पद्धतीने सेट केलेले असते त्या पद्धतीने ते टिकवण्याचे काम हे फ्रीच्या असलेल्या डोअर वरच्या रबरचं असतं. त्यामुळे हे रबर साफ करताना अगदी काळजीपूर्वक आणि हळुवार करावे (Kitchen Tips) लागेल.

  • फ्रिजचे रबर साफ करत असताना सगळ्यात आधी फ्रीजचा मेन स्विच बंद करून घ्या.
  • त्यानंतर एका वाटीमध्ये लिक्विड डिश वॉश, विनेगर आणि बेकिंग सोडा (Kitchen Tips) हे तीन पदार्थ टाका
  • फ्रिज चा रबर आधी पाणी लावून थोडं ओलसर करून घ्या.
  • त्यानंतर आपण वाटीमध्ये तयार केलेला मिश्रण त्यावर टाका आणि तीन ते चार मिनिटे हे मिश्रण तसंच राहू द्या
  • त्यानंतर आपल्याला वायरची घासणी घ्यायची आहे आणि हे रबर हलक्या हाताने घासून घ्या. तारेचा चोथा अजिबात वापरू नका. नाहीतर रबरला चरे पडू शकतात.
  • आता पुन्हा एकदा त्यावर पाणी शिंपडा आणि रबर मऊ कापडाने (Kitchen Tips) व्यवस्थित पुसून घ्या

Central Railway : खशखबर ! सुट्ट्यांच्या काळात नागपूर -मुंबई ,नागपूर- पुणे मार्गावर धावणार विशेष रेल्वेगाड्या

Central Railway : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर लागोपाठ सणांची रेलचेल सुरू होते. भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट आणि त्यानंतर 18 ऑगस्टला रविवार असून 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्यामुळे लागून सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण प्रवासासाठी निघतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे खात्याकडून जादाच्या गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते आणि ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रेल्वेकडून पुरेपूर प्रयत्न केला जात असून विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे कडून घेण्यात आला आहे. या गाड्या नेमक्या कोणत्या आहेत आणि कोणत्या मार्गावरून कधीपर्यंत धावणार आहेत (Central Railway) चला पाहूयात…

रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर- मुंबई आणि नागपूर- पुणे या मार्गांवरून विशेष रेल्वे धावणार आहेत. या दोन्ही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक काय आहे आता पाहूयात

मुंबई- नागपूर विशेष रेल्वे (Central Railway)

या गाडीच्या दोन फेऱ्या धावणार असून विशेष गाडी क्रमांक 0 2 1 3 9 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईतून 15 ऑगस्ट रोजी 25 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 15 वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक 02140 नागपूर इथून 16 ऑगस्ट रोजी 13 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. तर या गाडीमध्ये एक वातानुकुळीत प्रथम तीन वातानुकूलित द्वितीय 15 वातानुकूलित तृतीय आणि दोन जनरेटर व्हॅन (Central Railway) राहतील.

या स्थानकांचा समावेश

या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक ,मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला ,मुर्तीजापुर, बडनेरा, धामणगाव, आणि वर्धा असे थांबे असणार आहेत.

नागपूर- पुणे विशेष गाडी (Central Railway)

नागपूर -पुणे विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार असून गाडी क्रमांक 0 2 1 4 4 नागपुरातून 14 आणि 16 ऑगस्ट रोजी 19 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 11:35 वाजता पोहोचणार आहे. तर विशेष गाडी क्रमांक 02143 पुणे येथून 15 आणि 17 ऑगस्ट रोजी 16 वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सहा वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला 14 वातानुकूलित तृतीय आणि दोन जनरेटर व्हॅन अशी रचना राहील. तरी प्रवाशांनी या दोन्ही गाड्यांचा लाभ घ्यावा असा आवाहन रेल्वे खात्याकडून करण्यात आला आहे.

या स्थानकांचा समावेश

या गाडीसाठी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरळी या स्थानावर थांबे घेणार (Central Railway) आहेत.

वजन कमी करण्यासाठी गूळ आणि मध आहे फायद्याची; आहार तज्ज्ञांनी दिली माहिती

Jaggery And Honey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांचे जीवनशैली बदलल्याने त्यांचे वजन देखील झपाट्याने वाढत आहे. आणि या झपाट्याने वाढणाऱ्या वजनामुळे सगळे त्रस्त आहेत. हे वजन नक्की कसे कमी करायचे? याबद्दल सगळेच रोज नवीन उपाय शोधत आहेत. परंतु खराब जीवनशैली, अपुरी झोप, आहारात बदल, फास्ट फूडचे वाढते प्रमाण यामुळे लठ्ठपणा वाढलेला आहे. लठ्ठपणा वाढला की, लठ्ठपणासोबत रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार देखील येतात. अनेकवेळा लोक वजन कमी करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये बदल करतात. ते त्यांच्या जेवनातून चपाती, भात, गोड पदार्थ, तेलकट पदार्थ आणि मुख्य म्हणजे साखर बाजूला करतात. हे पदार्थ खाल्ले की वजन वाढते असे त्यांचा म्हणणे असते.

