Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 544

OnePlus Open Apex Edition : 16GB RAM सह OnePlus ने लाँच केला फोल्डिंग मोबाईल

OnePlus Open Apex Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी OnePlus ने भारतीय बाजारात फोल्डिंग मोबाईल लाँच केला आहे. OnePlus Open Apex Edition असं या नव्या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 16GB RAM सह अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. दिसायला सुद्धा हा मोबाईल अतिशय आकर्षक असून तरुणाईला उभा स्मार्टफोनची चांगलीच भुरळ पडेल हे नक्की… आज आपण या मोबाईलचा कॅमेरा, प्रोसेसर, डिस्प्ले, बॅटरी याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

7.82-इंचाचा डिस्प्ले –

OnePlus Open Apex Edition मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.82-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर कव्हरला सुद्धा 120Hz रिफ्रेश रेटसह 6.31 इंचाचा डिस्प्ले मिळतोय. हे दोन्ही डिस्प्ले 2800 Nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतात. मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर बसवण्यात आला असून वनप्लसचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Oxygen OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. त्यानुसार स्मार्टफोन मध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज देण्यात आलं आहे.

कॅमेरा – OnePlus Open Apex Edition

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OnePlus Open Apex Edition मध्ये पाठीमागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा, 64MP टेलिफोटो लेन्स आणि 48MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेराचा समावेश आहे, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 20MP आणि 32MP असे २ फ्रंट कॅमेरे उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईलमध्ये 4805mAh बॅटरी वापरली गेली आहे, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती ?

OnePlus Open Apex Edition हा स्मार्टफोन 16GB RAM आणि 1TB स्टोरेज या फक्त एकाच स्टोरेज व्हॅरियेण्ट मध्ये येतो. या व्हेरिएंटची किंमत 1,49,999 रुपये आहे. 10 ऑगस्टपासून या मोबाईलची विक्री सुरु होईल. ग्राहक वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर, ग्राहकांना मायक्रोसॉफ्ट 365 पर्सनल चे ३ महिने मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय कंपनी Jio पोस्टपेड प्लॅनसह 15 हजार रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे.

Viral Video | रीलसाठी वाहत्या पाण्यात तरुणाने मारली उडी; सोशल मीडियावर संताप व्यक्त

Viral Video

Viral Video | यावर्षी राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. दरवर्षीच्या पावसाचा रेकॉर्ड या वर्षीच्या पावसाने मोडलेले आहे. त्यामुळे अनेक विभागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पूर सदृश्य परिस्थिती देखील निर्माण झालेली होती. अशातच अनेक डोंगराळ ठिकाणी दरड देखील कोसळण्याच्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. यावर्षी आपण अशा अनेक बातम्या पाहिलेल्या आहे की, धबधब्यात पुराचा आनंद पाण्याचा आनंद घेताना अनेक लोकांना आपल्या जीव देखील गमवावा लागलेला आहे. याबाबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अशातच आता एक व्हिडिओ आणखी व्हायरल झालेला आहे. जो व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हीही थक्क व्हाल

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. यावेळी अनेक रील स्टार आणि तरुण मुलं ही पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरून रिल्स बनवताना दिसत आहे. अनेकजण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीच्या पाण्यात त्याचप्रमाणे धबधब्याखाली उड्या मारत आहेत. धबधब्यावर मज्जा मस्ती करत आहेत. परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करत आहे.

https://www.instagram.com/reel/C9xTRUAvL0e/?utm_source=ig_embed&ig_rid=4721230c-3112-4f26-a4a0-db9e84b17f0d

व्हिडिओमध्ये काय आहे ? | Viral Video

वायरल होणारे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गावातील ओढ्यामधील वाहत्या पाण्यामध्ये एक तरुण झाडाच्या ओडक्यावर बसून मजा करताना दिसत आहे. परंतु त्या तो वाहत्या पाण्यामध्ये उडी मारतो. त्यावेळी तो स्वतःच्या जीवाची अजिबात परवा करत नाही. अनेक जण त्या तरुणाचा व्हिडिओ काढत आहेत. त्याचप्रमाणे त्याला प्रोत्साहन देखील देत आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत 9 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज आलेले आहेत. अनेक लाइक देखील मिळालेले आहेत. त्याप्रमाणे अनेक लोक या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहे. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की, ‘बाहुबलीचा मोठा भाऊ” तर दुसरा युजरने लिहिलेले आहे की, “अंगातली मस्ती” अशाप्रकारे अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत

मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस- ठाकरे गटात मतभेत; पृथ्वीराजबाबा- संजय राऊतांची वेगवेगळी मते

sanjay raut prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुका अवघ्या २-३ महिन्यावर आल्या असताना राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) ऍक्शन मोड मध्ये आली आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन शरद पवार आणि गांधी कुटुंबीयांची भेट घेत आगामी विधानसभेबाबत सखोल चर्चा केली. मात्र जर सत्ता आली तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात मतभेत पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी २ वेगवेगळी विधाने केली आहेत. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. तसेच अजूनही मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत एकमत नाही काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा कोणीही एकदा चेहरा प्रोजेक्ट करत नाही. आम्हाला चेहऱ्याची गरज नाही, आम्ही महाविकास आघडीच्या जाहीरनाम्यावर विधानसभेची निवडणूक लढणार आहोत आणि सत्तेत आल्यानंतर आमचा जाहीरनामा पूर्ण करणार आहे. आपली परंपराच अशी आहे कि निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळते. मग ते मुख्यमंत्रीपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं ते त्या त्या पक्षातील नेते ठरवतात असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केली.

राऊतांचे पृथ्वीबाबाना प्रत्युत्तर-

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भूमिकेबाबत संजय राऊत याना विचारलं असता ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचे हे एखाद मत असू शकते. परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही दिल्लीत चर्चा केल्यात त्यात वेगळं काही ठरलेले असू शकते. पृथ्वीराज बाबा हे जेष्ठ नेते आहेत, पण राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा झाला असते तर अनेक जागांवर आपण भाजपचा पराभव करू शकलो असतो. त्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षांनाही असायला लागतो आणि चेहरा हा सत्ताधारी पक्षाला सुद्धा लागतो. उद्धव ठाकरे हेच चेहरा असावे असं मी म्हणत नाही. परंतु जेव्हा कोणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा देशात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे २ नेते सातत्याने मोदी- शाह यांच्याविरोधात आवाज उठवत राहिलेत. याची शिक्षाही आम्ही भोगली असं संजय राऊतांनी म्हंटल.

Almond Facepack | तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्याला लावा बदामाचा फेसपॅक; अशाप्रकारे करा तयार

Almond Facepack

Almond Facepack | ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात. अगदी मेंदूपासून ते स्किनपर्यंत ड्रायफ्रूट्स आपल्याला मदत करतात. ड्रायफ्रूट्समध्ये बदाम हा अत्यंत आरोग्यदायी मानला जातो. बदाम (Almond Facepack) आपल्या आरोग्यासाठी जेवढा फायदेशीर आहे. तेवढा आपल्या त्वचेलाही अनेक फायदे होतात. यामध्ये विटामिन ई प्रमाणात असतात ज्यामुळे आपली त्वचा अत्यंत मुलायम होते. आणि चमकते. त्याचबरोबर आपल्या त्वचेचा रंग देखील सुधारतो. परंतु या बदामाचा आपल्या चेहऱ्यावर नेमका कसा वापर करावा? या गोष्टीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेला चमक येईल.

जर तुमच्या देखील चेहऱ्यावर पिंपल्स असतील पिंपल्सचे डाग, त्याचप्रमाणे त्वचेचा पोत यांसारख्या समस्या असतील, तर तुम्ही बदाम आणि दुधाचा वापर करू शकता. यामुळे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स कमी होतात. आता या बदामाचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊया.

बदामाचा फेस पॅक | Almond Facepack

तुम्ही बदामाचा फेस पॅक तयार करून देखील चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी फेसपॅक बनवायला लागेल. नंतर तुम्ही एक छोटी वाटी बदाम घ्या त्यात पाणी घालून रात्रभर ते भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याची साल काढून किंवा सालीसकट तुम्ही मिक्सरच्या भांड्यात त्याची पेस्ट करून घ्या. पेस्ट करून झाल्यावर त्यात थोडंसं दूध घाला. अशाप्रकारे तुमचा बदामाचा फेस पॅक रेडी होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ घेऊन धुऊन घ्या. आणि बदामाची ती पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. अर्धा तास ती पेस्ट तशीच ठेवा. नंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यात काही वेळानंतर तुम्ही बदामाच्या तेलाने देखील चेहऱ्याची मालिश करू शकता.

