Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 540

उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नितीश कुमार पॅटर्न राबवू पाहतायत, पण गणित जमेना

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सूर्य पूर्वेला उगवो किंवा पश्चिमेला.. आपल्याला त्याची काही फिकीर नसते… युती होवो किंवा न होवो… विचारसरणी बिचारसरणी असल्या गोष्टींचा थेट कोल्या करत परमनंट मुख्यमंत्री कसं राहायचं? याची कला फक्त देशात कुणाला जमली तर ती नितीश कुमार यांना… नितीश कुमार उर्फ नितेश बाबू… कुठल्या पक्षासोबत आणि किती वेळा मुख्यमंत्री पदाच्या शपथा घेतल्या असतील ते त्यांचं त्यांनाच माहित… त्यात इंडिया आघाडीची पहिली बैठक बोलवणारे हेच नितीश बाबू भाजपात गेले… सत्तेतील वाटेकरी झाले.. अनेक मलाईदार खाती त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतली… पक्ष मोठा केला… आणि बिहारमधली आपली ताकदही मजबूत केली… हे सगळं सांगायचं कारण म्हणजे अगदी असाच काहीसा बिहारचा नितीश बाबू पॅटर्न महाराष्ट्रात राबवायचाय तो उद्धव ठाकरे यांना… तो कसा आणि कधी? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव साहेबांनी नुकताच दिल्ली दौरा केला… यात त्यांनी मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणू गोपाल, राहुल गांधी अशा काँग्रेस हाय कमांड मधील नेत्यांच्या झाडून बैठका घेतल्या…. मागण्या दोन होत्या.. पहिली विधानसभेला जास्त जागा मिळाव्यात… आणि दुसरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा… पण काँग्रेस हायकमांडने अगदी आत्मविश्वासाने आलेल्या उद्धव साहेबांच्या हाती काहीच लागू दिलं नाही… नितीश कुमार जसे मुख्यमंत्री पदाला चिकटून आहेत.. अगदी तसंच काहीसं जागावाटप, निवडणूक, निकाल असं सगळं होण्याच्या आधीच मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलीये… संजय राऊतांची सकाळ सकाळी येणारी स्टेटमेंट देखील हेच सांगतात… की उद्धव ठाकरेंना काही केल्या येणाऱ्या विधानसभेत मुख्यमंत्री व्हायचंय…

लोकसभेला काँग्रेसनं ठाकरेंसमोर नमतं घेतलं. त्यांचे सगळे हट्ट पुरवले. सांगलीसारखी पारंपारिक जागा सोडली. पण तरीही ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत सर्वात कमी स्ट्राईक रेटने रन ठाकरेंनी काढले… असा सगळा लोकसभेचा झालेला गेला बाजार इतिहास काँग्रेस हाय कमांडने ठाकरेंसमोर वाचून दाखवला… थोडक्यात ठाकरेंना बार्गेनिंग पॉवर करून जे मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यायचय… ते काही दिल्लीवारीत जमताना त्यांना दिसलं नाही… संजय राऊतांपासून ते शिवसेना ठाकरे गटातील सर्वच उत्सुक मंडळी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी उतावीळ आहेत… तसे अनेक स्टेटमेंट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही बोलून दाखवली… मुख्यमंत्र्याचा चेहरा डिक्लेअर करून मगच विधानसभा निवडणूक लढवाव्यात, या ठाकरेंच्या शिवसेनेची मागणीही काँग्रेस हायकमांडने रीतसर रित्या साईडलाईन केल्याचं बोललं जातय… काँग्रेसचं म्हणणं असं की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला तर भाजपच्या हाती आयतच कोलीत मिळेल… निवडणूक व्यक्तीकेंद्रीत होईल. त्याचा फटका आपल्या आघाडीलाच बसेल…

ज्याचे जास्त आमदार निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री हाच फॉर्मुला विधानसभेला पुढे कायम राहील, याचं जणू कन्फर्मेशनच काँग्रेसकडून मिळालय… थोडक्यात मोठा भाऊ छोटा भाऊ… असलं सगळं बाजूला सारून विधानसभेला जो चांगला परफॉर्मन्स करेल… जास्तीत जास्त आमदार निवडून आणेल… त्याचा मुख्यमंत्री असल्याने आता मुख्यमंत्रीपदाची घोषणा बैठकीत नाही तर निवडणुकीच्या रिंगणात होईल एवढं नक्की… नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलासोबत असोत वा भाजपसोबत, निवडणुकीआधीच ते मित्रपक्षांकडून मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करुन घेतात आणि आमदारांचा आकडा कितीही कमी असला तरी मुख्यमंत्रिपदी कायम राहतात. पण हा पॅटर्न ठाकरेंना जमलेला नाही….