मधुमेह त्याचप्रमाणे लठ्ठ लोकांना आहारात साखर ऐवजी गूळ खाण्याचा सल्ला देतात. परंतु आरोग्यासाठी साखर आणि मध किती गुणकारी आहे? याने वजन कमी होते का हे आपण जाणून घेऊया.

मध खाण्याचे फायदे

आपल्याला जर नैसर्गिकरित्या गोड खायचे असेल, तर मध हा एक उत्तम पर्याय आहे. अनेकवेळा लोक वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध घालून पितात. मधामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असतात. जे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करतात. त्यामुळे मध खाणे हे आपल्या हृदयासाठी त्याचप्रमाणे त्वचेसाठी देखील चांगले मानले जाते.

गुळ खाण्याचे फायदे

नैसर्गिकरित्या गोड खाण्यासाठी गुळ हा देखील एक उत्तम पर्याय असतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गुळ हा एक उत्तम पर्याय आहे. गुळामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट आढळतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. आणि हिमोग्लोबिन देखील वाढते.

गुळ आणि मध खाण्याबद्दल आहार तज्ञाची ज्योती सिंग यांनी सांगितलेले आहे की, “वजन कमी करण्यासाठी दूध आणि गूळ हे दोन्ही देखील उत्तम पर्याय आहे दोन्हींमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आहे आणि नैसर्गिक स्वीटनर आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही साखरे ऐवजी गुळ किंवा मध खाऊ शकता. परंतु या दोन्ही गोष्टी देखील एका विशिष्ट प्रमाणातच खायला हव्यात. बऱ्याचदा यामध्ये भेसळ आढळून येते.

Gujrat Diomond Industry | गुजरात हिरे उद्योगात मोठी मंदी; पगार कपात झाल्याने 65 कर्मचाऱ्यांनी संपवले जीवन

Gujrat Diomond Industry

Gujrat Diomond Industry | सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अगदी गरिबांपासून ते सर्वसामान्य माणसांना देखील या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. शेतकरी असो किंवा मोठ्या फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार असो. सगळ्यांनाच या महागाईचा चटका बसत आहे. सध्या भारतामध्ये हिऱ्या उद्योगात देखील मंदी आल्याची पाहायला मिळत आहे. ही मंदी आल्याने अनेक कामगारांना कामावरून काढण्यात आलेले आहे. परंतु याच कामगारांनी अगदी टोकाचे पाऊल उचलून त्यांच्या आयुष्य संपवलेले आहे.

यादी डायमंड वर्कर्स युनियनने गुजरातने 15 जुलै रोजी एक सुसाईड हेल्पलाइन नंबर चालू केला होता. आणि त्या नंबर वर तब्बल 1600 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी कॉल केलेला आहे. हे कर्मचारी आर्थिक परिस्थितीशी झुंज देत असल्यामुळे त्यांनी या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्याचे देखील समोर आलेले आहे.

याबद्दल माहिती देताना डायमंड वर्कर्स युनियन गुजरातचे उपाध्यक्ष भावी स्टंप यांनी सांगितलेले आहे की, “सुरतमध्ये गेल्या 16 महिन्यांमध्ये तब्बल 65 हिरे कामगारांनी आत्महत्या केलेली आहे. अनेकांचे पगार कपात झाले होते. त्याचप्रमाणे आर्थिक मंदीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.” सुरत हे शहर प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. या ठिकाणी जगातील जवळपास 90% हिरे कापले जातात आणि पोलीस देखील केले जातात. या केंद्रामध्ये आतापर्यंत 15 लाख कर्मचारी काम करतात. त्यांनी 15 जुलै रोजी हा हेल्पलाइन नंबर चालू केला होता.

याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, “आत्तापर्यंत आम्हाला 1700 पेक्षा अधिक कॉल झालेले आहेत. त्यापैकी अनेकांनी आर्थिक तणावामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. तर बहुतेक येणारे कॉल हे बेरोजगार होते. त्यामुळे त्यांनाही रोजगार मिळण्याची चिंता असल्याने हे कॉल आलेले आहेत.”