बदामाच्या फेस पॅकचे फायदे

  • तुमची त्वचा जर अत्यंत कोरडी आणि निर्जीव झाली असेल, तर तुम्ही हा फेसपॅकचा वापर नक्की करा. यामुळे तुमची त्वचा अत्यंत मुलायम अशी होते.
  • त्याचप्रमाणे तुम्हाला जर डार्क सर्कल असतील, त्याचप्रमाणे चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग असतील तर हा फेस पॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग धब्बे तर दूर होतातच, तसेच तुमची त्वचा देखील चमकदार आणि एकदम सुंदर दिसते.

खिशात नाही दाणा, तरी मला बाजीराव म्हणा; सामनातून सरकारवर टीकास्त्र

mahayuti govt saamana editorial

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या खोकेबाज सरकारने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडवला आहे. 2021-22 या वर्षात दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सहाव्या क्रमांकावर गेला आहे. राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज आहे, तिजोरीत खडखडाट आहे या वास्तवाचे भान न राखता ‘खिशात नाही दाणा, तरी मला बाजीराव म्हणा, या थाटात खोकेबाज सरकार ‘अमुक लाडका’, तमुक लाडका ‘ घोषणा करीत सुटले आहे. मग कर्जमाफी योजनेतील ज्या शेतकऱ्यांची रक्कम 6 वर्षांपासून अडकून पडली आहे, ते शेतकरीच तेवढे सरकारच्या लाडाचे नाहीत काय? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून महायुती सरकारवर निशाणा साधला.

सामना अग्रलेखात काय म्हंटल?

महाराष्ट्रात मिध्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले घटनाबाहय सरकार येत्या विधानसभा निवडणुकीनंतर कायमचे परागंदा होणार असले तरी या ‘खोकेबाज’ सरकारने राज्याच्या तिजोरीची भयंकर दुर्दशा करून ठेवली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सहा वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेतील शेतकन्यांना कर्जमाफीची रक्कम देण्यास राज्याच्या वित्त विभागाकडे निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे 2017 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील असंख्य पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी निधीअभावी रखडली आहे. एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. बँकांची कर्जे, सावकाराकडून घेतलेल्या उधार-उसनवारी, बियाणे व खतांचे गगनाला खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि या सगळ्यांच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव याचा कुठलाच मेळ बसत नसल्याने राज्यातील तमाम शेतकरी वर्ग दिवसेंदिवस अधिकाधिक गाळात रुतत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या आत्महत्याग्रस्त बळीराजाविषयी राज्य सरकारला काहीच वाटत नाही.

2017 मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन कर्जमाफी योजना आणली. 1 एप्रिल 2001 पासून पीक व मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या, पण जून 2016 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची ही घोषणा होती. मात्र आधी महाऑनलाइन पोर्टलवरील गोंधळ आणि नंतर महाआयटीकडे हस्तांतरित झाल्यानंतरही सुमारे 1 लाख 30 हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची एकंदर 1 हजार 644 कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही शिल्लक आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी सलग 2 वर्षे पीककर्जाची परतफेड केली, अशा 1 कोटी 72 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांपैकी 2 लाख 33 हजार शेतकऱ्यांचेही 346 कोटी रुपये अद्याप देणे बाकीच आहे. आधी 2017 मधील शेतकऱ्यांचा डेटाच मिळत नसल्याचे थातूरमातूर कारण सरकारने दिले. मात्र आता हा डेटा मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची 6 वर्षांपासून थकीत असलेली ही रक्कम जमा करण्यात चालढकल करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार दणका दिल्यानंतर आपल्याला जनतेची किती काळजी आहे, हे दाखवण्याची स्पर्धांच मिंधे सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये लागली. त्यातून ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’ वगैरे लोकप्रिय योजनांचा सपाटा सुरू झाला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत. त्याआधी सरकारी तिजोरीतून एक प्रका रेदेऊन मतदारांना आकर्षित करण्याचाच हा प्रकार आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून दरवर्षी सरकारवर 46 हजार कोटी रुपयांचा भार पडणार असून हा निधी कोठून आणायचा? असा प्रश्न वित्त विभागाने केल्याचे वृत्त मध्यंतरी आले होते. मात्र जे अशक्य आहे ते आम्ही करतो, अशी दर्पोक्ती सरकारने केली.