बरं लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या ढीगभर चुका झाल्या… काँग्रेसनं सांगलीची जागा सोडली… पण तिथे काँग्रेसचा बंडखोर निवडून आला. तर ठाकरेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला… रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, संभाजीनगरसारख्या जागांवर शिवसेना कमी पडली. अनेक ठिकाणी उमेदवारांची निवड योग्य नव्हती, अशा चुकांचा पाढाच काँग्रेसच्या नेत्यांनी वाचल्याचं कळतं… त्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री होण्याइतपत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची साधी सोपी नाही… हेच जणू ठाकरे यांना यातून उमगल असावं…बॉटम लाईन काय तर ठाकरेंना महाराष्ट्राचे नितीश कुमार बनायचंय… अगदी राजकारण इकडचं तिकडं झालं तरीपण मुख्यमंत्री व्हायचंय… पण बिहार साठी हे सोपं असलं तरी महाराष्ट्राची गुंतागुंत पाहता इथे ठाकरेंना ते तंतोतंत लागू पडणार नाही… एकतर महाराष्ट्रात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित दादा आणि आता शिंदे आपापले सत्ता केंद्र बनवून आहेत… त्यामुळे नितीश कुमार यांच्यासारखं राजकारण करायला महाराष्ट्र काही बिहार नाही…. एवढं मात्र सांगावं लागत…

… तर भारताचाही झाला असता बांगलादेश; सरकारने कसे हाणून पाडले परकीय षडयंत्र? पहा द अनटोल्ड स्टोरी!

bangladesh violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांग्लादेशमध्ये अराजकता माजली आहे. हिंसाचार, जाळपोळीने संपूर्ण देश दहशतीखाली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही अजूनही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. वरवर जरी हा विषय आरक्षणाचा वाटत असला तरी यामध्ये कोणत्या तरी परीकय शक्तीचा हात असावा, त्याशिवाय इतकं मोठं आंदोलन पेटणार नाही असा अंदाज लावला जातोय. याबाबत किती खरं- खोटं ते येत्या दिवसात समोर येईलच. पण भारतावरही अशाच प्रकारे अनेकदा परकीय षडयंत्र रचलं गेलं, मात्र प्रत्येक वेळी केंद्रातील मोदी सरकारच्या कणखर भूमिकेमुळे हि षडयंत्र हाणून पाडण्यात देशाला यश आले… जाणून घेऊयात त्याचीच हि एक अनटोल्ड स्टोरी!……

देशाला अस्थिर करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या परकीय हस्तक्षेपांना रोखून भारताने बांगलादेशसारखी परिस्थिती यशस्वीपणे टाळली आहे. अनेकदा भारताविरुद्धही अशी षडयंत्र रचण्यात आली, आणि देशात अशांतता भडकवण्याच्या प्रयत्न काही परकीय शक्तींनी केला, मात्र भारत सरकारच्या सक्रिय उपाययोजनांमुळे या देशात लोकशाही मूल्ये जपली जातील आणि भारत हा एक सुरक्षित आश्रयस्थान राहील याची खात्री झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या एडीजी आणि भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती बांगलादेशातील भारतीय नागरिक, हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी बांगलादेशातील समकक्षांशी जवळून काम करेल. ही आव्हाने हाताळण्यात भारत यशस्वी ठरेल असा विश्वस तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