याबाबत भावेश टंक म्हणाले की, “ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांपर्यंत कामकाज झाली आहे. ते लोक त्यांच्या मुलांच्या शाळेची फी, घर भाडे, घराचे मासिक हप्ते बाकीच्या सगळ्या गोष्टी भरण्यासाठी मदत मागत आहे. परंतु रशिया आणि इज्राइल गाझा यांचे युद्ध चालू असल्यामुळे प्रमुख बाजारपेठेतील चीनमधील कमकुवत मागणीमुळे अतिरिक्त पुरवठा झालेला आहे. त्यामुळे यावर्षी जवळपास 50 हजार कामगारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहे.”

SBI Amrut Vrushti FD | SBI ने आणली अमृत वृष्टी योजना; मिळणार सगळ्यात जास्त परतावा

SBI Amrut Vrushti FD

SBI Amrut Vrushti FD | महागाईच्या आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आजकाल बचत करणे खूप गरजेचे आहे. अनेकजण आपापल्या परीने दर महिन्याच्या उत्पन्नातील काही वाटा हे बचत करत असतात. सध्या मार्केटमध्ये याबद्दल अनेक योजना देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बँकांमध्ये देखील पैशांची गुंतवणूक करण्यासाठी देशातील मोठी बँक एसबीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी एक अशीच योजना आणलेली आहे. ही योजनेचे नाव अमृत वृष्टी एफडी योजना (SBI Amrut Vrushti FD) असे आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर खूप चांगला परतावा मिळू शकतो.

गेल्या अनेक वर्षांवर वर्षापासून लोकांना एफडी हा गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळे बहुसंख्येने गुंतवणूक करत असतात. परंतु प्रत्येक बँकेचा व्याजदर हा कमी जास्त असतो. आणि त्या व्याजदरानुसार अनेक लोक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जर चांगला व्याजदर असेल, तर गुंतवणूकदाराला देखील त्याचे चांगले फायदे मिळतात. अशाच स्टेट बँक ऑफ इंडियाची ही नवी अमृत वृष्टी योजना (SBI Amrut Vrushti FD) ही एक खूप महत्त्वाची आणि फायदेशीर योजना आहे.

अमृत वृष्टी एफडी योजना | SBI Amrut Vrushti FD
एसबीआयची अमृत वृष्टी योजना ही 444 दिवसांची योजना आहे. यामध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो. जर सामान्य नागरिकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केली, तर त्यांना वर्षाला 7.25 टक्के एवढा व्याजदर मिळतो. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांना या योजनेतून 7.75 टक्के एवढा व्याजदर मिळतो. या योजनेत तुम्हाला 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करता येईल. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त अशा अनेक बँक आहेत . ज्या नागरिकांसाठी खूप चांगला योजना घेऊन येत असतात. पंजाब नॅशनल बँक ही 400 दिवसांच्या एप्रिलच्या कालावधीवर जास्तीत जास्त सामान्य नागरिकांना 7.30% एवढे व्याजदर देते. तर जेष्ठ नागरिकांना 7.80% एवढे व्याजदर देते. त्याचप्रमाणे कॅनरा बँक एचआय४४ दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 7.25 टक्के एवढे व्याजदर मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर मिळते.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या 399 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 7.25 टक्के एवढे व्याजदर मिळते
ते ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर मिळते. त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदाच्या बॉम्ब मान्सून धमाका ठेव योजनेची मुदती 399 दिवसांची आहे. यामध्ये सर्व सामान्य नागरिकांना 7.25 टक्के व्याजदर मिळते. जेष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर मिळते.

Independence Day 2024 | या स्वातंत्र्यदिनी केवळ 25 रुपयात; घरबसल्या पोस्ट ऑफिसमधून ऑर्डर करा झेंडा

Independence Day 2024

Independence Day 2024 | यावर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. मोठ्या उत्साहाने या स्वातंत्र्य दिनाची (Independence Day 2024) तयारी देशभर होताना दिसत आहे. अगदी दोन दिवसावर आपला राष्ट्रीय सण आलेला आहे. त्यामुळे सर्वत्र देशात धामधूम चालू झालेली आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा होतो. सर्वत्र झेंडे लावले जातात. त्याचप्रमाणे तिरंग्याच्या रंगाचे फुगे तसेच इतर डेकोरेशन देखील अनेक ठिकाणी होत असते. आणि शाळा कॉलेजमध्ये फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. शाळेतील लहान मुलांना या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले जाते. आपल्या देशातील ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या कहाण्या देखील सांगितल्या जातात.