सरकारने केलेल्या नव्या लोकप्रिय घोषणांसाठीच सरकारी तिजोरीत पैसा नाही. या नव्या योजनांसाठी लागणाऱ्या निधीची जुळवाजुळव करण्यात वित्त विभाग मश्गूल असल्यामुळेच सहा वर्षापूर्वीच्या कर्जमाफी योजनेतील उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव सरकारने धूळ खात ठेवला आहे. 2021-22 या वर्षात दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सहाव्या क्रमांकावर गेला आहे. राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज आहे, तिजोरीत खडखडाट आहे या वास्तवाचे भान न राखता ‘खिशात नाही दाणा, तरी मला बाजीराव म्हणा, या थाटात खोकेबाज सरकार ‘अमुक लाडका, तमुक लाडका’ घोषणा करीत सुटले आहे. मग कर्जमाफी योजनेतील ज्या शेतकऱ्यांची रक्कम 6 वर्षांपासून अडकून पडली आहे, ते शेतकरीच तेवढे सरकारच्या लाडाचे नाहीत काय? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

विनेश फोगटला न्याय मिळणार? 1 रुपयांत पाकिस्तानला घाम फोडणारा वकील लढवणार केस

Vinesh Phogat Harish Salve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ५० किलोपेक्षा जास्त वजन भरल्याच्या कारणाने तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र तिचे रौप्य पदक सुद्धा तिला गमवावे लागले. या एकूण सर्व घडामोडीनंतर आता विनेश फोगाटला न्याय मिळवून देण्यासाठी भारताने दमदार पावले उचलली आहेत. आता विनेशची लढाई हि कुस्तीच्या मैदानात नाही तर कोर्टात आहे. महत्वाची बाब म्हणजे जगप्रसिद्ध वकील हरीश साळवे हे तिच्याकडून केस लढणार आहेत. हरीश साळवे यांनी विनेश फोगटच्या वतीने क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) हजर राहण्याचे मान्य केले असल्याचे सांगण्यात आले. हे तेच हरीश साळवे (Harish Salve) आहेत ज्यांनी कुलभूषण जाधव यांची केस अवघ्या १ रुपयांत लढून पाकिस्तानला घाम फोडला होता.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) विनेश फोगटच्या अपिलासाठी सीएएससमोर वकील नियुक्त करण्यासाठी अतिरिक्त वेळेची विनंती केली होती. विनेशने दोन प्रकरणांमध्ये अपात्रतेविरुद्ध अपील केले होते. यातील एक म्हणजे तिचे वजन पुन्हा एकदा चेक करणे आणि दुसरं म्हणजे तिने जिंकलेले रौप्यपदक तिला कायम ठेवण्यात यावं, कारण मंगळवारी तिने योग्य वजन करूनच मॅच खेळली होती आणि जिंकली सुद्धा होती. यातील दुसऱ्या प्रकरणावर चर्चा करण्याची तयारी सीएएसने दर्शवली आहे.

CAS मध्ये आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता याबाबतची सुनावणी सुरू होईल. हरीश साळवे हे विनेश फोगटची बाजू मांडतील. हरीश साळवे हे देशातील सर्वात हुशार वकील मानले जातात. यापूर्वी हरीश साळवे यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला लढवला होता. लाखो रुपयांची फी घेणारे साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी फक्त एक रुपये फी घेतली होती. तसेच ती केस जिंकली सुद्धा होती. त्यामुळे आजही ते दमदार युक्तिवाद करून विनेश फोगटला न्याय देतील अशी अपेक्षा आणि इच्छा देशवासीयांची आहे.

प्रिस्क्रिप्शनशिवाय वजन कमी करणारे औषध खरेदी करता का? अभ्यासात धक्कादायक खुलासा समोर

Weight loss medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लठ्ठपणाची (Obesity) समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे अनेक लोक हे वजन कमी करण्यासाठी औषध देखील घेतात. परंतु डॉक्टरांनी सल्ला न देता कोणत्याही प्रकारची प्रिस्क्रिप्शन न देता, अनेक लोक तसेच औषध विकत घेतात. परंतु तुम्ही जर असे करत असाल, तर आता सावध व्हा. कारण अभ्यासात याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. ते म्हणजे आता वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन औषधे खरेदी करणाऱ्या फसवणूक किंवा उत्पादन मिळवण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आलेले आहे. अभ्यासातून असे लक्षात आलेले आहे की नोवो नॉर्डिस्कच्या लठ्ठपणाविरोधी औषध Vegovy मधील सक्रिय घटक semaglutide विक्री करणाऱ्या ऑनलाइन फार्मसींपैकी 42% बेकायदेशीर आहेत आणि परवान्याशिवाय औषधाची विक्री करतात.

प्रिस्क्रिप्शनशिवाय वजन कमी करणारे औषध खरेदी करण्याचे तोटे

या अभ्यासाचे लेखक आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सॅन डिएगो येथील जागतिक आरोग्याचे प्राध्यापक टिम मॅकी यांनी सांगितले की, जे लोक वजन कमी करणारी औषधे ऑनलाइन खरेदी करत आहेत त्यांना धोकादायक उत्पादने मिळत आहेत, ज्यांचे शरीरावर होणारे परिणाम अतिशय गंभीर आणि धोकादायक असू शकतात.

ट्रू यू वेटचे संस्थापक, संशोधन संचालक डॉ. क्रिस्टोफर मॅकगोवन यांनी सांगितले की, लोकप्रिय वजन कमी करणारे औषध जेएलपी-1एस नावाच्या औषधांच्या श्रेणीशी संबंधित आहे. औषध नसलेल्या औषधांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. ते म्हणाले की, बेकायदेशीर फार्मसीमधून निकृष्ट दर्जाची औषधे रुग्णांपर्यंत पोहोचत आहेत, ती अत्यंत धोकादायक ठरू शकते.

ही औषधे धोकादायक का आहेत?

शुक्रवारी जामा हेल्थ फोरममध्ये प्रकाशित झालेल्या एका वेगळ्या अभ्यासात असे दिसून आले आहे की अलिकडच्या काळात सेमॅग्लुटाइड खूप लोकप्रिय झाले आहे. डिसेंबर 2023 पर्यंत यूएसमध्ये 2.5 दशलक्षाहून अधिक प्रिस्क्रिप्शन अपेक्षित आहेत. प्रत्येकजण औषधांची मागणी पूर्ण करू शकत नाही ज्यांची मासिक किंमत 1,300 पर्यंत आहे. जेव्हा अनेकांना स्थानिक फार्मसीमध्ये हे औषध सापडत नाही, तेव्हा ते ऑनलाइन शोधू लागतात. जेथे टाइप 2 मधुमेहावरील उपचारांसाठी सेमॅग्लुटाइड देखील ओझेम्पिक म्हणून विकले जाते.

साखरेची पातळी कमी होऊ शकते

मॅकीच्या अभ्यासात, सहा ऑनलाइन फार्मसीमधून मागवलेल्या सेमॅग्लुटाइडच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सेमॅग्लुटाइडच्या एका बाटलीमध्ये एन्डोटॉक्सिनची उच्च पातळी असते, जिवाणू पेशींमध्ये आढळणारे विष. तथापि, संशोधकांना जिवंत जीवाणू सापडले नाहीत ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

Har Ghar Tiranga Abhiyan : आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु; सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केला कार्यक्रम

Har Ghar Tiranga Abhiyan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान (Har Ghar Tiranga Abhiyan) सुरु केलं आहे. आजपासून म्हणजेच ९ ऑगस्ट पासून या अभियानाची सुरुवात होणार असून १५ ऑगस्ट पर्यंत ते चालणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना त्यांच्या घरावर आणि कार्यालयात तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच प्रत्येकाने आपल्या व्हाट्सअप डीपीवर तिरंग्याचा फोटो ठेवावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे . हर घर तिरंगा या मोहिमेची सुरुवात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत

तिरंग्याबाबत लोकांमध्ये जागृती करावी- Har Ghar Tiranga Abhiyan

हर घर तिरंगा या मोहिमेच्या दरम्यान, सर्व राज्यांनी देशाचा राष्ट्रध्वज आणि तिरंग्याबाबत लोकांमध्ये जागृती करावी तसेच तिरंग्याशी जोडण्यासाठी उपक्रम राबवावे अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी याबाबत माहिती देत म्हंटल कि, हर घर तिरंगा मोहिमेत यंदा जास्तीत जास्त नागरिक सहभागी होऊन एक नवा इतिहास रचतील. यापूर्वी 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत सुरू झालेल्या या मोहिमेत एकूण सहा कोटी लोकांनी तिरंग्यासह त्यांचे फोटो मंत्रालयासोबत शेअर केले होते. तर 2023 मध्ये दहा कोटी लोकांनी तिरंग्यासोबतचे फोटो पाठवले होते. यंदा ही संख्या आणखी वाढणार आहे.

गजेंद्रसिंह शेखावत पुढे म्हणाले की, हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga Abhiyan) या अभियानांतर्गत प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकावण्याबरोबरच तिरंगा रॅली, तिरंगा दौड, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान लोकांना भारताचे तिरंगा चिन्ह कसे अस्तित्वात आले हे देखील सांगितले जाईल. या मोहिमेदरम्यान 13 ऑगस्टला देशातील खासदार तिरंगा बाईक रॅलीही काढणार आहेत. ही रॅली भारत मंडपमपासून नॅशनल स्टेडियमपर्यंत सुरू होईल. त्यात सहभागी होण्यासाठी सर्व खासदारांना निमंत्रित करण्यात आल्याचे शेखावत यांनी सांगितले.

Weather Update | ‘या’ 6 जिल्ह्यांमध्ये आज कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता. परंतु गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे नागरिक देखील आता स्वस्थ झालेले आहेत. कारण या पावसाचा अनेक लोकांना त्रास होत होता. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया हवामान विभागाने आज म्हणजे 8 ऑगस्ट रोजी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता | Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, यवतमाळ, अमरावती, रायगड, धुळे, वर्धा जिल्ह्यांमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेऊनच घराबाहेर पडण्याचे आव्हान देखील प्रशासनाकडून दिलेले आहेत. या भागात वादळी वारा देखील लिहिण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे पावसाचा (Weather Update) जोर कमी झाला असला तरी, घाट माथ्यावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तर रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाला रेड अलर्ट देखील झाली करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये देखील ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढे शहरात आणि परिसरात देखील ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस देखील येईल तसेच घाट माथ्यावर आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Cleaning Hacks : बाथरूमच्या आरशावर पडलेत डाग ? कोणत्याही केमिकल्स शिवाय मिनिटांत होईल साफ

Cleaning Hacks : हल्ली घरांमध्ये मोठमोठे फर्निचर केले जाते. शिवाय हे फर्निचर बनावत असताना काचेचा वापर अधिक केला जातो. कारण घरातल्या फर्निचर मध्ये काच असेल तर त्याची रौनक आणखी वाढते. पण अनेकदा या काचा साफ करणे कटकटीचे होऊन जाते. सध्याच्या घडीला बाजारात काचा साफ करण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. पण तुम्ही घराच्या घरी सध्या सोप्या ट्रिक्स वापरून काचा स्वच्छ करू (Cleaning Hacks) शकता. चला जाणून घेऊया …

पाणी आणि ओले कापड (Cleaning Hacks)

वॉटर स्प्रे किंवा ओल्या कपड्याने ग्लास साफ करण्याची चूक कधीही करू नका. असं केल्याने ही काच एकदा साफ होते पण त्यावरील रंग निघू लागतो शिवाय काळे डागही पडतात.

पेपर करेल कमाल (Cleaning Hacks)

जर तुम्हाला काच स्वच्छ करायची असेल तर कागदाचा जाडसर तुकडा घ्या. पेपर नसेल तर वर्तमानपत्र हे चालेल फक्त कोरड्या कापडाने काचेवरील धुळीचा हलका थर काढून टाका. नंतर कागदावर दोन ते तीन थेंब पाणी लावा कागद जास्त ओला करायचा नाही. आता पेपर हातात घट्ट धरून संपूर्ण ग्लास स्वच्छ करा या ट्रिकने कोणत्याही केमिकल शिवाय आरसा पटकन साफ (Cleaning Hacks) होतो.

घरगुती क्लिनर

बाथरूमच्या काचेवर पाणी किंवा साबणाचे डाग असतात किंवा आरसा त्यामुळे खूप घाणेरडा दिसू लागतो त्यामुळे तुम्ही घरगुती क्लीनरचा वापर करून तुम्ही काच स्वच्छ करू शकता यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि एक कप त्यामध्ये व्हिनेगर मिसळायचे आहे. आता हे मिश्रण काचेवर स्प्रे करा आणि मऊ टॉवेल किंवा सुटी कापडाने पुसून घ्या. त्यामुळे आरसा एकदम चमकू लागेल आणि लवकर (Cleaning Hacks) खराबही होणार नाही.