अभिजित अय्यर मित्रा, इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीज (IPCS) चे वरिष्ठ फेलो, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भारताचे मजबूत परराष्ट्र धोरण आणि विदेशी एनजीओ फंडिंगच्या कठोर नियमनाचे श्रेय देतात. ते अधोरेखित करतात की ओमिड्यार आणि हिंडेनबर्ग सारख्या ग्रुपने त्यांच्या निहित स्वार्थांसाठी भारतावर जाणीवपूर्वक टीका केली , परंतु सरकारच्या कठोर भूमिकेमुळे महत्त्वपूर्ण नुकसान होण्यापासून रोखले गेले आहे.प्रमित पाल चौधरी, परराष्ट्र धोरण आणि राजकीय अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ, यांनीही एक गोष्ट निदर्शनास आणली. त्या म्हणाल्या, बांगलादेशातील हिंदूंना 1971 पासून राजकीय आणि धार्मिक हेतूने अनेकदा हल्ल्याना सामोरे जावं लागलं. बांगलादेशातील हिंदूंना पद्धतशीरपणे लक्ष्य करणे आणि 1971 च्या नरसंहारादरम्यान पाकिस्तानी सैन्याने वापरलेले डावपेच यांच्यात त्यांनी साम्य दाखवलं. जिथे बंगाली बुद्धीजीवी वर्गाला जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले. या ऐतिहासिक तक्रारींमुळे बांगलादेशातील अलीकडील अशांततेने या प्रदेशातील अस्थिरतेत आणखी भर पडली आहे.

या आव्हानांना सहजतेने नॅव्हिगेट करण्याची भारताची क्षमता अलीकडच्या काही घटनांमधून दिसून आली. भारतात मागील वर्षी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोल पुकारलं होते. ग्रेटा थनबर्ग आणि रिहाना सारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही भारत सरकार स्थिर राहिले, मजबूत राहिले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक शक्ती म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करण्यास आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे यावर अनेकांची सहमती आहे.

Rohit Sharma : …. म्हणून मुंबई इंडियन्स रोहितला रिटेन करणारच; पहा 3 मोठी कारणे

Rohit Sharma Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे, मात्र त्याआधी काही खेळाडूंना रितें करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच संघ आपल्या महत्वाच्या खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. रिपोर्टनुसार, सर्व संघाना जवळपास ६ खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची मुभा मिळू शकते. असं झाल्यास आयपीएल मधील महाराष्ट्राची टीम मुंबई इंडियन्स नेमकं कोणकोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार आणि कोणाला रिलीज करणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईत रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह सारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. मात्र मागील आयपीएल हंगामात ज्याप्रकारे रोहित शर्माला मुंबईने कर्णधारपदावरून पायउतार केलं, ते पाहता रोहित पुन्हा मुंबईच्या जर्सीत दिसणार कि नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी ३ कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे मुंबईकरांचा लाडका रोहित पुन्हा एकदा निळ्या जर्सीतच पाहायला मिळू शकतो. कसे ते सविस्तर पाहुयात….

१) जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याची मुभा –

रिपोर्टनुसार, यंदाच्या आयपीएल मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय सर्व फ्रेंचायजीना आपल्या ६ खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते. असं झाल्यास रोहित शर्माचे रिटेन्शन नक्की मानलं जात आहे. मुंबईकडे हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह असे महत्वाचे खेळाडू आहेत. जर ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळाली तर मुंबई इंडियन्ससाठी हे सोप्प जाईल. भलेही रोहितने अतिरिक्त पैसे मागितले तरी मुंबई ते देऊ शकेल.

२) रोहितचा फॉर्म – Rohit Sharma

रोहित शर्मा हा सध्या तुफान फॉर्मात आहे. भलेही आज रोहित ३७ वर्षाचा असेल परंतु जस जस त्याच वय वाढतंय, तस तस त्याचा खेळ आणखी आक्रमक होत आहे. यंदाच्या T20 वर्ल्डकप मध्ये भारताकडून सार्वधिक धावा रोहित शर्मानेच काढल्या आहेत, ते सुद्धा आक्रमक खेळीने … नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका विरुद्धच्या सिरींजमध्येही रोहितची बॅट चांगलीच तळपली. मुंबई इंडियन्स साठीही रोहितने अनेकदा महत्वपूर्ण खेळी करत हरलेले सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे रोहितचा सध्याचा फॉर्म बघता मुंबई इंडियन्स त्याला रिलीज करण्याची चूक करणार नाही असं वाटतंय.

३) रोहित शर्माचा अनुभव –

यातील तिसरा आणि महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे रोहितचा (Rohit Sharma) अनुभव…. रोहित शर्माने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला तब्बल ५ वेळा चॅम्पियन केलं आहे. भलेही मागील वर्षी फ्रेंचायजीने रोहित ऐवजी हार्दिकला कर्णधार केलं, मात्र याचा उलट परिणाम संपूर्ण संघावर झाला आणि मुंबईचा संघ तळाला गेल्याचे पाहायला मिळालं. रोहित २०१३ पासून मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहे. त्यामुळे संघबांधणीपासून ते वानखेडे वरील पीच पर्यंतचा त्याचा अनुभव संघासाठी नक्कीच उपयुक्त पडेल यात शंका नाही. त्यामुळे ज्याप्रकारे वय वाढूनही चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंघ धोनीला संघात कायम ठेवते, त्याचप्रमाणे रोहितला सुद्धा मुंबई इंडियन्स संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटलांची रॅली आज पुण्यात; वाहतुकीतील बदल जाणून घ्याच

jarange patil in pune

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil In Pune( यांची शांतता रॅली कोल्हापूर, साताऱ्याहून आज पुण्यात येणार आहे. जरांगेच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीची सुरुवात होईल. पुणे हे तस महाराष्ट्रातील मोठं आणि गजबजलेलं शहर आहे, त्यामुळे जरांगे पाटलांच्या रॅली दरम्यान, पुण्यातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

कशी असेल जरांगे पाटलांची रॅली –

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सारसबाग परिसरातून सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात होणार आहे. हि रॅली टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रोड, झाशीची राणी चौक मार्गे फेरी काढण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती संभाजी पुतळा येथे फेरी संपणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काही रस्ते बंद करण्यात आलेत तर काही ठिकाणी प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. जरांगे पाटील यांची रॅली समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा बंद झालेले रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील.

हे रस्ते बंद –

गोखले स्मारक चौक ते नटराज चित्रपटगृह रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे.
काकासाहेब गाडगीळ पूल ते केळकर रस्ता वाहतुकीस बंद असणार आहे.
नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे.
टिळक चौक ते खंडोजीबाबा चौक वाहतूक बंद राहणार आहे.
नीलायम चित्रपटगृह ते सावरकर पुतळा चौक वाहतूक बंद राहणार आहे.
ना. सी. फडके चौक, सणस पुतळ्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद असेल.
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय ते पूरम चौक दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे.

पर्यायी रस्ते कोणते?

जेधे चौकातून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे, मित्रमंडळ चौक, सावरकर चौकमार्गे जाणार आहे.
सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गावरून जावं. वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्याकडे वळविण्यात येईल.
कोंढवा खडीमशीन चौक – जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटमार्गे जातील.
कात्रज चौकमार्गे फेरी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे जाणार आहे.

BSNL Recharge Plan : BSNL चा परवडणारा रिचार्ज प्लॅन!! 91 रुपयांत 60 दिवसांची व्हॅलिडिटी

BSNL Recharge Plan 91 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी टेलिकॉम कंपनी BSNL हि तिच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. त्यातच मागील महिन्यापासून जिओ, एअरटेल सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक ग्राहक बीएसएनएल (BSNL Recharge Plan) कडे वळत आहेत. कमी पैशात बीएसएनएल रिचार्ज उपलब्ध असल्याने ग्राहकांना ते चांगलंच परवडत आहे. तुम्ही सुद्धा BSNL चे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रीपेड रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत फक्त 91 रुपये असून ग्राहकांना २ महिने म्हणजेच तब्बल 60 दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. आज आपण या रिचार्ज प्लॅन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात….

काय फायदे मिळतात – BSNL Recharge Plan

तस बघितलं तर BSNL कडे ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. यामध्ये कमीत कमी दिवसापासून ते लॉंग टर्म प्लॅनचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला 91 रुपयांच्या ज्या प्लॅन बद्दल सांगणार आहोत त्या प्लॅनची खास बाब म्हणजे तुम्हाला तुमचे सिम कमी खर्चात जास्त दिवस ॲक्टिव्ह ठेवायचे असेल तर हा रिचार्ज तुम्हाला परवडेल. या प्लॅनमध्ये युजर्सना 60 दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. मात्र तुम्हाला कॉलिंग आणि डेटासाठी चार्जेस भरावे लागतील. कॉलिंग साठी तुम्हाला 15 पैसे प्रति मिनिट आणि 25 पैसे प्रति SMS द्यावे लागतील. याशिवाय, तुम्हाला इंटरनेटसाठी 1 पैसे प्रति MB दराने चार्जेस भरावे लागतील. (BSNL Recharge Plan)

बीएसएनएलचा 187 रुपयांचा प्लॅनही परवडतो

BSNL चा 187 रुपयांचा प्रीपेड प्लान सुद्धा ग्राहकांसाठी बेस्ट पर्याय मानला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB इंटरनेट डेटा वापरायला मिळतो. याशिवाय लोकांना अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळते. BSNL चा हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. जर आपण इतर टेलिकॉम कंपन्यांशी तुलना केली तर बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन अतिशय स्वस्त ठरतोय.

दरम्यान, ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL कडून देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती. तर मार्च 2025 पर्यंत आणखी हजार टॉवर बसवले जातील असं त्यांनी म्हंटल होते. म्हणजेच एकूण 1 लाख BSNL टॉवर देशात उभारले जातील. सध्या जरी BSNL 4G सेवा देत असली तरी कंपनी 5G इंटरनेटवर सुद्धा काम करत आहे. बीएसएनएलचे नवीन 5G सिमकार्डची झलक सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे येत्या काळात Jio-Airtel ला टक्कर देत BSNL जोरदार मुसंडी *BSNL Sim Card) मारण्याची शक्यता आहे.

Raksha Bandhan 2024 : राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता ? काय आहे या दिवसाचे महत्व ?

Raksha Bandhan 2024 : भारत हा जगभरात त्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृती साठी ओळखला जातो. भारतीय संस्कृती मध्ये सण आणि उत्सवाला खूप महत्व आहे. श्रावण महिना सुरु झाला की सणांची रीघ लागते. त्यातही भारतात भाऊ -बहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सुरु होतो. यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कधी आहे ? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे ? चला जाणून घेऊया …

रक्षाबंधन दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करते. हा पवित्र सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

रक्षा बंधन 2024 तारीख

यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी श्रावण पौर्णिमा आणि श्रावण सोमवारचा राखी उपवास यांचा अप्रतिम मेळ आहे. याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग यांचाही शुभ संयोग होईल.

मुहूर्त

रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 01.30 ते रात्री 09.08 पर्यंत राहील. रक्षाबंधनाचा दुपारचा मुहूर्त दुपारी 01:43 ते 04:20 पर्यंत असेल. तर रक्षाबंधनासाठी प्रदोष कालचा शुभ मुहूर्त 06:56 ते रात्री 09:08 पर्यंत असेल.

भावाला टिळक आणि अक्षता का लावले जाते

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी हातावर राखी बांधण्यापूर्वी भावाच्या कपाळावर टिळा आणि काही अक्षता लावतात. सनातन धर्मात तांदूळ हे अत्यंत पवित्र अन्न मानले जाते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार कच्चा तांदूळ टिळ्यामध्ये मिसळून कपाळावर लावल्यास शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे नकारात्मक शक्ती टिकत नाही.

रक्षाबंधनाशी संबंधित द्रौपदी आणि श्रीकृष्णाची कथा

रक्षाबंधन हा सण अगदी पौराणिक काळापासून साजरा केला जातो. असे म्हणतात की महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला होता. त्यामुळे त्याच्या बोटाला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.त्यानंतर श्रीकृष्णाचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा एक छोटा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटावर बांधला. त्यामुळे श्रीकृष्णाचा रक्तस्त्राव थांबला. ज्या दिवशी ही घटना घडली तो श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तेव्हापासून हा दिवस रक्षाबंधनाचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला.

PM Awas Yojana: मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 ला मान्यता

PM Awas Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक कोटी परवडणारी घरे बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेवर सरकार 2.30 लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे. या योजनेंतर्गत शहरी (PM Awas Yojana)भागात घरे बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करणार.

पहिल्या टप्प्यात 1.18 कोटी घरांना मंजुरी

प्रधानमंत्री आवास योजना-शहरीच्या पहिल्या टप्प्यात १.१८ कोटी घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 85.5 लाख घरे बांधण्यात आली आहेत. याशिवाय सरकार आता क्रेडिट रिस्क गॅरंटी फंड ट्रस्टमध्ये 3000 कोटी रुपये देणार आहे. यापूर्वी हा आकडा 1000 कोटी रुपये होता. या अंतर्गत, बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांना मदत केली जाते जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी घरे बांधण्यासाठी वित्तपुरवठा करू शकतील. हा निधी आता नॅशनल हाऊसिंग बँकेऐवजी नॅशनल क्रेडिट गॅरंटी कंपनीद्वारे व्यवस्थापित (PM Awas Yojana) केला जाईल.

EWS, LIG ​​आणि MIG ला लाभ मिळतील (PM Awas Yojana)

ज्या लोकांकडे अद्याप कायमस्वरूपी घर नाही ते या योजनेच्या कक्षेत येतील. 3 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांची गणना EWS श्रेणीत केली जाईल, 3 ते 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांची LIG श्रेणीत आणि 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांची MIG श्रेणीमध्ये गणना केली जाईल. जर तुमच्याकडे या योजनेअंतर्गत जमीन नसेल, तर तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशाकडून भूखंडही दिला जाईल. याशिवाय खासगी प्रकल्पांमध्ये घरे खरेदी करणाऱ्या लोकांना घरांचे व्हाउचर दिले जातील. यावेळी रेंटल हाऊसिंगचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला घर घ्यायचे नसेल किंवा बांधायचे नसेल तर ते भाड्याने घेण्याचाही पर्याय (PM Awas Yojana) असेल.

गृहकर्जावर 1.80 लाख रुपयांची सबसिडी

याशिवाय, या योजनेंतर्गत, EWS, LIG ​​आणि MIG श्रेणीतील लोकांना 35 लाख रुपयांपर्यंतच्या घरांसाठी 25 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेण्यावर व्याज अनुदान दिले जाईल. या योजनेत 1.80 लाख रुपयांचे अनुदान 5 वर्षांसाठी हप्त्यांमध्ये दिले (PM Awas Yojana) जाईल.

भरसभेत चक्कर, हात थरथरू लागले; साताऱ्यात जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

jarange patil in satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पश्चिम महाराष्ट्रातून शांतता रॅली काढत आहेत. आज त्यांनी रॅली कोल्हापुरातून राजधानी साताऱ्यात आली. मात्र यावेळी भरसभेत मनोज जरांगे पाटील याना चक्कर आली, तसेच त्यांचे हातही थरथर कापू लागले. कार्यकर्त्यांनी त्यांना पाणी दिले. जरांगे पाटील याना अशक्तपणा आल्यानंतर आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे.

आज अत्यंत जोशात आणि जयघोषात मनोज जरांगे पाटील यांची रॅली साताऱ्यात आली. मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जमले होते. हजारोंचा जनसमुदाय साताऱ्यात जमला होता. जरांगे पाटील नेमकं काय मार्गदर्शन करतात? मराठा समाजाला काय आवाहन करतात याकडे संपूर्ण सातारकरांची लक्ष्य लागलं होते. मात्र तत्पूर्वीच जरांगे पाटलांना स्टेजवरच चक्कर आली. अशक्तपणामुळे त्यांचे हात थरथर कापू लागले. स्टेजवरच ते मांडी घालून बसले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना पाणी दिले. प्रकृती खालावल्यानंतर जरांगे पाटील याना रुग्णालयात दाखल करण्यात येऊ शकते.

कराडमध्ये जल्लोषात स्वागत –

दरम्यान, आज दुपारी कोल्हापूरवरुन कराडमार्गे साताऱ्याकडे जात असताना जरांगे पाटील यांनी कराड येथील वारुंजी फाटा येथील पाटण तिकाटणे येथे मराठा बांधवांची भेट घेतली. यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने जेसीबीव्दारे फुलांचा वर्षाव करुन जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. कोणी कितीही हिणवलं तरी मी मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहे. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पक्ष सोडून आपल्या लेकरांसाठी एकजुटीने राहावे. मराठा एकत्रित नाही आला की संधीसाधू लोक एकत्र येतात. लोकांना बोलायला जागा ठेवू नका, मराठा एक होत नाही. आपल्याला लढून जिंकायचं आहे असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हंटल.

पुण्यात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटांची शक्यता ? पोलीस आयुक्तांच्या पत्राने खळबळ

मुंबईनंतर राज्यातलं सर्वात मोठं शहर असणारं पुणे आता हाय अलर्ट वर आलं आहे. पुण्यात एका बाजूला होणारे अपघात तर दुसऱ्या बाजूला पुण्याचं नाव आता गुन्हेगारी मुळे उजेडात आलं आहे. त्यातच आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या एका पत्रामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यात दहशतवाकडून बॉम्बस्फोटाची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे की एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा इशारा दिला. पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून पुणे शहरातल्या एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला हा धोक्याचा इशारा दिला आहे.

काय आहे पत्रात ?

हे हॉटेल पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात असून या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा अमर्यादित आवाज ठेवण्याबाबत , उशिरापर्यंत हॉटेल चालू ठेवणे आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा या हॉटेल बद्दल तक्रारी दाखल केलया आहेत. शिवाय या हॉटेल व्यवस्थापका कडून अनेकदा डिस्को थेक परवानातल्याअटीशर्थींचा भंग करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनीही वेळोवेळी या हॉटेल संदर्भात कारवाई केल्या आहेत परंतु यावर अनेकदा कानाडोळा केला जात असल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस पत्रातून करण्यात आला आहे.

दुर्घटना होण्याची शक्यता

कल्याणी नगर परिसरात असलेल्या या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आग, चेंगराचेंगरी, गॅस गळती, अफवा यासारखे घटना घडवून जीवित हानी होऊ शकते. तसेच सध्या अतिरेकी कारवायांबाबत अलर्ट आहेत. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे लक्ष करून बॉम्बस्फोटासारखे दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या हॉटेलचा डिस्को थेट परवाना रद्द का करण्यात येऊ नये ? असं या नोटीसद्वारे विचारणा केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या सहीने ही नोटीस असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त नितेश कुमार यांनीच ही शक्यता व्यक्त केल्याने पुणे पोलीस देखील अलर्ट मोडवर आहे. या हॉटेलमध्ये मोठी गर्दी होत असल्याच्या कारणाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो आहे. त्यामुळे जर एखादी मोठी घटना घडली तर त्यामुळे मोठी जीवित हानी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मनोज जरांगे गोधडीत होते, तेव्हा राणे साहेबांनी आरक्षण दिलं होतं; नितेश राणेंची जहरी टीका

nitesh rane on jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद उफाळून आला आहे. दोन्हीकडून एकमेकांवर टीकेचा भडीमार सुरु असतानाच आज नितेश राणे यांनी पुन्हा एकदा जरांगेवर जहरी टीका करत हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे गोधडीत होते तेव्हा राणे साहेबानी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं असं म्हणत मनोज जरांगे हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, मनोज जरांगेच्या दाढीवर आतां संशय यायला लागला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. EWS मधून जेव्हा पोलीस भरती निघाली, तेव्हा ९० टक्के लोक हे मुस्लीम समाजाचे होते. त्यामुळे मराठा समाज आणि महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हा आधुनिक महम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातोय. तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय की मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिमांची सेवा करताय याबाबत स्पष्टता येउदे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एका तरी मराठा तरुणाचा फायदा झाला का, याचा त्यांनी आम्हाला हिशोब द्या असं म्हणत नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलं.

नितेश राणे पुढे म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे गोधडीत असताना नारायण राणे साहेबानी आरक्षण मिळवून दाखवले आहे. त्यामुळे तू राणे साहेबाना, प्रवीण दरेकरांना, आम्हाला आव्हान देऊ नकोस, तुझ्या शाळेत राणे आणि दरेकर प्राध्यापक होते. तू आधी हे सांग की तू मराठ्यांचा आहेस की मुसलमानांचा आहेस? कारण तुझ्या दाढीवर आता आम्हाला संशय यायला लागला आहे, असा एकेरी उलेख करत नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर बोचरी टीका केली आहे.

संजय राऊतांवरही निशाणा –

दरम्यान, राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणारे फक्त शिवसैनिक नव्हते तर सर्वच पक्षाचे मराठा कार्यकर्त्ये होते अशी स्पष्टोक्ती खासदार संजय राऊत यांनी दिली होती, त्यावरूनही नितेश राणे यांनी टीका केली. आंदोलन करायला सांगायचे आणि मग पॅन्ट पिवळी झाली की ते आमचे नाहीत. हे फक्त राऊत आणि उद्धव ठाकरे करू शकतो. कुठलाही कडवट मराठा असे करणार नाही. त्यामुळे मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत संजय राऊत यांनी करू नये अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांचा समाचार घेतला.