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावर जाऊन झेंडा फडकवतात. शाळा कॉलेजमध्ये संस्थांमध्ये झेंडा फडकवण्यासोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. या ठिकाणी देखील फडकवला जातो. यासोबतच अनेक भारतीय आपल्या घरावर देखील ध्वज फडकवतात रस्त्यावर अनेक लोक हातात झेंडा घेऊन रॅली काढताना दिसत असतात.

जर या वर्षी देखील तुम्ही तुमच्या घरावर तिरंगा फडकवण्याची खरेदी करणार असाल, तर आता तुम्ही घरबसल्याही खरेदी करू शकता. तुम्ही अगदी स्वस्तामध्ये पोस्ट ऑफिस कडून तिरंगा खरेदी करू शकता. पोस्ट ऑफिसने ही एक खास सुविधा आणलेली आहे. यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन घर बसल्या तिरंगा ऑर्डर करू शकता. तुम्हाला अगदी 25 रुपयांमध्ये घरपोच हा तिरंगा मिळवून जाईल. तुम्ही तुमच्या घरावर देखील तिरंगा लावू शकता.

Tourism : रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक

Tourism : महाराष्ट्रात अनेक अशी ठिकाण आहेत जी आजही इतिहासाची साक्ष देतात. मग गडकिल्ले आहेत लेण्या आहेत यामुळे महाराष्ट्र अधिक समृद्ध होतो. कोकणाला देखील असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोकण म्हटलं की सर्वात आधी समुद्रकिनारे आठवतात मात्र कोकणात अशी अनेक ठिकाण आहेत जी इतिहासाची आजही साक्ष देतात. अशाच ठिकाणांपैकी एक म्हणजे रत्नागिरी येथील कातळशिल्प…

कोकणातल्या अनेक भागांमध्ये मानवी संस्कृतीच्या पाऊल खुणा ठेवणारी कातळ शिल्प आजही आढळतात. कोकणातली ही कातळ शिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे त्यात आता आणखी एका कातळ शिल्पाची भर पडली आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देउड कातळ शिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. एवढेच नाही तर पर्यटन आणि संस्कृती कार्य विभागाने यासंदर्भात अधिसूचना देखील जारी केली आहे.

महाराष्ट्राच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या मार्फत कातळ शिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्यानंतर गतकातळ शिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

कुठे आढळले शिल्प ?

रत्नागिरी जिल्ह्यातल्या देउड इथं प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळ शिल्प आढळून आले होते. हे कोरलेले मध्याश्मयुगीन म्हणजेच जवळपास 20 हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या कातळावर एक शिंगी गेंडा, गाढव, वानर, हरीण आणि इतर पावलांचे ठसे रेखाटण्यात आले असून एकूण दहा बाय दहा चौरस फूट असे शंभर चौरस मीटर इतके आहे. या कातळ शिल्प परिसरातील 310 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

राज्यातल्या कातळ शिल्पांबद्दल सांगायचं झाल्यास महाराष्ट्र आणि गोव्याजवळ 900 km क्षेत्रावर ही कातळ शिल्प पसरलेली आहेत. फक्त रत्नागिरीतच 70 ठिकाणी दीड हजार हून अधिक अशा कलाकृती आहेत ज्यातलया सात कलाकृतींना युनिस्कोने संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली असून कोकणातील ही कातळ शिल्प अरबी समुद्र आणि लगतच्या सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास 170 किलोमीटर लांब आणि 25 किलोमीटर रुंद पट्ट्यामध्ये आढळले आहेत.

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024 | नागपूर महानगरपालिकेत अंतर्गत नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमी तुमच्यासाठी नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नागपूर महानगरपालिके (Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता नागपूर महानगरपालिके अंतर्गत एक मोठी भरती सुरू झालेली आहे. ही भरती प्रजनन तपासक या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 38 रिक्त जागा. आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत देखील आयोजित केलेली आहे. 13 ऑगस्ट रोजी ही मुलाखत होणार आहे. त्यामुळे दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

महत्वाची माहिती | Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024

  • पदाचे नाव – प्रजनन तपासक
  • पदसंख्या – 38 जागा
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा –18 ते 43 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख – 13 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास
  • वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष

भरती प्रक्रिया

  • ही भरती मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • मुलाखतीला हजर राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क दिले जाणार नाही.
  • मुलाखतीला हजर राहताना सगळ्या कागदपत्रांची प्रत घेऊन येणे गरजेचे आहे.
  • 13 ऑगस्ट ही मुलाखतीची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा